जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Shailendra
13-08-2021
Shailendra9944@gmail.com

नमुना 8अ वर नवीन मालकाचे नाव आहे आणि 7/12 वर जून्या मालकाचे नाव आहे ..ताबा नवीन मालकाचाच आहे ..भू संपादनाची नोटिस ही नवीन मालकाच्या नावे आहे..आणि जुना मालक त्यास संमती देत नाही आता तर काय करावे तो मोबदला मिळण्या साठी
काही चिंता नसावी
नवीन मालकासच नुकसान भरपाई मिळेल
जुम्ल्या मालकाची संमती आवश्यक नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by C.K. Sarode
12-08-2021
sarodeck@gmail.com

Please send a PDF copy of your Circular dated 21/11/1957 to regularise the defaulter members in co-op. Housing Society. महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक 21/11/1957

Question by kuldip patil
12-08-2021
kuldee8360@gmail.com

माझा प्रश्न गावठाण वाढ विस्तार योजनेमध्ये सन 1993 मध्ये मंजूर भुखंड सन 1999 मध्ये तक्रारी झाल्या म्हणूण प्रदद करता येतो का आणी याबाबत अपिल कोणाकडे व किती कालावधीत करावे

ताबा घेतला असेल तर अश्या कोणत्या तक्रारी झाल्या म्हणून , प्रदान आदेश रद्द करावा लागेल ?
ताबा घेतला असल्यास आता काही उपयोग होणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आजोबा हयात असताना जर रजिस्टर वाटणी करून दिली असेल तर त्या जमिनी मध्ये मुली हक्क मागू शकतात का,,वाटणी पत्र हे 80च्या नियमाखाली झाले आहे पण कुठल्याही मुलीचे हक्क सोड घेतले नाही,,,तर त्यांना हक्क मिळू शकतो का
आजोबांची वडिलोपार्जित मिळकत असेल व या पूर्वीच जमिनीचे वाटप झाले असेल तर , आता काही करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर ,
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये माझ्या आज्जीच्या नावे 1.44 आर जमीन होती
माझी आज्जी मयत झाल्यानंतर सदरील जमीन माझ्या वडिलांच्या (72 गुंठे) नावे व काकांच्या नावे (72 गुंठे) वाटणी प्रमाणे झाली.
व सदरील (72 गुंठे) जमीन माझ्या वडिलांनी व माझ्या दोन भावांनी आम्हाला माहिती न होऊ देता 2012 ला परस्पर दुसऱ्यांना विक्री केली
असे की सदरील जमिनीचे वाटणी पत्रक झालेले नसून वडिलांनी व माझ्या दोन भावांनी आम्हास माहिती न देता सदरील जमीन परस्पर विकली
हि जमीन मला व माझ्या बहिनींला कशी परत मिळेल व योग्य मोबदला कसा मिळेल कृपया करून मार्गदर्शन करावे.
दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा आपणास नुकसान भरपाई मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आम्ही 40 वर्षापासून गावठाण जमिनीमध्ये राहतो , घरपट्टी भरतो , त्या जागेवरून आम्हाला कोणी काढू शकत का, आणि ते जागा नावावर होऊ शकते का आणि होत असेल तर कशी?
जागा कोणाच्या मालकीची आहे ? त्याची हरकत नसेल तर हरकत नाही
नावावर होण्यासाठी मालकास संपर्क करा व विकत घ्या
मालक तयार नसल्यास Adverse -possession चा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Datta putwad
09-08-2021
dattaputwad@gmail.com

नमस्कार सर १९७९ मध्ये ग्रामपंचयतीमार्फत ८० फ्लोट वाटप केले गेले आहेत. त्या मध्ये आमच्या वडीलाला फ्लोट भेटला आहे. आणि आमच्या लगत चुळत्याला पण भेटला आहे .चुलता चा फ्लोट आमच्या वडिलांनी २००१ मध्ये विकत घेतला आहे. त्या ठिकाणी आम्ही राहतो. पण त्याचा फेरफार झाला नाही. ग्रापंचायतीला नोंद झाली नाही आता चुलता मयत आहे त्याची मुले विकल्ले नाही मानतात त्या फ्लोट ची खरेदी विक्री होत नाही मानतात. तर काय करायचं सर



वास्तविक ग्रामपंचायतीस शासनामार्फत जागा दिली जाते . त्यामुळे अश्या जमिनीची विल्हेवाट ग्राम पंचायतीस लाव्हता येत नाही . त्यामुळे आपण जरी प्लॉट विकत घेतला असला तरी आपले नावे होणार नाही तद्वत नोंद करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्याकडे वडिलोपार्जित शेती होती ती मी 2010 ला आत्याला हक्क सोड करून दिले आणि बाकीची शेती विकली तर आता मला नवीन शेती घायची आहे तर मी घेऊ शकतो का?
सध्या आपण शेतकरी नाही
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ नुसार बिगर शेतकरी व्यक्तीस जमीन खरेदी करता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर आमच्या गावात एका व्यक्तीने त्याच्या मिळकती मधील 40 एकर जमीन देवस्थान ला बक्षीस पत्राने बक्षीस दिली परंतु देवस्थान मधील ट्रस्टी लोकांनी ती document तलाठी कार्यालयात सादर केली नाही परिणामी जमिनी अजून मूळ व्यक्तीच्या नावे राहिली आणि आता गावातील अनेक लोक त्या जमिनी ना कुळ लावून कुळ खरेदी करून घेत आहेत या वर मार्गदर्शन करावे
जरी जमीन ७/१२ ला देवस्थानाचे नावे झाली नसली तरी जमीतील मालकी देवस्थानचे नावे हस्तांतरण झाली आहे . अश्या मिळकतीस कुल लागू शकतो मात्र त्याची विक्री कुळाच्या लाभात होऊ शकत नाही
तसेच हि बाब तहसीलदार यांचे निदर्शनास आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Surekha Tupe
07-08-2021
surekhatupe03@gmail.com

सुरेखा तुपे - surekhatupe03@gmail.com

Feedback : शिक्षण संस्था 1960साली संस्थापक यांनी आजाेबांना ताेंडी 20 गुंठे जागा वहिवाटीस दिली 1992साली संस्थेने अनेक लाेकांना वाणिज्य कारणासाठी 99 वर्ष भाडेकरारांने जागा दिली आहे. आजाेबांना ही दिली त्यामध्ये 20 गुंठेचा उल्लेख नाही. ग्रामपंचायत 1966 सालापासून नाेंद आहे. आज ही जागा आम्ही वहिवाट आहे. ग्रामपंचायत आम्हाला अतिक्रमण नाेटिस देत आहे.वहिवाटीस मज्जाव करत आहे.काही गांवगुंड दमदाटी करत टपरी वडापाव भाजीपाला फळे विक्रते यांना आमच्या दारात बसवित आहे.कुंटुबाल मानसिक टाँवर्च करत आहेत. न्याय कसा मिळेल.7/12 नाेंद कशी हाेईल .प्लीज मार्गदर्शन करा.
२० वर्षाहून अधिक काळ आपल्याकडे जमिनीचा ताबा आहे . वहिवाटीस अडथळा करू नये म्हणून दिवाणी दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
आमच्या गावात एका व्यक्तीने 40 एकर स्वतःच्या मालकीची जागा देवस्थान ला बक्षीस पत्राने बक्षीस दिली परंतु देवस्थान मंडळ यांनी बक्षीस पत्र आणि संबंदीत कागद स्वतः कडे ठेवले ते कोणत्याही कार्यालायत पुढील प्रक्रिये साठी सादर केले नाहीत परिणामी काही वर्षांनी त्या जमिनीवर कुळांची नावे लागली आणि कुळ खरेदी विक्री करायला लागली या वर काय करता येईल ती जागा पुन्हा देवस्थान ला मिळेल का ?
सर आमच्या गावातील मातंग समाज मंदिरासाठी असलेली जागा हि ग्रामसेवक व माजी सरपंच यांनी परस्पर हि जागा त्यांनी त्यांच्या हितधारकां च्या नावाची नोंद केली आहे आणि त्या ठिकाणी मातंग समाज मंदिर असा उल्लेख अहतानाही त्याला गोल करुन त्याच्या खाली त्या खाली या हितचिंतक का ची नावे लिहिली आहेत. या वरती आपण काय योग्य ती कारवाई करु शकतो
ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना जमीन वाटप करण्याचा अधिकार नाही . आपण प्रांतअधिकारी यांचेकडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१) दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकत दस्त नोंदणी विरुद्ध हरकत अर्ज स्विकारला जातो का ?
२) उप अधीक्षक भूमीअभिलेख कार्यालय यांना हरकत अर्ज मिळाल्यास चौकशी नोंद वही किंवा मिळकत पत्रिकेवर पेन्सिलने हरकत आहे म्हणून नोंद करुन शकतात का ?
३) फेरफार विरुद्ध अपिल करण्यासाठी किती कालावधीची कायद्यात तरतूद आहे ? कालावधीनंतर पुढील मार्ग काय ?
१. कायद्या मध्ये हरकत घेण्याची /मागवण्याची तरतूद नाही . मात्र एखादी नोंदणी कायद्याविरुद्ध होत असेल तर हरकत तपासली जाते
२. उपाधीक्षक यांचे कामकाज जमीन महसूल कायद्याप्रमाणे चालते त्यामुळे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर काही अंशी होय असे आहे
३. ६० दिवस

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, आमचे राहते घर हे आजोबाच्या नावे आहे.आजोबा मयत झाले आहेत. मला ते राहते घर वडिलांच्या नावे करायचे आहे. पण वडिलांना 3 भाऊ आणि 6 बहिणी आहेत त्याची संमती घ्यावी लागेल का? चुल्याचा नावे करून देंण्यास विरोध आहे. आणि ग्रामपंचायत त्याचे संमती पत्र मागते आहे. तर ह्या साठी मला मार्गदर्शन करावे की घर नावे कसे होईल.
आजोबांचे घर आहे त्यामुळे त्यावर सर्वांचा अधिकार आहे . इतरांची संमती असली तरी नोंदणीकृत दस्ताद्वारे हक्क सोडणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ganesh Pingale
05-08-2021
pingala.g07.gp@gmail.com

सर दुसरयास अकॉउंट ने उसनवार दिलेले पैसे परत मिळण्यासाठी कायदेशीर मार्ग सूचवने
वकिलांचा सल्ला घ्यावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या वडिलांना त्यांच्या काकीची जमीन मिलालेलि आहे त्याचा सात बारा 173/१ असा आहे आणि बाजूच्या गावचा शेतकरी त्याला ह्या जमिनी मधून फक्त 3 शेत लागवडीसाठी दिलेली होती ती अन्दाजे 1 एकर असतील परंतु त्या शेतकऱ्याने 32 ग लागू करून 4 ते 5 एकर चा नवीन सात बारा काढून घेतलाय 173/२ असा त्याचा नावे एवढी जमीन कशी झाली त्यांनी काय केलं ह्याच आमच्या वडिलांना काहीच माहिती नाही आता प्रांत कडे केस चालू आहे 32ग हे कस लागू केला यासाठी तहसील ऑफिस ला चौकशी केली असता हे प्रमाणपत्र सुद्धा तिथे मिळत नाही तर आम्ही काय कराव सर कश्या प्रकारे आणि कुठे कुठे चौकशी करावी प्लीज सर मार्गदर्शन करा त्यामध्ये अस आहे कि आजही ते शेतकरी त्यांना दिलेली 3 शेत तेवढी च कसत आहेत बकिच क्षेत्र आमच्या ताब्यात असून आम्ही पूर्वीपासून कसत आहोत
आपलय ज्या मिळकतीस बाजूच्या शेतकऱ्याचे नाव लागले आहे ते सर्व फेरफार काढा . वाचून पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार, माझा प्रश्न असा की, एक अपत्यहीन पती आणि पत्नी, वय वर्ष 60+, यांची 7 एकर शेती व राहते घर शहरात आहे, 7/12 व 8 अ या वर फक्त पतीचे नाव आहे, तर आता पतीच्या संमतीने पत्नीचे ही नाव 7/12, 8 अ, राहते घराच्या पेपर्स वर लावायचे आहे , तर हे सर्व करण्यासाठी विविध पध्दती आहेत ( उदा.वारस नोंद पध्दत, शेत दोघांचे घर दोघांचे महिला सक्षमीकरण उपक्रम , इतर ) यापैकी कोणती पध्दत वापरावी जेणे करून कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेत प्रक्रिया पूर्ण होईल, शेत दोघांचे घर दोघांचे महिला सक्षमीकरण उपक्रम या योजनेचा कसा उपयोग करावा व त्याची संपूर्ण procedure काय आहे.
तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, येथे याची माहिती मिळेल हे मला माहित आहे परंतु तेथील कर्मचारी संपुर्ण माहिती देत नाहीत टाळाटाळ करतात,तरी आपण स्टेप बाय स्टेप procedure ची माहिती दिली तर मला खूप मदत होईल
पतीदेव यांनी पत्नीच्या नावे बक्षीस पत्र करून द्यावे . राहते घर असल्याने केवळ २०० रुपये मुंद्रणक शुल्क लागेल . नोंदणी फी वेगळी . अंत्यंत सोपी पद्धत आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Namkar sir amchi vadiloparjit sheti aahe ,pan ami shetisati sarkari padit jagevar vihir kodhun pani cha vapar karto parntu maze bhau mala pani dhet nahi ,sabara var maze vadilcha nave ahe pan vadil mayat ahe krupa karun mala pani gench adhikari sati margadhardhan karve
आपली पाण्याची विहीर सरकारी जागेवर आहे . त्यामुळे तस पाहिलं तर आपल्या कुणाचाच पाण्यावर हक्क नाही
असोत जर विहिरीवर आपले वडिलांपासून पाणि घेत असाल तर वडिलांचे वारस म्हणून आपलाही पाणी घेण्यावर हक्क आहे .
वकिलांच्या सल्ल्याने दिवाणी दावा दाखल करून पाणी घेण्याचा हक्क जाहीर करून मिळावा अशी मागणी करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सरकारी गोठण जमीन एकूण कुळापैकी एकाच्या नावावर मा. तहसीलदार यांनी आदेश पारित केले असल्यास याविषयी कोणती कारवाई होऊ शकते? व तहसीलदार यांना सरकारी गोठण जमीन देण्याचे अधिकार आहेत का?
सरकारी जागेला एखादी व्यक्ती कुल आहे हे जाहीर करण्याचा अधिकार तहसीलदार यांना नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by शबी
03-08-2021
shabimoulvi@gmail.com

महोदय,
जुना ७/१२ व गाव नकाशा (अंदाजे १९४३ साली) मध्ये सर्वे नंबर वर रस्ता दाखवला नव्हता. आत्ताच्या सर्वे नंबरचा नकाशामध्ये गावाचा रास्ता दाखवण्यात आलेला आहे. परंतु गावाचा रस्त्यासाठी सर्वे नंबर मधून काही क्षेत्र कमी करण्यात आले असून, ता.न.भु यांच्याकडून प्राप्त नकाशा मध्ये एकूण सर्वे चा क्षेत्र कमी दाखवण्यात आलेला आहे. रस्त्यासाठी लागणाऱ्या क्षेत्राचा कुठलाही प्रकारचा मोबदला अगर फेरफरची नोटीस प्राप्त झालेली नाही. तसेच ७/१२ वर सुद्धा क्षेत्र कमी झाले याची नोंद नाही. जर रस्ता गेला असेल तर त्याचा मोबदला (मिळत असल्यास) तसेच किती क्षेत्र गेले यासाठी काय करायचे? कृपा करून मार्गदर्शन करावे व म. ज. म. अधिनियम मध्ये यासाठी कोणती तरतुद आहे किंवा कसे, यावर प्रकाश टाकावे.
धन्यवाद
आपला नम्र
शबी
संपादनाबाबत फेरफार व सातबारावर उल्लेख असेल . ते पाहून आपल्यास कोणत्या विभागास जमीन संपादित झाली आहे हे कळेल . त्यानुसार पुढील दिशा ठरवा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Namskar Sir,

Maji vadloparjit shet jamin ahe parantu sakkya-chulat bhavane ti shet jamin majya vadlianche nav n lavta (vaglun) tyanche varas nond karun paraspar vikli ahe ata mala kute dad magave lagel ani kay documents lagtil
मी शिक्षक आहे.पूर्वी वडिलोपार्जित शेतजमीन नव्हती आणि आज सुद्धा नाही.मात्र मला पेन्शन नसल्याने निवृत्तीनंतर मला उदरनिर्वाह करणेसाठी शेती खरेदी करायची आहे.करू शकतो का? कोणत्या अडचणी आहेत.? शेतकरी दाखला माझ्यासारख्या भूमिहीन लोकांना कोणत्या प्रकारे मिळू शकतो?
दानपत्र का काय प्रकार आहे? मी करू शकतो का? या मार्गाने शेती खरेदी करू शकतो का? किंवा इतर कोणता मार्ग आहे ज्याने मी शेती खरेदी करू शकतो?
कृपया मार्गदर्शन करावे.
आपण शेतजमीन खरेदी करू शकत नाही
अन्य कोणताही मार्ग नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर, माझ्या आजोबांनी 7-8 महिन्यापुर्वी 60 गुंठे जमिनीचे साठेखत करून दिले होते. परंतु त्यात मुदत किती दिवसांची होती हे त्यांना समजले नाही. ज्या व्यक्तीला साठेखत करून दिले होते तो म्हणाला होता की आपण जमिनीचि खरेदी 3 महिन्यात करून टाकू. परंतु आम्ही त्याला 8 महिन्यापासून कायम फोन करुन म्हणायचो की खरेदी कधी करायची. तेव्हा तो सतत म्हणायचा पुढच्या महिन्यात करू. परंतु त्याने खरेदी केली नाही आजपर्यंत. आम्हाला तेव्हा पैशांची गरज होती म्हणुन लवकर जमीन विकायची होती. परंतु आता पैशांची गरज पूर्ण झाली म्हणुन आम्हाला ते साठेखत रद्द करायचे आहे. त्याने आम्हाला साठेखत किवा त्याची एकही प्रत अद्यापही दिलेली नाही. आता त्यानेच आम्हाला नोटिस दिलेले आहे की खरेदी देऊन टाका नाहीतर मी कायदेशीर कारवाई करेल. * * त्या नोटिस मध्ये त्याने साठेखताचि मुदत 4 महिने असल्याचे लिहीले आहे. * *
आम्ही त्याच्याकडून घेतलेली रक्कम पुन्हा त्याला द्यायलाही तयार आहोत. परंतु तो आता नाही म्हणत आहे. तर आम्ही काय करावे. आम्हाला साठेखत रद्द करायचे आहे. #
साठेखतामध्ये अजून कोणत्या अति व शर्ती होत्या त्या मुद्द्यानिहाय वाचा . त्यामध्ये एखाद्या गोष्टीचा भंग होत असेल तर त्याचे नोटीस ला उत्तर द्या . त्याने दावा दाखल केला तर त्यास शर्ट भंग झाला असल्यास त्याप्रमाणे उत्तर द्या . न्यायालय त्यावर निकाल देईल,

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्याकडे संरक्षित कुळ वाहिवाठी नुसार शेत जमिन आहे आता त्यामधून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे तरी कुळवाहिठीनुसर मोबदला कसा आहे त्या संधर्भात कायदा काय आहे.
आपण सौरक्षित कुल आहेत . त्यामुळे जमीचे आपण मानीव मालक आहेत . ३२ग किंमत निश्चित झाली नसल्यास , ३२ ग किंमत निश्चित झाली तर , जेवढे पैसे मालकास मिळायला पाहिजे होते तेवढेच पैसे जमीन मालकास मिळतील व उर्वरित आपणास मिळतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब, आम्हाला तुळजापूर तालुक्यातील मौजे काटी गावातील सि.स.नं.३९१ ची खरेदी द्यायची असताना दुसऱ्या व्यक्तींकडून अनवधानाने आमच्याच सि.स.नं.३४ ची जागेची खरेदी झाली आहे, तरी खरेदी देणार व घेणार दोन्ही व्यक्ती ही खरेदी रद्द करण्यास तयार आहेत, तरी तो व्यवहार रद्द होण्यास किती दिवस लागतील, कृपया मार्गदर्शन करावे..!
खरेदी खत रद्द करण्यास वेळ लागणार नाही परंतु आपणास नवीन जागेचे खरेदी करण्यासाठी पुन्हा मुंद्रणक शुल्क भरावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.27 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3