जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सोमनाथ Lokhande
18-08-2016
somnathLokhanderx@gmail.com
मागील प्रश्नाचे उत्तर दिल्याबददल मोहसीन सरांचे आभार. मी एका पलाॅटमधील दोन भाऊ व पाच बहिणी यांच्या सामायिक क्षेत्रातील पाच बहीणींचा अविभक्त हिस्सा खरेदी खताने विकत घेतला असून माझी नोंद होईल का दोन भावांपैकी एकाने त्याचा हिस्सा आधिच विकला आहे. कृपया मार्गदर्शन करावे
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ४४ अन्वये अनेक सहधारकांपैकी एक सहधारक आपल्या हिस्याचे क्षेत्र विकू शकतो. अशा विक्रीमुळे ते क्षेत्र खरेदी घेणार्या व्यक्तीला सहहिस्सेदाराचा दर्जा प्राप्त होतो.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन कठापूरकर
17-08-2016
sachinkthapurkr@gmail.com
आदरणीय महोदय, भाडेकरूने फ्लॅट वर हक्क दाखवू नये या करीता काय काळजी घ्यायला हवी?
जाणकार वकीलाच्या सल्ल्याने नाोंदणीकृत भाडेकरार करावा.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश कदम
17-08-2016
ganukadam@gmail.com
आदरणीय सर ...वारस फेरफार करताना नोंद तलाठी यानी घातली त्यावर हरकत दाखल केली आहे ,, परंतु ती तक्रार केस मंडलाधिकारी यांकडे चालवली जाणार आहे परंतु मंडलाधिकारी यांच्या कडे काही कारनास्तव आपल्याला चलवायाची नसेल तर काय करावे ....
Question by गणेश शिंदे
17-08-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,मनपा.हद्दीत रहिवासी झोनमध्ये पूर्वी विहीर होती. संदर जागा बिनशेती करावयाची आहे.7/12 सादरी विहिरींची नोंद आहे.आज रोजी सदर विहिरीत पाणी नाही.तसेच तिचा काहीही उपयोग नाही.तरी सदर विहीर बुजविणेकामी कोणाची परवानगी घ्यावी लागेल?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
विहीर मनपाची नाही याची खात्री करा . विहीर आपले मालकीची असेल तर परवानगीची गरज नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मुकेश हिवाळे
17-08-2016
mukesh.hiwale@gmail.com
कुळकायदा मध्ये अलीकडे झालेली सुधारणा अधिनियम 20/2016 ची प्रत अपलोड करावी हि विनंती
Question by ramnath kadam
16-08-2016
rdkadam@gmail.com
आदरणीय सर वारस नोंद करताना सर्व वारसांची नावे कब्जेदार सादरी येणे आवश्यक आहे तरी आजच्या digital युगात इफेरफर सारखे उपक्रम आले असताना तलाठी जर संगनमत करून वारस महिलांची नावे इतर अधिकार ठिकाणी ठेवत असेल तर हा अन्याय आहे ,ह्या विरुद्ध काय करावे लागेल ,
असे झाले असेल तर त्या फेरफार नाोंदी.विरूध्द अपील करावे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
16-08-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,दुसऱ्या राज्यातील शेतकरी पुरावा महाराष्ट्र राज्यात शेतजमीन घेताना चालेल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
Question by विनायक बुवाजी patil
16-08-2016
Vbpatil96@gmail.com
कुळाच्या वारसाची नोंद करताना मूळ मालकाला नोटीस देणे बंधनकारक आहे ka
वारस नोंद करायची आहे , मग मूळ मालक हायत- जिवंत कसा असेल ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
हाेय. सर्व हितसंबंधीतांना नाोटीस देण्याची कायदेशीर तरतुद आहे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by वाडेकर नामदेव
14-08-2016
namdeo1682@rediffmail.com
सर माझ्या वडिलांची आणि त्यांच्या भावाची जमीन वडिलोपार्जित आहे .हे दोघे 30 वर्ष्या पूर्वी वाटण्या झालेल्या आहे पण वडिलांचा भावाचा मुलगा रस्ता देत नाही तर आम्हाला रस्ता मिळेल का व कोणाकडे दाद माघाची ?
Question by निलेश लोखंडे
14-08-2016
nikysweet1@gmail.com
आदरणीय सर मी अनुसूचित जमाती (संत) या प्रवर्गातील असून मला माझा प्लॉट / घराचा विक्रीचा व्यवहार गैर आदिवासी व्यक्ती सोबत करता येईल का? किंवा कसे , कृपया मार्गदर्शन करावे.
कायद्यातील तरतुदीनुसार भोगवटा हस्तांतरण करता येत नाही .
भोगवटा म्हणजे धारण केलेला जमिनीचा भाग
जमीन म्हणजे त्यावरील इमारत या सह असा आहे . त्यामुळे बिगर आदीवासी व्यक्तीस विकत येणार नाही .
हा कायद्यातील ग्रे क्षेत्र ( grey - area ) आहे . त्यात बदल होणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
अनुसूचीत जमाती भाोगवटा हस्तांतरण प्रतिबंध कायदा शेत जमिनींसाठी लागू आहे असे माझे व्यक्तीगत मत आहे. कायद्यात तसा स्पष्ट उल्लेख नाही. तथापि, आपण जाणकार वकीलाचा सल्ला घ्यावा.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by तुषार भांडवलकर
13-08-2016
tussh87bhand@gmail.com
नमस्कार,
महोदय मजा मामीचे वडील 1971 चा बांगलादेश युद्धात शाहिद झाले तेंव्हा माज्या मामी खूप लहान होत्या माज्या मामींच्या आईला शासनाकडून दहा एकर जमीन मिळाली. 1975 मध्ये मामींच्या आईने दुसरा विवाह केला त्यांना दोन मुले आहेत आता त्या जमिनीवर आमचाच अधिकार आहे असे ते म्हणतात तर यात शाहिद जवानांचा मुलीला त्या जमिनीत हक्क मिळेल का.
हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ कलम १४ अन्वये: हिंदू स्त्रितची मालमत्ताबाबत नमूद आहे की, :
या अधिनियमापूर्वी किंवा नंतर, हिंदू स्त्रिची, तिच्या कब्जात असलेली कोणतीही संपत्ती, मग अशी मालमत्ता तिला विवाहापूर्वी किंवा नंतर वारसाहक्कांने, मृत्यूपत्रीय दानाने, वाटणीमध्ये् पोटगी म्हणून, नातलगांकडून मिळालेली असो किंवा तिने अशी मालमत्ता स्वत:च्या कौशल्याने, परिश्रमाने किंवा एखादी संपत्ती दान म्हणून, मृत्यूपत्रान्वये, इतर कोणत्याही लेखान्वये, दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यान्वये, आदेशान्वये किंवा एखाद्या निवाड्यान्वये संपादित केली गेली असेल किंवा अन्य् कोणत्या ही मार्गाने संपादित केलेली असो, अशी संपत्ती, हिंदू स्त्री संपूर्ण स्वामी म्हणून धारण करील, मर्यादित स्वामी म्हणून नव्हे.
तथापि, असे दानपत्र, मृत्युपत्र, अन्य लेख, हुकूमनामा, आदेश किंवा निवाडा काही अटी किंवा शर्तींच्या आधिन ठेवल्यामुळे संपत्तीत निर्बंधीत अधिकार निर्माण होत असतील तर अशा संपत्तीला या अधिनियमाचे उपबंध लागू होणार नाहीत.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by लिलेश यादव
13-08-2016
lileshy03@gmail.com
मा. महोदय नमस्कार,
माझे वडील शामराव व त्यांचे सख्खे भाऊ राजाराम व भार्गव यांनी समा. ४ आणेचा हिस्सा खूष खरेदी पत्राने घेतलेला होता व नंतर दि. ०५/१२/१९८२ रोजी फे. नं. ३०१६ ने झालेल्या त्यांच्या वाटणी पत्रावरून त्यांचे नावे खालीलप्रमाणे हिश्याची नोंद झालेली होती :
गट नं. ४९४/१ १) शामराव :- २ आणे २ पै. २) राजाराम :- ११ पै. ३) भार्गव :- ११ पै.
गट नं. ४९४/२ १) शामराव :- १ आणे ४ पै. २) राजाराम :- १ आणे ४ पै. ३) भार्गव :- १ आणे ४ पै.
असे असता राजाराम यांना त्यांच्या इतर हिस्स्याच्या जमिनीवर विहीर पाडणे व पाईप लाईन करणेचे खर्चासाठी कर्ज झालेने सदरील कर्ज भागवण्यासाठी पैशांची गरज लागल्याने त्यांनी वर नमूद गट नं. ४९४/१ मधील ११ पै. व ४९४/२ मधील १ आणे ४ पै. चा त्यांचे नावे असलेला संपूर्ण हिस्सा माझे वडील शामराव यांना ते सह हिस्सेदार असलेने दि. ०२/०८/१९८३ रोजी रक्कम रु. ५०००/- ला ५ (पाच) वर्षे मुदती करिता गहाण स्वरूपी मुदत खरेदी पत्राने दिलेला होता. सदरील दस्ताची नोंद माझे वडील शामराव यांनी दस्त लिहून देणार राजाराम हे सख्खे भाऊ असलेने त्यांनी वर नमूद दस्ताची नोंद त्यावेळी ७/१२ सदरी केली नाही.
तसेच माझे वडील शामराव यांनी अर्ज देऊन दि. ३१/१२/१९८४, रोजी फे. नं ३२०५ ने त्यांच्या खाते उताऱ्यावरील गट नं . ४९४/१ मधील २ आणे २ पै, व गट नं ४९४/२ मधील १ आणे ४ पै, च्या हिश्या सहित सर्व गट नं. वर त्यांच्या मुलांची नावे दाखल केली होती.
अशी वस्तूस्थिती असताना पुढे राजाराम यांनी माझे वडील शामराव यांचे कडून दि. ०२/०८/१९८३ रोजी गहाणस्वरूपी मुदतखरेदी पत्राने घेतलेली र. रु. ५०००/- दि. १४/१२/८४ रोजी परत देऊन माझे वडील शामराव यांचे कडून त्यांच्या वर नमूद जमीन मिळकतीचे रजि. रिकन्व्हेअन्स पत्र करून घेतले व त्याच दिवशी राजाराम यांनी रजि. रिकन्व्हेअन्स पत्रा मध्ये नमूद असलेली मिळकत म्हणजेच गट नं. ४९४/१ मधील ११पै व गट नं. ४९४/२ मधील १ आणे ४ पै च्या हिश्याची गहाणस्वरुपी मुदत खरेदीपत्राची नोंद माझे वडील शामराव यांनी ७/१२ सदरी केलेली नसल्यामुळे सदर मिळकत राजाराम यांच्याच नावे नोंद होती म्हणूनच दि. १४/१२/१९८४ रोजीच राजाराम यांनी शिवराम कदम यांना कायम खूषखरेदी पत्राने दिलेली होती. याची फे.नं. ३४३८ ने ७/१२ सदरी नोंद झालेली होती व आहे. त्यामुळे सन १९८४ सालीच राजाराम यांचे नावे असलेला हिस्सा व हक्क संपुष्टात आलेला होता व आहे. अशी वस्तुस्थिती असताना राजाराम यांनी दि. १२/०२/१९८५ रोजी. रिकन्व्हेअन्स पत्राची ७/१२ सदरी नोंद करण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकताच नव्हती. तरीही त्यांनी लबाडीने व बेकायदेशीरपणे नोंद केली.
वास्तवीक राजाराम यांनी रिकन्व्हेअन्स पत्राच्या नोंदीसाठी मा. तलाठी व मंडल अधिकारी, या शासकीय अधिकारी यांना अर्ज दिला तेव्हा या शासकीय अधिकारी यांनी रिकन्व्हेअन्स पत्राची नोंद मंजूर करताना दि. ०२/०८/१९८३ रोजी र.द.अ.नं. १८८२/१९८३, च्या गहणस्वरूपी मुदतखरेदी पत्राची नोंद सन. १९८२/८३ ते सन. १९८४/८५ पर्यंतच्या ७/१२ सदरी झालेली नाही तसेच राजाराम यांच्या नावे गट नं. ४९४/१ मधील ११पै व गट नं. ४९४/२ मधील १ आणे ४ पै चा हिस्सा तसाच शाबूत आहे याची कोणतीही दाखल न घेता माझे वडील शामराव यांनी फे.नं. ३२०५ ने त्यांच्या मुलांच्या नावे केलेल्या गट नं. ४९४/१ मधील २आणे २पै व गट नं. ४९४/२ मधील १आणे ४पै च्या हिश्यातून फे.नं. ३२१६ने कमी करून सन. १९८४/८५ च्या ७/१२ सदरी राजाराम यांच्या नावे गट नं. ४९४/१ मध्ये ११पै + ११पै व गट ४९४/२ मध्ये १आणे ४पै + १आणे ४पै अशी वाढीव हिश्याची नोंद केलेली आहे. त्यामुळे सादर फेरफार शासकीय अधिकारी यांनी मंजूर करून अन्याय केलेला आहे.
तसेच राजाराम यांनी सदर रिकन्व्हेअन्स पत्राची नोंद ७/१२ सदरी लबाडीने व बेकायदेशीरपणे करून घेतले मुळे माझे वडील शामराव यांचे मुलांचे नावे नोंद असलेला वर नमूद दोन्ही मिळकती मधील अनुक्रमे ११पै आणि १आणे ४पै चा हिस्सा फे. नं. ३२१६ने राजाराम यांचे नावे केवळ कागदोपत्री नोंद झालेला आहे. वास्तविक आमच्या नावे नोंद असलेल्या हिश्यातून कमी झालेले क्षेत्र हे सर्वस्वी आमच्या मालकी हक्काचे व प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीचे होते व आहे. पुढे राजाराम यांच्या दि. २४/१०/१९८६ रोजीच्या अर्जावरून फेरफार ने राजाराम यांचे नावाची नोंद वर नमूद दोन्ही मिळकती माधील अनुक्रमे ११पै व १आणे ४पै चे हिश्यास पोकळ स्वरूपी झालेली होती व आहे.
तसेच माझे वडील शामराव हे वयस्कर व अशिक्षित असल्याने व नोकरी-धंद्या निम्मीत पर ठिकाणी राहण्यास असल्याने त्यांना फेरफार ने त्यांचे मालकीचा वर नमूद दोन्ही गटातील हिस्सा ७/१२ सदरी कागदोपत्री कमी झाले बाबत त्यावेळी कोणतीही माहिती मिळाली नाही. असे असले तरी माझे वडील शामराव हे हयात असे पर्यंत त्यांची व तदनंतर आज पर्यंत आम्हा भावांची पूर्वपार प्रमाणे संपूर्ण मालकी हक्काने असलेल्या हिश्या प्रमाणे वर नमूद जमीन मिळकती मध्ये मालकी हक्काने प्रत्यक्ष कब्जे वहिवाट होती व आहे. यास राजाराम व त्यांची मुले यांनी कधीही हरकत अथवा तक्रार केलेली नव्हती. सदरील पूर्व हकदार राजाराम यांनी त्यांचा गट नं.४९४/१ मधील ११पै व गट नं.४९४/२ मधील १आणे ४पै चा हिस्सा दि. ४/१२/१९८४ रोजी शिवराम कदम यांना विक्री केलेला होता व आहे. याची माहिती होती त्यामुळे राजाराम व त्यांची मुले यांना त्यांची वर नमूद मिळकत तुमची तुम्हांस परत देतो या आशेवर ठेवले होते. म्हणून राजाराम यांचेवर विश्वास ठेऊन सदर फेरफारा बाबत कोठेही अपील अथवा रिव्हिजन केले नव्हते. परंतु शेवटी कंटाळून आम्ही (मे.उपविभागीय अधिकारी यांचे न्यायालयात)आर.टी.एस./ रिव्हिजन अर्ज. सर्व पुराव्या सहित महराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलाम 257 नुसार अर्ज केला होता. सदर रिव्हिजन अर्ज महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 257 सुधारणा नुसार खालील निर्णयास 5 वर्ष पेक्षा अधिक कालावधी लोटल्या मुळे फेरचौकशीची कारवाई सुरु करता येणार नाही. या मुद्देवर फेटाळण्यात आलेला होता.
त्या नंतर आम्ही पुढे अप्पर जिल्हा अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 247 अंतर्गत अर्ज दाखल केला होता. तेथेही सदर रिव्हिजन अर्ज महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 249,252 अन्वये फेरतपासणी अमान्य केले असल्यास व त्यावर अपिलाची तरतूद नसल्याने सदरची अपील दाखल करणेचा स्तरावर फेटाळण्यात येत आहे. असा निर्णय दिला आहे ...तर आता पुढे मी काय करावे या बद्दल कृपया आपण मार्गदर्शन करावे.
आपण जाणकार वकीलाचा सल्ला घेऊन, दिवाणी न्यायालयात दाद मागता येते काय याबाबत चाौकशी करावी.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by Balaji sawant
12-08-2016
Balaji.sawant44@gmail.com
PWD ने 1981 साली त्यांच्या प्रकल्पासाठी जमीन संपादित केली होती परंतु या जागेवर कुठल्याही प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यात आला नाही म्हणून जमीनीच्या मुळ मालकाने जमीन परत मिळण्यासाठी कोर्टात केस दाखल केली व कोर्टाने PWD ने जमीन मुळ मालकाला परत करावी असे आदेश दिले आहेत परंतु अद्याप सदरील 7/12 PWD च्याच नावे आहे तरी जमीन मुळ मालकाच्या नावाने होण्यासाठी काय करावे लागेल सविस्तर माहिती देण्यात यावी
तसा शासन निर्णय असल्यास तो द्यावा
धन्यवाद
कोर्टाने आदेश करूनही जमीन , PWD च्या नावावर असेल तर , आपण कोर्टाकडून जमिनीचा ताबा मिळण्याचा हुकूम घ्यावा . जर जमीन PWD च्याच आज हि ताब्यात असेल तर , कोर्ट आपणास जमिनीचा ताबा देणे बाबत आदेश करेल .
मात्र जर जमिनीचा ताबा आपणाकडे असेल तर , केवळ कोर्ट आदेशाचे आधारे , आपले नाव 7/12 सादरी लावणे आवश्यक आहे . तलाठी आपले अर्जाची दाखल घेत नसतील तर त्यांचेकडून लेखी उत्तर घेऊन , तहसीलदार /जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास हि बाब आणून दया
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
काोर्टाचा आदेश तलाठीकडे देऊन नाोंद घेण्याची.विनंती करावी.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप बोरले
12-08-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,
भूमी संपादन अधिनियम 2013 अंतर्गत कलम 4 5 6 7 नुसार सामाजिक आघात निर्धारण अभ्यास (SIA) हे संपादन संस्थेने करावयाचे आहे कि भूसंपादन अधिकारी यांचे कार्यालया ने करावयाचे आहे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
सामाजिक आघात निर्धारण अभ्यास करण्यासाठी जिल्हानिहाय , पॅनल तयार कराचे आहे . या पॅनल ने हा अभ्यास करावयाचा आहे.
भू संपादन प्रस्ताव प्राप्त झालेवर , संपादन अधिकारी/ जिल्हा कार्यालय समन्वयक कार्यलयाने , या पॅनल कडे प्रस्ताव वर्ग करावा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विलास चिरकुटजी सेवारे
12-08-2016
sewarev@gmail.com
मा. महोदय मी जमीन विकत घेतली असून त्यात 6 धारक आहे त्या पैकी 5 धारकानी मला नोंदणीकृत रजिस्टी करून दिली परंत 1 धारकानी मला करार केला परंतु रजिस्टी करून दिली नाही आता मला 7/12 वर माझे नाव चढवाये आहे पंरतु सदर 1 सह धारक नी फेर फार वर आक्षेप घेतला आहे त्यावर कार् करू
फेरफार वर आक्षेप घेतला असेल तर मंडलअधिकारी तक्रार केस चालवून त्यावर निर्णय देतील
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
11-08-2016
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर
जमिनीचा महसूल कोणत्या वर्षांपासून चालू झाला , तसेच हा महसूल भरलेल्या काही पावत्या हरवल्या आहेत तर तलाठी मागील वर्षी भरलेल्या पावती आणा असे सांगत आहे . परंतु मागील वर्षी आम्ही महसूल भरला नाही , तर आत्ता आम्ही भरायला तयार आहोत पण तलाठी मागील मागील पावती पाहिजेच असे सांगत आहे तसेच महसूल रजिस्टर वही मध्ये तुमची नोंद नाही असे सांगत आहे , या पूर्वी आम्ही अनेकवेळा जमीन महसूल भरला आहे तसेच 2003 तसेच 2009 या काही वर्षाचे पावती आमच्या कडे आहेत ते आम्ही तलाठी ला दाखवले आहे , तरी हि ते मागील पावती पाहिजेच असे सांगत आहे
आत्ता महसूल कर भरण्यासाठी आत्ता आम्ही काय करावे तसेच मागील भरलेल्या पावत्यांची डुप्लिकेट प्रत आम्हाला मिळेल का , आणि जर मिळत असेल तर किती वर्षाचे पावत्याचे रेकॉर्ड आपण मागू शकतो
महसूल भरल्याची नाोंद तलाठीकडे असणे अपेक्षित आहे. आपण तहसिलदारांची भेट घेऊन मार्गदर्शन घ्यावे. परंतु दरवर्षी मुदतीत महसूल भरणे व त्याची याोग्य ती नाोंद ठेवणे ही आपलीही जबाबदारी आहे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by आनदराव देवकर
09-08-2016
anandraodeokar3589@gmail.com
मृत्युपत्राची direct तलाठी नोंद घेऊ शकतो का? किंवा त्यासाठी तहसीलदार वर नायब तहसीलदार यांचा आदेश होणे आवश्यक आहे काय?
तलाठी नोंद घेऊ शकतात या ऊपरोक्ष तलाठी यांनीच नोंद घेणे आवश्यक . आदेश घेण्याची पद्धत चुकीची आहे . सध्या online पद्धितीमुळे , आदेश घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नितेश मनोहर पाचभाई
09-08-2016
niteshpachbhai001@gmail.com
तुकडेबंदी नियमानुसार हंगामी बागायती प्रमाणीभूत क्षेत्राचे व्यवहार करावयाचे असल्यास जमीन हंगामी बागायती आहे किंवा नाही हे कशाच्या आधारे ठरवावयाचे. हंगामी बागायती प्रमाणीभूत क्षेत्राची विक्री करणेसाठी परवानगीची आवश्यकता आहे का. असल्यास कुणाची व कोणत्या पुराव्याच्या आधारे परवानगी मिळेल. (कायदे व नीयम)
हंगामी प्रमाणभूत क्षेत्र प्रमाण 15 गुंठे आहे. हे क्षेत्र पीक पाहणी वरून ठरवावे .
कमी क्षेत्र जर मुळातच कमी असेल तर ( ज्याची नोंद तुकडा म्हणून 7/12 सदरी केली असेल ) तर करता येईल . तसेच लगतच्या कब्जेदारास ( त्याच सर्वे नंबर मधील ) हि विक्री करता येईल . अन्यथा इतरांना करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रफुल द. मोरे
08-08-2016
prafuldm@rediffmail.com
माननीय महोदय
मला शेतजमीन खरेदी साठी शेतकरी दाखला हवा आहे.
माझ्या पणजोबांची वडिलोपार्जित जमीन माझ्या चुलत आजोबांनी स्वतःच्या नावे केली आहे परिणामी माझ्या सख्या आजोबांचं व माझ्या वडिलांचे नाव 7/12 वर नाही तर ते चढवण्या साठी काय करावे लागेल.
आईच्या बाजूने मामाच्या वडिलोपार्जित जमिनीवर आईचे नाव ईतर अधिकार मध्ये आहे बबी दगडू मोरे असे. माझे नाव प्रफुल दगडू मोरे असे असून आईचे लग्ना नंतर चे व सरकारी कागदपत्र जसे रेशन कार्ड, आधारकार्ड अश्या ठिकाणी नाव सुशीला दगडू मोरे असे आहे तर मला आईच्या कागद पत्र वर शेतकरी दाखला मिळू शकतो का?
आईच्या वडिलोपार्जित जमीनीच्या कागद पत्रांच्या अआधारे शेतकरी दाखला देता येणार नाही. तुमच्या पणजोबांची शेतजमीन असेल तर तुम्ही शेतकरी कुटुंबातील आहात. तुम्हाला नाते सिध्द करावे लागेल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by abhijit kadam
08-08-2016
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... महोदय अतिक्रमण म्हणजे काय याची MLRC नुसार व्याख्या कोणती अतिक्रमण झाले किंवा नाही हे तपासण्याचा किंवा घोषीत करण्याचा अधिकार कोणाला अाहे
MLRC मध्ये अतिक्रमण या शब्दाची व्याख्या दिलेली नाही.
अतिक्रमण म्हणजे दुसऱ्याचे मालिकेच्या जागेवर कब्जा करणे असा व्यावहारिक अर्थ आहे .
MLRC मध्ये अभिप्रायट अतिक्रमण म्हणजे , सरकारी जागेवर खाजगी व्यक्तीने केलेले अतिक्रमण असा आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Nitesh Pachbhai
08-08-2016
niteshpachbhai001@gmail.com
तुकडेबंदी नियमानुसार हंगामी बागायती प्रमाणीभूत क्षेत्राचे व्यवहार करणेसाठी जमीन हंगामी बागायती आहे किंवा नाही हे कशाच्या आधारे (कायदेशीर आधार) ठरवायचे. तसेच यांचा व्यवहार करावयाचे असल्यास कुणाची परवानगीची आवश्यकता आहे का? असल्यास तसे व्यवहार करण्याची परवानगी कोण देऊ शकतो? व कोणत्या पुरावा आधार घेऊन ? तलाठी साखरा को.
Question by विनायक बुवाजी patil
07-08-2016
Vbpatil96@gmail.com
गुंठेवारी आदेश (tahsildar)मिळाल्यानंतर ले aaut madhe बदल करता येईल का करता येत असेल तर कृपया प्रक्रियेची माहिती milavi. प्लॉटचे एरिया तसेच रस्त्याच्या रुंदी मध्ये बदल करावयाचा aahe.
विकास नियमावली प्रमाणे सुरवातीचा अभिन्यास नगर-रचना विभागाने /नागरपालिकाने /नियोजन प्राधिकरणाने मंजूर केला असेल.
जर तो चुकीचा असेल तर , विकास नियमावली प्रमाणे बदल करणे शक्य असल्यास , नियोजन प्राधिकरण / तहसीलदार करू शकतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sonali gadade
07-08-2016
gadadesonam@gmail.com
एका शेतजमिनीची वारस नोंद करायची आहे त्याबाबत एक प्रश्न आहे . माझ्या वडीलाना तीनशे गुंठे वडिलोपाजित मिळकत आहे आम्ही सहा बाहिनी व दोन भावंडे आहेत माझ्या दोन भावांनी माझ्या चार बहिणींचे हक्कसोड पञ 2010 साली करुन घेतले व परत 2011 साली माझ्या आईचे हक्कसोड पञ करुन घेतले आहे व परत 2012 साली माझ्या भावांनी वडिलांचे मृत्यूपञ करुन सर्व जमिन दोघा भावांच्या नावावर मृत्यूपञात लिहून घेतली. मला विचारायचे आहे की वडिलोपाजित जमिनीचे मृत्यूपञ करुन देण्याचा अधिकार वडीलांना आहे का? तसेच 2013 साली माझ्या राहिलेल्या एका बहिणीचे हक्कसोड पञ करुन घेतले आहे जर वडिलांनी मृत्यूपञ दोन भावाच्या नावावर करुन दिले आहे तर मृत्यूपञानंतर बहिणीचे हक्कसोड पञ करुन घेण्याचे कारण काय?आता फक्त माझेच हक्कसोड पञ करायचे राहिले आहे आता माझे नाव मला ७/१२त घालायचे आहे तर ते कसे घालू ते सुचवावे व माझा राहिलेला वडिलोपाजित जमिनीचा अधिकार डावलायचा अधिकार माझ्या वडीलाना आहे का?
संपूर्ण वडिलोपार्जित मिळकतीचे मृत्यूपत्र करता येत नाही. तुमच्या् वडिलांना वडिलोपार्जित मिळकतीत, त्यांच्या हिश्याला आलेल्या मिळकतीपुरतेच मृत्यूपत्र करण्याचा अधिकार आहे. तुमचे वडील, त्यांच्या हिश्याला आलेल्या मिळकतीची, त्यांच्या इच्छेनुसार विल्हेवाट लावू शकतात. वडिलोपार्जित मिळकतीत तुमचा हिस्सा आहे आणि तो डावलला गेला आहे असे तुम्हीं पुराव्यानिशी सिध्द करू शकत असाल तर तुम्हाला दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागेल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक बुवाजी patil
06-08-2016
Vbpatil96@gmail.com
Mahoday, मी ग्रामपंचायत कार्यालयात घरठाण पत्रक मागायला गेलो असता मला सांगितले कीड घरफाळा भरल्याशिवाय घरठाण पत्रक मिळणार नाही हे कितपत योग्य आहे .घरठाण पत्रक हे पब्लिक डॉक्युमेंट आहे ka.
आपले जसे हक्क आहेत तशीच आपली कर्तव्य हि आहेत .
कर भरा , घरठाण पत्रक मिळेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
अशी अडवणूक करणे योग्य नाही. तथापि, देय असलेला कर वेळेवर अदा करणे हे प्रत्येक नागरीकाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे तुमच्याच गावाच्या सुधारणेस वेग येईल. तुमची खरोखरच काही अडचण असेल तर ती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावी.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
06-08-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करताना शेतकरी पुराव्याची आवश्यकता असते.त्याप्रमाणे कर्नाटक किंवा इतर राज्यात शेतजमीन खरेदी करावयाची असल्यास शेतकरी पुराव्याची आवश्यकता असते का?किंवा कसे?त्याबाबत तेथील शासनाचा काही अधिनियम आहे आहे का? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
शेत जमीन खरेदी करण्याचे कायदे राज्यनिहाय भिन्न आहेत. त्या त्या राज्यात चौकशी करणे योग्य .
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
