जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अमोल काळूराम धसाडे
01-06-2021
dhasadeamol04@gmail.com
जर नगरक्षेत्रातील जमीन विक्रीस काढावयाची असेल पण जमिनीची ओरिजिनल कागदपत्रे हरवली असतील तर त्यावर काही उपाय आहे का?
Question by विश्वनाथ मोरे
01-06-2021
more.vish111@gmail.com
नमस्कार सर,
आमची जमीन खरेदी असून खरेदी पत्रा मध्ये विहिरीच्या पाणी उपसा हक्कासह आहे.खरेदी पत्रास १० वर्ष झालेली आहेत. परंतू ७/१२ मध्ये विहिरीची नोंद झालेली नाही. सदर ची विहीर भांडे सह्हिसेदारच्या क्षेत्रफळात आहे मोटार, लाईट सामाईक आहे. पण गेले वर्षभरापासून ते पाणी उपसा करू देत नाही. तरी ७/१२ सदरी नोंद कशा प्रकारे करता येईल.
केवळ ७/१२ सादरी नोंद झाली म्हणजे आपला सहहिस्सेदार आपल्याला त्या विहिरीतून पाणी उपसा करण्यास परवानगी देईल अशे नाही . आपणास तो पाणी देत नसेल तर आपण न्यायालयात दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by तुषार विलास कुरकुरे
31-05-2021
tushar.kurkure@gmail.com
सर, माझ्या आजोबांनी सन 1982 ला शेती विकली आहे. मी आता शेत जमीन घेऊ शकतो का
आपण शेतकरी नाही . त्यामुळे शेतजमीन खरेदी करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विजय माळी
30-05-2021
vijaysmali92@gmail.com
नमस्कार सर/मॅडम
एखादी जागा सोसायटी अंतर्गत असेल याचा अर्थ काय होतो? तसेच ती जमीन पद्धती मध्ये कुठल्या वर्गात मोडते?तसेच हि जमीन भोगोटादार वर्ग 1 करता येते का? तसेच ह्या जमिनीला भोगाटोदार वर्ग 1 मध्ये जर केले तर फायदे?
कृपया कळावे. धन्यवाद!
Question by अभय काळे
27-05-2021
Kaleabhay9696@gmail.com
माझ्या वडिलांना आजोबाकडून मिळालेल्या जमीनीची विक्री माझ्या समंती शिवाय करता येईल का? मार्गदर्शन करावे
आजोबांकडून मिळालेली जमीन , केवळ वडिलांच्या हिस्सापूर्ती विकता येईल . आपला हिस्सा विकत येणार नाही . शिवाय त्यांचे हिस्स्याची जमीन विकताना आपली संमती आवश्यक यासाठी कि , आपणाला खरेदी करावयाची असल्यास .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भावना प्रदीप पाटील
27-05-2021
patilpm1@gmail.com
सर,
आम्ही 2016 साली एका कडून त्यांची वडिलोपार्जित, वर्ग 1 ची जमीन योग्य मोबदला देऊन दस्त नोंदणी करून खरेदी केली. 7/12 वर फक्त त्या इसमाचे नाव होते. विकणाऱ्या इसमास 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलीचे लग्न झालेले आहे आणि आता तिचा पती वारला आहे. आता त्या इसमाची मुलगी आम्ही खरेदी केलेल्या जमिनीवर हक्क सांगू पहात आहे आणि जबरदस्तीने जमिन कसण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे भानगडी टाळण्यासाठी, आपण कृपया मार्गदर्शन करावे.
जमीन खरेदी करताना आपण , title - search व paper notice दिली होती का ?
या दोन गोष्टी केल्या असतील तर घाबरण्याचे कारण नाही . आपण bonafide purchaser आहेत
मात्र जरी या दोन गोष्टी केल्या नसल्या तरी , जबरदस्तीने ती जागा ताबा घेऊ शकत नाही . न्यायालयाकडून तिला जमीन परत मिळवून घ्यावी लागेल . ती तिला मिळेल याची शाश्वती नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Reshma tayde
25-05-2021
reshmitaude07@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की ती एकाच शेती क्षेत्रफळात दोनदा वारस म्हणून नाव ठेवू शकते काय?
Question by Pradip Prabhakar Jadhav
24-05-2021
pradipj500@gmail.com
नमस्कार सर,आम्ही म्हणजे एकूण 24 कुटुंबांनी सर्व्ह नंबर मध्ये घर बांधली आहेत ,त्यावेळी सारबांधवरून रास्ता होता पण तो आत्ता आढवला आहे , त्याला काय करावे लागेल,ग्रामपंचायत लक्ष्य देत नाही?
जो रस्ता अडवला आहे त्याचा वापर , शेतीसाठी होतो का ?
होत असेल तर आपण मामलतदार याजकडे , अर्ज करा . मामलतदार महोदय , मनाई हुकूम , मामलतदार कोर्ट कायदा खाली काढतील
मात्र जर शेतीसाठी वापर होत नसेल व आपण घरासाठी नियोजन अधिकारी यांची परवानगी घेतली नसेल तर , आपले घर अनधिकृत आहे . आपणस न्यायालयात जाऊनही काही उपयोग होणार नाही
ज्याने रस्ता अडवला आहे , त्याचेशी चर्चा करून , त्यास भरपाई देऊ करून , रस्ता हक्क लिहून घ्यावा . दस्त नोंदणीकृत करावा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Prabhakar Sonawane
23-05-2021
prabhakarsonawane.ps@gmail.com
भोगवटा वर्ग २ (महार वतन) हक्क सोड पत्र कसे करावे
Question by अमोल ठाकरे
18-05-2021
sonuamol1982@gmail.com
सर मी आदिवासी जमातीचा असून मला आदिवासी व्यक्ती कृषी जमीन (1966 36 अ) विकण्यास तयार आहे तर त्यासाठी
1)कोणाचीपरवानगी घ्यावी लागेल?
2) त्यासाठी काही नजराणा रक्कम भरावी लागेल का?
3) ती कृषी जमीन घेतल्यास ती बिनकृषी (NA) करता येईल का?
कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
१. आपणास जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल .
२. नजराणा नाही मात्र , खरेदी किंमत ( मिळकतीचे बाजार मूल्य ) भरावे लागेल .
३. जमीन बिन शेती करता येईल . मात्र बिन शेती केली म्हणून अन्य बिगर आदिवासी व्यक्तीस विक्री करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निलेश थोरात
05-05-2021
nilesh3thorat9@gmail.com
नमस्कार सर,
सर माझा प्रश्न असा आहे की , एखादी गायरान जमीन 35 वर्षापासून एखादा व्यक्ती वापरतो आणि ती त्याला नावावर करण्यासाठी के करावे लावेल?
काही करत बसू नका . गायरान जमीन हि गावातील गुरांसाठी चरण्यासाठी शासनाने दिलेली जमीन आहे . ती प्रत्येक गावात , लागवड्डीलायक क्षेत्राच्या कमीत कमी ५ % असण्याचे बंधन आहे .
जरी एखाद्या व्यक्तीचा त्यावर ताबा असेल अथवा कसत असला तरी तो अनधकृत ताबा /अतिक्रमण आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निलेश थोरात
05-05-2021
nilesh3thorat9@gmail.com
नमस्कार सर,
सर माझा प्रश्न असा आहे की , एखादी गायरान जमीन 35 वर्षापासून एखादा व्यक्ती वापरतो आणि ती त्याला नावावर करण्यासाठी के करावे लावेल?
Question by अजिंक्य नारळीकर
01-05-2021
naralikarajinkya32@gmail.com
सर आमच्या सामाईक 7/12 मध्ये महाराष्ट्र वन आहे त्यात माझ्या चुलत भावाने कोणाचीही परवानगी न घेता बोरवेल व घरभाट नोंद करून घेतली आहे.
1)महाराष्ट्र वन जमिनीत अशी नोंद करता येते का?
2)ती नोंद अथवा फेरफार कसा रद्द करावा?
अश्या जमिनीत वनेतर कामास बंदी आहे . फेरफार रद्द करण्यासाठी प्रांतधिकारी यांचेकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दत्तात्रय साठे
01-05-2021
dattasathe10@gmail.com
माझ्या आजीला फसवूण कुलमुख्तारपत्र बनवून तिच्या वाट्यावरील संपूर्ण जमिन एका इसमाने स्वःताहाच्या मुलाच्या नावे २५/१२/२०२० रोजी नोंदणीकृत दस्ताने केली आहे. आम्हास जमिन विकायचीच नव्हती. तर आम्हास काय करावे लागेल? कोणाकडे अर्ज करावा लागेल?
जर कुलमुखत्यारपत्र फसवणूक करून घेतले आहे तर ते व त्या आधारे करण्यात आलेलं खरेदी दस्त न्यायालयाकडून रद्द करणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उपेश सोनटक्के
23-04-2021
Upeshlaxman@gmail.com
माझ्या काकाला 1 एकर शेती आहे व ती शेती त्यांना विकायची आहे पण शेती विकले तर ते भूमिहीन होणार मग गावचे तलाठी म्हटले की कोणत्याही शेतकरी ला भूमिहीन करता येणार नाही असा कायदा आहे। पण त्याच्या दोन्ही किडनी खराब झाली असून त्यांना आपल्या उपचार साठी पैसे नाहीत व शेती ते काम करू शकत नाहीत। मग शेती विकायची कसे क्रुपया सांगा
Question by Gopal chim
20-04-2021
gopalchim@gmail.com
नमस्कार सर
माझे बाबा, काका, व मोठे बाबा ,याचे नावे मलकापूर येथे दोन गुंठे प्लॉट आहे. 7/12 वरती तिघांची नावे आहे . .वाटणी पत्रासाठी काका सही द्यायला तयार नाही, तर बाबांच्या नावाने वेगळा 7/12 कसा मिळेल
१. २ गुंठे क्षेत्र हे बिगर शेती जमीन वापर विभागात असणे आवश्यक आहे . अथवा नगर पालिका हद्दीत असणे आवश्यक आहे . जर नसेल तर जमीन वाटपामुळे जमीनीचा तुकडा निर्माण होणार असेल तर अश्या जमीनीचे वाटप पत्र होणार नाही .
२. मात्र जर मिळकत बिगर शेती जमीन वापर विभागात असेल तर , आपण न्यालयात आपले हिस्से निश्चित करून त्याचे वाटप करण्याचे आदेश देणे व हिस्स्यानुसार , जमिनीचे वाटप जिल्हाधिकरी यांनी दिवाणी संहिता कलम ५४ प्रमाणे वाटप करून मिल्ने , या बाबतचा हुकूम /आदेश मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा ..
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आदेश
19-04-2021
aadiraut93@gmail.com
आजोबांनी गावातील बखळ जागा वडिलांच्या नावे केली आहे. त्या जागेच्या कागदपत्रांवर सिटी सर्व्हे नंबर आहे, पण त्या कागदपत्रांवर कुठेही ग्रामपंचायत मिळकत क्रमांक नमूद केलेला नाही, यावर काय करावे लागेल?
एखाद्या गावाचा कलम १२२ खाली सर्वेक्षण झाले कि त्यास सिटी सर्वे नम्बर मिळतो व त्याचे मिळकत पत्रिका तयार होते . त्यावर ग्राम पंचायत क्रमांक नमूद नसतो .
आपण ग्राम पंचायतीकडे आपल्या मिळकतीचे आकारणी ( घरपट्टी ) केली आहे का ? केली असल्यास , मालमत्ता आकारणी नोंदवही मध्ये मिळकत क्रमांक नमूद असतो .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Prakash munde
16-04-2021
mundep6@gmail.com
आमचे नाव पीक पाहणी लागले आहे तर आम्हाला मालकी हक्क साठी काय करता येईल
पीक पाहणीला नाव लागले म्हणजे आपण त्या जमिनीचे मालक होऊ शकत नाही
पीक पाहणी म्हणजे त्या पीक हंगामात आपण दुसऱ्याची जमीन कसली
सध्या ७/१२ सदरी नाव लावले जात नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ganesh Bhandari
14-04-2021
ganeshbhandari1122@gmail.com
Sir mi 26 Varshancha aahe. Majhe vadil Mi 2 Varshancha Astana Gharatun Nighun gele aahet. Tya veles FIR dakhal kele navhte. Tyanchya navavar gavakade ek plot aahe. To Varsa hakkane Milavnyasathi kay karave lagel. Ani tya sathi kiti kalavadi lagel?
भारतीय पुरावा कायदा १०८ नुसार एखादी व्यक्ती बद्दल ७ वर्ष काहीच माहित नसेल तर , ती व्यक्ती मयत आहे असे मानण्यात यावे ,
मात्र एखादी व्यक्ती मयत ( अश्या कारणांमुळे ) आहे , हे न्यायालयाने जाहीर करणे आवश्यक आहे .
पुरावा म्हणून missing complaint दाखल के;लेली असणे आवश्यक आहे .
आता दाखल करा . ७ वर्षांनी आपणास न्यायालयाकडून declaration घेता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Gopal chom
11-04-2021
gopalchim@gmail.com
नमस्कार सर
माझे बाबा, काका, व मोठे बाबा ,याचे नावे मलकापूर येथे दोन गुंठे प्लॉट (NA36)आहे. 7/12 वरती तिघांची नावे आहे .बाबाना आपल्या हिश्याची जमीन विकायची आहे .वाटणी पत्रासाठी काका सही द्यायला तयार नाही, तर ती जमीन विकू शकतो का ?
किंवा वेगवेगळे 7/12 बतील का ?
Question by Ashfaque Patel
10-04-2021
patelashfaque@gmail.com
वर्ग 2 ची ज़मीन जी 6 ब मध्ये मोडते मात्र महार वतन नाही व त्याला आकारणीच्या 3 पट कब्जेहक्काची रक्कम घेऊन पुनरप्रदान केलेले आहे.अता ती ज़मीन उर्वरीत रक्कम आकारणीच्या 10 पट घेऊन शेतीपरियोजना साठीच वर्ग एक किंवा जुनी शर्तीने केली जाऊ शकते का?
Question by शुभम प्रकाश पाटील
10-04-2021
sp9168810173@gmail.com
नमस्कार , सर माझा प्रश्न असा आहे की , दुय्यम निबंधकांकडे धाव न घेता सख्या भावाची जमीन त्याच्या संमतीने व राजीखुने आपल्या नावावर करता येते का? कारण दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जावून बयनामा / जमीन नावावर करून घेण्याची आमची ऐपत नाही.
महाराष्ट्र मुंद्रणक अधिनियम १९५८ च्या कलम ३ अन्वये दस्त हा योग्य त्या शुल्काणे मुन्द्रांकित असणे आवश्यक आहे . तसेच नोंदणी कायदा कलम १७ अन्वये नोंदणीकृत करणे आवश्यक आहे . या प्रक्रयेतून जावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोशन विशे
09-04-2021
roshanvishe991@gmail.com
मा. महोदय साहेब
माझ्या वडिलांचे अल्पशा आजाराने मयत झाले आहे . एक जमीन आहे २६ गुंठे ची भातशेती आहे. गेली २५-२६ वर्षे माझे वडील भातशेती करून राबत आहेत. ती भातशेती जमीन भावहिस्सा म्हणून माझे वडिलांना देण्यात येणार होती, परंतु ती जमीन वडिलांच्या काकाचे नावे आहे. ते वडिलांचे काका मयत असून ती जमीन सध्या त्या वडिलांचे काकाच्या वारसाचे नावे आहे. तर ती जमीन मला भावहिस्सा म्हणून माझ्या नावे कशी कशी मिळवता / करता येईल ?
Question by मयूर शेळके
09-04-2021
mayurshelake1313@gmail.com
आदरणीय सर.
माझ्या वडिलांचे नावे एक जमीन आहे तर त्या जमिनीच्या 7/12 खातेउताऱ्यावर एका अज्ञात व्यक्तीचे नाव लागले आहे त्या नावाची व्यक्ती कोणीही नाही तर त्यांचे नाव कमी करण्यासाठी काय करावे
अज्ञात व्यक्ती मयत असल्याकजे सिद्ध झाले तर जमीन शासनाकडे जाणार .
आपण काही करून उपयोग नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भाऊसाहेब राजवाडे
05-04-2021
rajwadebhausaheb@gmail.com
सर नमस्कार,
एकतर्फी विभागीय चौकशी दरम्यान कर्मचा-यास सुनावणी तारखा कळविणे व बडतर्फ केल्याबाबतचे आदेश तामील करणेबाबतची कार्यपध्दति बद्दल मार्गदर्शन करणेस विनंती आहे.
धन्यवाद
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
