जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by rohit
12-06-2016
www.roraj8@gmail.com
दोन भावाच्या नावे वडिलोपार्जित जमीन असताना, यात कोणतेही वाटप अथवा खातेफोड नसताना एका भावाने स्वतचे मुत्युपत्र तयार केले आहे या मुत्युपात्रास आम्हा वारसांचा विरोध आहे तसेच दुसर्या भावाचाही विरोध आहे. तर हे मुत्युपत्र तलाठी साहेबांनी नोंद न करण्यास काय करावे.
आम्हा सर्व वारसांची वारस नोंद लागावी व सर्वाना समान हिस्सा मिळावा अशी आमची अपेक्षा आहे
कृपया मदत करावी
कोणत्याही सीमा किव्हा चातुर्सिमा ठरलेल्या नाहीत किवा कोणतीही मोजणी झालेली नाही
वडिलोपार्जित जमिनीतील स्वतःचा हिस्सा मृत्यू पत्राने दिला जाऊ शकतो. नोंदीबाबत तक्रार असेल तर तक्रार अर्ज तालाठीकडे दाखल करा. मंडलाधिकारी त्यावर तक्रार केस चालवून निकाल देतील
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by vijay dinkar mohite
11-06-2016
mohitevijay786@gmai.com
आपला प्रश्न/सूचना... sir...saprem namskar ...mi khed Ratnagiri madhe rahat asun..mi 3 gunta jamin vikat ghetali aahe ..tachi notary sudha keleli aahe jagechya nakasha nusar malkane aamhala Jo jageparyant janyasathi rasta dila aahe...tyach rastya var dusryane ghar bandhale aahe mag ya sandarbhat mi grampanchayat javal takrar hi keli .matra 3 mahine zale tari ajun tya takrarikade konihi laksha det nahi...mag ashavile mala jage paryant jayala rasta kasa milavata yeyel....jamin malak sadhya hayat nahit....krupaya marg darshan karave
आपण जमीनखरेदी करताना , त्याची नोंदणी कायद्या अंतर्गत नोंदी दाटस केलेला नाही . त्या मुले आपल्याला मलिकी हक्क प्राप्त होत नाही .
तथापि आपण The Specific Relief Act खाली दिवाणी न्यायालयात आपली मालकी सिद्ध करून मिळण्यासाठी दावा करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
तुम्ही जर तुमचा व्यवहार दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत केला नसेल तर त्या व्यवहाराची नोंद शासकीय दप्तरात होणार नाही. तुमचा व्यवहार जर कायदेशीर असेल तर तुम्ही तहसीलदारकडे दाद किंवा रस्ता मागू शकाल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by हेमंत मोरे
11-06-2016
hemantanilmore@gmail.com
सर नमस्कार
आम्ही तीन भाऊ व एक बहिण आहोत यात वडील हयात असताना सर्वाना घरे करून दिली आज त्यात मी राहत असलेले घर माझ्या वाट्याला आले होते पण ते घर मी त्या वेळी माझ्या नावावर केले नाही ते घर अजूनही वडिलाच्या नावावर आहे आता ते घर मला माझ्या नावावर करायचे आहे या प्रक्रियेत माझी आई , मोठा भाऊ व बहिण माझ्या बाजूने आहेत मी राहत असलेल्या घरावर सर्वानु मते माझा अधिकार आहे यात माझा एक भाऊ सही देत नाही तरी मला घर नावावर करण्या विषयी मार्गदर्शन करावे हि विनंती
घर कोणाच्या हद्दीत आहे ? वाट्याला आले होते म्हणजे नेमके कसे? या बाबत खुलासा आवश्यक. अन्यथा हा वाद दिवाणी न्यायालात सोडवला जाऊ शकतो
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by रवि
11-06-2016
ravindra171282@gmail.com
आदरनिय सर , आमच्या शेजारील शेताच्या उतारा क्रमांक हा आमच्या उतार्याच्या अनुक्रमानिकेने आहे सदर चे शेत एका त्रयस्थ व्यक्तीच्या नावे आहे आणि त्या उताऱ्या मध्ये इतर अधिकारी सदरा मध्ये आमच्या आजोबाचे नाव ता.ग.दे सदरी आहे आणि त्या पुडे कंस मध्ये १ नंबर आहे सर सदर च्या नोंदी चा अर्थ आणि उद्देश काय होता जर स्पष्ट करावे हि विनंती सर जो उतारा आमचा आहे ती शेती आमच्या आजोबांनी विकत घेतलेली होती.
Question by रवि
11-06-2016
ravindra171282@gmail.com
आदरणीय सर कायदेशीर रित्या हक्क सोड पत्र तयार केले आहे आणि तलाठी कार्यालयात नोंदी साठी दिले असता आम्हाला ओंन लाईन फेरफार निघेल असे सांगितले आणि tehsil कार्यालातून नोंद ओंन लाईन होईल असे सांगितले सर सदर च्या बाबतीत प्रश्न असा आहे कि तहसील कार्यालात आम्हाला कोणाकडे भेटावे लागेल किवा ओंन लाईन फेर्फार्र त्यांचा channel कसे असेल त्या बद्दल सांगावे कि जेणे Karun भविष्य मध्ये दस्त नोंदवले बरोबर तहसील कार्यालात भेट देवून सदर च्या नोंदी चा पाठ पुरावा करता येईल किवा ओंन लाईन फेरफार इंटर नेठ वर बघता येईल का किवा त्याचा पाठ पुरावा कसा करावा e फेरफार कश्या प्रकारे कार्य करेल त्या संबंधी अधिक ची माहि द्यावी
Question by girish shinde
10-06-2016
girishinde12@gmail.com
आदरणीय सर वादिलोपार्जित जमिनीचे वाटपपत्र तयार करताना एखादा सहहिस्सेदार वगळले गेला असेल तर अश्या बाबतीत मंडलाधिकारी नोंद प्रमाणित करतात का?
वाटप पत्र नोंदणीकृत असेल तर नोंद प्रमाणित करतात ...तक्रार हरकत आलेस पुरावे पाहून निर्णय घेतला जातो.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by प्रदीप बोरले
10-06-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,
एका शेतजमिनीचे वारस नोंद करणेबाबत हरकत आहे.यामध्ये वारस ठरविण्याचे अधिकार महसूल विभागास आहे काय ? किंवा वारस नोंद करणेबाबत काय कार्यवाही करावी ? कृपया मार्गदर्शन करावे.हि विनंती.
वारस नोंद करताना तलाठी व मंडळअधिकारी हे चौकशी अधिकारी असून ते स्थानिक चौकशी करून वारस ठरवतात.यासाठी तलाठी दप्तरातील गाव नमुना ६ क वारस प्रकरणांची नोंदवही हा नमुना आहे.काही प्रसंगी वारस बाबत तपास लागत नसलेस मंडळ अधिकारी दिवाणी न्यायालायातून वारस प्रमाणपत्र मागणी करू शकतात.वारस नोंदी बाबत महसूल मित्र मोहसिन शेख ब्लोग वरील ७-१२ वरील वारस नोंदी हे डॉ.संजय कुंडेटकर सर लिखित पुस्तक वाचावे अधिक संकल्पना स्पष्ट होतील.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by chandrakant wankhede
10-06-2016
mr.chandrakant_wankhede@rediffmail.com
आदरणीय सर, माझ्या लहान भावाला आई आणी वडिलांनी सन २००५ मध्ये नोकरीसाठी ४ लाख रुपये भरले. सन २००५ ते २००८ पर्यंत तो शिक्षण सेवक असल्याने तीन वर्ष त्याला खर्च करण्यासाठी वरून ५००० रु. महिना द्यायचे. सन २००१ मध्ये त्याच्या नावावर LIC ची २ लाखाची POLICY काढली. त्याचे हप्ते आतापर्यंत वडिलांनी भरले. सन २००७ मध्ये वडील सेवानिवृत्त झाल्यावर त्याला घराशेजारी १५०० स्के.फुटचे ४ रूम चे घर ८ लाखाला घेऊन दिले. तो आई वडिलांमध्ये राहून त्याचे घर भाड्याने देऊन भाडे कमाई करून, ते व पगाराचे पैसे शिल्लक टाकायचा. त्याच्या पत्नीला डी. एड. करण्यासाठी २ लाख रुपये भरले. आतापर्यंत मला काहीच दिलेले नाही. मी भाड्याच्या घरात राहतो. ४ रूम मधील २ रूम माझ्यासाठी तात्पुरते राहायला मागितले असता, तेही देत नाहीत. मला न सांगता लहान भावाचे ऐकून घर विक्रीला काढले आहे. वडील माझ्या नावावर घर करायचे म्हणतात तर आई व भाऊ त्यांना धमकावून त्यातले हि २ रूम लहान भावाला द्या म्हणतात. तरी मला योग्य मार्गदर्शन करा हि विंनती.
तुमच्या प्रश्नावरून असे वाटते कि वरील सर्व खर्च तुमच्या वडलांनी त्यांच्या स्वकष्टार्जित उत्पन्नातून केला आहे. त्यांच्या हयातीत त्यांच्या स्वकष्टार्जित मिळकतीत तुमचा अधिकार नाही. वडिलांना विनंती करून बघा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by shekhar agivale
09-06-2016
s.agivale23@gmail.com
आदरणीय सर माझा आईचे वडील 1991 ला मयत झाले तेव्हा बहिणींची नावे इतर अधिकार सदरी आले व् भाऊ व् आईचे नाव कब्जेदार सदरी दाखल झाले , आता आई मयत झाली तर तिचे वारस लागताना बहिणींची नावे कोठे येतील?
१)ते इतर अधिकार सदरिच राहतील की दोन्ही ठिकाणी ( कब्जेदार व् इतर अधिकार सदरी )
Question by prakash mansaram patil
08-06-2016
pmpatil69@gmil.com
Adaraniy sir आम्हा 4 भावंडमधे जमिनीचे वाटप करायचे आहे ,, तर इतर अधिकार सदरी काही जुन्या सावकार नावे लागलेली आहे , त्यांची सम्मती आवश्यक आहे का ?
Question by भागवत गणेश
08-06-2016
bhagwat36@gmail.com
१) एकाच शेती शेत्रावर दोन राष्ट्रीयकृतबँकेचे पीककर्ज घेता येते काय ? २) किंवा एकाच शेत्रावर जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँक असे दोन्ही एकाच वेळी पीककर्ज घेता येते काय? ३) शेत्रावर बँकेचा कर्जाचा बोझा असताना त्याची वाटणीपत्र करून फोड करता येते का?
Question by रोहिदास सखाराम पाबळे
08-06-2016
rohidaspable@yahoo.in
एखाद्या धरणासाठी अधिसूचना प्रसिद्ध होवून १५ वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे ७/१२ वर इतर अधिकारात पुर्नवसनासाठी राखीव शेरे पडले आहे परंतु त्यानंतर कोणतीही कार्यवाही पुनर्वसन कार्यालयाने केली नाही त्याबाबतचे मोबदले मिळाले नाही तरी शेरे कमी करण्यासाठी काय करावे लागेल
Question by rohit patil
08-06-2016
rhtpatil168@gmail.com
सर कबुली नामा म्हणजे काय ते सविस्तर सांगा
हि विनंती
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
07-06-2016
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, मृतुपत्र नुसार वारस फेरफार घेण्यासाठी मी प्रांत साहेबांकडे अपील केले असता वेळेत अपील न केल्याने फेटाळले आहे. आता या पुढे काय करावे याचे मार्गदर्शन करावे. तसेच मृतुपत्राची राईट आफ़ रेकॉर्ड ला नोंद करता येते का नोंद करता येत असेल तर कोणत्या महसुल अधिकारयाकडे नोंदी साठी अर्ज करावा कृपया मार्गदर्शन करावे हि आग्रहाची विनंती.
अपील फेटाळले आहे तर अप्पर जिल्हाधिकारीकडे अपील करा. मृत्यूपत्राची नोंद रेकॉर्ड आफ़ राईट ला करता येते. तलाठी यांचेकडे अर्ज करावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप बोरले
07-06-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय, कृपया आरहन व संवितरण अधिकारी (DDO) यांची अधिकार व कर्त्यव्य याबाबत माहिती चे पुस्तकाचे नाव सांगावे किंवा वेब साईट चे नाव सांगावे.
Question by Ravi
07-06-2016
ravindra171282@gmail.com
आदरणीय सर प्रश्न असा आहे कि माझ्या शेत शेजारी एक त्रयस्थ व्यक्तीची शेत आहे आमचा आणि त्यांचा गठ न एका मागे पुडे जसे १४६ आणि १४७ आहे सदर त्रयस्थ व्यक्तीचा उतारा इंटरनेट वर पहिला असता त्याच्या उताऱ्या मध्ये माझ्या आजोबाचे नाव इतर अधिकार च्या कॉलंम आहे आणि पुडे तागदे आणि कंस मध्ये १ number लिहिला आहे त्याचा अर्थ काय होवू शकतो ते सांगावे धन्यवाद .. इतर माहिती असि आहे कि सदर ची आमची जमीन हि आमच्या पंजोबाने तेथे विकत घेतलेली aahe..
संबंधित फेरफारचा उतारा काढून बघावा.ता.ग.दे. चा अर्थ तारण गहाण देणार असा होऊ शकतो परतू निश्चित नाही
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by प्रकाश मधुकर कडाळे
05-06-2016
kadaleprakash15@gmail.com
आदरणीय सर,अप्पर जिल्हाधिकारी सो यांनी उपविभागीय अधिकारी सो यांनी दिलेल्या निकालाविरोधात निर्णय दिला असून त्याला अपील कालावधी किती दिवसाचा असतो.यावर कृपया मार्गदर्शन मिळावे .
Question by rohit patil
05-06-2016
rhtpatil168@gmail.com
सर माझे आजोबा त्यांना चार भाऊ होते ते असे भास्कर , बाबू, मोहन, भादू हे त्यांच्या नावावर एक घर होते त्या घरात आता एक म्हणजे भास्कर व त्यांचा परिवार राहत आहे व ते बाकी लोकांना तेथे राहू देत नाही त्या घरात सर्वांचे नाव आहे तरी त्यावर काही उपाय सांगावा हि विनंती .............
Question by राम शिंदे
05-06-2016
shinderam1983@gmail.com
आदरणीय सर, १९८० पूर्वीचे घर जागेचे रेकॉर्ड उपलब्ध नसलेचे कारण सांगून सिटी सर्वे ऑफिस ते देत नाही तरी सदर रेकॉर्ड प्राप्त करणेकरिता काय करावे?
जर कार्यालयात रेकार्ड उपलब्ध असेल तर त्या कार्यालयाने तो उपलब्ध करून दिला पाहिजे . आपण सविस्तर तपशिलासह आवश्यक रेकार्ड च्या प्रमाणित प्रती साठी अर्ज करा . जर उपलब्ध होत नसेल तर माहिती अधिकार कायद्यान्वे अर्ज करा .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by सचिन पाटील
05-06-2016
chiupatil.patil@gmail.com
नमस्ते सर, २८ वर्षापूर्वी विकास सोसायटी ला ५ आर शेत्र ऑफिस बध्कामासाठी दिलेले होती महसुल न चुकता भरला आहे. पण दुष्काळी परिस्थिती व अपुरा इमारत फंड यामुळे बाधकाम डरता आले नाही व शर्तभंग होऊन पुणे अप्पर जिल्हाधिकारी yani सरकार जमा आदेश दिला आहे तर ती जमीन प्रत घेण्यासाठी काय काय करावे....मार्गदर्शन करावे
Question by राम शिंदे
04-06-2016
shinderam1983@gmail.com
आदरणीय सर ,आमचे घराशेजारी असलेल्या खुल्या जागेतून परंपरेनुसार गेली ६५ वर्षे आमची वहिवाट आहे.ती खुली जागा आम्ही व दोन शेजारी असे तिघात सामायिक आहे.त्यातील एक शेजार्याने त्या जागेतून आमची वहिवाट बंद करणेकरिता ग्रामपंचायतीत तक्रार केली आहे.ती खुली जागा सामायिक असताना शेजार्याने केलेली तक्रार बरोबर आहे का?त्या तक्रारीस काय उत्तर द्यावे?
जमिनीविषयक कागदपत्रांच्या आधारे वस्तुस्थिती दर्शक उत्तर तक्रार प्राधिका र्यास द्यावे .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
03-06-2016
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, एखादे अपील करण्यासाठी विलंब झाला असेल तर विलंब माफीचा अर्ज करावा लागतो का, असा विलंब अर्जाचा नमुना कोठे मिळेल कृपया मार्गदर्शन करावे
होय विलंब माफीचा अर्ज करावा लागेल.त्यासाठी कोणताही विहित नमुना नाही .
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by राजेंद्र साळुंखे
03-06-2016
विक्री वैध्य आहे कि अवैध्य
कोकणातील एकत्र कुटुंब पद्धतीमुळे गावाकडची जमीन, आजोबांच्या मृत्युनंतर कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या काकांच्या नावे झाली. त्याचा त्यांनी गैरफायदा घेऊन काही जमिनीची विक्री माझ्या वडिलांची सहमती न घेत विक्री केली. सदर विक्री वैध्य आहे कि अवैध्य ?
धन्यवाद
राजेंद्र साळुंखे
Question by dn gunjal
02-06-2016
gunjaldny@gmail.com
वाटप पत्र करताना इतर अधिकार सदरी वारसांची सम्मति घ्यावी लागते का ? त्यांची सम्मती न मिळाल्यास वाटप करण्यासाठी काय करावे?
वाटपास सर्व धारकांची संमती असणे आवश्यक आहे.अशी संमती नसेल तर दिवाणी कोर्टातून हिस्से तःरवून घ्यावे लागतील
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by आबा
02-06-2016
ashokmalid3@gmail.com
सर आईच्या वडिलांनी त्यांची वडिलोपाजित जमीन 2008 मध्ये 3 मामामध्ये समान वाटणीने वाटप करून दिली त्यात आईचा हक्क मिळवण्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन करावे
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
