जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by MaheshKumar
16-04-2026
mkumbhar34@gmail.com
आमची पणजोबा ची जमीन वडील वारल्यानंतर मी 4 वर्षापूर्वी चुलत्याला वाटप करून दिली, तीच जमीन2 वर्षापूर्वी दुसऱ्याला विकली. ती मला परत विकत घेण्याचा अधिकार आहे का? 7/१२ एक आहे पण खातेफोड केली होती.
Question by अजय चव्हाण
06-04-2026
ajayjchavan@yahoo.com
इनाम वतन जमीन ७/१२ असताना कुळ कायदा लागू होतो का? कुळाची नावे कब्जेदार सदरी नोंद होतात का?
होय, इनाम जमिनीला कुल कायदा लागू आहे . सर्व, तन नष्ट करणे कायदे यामध्ये , कुल कायद्याच्या तरतुदी लागू आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sampada Rangnekar
03-04-2026
sampadasanjayrangnekar@gmail.com
एखाद्या बँके नी शेत गहाण नसताना सुद्धा त्यावर बोझा ठेवला असेल. व महसूल न्यायालय असं म्हणत असेल की आम्हाला बँके नी बोझा ठेवायला सांगितला तर ठेवावा च लागतो तर मग शेतकऱ्यांना कशाला विचारतात की आपलं काय म्हणणं आहे? दुसरे जर शेतावर बोझा योग्य आहे का? ही केस प्रांत कडे चालली आहे व बँक शेत जमीन जप्त करू शकते का?
जरी मिळकत गहन ठेवली नसली तरी , दिलेल्या कर्जाची नोंद ठेवली जाते. अश्या नोंदी केवळ जमीन खरेदी करणाऱ्या किंवा अन्य कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांना नोटीस देण्यासाठी ठेवल्या जातात . उद्या तुम्ही दिलेल्या कर्जाची परतफेड केली नाही तर ती वित्तीय संस्था / बँक , बोजा ठेवलेल्या जमिनीबाबत वसुलीची कार्यवाही करू शकत नाही . मात्र अशी जमीन मालकाने विक्रीला काढल्यास , प्रस्तावित खरेदीदार अश्या बोजा चा विचार करणार . तो बोज्याची रक्कम तुम्हाला भरण्यास सांगेन किंवा तो स्वत भरेल तेवढी रक्कम आपणाला द्यावयाच्या रक्कमेतून कमी करेल. मात्र बँक कर्ज वसुलीसाठी , आपणा विरुद्ध कर्ज वसुली दिवाणी दाखल करू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sampada Rangnekar
03-04-2026
sampadasanjayrangnekar@gmail.com
मा. सर नमस्कार,
मला विचारायचं आहे की जर का विविध न्यायालयात न्याय मागण्यात वेळ गेला असेल तर 3 वर्षा ची मुदत सपंळ्यावर शेतकरी नसलेल्या माणसा चे खरेदी खत रद्द करता येते का?
Question by Sampada Rangnekar
03-04-2026
sampadasanjayrangnekar@gmail.com
मा. सर माझा प्रश्न आहे की एखाद्या चा शेतकरी दाखला 2015 मध्ये रद्द झाला आहे. त्या वर मा. अप्पर आयुक्ता पर्यंत अपील होऊन आदेश कायम राहायला आहे. तसेच 2016 मध्ये मा. प्रांत यांनी त्याचा फेरफार रद्द करून तहसीलदार यांना समोरच्या ला संधी देऊन जमीन शासन जमा करण्यासाठी आदेश दिले होते. त्यावर ही अपील होऊन मा. अप्पर आयुक्त ह्यांनी फेरफार रद्द करून जमीन शासन जमा करण्या चे आदेश दिले होते. परंतु तहसीलदार यांनी सुमारे 6/7 वर्ष लावून जमीन नवरा बायको च्या नावा वर असल्यामुळे दिवाणी कोर्टात जाऊन हिस्सा ठरवून नवऱ्या चा अर्धा हिस्सा शासन जमा करण्यात यावा. असा आदेश दिला. कारण मा. प्रांत कडे सुनावणी चालू असताना त्यांनी बायको च्या नावा चा शेतकरी दाखला 2016 चा आणला. जमीन 2011 मध्ये खरेदी केली होती. त्यावर परत मा. प्रांत कडे अपील होऊन मा. प्रांत यांनी निकाल दिला की आता जमीन घेऊन 8 वर्षे झाली आहे व तहसीलदार यांनी जमीन शासन जमा करायला खूप कालावधी घेतला आहे. संदर्भ दिला आहे मोहंमद कवी vs फातिमा इब्राहिम केस चा. त्यामुळे जमीन शासन जमा करण्यात येऊ नये. ह्या निकाला वर तहसीलदार यांच्या आदेशा नी 8 वर्षानी शेत परत शेतकरी नसलेल्या माणसा च्या नावावर करण्यात आले. मा. कलेक्टर व मा. अप्पर आयुक्त हयांचे आदेश फेरफार व शेतकरी नाहीं ह्या आदेशा च्या 6 वर्षांनी परत शेत जमिनी वर नावं लागले. हे योग्य आहे का? नसेल तर काय करायला पाहिजे?
Question by Shri. Vishwanath Payghan
02-04-2026
vishwanath88payghan@gmail.com
मानीव दिनांक मिळणेबाबत. अर्ज करायचा आहे कृपया मार्गदर्शन करावे.
Question by vijay goswami
02-04-2026
goswamiv99@gmail.com
कुळ कायदा कलम 40 ता सविस्तर पतशिल दया
Question by V.K Kondawar
02-04-2026
vkkondawar@gmail.com
माननीय महोदय, आपला उपक्रम खूप अभिनंदनीय आहे. खूप धन्यवाद,
आमच्या इमारतीचा common area एका गाळेधारकांनी १२ वर्षांपूर्वी अवैधपणे एका संस्थेच्या स्वाधीन केला होता. त्याचे rental agreement deed ची किंवा lease deed ची नोंदणी झाली होती. आम्ही तक्रार केल्यामुळे त्या संस्थेने ताबा सोडला. परंतु हे deed रद्द झाले की नाही हे माहित नाही. आता पुनर्विकासाची वेळ आल्यामुळे त्यांच्याकडून अडथळा येईल असे वाटते. तो विशिष्ट गाळेधारक आणि ती संस्था ह्यांच्याकडून सहकार्य मिळण्याची शक्यता नाही. अशा जुन्या नोंदणीकृत लेखी करारनाम्याच्या/करारपत्रांच्या प्रति मिळवता येतात काय? नागपुरात उपनिबंधकांची अनेक कार्यालये आहेत. प्रत्येक उपनिबंधकांच्या कार्यालयात माहिती अधिकारा अंतर्गत माहिती मागवण्याकरिता वेगवेगळे अर्ज द्यावे लागतील काय? अशा करारांचे मध्यवर्ती रजिस्टर/डाटाबेस असते काय? अवैध विक्रीपत्र, leasedeeds रद्द करण्याची प्रक्रिया किती काळात पूर्ण होऊ शकते. त्याच्याकरिता कुणाकडे तक्रार करावी? पुन्हा एकदा धन्यवाद
Question by प्रविण पाटील
28-03-2026
adhanepravin@gmail.com
माझी नियुक्ती मार्च 2014 मध्ये महसूल सहायक पदावर झाली होती मी 2024 मध्ये दुय्यम व 2026 मध्ये अर्हता पास झालो आहे..मला हे विचारायचं आहे की माझी ज्येष्ठता कधी पासून गृहीत धरतील...2014 पासून की 2026 पासून...कारण पुणे विभागात काही केसेस मध्ये ज्येष्ठता joining date pasun पकडल्याचे कळाले आहे...मार्गदर्शन हवे..
ईमेल id vr तसा काही mat चा निर्णय असल्यास पाठवावे ही नम्र विनंती
Question by संजय जी.वाघ.
25-03-2026
sanjaygwagh@gmail.com
मा.सर,
नागरिकांचे उत्पन्न ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे,आमचे कडे तलाठी/ग्रा.मह.अधि.उत्पन्न अहवाल देतांनी उत्पन्न टाकून देत नाहीत आम्हाला अधिकार नाहीत सांगतात तर उत्पन्न टाकून देण्याचा/ठरविण्याचा अधिकार कोणास आहे तसा Gr वगैरे आहे का सर कृपया मार्गदर्शन करावे.
Question by अजय जयसिंग चव्हाण
24-03-2026
ajayjchavan@yahoo.com
तहसिलदार कार्यालयाने त्यांच्या ४५ पानांच्या अनोंदणीकृत फेरफार अन्वये हस्तलिखित आणि संगणकीकृत अधिकार अभिलेख तंतोतंत जुळविणेचा दि ७-५-२०१५ चा शासन परिपत्रकचा संदर्भ देऊन गावातील एकूण ७९ गटांचे तथा ७/१२ चे सर्व प्रकारच्या नोंदी दुरूस्ती केल्या आहेत. या दुरुस्त्या अन्य ७८ गटांच्या बाबतीत योग्य असल्या तरी आमच्या ७/१२ मध्ये इनाम वतन जमीन चा चुकीचा शेरा नोंद केला आहे. हा फेरफार नोंद करताना त्यांनी शेरा च्या बाजूला कंसामध्ये फेरफार क्रमांक नमूद केला नाही यामुळे आमच्या निदर्शनास आले नाही. हा फेरफार व नोंद २०१७ मधील आहे. आता ९ वर्षांनी तहसिलदार त्यांच्याच कार्यालयाने तथा तत्कालीन मंडल अधिकारी / तलाठी यांनी चुकीने नोंद केलेला शेरा कलम १५५ अन्वये त्यांच्या स्तरावर कमी करू शकतात का? यावर काय उपाय तथा नियम आहे ? साहेब, या मध्ये आमची काहीही चूक नाही. आम्ही सर्व वरिष्ठ नागरिक आहोत.
Question by संतोष तुळशीराम भालेराव
24-03-2026
bswas82879@gmail.com
मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 कलम 5 (२), PPT download केली आहे आपल्या website वरून, त्यामध्ये तहसीलदार ह्यांनी पर्यायी रस्ता ह्या अधिनियमात पाहू नये व वहिवाट रस्ता ह्या संदर्भात मुख्य, मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 कलम 5 (२) english आवृतीमध्ये कुठेही नमूद नाहीये, मग हे मुद्दे कसे काय valid धरल्या जातील एखाद्या केस मध्ये.
Question by Kiran Hulawale
15-03-2026
kiranhulawale@gmail.com
माझ्या आजीच्या वडिलांच्या मृत्यू नंतर १९८७ साली वारस नोंद करण्यात आली व त्यामध्ये फेरफार वर २ भाऊ आणि २ बहिणींची नावे लिहिली आहेत व त्याखाली पुढील प्रमाणे उल्लेख करण्यात आला आहे [ वरील प्रमाणे मयतास वारस असत, वारस रजिस्टर नं ४५ वरून नोंद. मुलींने वारसाचा हक्क सोडून दिलेचा जबाब दिलेवरून मुलींची नावे इतर हक्कात दाखल करून कमी केली. ]
असे लिहिले आहे, तरी असे जबाब वरून नावे कमी करता येतात का?
Question by संजय अरविंद बडवे
11-03-2026
sanjaybadave43@gmail.com
देव. इनाम वर्ग 3 भोगवटादार vrg2 वही त्राटी जमीन या पुजार्यांना तय हयात कायम स्वरूपी दिलेल्या आहेत.खरेदी घेता येतात का?
Question by Rameshwar Thakare
06-03-2026
rameshwarthakare42837@gmail.com
अतिक्रमण वहीत करणाऱ्या नाव येणार किंवा वहीत न करणाऱ्या चे नाव येणार
ज्या जमिनीत वहीत करणाऱ्या व्यक्ती ऐवजी दुसरी व्यक्ती नाव आले याचा काही होणार का? या बद्दल माहिती हवा होता
Question by Rameshwar Thakare
06-03-2026
rameshwarthakare42837@gmail.com
अतिक्रमण शेत जमीनीचे पट्टे 1991-2016 पर्यंत चे पट्टे मिळणार का?
Question by Guru parbat
05-03-2026
gururajkp19@gmail.com
खरेदी दस्तापप्रमाणे क्षेत्राचा अंमल मेळ घेऊन करा सबब ही नोंद नामंजूर (रद्द)असे असा शेरा आहे याचा अर्थ काय
Question by Pratik Thorve
03-03-2026
pratikthorve007@gmail.com
वडिलोपार्जित जमिनीवर सावत्र भावाचा हक्क
Question by रंजित जोगदंड
02-03-2026
ranjitjogdand777@gmail.com
कोर्टाच्या हुकुमनाम्यानुसार वाटणी करत असताना कोणकोणते कागदपत्रे लागतात तसेच त्याची कार्यवाही कश्या पद्धीतीने करतात सविस्तर माहिती हवी आहे
Question by DEVENDRA TANDEL
26-02-2026
aaryatandel82@gmail.com
सर माझा प्रश्न आहे की
जमिन मिळकतीस संरक्षित कुळ असताना जमिन मालकाने सदर जमीन त्रयस्त व्यक्तीस विकली होती. याबाबतचा जमिन खरेदीची फेरफार रद्द झाला आहे. परंतू त्रयस्त व्यक्तीने कुळाचे फेरफार रद्द होणे बाबत दिवानी न्यायालयत दावा दाखल केला आहे. तर कुळच्या वारसानी मुंबई कुळ वहिवाट व शेतजतीन अधिनियम १९४८ कलम ८४ क अन्वये अर्ज दाखल केला आहे.
तरी मुंबई कुळ वहिवाट व शेतजतीन अधिनियम १९४८ कलम ८४ क अन्वये याबाबत काय कारवाई होते याबाबत संपुर्ण माहिती मिळावी
Question by jaya munde
21-02-2026
jmunde34@gmail.com
namaskar sir, mala sat bara varil sosayticha boja ettr hkkatun kadhaych aahe ty sathi mala diret talthi bhetun karav lagel ka.
Question by कैलास दगडू पिसे
19-02-2026
kailas.p25@gmail.com
आदरणीय सर माझे नाव कैलास दगडू पिसे माझे पुणे जिल्हा, ता.हवेली,गाव शिंदवणे येथील गट क्रमांक 141 मध्ये माझे खाते क्रमांक 3415 असून माझी सामायिक खरेदी मध्ये 2 गुंठे जागा असून सदर जागेचा सामाईक फेरफार क्रमांक 8752 आहे परंतु फक्त माझ्या नावपुढील फेरफार क्रमांक बदलला आहे व नवीन फेरफार क्रमांक 10551 अस ऑनलाइन सातबारा वर दिसत आहे. सदरील गट नंबर 141 मधून पुणे रिंगरोड साठी जागा संपादित केलेली असून त्यात माझी जागा गेलेली नाही तरी माझ्या सामाईक क्षेत्रातील फक्त माझाच फेरफार क्रमांक बदललेला आहे तो असा की पूर्वी चा 8752 होता तो आता बदलून 10511 असा दिसत आहे . सदरील चूक ही दुरुस्त मिळणेस नम्र विनंती आहे.
आपला विश्वासू कैलास दगडू पिसे . मोबाईल क्रमांक- 7721982543
Question by सुभाष पाटील
16-02-2026
subhpt75433@outlook.com
साहेब, सातबारा वर आणेवारी किंवा हिस्सेवारी लावली म्हणजे जमिनीचे वाटणी झाली असे कायद्याने मानले जाते काय ?
Question by sagar yedage
15-02-2026
yedagesagar@gmail.com
नमस्ते सर,
माझा प्रश्न असा आहे की.... आमची जमीन वडिलोपार्जित आहे... आमचे आजोबा मयत नंतर वारसाने माझे वडील व माझे चुलते यांची एकूण सात गटा वर्ती नावे दाखल झाली...काही दिवसांनी माझे वडील व माझे चुलते यांनी एकूण चार गटातील कमी(कमी जमीन माझे वडील यांनी घेतली)जादा (जादा जमिन चुलते यांनी घेतली)जमिनीने वाटप केले...आता राहिले तीन गट .त्या तीन गटामध्ये समान समान वाटप व्हावे असे चुलते म्हणतात.... मग आम्हाला सर्वच म्हणजे एकूण सात गटा वरती समान समान वाटप होऊन मिळेल का.....त्या साठी काय करायचे......त्या चार गटाचे वाटणी पत्र रद्द होऊन सर्वच गटावर्ती समान समान वाटप होऊन मिळेल का...
Question by Ramchandra Mali
15-02-2026
maliramchandra51@gmail.com
file no.23/१९/५६ बाबत स्थगिती आदेश नं.RB/CW/CVI-199 दि.06 june 1957 हा कोठे मिळेल? लेटर हेड Government Of Bombay असे आहे.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
