जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Ramakant Jadhav
19-12-2022
rmk60au@yahoo.com.au

Subject: Can I get access road to bring my agriculture produce on pucca road through
गट क्रमांक 18/1/a and 18/2/a
What ate the rules "
Whom to approach for access road and what is the procedure

माझे नाव डॉक्टर रमाकांत जगन्नाथ जाधव आहे.
मी भाटपुरे तालुका शिरपूर जिल्हा धुळे 425405 येथील माझ्या शेत जमिनी करिता access road साठी तक्रार करत आहे.. यावर काही मार्ग असेल तर कृपया सांगावे.

माझे वडील जगन्नाथ शंकर जाधव यांनी 1980 मध्ये त्यांच्या नावावरील शेताची खालील प्रमाणे वाटणी केली होती.
गट क्रमांक 18/1/b विलास जाधव (माझा मोठा भाऊ)
गट क्रमांक 18/2/b रमाकांत जाधव स्वतः (मी स्वतः)
गट क्रमांक 18/2/a संजीव कुमार जाधव (लहान भाऊ)
गट क्रमांक 18/1/a वडिलांनी स्वतःच्या नावावर ठेवला कारण लहान भाऊ प्रदीप जाधव अज्ञान होता.
वडिलांचा अचानक स्वर्गवास झाल्यामुळे आम्ही सर्व या शेतावर वारसदार आहोत.

माझ्या शेताच्या (18/2/b) दक्षिणेला गट क्रमांक 18/1/a and 18/2/a आहे आणि ह्या शेतांच्या अजून दक्षिणेला आजनाड-भाटपुरे या दोन गावांना जोडणारा पक्का रस्ता आहे.
( म्हणजेच माझं शेत आणि पक्का रस्ता यांच्या दरम्यान हे दोन गट क्रमांक आहेत).

गट 18 /1/ a आणि 18/2/a वर मोठा भाऊ विलास जगन्नाथ जाधव ने अवैधपणे 7-8 वर्षापासून कब्जा करून त्या शेतीची मशागत करत होता. त्याचा कोरोनामुळे दिनांक 10.4.2021 ला मृत्यू झाला . नंतर माझी वहिनी गं. भा. सविता विलास जाधव ने कब्जा केलेला असून ती आता दोन्ही शेतीमध्ये मशागत करत आहे.

उत्तरेकडील माझ्या शेतातून माल पक्या रोडवर आणण्यासाठी माझी वहिनी मला रस्ता देत नाही. .अडथळा करत आहे.

पीक आणि मालाची ने आण करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मी शेती करू शकत नाही .

मला शेती करायची आहे. पण मला access रोड नाही

मला गट क्रमांक 18/1/a आणि 18/2/a मधून मला रस्ता मिळेल काय.???
यासाठी मला काय करावे लागेल कृपया मला माहिती कळवावी.


महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 जर एखाद्याला त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसेल तर बांधावरून रस्ता देण्याची तरतूद या कायद्यात आहे . त्यासाठी आपण आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज करा प्रकरणाची चौकशी करून ती त्याबाबत निर्णय घेतील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sijauddin mujawar
19-12-2022
mujawar2255@gmail.com

सर, ११ डिसेंबर रोजी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले मनपूर्वक आभार
सर 155 कलम अन्वय 1952 साली झालेली
चुक दुरुस्ती करता येते का? विलंब माफी ची काही अडचण येवू शकते का?
कलम 155 साठी कोणतेही काल मर्यादा नाही

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अन्वये जी चूक दुरुस्त करण्यात येते की चूक ही लेखन प्रमाण चूक असते आणि ती प्रामुख्याने महसूल विभागाकडून झालेली असते त्यामुळे कलम 155 ला कालमर्यादा निर्धारित केलेली नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kedar
19-12-2022
army101guy@gmail.com

# माजीसैनिक प्लॉट ७/१२ नोंद व अतिक्रमण#

वय 80 माजी सैनिकाला वाढीव गावठाण १९९२मध्ये शासन मंजूर १५० चौ.मी. प्लॉट मिळाला आहे. व कब्जेहक्काची रक्कम व मोजणी फी भरली आहे. ग्रामपंचायत घरठाण पत्रकाला 8अ नोंद आहे .ताबा मिळाल्यानंतर काही वर्षांनी एकाने दंडेलशाहीने त्या प्लॉटवर अतिक्रमण(पत्रा शेड) केले आहे. पोलीस तक्रार केली पण काही कारवाई नाही. "घरगुती अडचणी मुळे अजून पर्यंत सातबाराला नोंद व सिटी सर्व्हे झाला नाही."
१)उपविभागीय अधिकारी यांचेकडे अतिक्रमण काढणे व 7/12 नोंद करण्यासाठी अर्ज केला आहे.
२)त्यांनी बांधकाम शर्तभंग झाला म्हणून पूर्वीच्या आदेशाप्रमाणे 7/12 ला नाव लावण्यासाठी बाजारभावानुसार 75℅ शर्तभंग रक्कम शासनाला भरण्यास सांगितले आहे. नोंदणी होईल पण जागा खाजगी होणार त्यामुळे अतिक्रमण काढून मिळणार नाही असे सांगितले आहे.
# ७/१२ तयार झाल्यावर माजी सैनिकाच्या प्लॉट वरील अतिक्रमण कोण व कसे काढता येईल ?
#तहसीलदार माजी सैनिकांच्या प्लॉट वरील अतिक्रमण काढू शकतात का?काही कायदे व तरतूद ?
#वृद्धापकाळाच्या अडचणीमुळे दिवाणी न्यायालयात न जाता अतिक्रमण काढता येईल का?
कृपया मार्गदर्शन करावे ..ही नम्र विनंती.
प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व आजी सैनिक यांच्या समस्या जाणून घेणे व त्यावर निराकरण करणे यासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे शासन निर्णयाद्वारे निर्देश देण्यात आलेले आहे. (शासन निर्णयाची प्रत माझ्याकडे नाही.) मात्र यासंदर्भात आपण आपल्या जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटून प्रथमता जमीन प्रदान आदेशाच्या अनुषंगाने मिळकतीच्या सातबाराला किंवा मिळकत पत्रिका उताऱ्याला नाव लावण्याबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करा. प्रश्न उरतो शर्तभंग झाला की नाही ?
माझ्या मते या प्रकरणात शर्तभंग झाला आहे असे म्हणता येणार नाही कारण बाजूचे व्यक्तीने दंडेलशाही ने आपल्याला जो भूखंड वाटप करण्यात आलेला होता त्यावर पत्र्याच्या शेड चे बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहे .. जिल्हाधिकारी कार्यालयाला आपणाला हे दाखवून द्यावे लागेल पत्र्याची शेड स्वातंत्र्यसैनिक यांच्या जागेत बांधलेली आहे ती परस्पर संमतीने बांधलेली नाही. ज्या वेळेस त्या व्यक्तीने जागेवर ती पत्र्याच्या शेड चे बांधकाम सुरू केले तर त्याने ते करू नयेत यासाठी काही प्रतिबंध केला का? पूर्वी या बाबत काही तक्रार अर्ज पोलीस स्टेशनला दिलेले आहेत का किंवा तहसील कार्यालयामध्ये याबाबत काही पत्रव्यवहार केला होता का याचा तपशील जर आपण देऊ शकला तर निश्चितच स्वातंत्र्य सैनिकांच्या जागेवर असलेले हे अतिक्रमण हे अतिक्रमण म्हणून मानले जाणार नाही व त्याबाबत 75% जो दंड लावलेला आहे तो रद्द होऊ शकतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sonam anpat
16-12-2022
ytapare9916@gmail.com

please give list of RTS application in Minister court list between September 2016 month
thank you
सदरची माहिती आपणास मा.मंत्री यांचेकडील अपील शाखेस मागणी करावी लागेल

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

Question by Sagar
16-12-2022
sagarkandekar1990@gmail.com

महोदय ,
जमीन एकत्रीकरण विषयक प्रकरण भूमी अभिलेख कार्यालयात 2019 पासून सुरू आहे.2019 ला मोजणी झाली त्या नंतर वार वार संपर्क व अर्ज करून कुठलाच निकाल किंवा दुरुस्ती कार्यालया कडून झाला नाही.RTI द्वारे माहिती मागीतली पण त्यात त्यांनी कारर्वही सुरू आहे असे सांगून जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व एकत्रिकरण कायदा 1947 नुसार एकत्रीकरण प्रकरणे निकाली काढण्यास काल मर्यादा नमूद नाही असे सांगत RTI ला उत्तर दिले.
कृपया वरील एकत्रिकरन सोडविण्यासाठी काय करावे?
आपण आपली तक्रार “आपले- सरकार” या आज्ञावली द्वारे मांडू शकता. अन्यथा उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना प्रत्यक्ष भेटून आपली व्यथा मांडू.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pravin Machindra Mudpe
15-12-2022
spmudpe@gmail.com

Shejari sheticha bandh fodune vaad nirman karit ahe .manai hukum milel ka?kasa ? Kagadpatre konati lagtil.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 135 अन्वये आपण जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे आपल्या व आपल्या शेजाऱ्याच्या मिळकती च्या हद्दी संदर्भात जो वाद आहे त्याबाबत तक्रार करून हद्द निश्चिती करून देण्याबाबत विनंती करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मला शेताची मोजणी करायची आहे परंतु माझ्या शेताचे लगत कब्जेदार वादग्रस्त लोक आहेत त्यामुळे मला मोजणी वेळी पोलीस बंदोबस्त पाहिजे आहे तर मला कुठल्या नियमा नुसार अथवा शासन निर्णया नुसार पोलीस विभागाकडे पोलीस बंदोबस्त मागता येईल
पोलीस बंदोबस्त फी जमा केले नंतर मंजूर होतो

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

आपणाला पोलिस बंदोबस्तासाठी आवश्यक असणारे शुल्क पोलीस ठाण्यामध्ये जमा करावे लागेल. मोजणीची तारीख निश्चित झाल्यावर त्याप्रमाणे पोलीस स्टेशन कडे अर्ज करा व त्या दिनांकाला पोलिस बंदोबस्त मिळावा अशी त्यांना विनंती करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sagar
14-12-2022
sagarkandekar1990@gmail.com

एक गट 47 गुंठे चा होता त्यामध्ये माधव चे नाव त्याचे वडील गेल्यानंतर 1970 ला सातबारा सादरी मूळ कबजेदार तर त्याचे दोन बहिनेचे नाव राधा व मुक्ता ईतर अधिकाकारात लागले होतें.1990 साली माधव नि सर्व जमीन केशव ला खरेदी दिली दोन्ही बहिणी चे नाव इतर अधिकारात तसंच ठेवून.२०20 साली राधा ने तीचे हकसोडपत्र करून दिले तर मुंक्ता 2019 साली मयत असून तिचे तीन वारशाचे नावे इतर अधिकारात लागले आहे मात्र सादर त्याच्या हिस्सा 1/3 म्हणजे 15 गुंठे असून तुकडा पडत आहे तर त्याना जमिनीचा कब्जा मिळेल का? व मोबदला देणे ठरेल तर जमिनिचा सरकारी भाव ने कौर्ट सांगेल का?
वाटपामध्ये जमिनीचा तुकडा पडत असेल, तर जमिनीच्या बदल्यात त्याला जमिनीचे मूल्य देण्याची तरतूद आहे. त्यानुसार नवीन भूसंपादन कायदा 2013 अन्वये जमिनीचे मूल्यांकन निश्चित केले जाते व अशा व्यक्तीला मूल्यांकनाची रक्कम दिली जाते. त्यासाठी आपणाला जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये मिळकतीचे सरस निरस वाटप करून मिळण्यासाठी चा अर्ज दाखल करा. जिल्हाधिकारी सरस निरस वाटप करण्यासाठी तहसीलदार व त्यानंतर उपअधीक्षक भूमिअभिलेख यांच्याकडे प्रकरण वर्ग करतील. उपअधीक्षक भूमी अभिलेख/ तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना, वाटपामुळे जमिनीचा तुकडा पडत असल्यामुळे जमिनीचे बाजार मूल्य देण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करून, बाजार मूल्य निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करतील. जिल्हाधिकारी एखाद्या उपजिल्हाधिकारी मार्फत अथवा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जमिनीचे बाजार मूल्य निश्चित करून करून देतील .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by dinesh donde
13-12-2022
dinbhim@gmail.com

Namaskar ,First let me thank and appreciate for your online service. My question is that can a person become owner of a land by paying taxes and irrigating the land for more than 50yrs?" kashil tyachi jamin" is it correct before law? what is the produre toget possession of a land which is never seen or irrigated (paid the tax) for more than 50 yrs.
What is the legal way to avoid family distpute .pl clear.
If the cultivator is a protected tenant or permanent tenant or is declared as a deemed tenant under the relevant Tenancy Act, he can become the owner of the land.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Can we purchase land category under Occupant class 2, which has the remark of Private Forest land. We intend to use the land for plantation of medicinal plants. We have heard that it can be purchased under the section 8 of the companies act. If yes, what would be the procedure regarding the same. Kindly guide us on this.
Yes Private Forest Land can be purchased and there is no bar .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Bhupinder chandok
12-12-2022
bschandok@gmail.com

We are not getting possession of our plot in pune Kondhwa 66/6/B inspite of having all documents in our name
You are planning to take back the possession from whom. Better you approach the Civil Court for the peaceful possession of the land.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by मोहन vishe
12-12-2022
vishe.mohan@gmail.com

सर 1970 साली माझ्या वडिलांच्या चुलत भावाने आमच्या वहीवटीची जागा वडिलांच्या नावे केल्याचा फेरफार मध्ये नोंद आहे. परंतु त्यानंतर एकत्रिकरण झाल्यापासून पुढे वडिलांच नाव 7/12 वर दिसत नाही, जागा आजही आमच्याच कब्जा ला आहे, जागा नावावर करण्यासाठी काय करावं लागेल कोणते पेपर काढावे लागतील मार्गदर्शन करावं
एकत्रीकरण यामध्ये जागा आपल्या वडिलांच्या चुलत भावाच्या नावे गेलेली असेल. एकदा एकत्रीकरण योजना अमलात आल्यानंतर एखाद्या दुसऱ्या सर्वे नंबर च्या ताब्यात बाबत कोणतीही बदल करता येत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या वडिलांनी 10 - 12 वर्षांपूर्वी एक एकर जमीन विकत घेतली, आणि त्या जमीन मालकाला (काही गावातील लोकांच्या हाताने)पैसेही दिले, मात्र आता सातबारावर वडिलांचे नाव लावण्यासाठी तो मालक सही देत नाही अशावेळी आम्ही काय करावे?

आपण नोंदणीकृत दस्त द्वारे जमीन खरेदी केली आहे काय ?नोंदणीकृत दस्त द्वारे जमीन खरेदी केलेली असल्यास व त्या जमिनीचा मालक आपल्याला ताबा देत नसेल तर त्याला प्रथम आपण वकिलामार्फत एक कायदेशीर नोटीस द्या व ताबा देण्याबाबत त्याला विनंती करा. जर तो ताबा देत नसेल तर आपण ताबा घेण्याचा प्रयत्न करा व आपल्या ताब्यात घेण्याचा जर त्याने प्रतिबंध केला तर आपण त्याबाबत दिवाणी न्यायालयात जमिनीची मालकी प्राप्त झाली असल्याकारणाने ताबा मिळण्यासाठी चा दावा दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sijauddin mujawar
11-12-2022
mujawar2255@gmail.com

सर्व प्रथम सर मनापासून आभार
माझा प्रश्न असा की जुने 7/12 सदरी थोरले आजोबा याची एकोप अशी नोद आहे. त्यांच्या पश्यात त्याच्या जेष्ठ मुलाची एकोप म्हणून नोंद असे पुढे चालत आहे. सर हे एकोप कमी होवुन इतर आजोबांच्या मुलांची 7/12 सदरी नोद होने साठी काय करावे?
खरेतर सातबारा संगणीकरण यामध्ये जे इकपू म्हणून शेरे आहेत ते कमी करण्यात येऊ सर्व कायदेशीर वारसांची भोगवतादर सदरी घेण्याबाबत शासनाचे आदेश आहेत आणि त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यामध्ये ही कार्यवाही करण्यात आलेली आहे तथापि काही प्रकरणात एकपू शेरे काही जर शिल्लक असतील तर सदरची बाब आपण मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या निदर्शनास आणून द्या त्यांच्यामार्फत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अन्वये दुरुस्ती बाबाचे आदेश काढले जातील आणि तलाठी यांच्या मार्फत एकपु शेरा कमी होऊन त्याच्या अंतर्गत असलेल्या इतर सर्व वारसांची नावे सातबाराचा भोगवटदार सदरी दाखल होतील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची वडिलोपार्जित औरंगाबाद महानगपालिका च्या हद्दीत १.६९ आर शेत जमीन आहे. सदरील जमीन ही वडिलांच्या नावे आहे. आता वडिलांकडून आम्हा ४ भावनांना जमीन वाटून घ्यायची आहे अशी आम्ही १०० च्या बॉण्ड वर वाटणी पत्रक हे केले आहे .सदरील जमिनीचे वाटणी पत्रक करतांना एकाच ठिकाणी न घेता वेगवेगळ्या ठिकाणी १० -१०आर जमीन घेतली आहे . तर फेर साठी काही प्रॉब्लेम येईल का तुकडेबंदी चा किंवा दुसरा काही...
*नाही तर वाटणी अशी करावी
महानगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र तुकडे बंदी तुकडे जोड कायदा याच्या तरतुदी नवीन सुधारणा नुसार लागू नाहीत. परिणामी तुकडा पडण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साझा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या शिफारसी
आमची वडिलोपार्जित औरंगाबाद महानगपालिका च्या हद्दीत १.६९ आर शेत जमीन आहे. सदरील जमीन ही वडिलांच्या नावे आहे. आता वडिलांकडून आम्हा ४ भावनांना जमीन वाटून घ्यायची आहे अशी आम्ही १०० च्या बॉण्ड वर वाटणी पत्रक हे केले आहे .सदरील जमिनीचे वाटणी पत्रक करतांना एकाच ठिकाणी न घेता वेगवेगळ्या ठिकाणी १० -१०आर जमीन घेतली आहे . तर फेर साठी काही प्रॉब्लेम येईल का तुकडेबंदी चा किंवा दुसरा काही...
*नाही तर वाटणी अशी करावी
महानगरपालिका क्षेत्रामध्ये महाराष्ट्र तुकडे बंदी तुकडे जोड कायदा या तरतुदी लागू नाहीत याबाबत शासनाने 2017 मध्ये कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जरी जमिनीचे वाटप प्रस्तावित असले तरी त्यामुळे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा प्रत्येकाच्या वाट्याला येणारे क्षेत्र जरी कमी असले तरी कायद्याचा भंग होणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

7/12 वर नाव नसल्या मुळे फेरफार नोंद रद्द झाली आस त्या फेरफार वर लिहिलं आहे . पण ज्या साली फेरफार झाला त्या सलच्या अगोदर पासून 7/12 वरती नाव आहे तरी पण त्यांनी फेरफार रद्द केला . प्रांत कार्यालय अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की 25 % शुल्क भरून नियमितीकरण करणे हा अर्ज करावा लागेल . माहिती मिळावी रद्द झालेल्या फेरफार साठी काय करावे लागेल
महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत । त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत सुधारणा 2017 दिनांक 07/09/2017 ह्या परिपत्रका मध्ये जर का फेरफार रद्द झाला असेल तर हा अर्ज भरावा लागतो का
अभिजीत जी आपल्या प्रश्नावरून नक्की आपल्याला काय म्हणायचे आहे ते समजून येत नाही कृपया सविस्तर प्रश्न मांडा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जमीन हद्दीवरुन शेजारील जमीन धारकांनी न्यायालयात वाद चालू आहे.शेजारील जमीन धारकांचे खरेदी खत सब रजिस्ट्रार ऑफिस मधे अर्ज करुन मागितले असता सब रजिस्ट्रार ऑफिस मधून असे समजले की त्या खरेदी दस्ताचे शेवटचे पान गहाळ झालेले आहे त्यामुळे आम्हाला देता येणार नाही. आम्हाला त्यातील वहीवाट व संबंधीत जमिनी समोरील रोड साईज कोर्टात पुरावे म्हणून सादर करायची आहे.तर प्रतिवादीचे दस्त कोर्टात कसे सादर करता येईल??
ज्या स्वरूपात तो दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात उपलब्ध आहे त्याची प्रत आपण प्राप्त करून घ्या त्याला शेवटचे पान असो अथवा नसो. याउपरही दुय्यम निबंधक कार्यालय आपणाला दस्त देत नसेल तर न देण्याबाबतचे लेखी कारण त्यांना देण्यात सांगा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार तहसीलदार ऑफिस मध्ये एखादा जागेचा फेरफार आपसातील संमतीने लेखी अर्जावर मंजूर झाल्यावर त्याबाबत भूमी अभिलेख कार्यालयात कळवणे ही कोणाची जबाबदारी ? भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी हे तहसील मधील अशा मंजूर फेरफारांची नोंद स्वतः येवून घेवून ,त्यानुसार भुमिअभी लेखात नोंद करतात का ? याबाबत महसूल अधिनियमात काय तरतूद वा नियम आहे ते कृपया कळवा ही विनंती . दत्तात्रय त्रिंबक सोनवणे
ज्या भागामध्ये अथवा गावठाणा मध्ये सर्वेक्षण झालेले असते त्याच ठिकाणी मिळकत पत्रिका असते. अशा क्षेत्रातील जमिनीची हस्तांतरण व त्या अनुषंगाने होणारे फेरफार याची सर्व जबाबदारी नगर भूमापन अधिकारी/ उपअधीक्षक भूमी अभिलेख यांची असते.
याउलट या क्षेत्रामध्ये सर्वेक्षण झालेले नसते त्या ठिकाणी सातबारा असतो. अशा क्षेत्रातली जमिनीचे हस्तांतरण होतात त्या अनुषंगाने होणारे फेरफार याबाबतची सर्वस्वी जबाबदारी तेथील संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी व अंतिमत तहसीलदार यांची असते.
त्यामुळे असे जे काही बदल होतात त्याबाबत परस्परांना सांगण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मात्र एखादे शेतीत स्वरूपाचे क्षेत्र बिनशेती मध्ये रूपांतर झाले तर अशा क्षेत्राची मोजणी करण्याचे काम भूमिअभिलेख विभागाचे असते व त्याप्रमाणे त्यांच्या स्तरावरती कमी जास्त पत्रक तयार करून ते महसूल खात्याकडे म्हणजे तहसीलदार कार्यालयाकडे पाठवतात व त्याप्रमाणे त्याच्यामध्ये गाव दप्तरामध्ये बदल केले जातात.
आपल्या प्रश्नामध्ये आपण सविस्तर तपशील दिलेला नाही केवळ मोघम माहिती विचारली आहे आपण जर सविस्तर तपशील देऊ शकला तर कदाचित याबाबत समर्पक उत्तर देणे (जर वरील उत्तराने आपले समाधान झाले नसेल) तर शक्य होईल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अहमदनगर जिल्हा महसूल मंडल व त्याअंतर्गत येणारी गावांची यादी
तहसीलदार महसूल अहमदनगर यांना भेटा त्यांचेकडून आपणाला उपरोक्त माहिती मिलेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महार वतन 6ब जमिन बिना परवानगी खरेदी केली असेल आणी आता त्यांची परवागी काढता येत का
सर, भोगवटा वर्ग २, इनाम वर्ग ६ब ची जमीन असेल आणि ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नवीन अविभाज्य शर्तीवर असा शेरा असल्यास, अशा जमिनीची पोट हिस्सा मोजणी करावयाची असेल तर सक्षम प्राधिकरणाची पोट हिस्सा कामी परवानगी घेणे आवश्यक आहे का ? असल्यास त्याबाबतचे शासन निर्णय / परिपत्रके याची माहिती मिळावी ही विनंती. धन्यवाद.
विषय: शेतबांधावरील किंवा इतरत्र विखुरलेल्या बांबू बेटांची 7x12 वर नोंद घेण्याबाबत मार्गदर्शन

'महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान' हे महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम आहे.

महाराष्ट्रातील बरेच शेतकरी (प्रामुख्याने कोकण, विदर्भातील डोंगराळ व अदिवासी भागात) शेत बांधावर डोंगर उतारावर व इतरत्र विखुरलेल्या भागात बांबूची लागवड करतात. परंतु या बाबतची नोंद 7x12 उता-यावर घेतली जात नाही. या प्रकारच्या बांबू उत्पादनाला व्यावसायीक मुल्य असल्याने त्याची नोंद 7x12 उता-यावर करणे गरजेचे आहे.

शेतात लावणी केलेल्या बांबू लागवडीची तलाठी कार्यालयात नोंद घेतली जाते, परंतु विखुरलेल्या बांबू बेटांची नोंद घेतली जात नाही.

तरी कृपया खालील मुद्यांवर मार्गदर्शन मिळावे.
1) तलाठी कार्यालयात विखुरलेल्या बांबू बेटांची (bamboo clumps) नोंद घेण्याकरीता सध्या अस्तित्वात असलेले नियम/मार्गदर्शन पुरेसे आहेत की याबाबत शासन स्तरावर विशेष परिपत्रक/निर्णय निर्गमीत करण्याची आवश्यकता आहे?

2) गावठाणातील घरांशेजारील बांबूची नोंद तलाठी नव्हे तर ग्रामसेवकांमार्फत घेण्यात येते अशी धारण आहे. तरी धरणा पक्की करावी.


वि.गिरिराज, IAS(Retd)
मुख्य कार्यकारी अधिकारी
'महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान'

This page was generated in 0.33 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3