जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by B.G solnar
01-10-2021
balajisolnar35@gmail.com

नमस्कार सर. आमच्याकडे वर्ग 2 ची जमीन आहे. 7/12 आहे व 8 अ आहे फेरफार आहे. या सर्व नंबरची जमीन कोनत्या ठिकाणी आहे ते माहिती आहे . पण या सर्व नंबर मध्ये अन्य 7 शेतकरी आहेत . आमची जमीन कोणत्या ठिकाणी आहे ते आम्हाला माहिती नाही .भूमी अभिलेख मध्ये गेले असता ते म्हणत आहेत की तुमच्या सर्वे नंबर ची अद्याप मोजणी झालेली नाही . व आम्हाला गायरान जमीन मोजता येणार नाही . सर आमची जमीन कशी मिळेल सर.कृपया मार्गदर्शन करावे
बालाजी राव
आपली जमीन वर्ग २ ची आहे . मग गायरान जमीन असण्याचा प्रश्न येतो कुठे ?
असो आपण जमीन मोजणी अर्ज दाखल करा . अन्य ७ शेतकऱ्यांना भूमिअभिलेख खात्यामार्फत नोटीस जाईल व ते हजर राहतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vikas Bhosale
29-09-2021
Vikasbhosale2012@gmail.com

नमस्कार सर आम्ही 2007 साली एका जमिनीचे 6 एकर क्षेत्राचे साठेखत केले होते तर त्या जमिनीला पुनर्वसन ची परवानगी लागत होती परंतु मूळ मालकाने आम्हाला पुनर्वसन परवानगी अनु दिल नाही त्यामुळे आम्ही 2013 साली एका व्यक्तीला विकून टाकली साठे खत रद्द लेख अनुसार विकून टाकली पाच एकर परंतु त्याचे पैसे आम्हास अद्याप दिलेले नाहीत व टाळाटाळ करीत आहे.व उरलेली एक एकर ही त्याने परस्पर त्याच्या नावावर करून घेतली आहे व आमची फसवणूक केली आहे व साठे खत रद्द केल्या पासून आम्हाला पैसे दीले नाही टाळाटाळ करीत आहे आज देतो उद्या देतो तरी यासाठी कृपया आम्हाला पर्याय सांगा ही विनंती.
The Specific Relief Act खाली दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर कुल कायदा म्हणजे काय
कुल व मालक यांचे संबंध , या संबंधीचा कायदा .
कृपया हा कायदा वाचा . असं दोन तीन परिच्छेदामध्ये उत्तर देता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Arjun mayane
27-09-2021
arjunmayane976@gmail.com

नमस्कार सर
भूमिहीन सैनिकांना शासनाकडून गायरान जमीन किंवा सरकारी जमीन मिळण्याची तरतूद आपल्या कायद्यात आहे का ❓
असल्यास कृपया माहिती मिळावी
महाराष्ट्र जमीन महसूल ( सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे ) नियम १९७१ अंतर्गत ,आजी/ माझी सैनिक यांना जमीन मिळू शकते
आपण जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पुनर्वसन शेरे 7/12वरती पडुन 25वर्षे पूर्ण झाली आहे तर ते कमी कधी होतील ।गावी एकत्रीकरण योजना लागु झाली नाही तर शेरे कसे कमी होतील
पुनर्वसन कायद्यानुसार जर संपादित केलेली जमीन वर्ग २ ची असेल तर , नवीन जमीन वर्ग-२ धारणाधिकाराची असते अन्यथा ती वर्ग १ ची असते . त्यामुळे शेरे असण्याचा प्रश्न नाही
मात्र ज्या जमिनी महसूल अधिनियम व त्या खालील नियमांतर्गत दिली असेल तर अशी जमीन वर्ग २ ची असते . मध्यंतरी २०१४ चे आस पास अशे शेरे काढण्याचा शासन निर्णय झाला आहे . तो शा नि पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
शेत जमिनींचा नंबर बाध , उरळी शेजाऱ्यांनी ठेवली नाही. दुसऱ्या बाजूने नदीच्या पलीकडे शेत असणारा शेतकरी त्याच्याकडे 7/12 वरील असणाऱ्या क्षेत्र पेक्षा जास्त क्षेत्र वर (नदीत एक दोन विहिरी खोदून त्याचा भराव नदीत त्याच्या बाजूने भराव करून )अतिक्रमण करत आहे,त्याच्या या भरावा मुळे आमचा बांध तब्बल 10 ते 12 फूट खसळला आहे.त्यांना विनंती करूनही ते ऐकत नाहीयेत.शिवाय ते लोक चोऱ्या , दरोडे,हाणामारी ,दादागिरी करणारे आहेत .सदरील विषयात आम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यात यावे ,ही नम्र विनंती.
नदी हि कोना एकाच्या मालकीची नसते . नदी जलसंपदा विभागाच्या मालकीची आहे . हि बाब जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आणून द्या . त्याचे मार्फत नदीत भराव करन [यात्रा अरुंद करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Even when a retired employee retires, his successor case is not completed on time. Whatever you do for this will get you justice
सेवा निवृत्त कर्मचारी निवृत्त झाल्यावर सुद्धा त्यांचे वारस प्रकरण वेळेवर पूर्ण होत नाही. याकरिता आपण काय केल्यास न्याय मिळणार
आपणास निवृत्ती वेतन प्रकरण अंतिम होत नाही कि शासकीय कर्मचारी मयत असल्याने , त्याचे वारस निश्चित होत नाही असे आपणास म्हणायचे आहे ? जर मयत कर्मच्रायच्या वारस निश्चित होत नसतील तर त्याचा दोष संबंधित विभागास देता येणार नाही . कायदेशीर प्रक्रिया पडून वारस प्रमाणपत्र सादर करावे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अदखलपात्र गुन्ह्याबाबत दंडाधिकारी यांच्या कोर्टात वादी स्वतः(वकील न करता) फौजदारी कलम १३३ अंतर्गत दावा दाखल करू शकतो का?
नमस्कार सर , आम्ही अज्ञान असताना वडिलांनी जागेमधील दुकान गाळा ओनरशिप पदतीने विक्री केला आहे.पण आम्हाला तो आता पर्येंत त्यांनी किरायाने दिले आहे असे सांगत असत आता आम्हाला हे बाब निदर्शनास आली आहे कि ती जागा ओनरशिप पदतीने विक्री केली आहे.तरी सदर विक्री करार कसा रद्द करता येईल
सुनीलराव
वडिलांनी गाला नोंदणीकृत दस्ताने विक्री केला असेल व सदरचा गाला जर वडिलांचा स्वकष्टार्जित असेल तर , विक्रीव्यवहार रद्द करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर/मॅडम
माझे वडील व त्यांचा मित्र यांच्या दोघांमध्ये जागा आहे म्हणजेच सामाईक क्षेत्र आहे, त्यापैकी निम्मा हिस्सा वडिलांचे मित्र यांच्या मुलीच्या नावाने केला मग राहिलेला हिस्सा वडिलांच्या नावाने लागेल का आणि जर लागत नसेल तर त्याची प्रकिया काय आहे? याबद्दल कुपाया मार्गदर्शन करावे ही आपणास नम्र विनंती....
जागा खरेदी करताना जर वडील व त्यांचे मित्र यांचे नावे खरेदी केली असेल तर , वडिलांचे नाव अगोदरच ७/१२ सादरी दाखल असेल . आपण जमिनीचा ७/१२ पहा .
मात्र खरेदी करताना केवळ वडिलांचे मित्राचे नावे केली असेल व आता वडिलांचे निम्म्या हिस्स्याला नाव लावायचे असल्यास , वडिलांच्या मित्रांनी अर्धा हिस्सा वडिलांना नोंदणीकृत दस्ताद्वारे विक्री करणे आवश्यक आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर कूळ कायद्याची जमीन विक्री करण्याचा अर्ज नमुना असल्यास पाठवा. Whatsapp no -9049473624
आपण आपल्या प्रांताधिकारी कार्यालयात जा . आपणास नमुना मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Balaji Solnar
19-09-2021
balajisolnar35@gmail.com

आदरनिय सर
सर माझ्या वडीलाच्य नावे वर्ग 2 ची जामीन आहे त्या जमिनीचा 7/12 आहे,8 अ, आहे सर्वे नंबर माहिती आहे. हिस्सा क्रमांक माहिती आहे .पण त्या सर्वे नंबर मध्ये इतर शेतकऱ्यांनी अधिक जमीन धरल्या मुळे आमची जमीन नेमकी कुठे आहे हे माहिती नाही . जमीन मोजणी साठी भूमी अभिलेख विभागात विचारले असता ते म्हणाले की आम्हाला गायरान जमीन मोजता येणार नाही. काय करावे लागेल सर मार्गदर्शन करावे विनंती
आपणास शासनाने प्रदान केलेली जागा आहे . ती जागा गायरान असू शकत नाही . अश्या जागेवर ( गायरान ) शासनाचीच मालकी असते . आपणास
दिलेली जागा /प्रदान केलेली जागा हि अन्य शासकीय जागा असेल अथवा शासनाने /जिल्हाधिकारी विहित कायदेशीर प्रक्रिया पार पडून आपणास दिलेली असेल . जर अशी जागा आपले नावावर असेल तर , जागेची मोजणी होऊ शकते . मात्र भूमी अभिलेख खाते मोजणी करण्यास तयार नसल्यास , जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर गायरान जमीन मोजणीसाठी काय करावे लागेल
गायरान /गुरुचरण जागा हि ग्रामपंच्यातीस दिलेली जागा आहे . मात्र त्यावर मालकी हि शासनाचीच असते . त्यामुळे त्याची मोजणी करणे हि बाब मा जिल्हाधिकरी /शासन यांचे अखत्यारीतील आहे .
आपण अर्ज करून गायरान जागेची मोजणी होऊ शकत नाही अथवा मोजणी केली जाणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sanket durgude
18-09-2021
Sanketdurgude54@gmail.com

सर मी बिगर शेती च्या 5 गुंडे प्लॅट घेतला असून त्यावर मी 1000 sq foot घराचे बांधकम चालू केले आहे पण त्या बांधकामत कडू लिबाची फांदी येत आहे तो लिब हद्दी लगत बांदा वर आहे म्हणून त्याला विचारले तर तो शेतकरी नाही तोड्याचे बोलतो तर मी काय करू तो जीवे मारण्याची धमकी देतो तर काय करू आता त्याची जमीन ही वर्ग 2 ची जमीन आहे खंड ची जमीन आहे..
https://indiankanoon.org/doc/1732448/
https://www.casemine.com/judgement/in/5767b11be691cb22da6d36d3

जर बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतातील झाडाच्या फांद्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या मिळकतीवर overhang झाल्या असतील तर , अश्या बाजूच्या शेतकऱ्यास नोटीस द्यावी व फांद्या काढण्यास सांगावे .
नितीस देऊन हि फांद्या काढून टाकल्या नाही तर , आपण फांद्या काढून टाकावयात . त्यास बाजूच्या शेतकऱ्याने अडथळा केला अथवा करत असल्यास , न्यायालयाकडून आदेश घ्यावेत .
उपरोक्त न्यायालयाचे संदर्भ आपले सुलभ माहितीसाठी आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की मुद्रांक शुल्क विभागाने प्रमाणभूत shetra पेक्षा कमी shetracha एकत्रीत सातबारा होणार नाही व रजिस्ट्रेशन होणार नाही असा आदेश 12.07.2021 रोजीच्या आदेशात नमूद आले आहे मला mandangad Ratnagiri येथे 88 गुंठे शेतजमीन एकत्रित 8 जणांमध्ये खरेदी करायची आहे तरी त्या बाबत मार्गदर्शन व्हावे PRAMOD DEREPATIL
८८ गुंठे शेतजमीन ८ जणांमध्ये खरेदी करावयाची आहे म्हणजे प्रत्येकाचे नावे ११ गुंठे क्षेत्र खरेदी केले जाईल . सदर क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी होत आहे . त्यामुळे खरेदी दस्त नोंदवला जाणार नाही .
आपण सदर जागा जर बिनशेती वापरविभागात ( रत्नागिरी प्रादेशिक योजनेनुसार ) येत असेल तर , दस्त नोंदवयण्यस काही अडचण येणार नाही . अन्यथा जागेची विकास परवानगी घ्या म्हणजे जमीन आपोआप बिनशेती होईल व प्रमाणभूत क्षेत्राची बाधा खरेदीसाठी येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्ते सर, माझे आजीचे 7/12 रेकॉर्डला इतर हक्कात नाव दाखल आहे. माझी आजी मयत असुन 7/12 रेकॉर्डला तिचे वारसांनी नावे दाखल न होता वारसांचे प्रतिज्ञापत्रावरुन आजीचे मयत भावांचे लाभात विनामोबदला हक्कसोडपत्र लिहुन दिले आहे. तसा दस्त दुय्यम निबंधक यांचेकडे नोंदविलेला आहे. त्यानंतर गावकामगार तलाठी यांचेकडे सदरचा हक्कसोडपत्राचा दस्त नोंदीसाठी दिल्यावर त्यांनी 7/12 रेकॉर्डला वारस नोंद नसताना हक्कसोडपत्राचा दस्त करता येत नाही व त्यानुसार मी 7/12 रेकॉर्डला नोंद करणार नाही असे सांगीतले आहे. तरी विनंती की सदरील वारसांनी लिहुन दिलेला हक्कसोडपत्राचा दस्त वैध असेल का किंवा प्रतिज्ञापत्रानुसार 7/12 रेकॉर्डला वारसांची नावे दाखल करुन दुय्यम निबंधक यांचेकडे नोंदविलेल्या हक्कसोडपत्रानुसार नावे कमी करता येतील का त्याबाबत मार्गदर्शन करावे
हक्कसोडपत्र नोंदणीकृत असल्यास त्याची नोंद ७/१२ सदरी घेण्यास गाव कामगार तलाठी नाकारू शकत नाही .
मात्र आजीचे इतर हक्कात ती हयात असताना नाव असन्याचे काही कारण नव्हते , आजीचे नाव भोगवटादार सदरी असणे आवश्यक होते . असोत . आजीस जमिनीची विल्लेवाट लावण्याचा हक्क होता का ? हे तपासून पहा . जर आजीस केवळ मर्यादित अधिकार होते ? इतर हक्कात नाव केवळ या कारणासाठी होते कि , हयात असे पर्यंत , उदर्निर्वाहासाठीचा हक्क होता का ?
जत आजीस हक्क सोड पत्र करण्याचा अधिकार न्हवता अथवा फसवून हक्क सोड पत्रक करून घेतले असेल सर्व, अश्या हक्कसोड पत्रकाची वैधता आपण न्यायालयात अहवाणीत करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की ग्रामपंचायत च्या हद्दितील गावठाण्यातील जमीन घर बांधण्यासाठी नावावर करण्याची प्रक्रिया काय आहे व त्यासाठी काही फीस द्यावी लागते का?
गावठाणातील जमिनीचे सर्वेक्षण झाले असेल तर , अश्या जमिनीची मिळकत पत्रिका असते . मिळकत पत्रिका असलेली जमीन नावावर करावयाची असल्यास , नगर भूमापन अधिकारी / उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचे कडे अर्ज करावा . अर्जासमवेत आपला जमिनीमध्ये हक्क कसा प्राप्त झाला , जसे वारसाने / खरेदीने या बाबत माहिती देणे आवश्यक .
वारसाने हक्क प्राप्त झाला असल्यास , मयत व्यक्तीचे वारसांचे प्रतिज्ञापत्र . खरेदीनि हक्क प्राप्त झाला असल्यास , खरेदी दस्त .
जर मिळकतीचे सर्वेक्षण झाले नसल्यास , अश्या जमिनीचे अधिकार अभिलेख नसतात . मात्र ग्रामपंच्यात प्राधिकरणाचे अखत्यारीतील गावठाणात अशी जमीन असल्यास , ग्राम पंचायतीकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rahul Desai
14-09-2021
desai.rahul86@gmail.com

नमस्कार सर माझ्या वडिलांना व माझ्या आत्या याच्या साह्य न घेता आमच्या वेगवेगळ्या जमिनेचे विक्री झाली आहे काय करावे .काही विक्री करताना माझ्या वडिलांना मृत दाखवलं आहे तरी बहुतेक मध्ये लहान मुलगा दाखवलं आहे मी कश्या पदतीने माझ्या वडिलांचं नाव व आत्या च नाव पुन्हा सातबाऱ्यावर आणू शकतो .माझ्या वडिलांनी ९वर्ष कोर्ट केस लढवली आहे परंतु काहीच उप्या झाला नाही मला मार्गदर्शन करावे
राहुल देसाई
महोदय
न्यायालयात हि आपल्या बाजूने निकाल झाला नसेल तर , अपील वरिष्ठ न्यायालयात करा . या पेक्षा वेगळे काही करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अनुसूचित क्षेत्रातील नदिपात्रातून सरकारी अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य संगनमताने अवैध वाळू उपसा करत आहेत,तर त्या गौण खनिजावर आदिवासींचा हक्क किती आणि शासनाचा हक्क किती?जर आदिवासींचा हक्क असेल तर अशा लोकांविरुद्ध अॅट्रोसीटीचा गुन्हा नोंदविता येतो का?
नमस्कार सर , भोगवटादार २ ची जमीन भोगवटादार १ मधे कशी आणि कोणत्या पद्धतीने करावी ?
२०१८ मध्ये , नवीन नियम प्रसिद्ध झाले आहेत . त्या नियमनांतर्गत जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

2003 मध्ये वडिलोपार्जित जमीनीचे (वाटप झाले नव्हते) तलावासाठी जमीन भूसंपादन केली, त्यावेळी गट नं. 401 असा एक होता , त्यामध्ये माझे वडील आणि 2 चुलते वारस होते, भूसंपादनाच्या वेळी माझे वङिल कामानिमित्त पुण्यामध्ये होते. भूसंपादनाच्या वेळी गावी 2 चुलते होते , त्याने 401/1, 401/2 ,401/3 मध्ये असे वेगवेगळे गट सांगून 8 एकर जास्त क्षेत्र लावून घेतले होते. माझ्या वडीलाच्या नावावर 401/4 मध्ये 3आर लावले गेले. आज पण चालू घडीला 401 गट नं. निघतो.वरील वेगवेगळ्या गटाची व क्षेत्राची नोंद निवाडा मध्ये नोंदविले गेले त्यांना जास्तीचा मोबदला पण मिळाला पुढील येणारी नुकसान भरपाई त्यांना मिळणार .भूसंपादनानंतर कोर्टात वाटपाचा दावा 2008 मध्ये दाखल झाला. 2018 मध्ये कोर्टाने भूसंपादनानंतर शिल्लक राहिलेल्या जमीनीचे 1/4 प्रमाणे वाटप केले पण भूसंपादन झालेल्या जमीनीचा विचार केला नाही, दोन्ही चुलते 8 एकर जमीनीचा पुढील येणारा मावेजा निवाड्याच्या आधारे घेणार आहेत. निवाडा होऊन 16 वर्षे झाली . पुढे काय करावे , कलेक्टर साहेब आम्हाला येणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये पार्टी करुन घेतील का? पुढे कोर्टात आपील चालू आहे ... पुढे किय करावे..
कोणतीहा हक्क बजावयाचा असेल तर तो विहित मुदतीत बजावणे आवश्यक असते . एकदा मुदत संपली केली , हक्क हि संपुष्टात येतो हे न्यायिक तत्व आहे . भू संपादन निवाडा २००३ साली झाला . आज या गोष्टीला १७ ते १८ वर्षे झाली .
असोत भू संपादन अधिनियम १८९४ च्या कलम ३१ च्या तिसऱ्या परंतुकानुसार , पात्र व्यक्तीशिवाय अन्य व्यक्तीने भू संपादन नुकसान भरपाई स्वीकारली असल्यास , अशी निवाडा रक्कम स्वीकारलेली व्यक्ती ,पात्र व्यक्तीस निवाडा रक्कम परत करण्यास/ देण्यास जबाबदार असते .
या तरतुदीच्या आधारे , आपला हिस्सा /हक्क संपादित जमिनीत असेल , तर आपण दावा दाखल करू शकतात . मात्र झालेला विलंब न्यायालयाने माफ करणे आवश्यक आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ghanshyam
10-09-2021
rathodghansham24@gmail.com

My question is . I purchased one farm form one seller but seller had already taken loan from the bank and He hid from us .now there is problem of registration of my farm on my name , please suggest
Dear Ghanshyam
If the land cannot be registered as the land to be purchased is encumbered , better not to purchase the same .
However the Registration Authorities cannot refuse to register the property for the reason that the land to be purchased is encumbered . If the loan is not paid by the vendor , you will have to pay the debt amount in case you purchase the encumbered property

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

बिगर येणे प्लॉट मधून जर रोड गेला तर त्याचे पैसे मिळतात का किंवा जेवढा रोड गेला आहे तेवढी जागा दुसरीकडे नगरपालिका देते का???
जागा जरी नगरपालिका हद्दीत असेल तरीही जमिनीची नुकसान भरपाई मिळते . नुकसान भरपाई पैस्याच्या स्वरूपात किंवा TDR स्वरूपात दिले जाते . संपादित झालेल्या जागेच्या बदल्यात जागा देण्याची तरतूद नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर जमिनीवरील वारसा हक्क सोडण्याविषयी माहिती मिळावी म्हणजे ( हक्क सोडने) व सदर प्रक्रिया ही onnline करता येते का? किंवा प्रत्यक्ष संबधित विभागात जाऊन करावी लागेल. कृपया आपण माझ्या संबधित विषयावर योग्य ते मार्गदर्शन करावे धन्यवाद.
श्री . अनिल चौधरी
महोदय

हक्क सोडपत्रक ज्याचा हक्क सोडवायचा आहे त्याचे इच्छेवर अवलंबून आहे .
हक्क सोड online पद्धतीने सोडता येत नाही
संबंधित निबंधक कार्यालयात जावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ऑनलाईन 7/12 च्या तांत्रिक अडचणी मुळे एका व्यक्तीची जमिनीची खरेदी होत नाही म्हणून आम्ही त्या व्यक्तीकडून साठेखात करून घेतले व त्या व्यक्तीला त्याचा पूर्ण मोबदला दिला आणि त्या व्यक्तीने जमिनीचा पूर्ण ताबा आम्हाला साठेखता मध्ये दिला आणि नंतर सातबारा दुरुस्ती नंतर त्या व्यक्तीने आम्हाला न कळवता ती जमीन एका तिसऱ्या व्यक्तीला विक्री केली त्या व्यक्तीची सातबाऱ्यावर नोंद झाली . तर आम्हाला ती जमीन साठेखताच्या पुराव्यांवर पुन्हा मिळू शकते का ? आणि त्यासाठी काय करावे ?
दिवाणी न्यायालयात दाद मागावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

दिवाणी न्यायालयात दाद मागावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.47 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3