जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर, राशन दुकानदार यांना जनमाहिती अधिकारी म्‍हणता येईल का ? किंवा तसे आदेश तहसिलदार यांना काढता येतील का ?
शासकीय कर्मचारी विरुध्‍द फौजदारी खटला दाखल करणेस मंजूरी देणेबाबतचा विहीत नमुना आहे का ? असलेस कोठे मिळेल ? (महाराष्‍ट्र नागरी सेवा (शिस्‍त व अपील) नियम 1979 व विभागीय चौकशी पुस्तिका 1991 मध्‍ये अशा प्रकारचा नमुना आढळून येत नाही.)
नमस्कार सर, आमच्या ७/१२ वरील इतर ह्क्क मध्ये जुन्या शर्तीवर असा शेरा दिलेला आहे त्यामुळे बांधकाम संबंधित विभाग महसूल विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मागत आहे कृपया त्यासाठीचे माहिती / मार्गदर्शन करावे अशी विनंती

Question by संदीप
21-09-2015
aspire200ns@gmail.com

माझे वडील संपत यांचे नावी ५ एकर १० गुंठे वडिलोपार्जित जमीन होती. सन १९८४ साली वडिलांनी आणेवारी लावली. आणेवारी नुसार क्षेत्र प्रत्येकी ४२ गुंठे प्रमाणे वडील + ४ मुले यांचे नावे आली. सन २००९ मध्ये वडिलांनी त्यांचा हिस्सा कायम खरेदीने मुलीच्या नावें केला आहे. जमिनीचे वाटप पत्र झालेले नाही, सन २००३ ते २००९ या काळात माझ्या मोठ्या भावाने इतर ४ हिस्सेदार यांच्या परस्पर काही (५+३+५=१३ गुंठे) जमीन विकली व उरलेली जमीन कायम खरेदीने मुलाचे नावे केली. ४२-१३=२९ गुंठे क्षेत्र मुलाचे नावे होणे अपेक्षित होते परंतु ३२ गुंठे क्षेत्राची खरेदी दिली. मुलाने परस्पर २००९ साली २०+३+११= ३४ गुंठे जमीन विकली. अशी जास्तीची जमिनीची खरेदी कशी झाली ? मी व माझा लहान भाऊ नोकरी निमित्त बाहेरगावी राहत असल्या कारणाने सदर प्रकरणाची आम्हाला कल्पना नव्हती. तसेच गावी शेती कसणारा भाऊ निरक्षर आहे. मागील दोन वर्षापासून सदर जमिनीचे खरेदीदार आम्हास शेती कसण्यास अडथला आणत आहेत. तसेच एका खरेदीदाराच्या फेरफार मध्ये 'तुकडे बंदी कायद्याविरुद्ध व्यवहार' असा शेरा आहे, तो इतर खरेदीदारांच्या फेरफार मध्ये का नाही? आमचा अधिकार डावलला जातोय. या प्रकरणी काय कारवाई करावी या बाबत मार्गदर्शन करावे.
आणेवारी झाली म्हणजे वाटप झाले .
एकदा वाटप झालेवर , मोठ्या भावास , इतरांची जमीन विकण्याचा हक्क नाही .
जर अशी जमीन विकली असेल तर आपण सर्व फेरफार आव्हानित करा . तसेच खरेदी खाते हि रद्द करून मिळणे बाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

गट न.२०२ हा ००.०१आर व गट न.२०३हा ००.०५ आर आहे. भोगवटदार सदरी तीन जणाची नावे असून प्रत्येकाचा हिस्सा ०५आणे ०४पैसे आहे. गट न.२०१ व गट न.२०४ हे लगत आहेत. गट न.२०१ च्या हद्दीत (पोटात) गट न.२०२ हा आहे. गट न.२०४ व गट न.२०१ च्या हद्दीत निम्मा निम्मा (पोटात) गट न.२०३ आहे. गट न.२०४चे संपूर्ण क्षेत्र व गट न.२०१ चे अर्धे क्षेत्र माझे नावावर असून ते खरेदी खताने घेतलेले आहे. गट न.२०२ व गट न.२०३ च्या ३ हिस्से पैकी २ हिस्से मला खरेदी घ्यावयाचे आहेत. सहायक निबंधक कार्यालय गुंठे ची खरेदी बंद असल्याचे कारण सांगत आहेत. गट न.२०२ व २०३ चे हिस्से ची खरेदी मी घेऊ शकतो का? अशी खरेदी ही गुंठेवारी मध्ये येते का?
एवढ्या कमी क्षेत्राचा गट असू शकत नाही . गट स्कीम योजनेचा उदेश हा छोट्या क्षेत्राचे एकत्रीकरण करून किफायतशीर , आकारमानाचे क्षेत्र भूखंड बनवणे असा आहे .
जर गट स्कीम योजना झाल्या नंतर , त्याची पोत्विभाग्णाई झाली असेल , तर हे व्यवहार तुक्देबंदी कायद्या विरुद्ध आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर

मज़े वडिल वर्ल्यानंतर माज्या अजोबने त्यांच्ये नावे असलेली १५ एकर जमीन माज्या ककाच्या नावे केलि व् आम्हाला त्यात कही हिस्सा नही दिला. ति जमीन अजोबने स्वत कमोवलेली आहे तर दावा करुण आम्हला जमीन हिस्सा मिळेल का कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार सर,
भुमिअभिलेख कार्यालय यांचे कडील आकारबंद पत्रकानुसार गटाचे एकुण क्षेत्र (पो.ख.सह) 02हे.22आर आहे. सध्याचे सात बारा उतारांतील एकुण क्षेत्र (पो.ख.सह) 02हे.19आर आहे. म्हणजेच ते 03आर कमी आहे. गट स्कीम झाल्यापासुन आज पर्यतच्या सात बारा उतारांत ते 02हे.19आर आहे. सात बारा उतारांवरील क्षेत्र वाढवले जाईल काय? याबाबत कोणाकडे अर्ज करावा.
गट स्कीम नंतर जर क्षेत्र २.१९ र झाले असेल तर , आता वाढवता येत येणार नाही . गट स्कीम योजने विरुद्ध अपील करावय्स खूप विलंब झालेला आहे
मात्र आपण अधिषक भूमी अभिलेख यांचे कडे अर्ज करा . विलंब माफ केला तर , आपणास कदाचित न्याय मिळू शकेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज करावा .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

सर आपल्‍या महाराष्‍ट्र सिव्‍हील सर्व्‍हीसेस मध्‍ये नविन खाते तयार केलेले आहे तरी माझा पासर्वड कधि मिळणार
आपला पासवर्ड पाठविला आहे, साधारणत: २-३ दिवस कालावधी लागतो.
एमसीएस.

Reply by MCS Maharashtra | इतर

१] मृतुपत्राच्या आधारे सध्याच्या वारस नोंद मध्ये फेराफार वारस नोंद करता येईल का २] मृत्यू पत्रात वडिलांनी मुलीला जमीन हिस्सा दिला नाही [ वडिलोपार्जित स्वकष्टित ] तर मुलीला जमीन हिस्सा मिळूशक्तो का ३] जमिनीची वाटप होण्यासाठी भावाने कोर्टात दावा दाखल केला व त्याच जमिनीत घर व संडास बांधले आहे तक्रार कोणाकडे करावी
१. होय
२. मृत्य पत्राने जर हिस्सा दिला नसेल तर , काही करता येणार नाही .
३.मृत्य पत्राने , भावाचे नवे जमीन झाली आहे . भाऊ जमिनीचा मालक आहे . त्याचे मालीकीचे जमिनीत तो बांधकाम करू शकतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by jagadis padamawat
19-09-2015
mehtaj40@gmail.com

Marathwada mukti sangramatil...swatntrya senikanchya..namnirdeshit palya sathi naukri sathi maharastra sashnane kontya prakarchi suvidha uplabhda keli aahe he ...kalwWe
एन.ऐ . अर्ज स्वीकारताना अर्जदार यांचेकडून ७/१२ , ८ अ , ले आओत , मोजणी नकाशा च्या प्रती ८ किंवा आवशयक प्रती मागणी करता येतील का ?
जमिनीचे अधिकार अभिलेख तपासण्यासाठी , हे अधिकार अभिलेख आवश्यक आहेत , आपण हे नमुने मागू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एन . ऐ . आदेश मंजूर करणेसाठी कोणते शासन निर्णय आहेत ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
NA आदेश म ज म अ १९६६ चे कलम ४२ अ, ४४ च्या तरतुदीचे अनुषगाने दिले जातात .
ज्या zone मधील जागा आहे , त्या ठिकाणी , मागितलेला बिन शेती वापर अनुद्नेय असणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तलाठ्याकडे अर्जदार/शेतकरी फेरफार नोंदीसाठी अर्ज, वारस/बोजा/विक्री/वाटणीपत्र/मृत्रुपत्राचा लेख व इतर कागद पत्र जोडून सादर करतात.त्यावर तलाठी कार्यवाही करतात जसे फेरफार नोंद घेणे;नमुना ९ व १२ ची नोटीस काढतात.त्या सर्व कागदपत्राची एक संचिका तयार होते.सदर संचिका फेरफार मंजूर झाल्यापासून तलाठी दफ्तरी किंवा अभिलेखागारात किती कालावधीसाठी जतन करावयाचा असतो.कृपया माहिती द्यावी.विशेषता नमुना ९ व १२ ची नोटीस. .
महसूल कार्यालयीन पत्रे/चौकशी अहवाल यांचा जतन करण्याचा कालावधी किती असतो.कृपया माहिती द्यावी.
संबंधीत प्रकरणावर अवलंबुन आहे....उदा. अकृषक प्रकरणातील चौकशी अहवाल ब अभिलेख आहे

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

नमस्कार सर
सर शेजारील शेतकरी 2-3 वर्ष पासून भांडन करून वापरू देत नव्हता तक्रार करून तहशील दारानी रस्ता दिला....तरी ही तो 4 महिन्यापासून वापरू देत नहीं...के करु???please nkki marg sanga
त्याचे विरुद्ध पोलिस तक्रार दाखल करा
The Specific Relief Act, खाली त्याचे दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझ्या सर्व कुटुंबांना जागा जमीन आहे आणि फक्त आह्मालाच नाही? तर आमच्या जमिनीचा शोध कसा घायचा, यावर काही उपाय आहे का?

माझ्या आजोबाच्या भावांना आणि त्यांच्या मुलांना सुद्धा जमिनी आहेत आम्ही सोडून सगळ्यांना....

वडील लहान असतांना माझे आजोबा वारले आणि आजी पण वारली आहे..

या विषयावर आपल्या कडून काही माहिती मिळेल अशी अपेक्षा करतो....

जमिनीचा हिस्सा तुमच्या आजोबा किवा वडिलांच्या नावे नोंदवली गेली नसेल हि शक्यता आहे . तरीही खात्री साठी रेसर्वे पासून चे रेकॉर्ड तपासा .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by kapil ingle
15-09-2015
ingle.kapil50@gmail.com

dongari pramanpatra tehsil office marfat deta yete ka?wa pramanpatra देण्याची karyapadhati
होय............. सेतुशी संपर्क साधा

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

एखादा कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहे .. तर त्या कर्मचारी यांची अर्जित रजा प्रतिनियुक्ती असलेल्या कार्यालयात मंजूर करता येईल का ? अर्जित रजेचा अर्ज मुल कार्यालयात मंजुरीसाठी पाठवावा लागेल का ?
नाही .होय ,मुल कार्यालय अर्ज मंजूर करेल .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

मी सदनिका खरेदी करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरलेले आहे सदर भरलेले मुद्रांक शुल्क किती दिवस वैध असते अथवा किती दिवसात खरेदी व्यवहार पूर्ण करणे बंधनकारक आहे
चार महिन्यात नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी , ज्यास्तीत ज्यास्त ८ महिन्यात ती पूर्ण करावी . अन्यथा आपली नोंदणी ( registration) होणार नाही

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

भूमी अभिलेख च्या वेब पेज वर ७/१२ ओपेन होत नाहीत .त्या साठी काय करावे लागेल .
प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटला लिंक दिली आहे......... तेथुन ओपन करा

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

सर, मोजणीबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नास मार्गदर्शन केल्‍याबद्दल धन्‍यवाद .
एखाद्या वर्ग 3 कर्मचा'याने त्‍याच्‍या सद्यस्थितीत कार्यरत कार्यालयात रुजू होण्‍यापुर्वी तो ज्‍या ठिकाणी कार्यरत होता त्‍या ठिकाणी एक महिना उशिराने राजीनामा दिला परंतु संबंधीत कार्यालयाने राजीनामा मंजूर न केल्‍यामुळे सदर कर्मचा'याने मॅटमध्‍ये अर्ज दाखल केल्‍यानंतर सदर कार्र्यालयाने जवळपास दोन वर्षानंतर कर्मचा'याचा राजीनामा मंजूर केला आहे. त्‍यांनी सदर कार्यालयात राजीनामा दिल्‍यानंतर वेतन व भत्‍ते स्विकारले नाहीत. त्‍यामुळे संबंधीत कर्मचा'याचे वेतन व भत्‍ते अद्याप मंजूर केले नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
सर....... मला माझ्या बहिनींनी हक्‍क सोडण्‍याबाबतचा लेख्‍ा लिहून दिलेला अाहे.व त्‍याबाबतची सब रजिस्‍टर कार्यालयात नोंद केलेली आहे. परंतू मला भविष्‍यात वारस हक्‍काने तिला हिस्‍सा द्यावयाचा असेल. तर मला हिस्‍सा देण्‍यासाठी कोणता लेख तयार करावा लागेल कृपया मार्गदर्शन करावे.
सर नमस्कार मी विचारले होते की आम्हाला सरकार कडून चार एकर जमीन मिळालेली आहे सदर जमीन भोगवटादार वर्ग 2 वरून भोगवटादार वर्ग 1 झालेली आहे पण जमीनीचा आकार सातबारा वर येत नाही सातबारा वर आकार येणेसाठी काय करावे लागेल सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
नमस्कार सर,
माझे आजोबा यांनी तारीख ६-१-१९५० रोजी खरेदी खताने सर्वे न. १ पैकी ११ गुंठे जमीन विकत घेतली. ५०/५१ ते ६२/६३ पर्यंत जमिनीचा सर्वे न.१/३ सातबारा उतारा निघत होता. एकत्रीकरण योजनेनंतर सातबारा निघत नाही. एकत्रीकरणा पूर्वीच्या हक्कनोंदीच्या पत्रका नुसार सर्वे न.१/३ ची नोंद आढळून येत नाही. आज रोजी सदर जमीन आमच्याच ताब्यात आहे. तरी सात बारा उतारा कसा मिळवावा.
एकत्रीकरण योजने मध्ये सर्वे न १/३ , अन्य इसमाचे ताब्यात गेली असेल .
त्या बाबत आपणास .अन्य जमीन मिळाली असेल .
आपण अपील करू शकता . मात्र अपील विलंब माफ होईल का या बाबत शाश्वती नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
नोंदणी महानिरीक्षक कार्यालय परिपत्रक ३८४६/२००५/७१० दि.१०-०५-२००६ कुठे बघावयास मिळेल.
www.igrmaharashtra.gov.in ह्या वेब साईट वर शासन निर्णय सदरात कृपया पहा

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.48 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3433
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3