जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

महसूल कलम १५५ आरटीएस केस बंद झाल्यानंतर तहसीलदार यांनी किती दिवसात निर्णय देणे अपेक्षित आहे
या बाबत स्पष्ट निर्देश नाहीत . मात्र जास्तीत जास्त २-३ आठवड्यात निकाल देणे अभिप्रेत .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Miss shaila mhatre
07-09-2023
spindia100@gmail.com

मुंबई उपनगर येथे तालुका बोरवली मध्ये मालवणी गावात cts 675 क्रमांकाचा भूखंड आहे.
त्याच्या सातबारावर आमची नावं आहेत पण मालमत्ता पत्रकावर नावे नाहीत.
मालमत्ता पत्रकावर नावे दाखल करण्यासाठी आमचा हा भूखंड cts 675 कार्यालयातून NA करायला सांगतात. हे उचित आहे का?
प्रश्न विचारायचं कारण हा भूखंड शहरात आहे. जरा आम्हाला मार्गदर्शन करा.
ज्या महसुली गावाचे अथवा शहराचे नगर भूमापन सर्वेक्षण झाले आहे , व एखादा भूखंड हा जिल्हाधिकारी यांचे आदेशानाने , बिन- शेती झालेला नसेल तर , अश्या भूखंडाची मिळकत पत्रिका तयार केलेई जाते मात्र त्यावर धारांकांची नावे दाखल केली जात नाहीत . अश्या शेती वापर असलेल्या भूखंडाचा अधिकार अभिलेख पत्रक हा ७/१२ असतो .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vishnu Pawar
06-09-2023
pawarvishnu@rediffmail.com

सर, माझे नाव शाळा दप्तरी विष्णू रामचंद्र पवार असे असून आधार कार्ड वर पॅन कार्ड वर असेच नाव आहे, परंतु माझ्या वडिलांचे नाव ७/१२ ला रामू आप्पा पवार असे असल्याकारणाने त्यांच्या निधन नंतर माझे नाव ७/१२ ला विष्णू रामू पवार असे लागले आहे. मला माझे नाव विष्णू रामचंद्र पवार असे ७/१२ ला बदलून कसे घेता येईल?
सर, कृपया मला यथायोग्य मार्गदर्शन करा.
तहसीलदार यांच्याकडे आपण पॅन कार्ड किंवा ज्या ज्या शासकीय अभिलेखावर आपले नाव विष्णू रामचंद्र पवार असे लागलेले आहे, अशा अभिलेखासह महसूल संहितेच्या कलम 155 अन्वये नावामध्ये दुरुस्ती करणे बाबत अर्ज द्या. ही लेखन प्रमा चूक असल्याकारण असतं तिची दुरुस्ती कलम 155 खाली करता येईल.
तथापि विष्णू रामू पवार नावाची अन्य व्यक्ती असता कामा नये. भविष्यात अशी व्यक्ती अशा नावातील बदलास हरकत घेऊ शकते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by rajiv
01-09-2023
rajiv_uttankar@yahoo.com

sir i had filed rti with deputy superintendent ofland record office of my taluka for gut book map, akarphod, akarband, area book, gunakar book for my grandfather agricultural lands survey numbers, but the PIO of land record department has replied stating that the documents of my survey numbers are broken and in dilapidated condition. sirs, this is their decided response whenever a coomon man is asking for land record documents. sir what is the solution for this problem.
As per RTI Act - माहितीचा अधिकार कायदा अन्वये , माहिती याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य . माहितीचा कायदा कलम ८ अन्वये , जी माहिती देण्यास अपवाद करण्यात आलेला आहे तीच माहिती जन माहिती अधिर्यास देता येत नाही . महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ च्या कलम ६ च्या उप्बंधानुसार , अभिलेख अधिकारी याचे कर्तव्य आहे कि , सार्वजनिक अभिलेखाचे जतन करणे . आपण अश्या उत्तराविरूढ , प्रथम अपिलीय अधिकारी यांचेकडे अपील करा . त्यांनि माहिती देण्याबाबत तेच उत्तर दिल्यास , द्वितीय अपील करा .
अभिलेख खराब झाले आहेत , फाटलेले आहेत या कारणामुळे ते माहिती देण्याचे टाळू शकत नाहीत . आपण अश्या माहितीचे निरीक्षण करू शकता . अश्या माहितीची प्रमाणित प्रत हवी असल्यास , इलेक्ट्रोनिक माध्यमाद्वारे त्याची प्रत घेता येते का पहा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
01-09-2023
sagarkandekar1990@gmail.com

गट ३०३ पुर्वी पासून ( एकत्रीकरण योजने अगोदर) 3 गुंठे असून त्यात 7 सामाईक खातेदार असून 12 उतारा मध्ये विहीर पड लिहले आहे पण जागेवर कुठलीही विहीर नाही.माझा मालकिच गट 304 हा 130 गुंठे त्या गटाला लागून आहे,. गट 303 मधील एक खातेदार मला खरेदी देण्यास तयार आहे तर मी खरेदी करुन सामाईक खातेदार होऊ शकतो का? तुकडेजोड काययद्याप्रमाणे? तसेच शासन का असे तुकडे जमा करून शेजारील शेतकऱ्यांना विकत नाही?
एकत्रीकरण योजनेपूर्वीपासून जरी गट क्रमांक 303 चे क्षेत्र तीन गुंठे असले, तरी अश्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या भूखंडाला , महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम याच्या कलम ७(२) अन्वये नोटीस दिली असेल तरच , लगत भूखंडाच्या खातेदारास , असा भूखंड ( तुकडा ) खरेदी करता येतो .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. साहेब
रीत 5 ने शेतजमीन अर्धेलिने कसणाऱ्या व्यक्तीची नोंद कुळ म्हणून होते का?
2 नैसर्गिकरीत्या गवत उगवत असणाऱ्या पडीक जमिनीला कुळ नोंद कायदेशीर आहे का? गवत उगवणाऱ्या जमिनीत शेती नाही केली तरी ते कुळ कसे होऊ शकतात, कृपया योग्य तो मार्गदर्शन करावे किंवा ह्या विषयी कोर्टाचे निकाल असल्यास कळवावे आपणास नम्र विनंती,,
दुसऱ्याची जमीन कायदेशीर रित्या कसणाऱ्या व्यक्तीला मानीव कुळ समजण्यात येते. आपण जमीन अर्धेलीने कसण्यास दिली म्हणजे , आपण त्या व्यक्तीस आपली जमीन कसण्यास दिली .
दुसरा प्रश्न , ज्या जागेवर अथवा जमिनीवर गवत नसर्गिक रित्या उगवत असेल तर , ज्याला कसण्यास जमीन दिली परंतु त्याने कसली नाही व कोणतेही पिक घेतले नाही तर अशी व्यक्ती कलम ४ अन्वये मानीव कुल होणार नाही .
नैसर्गिक रित्या गवत उगवणे म्हणजे, कुल-कायद्याला अभिप्रेत “ कृषी- कृती” होत नाही असा निर्वाळा मा उच्च न्यायालय मुंबई यांनी Nathubhai Gandabhai Desai vs The State Of Bombay on 5 October, 1954 या प्रकरणात दिला आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. साहेब
माझा प्रश्न असा आहे की आजोबांनी गमावलेली मिळकत जर त्याचा नातू स्वखर्चाने दावा दाखल करून वर्षानु वर्षे स्वतःच केस कडे लक्ष्य देऊन जर ती मिळकत प्राप्त करत असेल त्यात त्याच्या काकाचा काही हिस्सा असेल का की जो कोणत्याही प्रकारची मदत न करणारा आहे, अस कोणता निकाल आहे का ह्या विषयी .. खालील विषयी एखादा निकाल..

एकत्र कुटुंबाची परत मिळविलेली मिळकत: एकत्र कुटुंबाची, वाडवडिलांनी गमावलेली मिळकत जर त्याच एकत्र कुटुंबातील सदस्याने, एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे सहाय्य न घेता परत मिळविली तर ती त्याची स्वतंत्र मिळकत होते. ह्या विषयी मार्गदर्शन करावे
मिळकत आजोबांची आहे व ती कोणत्या कारणाने त्रयस्थ इसमाकडे कडे गेली होती व आपण प्रयत्न करून जरी मिळवली तरी त्यामध्ये काकांचा जर हिस्सा असेल तर तो हिस्सा काकांना द्यावा लागेल. आपण प्रयत्न केले म्हणून आपली ती स्वकष्टरजीत किंवा स्वतःची मिळकत होणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या गावात स्मशानभूमीची 4 एकर जागा आहे.ते जागा अतिक्रमण मध्ये करुन घेतली आहे.ते त्या जागे पेरत आहे.आपण ती जागा परत कशी घेऊ शकतो?
स्मशानभूमीची जी जागा आहे त्या जागेची स्मशानभूमी म्हणून सातबारा सदरीत अशी नोंद असणे आवश्यक आहे तसेच आकारबंधालाही ती स्मशानभूमीसाठी राखीव केलेली आहे अशी ही नोंद असणे आवश्यक आहे. कदाचित कोणत्यातरी खाजगी व्यक्तीची ती जागा असेल, अशी जागा जर स्मशानभूमी म्हणून वापरा खाली असेल, आणि ह्या व्यक्तीने त्याच्यावर अतिक्रमण केलेले असेल तर तशी ती जागा आपल्याला मिळणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आम्ही गायरान मघे घर बांधले आहे 18वर्ष झाली पण आज अचानक ति माझ्या मालकीची आहे असे कारखानदार कब्जा घेतला आहे आणि तो कोणत्याही प्रकारची माहिती नोटीस न देता सर्व गायरान मध्ये प्रकार चालू आहे अधिकारी पाठिंबा आहे सदर परिस्थिती वर माहिती पाहिजे
ज्या जागेमध्ये आपले राहते घर आहे त्या जागेचा ताबा कोणताही त्रयस्थ इसम कायदेशीर मार्गाशिवाय घेयू शकत नाही . सन २०१७-२०१८ मध्ये , गरम विकास विभागाचा शासन निर्णय आहे त्यानुसार गायरान जागेवरील अतिक्रमण नियमित करण्याचा अधिकार , उपविभागीय अधिकारी यांना आहे . याचा काय उपयोग होतंय का पहा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

स्वत:च्या जागेत विनापरवानगी केलेले अनधिकृत बांधकाम नियमीत करता येते का ... येत असल्यास असे बांधकाम नियमीत केलेल्या आदेशाची प्रत कृपया मिळावी ही विनंती
आपण नगरपालिका पेन यांचेकडे अर्ज करा . आपणा अर्ज तपासून , नियमित करता येत असेल तर ते नियमित होईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मला आमची वंशावळ काडावयाची आहे.माझ्याकडे आजोबा व पंजोबा यांच्या नावा शिवाय काही माहिती नाही.तरी वंशावळ कशी काडता येईल.
वंश्वळ कशी काढावी या प्रश्नाचे उत्तर असे आहे कि - वंशावाली बाबत नातेवाईक , आई - वडील यांना विचार - त्यांचे वडील - आजोबा - पणजोबा - खापर पणजोबा कोण होते ? त्यांची नावे काय ? घर निहाय वंशावालीचे दस्तावैजीकरण(documentation) सरकारी दप्तरी उपलब्ध नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब वारसाहक्काने मिळालेल्या शेतजमिनीचे बहिणीने भावाच्या हक्कात हक्कसोडपत्र केल्यानंतर बहिणीच्या मुलांचा हक्क असतो काय.
मार्गदर्शन करावे.
नोंदणीकृत दस्त असल्यास , बहिणीच्या मुलांना हक्क सोडलेल्या मिळकतीत कोणताही हक्क नसतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

राज्य रस्ता व गाव रस्ता यामध्ये भूसंपादन विभागाने जमीन मालकाकडून जमिनीचे क्षेत्र संपादित करून रस्ते तयार झाले आहेत मात्र सात बारावर रस्ते विभगाचे नाव नोंदविण्यासाठी ची कार्यपद्धती काय आहे?
संपादित जमिनीचे क.जा.प भूमी अभिलेख खात्याकडून प्राप्त करून , त्या आधारे , रस्ते विभागाचे नाव सादर करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by SAMEER MAYEKAR
14-08-2023
SAMEER.MAYEKAR@GMAIL.COM

महोदय

नुकत्याच शासनाने NI No. MAHBIL /2009/37831 ह्या ८ ऑगस्ट २०२३ च्या गव्हर्नमेंट रिसोल्युशन द्वारे प्रमाणभूत क्षेत्राची मर्यादा पुनर्निश्चित केली. आता माझा प्रश्न खालीलप्रमाणे
१. जर जुन्या प्रमाणभूत क्षेत्राप्रमाणे सातबारा वर जर तुकडा अशी नोंद असेल तर ती नोंद आता नवीन प्रमाणभूत क्षेत्र मर्यादेनुसार दुरुस्त आपोआप होईल का ?
२. जर ती दुरुस्ती आपोआप होणार नसेल तर हि दुरुस्ती कशी करून घ्यावी ?
देवस्‍थान इनाम जमिनीत कुळााला विभाजन करण्‍याबाबत कार्यवाही नियमासह मिळणेबाबत.
जमीन - महसूल माफीचा अधिनियम १८६३ ( १) अन्वये , देवस्थान इनाम जमिनीला लागलेल्या कुळाचे नावे किंमत ठरत नाही . त्यामुळे विभाजनाचा प्रश्न उद्भवत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by firoz
02-08-2023
7firoz8mulla6@gmail.com

khredi detana chatushima chuklya ahet, ata kay karayche? gharedidar dam dati kart ahe, gat putlela nahi.
विक्री दस्तामध्ये नमूद क्षेत्र जेवढे आहे त्याचे सीमांकन , भूमी अभिलेख यांचेकडून करून घ्या . खरेदीदाराने आडकाठी केल्यास कलम १३५ अन्वये , जिल्हाधिकारी यांच्डे कडे अर्ज करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by firoz
02-08-2023
7firoz8mulla6@gmail.com

agrahakka kayda va tya chi mahiti milel ka
सर, जर एखाद्याची शेतजमीन १७ गुंठे आहे आणि ७/१२ सेपरेट आहे आणि ती शेतजमीन आम्हास विकत घ्यायची आहे परंतु प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आहे तर त्याजमिनीची खरेदी कशी करावी.
जमिनीचे क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर , अश्या जमिनीची खरेदी खालील परीस्थितीत करता येऊ शकेल .
१. आपण खरेदी करावयाच्या जमिनीचे / भूखंडाचे लगतचे खातेदार आहात .
२, खरेदी करावयाची जमीन , प्रादेशिक योजनेतील बिगर-शेती , जमीन वापर विभागात ( झोन ) मध्ये स्थित आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ई पीक पहाणी app खूप दिवस झाले बंद आहे. शेतकऱ्यांना ई पीक upload होत नाही..शेतकऱ्यांच्या कर्ज करण्यासाठी अडचण येत आहे..कृपया करून aap update or चालू करावे..धन्यवाद
nagar bhumapan zhalelya kshetratiladhikar abhilekhache malki hakkache duheri nond padthati band karnebabatche ( 7/12 ANI nAGAR BHUMAPAN) gr milnebabat

Question by Harshad Raje
27-07-2023
ceaser.casinova@gmail.com

७/१२ च्‍या इतर अॅवार्ड नमुद आहे, कमी कसे करावेत?
Amchi ghartil jaga parspar dusrychya navavr city serve madhye lagli ahe. Kontahi kharedi khat kinva vywahr jhala nahi. Ani amcyakde tya adhiche purave ahet ki ti jaga amchi ahe.
नगर भूमापन चौकशी केंव्हा झाली आहे ? आपणास दिवाणी न्यायालयात मालकी हक्क निच्छित करणे बाबतचा दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sagar patil
26-07-2023
sp109391@gmail.com

सर नोदनी कृत साठे खताची नोद 7/12 वरती घेता येते का

Question by Hemant
26-07-2023
bharanehemant@gmail.com

आमचे गावात किराणा मालाचे दुकान असून गेली 35 वर्ष आम्ही व्यावसाय करीत आहोत. व्यावसाय ज्या जागेत आहे ती मिळकत माझे वडिलांचे नावावर असून निवासी कर नियमित भरत आहोत. आमच्या शेजारी व्यक्तीने ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे की, आम्ही 35 वर्षापासून निवासी जागेत व्यावसाय करीत असून निवासी कर भरत आहे तर 35 वर्षाचा व्यावसाय कर वसूल करावा. निवासी जागेत व्यावसाय करता येत नाही का? व्यावसायिक वापराकरीता ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असते का? आमच्याकडे किराणा व्यावसायासाठीचा अन्न व प्रशासन विभागाचा परवाना नाही. याचा काही समस्या येउ शकते का? आता आम्ही काय केले पाहिजे म्हणजे भविष्यात अडचण येणार नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
आपण ग्रामपंचायतीकडे जो कर भरत आहात तो कर ग्रामपंच्यात यांनी आकारणी करून निच्छित केला आहे . कर - आकारणी सुधारित करण्याचे अधिकार हे केवळ ग्रामपंच्यात यांना आहेत . जो पर्यंत ग्रामपंचायत यांचेकडून आपणास नोटीस येत नाही तो पर्यंत चिंता नसावी . किराणा माल विक्रीची साठी परवाना आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

७० वर्ष पूर्वीचि वारस नोंदिला अपिल दाखल करता येइल का?
आत्याला अपत्य नसल्याने,
चार भाऊ असतांना,
फ़क्त एकाच भाऊ च्या एकाच मुलाचे नाव दाखल केले आहे.(तोंडि दत्तक घेतलेले होते.)
मुळ जमींन आत्या च्या पती चि आहे.
जमींन नवीन अविभाज्य शर्ती चि आहे.

This page was generated in 0.42 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3