जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर , माझ्या वडिलांनी आणि माझ्या काकानी वाटपपत्र दुय्यम निबंधकांकडून मंजूर करुन घेतले आहे परंतु ऎसे करताना सामान क्षेत्र वाटप किंवा आकार जुडी समान असायला हवी होती, परंतु 2 एकर क्षेत्र एका भावाला वाटनितच जास्त दिल आहे , माझ्या वडिलांना 2 एकर क्षेत्र कमी आले आहे , वडील तक्रार करायला तयार नाही तरी ही वाटप आम्हाला मान्य नाही कारण आमचे क्षेत्र कमी आहे, ही नोंद सामान वाटप नाही म्हणून मुलगा या नात्याने तक्रार तलठ्यकडे दिल्यास नोंद मंजूर होईल का? ही वाटप मान्य नसल्यास मी आणखी काय करू शकतो ? जमीन वादिलोपार्जित आहे ,
मा दिवाणी न्यायालयात अर्ज करू शकता . ते त्या प्रमाणे आदेश करून जिल्हाधिकारी कार्यालयात समान वाटपासाठी पाठवतील . त्यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयात ते वाटप होऊन त्या प्रमाणे समोरची कार्यवाही होईल .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by ravindra
14-05-2016
ravindra171282@gmail.com

आदरणीय सर जर दुय्यम निबंधक कार्यालयातून ३ बहिणीं नि नोंदणी कृत हक्क सोड पत्र केल असेल आणि ते हक्क सोड पत्रची index ची कॉफी तलाठी कार्यालयात जमा कारात्यावेळेस तलाठी हक्क सोड करणारे व्यक्तीला घेवून येण्यास सांगितले त्या प्रमाणे २ बहिणी आल्या आणि त्यांची सही दिली परंतु एक बहिणीस तिच्या व्यक्तिगत करणा मुले येण्यास वेळ लागत आहे आणि तलाठी सांगतायत कि जो पर्यंत ती बहिण येत नाही दो पर्यंत नोदन होणार नाही सदर ची नोंदणीस एक वर्ष पूर्ण होयला आले आहे तरी प्रश्न असा आहे सदर च्या हक्क सोड पत्र ला किती दिवसांची वैधता असेल किवा एका वर्षा नंतर ते रद्द होतेका तसेच त्या बद्दल ची अन्य माहिती द्यावी
रजिस्टर / नोंदणीकृत हक्क्सोड पत्र आहे. ते रद्द होणार नाही.
हक्कसोड पत्र केलेल्या बहिनींना सदर नोंदी वर काही हरकत आहे काय...? या बाबत तलाठी यांना
नमुना ९ ची नोटीस देण्यास सांगा.

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

वरील विचारलेल्या प्रश्नातील जमीन वडीलोपारजीत आहे
माझा प्रश्न हींदु वारसा अधिनियम 1956 वत्यातील सूधारना 2005 शी संबंधित आहे माझ्या आईचा जन्म 1960चा असुन लग्न 1977साली झाले ती जिवंत असून तीला 3भाऊ व 3 बहीणी आहेत. सद्या तीचे आई व वडीलही जिवंत आहेत त्यांना 54 एकर जमीन असुन त्यापैकी44एकर 1990च्या आसपास वरील पैकी 3भावांचे नावें साध्या पद्धतिने केली असून बाकीची 10एकर जुलै 2005मध्ये कोर्ट डिक्री दावा नुसार(या डिक्री दाव्यात तीनही मुले गुडीपाडवा 2004 पासुन वेगळी राहतात व तोंडी वाटण्या झालेल्या आहेत असे नमूद आहे पण डीक्री दावा जुलै 2005मध्ये दाखल केला व नोहेंबर 2005 मध्ये मंजुर झाला) त्याच मुलांचे नावें केली आहे 7/12 त्यांच्या नावें निघतो .वाटप करते वेळी मुलींचा वीचार केला नाही किंवा कसलेही सही अंगठा घेतलेला नाही अशा स्थितीत माझ्या आईस तीच्या वडीलांच्या शेतीत हीस्सा मीळू शकतो का? त्या वीषयी मार्गदर्शन हवे.
हिंदू वारसा सुधारणा कायदा 2005 नुसार ,आपले आजोबांची जरी वडिलोपार्जित जमीन असेल , तर
any alienation including partition or testamentary disposition made prior to 20 th December 2004 does not invalidate such transfer.
आजोबांनी 44 एकराचे वाटप 1190 सालीचा केले आहे .
जमिनीचे वाटप 44 एकर प्रत्येकी 1/4 प्रमाणे ( वडील+ 3 भाऊ ) प्रत्येकी 11 एकर याप्रमाणे होणे आवश्यक
तसेच 10 एकर हि 20 डिसेंबर 2004 पूर्वी तोंडी वाटप त्यामुळे त्याचे हि प्रत्येकी 1/4 या प्रमाणे म्हणजे प्रत्येकी 2.5 एकर वाटप होणे आवश्यक .
आजोबांकडे 12.5 एकर जमीन वाटते आली असती . ती त्यांची स्वकष्टार्जित मिळकत होते त्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे .
त्यामुळे आपणास आता कोणताही हक्क मिळकतीत उरलेला नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, मी सासरवाडीला तीन एकर शेतजमीन पाच वर्षापूर्वी पत्नीच्या नावे खरेदी केली आहे. मेव्हण्याने इच्छा नसताना शेजारी त्रास देणारा येईल म्हणून बळजबरीने घ्यायला लावले. तीन वर्षानंतर बाजारभावाने घेईन म्हणाला. आता माझ्या जमीनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करीत आहे. खोटेच पैसे दिले म्हणुन सांगतो.’बहीण आहे म्हणून लिहून घेतले नाही’ म्हणुन सांगतो बळजबरीने शेतात नांगर मारला आहे. दोघांच्या शेतामधील बांध नष्ट केला आहे. मी दुसर्याक शहरात राहतो. पत्नी माझ्या बाजूने आहे. बहीण माझ्यासाठी मेली आहे म्हणतो. शेत विकत घेणारे आले की त्यांच्यासमोर वाद करतो. शेती घेणारे वादात आहे म्हणून निघून जातात. कृपया मला या त्रासातून कसे मुक्त होता येईल.
घाबरू नका . जमीन तुमच्या मालकीची आहे . नोंदणीकृत खरेदी खत तुमच्या नावे आहे म्हणजे मालकी तुमची आहे . कब्जा हा मालकी पाठोपाठ च आला पाहिजे . पण खबरदारी म्हणून तुम्ही दर वर्षी पिक पाहणी लावून घेत चला .म्हणजे तुमचा कब्जा सिध्द होईल आवश्यकता पडल्यास . या साठी तलाठी व तहसील कार्यालयाशी संपर्क साधा . फार्म no १४ आणि ७ ब च्या साम्क्षांकित प्रती स्वतः च्या file ला ठेवा . दर वर्षी चा ७/१२ स्वतः च्या file ला ठेवा.

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

माझ्या मामानी २०१० मध्ये वडिलोपार्जित मिळकतीबाबतचे माझ्या आई चे विना मोबदला हक्कसोड पत्र नोंदवून घेतले आहे. सादर विनामोबदला हक्कसोड पत्र कायदेशीर आहे का? माझ्या आईला ते रद्द करून घेता येईल का?
रजिस्टर / नोंदणीकृत हक्क्सोड पत्र असल्यास ते रद्द करायचे असल्यास दिवाणी न्यायालयात जावे लागेल .

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

पूर्वी ७/१२ उतार्यावर वारसांची नोंद करण्यात येत असे असे करताना घरातील मोठा मुलगा ह्याची फक्त नोंद कब्जेदार सदरी करण्यात येत असे व बाकीचे मुलीची नोंद इतर अधिकार सदरी करत असे . परंतु ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन सध्या दुय्यम निबंधकांकडे वाटप करताना इतर अधिकारातील वर्षांची नावे कायम ठेऊन चुच्कीचे वाटप करण्याची प्रथा चालू झाली आहे .इतर अधिकार सदरी असणाऱ्या व्यक्तींना संमतीसाठी बोलावले सुद्धा जात नाही आणि परस्पर वाटप केले जाते व इतर अधिकार कायम ठेऊन जमीन वाटप केले जात आहे. तरी अशी नोंद सुद्धा मंजूर केली जात आहे . यानुले वारसावर अन्याय होऊन लोक इतर अधिकार सदरी असलेल्या व्यक्तीचा हक्क डावलत आहे अशी समस्या सर्वत्र सुरु आहे .तरी आदरणीय अधिकारी मंडळास विनंती आहे कि हे थांबावे म्हणून काय उपाय करता येयील ? तसेच इतर अधिकार सदरी असलेले वारस भोग्वातदार सदरी आणण्याची प्रक्रिया कशी आहे किवा त्याबाबत एखादे परिपत्रक उपलब्द असल्यास site वर upload करावे आणि सर्व लोकांच्या शंका समाप्त कराव्या . तरी सर्व अधिकारी वर्गाने ह्या ह्या प्रशाबाबत योग्य असा सल्ला द्यावा आणि काही लोकांकडून होणारा दुरुपयोग थांबवावा ,कृपया विनंतीचा विचार व्हावा .
मुळातच बहिणीची / मुलींची नवे इतर अधिकारात ठेवणे चुकीचे व बेकायदेशीर आहे . हिंदू वारसा कायद्यानुसार , वडिलांचे मृत्य पश्चात जे वर्ग १ चे वारस आहेत , त्या मध्ये मुलींचा हि समावेश आहे. मुलींना हा मुलां इतकाच मिळकतीत हक्क आहे.
मुलींची नवेइतरहक्कात थेइन नोंद मंजूर करणे हे चुकीचेआहे. अश्या सर्व नोंद्चे , तहसीलदार यांनी म.ज.मअ १९६६ चेकलम १५५. खाली लेखन प्रमाद चूक , म्हणून दुरुस्त करणे आवश्यक आहे.
जिल्हाधिहारी स्तर वर , परिपत्रक काढून , अश्या सर्वनोंदी , दुरुस्त करून मुलींचीनवे, भोग्वातदार सादरी घेणे आवश्यक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,वडिलांच्या नावे वडिलोपार्जित शेतजमीन असल्यास,ते त्यांच्या इच्छेनुसार सदर जमीन तीनपैकी फक्त एका मुलास देऊ शकतात का?किंवा मुलांची संमती न घेता सदर जमिनीची ते विक्री करू शकतात का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
वडिलोपार्जीत जमिन ही ईतर वारसांना समान द्यावी लागेल.
एकाच मुलास दयायची असेल तर ईतर वारसांची संमती आवश्यक आहे.

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

सर
सर्वे ११२ पैकी ९ हिस्सा अरविंद व इतर व्यक्तीच्या नावे आहे परंतु सचिन नावाच्या व्यक्तीच्या कबज्या आहे सचिन याने २००९ साली ग्रामपंचायत अर्ज करून झोपडी आहे असे दाखवून घरपट्टी लावून घेतली तरी जमीन नावे नसताना ग्रामपंचायत घरपट्टी लागू करू शकते का
There is legal maxim
Quicquid plantatur solo, solo cedit-- Whatever is affixed to the soil belongs to the soil.
मात्र सदरचे तत्व हे भारतात लागू नाही . आपणाकडे , Dual -Ownership संकल्पना आहे . त्यामुळे जमीन एकाची व त्यावरील सौरांचना ( बांधकाम ) दुसर्याचे असू शकते .
ग्रामपंचायत अश्या घरावर घरपट्टी बसवू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर्व साधारणपणे कब्जा हा मालकी पाठोपाठ आला पाहिजे . ग्राम पंचायत उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून घरपट्टी आकारते . प्रताय्क्षात तेथे घर नसेल तर ग्राम पंचायत च्या निदर्शनास आणा . वयैक्तिक जागेवरील अतिक्रमण मात्र आपल्यालाच काढावे लागेल .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Adaraniy sir . माझ्या आईचे नाव मामाच्या उताऱ्यावर वारस म्हणून इतर अधिकारत आहे , ते कब्जेदार सदरी आनायचे असल्यास काय करावे , त्या अर्जाला कोणती कागदपत्रे जोडवी लागतील ?
एखाद्या ७/१२ उताऱ्यामध्ये काही महिला वारसांची नांवे इतर अधिकार मध्ये नोंदविण्यात आलेली आहे. त्यांची इतर अधिकारातील नांवे कब्जेदार सदरी दाखल करण्याकरीता कोणता शासन निर्णय अगर परिपत्रक अथवा अन्य काही तरतुदी आहेत काय?
महिला वारसदार आहेत . त्यांचे नाव कब्जेदार सदरी असणे आवश्यक . त्यासाठी शासन निर्णयाची गरज नाही . लेखन प्रमाद चूक दुरुस्ती कलाम 155 खाली तहसीलदार यांनी आदेश काढून करणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१) सातबारा मध्ये असणारा भोगवटादार या कॉलम मध्ये एखाद्याचे नाव ५० ते ८० वर्षापूर्वी कसे आले ते चेक कसे करावे किवा ते कोणत्या कागदपत्राची पूर्तता केल्यावर येते .

२) ८० वर्षापूर्वीचा एखादा फेरफार जर बरोबर दिसत नसेल आणि एखाद्याचे नाव याच फेरफार च्या आधारे चढले असेल तर फेरफार सोडून दुसरे कुठले कागदपत्रा चेक करू शकतो जेणेकरून सातबारात चढलेले नाव बरोबर आहे याची शाहनिशा करता येईल .

३) एखाद्याचे नाव 56 वर्षापूर्वी इतर हक्क मध्ये निगुन गेले असेल आणि तसा फेरफार ही आमच्याकडे आहे तर ते नाव सातबारा मधून कायमचे निगुन गेले पाहिजे कि नाही . पण आज रोजी ते नाव आमच्या भोगवटादार आणि इतर हक्क या कॉलम मध्ये कसे दिसते या वर कृपया मार्गदर्शन करावे .

४) इतर हक्क याचा अर्थ काय आहे
जुने चाक्बंदी ,जमाबंदी ,री सर्व्हे असे रेकॉर्ड तपासावे .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

१.जुने ७/१२ व फेरफार नोंदवही पहा.
२.फेरफार नोंदवही तील नोंदी वरून खात्री करता येयील
३.मुद्दा क्रमांक तीन चे बाबतीत कागदपत्रे पहिल्या नंतर अभिप्राय देणे योग्य आहे
४.इतर हक्क मध्ये कुल,कर्जाचा बोजा,किंवा संबंधित भूमापन क्रमांकावर इतर कुणाचा हक्क असल्यास त्याबाबर नोंद केली जाते.

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

Question by anand salve
07-05-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर, माझ्या वडिलांनी माझ्या नावे रजिस्टर मुतुपत्र केले आहे त्यामध्ये वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीला स्वकष्टित म्हटले आहे व ७ एकर जमिनीला ४ एकर म्हटले आहे व गावाचे नाव तालुका,झिला लिहिला आहे परंतु सर्वे न व गट नंबर टाकला नाही.७/१२ त्यांच्या नावानी आहे त्यांनी त्यांचा नंतर त्या जागेवर माझे नाव लावायला सांगितले आहे तर माझे नाव त्या जमिनीला लागू शकते का?
जर मृत्यापत्रात सर्वे नंबर नसेल तर , कोणती मिळकत आपणास त्यांनी दिली हे कसे लक्षात येणार ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सिटी सर्वे ऑफिस ने घराच्या जागेचा नकाशा कोणत्या कागदपत्राच्या आधारावर तयार केला याची माहिती मागविता येते का
दिनांक ३१/०३/२०१६ च्या महाराष्ट्र शासन राजापात्रानुसार शासकीय जमीन किवा नशुअल जमीन विक्री किवा हस्तांतर करण्याचे अधिकार कलेक्टर यांना देण्यात आले आहेत .त्यानुसार देवास्तान इनाम शेत जमिनेचे हस्तांतर किवा विक्री अधिकार देखील कलेक्टर यांना देण्यात आले आहेत का ?

Question by anand salve
06-05-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर, माझ्या प्रश्नाची उत्तर दिल्याबद्दल आपले धन्यवाद . माझ्या वडिलांनी माझ्या नावे रजिस्टर मुतुपत्र केले आहे त्यामध्ये वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीला स्वकष्टित म्हटले आहे व ७ एकर जमिनीला ४ एकर म्हटले आहे व गावाचे नाव तालुका,झिला लिहिला आहे परंतु सर्वे न व गट नंबर टाकला नाही.७/१२ त्यांच्या नावानी आहे त्यांनी त्यांचा नंतर त्या जागेवर माझे नाव लावायला सांगितले आहे तर माझे नाव त्या जमिनीला लागू शकते का? त्या चुक्या मी दुरुस्त करू शकतो का ? काही उपाय सांगा?
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम १९(1) अंतर्गत प्राप्त झालेली अपिल आपल्या प्राधिकरणाशी संबधित नसेल तर संबधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करता येईल काय ? कृपया कलम सांगावे.
याच site वर अपलोड केलेला R T I संबंधित G R वाचवा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर अनिवासी भारतीय व्यक्तीला महाराष्ट्रात शेत जमीन घ्यायची असल्यास त्याला काय करावे लागेल त्याच्या वडीलांच्या नावे महाराष्ट्रात शेत जमीन असल्याचे त्याचे म्हणणे आहे त्याला काही प्रक्रिया असल्यास सांगावी .
कुल वहिवाट कायद्यानुसार शेत जमीन घेणारी व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे अन्यथा अशा व्यक्तीस शेत जमीन घेत येत नाही.

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

आदरणीय सर,
माझ्या आजीचा मूत्यू सन १९९५ ते ९६ च्या दरम्यान झाला आहे पण त्यांचा मुत्युचा दाखला नाही कारण त्याची नोंद कोठेही नाही तर नोंद मिळवण्यासाठी काय करावे लागेल ?

माझ्या चुलत्यांनी नकली मुत्युचा दाखला क्षेरोक्स लावली व त्याच्या मूत्यू दिनांक २/१/२०१३ रोजी दाखवला आहे व त्याच्या खाली वारस नोंद लावली आहे . हे कायद्याने चुकेचे आहे तरी वारस नोंद फेरफार रद्द करण्यासाठी काय करावे
कृपया मार्गदर्शन करावे
चुलत्यांनी लावलेला मुत्युचा दाखला खोटा आहे हे सिध्द करण्यासाठी तुमच्याकडे खरा दाखला असावा. तुम्ही चुल्त्याविरुध्ह फौजदारी गुन्हा दाखल करू शकता. दाखला नसेल तर इतर कागद पत्रांवरून ते सिध्द करावे लागेल. फेरफार रद्द करण्यासाठी प्रांताकडे अपील करावे लागेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by पाठक
04-05-2016
ymm6339@gmail.com

आदरणीय सर, कांबळे यांना 1 गुंठा जमीन विकायची आहे व त्यास पैशाची फार गरज आहे. मी संगितले की कागदपत्रे असल्याशिवाय मी काही घेणार नाही. फारच हाता-पाया पडल्यावर कागदपत्रे देवून काहीही करा पण माझा गुंठा घेवून माला पैसे द्या असे सांगून कांबळे निघून गेला. कागदपत्रे तपासल्यावर लक्षात आले की जमीन गुंठेवरी मध्ये आहे व महानगर्पालिके कडून बिगर शेती परवाना घेतलेला आहे. परंतु अजून कलेक्टर कडून बिनशेती आदेश घेतला नाही व 7/12 वर नावही नाही. म्हणून जागेची खरेदी होत नाही. फारच जबरदस्ती केल्यानंनातर मी त्याला नोटरी खरेदीपूर्व करार नोटरी करून 2 लाख दिले. काही दिवसांनी मी 7/12 वर कांबळे चे नाव लावलेनंतर उरलेले 2 लाख देवून जागा खरेदी करन्याचे ठरले. मी सावध राहून 2 लाख रूपयांचा बँकेचा चेक दिला. त्याने बँकेतून पैसे काढून घेतले. मी त्याच्या जागेवर त्याचे नाव 7/12 वर लावून घेतले. नंतर मी त्याला ठरलेला व्यवहार पूर्ण करण्यासाठी निबंधक कार्यालयात येउन सही करण्यास संगितले. आता तो साफ नकार देत आहे. म्हणतो तुम्ही देत असलेला दर फार कमी आहे व नोटरी खरेदिपूर्व करार ला काही महत्व नाही. पैसे वाढवून द्या असे म्हणून फारच जास्त पैसे मागत आहे. त्याचे जागेची मूळ कागदपत्रे, नोटरी केलेले कागदपत्रे, बँकेतून पैसे काढलेला पुरावा (चेक चे झेरॉक्स) माझ्याकडे आहे. मी त्याला कोर्टात खेचतो असे म्हटल्यावर आता तो म्हणतो मी ही 1 गुंठा जमीन दुसर्‍यास विकतो तुम्ही कोर्ट-कचेरी करत बसा, नोटरी ला काही महत्व नाही. मी त्याला म्हटले नोटरी का केली तर तुझे नाव 7/12 वर न्हवते म्हणून आता निबंधक कार्यालयात करार व खरेदी होते पण तू बदललास. नोटरी केलेल्या खरेदीपूर्व करार मध्ये जागेचा दर निश्चित केलेला आहे. The Specific Relief Act खाली दावा दाखल करून न्यायालयाकडून खरेदी करून देण्याबाबत कांबळे ला आदेश देवू शकतो का ? कृपया मार्गदर्शन करावे.
नोटरी खरेदीपूर्व कराराला कायद्यात किमत नाही. जमीन गुंठेवरी मध्ये आहे, कलेक्टर कडून बिनशेती आदेश घेतला नाही तर त्याच्या जागेवर त्याचे नाव 7/12 वर कसे लावून घेतले? तुम्ही The Specific Relief Act खाली दावा दाखल करून न्यायालयाकडून खरेदी करून देण्याबाबत कांबळे ला आदेश देण्याचा प्रयत्न करू शकता

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by anand salve
04-05-2016
salveanand89@gmail.com

नमस्कार सर , माझ्या वडिलांनी माझ्या नावे रजिस्टर मुतुपत्र केले आहे .त्या नुसार मी आमच्या गावी तलाठी कडे माझ्या वडिलाच्या नावे असलेल्या जमिनीच्या ७/१२ वर माझे नाव दाखल करण्यासाठी अर्ज केला होता.तलाठी नि माझ्या घरच्या लोकांना नोटीसा सुद्धा पाठवल्या.त्यांनी त्याला हरकती घेतल्या व वारस नोंद साठी अर्ज दाखल केला.तलाठी नि वारस नोंद नुसार सगळ्याचे नाव लावले.पण मुर्तुपत्र नुसार माझ्या एकट्याचे नाव लावले नाही व मला म्हणाला तुम्ही पुन्ह्या अर्ज करा त्या नंतर तहसीलदार कडे तुमची केस चालेल व तहसीलदार त्यावर निर्णय देइल.तलाठी ची हि कारवाई योग्य आहे का ? आता मी काय करू ?तहसीलदार त्यावर काय निर्णय देइल?
तलाठी ची हि कारवाई योग्य आहे कि नाही हे कागदपत्र पाहिल्यानंतरच सांगता येईल . तुम्ही त्या फेरफार विरुद्ध प्रांत कडे अपील करू शकता

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नवीन गावठाण विस्तार मधील मिळालेला प्लॉट ला १५ वर्षे झाले आहे सदर प्लॉट विकता येतो का त्यास विक्रीस परवानगी मिळते का कोणाकडून परवानगी घ्यावी
गावठाण विस्तार योजनेतील भूखंड प्रांत अधिकारी यांचेकडून प्रदान ( Grant ) केले जातात त्यामुळे , हस्तांतरास परवानगी देण्याचे अधिकार हि त्यांनाच आहेत .
आपण प्रांत अधिकारी यांची परवानगी घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

tahsildar कार्यालयात चौकशी करावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मी १९९५ मधे चिपळूणमधे १ फ्लॅट खरेदी केला. साठेखत केले व खरेदीखत करणे राहून गेले. माझ्याकडे पझेशन लेटर आहे. त्या आधारावर बॅंकेकडून कर्ज घेतले व कागदपत्रे बॅंकेच्या ताब्यात दिले. नोकरीतून निवृत्त झाल्यावर चिपळूणमधे कायम वास्तव्यास रहाण्याचे ठरवले. बॅंकेचे कर्ज फेडून कागदपत्रे ताब्यात घेतली. नगरपरिषदेत फ्लॅटनावावर करण्यास गेल्यावर खरेदी खत न केल्याचे लक्षात आले. आता सोसायटी रजिस्टर झालेली असून असेसमेंट चेअरमन सोसायटीच्या नावाने होत आहे. माझे नाव भोगवटदार म्हणून नोंदलेले आहे. परंतू मालक म्हणून नोंद होण्यासाठी खरेदीखत आवश्यक असल्याचे नगरपालीका कार्यालयातून सांगण्यात आले. तसेच खरेदीच्यावेळी रीतसर स्टॅंपड्युटी भरलेली असल्याने फक्त रू.100/- च्या स्टॅंप पेपरवर सोसायटीच्या चेअरमन सोबत खरेदीखत करावे असे सांगण्यात आले. चेअरमन असे खरेदीखत सही करण्यास तयार नाही. अशा परीस्थितीत काय करावे?
दिवाणी न्यायालयात दाद मागावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मरण पावलेल्या व्यक्तीने मृतुपत्र तयार करून ठेवल्यास त्यांच्या वारसांना हिंदू वारस कायदा १९२५ प्रमाणे हिस्सा मिळतो कि हिंदू विल्स कायदा प्रमाणे हिस्सा मिळतो. हिंदू वारसा कायदा व हिंदू मृतुपत्र कायदा या दोन भिन्न व्याख्या आहे काय ?
याच site वर अपलोड केलेला वारस कायदे आणि मृत्यू पत्र संबंधित माझा लेख वाचवा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

१)आम्ही आमचे आजोबा वारले . तेव्हा तलात्याकडे वारस नोंद लावण्याकरता अपित्युत करून दिली .३ महिने जाले तरी वारस नोंद झाली नाय .त्यांना विचारले असता ते म्हणाले .वारस नोंद online करतात त्यामुळे वेळ लागत आहे .२) तर आता आमची आजी वरल्या आहेत .ते जे अपितुत बनवले आहे त्याच्या मध्ये आजीचे जिवंत असताना नाव लावले होते.तर काय करावा लाघेल
संगणीकरणाचे काम चालू आहे. थोडा वेळ लागेल. तलाठी कडे अर्ज देऊन पोहोच घेउन ठेवा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.31 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3444
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3