जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by वैभव भोसले
17-07-2021
Vaibhavbhosale.86@gmail.com
सर, माझी सवॆ नं. मोजणी झालेली आहे. त्यातील गट पण मोजले. सव॓ गट proper आहेत. त्यात माझा ही गट आहे तो मोजला आसता तो 54-60 गुंठे एवढा आहे.पण सातबारावर त्यातील क्षेत्र 14 गुंठे एवढे आहे. सवॆ नकाशा आणि गट नकाशा सारखाच आहेत, फाळणी नकाशा सापडत नाही. शेती पुस्तक यामधे सुद्धा 4-5 गुंठे तफावत
आहे. बाकी सर्व रेकॉर्ड म्हणजे आकारबंद,गुणाकार बुक,एकत्रीकरण हे 14 गुंठे असा आहे. माझी कोट॔ कमीशन मोजणी झाली आहे त्यानी टिपण नकाशा प्रमाणे मोजून माझ्या गटाचा नकाशा तयार केला तोही 54-60 गुंठे म्हणजे गट नकाशा सारखाच आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या गटात कोणत्या दिशेस क्षेत्र देणार यावरून गोंधळ आहे कारण त्या गटामधे दुसरे हिस्सेदार नाहित. फक्त माझ नाव आहे. त्या गटामधे दुसर्याच लोकानी अतिक्रमण केले आहे त्याचं त्या गटाशी काही संबंध नाही आपली वहिवाट फक्त 7-8 गुंठे एवढीच आहे. तर हा संपुर्ण गट सरकारी फी भरून किंवा नियमानुसार संपूर्ण गट क्षेत्र सातबारावर लावता येईल का . धन्यवाद
क्षेत्र दुरुस्तीचा अर्ज मा जिल्हाधिकारी यांचेकडे करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal
17-07-2021
tarev1565@gmail.com
सर नमस्कार
माझ्या आजोबास
A व B नावाचे दोन मुले होते
C व D नावाच्या दोन मुली होत्या
1998 ते 2004 माझ्या आजोबांनी ,वडीलांनी काकानी बरंच जमिनी लोकांना विक्री केल्या मी अज्ञान होतो
मी त्यांचा A चा मुलगा माझे वय 26 वर्षे आहे आज वीस वर्षे पुर्वी सन 2001 ला मी 6 वर्षेाचा असताना माझ्या वडीलांचे भावाने म्हणजेच काकाने B ने वडिलोपार्जित जमीन 100 रू स्टम पेपर वर च्या वाटणीपञ सादर करुन माझ्या नावाने केली होती आहे असा फेरफार मध्ये उल्लेख आहे
सदरील बॉन्ड पेपर चा कुठे ही रेकॉर्ड नाही ,
जमीन वडिलोपार्जित आहे माझे 7/12 ला नाव आहे , मी शेती वाहतो ,तरी आज पर्यंत मला काही ञास नाही
तरी मला भविष्यात काही ञास होईल का ?
माझी मालमत्ता विवादीत आहे का ?
Question by RAJU GANESH SONAVANE
15-07-2021
raju23662366@gmail.com
एखादी वृध्द स्त्री, 90 वर्षे वय असलेली, जर मृत्यूपत्र करताना दोन्ही डोळ्यांनी अंध असेल, आणि वैद्यकीय अधिकारी यांनी psygically fit certificate दिले असेल तर मृत्यूपत्र प्रोबेट मध्ये रद्द होवू शकते का?
वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र चुकीचे दिले आहे हे सिद्ध करावे लागेल . मगच प्रोबेट रद्दबादल होईल
त्याच बरोबर , मिळकत केवळ मुंबई मध्ये असेल तरच probate ची आवश्यकता असते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sachin Patil
13-07-2021
sachu491985@gmail.com
सर,
तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयातील विविध कामांसाठी अर्ज केल्यानंतर ते काम पूर्ण हिण्यासाठी लागणाऱ्या कालावधीचा तपशील कुठे मिळेल?
प्रत्येक कार्यालयाचे दर्शनी भागावर , माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४ अन्वये , नागरिकांची सनद लावली आहे . त्यामध्ये प्रत्येक कामास किती कालावधी आवश्यक आहे याचा तपशील नमूद केला असतो
तसेच सेवा हमी कायदा खाली हि प्रत्येक सेवेचा कालावधी ठरवून दिला आहे . त्या कालावधीत सेवा दिली नाही तर आपणास अपील दाखल करता येते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amol u surwade
12-07-2021
amolsurwade90@gmail.com
मज़े आजोबा A आणि त्याचे भाऊ B दोघां मधे 1970 मधे वाटप झाले आहे त्यामध्ये वाटपाच्या गटाच्या व्यतिरिक्त एक सामाईक गट B यांच्या वाटपाचा आहे असा अर्जा द्वारे वाटप पत्रावर उल्लेख आहे तरी उताऱ्यावर वाटपप्रमाणे सर्व गट वाटून ज्याच्या त्याच्या नावे झाले आहे तरी त्या एका सामाईक गटाची त्यांची 51 वर्षा पासून कसली फेरफार नाही त्या मुळे आता त्यांनी त्यावर तहसील साहेबा कडे अर्ज करून नोटीस बजावली आहे तर 51 वर्षा पूर्वीच्या वाटपाचे मूळ दस्ताज कुठेच नाहीये तर फक्त त्या नोंदीच्या आधारावर त्यांना तो गट दिला जाऊ शकतो का
A आणि ब् यांचे पूर्वजांची हि जमीन असेल तर , वाटप होणारच . मात्र जर त्यास आपली हरकत असेल तर , तहसीलदार वाटप करू शकणार नाहीत . त्या व्यक्तीस न्यायालयात दाद मागावी लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sanket Ananta Dhindale
12-07-2021
sanketdhindale52@gmail.com
सर माझ्या जमिनीमध्ये 1952सली जंगल वहिवाट द्वारे काही इसामांच नावे दाखल झाली आहेत 70% क्षेत्रावर पण त्यांनी ते क्षेत्र 5 वर्षाच्या आत विकले आहे.तरीही माझ्या वशाजांची नावे त्यांच्या क्षेत्रापैकी 40% हिष्यावर चालू सात बऱ्यावर 7/12 दाखवत आहेत. जंगल वहिवाट मध्ये त्याची नावे ही चुकीच्या पध्दतीने दाखल केली आहेत. कारण क्षेत्र बुकला माझ्या वंशजांची नावे असतानाही त्याची नावे दाखल करण्यात आली आहेत तरी त्याची नावे कमी करण्यासाठी काय करावे यावर सर आपण मार्गदर्शन करावे,ही आपणास विनंती.आपणास दिलेल्या तसदिबद्दल क्षमस्व.
आपला विश्वासू
संकेत धिंडले
Question by Mahesh shinde
11-07-2021
mahesh243669@gmail.co
सर मला रमाई आवास आवास घरकुल बाधन्यासाठी सी ओ नी गावठान मध्ये 500 स्वे देण्यासाठी गामपंचायत व बि डी ओ यांना आदेश दिले त्या नुसार गामपंचायत यांनी मला पुरव व पश्चिम 12.5 व दशिन उतर 40 फुट जागा दिली ज्या ठिकाणी जागा दिली आहे त्या खालुन गामपंचायत पाणी पुरवठा पाईप लाईन व शेतकरी याची गे ली आहे व त्या जागेच्या वरून 11000 हजार होल्ट ची लाईची वायर गेली आहे त्या मुळे मी पुरव पश्चिम 26 व दशिन उतर 13 असे घरकुलाचे फाऊंडेशन केले आहे तर गामपंचायत म्हनते की तुम्ही जसे दिले तसे फाऊंडेशन का केले नाहीत ते काढुन टाका म्हनते ज्या शेतकरी याचे गावठान वाढीसाठी 18 गुठे गेले आहेत तो म्हणतो माझ्या हादीत घरकुल आहे तु बाधु नकोस त्याचे क्षेत्र घरकुला पासुन लाब आहे तो म्हणतो की गावठान सोडून मला 4.गुठे रान कमी पडते पंचायत म्हणते की तुमाला नोटिस काढावी लागेल माझे फाऊंडेशन झाले आहे काय करावे मार्ग दर्शन करावे
Question by विलास नवगिरे
11-07-2021
vilasnavgire@yahoo.com
नमस्कार सर,
मी फेब्रुवारी 2012 मध्ये केसनंद पुणे येथे एक गुंठा प्लाट खरेदी खत करून घेतला होता. परंतु 7/12 करणे बाकी आहे. 7/12 करण्यासाठी मला काय करावे लागेल?
जवळच्या व्यक्तीच्या नावे बक्षीस पत्र केल्यास 7/12 होतो का?
केसनंद येथे जमीचा ७/१२ आहे कि मिळकत पत्रिका आहे ?
७/१२ असेल खरेदी दस्त संबंधित तलाठी यांचेकडे सादर करा . ७/१२ अन्य कायदेशीर निर्बंध नसतील तर आपल्या नावावर मिळकत होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेश इंगळे
10-07-2021
Ingale.rajesh.rajesh@gmail.com
नमस्कार,
माझे आजोबा २००७ मदे वरले आज पर्यंत आमच्या वाटणी झालेली नाही मला एक प्रश्न असा आहे की माझे आजोबा चे बँक खाते आज पर्यंत चालू आहे आणि माझे काही चुलते त्या खात्याचं आजुन वापर करत आहे आणि माझा आजोबा चा नावा वर पीक विमा बरून पैसे उचलत आहे हे शासन सोबत धोका आहे का ? आणि या गुन्हाची नोंद कुठे करायची?
बँक ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आहे त्याठिकाणी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वैभव पांडुरंग राऊत
10-07-2021
contact.vpraut@gmail.com
सर माझ्या वडिलांनी 2001 मध्ये 2 गुंठे व 2002 मध्ये 1 गुंठा अशी जमीन दुय्यम निबंधका समोर खरेदीखत करून घर बांधण्यासाठी घेतली आहे आणि हे गुंठे एका शेत जमिनीतील आहेत. तसेच माझ्या वडिलांच्या अशिक्षित पणामुळे आज तागायत त्या खरेदी खताचा फेरफार न दिल्यामुळे वडिलांचे नाव 7/12 वर नव्हतं परंतु मी 11/06/2021 रोजी फेरफार नोंदीचा अर्ज तलाठी कार्यालयास दिला व त्यांनी 9 नंबर ची नोटीस खरेदी देणाऱ्याच्या वारसांना काढली कारण खरेदी देणारा मृत आहे तसेच 18 दिवसात कोणतीही हरकत प्राप्त झाली नाही. तरीही तलाठी यांनी माझा फेरफार तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्याचे उल्लंघन म्हणून रद्द केला आहे तसेच याच तालाठ्यांनी काही महिन्यांपूर्वी आमच्या बरोबर झालेल्या खरेदीखताची नोंद 7/12 वर लावली आहे पण आमचा फेरफार रद्द केला आहे मार्गदर्शन करावे व यांच्या विरोधात अपील कोठे करावी
जर खरेदी केलीली जागा , निवासी जमीनवापर विभागात येत असेल तर , जरी प्रश्नधीं व्यवहार हा तुकडेबंदी कायद्या विरुद्ध असला तरी तो नियमानुकूल होऊ शकतो
तसेच अन्य इसमाची ७/१२ सदरी नोंद झाली असेल व आपला फेरफार रद्द केला असेल तर प्रांताधिकारी यांचेकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Yoginath Potdar
09-07-2021
yoginathpotdar96@gmail.com
नमस्कार सर,
मी अक्कलकोट जि. सोलापूर येथील रहिवासी असून येथे माझी वडिलोपार्जित घर जागा आहे. तर माझ्यात आणि शेजारच्या मध्ये जुनी २ ते ३ फुट रूंद सामायिक भिंत आहे. त्या भिंतीमध्ये तळमजल्या मध्ये दोन्ही बाजूंनी कपाट (कोनाडा) जे की सामायिक भिंत दर्शवित आहे. आणि माझे घर एक मजली आहे. शेजारील घर हे दुमजली आहे. आणि शेजारच्यांची वरच्या मजल्यावर सामयिक भिंतीमध्ये माझ्या बाजूने खिडक्या आहेत. तर ते खिडकी बंद करता येईल का. किंवा माझ्या हिश्याची सामायिक भिंतीचा अधिकार कसा मिळवावा. आणि जर मला आता बांधकाम करावयाचे असेल तर कसे करावे. आणि मला ते(शेजारी) २ते३ फूट माझ्या हद्दीत आत सरकून बांधकाम करून घेण्यासाठी सांगतात, असा कुठे नियम आहे का? असेल तर सांगावे. आणि माझे योग्य मार्गदर्शन करावे.
दुमजली घर जर २० वर्षाहून अधिक काळापासूनचे असेल व खिडकी तुमच्या मिळकतीच्या बाजूस असेल तर अश्या शेजाऱ्यास Right to Light and Air हा right of Prescription by easement मुळे मिळतो . जर २० वर्षाहून कमी असेल तर आपण बांधकाम करू शकतो ( २-३ फीट भिंत आता घेण्याची गरज नाही )
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Yoginath Potdar
09-07-2021
yoginathpotdar96@gmail.com
नमस्कार सर,
मी अक्कलकोट जि. सोलापूर येथील रहिवासी असून येथे माझी वडिलोपार्जित घर जागा आहे. तर माझ्यात आणि शेजारच्या मध्ये जुनी २ ते ३ फुट रूंद सामायिक भिंत आहे. त्या भिंतीमध्ये तळमजल्या मध्ये दोन्ही बाजूंनी कपाट (कोनाडा) जे की सामायिक भिंत दर्शवित आहे. आणि माझे घर एक मजली आहे. शेजारील घर हे दुमजली आहे. आणि शेजारच्यांची वरच्या मजल्यावर सामयिक भिंतीमध्ये माझ्या बाजूने खिडक्या आहेत. तर ते खिडकी बंद करता येईल का. किंवा माझ्या हिश्याची सामायिक भिंतीचा अधिकार कसा मिळवावा. आणि जर मला आता बांधकाम करावयाचे असेल तर कसे करावे. आणि मला ते(शेजारी) २ते३ फूट माझ्या हद्दीत आत सरकून बांधकाम करून घेण्यासाठी सांगतात, असा कुठे नियम आहे का? असेल तर सांगावे. आणि माझे योग्य मार्गदर्शन करावे.
शेजारील इसमाच्या खिडक्या आपल्या घराच्या दिशेने २० वर्षाहून अंधुक काळ असतील तर त्या खिडक्या आता काढून टाकता येणार नाहीत . मात्र जर २० वर्षाहून कमी कालावधीसाठीच्या असतील तर , त्या काढून टाकता येतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kaduskar vikram
09-07-2021
sathishrock19@gmail.com
सर 1986 ला मझ्या वडीलानी आमच्या दोन्ही भावंडांची वडिलो पर्जित जमीनिची वाटणी केली होती.अत्ता आमच्या 7/12 मधे इतर हक्का मधे माझ्या वडिलांच्या आई चे नाव दिसत आहे.वडिल आणी त्यांची आई मयत आहेत तर मला असे विचारायचे आहे की आई चे वारस माझे मयत वडिल आहे आणी वडीलचे वारस आम्ही दोघे भावंडे आणी 2बहिणी आहे तर 1986 ला संपूर्ण वाटणी अम्हा दोघा भावंडा मधे झाली होती.वडिलांच्या आई च्या वारस हक्का ने बहिणीचा हक्क येतो का?2004 च्या अधि वाटणीच्या नियमाने.
Question by Nilesh Dasharath chougale
09-07-2021
nileshchougale5247@gmail.com
सर मी कोल्हापूर जिल्ह्याचा रहिवाशी असुन सर मला माझ्या शेतात ये जा करणेकरिता वाटेची अडवणूक केली जाते तरी संबधितचा अर्ज तहसील कार्यालायला देलेला असुन त्यांनी सदराचा अर्ज सर्कल चौकशी करिता पाठवील आहे तरी सर्कल चौकशी किती दिवसात केली जाते आणि त्यावर काय कार्यवाही केली जाईल कोणता मार्ग निघेल
रस्ता अडवला जात असेल अथवा अडवण्याचा प्रयत्न केला असेल तर . तहसीलदार यांनी मामलेतदार कोर्ट ऍक्ट १९०६ खाली स्वतः चौकशी करणे आवश्यक आहे . वास्तविक हि अर्ध न्यायिक प्रक्रिया आहे . अश्या प्रकरणात स्वतः तहसीलदार यांनी स्थळ पाहणी करणे , सुनावणी घेणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Roshan Birari
09-07-2021
birariroshan3@gmail.com
माननीय सर, एखाद्या शेतकऱ्याने वडिलोपार्जित शेती दुसऱ्या एका शेतकरीच्या शेतीशी अदलाबदल करून घेतली. आणि त्या शेतकऱ्याला चुलत भाऊ आहे असं सांगून जमीन अदलाबदल केली आहे. व तशी नोंद केली आहे.असे चालते का? हा गुन्हा आहे का? त्यावर मुद्रांक शुल्क इत्यादी असते का? कृपया मार्गदर्शन करावे.
मुन्द्रानक शुल्क हे दस्तावर असते व्यवहारावर नाही .
दस्त केला असेल तर त्यावर मुन्द्रानक शुल्क भरणे आवश्यक आहे
गुन्हा आहे कि नाही हे ठरवणे अवघड
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कार्तिकी
09-07-2021
kiranshivaleafs@gmail.com
वडिलोपार्जित मिळकत मध्ये न्यायालयाने कोणताही व्यवहार करणे वर निर्बंध घातला असताना माझी आत्या माझ्या वडिलांच्या नावे हक्क सोड पत्र करू शकते का?
हक्कसोड करताना हक्क सोड पत्रात मिळकतीचे वर्णन करणे आवश्यक आहे का?
हक्कसोड पत्र केवळ नोंद करून स्वतः कडे ठेवता येणार नाही का?
आत्याच हक्कसोड पत्र होत नसल्यास न्यायालयीन अंतिम आदेश पर्यंत आत्यासोबत ठोस व्यवहार कोणता करू शकतो? उदा. नोटरी , साठे खत किंवा पॉवर ऑफ अटर्नी etc.
न्यायालयाचे निर्बंध आहेत . त्यामुळे असे कोणतेही कृत्य करून न्यायालयाचा अवमान होईल असे काही करू नये
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Umesh Pawar
06-07-2021
umesh.pawar1030@gmail.com
मा. सर आमच्या वडिलांनी व 2 चुलते यांनी 1995 साली रजिस्टर खरेदीखत द्वारे 3 एकर जमीन खरेदी केली होती व आहे. पण बँकेचे कर्ज असल्याने फेरफार वरती नोंद रद्द झाली त्यामुळे ७/१२उताराला नोंद करता आली नाही. सध्या 2021 मध्ये आम्ही ती नोंद करू शकतो का...? खरेदीखताची नोंद ७/१२ उताराला कधी पर्यत करता येते त्यासाठी काळ मर्यादा आहे का...? मूळ मालकाने सदर ७/१२ हा त्यांच्या नावे नोंद असलेचा फायदा घेऊन काही स्थानिक संस्था कडून कर्ज घेतलेले आहेत तर या संदर्भात मार्गदर्शन करावे .
कर्ज आहे म्हणून नोंद रद्द करणे चुकीचे आहे . आपण त्या नोंदीविरुद्ध अपील प्रांत अधिकारी यांचे कडे करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Somnath Dattatray Lokhande
05-07-2021
somnathlokhanderx@gmail.com
नमस्कार सर माझ्या आजोबांनी 1960 सालि 6 आर जागा घरासाठी मोठया चुलत्याच्या नावे खरेदी घेतली असून आजोबा 1962 सालि मयत झाले सातबाऱ्यावर चुलते चे नाव एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून असे नोंद झाली या तर आम्ही आमची वारस नोंद करून घेतली त्याचे म्हणणे असे आहे की ती माझी खरेदी होती तुम्हाला त्यात हिस्सा मिळणार नाही त्याने परस्पर जागा विकून टाकली कृपया कायदेशीर मार्गदर्शन करावे
७/१२ वरती जर त्याची एकुम्या अशी नोंद असेल तर , त्या जागेची विक्री होऊ शकणार नाही . आपण फेरफार अहवानीत करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jitendra Rajput
04-07-2021
jdr2234@gmail.com
सर वडिलोपार्जित जमिनीबाबत प्रश्न.
सर माझ्या आजोबांचे १३ एप्रिल २०२१ला निधन झाले आहे. त्यांना १ मुलगा व ८ मुली आहेत ( सर्व लग्न झालेले). मुलाने(माझ्या मामा ने) सर्व बहिणींना न कळवता आजोबन कडून ६ एकर जमीन व घराला एकट्यानेच वारस लावून घेतले आणि तसे बक्षिसपत्र सुद्धा मिळवले आहे. तरी वारसा कायदा २००५ नुसार इतर बहिणींना हक्क मिळेल काय? तसेच त्यासाठी कुणाला दाद मागायची. तलाठी व ग्रापंचायत त्यांना वारस लावतील का? किंवा इतर कोणता मार्ग त्यासाठी अवलंबावा . कृपया मार्गदर्शन करावे. ( त्यातील दोन बहिणी घटस्फोटित आहेत. )
आपल्या मामाने जर आपल्या आई श सर्व मावश्यांचे बक्षीस पत्र घेतले असेल व ते नोंदणीकृत असेल तर आता , आई व मावश्यांचे वारस म्हणून नाव लावता येणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निखिलकुमार अशोक पवार
04-07-2021
nikhilkumar.pawar@sbi.co.in
सर नमस्कार,
माझ्या चुलत्यांनी वाटनी झाली नसताना जमिनीची विक्री केली आहे, ही जमीन सामाईक हीश्याची असून तलाठी व मंडळ अधिकारी यांनी हितसंबंधितांना नोटीस ना बजावता नोंदी घेतल्या आहेत. याबद्दल आम्ही माननीय तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी ऑनलाइन दस्त असल्यामुळे नोटीस देण्याची गरज नाही अशी भूमिका घेतली व 2019 चा शासनाचा GR आम्हाला दिला, पण त्यामध्ये कुठेही नोटीस देण्याची आवश्यकता नाही असे म्हंटलेले नाही. सर असे व्यवहार झाले तर सामान्य जनतेच्या हक्कांवर गदा येणार व कौटुंबिक वाद वाढतील. कृपया मार्गदर्शन करावे.
जमिनीस कोणाचे नाव लागले होते ? जर जमिनीवरती सर्व वर्षांची नावे लागलेली असतील तर , अश्या दस्ताचे नोंदणीकरण होणार नाही . दस्त नोंदवलेले असेल तर याचा कि , जमीलनीला केवळ आपल्या चुलत्याची नाव लागले होते .
चुलत्याची नाव एकुम्या असे नाव असेल व नंतर एकुम्या हा शब्द काढून टाकला असेल व नंतर चुलत्याने ती जमीन एकट्याची आहे असे भासवून विकली असेल .
चुलत्याने वाटप दस्त कसा नोंदवला तसेच केवळ चुलत्याची एकट्याचे नाव ७/१२ सदरी कसे लागले याचा शोध घ्या . आप्ल्यायला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by धनंजय गेडाम
03-07-2021
gedamdhananjay4@gmail.com
नमस्कार सर
मी एक आदिवासी व्यक्ति आहे. मी तीथे राहत नसल्याने माझ्या घराच्या जागेवर शेजारच्या ने कब्जा केला आहे. व घराचा ८़़अ आपल्या नावावर करून घेतला आहे. आता जर मला ती जागा परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल क्रुपया माहिती द्यावी.
ज्याने कब्जा केला आहे ती व्यक्ती हि आदिवासी आहे का ?
बिगर आदिवासी असेल तर आपण तहसीलदार यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by धनंजय गेडाम
03-07-2021
gedamdhananjay4@gmail.com
नमस्कार सर
मी एक आदिवासी व्यक्ति आहे. मी तीथे राहत नसल्याने माझ्या घराच्या जागेवर शेजारच्या ने कब्जा केला आहे. व घराचा ८़़अ आपल्या नावावर करून घेतला आहे. आता जर मला ती जागा परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल क्रुपया माहिती द्यावी.
Question by सागर
02-07-2021
sagarkandekar1990@gmail.com
एक गट 11 गुंठे नवीन अविभाज्य शर्त , भोगवतदार वर्ग 2 असून आजच त्यावर 40 खातेदारचे नावे आहे जर त्यांनी अजून जमिनीचे वाटप केले नाही तर जमीन शासन जमा होईल का?
Question by Lakhan
29-06-2021
Lakhaningale03@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की आमच्या कडे एक मालकीची जमीन आहे पण त्या जागेवरती नगरपालिका ने play Graund चे आरक्षण टाकले आहे तर आपण ते जागा त्या जागेच्या मालका जवळून घेऊ शकतो का ?????
जागेवरती नगर पालिकेने , खेळाचे मैदान अशे आरक्षण आहे टाकले आहे
भविष्यात नगर पालिका नगर रचना कायद्याखाली , जमीन संपादन करून , खेळाचे मैदान तयार करणार आहे . त्यामुळे सध्या ज्या व्यक्तीची जागा आहे त्याचे कडून घेउन काय उपयोग आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rajshri vartak
29-06-2021
Patil.rajshri13@gmail.com
सर,
रद्द झालेल्या फेरफ़राची नोंदणी 7/12 वर होते का? होत नसल्यास आमच्या 7/12 वर 40 वर्ष्या पूर्वी रद्द झालेली फेरफ़ार नंबर तलाठी कडून करण्यात आली आहे त्या बद्दल तक्रार कुठे करायची. कृपया करून मार्गदर्शन करा.
तहसीलदार यांचेकडे म.ज .म .अ १९६६ खाली कलम १५५ अन्वये , मेहेरबान तहसीलदार यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
