जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Vijay Lanjekar
Friday, May 13, 2022
vijaylan@rediffmail.com

नमस्कार साहेब,
माझा प्रश्न आहे प्रांतांच्या आदेशानंतर तलाठी फेरफार वरती इतर कोण कोण हरकत घेऊ शकत का?
आणि फेरफार झाल्या नंतर किती दिवसात हरकत घ्यावी लागते.?

Question by कल्पेश पाटील
Thursday, May 12, 2022
krp889@gmail.com

नमस्कार सर, माझे वडील यांच्या नावे सात बारा उताऱ्यावरती 1.79हेक्टर एवढे क्षेत्र आहे. त्यामध्ये 0.44हेक्टर लागवडीलायक व 1.35हेक्टर पोट खराबा (ब)असे क्षेत्र आहे. परंतु सध्या आंम्ही 1.35हेक्टर पोट खराबा पैकी 1.16हेक्टर एवढे क्षेत्र लागवडीयोग्य बनविले आहे व त्यामध्ये आम्ही सध्या पिकांची लागवड घेत आहोत.
१. आमच्या शेतात 19 गुठे आकाराचे ओढा/नाला आहे , त्यामूळे पूर्ण 1.35हे श्रेत्र पोट खराब ब मध्ये येते
तरी सदर 1.16हेक्टर हे क्षेत्र आम्हाला सात बारा उताऱ्यावरती लागवडीयोग्य क्षेत्र असे नोंदवून घ्यायचे आहे. तरी त्याबाबत माहिती द्यावी.
२. सदर 1.16हेक्टर हे क्षेत्र आम्हाला सात बारा उताऱ्यावरती लागवडीयोग्य क्षेत्र असे नोंदवून घेता येईल का?

Thanks ®ard
कल्पेश पाटील
8888363273
krp889@gmail.com
नमस्कार सर,
माझा प्रश्न - 7/12 वर खरेदी क्षेत्रापेक्षा जादा क्षेत्र लावणेत आले बाबत.
सर माझ्या पंजोबांनी 1960 रोजी कायदेशीर दस्ताद्वारे एका व्यक्तीस 0.6 गुंठे जागा विकली. त्यानंतर अशाच प्रकारे कुणाला 0.4 गुंठे कुणाला 0.2 गुंठे जागा विकल्या. त्याच्या एकूण मिळकती पैकी (6 एकर 21 गुंठे) केवळ 0.29 गुंठे जागा विकली. राहिलेली सर्व आजही आमच्या ताबेवहीवाटीस आहे.
1960 साली ज्या एका व्यक्तीस 0.6 गुंठे जागा विकली त्याची आणेवारी लावताना तलाठी यांनी बेकायदेशीरपणे आठआणे आणेवारी लावली. ही बाब माझे आजोबा लष्करातून निवृत्त होऊन गावी परतल्यानंतर त्याच्या ही बाब लक्षात आली व त्यांनी तसे तलाठी कार्यालयास कळविले परंतू त्यांना वरिष्ठांकडे तक्रार अर्ज करण्यास सांगण्यात आले 1981 पासून ते 2003 पर्यंत त्यांनी वेळोवेळी सर्व संबंधित कार्यालयास अर्ज करुन सदर चुकीची आणेवारी दुरुस्त करणेबाबत कळविले परंतू त्याबाबत कोणताच निर्णय झाला नाही.
जमीनीची ताबेवहीवाट जरी आमचेकडे असली तरी चुकीची दुरुस्ती झालेशिवाय आम्हाला गत्यंतर नाही हे लक्ष्यात आल्यानंतर आम्ही वकिलांमार्फत विभागीय आयुक्त यांचेकडे 2020 साली पुन्हा योग्या त्या कागदपत्रांच्या आधारे अर्ज केला तो चौकशीसाठी मंडलाधिकारी यांचेकडे आला, त्यांनी आम्हा दोन्ही पक्षांना जबाबासाठी बोलावले. आम्ही सादर केलेल्या दस्ताप्रमाणे त्यावर ɕ 6 असा उल्लेख असल्याने ɕ हे आणेचे चिन्ह असून 6 आणे खरेदी असल्याचा युक्तीवाद केला त्यावर आम्ही त्याच साली झालेल्या इतर दस्तांचा पुरावा देवून त्यांच्या खरेदीमधे सुध्दा ɕ हेच चिन्ह असून ते पै असून ती खरेदी गुंठ्य़ामधे असल्याचे सांगितले तसेच त्यावर झालेल्या फेरफारवर सुध्दा विक्री करुन राहिलेले क्षेत्राचा उल्लेख आहे.
खरेदीजर 6 आणे ची असती तर खरेदी तारखेपासून आजरोजी पर्यंत सदर खरेदीदार अथवा त्यांचे वारस यांनी 6 गुंठेव्यतिरिक्त त्यांची वहीवाट कधीच नव्हती.
त्यांच्या युक्तीवादाला कोणताही ठोस पुरावा व संदर्भ नाही तरीही मंडलाधिकारी म्हणतात त्यांचा युक्तीवाद योग्य वाटतो.
याबाबत आम्ही पुढे काय करावे याबाबत मार्गदर्शन करावे.
मी औरंगाबाद कर मी 2000 साली 600qr फूट प्लॉट दुय्यम निबंधक कार्यालय नोंद करून घेतला. ज्या व्यक्ती कडन घेतला त्या व्यक्तीच 7/12 नाव नाही व मी जे खरेदीखत केल आहे त्या मध्ये (र. डे. बुक नंबर 6534 व दिनांक 5-6-89) अशा प्रकारे नोंद आहे व मी 6534 हा दस्त क्रमांक आधारे दुय्यम निबंध कार्यालय मध्ये गेलो असता तिथे मला दुसऱ्या इसमा च्या दस्त क्रमांक आहे हे दिसले हे कस खरं असु शकत माझा दस्त क्रमांक आणि वर्ष व इतर इसमाचा दस्त क्रमांक व वर्ष एक सारखं आसू शकतो का. क्रुपया सहकार्य करावे
आदरणीय मोहदय,

श्री किरण पाणबुडे साहेब कृपया आपल्याकडून उत्तराची अपेक्षा आहे, कृपया मार्गदर्शन करा.

सन १९३६-३७ साली कसत असलेल्या जमिनीवर पणजोबा हे संरक्षित कुळ होते. नंतर त्यांचा मोठा मुलगा (चुलत आजोबा) यांचे नाव साधे कुळ म्हणून लागले. माझे आजोबा हे मुंबई ला एकत्र कुटुंबातील दुकान संभाळत होते. तर चुलत आजोबा हे गावी शेती संभाळत होते. पणजोबा चें निधन (१९५० ला) झाल्यावर शेतीचे चे सर्व अधिकार हे चुलत आजोबा (ए कु म्या) यांचा कडे होते. पुढे १९६४ साली चुलत आजोबा यांनी वर्दी देऊन माझ्या आजोबांना कुळ हक्का ने कसत असलेली जमीन सोडून बाकीच्या जमिनीचे वाटप करून दिले. (पणजोबा पासून कुळ हक्काने कसत असलेली जमिनीची केस चालू होती म्हणून ती जमीन चुलत आजोबा यांनी वाटप करून नाही दिली) पुढे सन १९७१ साली चुलत आजोबा यांनी पणजोबा पासून कुळ हक्का ने कसत असलेली जमिनीचे खुश खरेदी करून जमीन मालक यांच्याकडून जमीन खरेदी केली व ७/१२ सदरी त्यांचे नाव लागले. माझे आजोबा यांचे १९७७ साली निधन झाले. तरी पुढे हि गावी असलेल्या जमिनीचे सर्व अधिकार हे चुलत आजोबा यांच्या कडे होते व त्यांच्या बरोबर माझे काका हे त्यांना जमिनी कसण्यासाठी मदत करत होते. पुढे चुलत आजोबा यांनी कुळ हहक्काने खरेदी केलेली जमिनीचे त्यांच्या पुतण्यां ना (माझ्या वडिलांना) त्या जमिनीचे आर्धी वाटप करून दिले पण ७/१२ वर नोंद नाही केली. सन १९९७ साली चुलत आजोबा यांचे निधन झाले व त्या नंतर आज रोजी त्यांच्या नातवांचे नाव ७/१२ आहे.

माझे प्रश्न: असे आहेत

१) पणजोबा पासून कुळ हक्काने कसलेली जमीन त्यांच्या नंतर मोठा मुलगा (चुलत आजोबा) खरेदी करतात तर त्यावर पणजोबा चा लहान मुलगा (माझे आजोबा) यांचा हक्का आहे का ?
२) चुलत आजोबा यांचे नातू आज कुळ हक्कातील जमीन नवा वर करून देण्यास तयार नाहीत व सांगत आहे तुमचा हक्का नाही आहे हे बरोबर आहे का ?
३) चुलत आजोबा यांनी हयात असताना स्वतः माझ्या वडिलांना कुळ हक्कातील खरेदी केलेल्या जमिनीचे प्रत्येक्षात अर्धे वाटप करून दिले पण ७/१२ नोंद केली नाही. तर ७/१२ सदरी नाव नोंद करण्या साठी काय करावे लागेल ?

सर कृपया मार्गदर्शन करावे.
सर, आदिवासी
सोनबाला सन १९५६-१९५७ ला सं. कुळ लागले आणि सं. प. असा शेरा आहे आणि मुळमालकाने सन १९५९ ला शेत दुसऱ्या व्यक्तीला विकले आहे
याबाबत मार्गदर्शन करावे.

Question by Sagar patil
Monday, May 02, 2022
sp109391@gmail.com

सर माझा प्रश्न असा आहे की माझ्या वडिलांना धरून तीन भावंडे असे चार भाऊ आहेत चारी भावांनी मिळून 2012 ला 41 गुंठे जमीन खरेदी केली त्यातील लहान भावाने दुसऱ्या 3 नि भावा ना न विचारता जमीन स्वतःच्या नावावर खरेदी करून घेतली दुसऱ्या तीन नि भावाकडे आपण जमीन घेतली आहे असा कोणताही पुरावा नाही तदनंतर तो लहान भाऊ मृत्यू पावल्यानंतर त्याच्या पत्नीचे व मुलांचे वारसा म्हणून लागले आहेत त्या सातबारा मध्ये या तिन्ही भावांचा कोणताही अधिकार नाही बरोबर आहे परंतु आत्ता त्या लहान काका ची पत्नी वडीलोपर्जित जमिनीत हक्क मागत आहेत ती वडिलोपार्जित जमीन आमच्या ताब्यात आहे त्या वडिलोपार्जित जमिनीचा दस्त काढले असतात ती जमीन आजोबांच्या वडिलांची नसून स्वतः आजोबांनी नोंदणीकृत खरेदीखताने विकत घेतली आहे त्यानंतर आजोबा मयत झाल्यानंतर चारी भावंडांची व आमच्या आजीचे देखील नाव लागले आहे तर आजीच्या पतीने जमीन घेतली असल्याकारणाने ती जमीन कोणत्याही मुलास न देण्याचा किंवा इतरत्र विक्री करण्याचा अधिकार आहे काय? आजीला विक्री करण्याचा किंवा मुलांना न देण्याचा अधिकार नसेल तर त्या काकू चे आजोबांच्या जमिनीतून हक्क काढून घेण्यासाठी काय करावे लागेल
सर माझा प्रश्न असा आहे
माझी सख्खी मोठी आईला शासनाने जमीन दिली होती.सदर मोठी आई निपुत्रिक होती.त्या मुळे तिने मृत्युपत्र तयार केले होते.त्या मध्ये एक हिस्सा माझ्या नावाने व दुसरा हिस्सा बाहेरच्या व्यक्तीच्या नावाने होता. पण माझी मोठी आई चे मरण होण्याअगोदर बाहेर च्या व्यक्ती मरण पावली व मृत्यूपत्र जसेच्या तसेच ठेवले. त्यामुळे माझ्या वडिलांनि वारस म्हणून कोर्ट कडून वारस प्रमाण पत्र मिळवून शेती माझ्या नावाने करण्यासाठी अर्ज केला होता. पण मृत्युपत्र असल्याने सदर प्रकरणात वाद आला आहे तरी सध्या प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्या समोर सुरू आहे. उपविभागीय अधिकारी म्हणतात कोर्ट वारस प्रमाण पत्र नुसार शेती ची फेरफार नोंद करायची असेल तर मला शासनाचा नियम किंवा कोर्ट आदेश दाखवा तरी आपण मला मृत्युपत्र नुसार फेरफार नोंद होणार नाही असा कोर्ट आदेश देण्यात यावा

Question by Pradip
Friday, April 29, 2022
pradeep7wadkar@gmail.com

नमस्कार सर
मौजे पाचगणी, ता, महाबळेश्वर टि पी स्कीम नं ३ ही १४ नोव्हेंबर १९३३ ला मंजूर झाली. व १ जानेवारी १९३४ पासून अंमलात आणली गेली.
या टि पी स्कीम अंतर्गत ३ सर्वे नं चा मिळून फायनल प्लॉट नं ४९९ हा फेरफार नं १२४९ ने २३/९/१९४५ रोजी फेरफार नोंदवहीत नोंद घेण्यात आली.
सदर प्लॉटची मिळकत पत्रिका १९४० साली करण्यात आली. परंतु सदर जमिनीचा समावेश नागरी भूमापन क्षेत्रात झालेला असतानाही दि. २८/४/१९४९ रोजी तलाठ्याने सदर फायनल प्लॉटवर फेरफार १३४९ ने संरक्षित कुळाची नोंद केली.व सदर जमीन कुळाने मिळकत पत्रिकेवर दुसरा मालक असताना स्वतःचे कुळ दाखवून ती जमीन तिसऱ्या व्यक्तीला परस्पर विकली .

१. बिनशेती झालेल्या किंवा नागरी भूमापन क्षेत्रात समावेश झालेल्या जमिनीवर तहसीलदार यांना कुळ
लावण्याचा तसेच सुनावणी घेण्याचा अधिकार आहे का ? तहसीलदार महसूल अधिकारी आहेत.
अधिकार असेल तर कसे ? ते चुकीचे असेल तर कसे सिद्ध करावे लागेल .

२. महाराष्‍ट्र शासन, महसूल व वन विभाग परिपत्रक क्रमांक एस-१४९७/प्र.क्र-५१३/ल-६, दिनांक २४/११/१९९७ अन्‍वये खालील सूचना दिलेल्‍या आहेत.
ज्‍या क्षेत्रात भूमापनाचे काम पूर्ण झाले आहे आणि त्‍या क्षेत्रातील मिळकतींची मिळकत पत्रे तयार झालेली आहेत अशा जमिनींबाबत सात-बाराचा वापर करण्‍यात येऊ नये. मिळकत पत्र हेच अशा जमिनीचे कायदेशीर कागदपत्र समजावे. असे असताना सातबारावर नोंदी घेतल्या गेल्या. त्या बेकायदेशीर आहेत हे कसे सिद्ध करावे लागेल.

३. मिळकत पत्रिका व सातबारा दुहेरी पद्धत बंद करणेसाठी सरकारने वेळोवेळी सूचना दिलेल्या असतानाही ज्या फेरफार नोंदी मिळकत पत्रिका झाल्यानंतर घेतल्या गेल्या असतील त्यांना कसे रद्द करता येईल.
कुळ कायद्‍याच्‍या तरतुदी शेतजमिनीसाठी लागू आहेत. सदर जमीन बिनशेती झाल्‍याबाबत अभिलेखात नाोंद नसल्‍यामुळे असा प्रकार घडला असावा. आपण वस्‍तुथिती पुराव्‍यासह तहसिलदारांच्‍या निदर्शनास आणून द्‍यावी. ते याोग्‍य ताो निर्णय घेतील. किंवा तहसिलदारच्‍या निर्णया विरूध्‍द अपील दाखल करावे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्ते ग्राहक मंच न्यायालय मधील दाव्यानुसार घर विक्री प्रकरणात फसवणूक केलेल्या बिल्डर ची जमीन जप्त करण्याचे व लिलाव करण्याचे आदेश मा. कलेक्टर यांचे आदेश सन 2020 या वर्षी झालेत . संबधित जागेत बेकायदेशीर रहाणारे सुमारे 150 घरामधे कुटुंबे रहात आहेत .लिलाव साठी खरेदीदार येत नाही .कारण सदर कुटुंबांना निष्कासित करने तहसीलदार यांची जबाबदारी आहे . पण हे काम करण्यात टाळाटाळ होत आहे . यावर कायदेशीर प्रक्रिया काय आहे ते कृपया कळवा ही विनंती .

Question by Vishal Eknath khairnar
Monday, April 25, 2022
vkhairnar9284@gmail.com

नगर भूमापन योजना लागू असेल त्याठिकाणी मिळकत पत्रिकेवर ब सत्ता प्रकार नमूद असेल तर अशा मिळकतीची पोट हिस्सा मोजणी करावयाची असेल तर सक्षम प्राधिकरणाची पोट हिस्सा मोजणी कामी परवानगी घेणे आवश्यक आहे का? असल्यास त्याबाबत शासन निर्णय / परिपत्रक त्याची तारीख मिळावी

Question by Vishal Eknath khairnar
Monday, April 25, 2022
vkhairnar9284@gmail.com

भोगवटादार वर्ग २ ची जमीन असेल तर अशा जमिनीची पोट हिस्सा मोजणी करावयाची असेल तर सक्षम प्राधिकरणाची पोट हिस्सा मोजणी कामी परवानगी घेणे आवश्यक आहे का? असल्यास त्याबाबत शासन नियम कोणता किंवा याबाबत शासन निर्णय / परिपत्रक असल्यास त्याची तारीख मिळावी
मोजणी म्हणजे हस्तांतरण नाही त्यामुळे परवानगीची आवश्यकता नाही

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर्वे न 7/12उतारामधे 1952साली कुल खंड या कॉलम ला आमचे आजोबाच्या नवाची कर्ता अशी नोद आहे. 2/9/1952 साली त्यांचे मुत्यु पच्यात 1953साली कुल खंड कॉलम सदरी कर्ता म्हणून कुटुंबातील जेष्ठ मुलाची नोंद होईल अथवा इतर सर्व मुलांची कर्ता म्हणून नोंद होईल.
जेष्ठ मुलाची नोंद करण्‍याची तरतुद आहे. तथापि, सध्‍या आपले कुटुंब एकत्र कुटुंब नसेल तर तहसिलदारकडे किंवा ऑन लाइईन तसा अर्ज आणि पुरावे सादर करून सदर नाोंद दुरूस्‍त/कमी करून घ्‍यावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Sijauddin mujawar
Monday, April 25, 2022
sijauddinm786@gmail.com

नमस्कार सर, मी कोल्हापूर जिल्हातील सामान्य शेतकरी माझा प्रश्न आसा की, कुळ कायदे मध्ये 32ग सर्टिफिकेट कुटुंबातील एकुप चा नावे दिले असेल तर इतर वारसांचा हक्क त्या जमिनीत राहिल का ?
कुळकायद्‍यान्‍वये ३२-म चे प्रमाणपत्र दिले जाते. सदर सर्टिफिकेट कुटुंबातील एकुप च्‍या नावे दिले असले तरी इतर वारसांचा हक्क त्या जमिनीत राहिल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय महोदय,

मा. तहसीलदार, उस्मानाबाद यांनी दि.१३/०४/१९९२ व दि.२९/०६/१९९६ रोजी शहरातील दोन वेगवेगळ्या सर्व्हे नंबर करिता इंग्रजीमध्ये मजकूर असलेल्या ५-६ पानी बिनशेती आदेश पारित केलेला आहे. तसेच त्यामधील एका आदेशासोबत असणा-या ले-आऊट प्लॅनवर देखील तहसीलदार यांची स्वाक्षरी आहे. सध्या महाराष्ट्र मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय तसेच शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०२० रोजी पर्यंतचे प्लॉटस् गुंठेवारी कायद्यानुसार नियमित करणेत येत आहेत. तेंव्हा मला उस्मानाबाद शहरातील दोन वेगवेगळ्या सर्व्हे नंबर मधील प्लॉटचे जुने बिनशेती आदेश असताना देखील गुंठेवारी कायाद्यानुसार उस्मानाबाद नगरपरिषदेकडून प्लॉटस् नियमित करुन घ्यावेत किंवा कसे याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावे, ही नम्र विनंती.
उस्मानाबाद नगरपरिषदेकडे चौकशी करणे उचित

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by मनोज
Thursday, April 21, 2022
sagarkandekar1990@gmail.com

सर ,
आम्ही चार भाऊ असून आमची सामाईक मालकीचा 130 गुंठे असलेले शेत जमीन आहे तसेंच आपसात कटुता असल्याने वाटप झालेले नाही.माझे तिन्ही भाऊ नौकरी आणि व्यवसाय निमित्त शहरात राहता व सर्व शेती मीच कसतो.शेजारील शेतकऱ्यांच्या अतिक्रमण ना मुळे सदर जमिनीची मला हद कायम मोजणी करायची आहे तर मला इतर सर्व भावाची संमति लागेल का ? तसेच शेत जमीन हद कायम मोजणी साठी कुठला कायदा किंवा कलम लागू पडते?
आपण संबंधित भूमी अभिलेख विभागाशी संपर्क साधल्या‍स आपणास सविस्‍तर माहिती मिळेल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by गोविंद
Wednesday, April 20, 2022
selfhood.agency@gmail.com

भोगवटादार वर्ग 2 मधील जमिनीचे कुटुंब अंतगर्त हक्कसोड करण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणती फी जमा करावी लागते? प्रांत कार्यालयातील कर्मचारी रेकनरप्रमाणे ५०% फी भरावी लागेल असे सांगत असल्यास काय करावे लागेल?
जमिनीवरील स्‍वत:चा हक्‍क साोडणे म्‍हणजे स्‍वत:च्‍या हक्‍काचे हस्‍तांतरण करणे हाोय. यासाठी सक्षम अधिकार्‍याची परवानगी व नजराणा अदा करणे आवश्‍यक

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by omkar s
Wednesday, April 20, 2022
sawanton44@gmail.com

महोदय ,
गवात आमची वादिलौत्परजीत जमीन आसून ति वर्ग 1 आहे एकून जमीन 1 एकर आहे त्यापैकी 24 गुंठे माधे सार्वजानिक बांधकाम विभाग चे विश्राम गृह आहे व इतर जगेत घर आहेत . आजोबा च्या नंतर वडील व चूलते यांची नावे 7/12 लागली आहेत. या जमिनिचा शेतफाळा आज रोजी पर्यंत आम्ही भरत आहे , सदर च्या जामिनी संधर्भात सा. बा . विभागाकडे महिती आधिकार अंतार्गत जगेच्या मालकी ची कागद पात्रे मगितली असता त्याच्याकडे कोणतेच कागद अढाळ होत नाही , असे सांगितले .
तसेच या विभागा कडे खालील बाबी मगितल्या असता कोणतेच कागद उप्लभ्धा नाहीत
1.विश्राम गृहाच्या जागेचा बिगर शेती परवाना.
( शासकीय इमारती बाढ्न्यासाठी जमीन बिगर शेती लागतो का ?)
2.विश्राम गृहाच्या बंधाकामाचा नकाशा अधिकृत साही शीक्क्या सहित.
3.महसुल विभागाने सुपूरद केलेल्या हस्तंतर्नाचे दस्ताएवज व जामिनी चा नकाश्या.
4.महसुलक विभागाकडून भूसंपादानसाठी जमिनिच्या विनियोजनसाठी
केलेली कार्यवाही.
वरीलकोणतेच कागद विभागाकडे नाहीत , तसेच 1962 पसन चे 7/12 व फेरफार तपासले असता त्यात या विभागाचा कोठेच उल्लेख नाही .सादर विभागाचे या जगेवर अतिक्रमण म्हंता येइल का ?
तसेच पिक-पाणी साठी 5 गुंटे माधे नाव या विभागाचे नाव आहे.
कृपया मार्गदर्शन कारवे.
सा. बा . विभागामार्फत भूसंपादन झाले असावे असे वाटते. भूमी अभिलेख विभागाकडे चाौकशी करावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by सुभाष मेहेंदळे
Wednesday, April 20, 2022
charu_11@yahoo.com

माननीय महोदय
दिनांक १५ /०४ /२२ ला वर्तमान पत्रात आलेल्या बातमी नुसार महसूल व वन विभागाचे सह सचीव श्री. रमेश चव्हाण ह्यांनी पारीत केलेल्या आदेशानुसार गावठाण पासून २०० मिटरचे अंत असलेल्या जमिनी अकृषिक करण्यासाठी अर्ज देण्याची गरज नाही माननीय तहसीलदार साहेब ह्यांना अशा जमीनिंची यादी तयार करून सभधीताना सूचना दिली जाईल असे म्हटले आहे ह्या आदेशाची प्रत मला मिळावी ही विनंती
आपला नम्र
सुभाष मेहेंदळे म-९८५०८७०७२७
सोबत बातमी जोडत आहे
15th April 2022:
After changes in the Maharashtra Land Revenue Rules 1966, there is no need to apply for a non-agriculture (NA) certificate for land within 200 metres of Gaothan (old village areas) As per a circular issued by the revenue department’s joint secretary Ramesh Chavan, the rule has come into immediate effect across the state. The local authorities (Tehsildar) have been asked to prepare survey numbers for residential, commercial and industrial zones of the land (except those which have been already converted to NA). The landowners will be sent NA tax and conversion charges notices.
सदर सुधारणा म.ज.म.अ. कलम ४२-ड मध्‍ये केली गेली आहे. शासनाच्‍या संकेत स्‍थळावर किंवा तहसिलदार कायार्यालयात हे सदरचे परिपत्रक उपलब्‍ध आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Sandesh Suresh Nangare
Tuesday, April 19, 2022
Sandesh.Nangare@Gmail.com

माझी वडिलोपार्जित जमीन ही सातबारा उतारा व खरेदी खत तसेच सर्वे नंबर पर्यंत मला माहिती आहे परंतु जर मी सर्वे नंबर मध्ये ती जमीन कुठे आहे हे कसे शोधू शकतो याकरता काही शासकीय मार्ग उपलब्ध आहे का?
भूमी अभिलेख विभागाशी संपर्क करावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.10 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 2573
कुंडेटकर संजय नरेंद्र 535
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 46
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
कामराज बसवंन्‍ना चौधरी 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
रामदास के कोळगने 6
श्री.मोहन टिकले 6
श्री. महेश शेवाळे 4
अजित नथू शेलार 3