जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सुनील पडवळ
08-08-2015
sunilpadwal395@gmail.com
भूसंपादनासाठी माझी ३ एकर जमीन सरकारने घेतली पण मी ३ एकर चे सरकारी मोबदला घेतला नाही व मिळाला नाही तर ती जमिनीसाठी मी कोर्टात न्याय मघु शकतो का
होय , मात्र त्या पूर्वी तुम्हाला कलम ४ व त्या नंतर च्या नोटीस बजावल्या गेल्या आहेत का ? विशेष भूसंपादन अधिकारी कोण आहेत ( पदनाम ) , तसेच हि जमीन एखाद्या स्थानिक प्राधिकरण उदा . नगर पालिकेचे हॉस्पिटल ई साठी संपादित आहे का ? या सर्व बाबीची माहिती काढून संबंधित विभागास ,स्थानिक प्राधिकरण ई , स tप्रतिवादी करावे लागेल . भूसंपादन अधिनियम १८९४ पाहावा . स्थानिक प्राधिकरणा साठी town planning act पाहावा .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by सुवर्णा पालवे
07-08-2015
adv.palve@gmail.com
मौजे नांदगाव येथे तुकडेबंदी कायद्यानुसार किती क्षेत्राला तुकडा असे म्हणता येईल
पर्मान्भूत क्षेत्राच्या बाबतीत उप अधीक्षक कार्यालयात अधिसूचना ठेवलेली असते.त्याचे अवलोकन करावे .
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
पर्मान्भूत क्षेत्राच्या बाबतीत उप अधीक्षक कार्यालयात अधिसूचना ठेवलेली असते.त्याचे अवलोकन करावे .
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by कैलास उंडे
07-08-2015
kailasunde@gmail.com
सर,जर एखाद्याने बातिस्मा करून घेतले असेल तर त्याला पूर्वी असलेल्या जातीचा व त्या जातीच्या दाखल्यावरून त्याला सवलत किंवा उपभोग घेता येतो का ?
Question by धीरज
07-08-2015
dhiraj.a.sonawane@gmail.com
आम्ही आमची जागा विकसित करण्यासाठी बिल्डर ला दिली आहे , तर बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर आणि सगळी घरे विकल्यानंतर बिल्डिंग च्या टेरेस वर बिल्डर चा काही हाक्क राहतो का ?
Question by दिनेश विष्णू दाभोलकर
07-08-2015
dinesh.dabholkar@rediffmail.com
आमचे चुलत काका आणि त्यांचे पूर्ण कुटुंब आम्हाला हक्क सोड पत्र देण्यासाठी तयार आहेत पण आमची जमीन सामायिक आहे आणि घर हे आजीचा नावावर असून ती मयत आहे तसेच या सामायिक जमिनीमध्ये पूर्वीपासूनची सर्वाची नावे आहेत .
तर हक्क सोड पत्र कोणाच्या नावाने देले पाहिजे किवा हक्क सोड पत्रासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे .
हयात असलेल्या व्यक्तीचे नावे ७/१२ वर कायम करून घ्यावे. ओ नंतर हकसोड लेख दुय्यम निबंधक यांचे कडे नोद्वावा.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by कैलास उंडे
07-08-2015
kailasunde@gmail.com
नमस्कार सर, जर एखाद्याने पूर्वी एस.सी जातीचा दाखला काढलेला असेल व नंतर त्याने बाप्तिस्मा म्हणजेच धर्मांतर करून ख्रीच्चन असेल तर त्याला पूर्वीच्या एस.सी जातीच्या प्रमाण पत्राच्या आधारे सवलत व उपभोग घेता येती का ?
Question by Sunil Murkar
07-08-2015
sunilmurkar@gmail.com
माझ्या चुलत आजी ने चुलत आजोबा वारल्या नंतर तिची वडलोपार्जित मिळकत तिने आणि तिच्या मुली ने (म्हणजेच चुलत आत्त्याने) १९८९ मध्ये स्वताच्या वा चुलत आत्त्या च्या नावे न करता माझ्या काकांच्या नावे करून दिली होती. त्यानंतर २०११ मध्ये आम्हीही तिच्या वडलोपार्जित मिळकतीत सहहीशेदाराची नावे लावण्यासाठी तलाठी कडे प्रतिज्ञा पत्रा सहित अर्ज केला, त्यावर तलाठ्याने आजी आणि चुलत आत्त्याला तसेच काकांना, माझ्या वडिलांना, सख्या आत्यां ना सहहीशेदारा च्या नोटिसा पाठवल्या त्यावर फक्त माझ्या काकांनी हरकत घेतली. माझ्या काकांनी हरकत घेतल्यावर पुन्हा तलाठ्याने सगळ्यांना नोटीसी पाठवून त्याची सुनावणी मंडळ अधिकारी कडे केली. माझ्या काकांनी हरकती वर काकदी पुरावे न दिल्याने मंडळ अधिकारी ने आमच्या नावांची सहहीशेदार म्हणून नोंद केली. त्यावर काकांनी पुन्हा अपील केले परंतु काकदी पुराव्या अभावी उप विभागीय अधिकारी, कणकवली यांनीही काकांचे अपील फेटाळले.
चुलत आजी आमच्या कडेच राहत होती, आता चुलत आजी वारल्या नंतर चुलत आत्त्याला आणि तिच्या मुलींना त्यांच्या आजी ची मिळकत मिळू शकते का ? त्यांची आजी चे हिशेदार म्हणून नोंद होऊ शकते का? त्यांचे त्याच्या आजीच्या वडलोपार्जित मिळकतीवर त्यांचे हक्क आहेत का? चुलत आत्त्या वा तिच्या मुली फक्त काकांना मृत्युपत्र/बक्षीस पत्र/खरेदी पत्र कायदेशिररित्या देऊ शकते का?
आम्ही कसलेही मृत्युपत्र केलेले नाही. अजूनही चुलत आत्याचे तसेच तिच्या मुलींची नावे ७/१२ वर नोंद नाही.
आपले प्रश्नात आपण मंडळ अधिकारी यांनी सह हिस्सेदार म्हणून नोंद केली व उप विभागीय अधिकारी यांनी काकांची अपील फेटाळली असे नमूद केले आहे . त्यानुसार नावे नोंद का झालेली नाहीत. ते तपासा . ७/१२ वर नाव नोद झाल्यावर पुढील दस्त करता येईल .
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
Question by राहुल
06-08-2015
Rahul Shinde.shinde962@gmail.com
सर आमची वादिलोपरजीत जमीन आहे पण ती आमच्या नावावर नाही ती जमीन गट वारी मधे कोणच्या तरी दुसऱ्या वयकतीच्या नावी गेली आहे पण त्या जमिनीचा नंबर माहित नहीं तो कसा मिळू शकतो
वडिलोपार्जित जमिनीचा नंबर शोधा. त्याला नवीन अभिलेखात कोणता नंबर दिला ते तपासा. तसेच दिलेल्या नवीन नंबरची जुनी व नवीन आराजी तपासा. त्यावरून अंदाज येईंल.
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
तुम्हाला जमिनीचे स्थान व आजूबाजूला असलेले शेतकरी माहित असतील . जमीन ज्या गावातील आहे त्या गावातील तुमच्या जमिनीच्या आजू बाजूचे सर्वे क्र तपासा . त्या वरून तुमचा क्र कोणता असेल याचा दिशेवरून अंदाज येईल . बंदोबस्त मिसल,जमाबंदी , रेसर्वे चा रेकॉर्ड शोधा.
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by Krunal Saupure
06-08-2015
ksaupure23@gmail.com
सर नमस्कार,
सर्वप्रथम आपण हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
जिल्हाधिकारी यांनी कबुलायात नवीन अविभाज्य शर्तीवर एका व्यक्तीस जमीन (भोह्वातदार वर्ग २ ) प्रदान केली.
सदर व्यक्तीने ही जमीन त्यांचा नात्यातीलच मावस मुलाला ज्याने त्याची म्हातारपणात काळजी घेतली त्याला दुयम निबंधक यांचेकडील नोंदणीकृत मृत्यू पत्रानुसार मध्ये दिली.
१.सदर प्रकरणामध्ये शर्त भंगहोतो काय?? २.जर शर्त भंग होत असेल तर शर्त भंग नियमित करून जमिनीची विक्री करण्यासाठी काय करावे लागेल?
३.सदर जमिनीची विक्री करताना किती % नजराणा शासनास भरावा लागेल
Question by संजय रा. कोकरे
06-08-2015
s.r.kokare1992@gmail.com
नमस्कार सर
माझ्या वडील्यांनी माझी वडीलोपार्जीत जमीन विकुन नविन जमिन खरेदी हक्काने विकत घेतली त्यामुळे मला जमीनवर माझा हक्क माझे वडील देण्यास नकार देत आहे
न्यायालयात दाद मागावी. वडिलोपार्जित जमीन विकून नवीन जमीन खरेदी केल्याचे सिद्ध करावे.
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
Question by संतोष जवरे
06-08-2015
jaware_sb@rediffmail.com
एका गट नंबरच्या जमिनीमध्ये कब्जेदार सदरी नाव असलेल्या व्यक्तीने त्याच्या पत्नी चे नांव सहहिस्सेदार (पती जिवंत आहे) म्हणून दाखल करण्याबाबत नमुद केले आहे.तरी पत्नीचे नांव सहहिस्सेदार म्हणून दाखल करता येईल का? जर करता येईल तर, त्याबाबत शासन निर्णय कळवावा ही विनंती.
संतोष जवरेजी आपण लक्ष्मि मुक्ती शा. परिपत्रक क्र.१४/२१६/१६/प्र.क्र.४५८/ल६ सन १९९२ अन्वये पतीचे नावाखाली सह हिस्सेदार म्हणून नाव दर्ज करण्या करिता अर्ज करू शकता.
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
गृह लक्ष्मी योजने अंतर्गत पतीचे नावासोबत पत्नीचे नाव दर्ज करता येते. तसा अर्ज तालुक्याला करावा. जी आर लवकरच कळविण्यात येईल .
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
Question by संतोष जवरे
06-08-2015
jaware_sb@rediffmail.com
नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीमध्ये मृत्युपत्रान्वये नांवे दाखल करता येतील का?
होय. गोत्रजा वेतिरिक्त मूत्यूपत्र केले असेल तर. हस्तांतरण होईल.
Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार
Question by कुणाल अं. जाधव, लिपीक
06-08-2015
mr.k1387@gmail.com
एखाद्या कर्मचाऱ्याची वेतनवाढ रोखण्याचे अधिकार कोणास आहेत ?
तहसीलदार यांना वेतनवाढ रोखण्याचे अधिकार आहेत का ?
एखाद्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केव्हा रोखावी याबाबत मार्गदर्शन मिळणेस विनंती.
1 कार्यालय प्रमुखास
२ होय .
३ कृपया महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम १९७९ वाचवा .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by विनायक पाटील
06-08-2015
rachnavinay123@gmail.com
माझ्या आजोबांची १०० गुंठे जमीन आहे. चार मुलांमध्ये सर्वसंमत्तीने खालील प्रमाणे वाटप झाले. वाटप रजिस्टर झाले आहे व सर्व भावंडांना मान्य आहे. सर्वांनी रजिश्टर ऑफिस मध्ये जाऊन सह्या केल्या आहेत.
अ (भाऊ) - २५ गुंठे + "५ गुंठे (घराची जागा )"
ब (भाऊ)- ३० गुंठे
क (बहिण) - २० गुंठे
ड (बहिण) - २० गुंठे
आता प्रश्न असा आहे कि दस्त नोंद करताना असे लक्ष्यात आले कि "अ" च्या वाट्याला आलेली "५ गुंठे (घराची जागा )" हीच उल्लेख वाटप पत्रात झाला नाही. सर्व भावंडे खूप दूर दूर अंतरावर राहत असल्यामुळे आम्ही तलाठी तसेच प्रांत अधिकारी यांस कडे उपाय मागितला त्यांनी सुचवलेला उपाय खालील प्रमाणे.
१) सदर वाटप पत्राची नोंद "५ गुंठे (घराची जागा )" सोडून वरील प्रमाणे होऊ शकते व ५ गुंठे जागा सामायिक चारही भावंडाच्या नावावर राहील.
२) ५ गुंठे (घराची जागा) :- हिस्सेदार "अ" ह्यांच्या नावावर करण्यासाठी वेगळे रजिश्टर (हक्कासोड पत्र ) करून, त्यावर सर्व भावंडांची सही घेता येऊ शकते.
माननीय साहेब,
वरील बाब लक्ष्यात घेता १ व २ हे समाधान बरोबर आहे का ?
भविष्यात हे वाटप कायद्यानुसार वैध मानले जाईल का ?
कृपया मार्गदर्शन करावे.
आपला विश्वासू,
१ व २ हे बरोबर आहे अथवा नोंदणीकृत वाटप पत्रातील चुकीच्या दुरुस्तीचा नोंदणीकृत दस्त तयार करावा.
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
Question by संजय रा. कोकरे
05-08-2015
s.r.kokare1992@gmail.com
माझ्याजवळ राहायला घर नाही. पण माझ्या गावठाण जमिनमधील जमिन शिल्लक आहे. पण गावातील काही व्यक्तीने तेथे शेणखत व कचरा टाकुन आपला ताबा केला आहे त्यामुळे ती जागा तशीच पडलेली आहे. त्यामुळे मला तेथे घर बांधायचे असेल तर बांधता येईल का? व त्या लोकांनी काही उपद्रव करु नाही म्हणुन काय बंदोबस्त करावा. त्याकडे कुणाकडे अर्ज करावा
Question by संजय रा. कोकरे
05-08-2015
s.r.kokare1992@gmail.com
माझ्याजवळ राहायला घर नाही. पण माझ्या गावठाण जमिनमधील जमिन शिल्लक आहे. पण गावातील काही व्यक्तीने तेथे शेणखत व कचरा टाकुन आपला ताबा केला आहे त्यामुळे ती जागा तशीच पडलेली आहे. त्यामुळे मला तेथे घर बांधायचे असेल तर बांधता येईल का? व त्या लोकांनी काही उपद्रव करु नाही म्हणुन काय बंदोबस्त करावा. त्याकडे कुणाकडे अर्ज करावा
गावठाणा मधील
जमीन जर शिल्लक असली तरी ती तुमच्या मालकीची आहे का ? जर ती तुमच्या मालकीची नसेल तर तुम्ही घर बांधू शकणार नाही . ती ग्राम पंचायत च्या मालकीची असेल व काही कारणासाठी राखीव असेल . जर तुमच्या मालकीची जमीन असेल आणि इतर लोक उपद्रव करीत असेल तर पोलिसांची मदत घ्यावी .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by गणेश नवले
05-08-2015
g9le@rediffmail.com
नमस्कार सर मी २०१० साली एक घर विकत घेतले ,ज्या व्यक्तीकडून घर घेतले त्याने तेच २००३ साली खरेदी केले होते त्याने मला घर विकताना त्याचे खरेदी खात देऊ केले होते पण ते माझ्या कडून गहाळ झाले आहे तरी त्या खरेदी खताची नक्कल प्रत मिळेल काय त्यासाठी मार्गदर्शन करावे हि विनंती
Question by कृणाल सौपुरे
05-08-2015
ksaupure23@gmail.com
सर नमस्कार आपल्या या मुक्त व्यासपीठा बद्दल सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद,
जिल्हाधिकारी यांनी कबुलायात ने एका व्यक्तीस नवीन अविभाज्य शर्तीवर जमीन प्रदान केली. पुढे त्या व्यक्तीने ही स्व अर्जित जमीन त्यांचा नात्यातीलच मावस मुलाला ज्याने त्याची म्हातारपणात काळजी घेतली त्याला दुयम निबंधक यांचेकडील नोंदणीकृत मृत्यू पत्रानुसार मध्ये दिली.त्यावेळी नजराणा भरलेला नाही. STAMP DUTY नियमानुसार भरलेली आहे तर १.या प्रकरणामध्ये शर्त भंग होतो काय??
२.जर शर्त भंग होत असेल व आत्ता शर्त भंग नियमित करून जमिनीची विक्री करण्यासाठी काय करावे लागेल.
३.सदरच्या जमीन खरेदी करण्यासाठी सध्या किती % नजराणा रक्कम म्हणून शासनास भरावी लागेल?
hoy , jilhadhikari yanchi parvangi ghyavi lagel . chalu bajarbhavachya 50 %
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by ganesh
04-08-2015
g9le@rediffmail.com
नमस्कार सर मी २०१० साली एक घर विकत घेतले असून परंतु ज्या व्यक्तीकडून घर घेतले त्या व्यक्तीचे खरेदी खात माझ्याकडून गहाळ झाले असून त्याची नक्कल प्रत मिळण्यासाठी काय करावे या बाबत मार्गदर्शन करावे हि विनंती
नोंदणीकृत केले असल्यास संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात milel
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by samadhan
04-08-2015
iamsamg19@gmail.com
नमस्कार सर,
जुने (४० ते ५० वर्षे ) दत्तक विषयीचे दस्त रेकॉर्ड शोधायचे असतील तर शासनाच्या कोणत्या विभाग अथवा कार्यालयाकडे मिळतील.
दत्तक घेतलेल्या कुटुंबाच्या जमिनीचे वारस फेरफार नोंदीवरून काही माहिती मिळू शकेल का?
एका इसमाने आमच्या शेत जमिनीवर १/७ हिस्सा नोंद करून घेतला आहे.हा इसम माझे आजोबांचे अपत्यापैकी (४ मुले पैकी १ मुलगा दत्तक दिला गेला + ३ मुली) दत्तक दिला गेलेल्या मुलाचा मुलगा आहे.ज्या कुटुंबात दत्तक दिले गेले त्या कुटुंबाचे जमीन विकून टाकली आहे व आता आमच्या जमिनीवरपण हिस्सा लावला आहे. तरी कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
Question by संजय रा. कोकरे
04-08-2015
s.r.kokare1992@gmail.com
नमस्कार सर
माझ्या वडील्यांनी माझी वडीलोपार्जीत जमीन विकुन नविन जमिन खरेदी हक्काने विकत घेतली त्यामुळे मला जमीनवर माझा हक्क माझे वडील देण्यास नकार देत आहे तरी ती मी काय त्या जमीनीचा कायदेशीर हक्क मागु शकतो का? व कसा?
Question by Khushboo Sonar
04-08-2015
khushboo.bharadwaj05@gmail.com
एख्याद्या जुन्या मृत्यू पत्रा मध्ये जर जमिनीशी संबंधित "सरकार मुदतीची" असा शब्द वापरला आहे तर त्याचे अर्थ काय आहे ते सांगावे?
Question by शिवाजी बनसोडे
04-08-2015
mpspkordgaon@gmail.com
सर नमस्कार माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद । भूसंपादन करताना जर क जा प झाले नसेल तर। काय कराव लागेल माहिती मिळावी हि विनंती
उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय व संबंधित विशेष भूसंपादन अधिकारी यांचेकडे पाठपुरावा करावा .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by TUSHAR BHANDWALKAR
02-08-2015
tussh87bhand@gmail.com
सर, नमस्कार आमचे आडनाव भांडवलकर आहे पण पहिल्यापासून माजा आजोबांचे आडनाव सुतार आसे लागले गेले त्या नंतर माजा वडिलांचे पण तेच आडनाव लागले आहे परंतु वडिलांनी मला शाळेत घातले तेंवा भांडवलकर असे आडनाव दिले आता माजे कागत पत्र भांडवलकर नावाने आहेत यामुळे मला काही कागत पत्र देत असताना आडचन येते मला माग्रदर्शन करावे
Question by Sachin Tyambak Javale
02-08-2015
sachin19121981@gmail.com
माननीय सर, आपण 11-07-2015 च्या प्रश्नाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले धन्यवाद. मी दिलेल्या माहीती प्रमाणे आमच्या प्रकरणमध्ये तडजोड करणे शक्य नाही. सदर शेतजमीन 17 गुठे टुकड़ा आहे. त्यामुळे खातेफोड करता येनार नाही.मला त्यांच्याशी व्यवहार करायचा झाल्यास योग्य तो मोबादला मिळणार नाही. तसेच ते पण मला शेत् घेऊ देणार नाही. सदर शेत् जमीन टुकड़ा असल्याने कायद्याने वाटनी करण्यास प्रतिबंध आहे. परंतु वारसास वारस हक्क मिलने हा कयदेशिर प्रश्न असल्याने मी प्रयत्न करीत आहे. मला त्यांचा स्वभाव चांगला असता तर तडजोड करायला हरकत नव्हती. आता मला हे प्रकरण कसे हाताळावे ,त्याबद्दल योग्य मार्गदर्शन हवे आहे.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3433 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
