जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर ,
माझा प्रश्न असा आहे की, मुलींना आई वडिलांचे संपत्ति जमीन मध्ये समान हक्क मिळतो हे मान्य, परंतु मुलगी विवाहित झाल्यास सासरी नवर्याच्या संपत्तित जमीन मध्ये ही समान हक्क मिळतो , म्हणजे दोन्हीं बाजूने हक्क दाखवता येतो ही कायद्यतिल चूक अस म्हणता येत नही का ?

Question by Kunjan Landge
04-09-2021
kunjan79.kl@gmail.com

सर,
माझे पूर्वजांचे एकूण 100 एकर जमीन असल्याचे समजले असून मला त्यापैकी 9 एकर जमीनीचे Mahabhulekh वर शोध घेतला असता ज्यांना पूर्वी सांभाळायला दिले होते त्यांची नांवे एकीवात असल्याने त्यांची नांवे असलेले 7/12 उतारे मिळाले, तसेच जुन्या स.नं. वर आजी-आजोबांची नांवे आहेत. याबाबत मी 1950 ते आजपर्यंत फेरफार नोंदी व 7/12 उताऱ्याचे नोंदी काढण्याकरीता अर्ज दिला आहे. आजरोजी सदर गावात इतर उर्वरित कुठे कुठे पुर्वजांचे नांवे असलेले जमीन आहे याबाबत आजींना माहिती होती पण त्यांचे फार पूर्वीच निधन झाले आहे. मात्र इतर जमिनीचे गटांबाबतचे उतारे कशा पध्दतीने सर्च करता येतील? तसेच जुना रेकॉर्ड सर्च करण्याकरीता कोणत्या गाव नमुन्याची नक्कल काढावी लागेल याबाबत मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
संबंधित तहसीलदार कार्यालयाकडे आणि भूमी अभिलेख कार्यालयाकडे विचारणा करावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब
माझे वडील व्यसनाधिन आहेत ते सतत आमच्याकडे व्यसनासाठी पैसे मागत असतात व नाही दिले तर मी घर विकून टाकील असे म्हणतात, व्यसनामुळे त्यांनी त्यांच्या नावे असलेले गावातील घर भावास बक्षीस पत्र करून देऊन टाकले आहे, आता स्वतःच्या चैनी साठी व व्यसनासाठी राहत असलेले घर विकायचे म्हणत आहे,सदरचे घर वडोलोपार्जित नाही, घर त्यांच्या नावे असल्यामुळे त्यांनी ते घर विकू नये म्हणून आई व आम्ही काय करू शकतो त्याबाबत मर्गदर्शन करावे ही विनंती
स्वकष्टार्जित मिळकत विकण्यापासून एखाद्याला प्रतिबंध करण्याबाबत कायद्यामध्ये तर अशा प्रकारची कोणतीही तरतूद नाही. मात्र सामाजिक प्रयत्न करून, नातेवाईकांचे सहकार्य घेऊन कदाचित हा प्रश्न सुटू शकतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

चार भावांच्या जमीन वाटप करताना पूर्वी त्या जमिनीत अस्तित्वात असलेल्या आणि ग्राम पंचायतीला नोंद असलेली घरे दुसऱ्या भावाच्या वाटनित जात असतील तर त्याबाबत काय निकाल दिला जातो .
आपण जे वाटप बाबत प्रश्न मांडलेला आहे ते वाटप जर दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54 अन्वये न्यायालयामार्फत जर होत असेल तर न्यायालय त्यामध्ये घर हे नक्की कोणत्या व्यक्तीच्या हिस्स्याला जाणार याबाबत स्पष्ट उल्लेख प्राथमिक हुकूमनामा मध्ये करते.
मात्र जर हे वाटप दिवाणी न्यायालय मार्फत नसून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अथवा परस्पर संमतीने असणारे वाटप असेल तर जे सह- धारक आहेत त्यांनी याबाबत घर कोणाला जाणार याचा निर्णय घ्यावयाचा असतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ज्यांच्या नांवे 7/12आहे त्यांच्याकडून आमच्या वडीलांनी जमीन खरेदी केली त्यावेळी त्यांची मुलं आणि आम्ही अज्ञान होतो पण आत्ता ती मुले म्हणतात आम्ही जमीन परत घेऊ अस होऊ शकते का सर.?
एकदा विकलेली जमीन परत घेता येत नाही. आपण जर जमीन विकण्यास तयार झाला तरच ते जमीन घेऊ शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या घराच्या शेजारी बिल्डर ने ५ फूट जागा सोडलेली असून ती जागा माझ्या मालकी हक्कात आहे. परंतु माझ्या पाठीमागे बिल्डर ने दुसऱ्या घराला त्या जागेतून वापर दिला आहे. त्या जागेची घरपट्टी मी भरत असून मला त्या जागेचा उपयोग करता येत नाही कारण बिल्डर ने भिंत घालून दिलेली आहे. मागील शेजारी त्या जागेत टू व्हीलर सायकल पार्किंग करतात. व येता जाता घरात बघत असतात. त्याचा मानसिक त्रास होतो. सदर जागेचा ताबा कसा मिळवता येईल.

Question by Amol Mali
31-08-2021
maliamol9245@gmail.com

गावठाण जागा आणि सिटी सर्व्हे नोंदणीकृत जागा फरक काय ?
नमस्कार सर,
मला सरकारी जमीनीचा भाडेपट्टा कसा काढावा व त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील व अर्ज कोणकोणत्या ठिकाणी करावा लागेल याची सर्व माहिती पाहिजे होती.
तरी कृपया करून मला माहिती देण्यात यावी.
धन्यवाद.
जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा करावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Sir माझे वडील नगर पालिका हद्दीत असलेल्या मिळकतीचा कर भरत होते । पण 1991 मध्य नगरपालिकेने अचानक प्रॉपर्टी टॅक्स पावती देने बंद केले व वडिलांना पण त्याच्याकडे विचारणा केली नाही । आता तो टॅक्स परत लागू होऊ शकतो का । आमच्या कडे दुसरे कोणते document नाही फक्त जुन्या टॅक्स पावत्या आहेत भरलेल्या
कर नेहमीच वसूली योग्य असतो. स्वतः जाऊन चौकशी करावी य कर थकीत असल्यास अदा करावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर, मला भोगवटदार वर्ग 2 असलेली जमीन भोगवटदार वर्ग 1 करायची आहे व तिची खरेदी करून घ्यायची आहे.
तरी कशी करता येईल व ती सर्व प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील, कृपया याविषयी सर्व माहिती द्यावी.
भोगवटादार वर्ग २ चे अनेक प्रकार आहेत त्यातील तुमची जमीन कोणत्या कायद्याने वर्ग २ आहे त्यावर अवलंबून आहे

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Tushar khooe
29-08-2021
Khope_tushar@rediffmail.com

Sir namskar, mazya ajobanchya nave asleli shetjamin varas nave nond karaychi ahe.Jamin ajunhi ajobanchya nave asun ajoba ani tya nantr amchi aaji suddha maran pavleli ahe... Tyanna 3 mule ani 5 muli ahet... Tyasathi kay kagadpatre lagtil. Margadarshan milave hi vinanti...
तलाठीकडे पुराव्यासह अर्ज करा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

गावठाण पुनर्वसन योजने अंतर्गत माझ्या आजोबांच्या नावे तहसीलदार यांनी हक्क पत्र दिले आहे. परंतु त्याच क्रमाकांचे हक्क पत्र दुसऱ्या व्यक्तीकडे आहे . ताबा त्याच्या कडेच आहे . त्यामुळे आता आमचा हक्क रद्द झाला का ? गाकऱ्यांच्या पुढाकारातून 1998 साली दुसरी मोकळी जागा आजोबाणा देवून वाद मिटवला होता . परंतु सदर जागा सार्वजनिक सांगून परत ताबा गावकाऱ्यानी घेतला आहे . वाद मिटवतानाचा कोणताही अधिकृत पुरावा आमच्याकडे नसल्यामुळे ग्रामपंच्यायत ने हक्क पत्राच्या आधारेच नोंद घेतली आहे . {नमुना 8 अ } गाव नकाशा , वाटप हक्क पत्र , प्लॉट च्या चतु :सीमा या प्रत्यक्ष ताबा नुसार माझ्या गल्लीत कुणाच्याही जुळत नाहीत. त्यामुळे तहसीलदारकडे तक्रार करून काही निर्णय झाला नाही . कृपया साहेबणी मार्गदर्शन करावे. ही नम्र विनंती .आजोबांचे निधन झाले आहे .
जिल्हाधिकारी याची भेट घ्या व प्रकरण सांगा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Shivaji Patil
27-08-2021
shivray2010@gmail.com

नमस्कार सर,
आमच्याकडे कुळवाहिवाठी नुसार जमिन आहे. आमच्या आजोबांचे नाव संरक्षित कुळ म्हणून नोंद आहे. सध्या त्यातील काही जमिन भूसंपादन होणार आहे. तर कुळ वहिवाठी नुसार मोबदला कुळाला वा मालकाला कसा राहील याची माहिती द्यावी. तर अजूनही आमच्या आजोबांचे नाव आहे आजोबा हयात नाहीत.आम्हीं वारस नोंदणी साठी अर्ज केला आहे. तर मोबदला वारसांना मिळण्यासाठी काय करावे लागेल.
भूसंपादन अधिकारी कायद्याप्रमाणे निर्णय घेतील

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

शासकीय/गायरान जमीन भूमी अभिलेख कार्यालयाकडून विनाशुल्‍क मोजणी करणेबाबत मा.जिल्‍हाधिकारी यांना अधिकारी आहे किंवा कसे याबाबत कृपया मार्गदर्शन मिळावे.
वारस नोंद करण्यात तलाठी टाळाटाळ करत आहे कोर्टाचा वारस दाखला अर्जासोबत द्या असे म्हणतात त्याशिवाय काम होणार नाही अस तलाठी म्हणे
वारसा बाबत तक्रार किंवा वाद असेल तर न्यायालयाचा दाखला आवश्यक असतो अन्यथा नाही

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Sir mazi dukan 21 varsha pasun grampanchayat chya jaget aahe aata kahi grampanchayat sadasya te atikraman aahe mhanun kadhnyas saangat aahet tari mi dukan vachvnyasathi kahi karu shakto ka? Aani ti jaga legally mazi hou shakti ka
नमस्कार सर!
सर मी राजन फडकले रत्नागिरी येथून आहे. मी MPSC साठी तयारी करत आहे.
MPSC ने नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र मध्ये तीनही परिच्छेदात अर्जदाराचे नाव असले पाहिजे अशी अट घातलेली आहे. ही त्यांच्या नवीन GR नुसार 2021. तर मी माझे नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र हे 7-8 महिन्यांपूर्वीच काढलेले आहे महा ई सेवा केंद्रातून. ते ही तीन वर्षा साठी. तर मग मी आता वर उल्लेख केल्याप्रमाणे तीन परिच्छेदात नाव असलेले नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र कसे काढावे किंवा अपडेट करावे. तसेच माझा जातीचा दाखला हा 20 वर्षा पासून चा आहे.
तरी आपण मला योग्य ते मार्गदर्शन लवकरात लवकर करावे.
धन्यवाद सर!
1989 साली दस्त झाला असून सिटी सर्वे ला नोंद करण्यात आलेली नाही परंतु त्या मालमत्तेवर बांधकाम करण्यात आले होते सलग 10 वर्षे 8 अ ला नोंदी होत्या नंतर त्या फिरवून मूळ मालकाच्या नावाने करण्यात आल्या व आता ती मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीने खरेदी केली आहे तरी ती कशी मिळवली पाहिजे.
Who is prior in time is prior in Law या तत्वानुसार , आपले दस्त पहिले असल्याने आपणच या मिळकतीचे मालक आहेत . SLR यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, आम्ही 2019-20 साली गावाकडे घर बांधून रहात आहोत.पण ती जमीन महाराष्ट्र शासन या नावाने सिटी सर्वेला नोंद आहे. तरी आता हे घर बांधकाम अधिकृत करण्यासाठी काय करावे लागेल.

Question by Shekh juned
22-08-2021
shekhjuned1294@gmail.com

ग्रामपंचायत ला शेत सर्वे मधिल नविन प्लाटींग चा ले आऊट मंजुर करायच अधिकार आहै का
नाही
ग्राम पंचायत केवळ , गावठाणातील जागेवर बांधकाम परवानगी देण्यास सक्षम आहे . सर्वे नम्बर मधील लेऊट ला परवानगी देण्यास जिल्हाधिकारी /प्रांताधिकारी सक्षम आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजीच्या नावे तालुका परतूर जिल्हा जालना येथे 1992 पासून 5 हे 97 आर संपूर्ण कोरडवाहू जमीन आहे 1993 ला स्टॅम्प पेपरद्वारे तलाठी मार्फत समान वाटणी पत्रानुसार दोन मुलींना समान वाटून दिले वाटणी पत्रात माझ्या दोन मुलींना जमीन प्रत्येकी 2हे समान वाटून देत आहे उरलेली माझ्यासाठी आहे असा उल्लेख आहे 1996ला 2हे 14आर जमीन पाझर तलावात एकूण जमिनीच्या मधली जमीन गेली त्यानुसार 7/12 वर आजीच्या नावे 1 हे 25 आर एका मुलीच्या नावे 1 हे 29 आर व दुसऱ्या मुलीच्या नावे 1 हे 29 आर जमीन राहिली 2017 ला एका मुलीने एका दिशेची चांगली जमीन तिची समजून खरेदीखत द्वारे विकली खरेदी खतात चुकीच्या चातूर्सिमीचा उल्लेख आहे परंतु त्यासबंधी कोणतेही कागद पत्रे खरेदी खताला जोडलेली नाहीत तरी तुकडेजोड तुकडेबंदी नुसार महसूल न्यायालयात कोणाकडे दाद मागता येईल किंबहुना खरेदी खतात चुकीच्या नोंदी बदलण्यासाठी कोणाकडे दाद मागता येईल दाद मागण्यासाठी काही कालावधीची मर्यादा आहेत काय कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
केवळ चतुरसीम चुकल्या आहेत . त्यामुळे दुरुस्त दस्त नोंदणीकृत करा .
वाटपामुळे तुकडेबंदी कायद्याचं भंग होत आहे का ?
जालना जिल्ह्यात प्रमाणभूत क्षेत्र किती आहे ? त्यावर अवलंबुन आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

विठ्ठल या इसमास 2 मुले व 2मुली 1पत्नी आहेत.
रामकिसन व राधाकिसन मुले,राधा व अनुसया मुली .कुसूम पत्नी.2002 ला विठ्ठल चा मृत्यूनंतर 2015 ला रामकीसन याने वारस हक्कने 5 हि वारसाची नोद केली .तलाठी यानी 60 आर पैकी 12 -12 सर्वात विभागणी करून 7/12वर नोद केली.रामकिसन ने आई कुसूम व अनुसया या बहिनीची जमीन विकत घेतली .अशी रामकिसन ची 36आर जमिन 2015 मधे तयाने विकली.2021मधे राधाने तिची 12आर जमिन विकली.आता राहिली राधाकिसन याची .राधाकिसन च्या मुलाने राधा ने विकलेल्या जमिनीच्यानोदीस अडथळा आनला आहे.तयाची तक्रार चालते का.तो वाटपावरुन कोर्टात जावू शकतो का?तसे झाल्यास 2015 ला झालेली व 2021 ला झालेली खरेदी रद्द होऊ शकते का.फेर नुसार सामाईक शेत्र नाही विभागणी करून नोदले आहे.
पाच वारासदारांचे नावे स्वतंत्र ७/१२ झाले होते का ? ७/१२ स्वतंत्र झाले असल्यास कोणतीही अडचण असण्याचा प्रश्न नाही .
जर ७/१२ स्वतंत्र झाले नसतील तर , जमीन विक्री करताना , अन्य हिस्सेदारांची संमती /सही दस्तांवर घेतली होती का ? ७/१२ स्वतत्र नसल्यामुळे सामायिक जागेमध्ये वहिवाट वरून प्रश्न निर्माण होतो .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी मुंबई येथे राहणार असून, माझ्या वडिलांचे निधन झाले आह. त्यांच्या मागे आई, मी आणि माझा भाऊ असे वारस आहोत. माझ्या वडिलांना म्हाडा गिरणी कामगार सोडत मध्ये सदनिका मिळाली आहे. मृत्यूपूर्वी ही सदनिका माझ्या नावे करावी असे वडिलांचे मत होते, आई सुद्धा त्यासाठी सहमत आहे. परंतु वडिलांच्या निधनानंतर माझा भाऊ लग्न करणार आहे असे सांगून स्वताच्या इच्छेने घर सोडून निघून गेला. त्याला घर सोडून ७ महीने झाले आहेत, त्याचा काहीही पत्ता नाही. आता ती सदनिका माझ्या नावे करावे असे आई चे ही मत आहे कारण आई माझ्यासोबत राहत असून तिची पूर्ण जबाबदारी माझ्यावरच आहे, परंतु मला वारसा हक्क नुसार खूप अडथळी येत आहेत. म्हाडाच्या पत्रा नुसार मला दुय्यम निबंधाकडे पंजीकृत केलेले हक्क सोड लेख (Deed of Relinquishment) आणि वारसा प्रमाणपत्र (Heirship Certificate) सादर करणे बंधनकारक आहे.
कृपया मला मार्गदर्शन करावे.
आवश्यक कागदपत्रे सादर करावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सामाईक शेती क्षेत्रातील स्वतः चा हिस्सा विकता येतो ❓उदा. 87 आर मध्ये 4 हिस्सेदार असून तिघांची इच्छा स्वतः चा हिस्सा तिघांच्या सहमतीने एकत्र विकायची आहे. चौथ्या ला स्वतः चा विकायचा नाही.
शेतजमीन असल्यास तुकडेबंदी कायद्याचा भंग होतो का पहा ?
जमिनीची स्वरूप काय आहे ?
बागायत /जिरायत कि एकपिकी
कोणत्या ठिकाणी जमीन आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मला मी स्वतः प्लॉट घेऊन घर बांधले आहे ते मला माझे पत्नी ला बक्षीस देताना काय करावे लागेल व काही खर्च येयेल काय.
बक्षीस पत्र करा व नोंदणीकृत करा
निवासी मिळकत असल्याने व पत्नीच्या नवे करत असल्याने केवळ २०० रुपये मुंद्रणक शुल्क lagel .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.28 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3