जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

After the redevelopment of society under the category of PWR-219 on Collector land in Mumbai suburban Who will give the approval to new flat purchaser's membership ( .free to sale}) category. The Collector or Social Welfare Deptt.

Question by tahsildar
21-02-2023
tahsilsawantwadi@gmai.com

एखाद्या जमिनीवर मुळ जमिन मालकाचा बोजा नोंद असताना कुळाने 70 ब दावा दाखल करावयाचा असल्यास संबंधित बोजाबाबत कोणता निर्णय घ्यावा
जमिनीवर बोजा कश्याचा आहे ? ज्या संस्थेचा बोजा आहे त्यांनाही सुनावणीस बोलावणे आवश्यक . कुल मालक झाल्यावर , बोजा कमी करण्यात येईल त्यासाठी , मालकाकडून दुसरी मिळकत तारण घ्या असे वित्तीय संस्थेस सांगावे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

I have a residence flat in my name and my father's name. I have to remove my father's name from the flat . Can this be done in a 500rupee stamp paper.
आपल्या वडिलांनी सदनिकी मध्ये असलेला त्यांचा, अर्धा हिस्सा आपणाला बक्षीस पत्राने देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुद्रांक शुल्क हे केवळ दोनशे रुपये एवढे आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मला महाराष्ट्र शासनाची / वन महसूल विभाग मालकीची गावा शेजारी असलेली कमी उंचीचे लहान डोंगराळ वा टेकडी भाग जमीन हि कृषी वन निगडित प्रयोजने साठी खरेदी घेवयाची आहे. तर त्यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागेल. तसेच शासन जमीन खासगी कृषी वन निगडित प्रयोजने साठी प्रदान करण्याचे कोणाला अधिकार आहेत व त्या साठी कोणत्या गोष्टींची वा कागद पात्रांची आवश्यकता आहे.
शासनाकडून कमी उंचीचे लहान डोंगराळ व टेकडी जमीन भाग हा कृषी निगडित प्रयोजने साठी खरेदी घेऊ शकतो काय या बद्दल कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
वृक्ष लागवडीसाठी जागा देण्याचे अधिकार, वित्तीय मर्यादेनुसार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व शासनास आहे. आपण मागणी करत असलेली जागा आपल्या जागे शेजारी आहे असे आपल्या प्रश्नावरून दिसून येते. शासनाकडून मागणी करणाऱ्या व्यक्तीला, जास्तीत जास्त पडीक जागा दोन हेक्टर, एक पाणी असणारी जागा एक हेक्टर व बागायत जागा पडीक जागेच्या निम्मी मिळतो. यासाठी आपणाला जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेचा सातबारा उतारा सह आपला मागणी अर्ज करावा लागेल. त्या आधारे जिल्हाधिकारी प्रकरणाची चौकशी मेहरबान तहसीलदार साहेब यांची कडून करून घेतील. व जागेची शिघ्र सिद्धगनका नुसार येणारे मूल्य, उपरोक्त नमूद महसूल अधिकारी यांच्या वित्तीय मर्यादेमध्ये असेल त्याप्रमाणे संबंधित त्याबाबत निर्णय घेतील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, माझे जमिनीला 1/4/57चे कुळ लागले आहे.कुळाने कुळ खरेदीला नकार दिला आहे. कुळव व त्याचा मुलगा मयत आहेत. त्या तिघानी तहसीलदारांना जमिन नको आहे असे पत्र दिले आहे जमिन मालकाने पेपर नोटीस देउन व सर्च रिपोर्ट काढुन जमिनीची विक्री केली आहे.काही समस्या होइल का?
कृषक दिनी जी व्यक्ती कुळ असते ती व्यक्ती त्या मिळकतीची खरेदीदार झाली आहे असे कायद्याने मानले जाते. त्यामुळे केवळ कुळाने जमीन मालकाला परत केली तर तो व्यवहार अत्यंत चुकीचा आहे. कुणाला अशी जमीन मालकाच्या लाभात देता येत नाही. कुळाच्या अन्य वारसांनी भविष्यात हरकत घेतली तर ज्या आदेशाने कुळाचे नाव कमी करून आपले नाव दाखल केलेले आहे ते आदेश रद्द बादल होऊ शकतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

How to remove reservation from my 7/12 extract. Where can i get the procedure to remove reservation
Once the land is reserved for any Public Purpose by the Local Body/Planning Authority, it can only be deserved if the acquisition proceedings lapse. Or otherwise, by resolution, Local Body decides to deserve the same, and de-reservation stands the scrutiny regarding the requirement of the Regional Plan .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Adhikarpatr sadhya panavar kelele chalate ka . Adhikar patr kase karave

Question by SHREYAS MEHTA
16-02-2023
accounts@rhco.in

Kindly guide the detail Procedure & forms if Any or the Application of Change of Name from grand Father to the Name of the Legal Hire
If your grandfather is surviving, he can gift the property. The stamp duty required to validate the transaction is Rs.200/- if it is a Residential/Agricultural Property. Otherwise, apply to Mutation Officer ( Talathi/CTSO) along with Death Certificate and an affidavit sworn in by all legal heirs, enumerating the names of all legal heirs.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सामायिक म्हणजेच एखाद्या सातबाऱ्यावरील अविभाज्य हिसाचा वडिलांकडून मुलाकडे बक्षीस पात्र करता येते का? म्हणजेच अविभाज्य हिसायाचे बक्षिसपात्र करता येते रक्ताचा नात्यामध्ये.
अ -विभाज्य म्हणजे आपणाला असे म्हणायचे आहे की आपल्या वडिलांचा त्या मिळकतीमध्ये आपल्या इतर चुल्त्यांसह हिस्सा आहे. त्यासाठी आपण सर्व इतर सहधारकांची जर संमती घेतली तर त्याचे बक्षीस पत्र अथवा विक्रीपत्र करता येईल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब , वसई , उमेळे येथे राहत असून आमचा वडिलोपार्जित संपत्ती मध्ये (शेत जमिनीमध्ये ) वडील जिवंत (हयात) असताना वडिलांची संमती असेल तर मुलाचे नाव सातबार्यावर आणू शकता येते का?
वडील त्यांचा हिस्सा आपणाला बक्षीस पत्राद्वारे देऊ शकतात. जमिनीचे स्वरूप शेतजमीन असल्यामुळे लागणारे मुद्रांक शुल्क केवळ रक्कम रुपये २००/- एवढे आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Nellikal Venugopal
14-02-2023
venu.39475@gmail.com

Respected Sir / Mam,
Our Society namely Varsha Sangam Cooperative Housing Society Ltd. having its Registration No. HSG/4520/1975 dated 30-06-1975 is located at Chakala Road, Andheri East Mumbai 400099. The Society got its conveyance deed duly registered in the month of February 2020, though the same was lodged for registration in the month of October 1984. Address of the Society as per BMC records and as mentioned in the Conveyance deed is as under
VARSHA SANGAM COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD.
PLOT NO. 35 CARDINAL GRAIOUS Road (Old Chakala Road)
CHAKALA , ANDHERI EAST MUMBAI 400 099.

According to us there has been a typographical error in the CTS Number mentioned in the Conveyance Deed. Instead of CTS No. 511 it has been mentioned as 512.
This we have concluded on the basis of the following information received under RTI.
a) Our application dated 25-01-2022 to Nagar Bhoomika Adhkari , Santacruz West, Mumbai. reveals that at Sr No. 4 against Plot No. 35 and Hissa No.12 the CTS Number is shown as “511”. (scanned cop enclosed.)
b) In the agreement of 2 Members of the Society who had registered their agreement at that relevant period shows CTS No. as 511.
The builder was a partnership firm and at present none of the partners are available for signing the rectification papers if the same has to be done.
We also enclose herewith the scanned copies of Malmatha Patrika downloaded from the site for (1) CTS No. 511 (2) CTS No. 511/1 and the Plot No. 35 / 12 (Hissa No.) for your perusal.
Name and address of the person to be contacted is as under;
Mr N Venugopal
Flat No. 12. VARSHA SANGAM COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD.
PLOT NO. 35 CARDINAL GRAIOUS Road (Old Chakala Road)
CHAKALA , ANDHERI EAST MUMBIA 400 099

Mobile No. 9892465533
Mail id: venu.39475@gmail.com

We will be highly obliged if you could advise us in the matter for the procedure to be followed to get the name of the Society in Property Card on the basis of the registered Conveyance deed.


Our Society namely Varsha Sangam Cooperative Housing Society Ltd. having its Registration No. HSG/4520/1975 dated 30-06-1975 is located at Chakala Road, Andheri East Mumbai 400099. The Society got its conveyance deed duly registered in the month of February 2020, though the same was lodged for registration in the month of October 1984. Address of the Society as per BMC records and as mentioned in the Conveyance deed is as under
VARSHA SANGAM COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD.
PLOT NO. 35 CARDINAL GRAIOUS Road (Old Chakala Road)
CHAKALA , ANDHERI EAST MUMBAI 400 099.

According to us there has been a typographical error in the CTS Number mentioned in the Conveyance Deed. Instead of CTS No. 511 it has been mentioned as 512.
This we have concluded on the basis of the following information received under RTI.
a) Our application dated 25-01-2022 to Nagar Bhoomika Adhkari , Santacruz West, Mumbai. reveals that at Sr No. 4 against Plot No. 35 and Hissa No.12 the CTS Number is shown as “511”. (scanned cop enclosed.)
b) In the agreement of 2 Members of the Society who had registered their agreement at that relevant period shows CTS No. as 511.
The builder was a partnership firm and at present none of the partners are available for signing the rectification papers if the same has to be done.
We also enclose herewith the scanned copies of Malmatha Patrika downloaded from the site for (1) CTS No. 511 (2) CTS No. 511/1 and the Plot No. 35 / 12 (Hissa No.) for your perusal.
Name and address of the person to be contacted is as under;
Mr N Venugopal
Flat No. 12. VARSHA SANGAM COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD.
PLOT NO. 35 CARDINAL GRAIOUS Road (Old Chakala Road)
CHAKALA , ANDHERI EAST MUMBIA 400 099

Mobile No. 9892465533
Mail id: venu.39475@gmail.com

We will be highly obliged if you could advise us in the matter for the procedure to be followed to get the name of the Society in Property Card on the basis of the registered Conveyance Deed.
Since there is no provision for uploading the documents we could not upload the documents mentioned as Enclosed.
Kindly revert and oblige.
Warm Regards
9892465533
I believe typographical error is on deemed conveyance?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मौजे निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे येथे गट क्रमांक ५०३/५ हे क्षेत्र माझे आजोबांचे नावे होते. माझे आजोबांचे सन २००१ साली निधन झाल्याने सदर क्षेत्रास वारस म्हणून माझ्या आज्जी, चुलते आणि माझे आईचे नाव लागले आहे.

वारसनोंद करत असताना माझे वडील कै. अशोकराव रणवरे यांचे वारस म्हणून माझी आई, आणि आम्हा दोन भावांची नावे लागणे अपेक्षित होते. कै. अशोकराव रणवरे यांचे सर्व वारसांची नोंद करण्यात यावी असा शेरा मंडळ अधिकाऱ्यांनी देऊनही सदर क्षेत्रास फक्त माझे आईचे आणि आज्जी व चुलते यांचेच नाव लागले आहेत.

माझे आज्जींचेही निधन २०१५ साली झाले आहे. त्यांचे नाव कमी करणे तसेच माझे वडिलांचे वारस म्हणून माझे आई सह आम्हा दोन भावांची नावे लावण्यासाठी किंवा पूर्वीची वारस नोंद दुरुस्त करावयाची असल्यास काय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन करावे.

धन्यवाद...!
आपलाच
अभिजित अशोकराव रणवरे
अभिजीत अशोकराव रणवरे, आपण सांगितलेल्या प्रश्नाप्रमाणे आपल्या आजोबांच्या मृत्यूप्रशात, त्यांना आपली आजी, आपले चुलते ( संख्या आपण नमूद केलेली नाही त्यामुळे मी एकच चुलते समजतो) व आपल्या मातोश्री यांचे नाव सद्यस्थितीत अधिकार अभिलेख सदरी दाखल आहे . आपण म्हटल्याप्रमाणे अशोकराव रणवरे यांच्या सर्व वारसांची नावे, ७/१२ सदरी दाखल होणे कर्मप्राप्त होते व आहे. मात्र आपणास मिळेल सांगू इच्छितो की, अशोकराव रणवरे हे हयात आहेत असे समजले तर त्यांना जेवढा मिळकतीमध्ये हिस्सा मिळाला असता तेवढाच हिस्सा आपल्या मातोश्री व आपले भाऊ-बहीण यांना या मिळतील मध्ये मिळेल. उदाहरणच द्यायचे झाले तर, आजी चुलते व आपले वडील यांना आजोबांच्या मृत्यू पश्चात प्रत्येकी १/३ हिस्सा मिळाला असता. आपल्या वडिलांचे आजोबांच्या अगोदरच निधन झाल्याने, त्यांना मिळणाऱ्या १/३ हिश्यामध्ये आपल्या मातोश्री व अन्य भाऊ-बहीण यांना हिस्सा मिळेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मौजे निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे येथे गट क्रमांक ५०३/२ हे क्षेत्र माझे मालकीचे असून सदर क्षेत्रास मला माझे पत्नीचे नावे परस्पर समजुतीने वाटप करावयाचे असल्यास / पत्नीचे नाव खात्यास लावायचे असल्यास काय करावे लागेल?

कृपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद...!
आपलाच
अभिजित अशोकराव रणवरे
अभिजीत अशोकराव रणवरे,
आपणाला आपल्या मिळते ती मधील हिस्सा आपल्या पत्नीच्या नावे द्यावयाच्या असल्यास आपणाला तो नोंदणीकृत विक्रीदस्ताद्वारे द्यावा लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shital Mohite
13-02-2023
mohiteshital@gmail.com

माझे वडिलांचे नावे वडिलोपार्जित क्षेत्र आहे. माझे वडिलांनी दि. ०६/०८/२०२१ रोजी लेखी अर्ज आणि प्रतिज्ञापत्रासह गावकामगार तलाठी यांचेकडे दिलेल्या वर्दीनुसार, आमच्या एकत्रित कुटुंबाच्या मालकीची जमिनीचे कौटुंबिक समझोता व मालकी वहिवाटीनुसार आपआपसात पत्नीचे (माझी आई) व सुनेचे (माझी भावजय) यांचे नावे वाटप केले आहे. परंतु सदर जमिन वाटपासंदर्भात माझे वडिलांनी एकत्रित कुटुंबातील सदस्य / मुलगी या नात्याने मला कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही अथवा माझी कोणतीही पूर्वसंमती घेतलेली नाही. तसेच मा. गावकामगार तलाठी यांचेकडून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम १५०(२) नुसार फेरफार नोंदवहीत नोंद घेत असताना माझा सदर एकत्रित कुटुंबाचा सदस्य / मुलगी या नात्याने असणारा हितसंबंध लक्षात घेता मला कोणतीही व्यक्तिशः लेखी नोटीस प्राप्त झाली नाही.

सदर जमिन वाटपासंदर्भात मुलगी या नात्याने मला दाद मागता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे.
आपण आपल्या वडिलांनी वडिलोपार्जित मिळकतीचे वाटप केले आहे असे आपल्या प्रश्नात नमूद केलेले आहे. तथापि वाटप कोणत्या पद्धतीने केलेले आहे? केवळ तलाठी यांच्याकडे लेखी वर्दीने वाटप करण्याची कायद्यामध्ये तरतूद नाही. केवळ लेखी वर्दीने जर वाटप केलेले असेल, तर संबंधित फेरफाराविरुद्ध आपण आपल्या भागाचे जे उपविभागीय अधिकारी महसूल आहे यांचेकडे अपील दाखल करा. जर वाटप हे नोंदणीकृत वाटप पत्राच्या आधारे केलेले असेल तर वाटप पत्र रद्द करण्यासाठी आपणाला दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल. जर वाटप हे संबंधित तहसीलदार यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अंतर्गत केलेले असेल तर त्या विरुद्ध उप विभागीय अधिकारी यांचे कडे अपील करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pawan Mohite
13-02-2023
pawanmohite97@gmail.com

मला शेतामध्ये घर बांधण्यासाठी माझे चुलत्यांकडून ३ गुंठे जागा (शेतजमीन) हवी आहे. शेतामध्ये घर बांधणेकामी सदर ३ गुंठे जागेची (शेतजमीनीची) माझे नावे खरेदी अथवा बक्षीसपत्र होऊ शकते का?
त्यामुळे तुकडा निर्माण होत आहे . त्यामुळे नोंदणीकृत दस्त होऊ शकणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Narmada Gavhane
10-02-2023
grjtraj2@gmail.com

माझा एक प्रश्न आहे कि माझ्या वडिलांची जमीन त्यांना वडिलोपर्जित मिळालेली होती त्यांच्या मृत्युच्या अगोदर माझा भाऊ व भावाच्या मुलगा  यांनी त्यांच्याकडून इच्छापत्र लिहून घेऊन सदर जमिनीवर माझ्या भावाच्या मुलाचा(म्हणजेच मयताचा नातू ) हक्क असेल असे लिहून घेतले होते त्यानंतर माझ्या वडिलांचे निधन झाले तरी सदरील जमिनीमध्ये वाटप हे मी  मुलगी म्हणून हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार होईल कि इच्छापत्रनुसार होईल? 
वडिलोपार्जित मिळकतीचे मृत्यू पत्र करता येत नाही . आपण मृत्य पत्र आपणावर बंधनकारक नाही म्हणून रद्द करून मिळणेबाबत दिवाणी दावा दाखल करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

mla 1947 chya adhichya satbara che report avshyak ahe. te kadnyasathi mla kay karave lagel
किरण पा पाटील साहेब ,
आपण तहसील कार्यालय , येथील अभिलेख कशात अर्ज करा . आपणास जुने फेरफार व ७/१२ प्राप्त मिळतील .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sunil Bhorkar
09-02-2023
sunilbhorkar1@gmail.com

Is property tax proof of land ownership?

Question by Sunil Bhorkar
09-02-2023
sunilbhorkar1@gmail.com

If property tax is being paid for a hutment in a slum in Mumbai then does that make the hutment ineligible for 33(10) SRA Scheme since the hutment is now regularised and the scheme is only for unregularised slum hutments?
नमस्कार,
माझ्या आजोबांकडे वडिलोपार्जित ११२ आर/ गुंठे जमीन होती.
त्यातील 40 आर/गुंठे जमीन त्यांनी माझ्या वडिलांना दिली.
आणि काही काळाने उरलेली ७२ आर/ गुंठे जमीन त्यांनी काकांना दिली.
वडिलोपार्जित जमीन कायद्या नुसार समान वाटप झालेले नाही.
तर त्यासाठी काय करावे लागेल?
झालेले वाटप दिवाणी न्यायालयात अह्वणीत करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या प्रश्न असा आहे मी लहान असताना माझ्या वडिलांनी माझ्या नावे रजिस्टर ऑफिस मधून केलेले आहे तेव्हा मी अज्ञान पालक होतो आता सध्या वरील माझ्याशी भांडण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की सातबारा तुझ्या नाही आहे तो सातबारा मी खाली करणार असं होऊ शकते का आता सध्या सातबारा माझ्या नावे आहेत
जमीन आपले नावे खरेदी केली होती केवळ आपण अज्ञान असल्याने , आपले नावापुढे अज्ञान पालन करता म्हणून वडिलांचे नाव होते . आपण वयाची १८ वर्षे पूर्ण कि आपण सज्ञान झाला. त्यामुळे आपले नाव त्याठिकाणी राहणार व वडिलांचे नाव कमी होणार .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Namskar sir
Aamchi vadilo parjit jamin aahe
Tyat aamhi 3 ghe bhau hissedar aahot saatbaryavar aamche nav aahet mazya mothya bhavane ti jamin dusaryala kasayala dili aahe aani tyache paise to ekta gheto tar aamhi te kase thambu shakto aamhi tyachya shi bolalo to aamch aikat nahi tar kaydeshir kay karu shakato
आम्ही शेती करत असलेली जमीन आमच्या भाऊबंधाच्या नावे लागली आहे. त्याने केस करून जमीन ताब्यात घेतली आहे. सदर जमिनीचा 1947 पर्यंत उतारा काढला आहे पण त्यामध्ये नोंद सापडत नाही उताऱ्यामध्ये खाडाखोड आहे. वाटणीनुसार सगळ्या गट नं मध्ये सगळी कडे समान वाटणी आहे पण या एकाच गट नं मध्ये शेत जमीन नावावर नाही आहे. त्या माणसाला पटवून सांगून ही तो माणूस एकण्यास तयार नाही. उलट आमच्यावर खोटे आरोप करून पोलीस संरक्षण मागून त्याने जमिनीचे मोजणी केली आहे. तो आम्हाला सांगतो की जमीन नावावर असलेला कागद दाखवा आणि जमीन घ्या. घरच्यांनी 1947 पर्यंतचे उतारे काढून बघितलेत पण काय उपयोग झाला नाही.
उताऱ्यामध्ये नोंद सापडली नाही. पण उतारा मध्ये थोडी खाडा खोड आहे असं घरचे म्हणत आहेत.
तर मी ह्यावर काय करू

Question by sadanand kadam
04-02-2023
sadanand_kadam@yahoo.com

Agricultural land transfer from Father to son by registered gift deed required Farmer Certificate to his son for 7/12 ferfar ?
जात पडाळणीसाठी वंशावळ शपथपत्र, व इतर शपथपत्र सध्या कागदावर करावे. असे शपथपत्र कोणासमोर प्रमाणित करून घ्यावीत.

This page was generated in 0.26 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3