जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

मला आमची वंशावळ काडावयाची आहे.माझ्याकडे आजोबा व पंजोबा यांच्या नावा शिवाय काही माहिती नाही.तरी वंशावळ कशी काडता येईल.
वंश्वळ कशी काढावी या प्रश्नाचे उत्तर असे आहे कि - वंशावाली बाबत नातेवाईक , आई - वडील यांना विचार - त्यांचे वडील - आजोबा - पणजोबा - खापर पणजोबा कोण होते ? त्यांची नावे काय ? घर निहाय वंशावालीचे दस्तावैजीकरण(documentation) सरकारी दप्तरी उपलब्ध नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब वारसाहक्काने मिळालेल्या शेतजमिनीचे बहिणीने भावाच्या हक्कात हक्कसोडपत्र केल्यानंतर बहिणीच्या मुलांचा हक्क असतो काय.
मार्गदर्शन करावे.
नोंदणीकृत दस्त असल्यास , बहिणीच्या मुलांना हक्क सोडलेल्या मिळकतीत कोणताही हक्क नसतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

राज्य रस्ता व गाव रस्ता यामध्ये भूसंपादन विभागाने जमीन मालकाकडून जमिनीचे क्षेत्र संपादित करून रस्ते तयार झाले आहेत मात्र सात बारावर रस्ते विभगाचे नाव नोंदविण्यासाठी ची कार्यपद्धती काय आहे?
संपादित जमिनीचे क.जा.प भूमी अभिलेख खात्याकडून प्राप्त करून , त्या आधारे , रस्ते विभागाचे नाव सादर करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by SAMEER MAYEKAR
14-08-2023
SAMEER.MAYEKAR@GMAIL.COM

महोदय

नुकत्याच शासनाने NI No. MAHBIL /2009/37831 ह्या ८ ऑगस्ट २०२३ च्या गव्हर्नमेंट रिसोल्युशन द्वारे प्रमाणभूत क्षेत्राची मर्यादा पुनर्निश्चित केली. आता माझा प्रश्न खालीलप्रमाणे
१. जर जुन्या प्रमाणभूत क्षेत्राप्रमाणे सातबारा वर जर तुकडा अशी नोंद असेल तर ती नोंद आता नवीन प्रमाणभूत क्षेत्र मर्यादेनुसार दुरुस्त आपोआप होईल का ?
२. जर ती दुरुस्ती आपोआप होणार नसेल तर हि दुरुस्ती कशी करून घ्यावी ?
देवस्‍थान इनाम जमिनीत कुळााला विभाजन करण्‍याबाबत कार्यवाही नियमासह मिळणेबाबत.
जमीन - महसूल माफीचा अधिनियम १८६३ ( १) अन्वये , देवस्थान इनाम जमिनीला लागलेल्या कुळाचे नावे किंमत ठरत नाही . त्यामुळे विभाजनाचा प्रश्न उद्भवत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by firoz
02-08-2023
7firoz8mulla6@gmail.com

khredi detana chatushima chuklya ahet, ata kay karayche? gharedidar dam dati kart ahe, gat putlela nahi.
विक्री दस्तामध्ये नमूद क्षेत्र जेवढे आहे त्याचे सीमांकन , भूमी अभिलेख यांचेकडून करून घ्या . खरेदीदाराने आडकाठी केल्यास कलम १३५ अन्वये , जिल्हाधिकारी यांच्डे कडे अर्ज करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by firoz
02-08-2023
7firoz8mulla6@gmail.com

agrahakka kayda va tya chi mahiti milel ka
सर, जर एखाद्याची शेतजमीन १७ गुंठे आहे आणि ७/१२ सेपरेट आहे आणि ती शेतजमीन आम्हास विकत घ्यायची आहे परंतु प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आहे तर त्याजमिनीची खरेदी कशी करावी.
जमिनीचे क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर , अश्या जमिनीची खरेदी खालील परीस्थितीत करता येऊ शकेल .
१. आपण खरेदी करावयाच्या जमिनीचे / भूखंडाचे लगतचे खातेदार आहात .
२, खरेदी करावयाची जमीन , प्रादेशिक योजनेतील बिगर-शेती , जमीन वापर विभागात ( झोन ) मध्ये स्थित आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ई पीक पहाणी app खूप दिवस झाले बंद आहे. शेतकऱ्यांना ई पीक upload होत नाही..शेतकऱ्यांच्या कर्ज करण्यासाठी अडचण येत आहे..कृपया करून aap update or चालू करावे..धन्यवाद
nagar bhumapan zhalelya kshetratiladhikar abhilekhache malki hakkache duheri nond padthati band karnebabatche ( 7/12 ANI nAGAR BHUMAPAN) gr milnebabat

Question by Harshad Raje
27-07-2023
ceaser.casinova@gmail.com

७/१२ च्‍या इतर अॅवार्ड नमुद आहे, कमी कसे करावेत?
Amchi ghartil jaga parspar dusrychya navavr city serve madhye lagli ahe. Kontahi kharedi khat kinva vywahr jhala nahi. Ani amcyakde tya adhiche purave ahet ki ti jaga amchi ahe.
नगर भूमापन चौकशी केंव्हा झाली आहे ? आपणास दिवाणी न्यायालयात मालकी हक्क निच्छित करणे बाबतचा दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sagar patil
26-07-2023
sp109391@gmail.com

सर नोदनी कृत साठे खताची नोद 7/12 वरती घेता येते का

Question by Hemant
26-07-2023
bharanehemant@gmail.com

आमचे गावात किराणा मालाचे दुकान असून गेली 35 वर्ष आम्ही व्यावसाय करीत आहोत. व्यावसाय ज्या जागेत आहे ती मिळकत माझे वडिलांचे नावावर असून निवासी कर नियमित भरत आहोत. आमच्या शेजारी व्यक्तीने ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे की, आम्ही 35 वर्षापासून निवासी जागेत व्यावसाय करीत असून निवासी कर भरत आहे तर 35 वर्षाचा व्यावसाय कर वसूल करावा. निवासी जागेत व्यावसाय करता येत नाही का? व्यावसायिक वापराकरीता ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असते का? आमच्याकडे किराणा व्यावसायासाठीचा अन्न व प्रशासन विभागाचा परवाना नाही. याचा काही समस्या येउ शकते का? आता आम्ही काय केले पाहिजे म्हणजे भविष्यात अडचण येणार नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
आपण ग्रामपंचायतीकडे जो कर भरत आहात तो कर ग्रामपंच्यात यांनी आकारणी करून निच्छित केला आहे . कर - आकारणी सुधारित करण्याचे अधिकार हे केवळ ग्रामपंच्यात यांना आहेत . जो पर्यंत ग्रामपंचायत यांचेकडून आपणास नोटीस येत नाही तो पर्यंत चिंता नसावी . किराणा माल विक्रीची साठी परवाना आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

७० वर्ष पूर्वीचि वारस नोंदिला अपिल दाखल करता येइल का?
आत्याला अपत्य नसल्याने,
चार भाऊ असतांना,
फ़क्त एकाच भाऊ च्या एकाच मुलाचे नाव दाखल केले आहे.(तोंडि दत्तक घेतलेले होते.)
मुळ जमींन आत्या च्या पती चि आहे.
जमींन नवीन अविभाज्य शर्ती चि आहे.
कोतवााल भरती व नेमणूक नियम, १९५९ या बद्दल पक्का पुरावा मिळेल का ? अर्जाची शेवटची तारीख 4 /8/2023 आहे. कृपया मदत करा
कूल व मालक यांच्या मध्ये जमीनीचे वाटप कसे होते
कुळ वहिवाट संबंध हे दोन प्रकारे तयार होतात.
१. संविदात्मक
२. कायद्याने तयार होणारे

१. संविदात्मक -या मध्ये भाडेपट्टा याद्वारे निर्माण होणारे
२. कायद्याने तयार होणारे - या मध्ये शेतजमीन असेल तर , शेतजमीन , कुलवाहीवाट कायदा नुसार. तर अनिवासी मालमत्ता असेल तर भाडे नियंत्रण कायदा .

साविदात्मक कुलवहिवाट हि भाडेपट्टा कालावधी संपला कि संपुष्ट येते व त्यामुळे संपूर्ण जमीन मालकाकडे जाते . या वाहिवातीमध्ये पत्तेदाराला केवळ , मिळकतीचा ताबा मिळतो व उपभोग घेण्याचा अधिकार निर्माण होतो . त्यामुळे अशी जमीन जर साविदात्मक कालावधी चालू असताना , संपादित झाली असेल तर , शिल्लक राहिलेल्या कालावधी विचारात घेऊन , नुकसान भरपाई रक्कम मालक व पत्तेदार यांचेमध्ये वाटप केली जाते .

जी कुलवहिवाट कायद्याने निर्माण झालेली असते त्याबाबतीत , ६०:४० हे प्रमाण विचारात घेऊन नुकसान भरपाई वाटप केली जाते . मात्र जमिनीचे वाटप कुल व मालक यांच्यात होऊ शकत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कुळ वहिवाट संबंध हे दोन प्रकारे तयार होतात.
१. संविदात्मक
२. कायद्याने तयार होणारे

१. संविदात्मक -या मध्ये भाडेपट्टा याद्वारे निर्माण होणारे
२. कायद्याने तयार होणारे - या मध्ये शेतजमीन असेल तर , शेतजमीन , कुलवाहीवाट कायदा नुसार. तर अनिवासी मालमत्ता असेल तर भाडे नियंत्रण कायदा .

साविदात्मक कुलवहिवाट हि भाडेपट्टा कालावधी संपला कि संपुष्ट येते व त्यामुळे संपूर्ण जमीन मालकाकडे जाते . या वाहिवातीमध्ये पत्तेदाराला केवळ , मिळकतीचा ताबा मिळतो व उपभोग घेण्याचा अधिकार निर्माण होतो . त्यामुळे अशी जमीन जर साविदात्मक कालावधी चालू असताना , संपादित झाली असेल तर , शिल्लक राहिलेल्या कालावधी विचारात घेऊन , नुकसान भरपाई रक्कम मालक व पत्तेदार यांचेमध्ये वाटप केली जाते .

जी कुलवहिवाट कायद्याने निर्माण झालेली असते त्याबाबतीत , ६०:४० हे प्रमाण विचारात घेऊन नुकसान भरपाई वाटप केली जाते . मात्र जमिनीचे वाटप कुल व मालक यांच्यात होऊ शकत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझे चुलते अनुसूचित जाती प्रवर्गात असून त्यांनी १९८५ मध्ये १ हेक्टर शेतजमीन खरेदी केली. त्यांच्या अशिक्षित पणाचा फायदा घेवून त्यांना दुसरीच जमीन दाखवण्यात आली. नावावर असलेली जमीन पाणथळ असून शेतीयोग्य नाही, करत असलेली जमीन हे सरकारी गायरान असल्याचे समजले. सध्या कसत असलेली जमीन मिळवण्याचा काही सरकारी उपाय आहे का ?
गुरचरण जमीन नवीन कलम २२-अ नुसार खाजगी व्यक्तीला देता येत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vilas misal
21-07-2023
Vilasmisal1992@gmail.com

नमस्कार सर. माझे आजोबा यांनी स्वकष्टाने कमावलेले घर आहे.व ते 1995 मध्ये मयत झाले आहे.त्याना 2 मुल व बायको आहे व या पैकी कायद्याने कुणाचे मालकी हक्क आहे

Question by YOGESH RUDRUKE
21-07-2023
yogeshrudruke@gmail.com

नमस्कार सर माझे 162,164,168 व 170 असे चार गट नंबर आहेत त्यापैकी 162, 164 व 168 या गट नंबर च्या सातबारा उताऱ्यावर खाते क्रमांक 2487 असा आहे व गट नंबर 170 च्या सातबारा उताऱ्यावर खाते क्रमांक 2178 असा आहे. असे दोन खाते क्रमांक (8A) उतारे असू शकतात का?
तसेच ऑनलाईन mahabhumi site वरून चारही गट नंबरचे सातबारा उतारे डाऊनलोड होत आहेत. परंतु आठ अ चे दोन्ही उतारे डाऊनलोड होत नाहीत त्यासाठी काय करावे लागेल ?
दोन खाते असू शकत नाही . एकाच खाते असावयाला पाहिजे . नावात spelling- mistake कदाचित असेल त्यामुळे दोन खाते तयार झाले असतील . तलाठी यांचेशी संपर्क साधून एकाच खाते तयार करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार .
माझे वडील 2022 मध्ये मयत झाले आहेत. त्यांनी साधारण 30 वर्षापूर्वी 20 गुंठे जमीन खरेदी केली होती. त्यांनी त्या जमिनीचे सर्व पैसे समोरील व्यक्तीला अदा केले आहेत. परंतु जमीन खरेदी करताना त्यांनी जमीन खरेदी बाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. माझे वडील मयत झाल्यानंतर समोरील व्यक्तीने जमीन ताब्यात घेण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. तरी योग्य मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
जर आपल्या पिताश्री यांनी , जमीन संपादन/ खरेदी मोबदला बँक धनादेश द्वारे दिला असेल तर आपण सिद्ध करू शकता कि देण्यात आलेला मोबदला हा जमींन खरेदीसाठी दिलेला होता . न्यायालयात निकाल आपल्या बाजूने लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या वडिलांना पुनर्वसन अंतर्गत प्लॉट देण्यात आले होते 1990 मध्ये त्यांनी स्वत: च्या पत्नीला बक्षीस म्हणून तो प्लॉट दिला हस्तातर देत असताना जिल्हाधिकारी यांची परमिशन घेतली नाही पत्नीला पुनर्वसन अंतर्गत प्लॉट देण्यात आल असेल तर परमिशन ची गरज नाही असं शासन निर्णय परिपत्रक किंवा इतर कोणत्याही प्रकारची माहिती द्यावी मला नितांत आवश्यकता आहे आहे
पुनर्वसन भूखंड याचे हस्तांतरण मा. जिल्हाधिकारी यांचे परवानगीनेच होते . आपण रीतसर परवानगी घ्यावी . पत्नीचे नाव सह-धारक म्हणून लावता येईल परत्तू पतीच्या जागी पत्नीचे नाव लागणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rohit Lokhande
18-07-2023
lokhanderohit82@gmail.com

साहेब,मौजे उदापूर ता. जुन्नर, पुणे ह्या आमच्या मूळ गावी आमचे वडिलोपार्जित घर आहे व घरालगत मोकळी जागा आहे. सदर घराच्या व जागेच्या मालमत्ता पत्रकावर फक्त आमचे थोरले अजोबा यांचे नाव आहे आणि नावाखाली वडिलोपार्जित अशा उल्लेख आहे. आमचे थोरले अजोबा आता हयात नाहीत. त्यामुळे भूमी अभिलेख शाखेत आमची वारस नोंद करण्यास अडचण येत आहेत. सदर घर व जागेबाबत आमच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारची कायदेशीर वाटणी झालेली नाही. मालमत्ता पत्रकावर थोरल्या अजोबांच्या नावापुढे ए. कु. मॅ. लावयाचे राहून गेले असेल अशी शकता आहे. तरी ह्याबाबत काय प्रकिया करून वारस नोंद करता येईल. थोरल्या अजोबांच्या नावापुढे ए. कु. मॅ. लावण्यासाठी कुठे अर्ज करावा आणि सोबत कोणते कागद पत्र जोडावे. तसेच भूमी अभिलेख शाखेत असे कोणते दस्त उपलब्ध होईल त्यावरून असे समजेल की इतर वारस असताना फक्त थोरल्या अजोबांचे नाव मालमत्ता पत्रकावर लावण्यात आले आहे. कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
मालमत्ता पत्रक आहे म्हणजे नगर भूमापन झाले आहे . नगर भू मापन चौकशीवेळी , आपल्या मिळकतिच्या मालकी हक्काबाबत चौकशी अधिकारी यांनी घेतलेल्या चौकशीचे कागद पत्र , नगर भूमापन अधिकारी यांचे कार्यालयात मिळतील . त्यावरून आजोबांचे नाव इतर वारसांचे वतीने प्रातिनिधिक स्वरूपात दाखल झाले आहे हे कळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rajiv uttankar
18-07-2023
rajiv_uttankar@yahoo.com

Dear Sir,

Kindly provide me a detailed clarification to the following questions in the context of Maharashtra Public Record Act 2005:

Q.1)Under which category, the following land record documents in falls in?
Enquiry register, Nagar bhumapan nakasha, tippan, Area book, Measurement Map, Gut book Map.

Q.2) For how many years the above mentioned documents shall be preserved by land record office?

Q.3) What is the expiry date till which the above mentioned documents should be preserved?
Under the Public Records Act 2005, the retention Schedule is prepared by the concerned Department and is approved by the Director of Archives, Maharashtra State, Pune. Check with the Land Record Department. I am not aware about the retention period of the documents which you have mentioned .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Under the Public Records Act 2005, the retention Schedule is prepared by the concerned Department and is approved by the Director of Archives, Maharashtra State, Pune. Check with the Land Record Department. I am not aware about the retention period of the documents which you have mentioned .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जमिनीच्या ७/१२ उतार्यावर पुरुषां बरोबर स्त्रियांचं मालकी हक्क म्हणून नोंद . कृपया एस-१४/२१६१८१६/प्रक्र ४५८/लं-६, दिनांक १५ september १९९२ circular कृपया email करावे हि विनंती

This page was generated in 0.30 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3