जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Chaitanya Phadatare
08-05-2023
chaitanyaphadatare7@gmail.com
सर नमस्ते
माझ्या वडिलांना दोन सख्खे आणि एक सावत्र भाऊ असून,माझे वडील सर्वात धाकटे आहेत.माझे सावत्र चुलते ह्यात नसून त्यांची दोन मुले आहेत.माझ्या वडिलांना सावत्र चुलत्याची मुले जमीन रजिस्टर वाटप करून देत नाहीत व त्या साठी कोणतंही सहकार्य करत नाहीत.तरी आम्हाला रजिस्टर वाटप करायचं आहे तरी लवकरात लवकर तुम्ही मार्गदर्शन करावं ही विनंती.
तुमचा विश्वासू,
चैतन्य फडतरे
जर आपले सावत्र चुलत भाऊ आपल्या एकत्रित कुटुंबाच्या मिळकतीचे वाटप करून द्यायला तयार नसतील तर आपण आपल्या तालुक्याच्या दिवाणी न्यायालयामध्ये वा मिळकती मधील आपला हिस्सा निश्चित करून मिळून त्याचा ताबा देण्याचा हुकूम करणे बाबत दावा दाखल करा. ही प्रक्रिया थोडीशी वेळ खाऊ व किचकट स्वरूपाची आहे. त्यामुळे यामधून काही तडजोडीने तोडगा निघतोय का याचीही चाचणी केलेली योग्य राहील.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Raju gaikwad
07-05-2023
rajug2917@gmail.com
लँड आलेनेशन (इनाम रजिस्टर) 1896 मध्ये पणजोबा यांचे नाव दिसतंय त्याच्यानंतरन वारसांचे नाव दिसत नाही सातबारा उतारावर वारसदार नाव दिसत नाही
कदाचित आपल्या आजोबांचे नाव, इनामी नाहीशी करण्याबाबतच्या अधिनियमाद्वारे कमी करण्यात आलेले असेल व त्यावेळी ज्या व्यक्तीचा मिळकतीवर ताबा कब्जा असेल किंवा असा इसम वैदरीत्या जमीन धारक करत असेल तर त्याचे नाव कब्जेदार सदरी दाखल झालेले असेल. यासाठी आपणाला जमिनीचा सातबारा उतारा काढून त्यावर नमूद जे फेरफार आहेत त्याचे उत्तरे प्राप्त करून घ्यावेत व त्या आधारे आपणाला आपल्या आजोबांचे जे वतनदार किंवा इनामदार म्हणून जे नाव आहे त्या का कमी झाले याचा बोध होईल. जर कोणत्याही फेरफाराविणार आपल्या आजोबांचे व त्यांच्या पश्चा वारसांची नावे लागली नसती तर आपणाला उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करता येईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Raju gaikwad
07-05-2023
rajug2917@gmail.com
आजोबांनी व्हील (मृत्यू पत्र) बनवलेला आहे पण ते रजिस्टर नाहीये त्याच्यानंतरन बहिणीचे नाव सातबारावर लागलेली आहे पण कमी करणेबाबत काय करावे लागेल
भारतीय उत्तर अधिकारी अधिनियम 1925 अन्वये मृत्युपत्र नोंदणीकृत असणे आवश्यक नाही. मृत्युपत्रांवर नाव दाखल व्हावे यासाठी बहिणींची जी नावे सातबारा दाखल झालेली आहे ती कमी करून मृत्युपत्राद्वारे ज्यांना जमीन दिलेली आहे त्यांची नावे दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आपणाला अपील दाखल करावे लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vaishali
04-05-2023
vaishali.upasani14@gmail.com
नमस्कार मी विवाहीत स्त्रि असुन माझी शेती घेण्याची इच्छा आहे,2016 सालापर्यंत माझे 7/12ला नाव होते परंतू त्यानंतर शेती विकल्या मुळे 7/12ला नाव नाही . तर मला आता शेती घेता येईल का? त्यासाठी काय कराव लागेल.
महाराष्ट्र कुळवळ व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 63 अन्वये कोणत्याही बिगर शेतकरी व्यक्तीला शेतजमीन विकत घेता येत नाही. सन 2016 पर्यंत आपल्या नावे शेत जमीन होती परंतु त्याचा काहीही उपयोग होणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amol
03-05-2023
amolsalunkhe@rediffmail.com
एका व्यक्तीने आपल्या वडिलांचे कुलमुखत्यारपत्र करुन घेतले आहे व त्याचा काहीही संबंध नसलेल्या केस मध्ये त्रयस्थ पक्ष म्हणून सामील करून घेण्यासाठी अर्ज केलेले आहे. एका पोलिस केस मध्ये जबाब देताना त्याने असे लिहून दिले आहे कि 'माझ्या वडिलांच्या मेंदूचे ऑपरेशन झाले असून ते अपंग आहेत त्यांना काही एक कळत नाही'
प्रश्न असा आहे कि ज्या माणसाची मानसिक स्थिती चांगली नाही व त्याला काही ही कळत नाही तर त्याने दिलेले कुलमुखत्यारपत्र खरे असू शकते का? त्याने या अवस्थेत केलेले कुलमुखत्यारपत्र कायदेशीर ठरते का?
माणसाचे आरोग्य किंवा त्याची मानसिक स्थिती चांगली नसेल व आपल्या म्हणण्यानुसार त्या माणसाला कळत नसताना जर त्याने त्रस्त व्यक्तीला मुखत्यारी नेमले असेल तर आपण असे मुक्त्यारपत्र दिवाणी न्यायालयात आव्हान करू शकता. मात्र जोपर्यंत दिवाणी न्यायालय असे मुक्तार पत्र रद्द बादल करत नाही तोपर्यंत आपणाला मुक्त्यारपत्रावरती कोणतीही शंका उपस्थित करता येणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by gavhane balasaheb laxman
01-05-2023
grjtraj2@gmail.com
कुळ कायद्याने प्राप्त जमिनीचे मिळकत दाराला मृत्यु पत्र बनविण्याचा अधिकार आहे काय ?
Question by समीर विनायक मोरे
26-04-2023
987.sameer@gmail.com
आई जिवंत असताना सात बाऱ्यावर नातूंचे नाव घेऊ शकतो का?
Question by फारूक
26-04-2023
safwanfaruk694@gmail.com
भुमि अभिलेख रोव्हर मशिने मोजनी कशा प्रकारे करतात याबत माहीती हवी आहे . आपण देऊ शकाल का
१)रोअर मशिने जमिनीची मोजणी करतांना प्रथम मोजनीदार जागेवर कोणते पाँईट निशित करतो तो पाँईट त्या कोणते उपरण वापरून स्टेशन निच्छित करतो काय?
२)पाँईट निच्छित करतांना अंक्षाश रेखांश नोंद रोअर मशिन प्रक्षेपणा द्वारे होते काय?
2)दोन रेषेमधिल अंतर मोजले जाते तेव्हा कोन तयार होतो त्या कोणाची अंशात्मक नोंद होते काय?
3)रोअर मशिन सोबत भुकर मापक यांना इतर यंत्र सामृग्रीची कोणती दिली आहेत त्याची नावे
4)जमिन मोजणी पुर्ण झाल्यावर मोजनीची प्रत आँन लाईन उपलब्ध केली आहे काय ?याची माहिती
5)भुकरमापक यांना रोअर मशिने जमिन मोजनी पध्दती बाबत माहीती पुस्तीका
या बाबत माहीती देणे बाबत संदेश पाठव माहीती द्या
Question by फारुख नाईक
25-04-2023
safwanfaruk694@gmail.com
सातबारा मध्ये सर्वे नंबर वर ( सरकार) नमूद गावठाण असलेली जमीन मिळकत मालकी हक्काने खरेदी करण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा? या कामी नजराना फी किती भरावी लागेल? सदरील सरकारी गावठाण मिळकतीमध्ये आम्ही तब्बल 80 वर्षापासून वहिवाट करून तेथे घर मिळकत बांधून राहत आहोत. तरी कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
Question by फारुख नाईक
25-04-2023
safwanfaruk694@gmail.com
सातबारा मध्ये सर्वे नंबर वर ( सरकार) नमूद गावठाण असलेली जमीन मिळकत मालकी हक्काने खरेदी करण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा? या कामी नजराना फी किती भरावी लागेल? सदरील सरकारी गावठाण मिळकतीमध्ये आम्ही तब्बल 80 वर्षापासून वहिवाट करून तेथे घर मिळकत बांधून राहत आहोत. तरी कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
Question by फारूक
25-04-2023
safwanfaruk694@gmail.com
मी एका माणसाबरोबर भाडेकरार रजिस्टर केला त्याचे इतर अधिकारात नाव दाखल झाले नंतर सदर करार रद्द न करता ते भड्याने घेटलेल्या जागेत असलेले घर पडून गेले तो माणूस निघून गेला आता मी पुढे काय केले पाहिजे
Question by फारूक
25-04-2023
safwanfaruk694@gmail.com
मी एका माणसाबरोबर भाडेकरार रजिस्टर केला त्याचे इतर अधिकारात नाव दाखल झाले नंतर सदर करार रद्द न करता ते भड्याने घेटलेल्या जागेत असलेले घर पडून गेले तो माणूस निघून गेला आता मी पुढे काय केले पाहिजे
Question by Balkrishna Devre
21-04-2023
b.devre@rediffmail.com
महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या १० जानेवारी २०१३ च्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना ( सिडको - नैना ) मध्ये समाविष्ट असलेल्या व विकास आराखडा घोषित केलेल्या जमिनींना तुकडे जोड व तुकडेबंदी कायदा लागू होतो का प्रमाणभूत क्षेत्रा पेक्षा कमी क्षेत्रफळाचा तुकडा खरेदी अथवा विक्री करता येऊ शकतो का या बाबत माहिती व उपलब्ध परिपत्रक प्रत मिळणे बाबत विनंती
Question by रमेश चौधरी
21-04-2023
chaudharirames356@gmail.com
शेत जमीनीतून जाणारी पूर्वपार पाऊलवाट जमीन मालकाने बंद केली आहे. याबाबत. काय कारवाई करता येईल. मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती.
Question by रमेश चौधरी
21-04-2023
chaudharirames356@gmail.com
शेत जमीनीतून जाणारी पूर्वपार पाऊलवाट जमीन मालकाने बंद केली आहे. याबाबत. काय कारवाई करता येईल. मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती.
Question by श्रेयस रा. जोशी
19-04-2023
shreyasrjoshi26@gmail.com
माझा प्रश्न असा आहे की, एक जागा आहे पंधरा गुंठे त्यातील चार गुंठे अ ला पाहिजे दोन गुंठे ब ला आणि उर्वरित नऊ ड ला पाहिजे, तुकडा बंदी असल्यामुळे एकत्र खरेदीखत होईल परंतु एकत्र पंधरा गुंठे खरेदीखतात अ चे क्षेत्र, ब चे क्षेत्र, डॉ चे क्षेत्र खरेदीखतात वेगळे वेगळे दाखवू शकते का ? सातबारा एकत्र असेल परंतु खरेदीखता मध्ये प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे दाखवता येईल का ? या संदर्भात माहिती मिळावी.
Question by Ankit Dhanraj Hargude
11-04-2023
ankithargude13@gmail.com
शासकीय जमिनीचा पट्टा हवा आहे कृपया सविस्तर प्रक्रिया माहिती सांगा
Question by Pankaj Hansraj Gawali
11-04-2023
pankajgawali2012@gmail.com
शेतमालकाने सन 1995 मध्ये ग्रामीण क्षेत्रातील शेतात दोन गटातील (खसरा नं. गट नं. भूमापन क्रमांक असलेल्या) एकुण 8 अ च्या क्षेत्रावर, स्वत: च्या मालकीच्या शेतामध्ये प्लॉट पाडून विक्री केली. व त्याबाबत विक्रीपत्र, दुयष्यम निबंधक कार्यालयातून खरेदीदारास विक्रीपत्र करुन दिलेले आहेत. परंतू त्या दरम्यान त्यांनी दुययम निबंधक कार्यालयामध्ये विक्रीपत्रासोबत शेतीमध्ये पाडलेल्या प्लॉट च्या नकाशा जोडलेला नव्हता. करीता खरेदीदाराचा हक्क् कायम राहील किंवा कसे ?
तसेच शेतमालक मृत पावल्यास त्या शेतावर त्याचे वारस यांनी नाव नोंदविले आहे. करीता पुढील कार्यवाही काय करावी लागेल याबाबत मार्गदर्शन मिळावे, ही विनंती.
Question by Amit Kulkarni
10-04-2023
ameetregekulkarni@gmail.com
दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी विक्री करताना
१) जमीन मिळकतीच्या पैकी क्षेत्राची विक्री करताना त्या पैकी क्षेत्राचा स्वतंत्र नकाशा आवश्यक आहे का किंवा कसे ?
२) पैकी क्षेत्राची विक्री करताना त्या पैकी क्षेत्राच्या चतु:सिमा खरेदी खतात नोंद करता येतीत किंवा कसे ?
३) खरेदी विषयक जमीन मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावर कमीत कमी किती वर्षाची पिक पाहणी नमूद असणे आवश्यक आहे याची माहिती मिळावी.
४) सामायिकातील सातबाराचे अमुक एक क्षेत्र जे स्वतंत्रपणे सातबारात दर्शवण्यात आलेले नाही अशा क्षेत्राची चतु:सीमापूर्वक विक्री करता येते किंवा कसे याची माहिती मिळावी.
Question by Rangsparsh
10-04-2023
pravinsarwade@gmail.com
Dadasheb gaikawad sabalikaran yojana suchana
Question by माळी एस.पी.
09-04-2023
spmali1949@gmail.com
म.ज.म.अधि. कलम 143 अन्वये बांधवरून किती फुट गाडी रस्ता देता येईल
Question by विनायक सुतार
08-04-2023
vinayak12sutar@gmail.com
नदी, वहाळ, पऱ्या या सार्वजनिक स्त्रोवरील पारंपारीक पाणीपुरवठ्याच्या योजनांचे नव्याने शासकीय पाणीपुरवठा योजना करताना बक्षिस पत्रांचा येणारा गुंता कसा सोडवणार
Question by पनवेल महानगरपालीका
06-04-2023
pmcasthapana01@gmail.com
सर्वेअर / भूमापक या पदाची सेवा प्रवेश नियमावलीनुसार शैक्षकिण अर्हता बाबत माहिती
Question by Vishal Eknath khairnar
06-04-2023
vishalkhairnar9284@gmail.com
भोगवटादार वर्ग २ ची जमीन असेल तर अशा जमिनीची पोट हिस्सा मोजणी करावयाची असेल तर सक्षम प्राधिकरणाची पोट हिस्सा मोजणी कामी परवानगी घेणे आवश्यक आहे का? असल्यास त्याबाबत शासन नियम कोणता किंवा याबाबत शासन निर्णय / परिपत्रक असल्यास त्याची तारीख मिळावी
Question by Abhijeet Patole
05-04-2023
abhijeetspatole@gmail.com
जर का फेरफार मंडळ अधिकारी यांनी चुकीच्या आधारे रद्द केला असेल तर काय करावे लागेल पूर्ण माहिती मिळावी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
