जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by गणेश शिंदे
30-10-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,शेतजमिनीची सरकारी मोजणी केली असता ७/१२ पेक्षा ६ आर क्षेत्र जास्त भरते त्याबाबत आजूबाजूच्या कोणत्याही शेतकऱ्याची हरकत नाही .तर मोजणी नकाशावरून ७/१२ सदरी बदल करता येईल का? त्याबाबत काही शासन निर्णय आहे का?
क्षेत्र दुरुर्स्ती साठी जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by युजवेंद्र
30-10-2015
yujavendra.rajput7@gmail.com
सर १९८५ ला वडिलांनी वर्ग२ ची शेती रजिस्टर सोदापावती करून खरेदी केली. नोंदणी व मुद्रांक विभागात नोंद केली. शेती मालकाने जून १९८५ ला तहसीलदर कार्यालय ला परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला
१९८९ ला शेती मालक मयत झाले
१९९१ साली तहसील कार्यालय कडून संबधित मालक मयत झाले असल्यमुळे वारस लावावे व नव्याने अर्ज सादर करावे असे कळविले परंतु पत्र आम्हाला २०१४ साली प्राप्त झाले. आता शेती जमीन मालकाच्या लहान भाऊ च्या पत्नी च्या नांवे आहे
सदर शेती वरील वारस आता आमच्या नावाने शेती करून देण्यास तयार नाही.
मी न्यायालयात जावे कि तहशील कार्यालय शी पत्र व्यवहार करावा
कृपया मार्गदर्शन करावे
वर्ग २ ची जमीन असल्यामुळे , आपण प्रथम त्याचे विक्री/खरेदी साठी , सक्षम अधिकारी ब यांची परवानगी घेणे आवश्यक होते .
आपण सौदा पावती ने खरेदी केलेई आहे म्हणता ? सौदा पावती म्हणजे नेमके काय केले आहे ?
हा साठे करार आहे कि खरेदी खात केले आहे ?
साठे करार असेल तर , आपणास प्रथम सक्षम अधिकारी यांचीपरवानगी घेणे आवश्यक आहे . परवानगी घेत्क्या ननतर , सध्याचे मालक यांचे विरुद्ध Specific Relief Act खाली दावा दाखल करावा लागेल .
जर परवानगी न घेत खरेदी केली असेल , तर अशे हस्तांतरण नियामंकुल करून घेणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
30-10-2015
ravindra.golesar@rediffmail.com
सर, वाटणी न झालेल्या जमिनीमध्ये २५ आंब्याची झाडे आहे. त्यातील ८ झाडे मृत झाली आहे. त्यातील काही झाडे माझ्या घराच्या छपरावर पडण्याच्या स्थितीत आहे. वाटणी न झाल्याने भाऊ सदरची झाडे तोडण्यास हरकत घेत आहे. या बाबत कोणाकडे दाद माघावी.
Question by Mahesh More
30-10-2015
mr.moremahesh@gmail.com
रहिवासी na केलेल्या जमीन मध्ये open space म्हणून असलेल्या जागेची विक्री करता येते का
नाही
Open Space हि स्थानिक स्वराज्य सौन्स्थेच्या मालीकीची असते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मयुरेश
29-10-2015
mayuresh.dere@gmail.com
जमीन खरेदी केल्या नंतर तलाठी कडे जमीन खरेदीची नोंद करावी लागते त्याची procedure काय? जमीन विकणारा व खरेदी करणारे दोघांच्या हि सह्या तलाठी कार्यालयात होणे आवश्यक असते का ? या बद्दल चा GR असल्यास नमूद करावे
खरेदी खात नोंदणीकृत असेल तर असेल तर खरेदीदराने कळवणे बंधनकारक नाही.
फेरफारदोघांकडे चौकशी केली जाते
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम १४९]१५० vacha
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by गणेश शिंदे
28-10-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,अ व्यक्ती १९३५ पूर्वी मयत झाली.त्याच्या नावे असलेल्या जमिनीस त्याच्या 3 मुलीन.पैकी २ मुलींची नावे दाखल न होता भावांची नावे वारस म्हणून दाखल आहेत .आज रोजी सदर जमीन तिऱ्हाईत व्यक्तीच्या नावे खरेदीखताने झाल्यास मूळ वारस मुलींच्या नातवाना सन २००५ च्या कायद्यानुसार त्यांच्या हक्कासाठी अपील दाखल करता येईल किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by संतोष भा जवरे
28-10-2015
jaware_sb@rediffmail.com
गुरचरण जमिन अतिक्रमण नियमानुकूल होऊन एका व्यक्तीला नवीन अविभाज्य शर्तीने मिळाली आहे. त्या व्यक्तीने मुलीच्या मुलाचे नांवे या जमिनीचे मृत्युपत्र दिले आहे.
तसेच मृत्युपत्र लिहणाऱ्या व्यक्तीला दोन मुली आहेत.
तर सदर जमिन न.अ.शर्ती च्या जमिनीमध्ये मृत्युपत्रानुसार नांव दाखल करावे अगर सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे काय?
Question by गणेश शिंदे
28-10-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर, जमीन मनपा.हद्दीत असून निवासी हद्दीत आहे .१ आर खरेदी केल्यास ७/१२ सदरी नोंद होईल का?तुकडेबंदी लागू होईल का?
Question by गणेश शिंदे
27-10-2015
bkganesh.shinde10@gmail.com
एकत्र कुटुंब कर्ता असलेल्या व्यक्तीने १९८३ मध्ये संपूर्ण जमीन तिर्हाईत व्यक्तीस विकली असल्यास आता अपिल करता येऊ शकेल का?
Question by गणेश शिंदे
27-10-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,अ व्यक्ती सन १९३०-३५ दरम्यान मयत झाली.सदर व्यक्तीस ३ मुली होत्या.मुले नव्हती.तर त्यावेळी मुलींची नावे ७/१२ च्या कब्जेदार सदरी लावता येत होती का?याबाबत शासन निर्णय आहे का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by मुखान
26-10-2015
k.moosa66@yahoo.com
हे संकेतस्थळ कोण वापरू शकते. फक्त महसूल विभागाचे अधिकारीच वापरू शकतात. की सामान्य जनता ही वापर करू शकते.. जर हो.. तर आम्ही नोंदणी कशी करावी. .माग॔दश॔क करावे. .
नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्याशिवाय हि आपण माहिती वाचू शकता . धन्यवाद .
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by मनोज शिंपी
26-10-2015
manoj.shimpi999@gmail.com
सर , ७/१२ उताऱ्यावरील पोटखराब जमीन वहिती लायक करता येते का ? वहिती लायक करण्याचे अधिकार कोणास आहे व त्याबाबतची प्रकिया कशी आहे. कृपया मार्गदर्शन होणेस विनंती .
होय
क्षेत्र दुरुस्ठी साठी आपणास जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
25-10-2015
ravindra.golesar@rediffmail.com
माझ्या शेती जवळ पाझर तलाव आहे. मला माझ्या शेतीमध्ये विहीर खोदावयाची आहे. पाझर तलाव पासून किती अंतरावर विहीर खोदावी असे काही नियम आहे का?
भू जल कायद्या नुसार , सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतापासून ५०० मीटर , अंतराच्या आत , विहित खोदता येत नाही .
पाझर तलावाची , सार्वजनिक पाण्याचा उद्भव म्हणून , नोंद आहे का पहा ?
जर सार्वजनिक उद्भव नसेल तर , आपणास ५०० मीटरचे आत विहीर खोदता येयील . अन्यथा ५०० मीटर चे बाहेर विहित कोह्दा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सोनाली कहात
25-10-2015
Sonalikahat@rediffmail.com
माझे वडील हे राज्य शासनाच्या महसूल विभागातून अव्वल कारकून म्हणून ५ वर्षा पुर्वी सेवा निवृत्त झाले आहेत. पण अजूनही त्यांना सेवा निवृत्त वेतन मिळाले नाही. आम्ही मुंबई मध्ये असलेल्या आयोगा कडे ही वारंवार तक्रारी आणि अर्ज करूनही आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जर शासन त्यांच्या कर्मचाराचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सोडवणार ?
जिल्हाधिकारी कार्यालय , आयुक्त कार्यालय येथे , नियमितपणे , Pension अदालत आयोजित केली जाते
तेथे आपला प्रश्न मांडा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमित विजय गायकवाड
22-10-2015
amit_gk1@yahoo.com
माझे आजोबा तुकाराम कोडूं गायकवाड हे १९७७ रोजी मयत झाले त्यानां २ मुल १)सखाराम २)विजय मयत झाले १९८२
आज़ोबा च्या नावे जी जीमन होती तीचा शेतसारा न भरल्याने सरकारी पड नाव नोदं होती नतंर १९९९ रोजी सखाराम याने शेतसारा भरून एकट्यानेच नाव लावले आम्ही विजयचे वारस मुले आहोत आम्ही वारस नोदं कशी करू मदत करा
सर्वप्र्रथम श्री तुकराम यांचे वारस रहिस्टर उतारा पाहा त्यात जर दोन्ही मुलांची नावे असतील तरच तुम्ही तुमची नावे लावणेबाबत तहसीलला अर्ज देऊ शकता
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by शिवाजी बनसोडे
21-10-2015
shivajikb17@gmail.com
ग्रामपंचायत ची जागा आहे ती एका शिक्षण संस्थेला द्यायची आहे तसा ग्रामपंचायत व ग्रामसभेने ठराव पारित केला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगी साठी प्रस्ताव सादर करावयाचा आहे प्रस्तावासोबत कोणती कागद पत्र जोडून द्यायला पाहीजे म्हणजे परिपूर्ण प्रस्ताव होईल सविस्तर मार्गदर्शन व्हावे
१. मिळकतीचा अधिकार अभिलेख
२. ग्राम पंचायत ठराव
३. मिळकत ग्राम पंचायतीची आहे त्या बाबत , रजिस्टर मधील उतारा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by swati swami
21-10-2015
swati.swami@yahoo.com
उपविभागीय अधिकारी यांना त्याचे उपविभागात महसुलशी निघडीत उपक्रम / कार्यक्रम राबवायचे असतील तर varisthanachi परवानगी घेणे गरजेचे आहे का ?
Question by स्वाती स्वामी
21-10-2015
swati.swami@yahoo.com
तलाठी हे नवीन नियुक्तीने १ आठवड्यापूर्वी रुजू झाले आहेत . त्यांना विभागीय दुय्यम सेवा परीक्षा पुढच्या महिन्यातील देत येईल का ?
Question by कपिल इंगळे
21-10-2015
ingle.kapil5@gmail.com
फौजदारी प्रक्रीया संहिता कलम १०७ च्या प्रकरणात जाब देणार यास अनेक वेळा समन्स पाठवुन जर तो तारखेवर हजर होत नसेल तर काय कार्यवाही करावी ?
अटक वॉरंट काढा आणि पोलीसाना अटक करुन हजर करणेचे आदेश द्यावेत
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by गणेश सुभाष माजरेकर
21-10-2015
mjrkrganesh@gmail.com
साहेब, प्रांत साहेबांनी संहीता 133 नुसार दाखल झालेल्या प्रकणाचा निकाल जवळपास एक वर्षांनंतर दिला. त्यामध्ये माझा अर्ज मान्य केला गेला व विरोधी पक्षाला १५ दिवसांच्या आत आवश्यक खात्याची परवनागी मिळवून कडूनिंबाचे तसेच नारळाचे झाडाचे धोकादायक फाटे तोडण्याचा आदेश दिला. परंतु विरोधी पक्ष अजूनही सदरची उपद्रवी झाडे तोडण्याच्या मनस्थिती दिसत नाही. साहेब आपली लोकशाही तसेच आपली न्याय प्रकीया आपल्याला माहीत आहे. तर मला एवढंच मार्गदर्शन पाहीजे आहे की, विरोधी पक्ष सदर आदेशा विरूध्द कुठे अपील करू शकतात वा वकीलांशी चर्चा करून कोणता मार्ग काढू शकतात. कृपया मार्गदर्शन तात्काळ देण्यात यावे. मी वाट पाहात आहे.
Question by राजेंद्रप्रसाद राउत ( ग्रामसेवक )
21-10-2015
rajendraprasadraut@gmail.com
माझ्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये एका कुटूंबाने दोन-तीन घरांचा पारंपारिक रस्ता बंद केला आहे. त्यामध्ये दगड टाकून सिमेंटचे क्राँकीटकरण आपल्या फायद्यासाठी केले आहे. त्यामुळे इतर घरातील वा वाडीतील ग्रामस्थांना त्याचा त्रास होत आहे. त्यांनी या साठी ग्रामपंचायत मध्ये तक्रार केली. परंतु तंटामुक्ती ही प्रश्न सोडवू शकली नाही. तरी साहेब आम्ही सदर प्रकरणामध्ये त्या ग्रामस्थांना म्हणजेच रस्ता अडवणा-या विरूध्द कुठे तक्रार करायला सांगू. दरचे रस्ता हा त्यांचा फार वर्षापासून म्हणजेच १०० वर्षापासून वापरात असल्याचे कळते. रस्त्याची मालकी कुणाची आहे हे अद्याप समजू शकले नाही. गाव नमुना २७ मध्ये सदर पांदण / बोळ नोंद नाही. यासाठी आपण काय सल्ला द्याल.
फौजदारी प्रक्रिया संहिता , कलम १४७ अन्वये , तहसीलदार यांचे कडे अर्ज करा
रस्त्याचा वापर कोणत्याही कारणासाठी होत असेल तर,
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
रस्त्याचा वापर जर शेतात जाने साठी हि केला जात असेल तर , आपण माम्लेतदार कोर्ट अक्ट काह्ली , तहसीलदार यांचे कडे अर्ज करा
जर रस्त्याचा वापर शेती साठी केला जात नसेल तर , आपणास , दिवाणी न्यायालाय्त दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
रस्त्याचा वापर जर शेतात जाने साठी हि केला जात असेल तर , आपण माम्लेतदार कोर्ट अक्ट काह्ली , तहसीलदार यांचे कडे अर्ज करा
जर रस्त्याचा वापर शेती साठी केला जात नसेल तर , आपणास , दिवाणी न्यायालाय्त दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कुणाल अं. जाधव
21-10-2015
mr.k1387@gmail.com
एखाद्या व्यक्तीला कार्यालयात साधा किंवा माहिती अधिकारांतर्गत अर्ज करायचा असेल परंतु, कोर्ट फी स्टॅम्प उपलब्ध नसल्यास अशा परिस्थितीत अर्जदाराने सदर फी कोणत्या स्वरुपात, रक्कम किती व कुठे भरावी ?
Question by शिवाजीराजे राजेमहाडिक
21-10-2015
shivajirajetarale@gmail.com
सर मी परवा विचारलेल्या कृषी सहाय्यकांची माहिती एवढ्या साठी पाहिजे आहे कारण ते माझ्या विरोधात फोजदारी केस मध्ये खोटी साक्ष देण्यासाठी आले होते म्हणून मी तालुका कृषी अधिकारी, चिपळूण यांना माहितीच्या अधिकारात न्यायालयीन कामासाठी माहिती हवी आहे असा अर्ज केला आहे तर मला माहिती मिळेल का ?
Question by महेश मोरे
21-10-2015
mr.moremahesh@gmail.com
सर माझी किडनी प्रत्यारोपण झाले आहे तर मला अपंगाचे प्रमाणपत्र व कोणते लाभ मिळु शकतात
Question by गोळेसर रवींद्र
21-10-2015
ravindra.golesar@rediffmail.com
एखाद्या गटाच्या जमिनीवर लीजपेनडशी दाखल असेल तर अशा जमिनीची विक्री करता येते का ?
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
