जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by SACHIN BOKAD
01-09-2022
s.bokad007@gmail.com
सर माझ्या काकांचे नुकतेच निधन झाले आहे काकांना मुलबाळ नाही व पत्नी पण हयात नाही, काकांची एक बहीण आहे म्हणजे माझी आत्या हयात आहे ,माझ्या वडिलांचे पण पूर्वी निधन झाले आहे . माझ्या वडील व काकांना वारसा हक्काने जमीन व घर वाट्याला आले आहे ,शेतजमिनीत आत्याचे नाव नाही , फक्त घरावर आत्याचे नाव लागले आहे .वारस म्हणून माझे काकांच्या मालमत्तेवर नाव लागेल का ? आत्याचा पण जमिनीवर हक्क दाखवेल का , वारस नोंद करताना कोणाची नोंद होईल?
हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 88 अन्वये, हिंदू पुरुष मयत झाल्यावर त्याची मिळकत वारसाहक्काने अनुसूचीमध्ये नमूद
वर्ग-1 च्या नातेवाईकांना जाते
वर्ग एकचे नातेवाईक नसतील तर वर्ग दोन च्या नातेवाईकांना जाते
वर्ग दोन च्या नातेवाईकांमध्ये, बहिण व भाऊ यांचा समावेश आहे.
त्यामुळे जसा आपल्या वडिलांचे नाव शेती मिळकती सह घराला लागले, तसेच आत्याची ही नाव शेती मिळकतीला लागणे आवश्यक आहे तद्वतच तिचा शेती मिळकतीमध्ये हिंदू वारसा कायदा कलम 8 व कलम 9 प्रमाणे तिचा हक्क आहे. आत्याचा हक्क डावलून जरी मिळकतीची विक्री केली, तरी भविष्यात आत्या ने जर न्यायालयात दावा दाखल केला, तर त्या मिळकतीच्या विक्री पासून प्राप्त होणारी रक्कम व्याजासह आपणाला आत्याला द्यावी लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रणव देशमुख
31-08-2022
pdesh08@gmail.com
मी "अ" या व्यक्ती कडून मालमत्ता खरेदी करून घ्यायचा आहे. प्रॉपर्टी कार्ड हे "अ" नावे 1994 ला झाले आहे. "अ"ला 4 बहिणी आहेत पण त्यांचे नाव प्रॉपर्टी कार्ड मध्ये नाही.1987 त्यांचे हक्कसोड घेतले होते पण ते नोंदणकृत नाहीत.फेरफार मध्ये "अ" चा उलेख उत्तराधिकारी म्हणून केला आहे. मला भेटलेल्या माहिती नुसार त्या बहिणी काही कायदेशीर कारवाही करू शकतात.
प्रश्न असा आहे की
१)"अ" कडून मालमत्ता खरेदी करण्यात त्याच्या बहिणी कोणती अडचणी निर्माण करू शकतात का?
2) त्यासाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची चाचपणी करावी.?
३)या परिस्तीत खरेदी केल्यास फेरफार मध्ये अडचण येऊ शकते का?
योग्य मार्ग सांगा व पुढील मार्गदर्शन करा.
धन्यवाद.
प्रणव राव,
हिंदू पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याची मिळकत हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 8 अन्वये, अनुसूचित नमूद प्रथम वर्ग-1 च्या नातेवाईकांना ही मिळकत जाते. वर्ग एकचे नातेवाईक नसतील तर वर्ग दोन च्या नातेवाईकांना मिळकत जाते.
वर्ग १ नातेवाईकांमध्ये , मुलींचा म्हणजे पर्यायाने बहिनांचा समावेश आहे . प्रस्तुत प्रश्नातील बहिणींनी हक्क सोडला आहे असे आपण नमूद केले आहे तथापि , सदरचे हक्कसोड पत्र हे नोंदणीकृत नाही . त्यामुळे भविष्यात बहिणी मिळकतीत त्यांचा हक्क सांगू शकतात .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by असद अली
30-08-2022
aasayyed88@gmail.com
नगर परिषदेच्या रेकॉर्ड वरील अतिक्रमित मिळकतीचे हस्तांतरण साठी दस्त नोंदणी अवश्यक आहे का ?
Question by Vishal Dnyanoba Shinde
29-08-2022
vishalrajeshinde143@gmail.com
1980 वर्षी गट नंबर 111 यास क्षेत्र 1 हेक्टर होते,
पुनर्वसन अंतर्गत 111अ यांस क्षेत्र 0 हेक्टर 80आर (खातेदार मुळमालक) तर
111ब यांस क्षेत्र 0 हेक्टर 20 आर ( जिल्हाधिकारी )
असे दोन 712 पत्रक तयार झाले.
पण आज तागायत सदर क्षेत्र जिल्हाधिकारी यांचाच नावे आहे .
सदर क्षेत्र पुनर्वसनाचा अंतर्गत कोणाचे ही पुनर्वसन नवीन खातेदार कडे वर्ग झाले नाही.
तर हे क्षेत्र मुळमालकास परत मिळवता येईल का? योग्य सल्ला मिळावा.
शिंदे साहेब नमस्कार
आपले आपले प्रश्नावरून, जी पुनर्वसनासाठी जमीन संपादित झालेली आहे ती जमीन भूसंपादन कायदा 894 अन्वये संपादित झालेली आहे. या जुन्या संपादन कायद्यानुसार, जमीन संपादन झाल्यानंतर तिच्या उद्देशासाठी संपादन झालेली आहे, त्या उद्देशासाठी त्याचा वापर झालेला नसेल किंवा संबंधित संपादन संस्थेकडे ती अतिरिक्त म्हणून शिल्लक असेल, तरीही अशी जमीन मूळ मालकाला परत देण्याची तरतूद नाही.
केरळ राज्य शासन विरुद्ध एम भास्कर पिल्ले, या दाव्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने खालील निर्देश दिले आहेत.
विनावापर शिल्लक राहिलेली संपादित जमीन अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरण्यात यावी अन्यथा अशा जमिनीचा जाहीर लिलाव करावा. त्यामुळे आपणास ही जमीन परत हवी असल्यास जर या जमिनीचा जाहीर लिलाव झाला तर त्यामध्ये आपण भाग घेऊ शकता. अन्यथा मूळ मालकांना अशी जमीन परत करावी अशी तरतूद जुन्या भूसंपादन कायद्यामध्ये नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sagar patil
29-08-2022
sp109391@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की माझ्या आजोबांची वडीलपार्जित सामाईक जमीन एकूण 10 एकर त्या पेकी त्याचा भावाने 5 एकर 1667 ला इतर दोन लोकांना विकली आमच्या आजोबांना किवा त्याच्या मुलांना कोणतीही कल्पना न देता तर आज त्या जमिनीवर आमच्या आजोबांचा कोणता अधिकार पोहचतो का
सागर पाटील साहेब,
वडिलोपार्जित मिळकतीमध्ये , आपले वडील, आपण स्वतः व आपल्या अपत्ये यांचा हक्क असतो. आपले आजोबा यांना केवळ एकच भाऊ असेल व त्या भावाने जर त्याचा हिस्सा विकला असेल, तर त्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणताही हक्क नाही.
तसेच आपल्या चुलत आजोबांनी 1967 ला विक्री केलेली आहे. आज या गोष्टीला पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Abhijeet
26-08-2022
amitpatole123@gmail.com
जर 7/12 वर एका खातेदाराचे 6 गुंठे क्षेत्र आहे आणि त्यातले 2 गुंठे क्षेत्र NA आहे ते 2 गुंठे क्षेत्र 2 वक्तीच्या नावाने मंजूर आहे . तर 7/12 वरती नोंद 4 गुंठे आणि 2 गुंठे NA ची नोंद वेगवेगळी असती की एकत्र असती .
नमस्कार अभिजित साहेब,
केवळ दोन गुंठे क्षेत्र एकूण सहा गुंठे क्षेत्रापैकी कसे बिनशेती झाले याचा फेरफार अथवा काही परवानगी असेल तर ती तपासून घ्या.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 42 ड च्या तरतुदीनुसार कदाचित दोन गुंठे क्षेत्र पुरतेच, बिनशेती धार याची रक्कम मेहरबान तहसीलदार यांच्या नोटीस प्रमाणे जमा केलेले असेल व त्याचा परिणाम म्हणून दोन गुंठे क्षेत्र बिनशेती दाखवलेले गेलेली असेल.
हेही पडताळणी करणे आवश्यक आहे की ही दोन्ही क्षेत्रे एकाच व्यक्तीच्या नावे आहेत की बिनशेती क्षेत्र एका व्यक्तीच्या नावे व उर्वरित क्षेत्र दुसऱ्या व्यक्तीच्या नावे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रताप शामराव चौगुले
26-08-2022
pratapchougule@gmail.com
ग्रामीण भागातील घरामध्ये मुलगी चा हक्क असतो काय? तसेच मला वडीलांनी खरेदी केलेले जमीन चे मुत्यपत्र करता येते काय?
प्रतापराव शामराव चौगुले साहेब,
ग्रामीण काय किंवा शहरी काय सर्वच क्षेत्रांमध्ये, वडलोपार्जित मिळकतीमध्ये मुलांसह मुलींचाही हिस्सा असतो. वडिलांच्या नावे असलेल्या मिळकतीचे मृत्युपत्र आपणाला करता येणार नाही. वडिलांना जे वारस असतील जसे की आपण आपणास बहिण असल्यास तिचाही हक्क या मिळकतीमध्ये आहे. आपण आपल्या रत्या हिश्श्याचे मृत्युपत्र करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal kakde
25-08-2022
b9604876863@gmail.com
मा. महोदय....... Sir मा. दिवाणी न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तसेच अपील सुनावणी साठी प्रलंबीत असेल विवादित मालमत्ता विक्री केली असेल तर मा. तहसीलदार साहेब फेर फार मंजूर करू शकतात का....
विशाल काकडे साहेब नमस्कार,
मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 कलम 52 अन्वये, एखाद्या मिळकती संदर्भात न्यायालयामध्ये दावा चालू असेल, व सदरचा दावा हा एकमेकांच्या संमतीने ( collosive ) दाखल केलेला नसेल, तर अशा दाव्यातील पक्षकारांनी, जमिनीची विक्री केल्यामुळे अन्य पक्षकारांच्या हक्कावर गदा येत असेल, तर संबंधित न्यायालयाच्या परवानगीशिवाय अशा जमिनीची विक्री करता येत नाही.
मालमत्ता हस्तांतरण कायद्यातील ही तरतूद lis pendens या तरतुदी वर आधारित आहे.
या तरतुदीचा आधार घेऊन जमिनीचे हस्तांतरण रोखायचे असेल, तर दावा प्रलंबित असल्याबाबत दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी पत्र करणे आवश्यक आहे. जेणेकरून मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी जो मालमत्तांच्या हक्कान संदर्भातला अन या हक्क तपासणी केली जाते ( title search ) त्यावेळी खरेदीदाराला, अशा प्रलंबित दावा जर नोंदणी केलेला असेल तर त्याची त्याला माहिती मिळेल कोणत्या जोगे तो जमिनीची खरेदी करणार नाही व पर्यायाने त्याची फसवणूक होणार नाही. कारण ज्या व्यक्तीने अथवा ज्या पक्षकाराने जमिनीची विक्री केली आहे त्याच्या विरोधात जर भविष्यात न्यायालयाचा निर्णय गेला तर खरेदीदाराला कोणताही मालकीहक्क अशा मिळकतीमध्ये प्राप्त होत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Abhijeet Patole
23-08-2022
abhijeetspatole@gmail.com
जर 7/12 वर खातेदाराचे 6 गुंठे क्षेत्र आहे आणि त्यातले 2 गुंठे क्षेत्र NA आहे ते 2 गुंठे क्षेत्र 2 वक्तीच्या नावाने मंजूर आहे . तर 7/12 वरती नोंद 4 गुंठे आणि 2 गुंठे NA ची नोंद वेगवेगळी असती की एकत्र असती .
Question by प्रशांत गुरव
23-08-2022
prashant.gurav69@gmail.com
गावाकडे आमच्या आजोबांची वडिलोपार्जित जमीन आहे. थोडी शेती आहे, एक घर आहे आणि घराभोवती थोडीशी जागा आहे. आजोबांच्या निधनानंतर गावातील पंचांकडून त्या जमिनीचे तीन हिस्से करण्यात आले. परंतू ते आम्हाला मान्य नाहीत. जमीन वाटप करताना समान वाटप झालेले नाही. असे असूनही हिस्सेदारांपैकी एकाने घरालगत असलेल्या जागेत स्वतःचे घर बांधले. तसेच पंचांनी आमच्यासाठी राखीव ठेवलेल्या जागेत सुद्धा अतिक्रमण केले. ग्रामपंचायत जमिनीच्या विषयात हस्तक्षेप करत नाही, असे ग्रामपंचायत ने आम्हाला कळविले आहे. कुठे दाद मागता येईल? आमची हरकत असूनही जे घर बांधले गेले, त्याला हटवण्यासाठी काही करता येईल का??
Question by Anshuman Nikam
23-08-2022
anshumumol2007@gmail.com
माझ्या आजोबांनी 1960 ते 1968 या सालामधे आमच्या एकूण 6 एकर जमीनीतील 30 गुंठे जमीन 3-3 गुंठे खरेदी खताने 10 लोकांनी विक्री केलेली आहे, या सर्वांनी त्यामधे घरे बांधली असून. बाकी जमीन आमचे ताबेवहिवाटीस असून आम्ही त्यामधे पिके घेतो. आमचा गट नंबर एकच आहे. प्रश्न असा आहे की, सदर 30 गुंठे जमीनाचा 7/12 वेगळा करता येईल का ? यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागेल व प्रक्रिया काय आहे ?
अंशुमन निकम साहेब नमस्कार
प्रत्येकी ३ गुंठे क्षेत्र आपल्या आजोबांनी विक्री केले आहे . त्यामुळे ७/१२ स्वतंत्र करण्यासाठी , तुकडे बंदी कायद्याची बाधा येईल . पर्यायाने या क्षेत्राची मोजणी होणार नाही ही अक्वा मोजणी जरी झाली व त्याप्रमाणे आकारफोड पत्रक जरी तयार झाले तर तुकडेबंदी कायद्याप्रमाणे त्यावर अंमल होणार नाही.
मात्र आपण , याचा अभिन्यास व बांधकाम नियामानुकुल करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अथवा तेथील स्थानिक नियोजन प्राधिकरण या कडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Bhushan bhaurao mhaisane
22-08-2022
bhushanmhaisane5083@gmail.com
Sir mazya sheti madhun rasta ahe to mi bandhawarun deu shakto ka tyabaddal mala mahiti dyawi
भूषण साहेब नमस्कार,
आपल्या शेतांमधुन जर रस्ता जात असेल व आपली इच्छा असेल की तो रस्ता त्या वहिवाटदार आणि आपल्या बांधावरून वापरावा, निश्चितच आपण तो जो वहिवाटदार आहे त्याच्या संमतीने आपल्या बांधावरून रस्ता देऊ शकतात.
जर तो संमती देण्यास तयार नसेल व त्याचा आग्रह जो पारंपारिक रस्ता आहे त्यावरून जायचं असेल, तर आपणाला दिवाणी न्यायालयात जाऊन त्याला बांधावरून रस्ता देण्यास आपण तयार आहात त्याप्रमाणे त्याने बांधावरून रस्ता वापरावा अशा प्रकारचा हुकूमनामा घ्यावा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रविण पाटभाजे
22-08-2022
pravinpatbhaje12@gmail.com
माझ्या शेताची मोजणी 2018 साली झाली असून माझ्या शेतातिल बांधालगत आंब्याचे झाड क प्रतीत गटाच्या सिमेत आहे. याच आंबा झाडालगत बांध कोरून प्रतिवादी ने 3 फुट खोल नाली खोदली, परंतू या नालीतील पाणी जाण्यासाठी मार्ग नाही, त्यामुळे पाणी मुरुण माझ्या शेतात पाझरते, त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. नाली खोदण्यापुर्वी या शेतातील पाणी लगत गटाच्या बांधाशेजारुन नाल्यात जात होते . परंतू नाली खोदकाम
करतांना त्या जागी बांध टाकण्यात आला. याबाबत मा. तहसीलदार यांना जमिन महसुल कायदा कलम 138 नुसार अर्ज केला, परंतु कारवाई करण्यात आली नाही. नंतर मी मामलेदार कोर्ट नुसार पूर्वस्थिती करण्यासाठी अर्ज केला. परंतु सदर प्रकरणी आपण दिवाणी न्यायालयात दाद मागावी असे पत्र मा. तहसीलदार यांनी दिले. या प्रकरणी, आणखी कोणा कडे. व कोणत्या नियमाने दाद मागावी. क्रुपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
प्रवीण साहेब नमस्कार,
मेहेरबान तहसीलदार साहेब यांनी जे काही उत्तर आपल्याला दिलेला आहे ते बरोबर आहे. याशिवाय आपणाकडे अन्य कोणताही मार्ग मला तरी दिसत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कवडू दौलत गेडाम
21-08-2022
kdgedam721@gmail.com
नमस्कार सर, कुळ, सिलींग, भूदान भोगटदार वर्ग ०२ च्या जमीनी भोगवटदार ०१ करता येईल का? करता येत असेल तर कोणाकडे अर्ज करावा.
नमस्कार कवडू साहेब
भूदान जमीन हि ज्या कुणाला प्रदान केलेली असते ही त्याच्याकडे बाहेर पट्ट्याने असते. या या मिळकतीवर ग्रामदान मंडळ यांचा मालकीहक्क आहे तद्वतच ते या मिळकतीचे मालक आहेत. त्यामुळे या मिळते तिच्या हस्तांतरणास परवानगीची तरतूद संबंधित कायद्यामध्ये नाही.
कुळ कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या जमिनी या वर्ग दोन म्हणून धारण केलेले असतात. त्याची विक्री किंमत निश्चित होऊन जर दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला गेलेला असेल, तर ती जमीन आपसूकच वर्ग-1 होते. जर अशा जमिनीचे हस्तांतरण करायचे असेल अथवा तिचे रूपांतर वर्ग एकमध्ये करावयाचे असेल तर संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा.
कमाल शेत जमीन मर्यादा धारण कायद्यापेक्षा अतिरिक्त ठरलेल्या जमिनी वाटप केल्यानंतर त्याचा भूधारणा प्रकार हा वर्ग-2 असतो. अशा जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी आपणाला जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे अर्ज करावा लागतो व त्या ठिकाणाहून आपणाला परवानगी मिळू शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्यामसुंदर खंकरे
21-08-2022
khankaresm5477@gmail.com
25 वर्षे अखंडीत झाले जमीन माझ्या कब्जात आहे, मी जमीन स्वतः कसतो, शेतमाल माझ्या घरी नेतो, पण मूळ मालक आतापर्यंत मला काही बोलला नाही.... शांतीपूर्ण कब्जा आहे... कब्जा आधारे शेत कोणाच्या नावे होईल
श्याम सुंदर साहेब
निश्चित शांत पूर्ण कब्जा तत्वा खाली दिवाणी न्यायालयामार्फत या मिळकतीमध्ये आपणाला मालकी हक्क मिळू शकतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Aniket patil
18-08-2022
ADPATILARVI@GMAIL.COM
काकाच्या नावने असलेले प्रकल्प ग्रस्त पुतण्याच्या नावाने करता येते का
Question by Navanath Patil
15-08-2022
9nathpatil21@gmail.com
सर मा तहसीलदार साहेबांनी आमच्या विरुद्ध निकाल दिला आहे, त्याचे आसे म्हणणे आहे की सदर ची जमीन ही महार वतन 6ब ची आसल्याने तूम्ही सक्षम प्राधिकारी ह्यांची पूर्व परवानगी घेतली नसल्याने तुमचा फेरफार रद्द करत आहे . परंतु सर आम्ही खरेदीच्या वेळेस तेव्हाच्या मा तहसीलदार साहेबांना अर्ज केला असता तेव्हा मा तहसीलदार साहेबांनी आम्हाला पत्र दिले की सदरचा गट हा सन 1968 च्या मुंबई हलके गाव नोकरांची वतने रद्द करणेबाबतच्या कायदा वतन इनाम 01/05/1959 खालसा करण्यात आलेली आसल्याने याकामी शासन निर्णय क्रमांक/वतन/1099/प्र.क्र.223/ल-4 दिनांक 09/07/2002 व शासन निर्णय क्रमांक/2002/प्र. क्र.100/ल -4 दिनांक 17/07/2008अन्वये आणि कंसामधे (महार वतन आणि देवस्थान इनाम जमीन वगळून) सदर जमिनीवरील भोगवटदार वर्ग 2 ही अट कमी न hota जमीन वाटप/ खरेदी विक्री करणेस परवानगीची आवश्यकता नाही. असे आम्हास पत्र दिले होते . आणि आता नवीन मा तहसीलदार साहेबांनी महर वतन 6ब ची जमीन आसल्याने तूमचा फेरफार रद्द करत आहे असे म्हंटले आहे, तरी आता मी काय करू सर
Question by अमोल वाघ
14-08-2022
amolwagh6828@gmail.com
नमस्कार सर,
मामलेदार न्यायालय १९०६ कलम ५(२) अन्वये अर्जदार यांचे अर्जाची सविस्तर चौकशी होऊन केलेला अडथळा दुर करण्यांसंबंधी निर्णय पारीत झाला आहे. नंतर प्रतिवादी यांनी उपविभागीय अधिकारी यांचेकडे २३(२)रिव्हीजन अर्ज दाखल केलेला होता. त्यांत रिव्हीजन नामंजूर करण्यात आले. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असुन त्यांत फेरबदल करण्यांची आवश्यकता नाही. असा निर्णय निर्णय दिलेला आहे. परंतू त्यांनी परत उपविभागीय अधिकारी यांचेकडे रिव्हु अर्ज दाखल केलेला असुन त्यांचे नोटीस आम्हाला प्राप्त झाले आहे.
१) मामलेदार कोर्ट अॅक्ट नुसार रिव्हीजन अर्जातील निर्णय नंतर रिव्हु दाखल करता येते का?
२) मामलेदार कोर्ट अॅक्ट मध्ये तशी तरतूद आहे का?
Question by Manoj
14-08-2022
sagarkandekar1990@gmail.com
एकाच गटातील आपल्या पोटहिस्सा ची मोजणी करण्याची प्रक्रिया काय आहे ? बरेच जण बोलता की सह हिस्सेदार यांची समती लागते पण सह हिस्सेदार तर कधीच समंती देणार नाही कारण जमीन जास्त त्याच्कडे निगते. कृपया आपला पोट हिस्सा मोजणी करून व आपली जमीन ताब्यात घेण्यासाठी काय करावे?
Question by Sampat raskar
08-08-2022
sampatraskar4049@gmail.com
कलम 44अ नुसार रहिवाशी (NA) 200 स्क्वेअर मीटर चा प्लॉट परवानगीशिवाय इंडस्ट्रियल वापरासाठी वापरता येईल का ?
Question by Rahul
08-08-2022
jadhav.rahul111@yahoo.com
माझी व माझ्या काकांची जमीन एकाच गटामधे आहे. गट वेगळे करण्यासाठी किंवा जमीनीचे गट वेगवेगळे करण्यासाठी काय प्रक्रिया आहे. आमचे 7/12 सेपरेट करण्यासाठी काय करावे लागेल याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
महाराष्ट्र तुकडे बंदी तुकडे जोड कायदा १९४७ च्या कलम 31 नुसार, गटर स्कीम योजना अमलात आल्यानंतर, अशा जमिनीचे हस्तांतरण करताना ,जमिनीची विभागणी होत असेल तर अशा जमिनीचे हस्तांतरण करता येत नाही . तथापि विद्युत पंप बसवणे वा अन्य कारणासाठी, जमिनीचा तुकडा पडत नसेल म्हणजे( प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र निर्माण होत नसेल) तर जिल्हाधिकारी यांना परवानगी देण्याचे अधिकार आहेत.
मात्र जर हस्तांत्र्नामुळे तुकडा निर्माण होत असेल तर अस्ज्या हस्तांतार्नास परवानगी देण्याची तरतूद नाही तद्वतच असा व्यवहार अनुद्नेय नाही .
मात्र वारसा हक्काने आलेल्या जमिनीच्या विभागणी करताना जर तुकडा पडत असेल तर दोघांपैल्की एकाला , जमीन घ्यावी लागेल व दुसर्याला त्याच्या हिस्स्याची जमिनीचे पैसे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by BALAJI GOPAL DAHIPHALE
08-08-2022
BALAJIDAHIPHALE1996@GMAIL.COM
महोदय सर,
ज्याच्या नावे ७/१२ आहे तो मयत झाल्यानंतर कायदेशीर वारस यांच्या नावे ७/१२ आली आहे,हे वारस पत्नी, मुले व मुली आहेत. परंतु हे वारस आप-आपसात कटुता असल्यामुळे वाटणी पत्र केलेले नाही, वकिलांनी वाटणी करतो म्हणून प्रत्येक वारसांनी मा.न्यायलयात 7 Rule 1 CPC या खाली दावा दाखल केलेला आहे, हा दावा दाखल करून 2 वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला आहे, पण कोणीही तारखेला जात नाही , म्हणून पुढील प्रश्नवर मार्गदर्शन मिळावे सर.
1) वारस यांची मुले यांच्या नावे जमीन कश्या प्रकारे करता येईल?
2) वारसांच्या समंती विना प्रत्येक जण स्वतः चा हिस्सा कश्या प्रकारे घेवू शकतो ?
३) सर्व वारसांची सामाईक नावे असल्यामुळे प्रत्येक वेळेस शासकीय अनुदान, पिक विमा , शासकीय योजना साठी सहमती देत नसतील तर काय करावे ?
४) अनुदान मागणी साठी तहसीलदार महोदय यांच्याकडे विनंती केली असता तहसीलदार सर सांगतात कि , आपल्या जमिनीवर कोणालाही अनुदान देवू नये म्हणून अर्ज आलेला आहे म्हणून आपणास सहमती विना अनुदान देता येणार नाही.
आपला जो दावा आपण दिवाणी न्यायालयात दाखल केलेला आहे त्याच्या नियमित सुनावणी घेण्यासाठी आपल्या वकिलांमार्फत पाठपुरावा करावा. न्यायालयामार्फत प्रत्येकाचा त्या जमिनीमध्ये असलेला हिस्सा निश्चित केला जाईल. त्यानंतर ते प्रकरण माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सरस निरस वाटपासाठी वर्ग करण्यात येईल. सह धारकाची संमति असो अथवा नसो, तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याच्या अधीन राहून तहसीलदार/ उपअधीक्षक भूमी अभिलेख अशा जमिनीचे सरस निरस वाटप करते. व प्रकरण अंतिम हुकूमनामा साठी दिवाणी न्यायालय या कडे वर्ग केले जाईल. दिवाणी न्यायालय मार्फत अशा प्रकरणांमध्ये अंतिम हुकूमनामा काढला जाईल व त्याप्रमाणे जमिनीचा ताबा सहधारकांना देण्यात येईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोळकर
07-08-2022
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
आमचे राहते घर पडले आहेत ते आम्हाला मुळासकट बांधायचे आहे आम्हची घरपटी पण आहे , पण ज्यांचे जमीनीत नाव आहे ,पण घरावर अधिकार नाही ,या सर्व सातबारामधील लोकांची आम्हांला ना हरकत घवे लागते का
प्रश्न असा आहे ते घर बांधकाम करण्यासाठी आपणाला महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अथवा घर जर नगरपालिका किंवा महानगरपालिका हद्दीत असेल तर त्या त्या नियोजन प्राधिकरणाची परवानगी लागेल. नियोजन अधिकारी आधी तर अभिलेखाची पडताळणी करताना, या व्यक्तीच्या नावावर ती जमीन आहे त्या व्यक्तीची संमती असल्याशिवाय तद्वतच त्या व्यक्तीने अर्ज केला असल्याशिवाय परवानगी देणार नाहीत.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जयराम हरी पाचपुते
06-08-2022
pachputejh@gmail.com
बिनशेती प्रकारानुसार प्रति चौ मी दर आकारणी चे 23/10/2007 चे परिपत्रक मिळावे हि विनंती
Question by Datta putwad
05-08-2022
dattaputwad@gmail.com
dear. sir
In The Court Of :District Judge-2 And ASJ Kandhar Link Court Mukhed
CNR Number. :MHND210002492018
Case Number. :R.C.A./0000032/2018
Nagorao Shyamrao Putwad Versus Pandurang Shyamrao Putwad
Date :03-08-2022
Business : अपीलाथी व त्याचे वकील हजर गैरअपीलाथी व त्याचे वकील हजर युक्तीवाद ऐकला नि १ वर आदेश पारीत केला Order 1 Appeal Is Allowed With Costs 2 The Judgemwent And Decree Passed By 2 Joint CjjD Mukhed In RCS 78/15 Dt 27/7/18 Is Here By Set Aside 3 RCS 78/15 Is Here By Dismissed 4 Decree Be Drawn Up Accordingly
Nature Of Disposal : APPEAL ALLOWED, CROSS OBJECTION ALLOWED
Disposal Date : 03-08-2022
District Judge-2 And ASJ Kandhar Link Court Mukhed नि 1 वर आदेश पारित केला म्हणजे कळत नाही निकाल कोणाच्या बाजूने लागला आहे सांगा निकाल बदल सविस्तर माहिती सागा
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
