जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Sijauddin mujawar
29-10-2024
sijauddinm786@gmail.com
आपले मार्गदर्शन खुप मोलाचे आहे. मी आपला मना पासून आभारी आहे. माझा प्रश्न असा की एकाच व्यक्तीचे
व्यक्तिगत दोन खाती असू शकतात का,? भूमी अभिलेख च्या 9(3)9(4)ला एकाच व्यक्तीचे दोन खाती दिसून येतात. हे रद्द करता येतात का?
Question by वाल्मिक सुरसे
29-10-2024
sursevalmik@gmail.com
महोदय
माझी नगरपरिषद हद्दी मध्ये एक इमारत आहे, ती खूप जुनी झाली आहे म्हणून मला आता ती पाडावयाची आहे तर सदर इमारत पाडून मला कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम करायचे नाही फक्त ती इमारत पाडून जागा मोकळी करून ठेवायची आहे. तरी मला नागरपरिषदे कडून परवानगी घेण्याची आवश्यकता आहे का आणि असल्यास तसे प्रोव्हिजन कोणत्या कायद्या मध्ये दिले आहे. कृपया मला मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
कोणतीही इमारत किंवा संरचना ही भगनावस्थेत असेल किंवा ती पडण्याचा संभव असेल किंवा त्या इमारतीपासून धोका असेल तर मुख्याधिकारी अशी इमारत जमीनदोस्त करण्यासाठी महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 195 अन्वये परवानगी देऊ शकतात. आपण मुख्याधिकारी यांच्याकडे तसा अर्ज करावा आपणास परवानगी मिळेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Aruna Halkare
25-10-2024
arunahalkare52@gmail.com
माझ्या वडिलांचे निधन 2012 साली झाले नंतर वारसाहक्काने सातबारा वर आई, माझे व तीन भावांचे सामाईक हिस्साने नाव शेतीला लागले. 2017 साली एका भावाने वडिलांचे मृत्यूपत्राचे प्रोबेट, माझा व इतर भावाचे कोर्टात खोट्या पत्त्यावर नोटिस पाठवून आम्हाला एक्सपार्टी ठरवून प्रोबेट बनवले व त्यात स्वत:ला व ईतर भावांना 2.15 एकर व स्वतः च्या मुलाच्या नावाने 3.16 एकर शेती तसेच राहते घर लिहून घेतले व कोर्टाने मान्य करून प्रोबेट दिले. सदर प्रोबेट मध्ये मला चोळी बांगडी दिले असे नमूद केले. सदर प्रोबेट विरुद्ध आम्ही अपील जिल्हा न्यायालयात केले असता सदर कोर्टाने आम्हास हायकोर्टात जाण्यास सांगितले कारण प्रोबेट रद्द करण्याचे अधिकार हायकोर्टाला आहेत त्यानूसार हायकोर्टाने सदर प्रोबेट रद्द केले. परंतु याआधी प्रलंबित असलेला फेर तलाठ्याने विना नोटीस ओढून प्रोबेट प्रमाणे नावे लावले. सदर फेर रद्द करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना असल्याने तेथे अपिल केले तेथे ते मंजूर झाले. परंतु विरुद्ध पक्षाने जिल्हाधिकारी कडे अपील केले व ते अपील मंजूर झाले. आता विभागीय आयुक्ताकडे आम्ही अपील केले आहे अजून निकाल दिला नाही.
याबाबत माझा प्रश्न आहे कि "हायकोर्टाने प्रोबेट रद्द केल्यानंतर मी सदर जमीन वर शेती करू शकते का अथवा समोरील पक्षास शेती करण्यास रोखू शकते का? शेतीमालकीचे अधिकार ठरविण्याचे अधिकार ज्युडीशियल कोर्टाला आहेत का महसूल कोर्टाला हे स्पष्ट करावे.
शेतीची मालकी ठरवण्याचे अधिकार हे केवळ दिवाणी न्यायालयास आहेत . वास्तविक न्यायालयाने मृत्युप्त्रास देण्यात आलेले संप्रमान ( probet) रद्द ठरवले असताना तलाठी यांनी नोंद घेणे व मंडळ अधिकारी यांनी मंजूर करणे चुकीचे आहे . आपण शेती करू शकता . समोरील पक्षाने आपणास रोखल्यास आपण दिवाणी न्यायालयात जाऊन मनाई हुकुम त्यांचेविरुद्ध घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर
07-10-2024
sagar06731@gmail.com
महोदय
१९७० साली जमीनची (भोगवटदार वर्ग १) नोंद आहे की व्यवहारासाठी खरेदी विक्री ची परवानगी मिळणे पुर्वी जमिनीचा कब्जा घेतल्याने गट स्कीम विरूद्ध साठेखताचा बेकायदेशिर व्यवहार असा इ हक्कात दाखल ठेवला असे मे तहसीलदार यांचा कडील हुकूम आले वरून नोंद केली अशी नोंद आहे मात्र ही नोंद रद्द झाली आहे तरी अशी एखादी नोंद रद्द झाली असेल तर तिचे रेकॉर्ड व तिचे कारण आपणास कुठे मिळेल ?
तसेच साठेखत हे १९६२ साली स्टॅम्प वर केले असून व ते महसूल दप्तरी तहसीलदार यांचा आदेश ला जोडून आहे तर आज ते खरेदी देणाऱ्याचा वारसांनी लागू पडेल का ?
तसेच एकत्रीकरण कायदा कलम ९(२)(३) काय आहे?
Question by Jitendra Kasar
01-10-2024
jitendrakasar.1984@gmail.com
प्राथमिक व माध्यमिक एका शाळेपासून दुसरी शाळा किती अंतरावर सुरु करू शकतो याची माहिती किवा GR सेंट करा
Question by Balaji
27-09-2024
balkrishnaabdare@gmail.com
नमस्कार., गावात नवीन जागा वडीलांनी घेतली 1986 मध्ये त्यांनी तलाठी कार्यालयात नोंदणी राहून गेली आता त्यावेळी सर्व नंबर होते आता गटनंबर घेता येत नाही, गट नंबरवर घेण्यासाठी आजरोजी काय करावे लागेल?
जर खरेदी केलेल्या जागेचा दस्त नोंदणीकृत नसेल तर आपणाला अशा जमिनीमध्ये कोणताही मालकी हक्क प्राप्त होत नाही. आपणाला तीच जमीन विकत घ्यायची असेल तर ती नोंदणीकृत दस्ताद्वारे विकत घ्यावी लागेल.
मात्र जर जी जमीन खरेदी केलेली आहे ती विकत घेतली असेल त्याची नोंदणी झालेली असेल मात्र केवळ तलाठी यांच्याकडे दस्त सादर न केल्यामुळे फेरफार मंजूर झालेला नाही आणि त्यामुळे अधिकार अभिलेख सदरील, 7/12 आपले नाव लागलेले नसेल, तर जरी त्या मिळकतीचा सर्वे नंबरची रूपांतर गट नंबर मध्ये झाले असेल तरीही जेवढे क्षेत्र नोंदणीकृत असतात नमूद केलेली आहे तेवढ्या क्षेत्राला आपले नाव लागू शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sayyad Akhtar
24-09-2024
sayyedakhtar53130@gmail.com
एक व्यक्तीने जमीनीत प्लॉट पाडून बॉण्ड वर नोटरी खरेदी खत करुन दिले आहे.व आता त्या जमिनीचे त्याच्या मुलाला बक्षीसपत्र करुन दिले आहे.व तलाठी कार्यालय कडे 7/12 तयार करण्यासाठी बक्षीस पत्र दाखल केले आहे. त्याचा बक्षीसपत्रा आधारे नाव लागू नये या साठी मार्गदर्शन करा साहेब.
कोणतीही मालमत्ता ही नोंदणीकृत दस्ताशिवाय विकत घेता येत नाही तद्वतच आशा मिळकतीमध्ये कोणताही मालकी हक्क प्राप्त होत नाही. त्यामुळे अशा जमिनीचे जरी बक्षीस पत्र त्यांच्या मुलाला करून दिले तरी त्या मुलाला कोणताही मालकी हक्क प्राप्त होणार नाही. दस्ताची नोंदणी ही भारतीय नोंदणी कायदा 1908 प्रमाणे होणे अत्यंत आवश्यक आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by shubham jaysing dange
24-09-2024
shubhamdange301@gmail.com
जि .सांगली ता.वाळवा गाव साखराळे मधील चालू न.35/ सी स 460/ प्लॉट न 52 सी सदर प्लॉट मी 2023 ला खरेदी केलासध्य स्थितीला सदर प्लॉटमध्ये अतिक्रमण असून त्या प्लॉट ची मोजणी मागवण्याकरता मी जिल्हा पुनर्वसन कार्यालय सांगली यांच्याकडे गेलो असता या प्लॉटचे सेपरेट नकाशा नाही त्यामुळे मोजणी करता येणार नाही असे उत्तर दिले त्यानंतर भूमी अभिलेख वाळवा इस्लामपूर या ठिकाणी गेलो असता त्यांनी पण सेपरेट प्लॉट चा नकाशा नसल्याने मोजणी करता येत नाही या साठी काय करावे लागेल
आपल्या प्रश्नावरून आपणाला पुनर्वसन कायद्यांतर्गत भूखंड मिळालेला आहे. आपल्याबरोबरच अन्य व्यक्तींनाही पुनर्वसनाखाली असे भूखंड मिळालेले आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून पुनर्वसन करावयाच्या व्यक्तींना ज्यावेळेस अशा भूखंडाची वाटप केले जाते त्यावेळेस अभिनयास म्हणजे लेआउट मंजूर केला जातो व त्या लेआउट मध्ये असे भूखंड क्रमांक देण्यात येतात. आपण संपूर्ण लेआउटची मोजणी भुमिअभिलेख खात्याकडून करून घ्या.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sagar mahale
21-09-2024
sbmahale@gmail.com
सर, आमची एक जमीन आहे जी कि सन २००० मध्ये आमच्या वडिलांच्या मोठ्या भावाने त्यांच्या वाट्याला आल्याने बक्षिसपात्र करून दिली आहे. ७/१२ वर नाव लागलेले आहे . परंतु त्या जागेचे ओरिजिनल खरेदीखत आणि इतर कागदपत्र दिलेली नाहीत. तर त्याची कॉपी आम्हाला मिळू शकते का. ग्रामपंचायत हद्दीतील एन. ए. प्लॉट आहे. सिटी सर्वे झालेलं नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
हो आपणाला खरेदी खताची प्रत मिळू शकते . ज्या ठिकाणी अस्य खरेदी खताची नोंदणी झाली असेल त्याठीकानी आपणाला त्याची प्रत मिळू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अंकुश गोकुळ नंदवाळकर
20-09-2024
nandwalkar10@gmail.com
सहकारी गृहनिर्माण संस्थांना भोगावटादार वर्ग 2 चा धारणाधिकार वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी आदेश महसूल व वनविभाग दि. 16 मार्च 2024 अन्वये निर्गमित केले आहे. यासंदर्भातला जीआर pdf मिळावा. धन्यवाद.
Question by Ramkisan
18-09-2024
chatse1984@gmail.com
डोंगरी भागात असलेल्या गावाची यादी
Question by Vishnu Ramchandra Pawar
16-09-2024
pawarvishnu@rediffmail.com
माझ्या मृत चुलत आजोबाचे नाव साधे कुळ म्हणून सातबाराला आहे, त्यांच्या पश्चात माझे दुसरे चुलत आजोबा ती शेतजमीन कसत आहेत. परंतु मूळ मालक यांनी त्या शेतजमिनीचा साठेखत त्रयस्थ व्यक्तीसोबत केला आहे. तर मूळ मालक ती शेतजमीन त्रयस्थ इसमाला विकू शकतात का? माझ्या मयत चुलत आजोबांचे नाव अजूनही साधेकुल म्हणून सातबारावर आहे. तर आता काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन करावे.
चुलत आजोबा यांचे निधानन्ति त्यांच्या वारसांची नावे ७/१२ सदरी दाखल होणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vasant kumbhar
15-09-2024
diliparmy@gmail.com
मी सांगली येथे आमच्या गावातील गावठाण भागात 1998 मध्ये नोंदणीकृत कराराद्वारे घर खरेदी केले. घर सी.टी.एस. क्र. 685 आणि 686 वर बांधलेले आहे. मी हस्तांतरणासाठी संबंधित उप भूमि अधीक्षक कार्यालयाकडे संपर्क साधला, तेव्हा मला आढळले की, वरील सी.टी.एस. प्रॉपर्टी कार्ड घर विक्रेत्याच्या नावावर नसून हक्काचा मूळ धारक H-बिगर परवाना बिन शेती, वर्ष-1977 च्या नावावर आहे. कृपया मला मार्गदर्शन करा, मी माझ्या नावावर दोन्ही प्रॉपर्टी कार्ड कसे हस्तांतरित करावे.
जर खर्डी केलेले घर विक्रेत्याच्या नावावर नसेल तर , आपणाला त्या मिळकतीत मालकी हक्क मिळणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Prashant Vishwasrao sapate
15-09-2024
pvsapate2022@gmail.ocm
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग क्र. जमीन 2024/सी.आर 292 /ज-1 दिनांक 16 मार्च 2024
Question by योगेश विश्वनाथ राठोड
15-09-2024
rathod.yogesh.144@gmail.com
1) खरेदी करून 3 महीने होऊन गेली तरी पण 7/12, फेरफार नोंदणी होत नसेल त्याबाबत सदर गाव तलाठी यांना वारंवार विचारपूस केली असता ते काहीच स्पष्ट सांगत नसतील तर काय करावे?
2) जर एखाद्या खरेदीखतावर हरकत आली असेल तर ते खरेदी लिहून घेणार यांना कसे कळेल ?
3) जर हरकत आली असेल तर लिहून घेणार यांनी पुढे काय करावे ?
जर खरेदी दस्तावर हरकत आली असेल तर त्या बाबत आपले म्हणणे मांडण्याची संधी गाव कामगार तलाठी / मंडळ अधिकारी यांचे मार्फत दिली जाते . जर सदरची नोंद तक्रार नोंद म्हणून वर्गीकृत करण्यात आली असेल तर ज्या अधिकार्याकडे हो नोंद वर्ग करण्यात आली असेल त्याचेकादुन्ही आपणाला म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल .
आपण तक्रार स्वरूप काय आहे याची पडताळणी करून घ्या ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mohammad Rafesaad
14-09-2024
mohammadrafesaad@gmail.com
Riesolution No. LND /3959/163425 (a)-AI.
Sachivalaya, Bombay, lOth November 1959.House sites.
Provision for - for Flood affected
persons.
Question by Mohammad Rafesaad
14-09-2024
mdrafesaad@gmail.com
शासनाचे पत्रक क्रमांक आर बी. ६ वब्ल्यू. एम. २८-६ जाफाबाद माकुल डिस्ट्रीक्ट औरगाबाद १-१०-१९५९ या पत्रकान्वये सदर जमीन सरकारने ताब्यात जेठस्त्याची
GR COPY मिळणे बाबत.
Question by sandip dalvi
14-09-2024
Sandipdalvi6412@gmail.com
kindly send e pik pahni extended date GR
Question by Sayyad Akhtar
14-09-2024
sayyedakhtar53130@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे
मी 2011 ला एक प्लॉट घेतला होता. त्या अगोदर 2008 मध्ये एका व्यक्ती ने घेतला होता. त्या वेळी 7/12 वर मूळ मालकाच्या नावे बँक लोन नव्हते. मला आता गुंठेवारी साठी 7/12 वर नाव लावायचे आहे.परंतु आताच्या 7/12 वर मूळ मालकाच्या क्षेत्रावर बँकेचे लोन दाखवत आहे.
मूळ मालकाने सर्व प्लॉट विक्री केले आहेत एक ही प्लॉट शिल्लक नाही. तरी योग्य ते मार्गदर्शन करावे.
आपले खरेदी खत तपासून पहा त्यामध्ये , मुल मालकाने जे कर्ज घेतले होते त्ते फेडण्याची जबाबदारी कोणाची होती याबाबत काही उल्लेख आहे का ? तसेच भूखंड खरेदी करतांना , खरेदी केलेल्या भूखंडाची मिळकत पत्रिका / ७-१२ उतारा जोडला होता हे तपासून पहा . जर त्यावर बोजा न्हवता , तर आता बोजा कसा ठेवण्यात आला याचा तपशील तलाठी याचेकडून बघा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shivaji Sankpal
07-09-2024
shivajisankpal266@gmail.com
Mahar watan jamin 50% najrana bharlyawar varg 2 chi varg 1 hoto k
होय. महाराष्ट्र कनिष्ट वतने नाहीशी करण्याचा अधिनियम १९५८ च्या कलम ५ (३) (ब) च्या प्रन्तुकानुसार , ५० % नझराणा रक्कम भरल्यानंतर , वर्ग ची जमीन वर्ग १ होते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar
30-08-2024
sagar06731@gmail.com
जमीन मालका कडून जमीन खरेदी करणे आहे जी त्याची वडिलोपार्जित जमीन आहे ,जमीन मालकाची पहिली पत्नी मयत असून तिच्या पासून तिला एक मुलगा आहे २० वर्षाच्या व जमीन मालकाने दुसरे लग्न केले आहे तर साठेखत करताना फक्त मुलाची संमती घेतली आहे तरी खरेदी खत करताना मुलाची तसेच दुसऱ्या पत्नी चे संमती घ्यावा लागणार का? किंवा भविष्यात काही अडचण होइल का ?
वडिलोपार्जित मिळकत म्हणजे जी वडील/आजोबा किंवा पणजोबा यांचेपासून प्रकांत ( वारसाने प्राप्त झाली आहे ) झाली आहे व जिचे वाटप झालेले नाही . उदाहरण अर्थ - सोम्या या व्यक्तीला त्याच्या वडिलांकडून मिळकत /जमीन प्रकांत झाली असेल तर अश्या जमिनीमध्ये सोम्याचा मुलगा गोम्या याला हि जन्मापासून हक्क असतो . तद्वतच तो अश्या मिळकतीत मिताक्षार सहदायकि होतो . उद्या सोम्याला जमीन विकायची असेल तर त्यास त्याचा मुलगा गोम्या याची संमती घेणे आवश्यक आहे . आपल्या प्रश्नातील उदाहर्नानुसार , साठे कराराला मुलाने संमती दिली असली तरीही , विक्री करताना मुलाची संमती लागेल . पत्नीची परवानगी नसेल तरीही चालू शकते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Bapu Eknath Rokade
27-08-2024
bapu.rokde@gmail.com
small farmer area minimu
Marginal farmer area minimum requir
According to the RBI, a ‘Marginal Farmer’ is a farmer who cultivates up to 1 hectare of agricultural land (as an owner, renter, or sharecropper) (2.5 acres).
A farmer farming agricultural land of more than 1 hectare and up to 2 hectares (as owner, renter, or sharecropper) is referred to as a “small farmer” (5 acres).
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश विष्णू दाभोलकर
25-08-2024
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
आम्ही तहसीलदार कार्यालयात कलम १५५ अंतर्गत जुनी काही नावे काढण्यासाठी दुरुस्ती अर्जे आमच्या नेमणूक केलेल्या वकिलांमार्फत ऑक्टोबर २०२३ ला सबमिट केला आहे , पण आज या गोष्टीला या ऑक्टोबर ला १ वर्ष पूर्ण होईल पण अजून काही तहसीलदार साहेबांकडून एक हि दिनांक वर हजर नाहीत फक्त आम्हाला दोन दोन महिन्याच्या पुढील दिनांक तहसीलदार कार्यालयातून देण्यात येतात.
जर सामान्य माणूस जर काही न्याय मागत आहेत तर किती दिवस आणि वर्ष वाट पाहायची , तहसीलदार साहेबानी किमान १५ दिवस पुढे दिनांक देऊन लोकांना वेळ दिले पाहिजे त्याच्या समस्श्या समजून घेतल्या पाहिजे
या वर कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
सेवा हक्क अधिनियम या नुसार कलम १५५ खालील दुरुस्त कार्यवाहीला किती कालवधी विहित करण्यात आला आहे या बाबत , नागरिकांची सनद या मध्ये कालावधी देण्यात आला आहे . नागरिकांची सनद याचे फलक , तहसील कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आले आहेत . जर या कालावधीत आपल्या लेखन प्रमाद दुरुस्ती अर्जावर कार्यवाही झाली नसेल तर सेवा हमी कायदा या अंतर्गत आपण अपील दाखल करावे . अन्यथा आपले सरकार हे online पोर्टल वर आपली तक्रार मांडू शकता . या शिवाय लोकशाही दिन या दिवशीही मा जिल्हाधिकारी यांचेकडे गाऱ्हाणे मांडू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वराज
24-08-2024
sagar06731@gmail.com
एक गट ९४ गुंठे इतका आहे त्या पैकी आमच्या आजोबांनी १९४८ साली १/२ म्हणजे ४७ गुंठे जमीन मालक कडून रजिस्टर खरेदी केली व नंतर मार्च १९६४ साली आजोबांनी उरलेल्या ४७ गुंठे जमिनीचे जमीन मालकाकडून कब्जे चे रजिस्टर साठेखत केले होते मात्र जमीन मालक ह्या जून १९६४ साली मयत झाल्याने खरेदीखत होवू शकले नाही मात्र पीक पाहणी सदरी आजोबा यांचे नाव पूर्ण ९४ गुंठे वर दिसते आहे १९६४ पासून १९९४ पर्यंत .१९७० साली मुळ मालकाच्या नातू व पत्नी यांचे नाव मुख्य उताऱ्यावर आणि दोन मुलींची नावं इतर हक्कात लागली होती.१९९४ साली माझ्या वडिलांनी उर्वरित ४७ गुंठे हे मूळ जमीन मालकाच्या एकमेव नातवा कडून खरेदी केले मात्र मुळ जमीन मालकाच्या दोन मुलींची नावे इतर हक्कात राहिले तसेच आज पर्यंत सर्व जमीन वर कब्जा वडिलांचाआहे.आज मुळ मालकाच्या दोन मुली मयत असून एका मुलीच्या वारसांनी हक्कसोड करून दिले आहे मात्र दुसऱ्या एक मुलीचे वारस हक्क्सोड देत नाही आहे व खूप जास्त मोबदला मागत आहे त्याच्या ४७ गुंठ्या पैकी १/३ हिस्यासाठी.
वरील माहिती का अनुसरून
१.आजोबांनी जे १९६४ साली जे रजिस्टर साठेखत केलं त्या आधारे वारसाची नावे कमी करू शकतो का?
२.राहिलेल्या वारसाच्या हिस्स्याचा तुकडा पडत आहे तर आम्ही तर न्यायालय किंवा जिल्हाधिकरी यांच्या कडे खरेदी चा दावा करू शकतो का?
३.अजून काही मार्ग असेल तर सुचवावे
आपल्या आजोबांनी १९६२ मध्ये जे साठे करार केलेला आहे त्या आधारे आपण न्यायालयात जाऊन जे वारस आपले लाभात हक्क सोड पत्र करत नाहीत त्यांना साठे कराराप्रमाणे खरेदीखत करणे बाबत भाग पाडण्यासाठी न्यायालयाला विनंती करा.
सदरचा दावा आपण विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम१९६३ अन्वय करू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by GOVIND ANAND LELE
19-08-2024
anandsut@gmail.com
शेत जमिनीवर शेत घर बांधण्याची अनुमती मिळवण्याचे अर्ज व लागणारी कागदपत्रे. तसेच असा अर्ज कोणत्या अधिकाऱ्या कडे दाखल करावयाचा त्याची माहिती मिळेल का ?
शेतघर बाधण्यासाठी जिल्हाधिकारी/ उप विभागीय अधिकारी / तहसीलदार यांची परवानगी आवश्यक आहे . अर्जासमवेत , प्रस्तावित बांधकामाचा नकाशा आवश्यक आहे . ७/१२ उतारा हि आवश्यक आहे . शेतघर परवानगीचे मुल अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत . काही जिल्ह्यात उप विभागीय अधिकारी अथवा तहसीलदार यांना हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
