जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Bhanudas
29-06-2021
Buanudas592@gmail.com

Namskar sir,
10-12 varshapurvi jamin vikat ghetleli pn ti samuhik ahe ani ajun navavr ny jhali itki varsha amhi ti jamin lavt hoto na ata te sangtat ki amhi gahan thevli hoti ata purn paise deunhi ti jamin navavr ny jhali tr ky karave?

Question by Amar patane
29-06-2021
amarpatane27@gmail.com

नमस्कार
सर माझ्या मामांनी वडिलोपर्जित मिळकतीबाबतचे सहा वर्षापूर्वी माझ्या आईचे, व तीन मावशी, व आजी चे फसवणूक करून विनामोबदला हक्कसोड पत्र न नोंदवून घेतले आहे. आणि मामांची मृत्यू झाली आहे. व वारस मामी आहे. तर इतर सर्वांना ते रद्द करून घेता येईल का?
जर बक्षीस पत्र फसवणूक करून घेतले असेल तर , न्यायालयांकडून ते रद्द करून घ्यावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

1 ग्रामपंचायत हद्दीत घराचे बांधकाम एक फूट जास्त झालाय तर काय होईल
2 आणि एकाच व्यक्तीने आमच्या नावाची तक्रार केली आहे यांनी घर अतिक्रमण मध्ये बांधकाम केले आहे
घर जर गावठाणात असेल तर , ग्राम पंचायत कारवाई करू शकते .
घर सर्वे नंबर मध्ये असेल तर , तहसीलदार( जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी ) त्यावर कारवाई करू शकतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या शेजारीने त्याचे सांडपाणी त्याच्या घरासमोर व माझ्या घराबाजुला सोडले आहे. ४ - ५ वर्षापासुन सहन करत आहे. घरे ग्रामपंचायत मध्ये येतात.
काय करावे मार्गदर्शन करावे हि विनंती.
एक तर आपण ग्राम पंचायतीकडे तक्रार करा . जर तोडगा निघत नसेल तर आपण भारतीय दंड संहिता कलम २६८ खाली प्रथम माहिती अहवाल नजीकचे पोलीस स्टेशन मध्ये दाखल करू शकतात
अथवा आपण त्या शेजाऱ्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करू शकतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या मुस्लीम संस्था (जमातुल मुस्लीमिन साखरीनाटे , रत्नागिरी ) सदरच्या ट्रस्टची नोंदणी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड कडे नोंदणी झालेली आहे. त्यामध्ये सार्वजनिक जमिनी व इमारती च्या नोंदणी सार्वजिनिक विश्वस्थ व्यवस्था नोंदणी पुस्तकामध्ये नोंदणी झालेली आहे. सदर जमिनीपैकी आरोग्य उपकेंद्र, उर्दु शाळा आणि अंगणवाडी बक्षिस पत्राने देणेची आहे. करिता मा.उपविभागीय अधिकारी ( प्रांत )यांची परवानगी घेणेत आलेली आहे. मात्र बक्षिस पत्र करणेसाठी रजिस्टर आँफीस वक्फ बोर्डाची परवानगी ची मागणी करते ती योग्य आहे का ? असल्यास वक्फ बोर्ड चा पत्ता, माहीती व संपर्क क्रमांक कुठे मिळू शकेल ?
श्री.अ.ग. आपटे( ग्रामविकास अधिकारी , राजापूर,जि.रत्नागिरी )
आदरणीय आपटे साहेब आपण या विषयी एकदा बोललो आहे
वअक़फ बोर्डाचे मुख्य कार्यालय औरंगाबाद येथे आहे
गुगल करा आपणास पत्ता , फोन सर्व काही मिळून जाईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Suraj patil
23-06-2021
Surajpatil12188@gmail.com

सर 1950 चा पुर्वी घरा चा रेकॉर्ड कुठे भेटाल्

Question by Laxmikant Hire
22-06-2021
lp.hire@gmail.com

नमसकार सर ,
आमची समयीक शेत जमीन महार वतनी २४ गुंठे आहे . आमचं मागील बाजूस आमचं काका ची २ एकर जमीन आहे . आमच्या जमिनीतून ते रस्ता मागत आहे . आमची जमीन कमी आहे मी त्याना आमच्या बंदावरून जाण्यास संमती दिली आहे पण ते ८-१० फूट ची जागा सोडनसाठी आग्रह करतात मी नकार दिला आहे . ते आम्हला कोर्टात जाण्याचं धमकी देत आहे .त्यानि जमीन विक्रीस काढली आहे . त्या जमीन विकून नंतर आम्हाला त्रास होईल म्हणून मी नकार देत आहे. ती जमीन विक्रीला आम्ही हरकत घेऊ शकतो का ?
लक्ष्मीकांत साहेब ,
आपल्या शेतातून काकांना त्यांचे शेतात जाण्यासाठी परंपरागत रस्ता होता का ? परंपरागत रस्ता असेल तर , आपल्याला काकांना काय किंवा ज्याला ते जमीन विकतील त्यांना हि आपल्याला अडवता येणार नाही .
मात्र वंश परंपरागत रस्ता नसेल तर , रास्ता बांधावरून म .ज. म .अ . १९६६ च्या कलम १४३ प्रमाणे आपण या पूर्वीच दिला आहे / देण्याची तयारी दर्शवली आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय, मी सांगली महापालिका क्षेत्रातील रहीवासी असुन माझे परिचित यांच्या मालकीची 5 एकर जमिन याच महापालिका क्षेत्रातील शेती झोन (ग्रीन झोन) मध्ये येते सदर जमिनीच्या लगतचे क्षेत्र हे पिवळ्या (यलो झोन) पट्टयातील आहेत. सदर जमिन जर (ग्रीन मधुन यलो झोन ) शेती मधुन बिगरशेती मध्ये करावयाची असेल तर काय प्रक्रिया आहे व साधारण शासनास मोबदला किती भरावा लागेल.
कृपया मार्गदर्शन करावे
आपला आपला प्रश्न महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायदा १९६५ शी निगडित आहे . तथापि उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे
महा नगर पालिकेतील जमिनीवरील आरक्षण बदलणे हे महानगर पालिकेची निगडित बाब आहे . महानगर पालिके मध्ये या बाबत सर्व साधारण सभेत निर्णय होऊन तसा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागाकडे जातो व नंतर निर्णय होतो .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर आमची जमीन 1996 साली आमच्या कडून काढून घेऊन, प्रकल्प ग्रस्ता ना 2002 ला दिली,त्याच्या नावे आमचा गट फोडून त्यांना वेगळा गट करून जमीन दिली गेली,मात्र अजून पर्यंत त्या जमिनीमध्ये कोणीही वहिवाट घालायला आले नाही,आम्ही हाई कोर्ट मध्ये दावा दाखल.केला आहे की आम्ही जमीन द्यायला तयार आहे पण आम्ही जमीन त्याच गट नंबर मध्ये दुसरीकडे देणार, यासंबंधी जिल्हाधकाऱ्यांमार्फत काही करतां येईल का?
आता काही करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rakesh Hire
21-06-2021
lp.hire@gmail.com

नमस्कार सर,
माझी 24 गुंठे सामायिक महार वतानी जमीन आहे. आमची जमिनी च्या पाठी माझा काका ची 81 गुंठे जमिनी आहे. ते ती जमिनी विक्री काढत आहे. मी त्याला हरकत घेऊ शकतो का? मला ती जमीन घायची आहे. माझ्या कडे कमी क्षेत्र आहे.
amchya shetatun ty rasta magat aahe tyla amcha virod aahe . pn ty jabdsti kart aahe.
हिंदू वारसा कायदा १९५६ च्या कलम २२ अन्वये , वडिलोपार्जित जमीन जर वारसाने , वर्ग -१ च्या वारसांकडे गेली असेल व त्यातील एक जण अशी मिळकत विकू इच्छित असेल तर अन्य वारसास हि जमीन खरेदी करण्याचा हक्क असतो .
आपले वडील व काका हे वर्ग-१ मधील वारस आहेत मात्र आपण ( पुतणे ) हे वर्ग -१ मधील वारस नाहीत . त्यामुळे आपणास काका जर जमीन विकू इच्छित असतील तर त्यास विरोध करता येणार नाही.एखादी हिंदू व्यक्तीस दोन मुले होती . त्यातील एक मुलगा मयत अगोदरच ( हिंदू व्यक्तीच्या ) मयत असेल तर , मयत मुलाचे वारस यांची नावे मिळकतीस लागतात . अशी प्रसंगी मयत मुलाचे वारस हे वर्ग -१ मधील वारस ठरतील
रस्तांबाबत या पूर्वीच्यया प्रश्नात उत्तर दिले आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

हिंदू वारसा कायदा १९५६ च्या कलम २२ अन्वये , वडिलोपार्जित जमीन जर वारसाने , वर्ग -१ च्या वारसांकडे गेली असेल व त्यातील एक जण अशी मिळकत विकू इच्छित असेल तर अन्य वारसास हि जमीन खरेदी करण्याचा हक्क असतो .
आपले वडील व काका हे वर्ग-१ मधील वारस आहेत मात्र आपण ( पुतणे ) हे वर्ग -१ मधील वारस नाहीत . त्यामुळे आपणास काका जर जमीन विकू इच्छित असतील तर त्यास विरोध करता येणार नाही
रस्तांबाबत या पूर्वीच्यया प्रश्नात उत्तर दिले आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबांच्या नावे शेतं आहे. त्यांना वंश परंपरागत पद्धतीने ते मिळाले आहे. मला 7 12 वर वारसांची ( वडील, चुलता आणि अत्त्या व त्यांची मुलं) नावे लावायची आहेत. आजोबा नाव लावु देत नाहीत. काय करता येईल. फक्त नाव लावयची आहेत खतेफोड न करता.
वडिलोपार्जित जमीन असेल तर , आपण सर्व वारस जमिनीचे वाटप करून घेण्यासाठी न्यायालयात हिस्से निश्चित करणेयाचा दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by अनिकेत
20-06-2021
aniket.mgj@gmail.com

7/12 वरती महाराष्ट्र सरकार, शेतकरी (नाव) असा उल्लेख आहे. त्या जमिनीवर शेतकऱ्याला पीक कर्ज मिळू शकते का? त्या संदर्भातील शासन जी आर आहे का?
सर माझ्या आजोबांनी माझ्या काका च्या नावावर मृत्युपत्र केले आहे.पण ते शेत माझ्या आजोबांना कूळ कायदा मधे भेटले आहे.मग ते रद्द होईल का? कारण मृत्युपत्र फक्तं स्वतः विकत घेतलेल्या शेतीवर करता येते ना..पण ते कूळ कायद्या मधे भेटले आहे ना मग ते रद्द होईल का कोर्ट मधे..
कुळकायद्याने मिळालेली जमीन हि स्वकष्टर्जित आहे जर आजोबा त्या मिळकतीचे कुल असतील .
जर पणजोबा कुल असतील तर , आजोबांना मृत्युपत्राद्वारे केवळ एका मुलाचे नावे जमीन बक्षिसपत्र करून देता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर अल्पभूधारक शेतकऱ्याला खाजगी विहीर घेताना दुसऱ्या शेतकऱ्याच्या खाजगी विहिरीपासून कमीत कमी किती अंतरावर नवीन खाजगी विहीर घेता येते ? नकळत दोन खाजगी विहिरी मधील अंतर कमी राहिल्यास त्यावर एखाद्या शेतकऱ्याला ऑब्जेक्शन असल्यास महसूल विभागाला काय निर्णय घ्यावा लागतो ?
महाराष्ट्र भू जल ( विकास आणि व्यवस्थापन ) कायदा २००९ , च्या कलम २१ नुसार , अधिसूचित सार्वजनिक पाण्याच्या उद्भवापासून ५०० मीटरच्या आत दुसरी विहीर खोदता येत नाही . दुसऱ्या शेतकऱ्याच्या विहिरीपासून नवीन विहीर खोदण्यास अंतराचे निर्बंध नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर अल्पभूधारक शेतकऱ्याला खाजगी विहीर घेताना दुसऱ्या शेतकऱ्याच्या खाजगी विहिरीपासून कमीत कमी किती अंतरावर नवीन खाजगी विहीर घेता येते ? नकळत दोन खाजगी विहिरी मधील अंतर कमी राहिल्यास त्यावर एखाद्या शेतकऱ्याला ऑब्जेक्शन असल्यास महसूल विभागाला काय निर्णय घ्यावा लागतो ?
ड पत्रक नोंद मध्ये नमूद असलेली बाब ७ / १२ उताऱ्यावर तहसीलदार नोंद घेण्यास मनाई करत आहेत ? सदर बाबीत कलेक्टर च्या notice वर पण कारवाही होत नाही आहे ?

Question by ramrao walke
13-06-2021
ramraobapuwalke66@gmail.com

Sir 2011roji majhya jaminiver shejaryane 20-22 gunthe atikraman kele junior hadda jcp be todali yachi mahiti meet Tehsildar aani DC yana arjadware dili tehsildarachi arjachi nakkal office shikka majyakade aahe parantu DC SP yanche postachi rashid aahe jun2020 roji doghanchi sarkari MOJNI jhali donhihi mojnit jevadhe atikraman jhale note tevdhe nighale .aaj atikraman karnara tya jagevar vahivat karit aahe .mala tarcampound karu det nahi.Tehsildar DC yanchyakadun aajparyant kuthlihi karvayi jhali naahi doghanchyahi mojnit atikran sidh jhale mahitichya adhikaratun meet tyachya gatacha k patrak nakasha milavila aahe bhumiabhilekh yani molni arjdararachya magninusar falni nakasha durusti sathi prakaran nikali Ashe ASA shera Nov 2020 roji tyachya k patrak nakashaver lihila aahe Kay karave
आपला हद्दीबाबत वाद असता तर कलम १३५ अन्वये आपण जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करून तो सोडवू शकला असता . मात्र पण पाळ्या प्रश्नात नमूद केले आहे कि , जमिनीची मोजणी झाली आहे . आपल्या जागेत त्याने अतिक्रमण केले आहे .
आपणास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अवैध पध्दतीने जमिनीवर नाव दाखल झाल्यानंतर कोणत्या कायद्याअंतर्गत सातबारावरील अवैध नाव कमी करता येईल. आमचे नाव करण्यासाठी अवैध रित्या नाव दाखल केलेल्या व्यक्तीची संमती आहे.तसेच आम्ही दिवाणी न्यायालयामधून खरे वारस म्हणून वारसा प्रमाण पत्र मिळविले आहे. वारसा प्रमाण पत्र व त्या व्यक्तिचे संमती पत्र जोडून सातबारा, व इतर हक्कात नाव दाखल करणेसाठी तहसीलदाराकडे अर्ज करता येऊ शकते का?
ज्या फेरफाराने अवैध वारसाचे नाव ७/१२ सादरी लागले आहे तो फेरफार , प्रांताधिकारी यांचेकडे अहवानीत करा . फेरफार रद्द झाल्यावर आपले नाव वारस प्रमाणपत्राचे आधारे आपले नाव लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे कि,
सन १९६८ पासून आमचे वडिलोपार्जित घर शेतात आहे. पुढे सन १९९० ला घराचे नूतनीकरण केले. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या आवश्यक परवानगी घेतलेली आहे.ग्रामपंचायतीस नियमितपणे घरपट्टीच्या पावत्या आणि घरपट्टी देखील भरलेली आहे. परंतु सदर जागा हि आमची वडिलोपार्जित असून त्या जागेची किंवा शेतीचे क्षेत्र वडिलांच्या नावावर नाही. सदर क्षेत्रातील घरपड किंवा ७/१२ ला घराची नोंद करण्याबाबत मार्गदर्शन करावे.
७/१२ सदरी घराची नोंद घेतली जात नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दोन गावच्या शिव रस्ता करायचा असल्यास काय करावे लागेल? चालू रस्ता पूर्णपणे माझ्या व आमच्या गावच्या हद्दीतून आहे . तरी काय व कसे करावे कोणाकडे अर्ज करावा अणि कसा लवकरात लवकर हा रस्ता होईल?
आपण कलम १३५ (MLRC १९६६ ) खाली जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pankaj Nandurkar
07-06-2021
p.nandurkar03@gmail.com

ग्राम पंचायत क्षेत्रतील वडिलोपार्जित गावठान जमीन आपल्या नावावर करता येते का ❓ करता येत असेल तर कशी करावी?
गावठाण हद्दीतील जमीन आपले नावावर करण्यासाठी ग्राम पंचायतीकडे अर्ज करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shekhar davane
05-06-2021
9112389199

1 boar mazy vatanit ani maze nave ahe pan maza chulata mahnto tya boar madhe maza pan hissa ahe tar kay karave
जर आपले काका , त्या विहिरीतून /बोरमधून पूर्वीपासून पाणी घेत असतील तर त्यांचा हक्क आहे . आपण काही करू शकणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार माझे पती श्री. पवनकुमार शिवाजी पवार रा. तडसर, ता. कडेगांव, जि. सांगली यांनी दिनांक ३०/०३/२०२१ रोजी तडसर येथील गट नं. ७७९ मधील सामाईक क्षेत्र असलेल्या जमिनीपैकी २५ गुंठे जमिनीचा विक्री व्यवहार श्री. भास्कर संपत पाटील यांच्याशी दारूच्या नशेत केलेला आहे, त्या गटामध्ये माझे पती श्री. पवनकुमार शिवाजी पवार यांच्यासोबत माझे दीर व माझाही बरोबरीचा हिस्सा असून घेणाऱ्या व्यक्तीने माझी कोणतीही पूर्व कल्पना, परवानगी, संमती घेतलेली नाही.तसेच माझी नणंद व सासूबाई यांचाही इतर हक्कामध्ये हिस्सा आहे त्यांचीही घेणाऱ्या व्यक्तीने कोणतीही पूर्व कल्पना, परवानगी, संमती घेतलेली नाही. तसेच गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत माझेही नाव दि. ०३.०३.२०२१ पासून सर्व खाते उताऱ्यावरती लावलेले असून मा. दुय्यम निबंधक यांनी हा दस्त माझ्या व इतर हक्कातील कोणाच्याही पवानगीशिवाय केलेला आहे. तरी तो व्यवहार बेकायदेशीर ठरवून रद्द करता येतो का? आमच्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटण्या झालेल्या नसताना चतुःसीमा निश्चित नाहीत. सध्या कोरोना मुळे लॉक डाऊन असलेने आम्हांस कोणतीही शासकीय कागदपत्रे मिळालेली नाहीत तरी मला माझी जमीन मिळेल का? त्यासाठी मला काय करावे लागेल ?
जे २५ गुंठे क्षेत्र आपल्या पटीने नशापाणी करून विकले आहे , त्या क्षेत्रासाठी आपले पती , आपण स्वतः व आपले दीर यांची नावे ७/१२ सादरी दाखल होती का ? जर असतील तर , आपले पटीने करून दिलेल्या दस्ताचे आधारे , फेरफार मंजूर होणार नाही .
आपण मेहेरबान तलाठी/ मंडळ अधिकारी साहेब यांचेकडे फेरफारास हरकत घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 36 व 36 अ मालकी हक्काच्या पत्रात 7/12 नोंद करायचे असल्यास जात पडताळणी ची आवश्यकता आहे का? जमिनीची विक्री होऊन फसवणूक झालेली पुरावे सादर केले आहेत. महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रस्थापित करण्यासाठी अधिनियम 1974 अन्वय सुरू करण्यात आलेल्या चौकशी विरुद्ध कोणत्या सक्षम प्रांत अधिकाऱ्यांसमोर अपील दाखल करावी?
जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे .
कलम ६ खाली अपील , महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाकडे करण्याचे आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय साहेब व्येसनाधीन नवर्‍याला शेत विक्री पासून कसे थांबवता येईल.

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3