जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by किरण काळे
30-12-2016
kkale40@gmail.com
आदरणीय सर ,
नवीन शर्तींच्या जमिनीच्या खरीदी नंतर झालेला शर्तभंग नियमाकूल करणेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते .पिलीज याची माहिती द्यावी
शर्थ भंग नियमानुकूल होईलच असे नाही . कश्या प्रकारचा शर्थ भंग आहे त्यावर आवलंबून आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहित
30-12-2016
patil06rohit@gmail.com
माझ्या आजोबांना त्यांच्या पहिल्या बायकोपासून एक मुलगी होती(मयत -२०१४). ती लहान असतानाच आजोबांच्या पहिल्या पत्नी चा मृत्यू झाला. मुलीच्या संगोपनासाठी आजोबांनी माझ्या आजीसोबत(वडिलांची आई) दुसरे लग्न केले . वडिलांना अजून २ भाऊ व ३ बहिणी आहेत(आजोबांची एकूण मुले- ७)
वरील पैकी वडिलांच्या एका छोट्या बहिणीचा विवाह हा १९९७ साली झाला आहे आणि उर्वरित सर्वांचे विवाह हे १९९४ पूर्वी झाले आहेत. आजच्या घडीला माझे आजोबा, आजी तसेच वडिलांची सावत्र बहीण हे हयात नाहीत. आजोबा तसेच आजी पैकी कोणीही मृत्युपत्र/ बक्षीसपत्र इत्यादी काहीही केलेले नाही.
आजोबांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आधी नमूद केलेल्या सर्व भावंडाशिवाय, आजोबांच्या एका बहिणीचे ( हयात आहे) तसेच एका भाच्याचे (आजोबांच्या दुसऱ्या बहिणीचा मुलगा ) नाव आहे.
तरी आज रोजी आजोबांच्या वडिलोपार्जीत मालमत्तेचे वाटप करायचे असल्यास किती व कसे हिस्से करावे लागतील?
वडिलांच्या सावत्र बहिणीच्या वारसांनी एकूण मालमत्तेच्या अर्ध्या हिस्स्याची मागणी करणे कायदेशीर आहे का?
आपण कथन केल्यानुसार , जर ७/१२ सादरी आजोबांच्या बहिणीचे व दुसऱ्या बहिणीच्या मुलाचे नाव आहे म्हणजे , मिळकत एकट्या आजोबांच्या मालकीची नाही . त्यामुळे आजोबांना एकूण क्षेत्रातील १/३ हिस्सा मिळेल . सध्या आजोबा हयात नाहीत . आजोबांना आपली सावत्र आत्या धरून ७ अपत्ये होती . सावत्र आत्या मयत आहे . सावत्र अत्याचा विवाह झाला होता का? तिला अपत्ये आहेत का ?
आजोबांना मिळणाऱ्या १/३ हिस्स्या पैकी आत्याला वारस आहेत असे समजले तर , आजोबांचे सर्व अपत्यांना , १/३ * १/७ = १/२१ हिस्सा मिळेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
29-12-2016
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, आमचे आईचे नावे ६० आर जमीन आहे. सदरची जमीन ७ भावाचे हिस्से मध्ये समान वाटून घ्यावयाची आहे. तुकडेबंदी कायद्यानुसार काही अडचण येऊ शकते काय ?
हि जमीन jr रहिवासी/ औद्योगिक क्षेत्रात /झोन मध्ये असल्यास अडचण नाही
मात्र नसल्यास , जमीन वरकस अथवा एकपिकी असल्यास ६०/७= ८.५ R क्षेत्र प्रत्येकाचे वाट्यास येईल . त्यामुळे तुकडा निर्माण होईल .वाटप करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल वाटखेडे
29-12-2016
rahulwatkhede876@gmail.com
सर,मी ६४% अपंग आहो मी ग्रामपंचायत च्या जागेवर २००३ साली बांधकाम केल, खाली जागेवर ३०० रु. महिन्याने. पण मी आजपर्यंत १ हि महिन्याचे पैसे दिले नाही, ग्रामपंचायत माझ्या जागेवर सील लावण्याचा notice पाठवीत आहे.मी अपंग असल्यामुळे माझी परीस्थिती थकीत पैसे भरण्याची नाही आहे.तरी मी अपंग असल्यामुळे शासन ती जागा माझ्या नावावर करू शकते का? कृपया याची माहिती द्यावी हि विनंती
Question by रवींद्र
28-12-2016
ravindrakhekade@gmail.com
मा.सर
सर आमचे गावामध्ये सन १९७१-१९७२ मध्ये सिंचन तलाव तयार झालेला आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करण्यात आलेली आहे.तलाव पूर्ण झालेनंतर जवळपास ४०-५० हेक्टर जमीन शिल्लक राहीलेली आहे.अतिरिक्त जमीनीचा वापर ३ वर्षात होऊ शकला नाही व पुढील १० वर्षात होणार नसेल तर त्या अतिरिक्त जमिनी जिल्हाधिकारी यांचेकडे सुयोग्य मोबदला घेऊन वर्ग करणेबाबत चा म.शा.प.दि.२६/०७/२००२ मध्ये नमूद केलेले आहे.
सदर जमीन १९७१-१९७२ मध्ये संपादित केली त्यावेळी मूळ मालक अन्य व्यक्ती होत्या पण सन १९८५ पासून ०१ हे.60 आर जमिनीवर वहीती माझे आईची आहे आहे व सन १९९५ पासून सदर जमिच्या पाटबंधारे विभागाकडून वार्षिक करार नाम्यानुसार पावत्या व करारनामे माझेआईकडे आहेत.सदर जमिनीला लागून नदी असल्याने नदीमुळे अतिरिक्त जमीन तयार झाली असून ति 60 आर चे आसपास आहे सन २०१० पासून माझी आई एकूण ०२.हे २० आर जमीनिची वहीती पाटबंधारे विभागाकडून वार्षिक करार नाम्यानुसार पावत्या व करारनामे करून वहीती करीत आहे.
वरील पद्धतीने माझे आई कडे जमीन वाहितीत आहे.म.ज.म.अ.१९६६ चे खंड 1 मधील प्रकरण ३ मधील भाग तीन मधील नियम १० ते २१ प्रमाणे माझी आई मा.तहसीलदार यांचे मार्फत जमीन मिळणे बाबत अर्ज सादर करू शकेल काय आणि जमीन ७ किव्वा १२ प्रमाणे मिळू शकेल काय.तसेच सादर जमीन देणे बाबतचे अधिकार कोणाला आहेत.कृपया याबाबत मार्गदर्शन होनेस विनंती आहे
Question by शुभांगी राजाराम सरोदे
28-12-2016
tastahsildar@gmail.com
कु का क 32 एम नूसार मिळालेली जमीन ही दि 28/12/15 रोजी कूळाच्या वारसांनी पतीने पत्नीस व दिराने भावाची बायकोस जमीन 40 पट आकाराची रक्कम न भरता विक्री केली आहे. सदरचा व्यवहार कुटंबात झाला असलेने शर्तभंग होतो किंवा कसे नसल्यास त्याबाबतची तरतूद कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
Question by साठे दीपक
28-12-2016
sathe.dipak@gmail.com
तुकडेबंदी कायद्यानुसार एखादी खरेदी रद्द झाली असल्यास , सदरची जमीन त्या जमिनीमधील जुन्या मूळ वारसापैकी एखादा वारस दंड भरून जमीन परत घेऊ शकतो का ?
Question by Rahul wankhede
28-12-2016
Rpwankhede@rediffmail.com
Sir please make available all old material and post of recent documents section
Question by शिवाजीराजे
27-12-2016
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरण पाणबुडे साहेब , नमस्कार मी विचारलेल्या प्रश्नाचे योग्य मार्गदर्शन आपल्याकडून मिळाले त्याबद्दल प्रथमतः मी आपला आभारी आहे. दिनांक ०७/१२/२०१६ रोजी विचारलेल्या प्रश्नाबाबत कृपया मला मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
Question by संतोष मोरे
27-12-2016
santoshpmore9@gmail.com
३५ वर्षांपूर्वी झालेली खरेदी जर तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करणारी असेल तर तक्रार झालेनंतर सादर खरेदी व्यहारावर कायदेशीर कारवाई होईल काय ?
Question by नरेंद्र पाटील अलीबाग रायगड
27-12-2016
ngpatil@rcfltd.com
महोदय साहेब आमची वडिलोपार्जितची शेतजमीन आहे.दोन सातबारा आहेत एकाचे क्षेत्र 0.10.0 व दुसर्याचे 0.25.5 क्षेत्र सदरची शेतं दोन भावामध्ये वाटप करून घ्यायची आहेत.तर तसे करता येतील का? की तुकडे बंदी नियम लागु होईल. भावाभावा मध्ये आजिबात पटत नाही.मला माझ्या हिस्साची शेतजमीन विकसित करावयाची आहे.कृपया आपण मार्गदर्शन करावे.
Question by suresh mohite
27-12-2016
suresh.mohite73@gmail.com
mi dusarya gavat 4guntha jaga gheun grampanchyayatichya parvangine ghar bandhal tar pudhe sarkari niyamanusar kay karave lagel plg mala salla dya hi vinanti
Question by शिवाजीराजे
27-12-2016
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरण पाणबुडे साहेब नमस्कार,
आमची गावठाणात वडिलोपार्जित स्वमालकी वहिवाटीची जागा आहे. ती आमच्या पंजोबानी १८७३ साली बाबर याला स्टॅम्प वर लिहून भाड्याने दिली तो स्टॅम्प आमच्याकडे आहे. तो निघून गेल्यावर ती जागा आमच्या आजोबानी रामा शिंदे याला भाड्याने दिली तो भाडेपट्टा आमचे जवळ नाही. त्याने त्या जागेवर ग्रामपंचायत ला १९२२ साली ४३ x ४३ घर अशी त्याच्या नावावर नोंद केली. त्याची माहिती आम्हाला न्हवती. पुढे तो वारला त्यानंतर त्याच्या मुलाची नोंद त्या जागेला लावून घेतली. तो १९७० साली नोकरीवर निघून गेला त्यावेळी त्याने त्याचे घराचा पत्रा कडून न्हेला व आम्हाला तोंडी सांगितले कि तुमची जागा तुमच्या ताब्यात घ्या. नंतर आम्ही ती जागा १९७१ ते १९८० या सालात कुलकर्णी याना भाड्याने दिली त्याच्या स्टॅम्पची झेरॉक्स आमच्याकडे आहे, व १९८० साली जागा सोडतानाच ओरिजनल स्टॅम्प आमच्याकडे आहे कि तुमची जागा तुमच्या ताब्यात दिली म्हणून .
१९९० साली आमच्याकडे असणारे वरील दोन स्टॅम्प दाखवून आम्ही आमच्या घराचे दक्षिण बाजूच्या खुल्या जागेला ग्रामपंचायतीला ६५ x ८५ मोजमापाचीं खुली जागा अशी नोंद करून घेतली. १९९५ साली सिटी सर्वे झाला त्यावेळी त्यांचे कोणीही हजर न्हवते आमचे वडील हजर होते त्यांनी वरील स्टॅम्प दाखवून आमच्या नावाची नोंद सिटी सर्वे ला करून घेतली. शिंदे यांच्या उताऱ्या बाबत विचारले असता वडिलांनी त्यांना सांगितले कि ते भाडेकरू होते. मग सिटी सर्वे साहेबानी आमची नोंद जागेला करताना शेरा मारला कि शिंदे यांच्या वहिवाटीबाबत माहिती सांगतात ते भाड्याने राहत होते असा शेरा मारला.
पुढे आमच्या वडिलांनी ती जागा २० वर्षाच्या कराराने २००७ साली रिलायन्स tower ला भाड्याने दिली आहे.
शिंदे यांच्या वारसांच्या नावाची नोंद ग्रामपंचायतीला अजूनही पडीक जागा ४३ x ४३ अशी आहे पण त्यांचा मिळकत नंबर वेगळा आहे व आमच्या जागेचा मिळकत नंबर वेगळा असून मोजमाप ६५ x ८५ असे आहे.
आता शिंदे यांच्या वारसांनी त्यांच्या व त्यांच्या वारसांच्या नावांची नोंद असलेले उतारे २००८ साली काढले व २०१५ साली सिटी सेर्वेला साधे पत्रं लिहिले आमची नोंद करावी म्हणून मग सिटी सर्वे ने त्या पत्राला उत्तर म्हणून तुम्ही योग्य कारणांच्या विलंब माफी अर्जासह अपील दाखल करावे असे पत्र पाठवले. त्या नुसार त्यांनी आम्ही सर्विस मुळे बाहेर होतो असे सांगून विलंब माफी अर्ज केला व अपील दाखल केले आहे तर त्यांचा विलंब माफ होईल का ? त्यांचे अपील चालेल का ?
अपील दाखल करताना त्यांनी आमचे वडील हयात असताना मयत वारस म्हणून आमच्या मोठ्या भावांच्या नावे नोटिसा काढल्यात ते चालेल का ? आम्हाला काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
Question by अमोल HARGUDE
26-12-2016
amolhargude00@gmail.com
सर हि मिळकत वडिलोपार्जित आहे आमच्याकडे १९२१ चा एक कागद आहे त्यावर असे लिहले आहे की लेखी कबुली आपापसात वाटणी व तलाठीची सही आहे. त्यावर आमच्या चुलत आजोबाचे नाव कासे लागले त्या नंतर १९४५च्या सातबारा व फाळणी बार आहे त्यावर आमच्या चुलत आजोबाचे नावावर कशी आली याचा फेरफार किंवा सातबारा नाही . आजोबा किंवा पजोबा व खापरपजोबा यांच्या नावचा कुठेही उल्लेख नाही चुलत आजोबा नावावर कशी आली हे समजात नाही हि मिळकत वडिलोपार्जित आहे आमची नावं लावण्यासाठी काय कराव्या लागेल. चुलत आजोबा नावावर कशी आली याचा फेरफार आम्हाला मिळत नाही तहसीलदार ऑफिसस मध्य आम्हाला १९२१चा एक कागद व त्यनंतर १९४५मधील सातबार व कही फेरफार मिळले परतु १९२१ ते १९४४ यां काळाती एक ही कागद किवां त्या आधिचा कागदपत्र तहसीलदार ऑफिसस मध्ये नाही असे सागितले आहे. तर मूळ कागदपत्र कुठे मिळतील
Question by प्रदीप बोरले
26-12-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,
भूमिहीन व्यक्तीला शेतजमीन खरेदी करावयाची असल्यास त्याला कोणाची परवानगी घ्यावी लागेल.परवानगी मिळण्याबाबत काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन करावे.
Question by राहुल सावंत
26-12-2016
rahul9619309796@gmail.com
साहेब नमस्कार ,
मी राहुल सावंत माझ्या मावस भावाला बदलापूर -ठाणे जिल्हा, येथे गावठाण मध्ये चाळ टाईप मध्ये रूम घ्यायचा आहे. तरी बिल्डरने सांगितले आहे कि मी ग्रामपंचायतची रीतसर परवानगी घेऊन सदर चाळीचे बांधकाम केलेले आहे . करारनामा नोटरी करून देणार आहे, जमीन मालकाशी बांधकाम करण्याचा करार केलेला आहे, सदर रूम विकत घेतल्यावर ग्रामपंचायत मधून घर पावती माझ्या भावाच्या नवे येईल असे बिल्डरने सांगितले आहे . सदर चाळीतील रूम माझ्या भावाने घेणे योग्य आहे काय ? बिल्डर व माझा मावस भाऊ यांच्या मध्ये करारनामा नोटरी असल्या मुळे भविष्यात त्याला काही अडचणी येऊ शकतात काय ? तरी साहेब मला आपण योग्य ते मार्गदर्शन करावे हीच नम्र विंनती
Question by अभिजित य पाटील
25-12-2016
abhijit_y_patil@yahoo.co.in
सर नमस्कार
एक वडिलोपार्जित सामायिक मिळकतीचा फेरफार नोंदवितानाच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे अफ़रातफ़रीच्या व आक्षेपार्ह्य गोष्ठी घडल्या आहेत.
१. फेरफार नोंदवल्या नंतरच्या नोटीसवर ज्या लाभार्थी व्यक्तीने सही केली आहे ती व्यक्ती फेरफार नोंदवण्याचा दोन दिवस आधीच परदेशी निघून गेली होती. (पासपोर्ट वरील नोंद पुरावा म्हणून दुसऱ्या एका महसूल प्रकरणात दाखल आहे). म्हणजेच प्रत्यक्षात तलाठी यांनी फेरफार आधी नोंदवलाय मात्र तारीख पुढची टाकली आहे.
२. लाभार्थी व्यक्तीने केलेल्या अर्जावरील कोर्ट फी स्टॅम्प वर फेरफार नोंदवल्याच्या तीन दिवस नंतरची तारीख आहे. म्हणजे फेरफाराचा अर्ज फेरफार नोंदवल्याच्या तीन दिवस नंतर केला आहे.
३. अर्जावर सादर केल्याची व स्वीकारल्याची तारीख नाही. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची नोंद रीकामी आहे.
४. मिळकती बाबत फेरफारात माझ्यावर अन्याय करणाऱ्या चुकीच्या नोंदी केल्या आहेत.
या बाबत तेहसीलदार यांचेकडे लेखी तक्रार करून पाठपुरावा केल्यावर त्यांनी तलाठी यांचेकडून स्पष्टीकरण अहवाल मागितला आहे. फेरफार अजून मंजूर होणे बाकी आहे. चुकीच्या नोंदी असणारा फेरफार होऊन देणे व त्याबाबत नंतर RTS अपील भांडत बसणे मला टाळायचे आहे. तरी या प्रकरणात
१. फेरफार नोंदणी प्रक्रियेचे योग्य पालन झाले नाही म्हणून फेरफार रद्द करण्यासाठी काय करावे लागेल?
२. किंवा कोणत्या मार्गाने फेरफार मंजूर होण्याआधीच रद्द करता येईल?
(माझ्या मिळकतीचा हक्क माझ्यासाठी महत्वाचा आहे. तलाठी यांचेवर कारवाई होणे किंवा न होणे माझ्यासाठी गौण आहे.)
कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद
Question by अभिजित य पाटील
25-12-2016
abhijit_y_patil@yahoo.co.in
सर नमस्कार व आपण आधीच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराबद्दल धन्यवाद
महसूल न्यालयालयाच्या निर्णयाचा अंमल सातबारा वर येण्या पूर्वी ६० दिवसांचा अपील कालावधी जावा लागतो हे खरे आहे का?
धन्यवाद
Question by गणेश शिंदे
17-12-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,कु.का.क.४३ ची जमीन ,साऱ्याची ...पट रक्कम भरून भोगवटादार वर्ग १ झाली आहे.सदर जमीन आता रहिवासी झोनमध्ये आहे.तसेच म.न.पा.हद्दीमध्ये आहे.तरी सदर जमीन बिनशेती करणेकामी आता चालू बाजारभावाच्या ५० टक्के नजराणा रक्कम भारवी लागते का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती......
Question by गोरोबा पवार
17-12-2016
gorobap@gmail.com
पूर्वी पाटीलकी म्हणून एका व्यक्तीला ४० एकर जमीन मिळाली आहे. तो व्यक्ती आदिवासी समाजापैकी आहे. पैकी २० एकर जमीन बिगर आदीवासी व्यक्तीला विकली आहे. सदरचा व्यवहार १९७१, १९७२, १९७३ ला म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व कुळवहिवाट कायदा सुधारणा कायदा १९७४ अगोदर विकली आहे. आता त्या व्यक्तीच्या वारसांनी अर्ज दाखल केला आहे कि सदर च्या विक्री व्यवहारामध्ये शासनाची मान्यता घेतली नाही. तर त्या व्यवहार साठी बिगर आदिवासी व्यक्तीला हस्तांतरण करणेसाठी शासनाच्या पूर्वमान्यतेची अवश्यकतेचा मुद्दा विचारात घ्यावा लागेल काय ?
Question by amol ahire
17-12-2016
amolahire585@gmail.com
sir maze panjoba Mavashi kade dattak ale hote alyavar mavashila mulga zala tyani mazaya panjoba la estate dili nahi tya nanatar panjoba ne vikat jamin gheun tyach gavala sthakai zale.. Tar mazya panjoba agodarchya gavi jamin hoti panjoba natar maze baba varas lagale ti jamin 112 acre hoti ti padit rahili amhala mahit nawate tar ti sarkar jama zali 2003 paryant mazaya babache nav utaryavar hote ti jamin bhogvatdar 1 khalasa jamin hoti at ti jamin milwayala kay karave lagel.... Sir krupaya margdarshan karave sir please reply me.
Question by amol अहिरे
16-12-2016
amolahire585@gmail.com
Sir apache VADILOPARJIT jamin sarkar जमा zali ahe kay karave lagel
Question by प्रदीप बोरले
16-12-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,
एका व्यक्तीला एका गावामध्ये १.६२ हे आर सिलिंगची जमीन मिळाली.ती व्यक्ती मयत झाली.तिला वारस दोन मुले असून त्याचे नावे ७/१२ ला लागली आहे.त्या मुलांना आपसी वाटणी करून जमीन स्वतंत्र पणे आपले नावे करून जमिनीची स्वतंत्रपणे वहिवाट करावयाची आहे.जमीन स्वतंत्रपणे वेगळी करता येईल काय? कृपया मार्गदर्शन करावे.
महाराष्ट्र शेतजमीन ( कमाल मर्यादा धारणा )कायदा १९६१ च्या कलम २९ ब प्रमाणे अतिरिक्त झालेली जमीन वाटप केली असल्यास ,अश्या जमिनीची विभाजन , जिल्हाधिकारी यांचे परवानगीशिवाय करता येत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
16-12-2016
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
आमच्या सामाईक जमिनीमध्ये चार खातेक्रमांक आहेत , पण प्रत्यक्षात मात्र आम्हीच जमीन कसून पीक घेतो . पण सातबारा च्या मागे मात्र खुद्ध असे लिहिलेले आहे . तर फक्त आमचेच खातेक्रमांकाला फक्त पीक पाहणीवर नोंद कशी येईल , या साठी कोणाला भेटावे किंवा कोणती कागतपत्रे लागतील किंवा पीक पाहणीचा स्वतंत्र दाखला मिळतो का
आपले प्रश्नावरून सामायिक जमीन , आपण कसत आहेत . मात्र पीक पाहणी सदरी आपले एकट्याचेच नाव दाखल नाही . आपणास केवळ आपले नाव पीक पाहणी/पाणी सादरी लावण्याचे आहे .
पीक पाणी सादरी नाव लावणे बाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुव्यवस्थित ठेवणे ) नियम १९७१ च्या नियम ३० व ३१ मध्ये कार्यपद्धती दिली आहे .
नियम ३१ प्रमाणे , अधिकार अभिलेख या परिमाणे ज्या व्यक्तीने जमीन कसणे आवश्यक आहे , त्या व्यक्ती शिवाय अन्य व्यक्ती जमीन कसत असल्यास त्याचे नाव पीक पाहणी सादरी लावण्याची कार्यपद्धती दिली आहे . मात्र अश्या अन्य व्यक्तीने दुसऱ्याची जमीन कायदेशीर रित्या कसण्यासाठी घेतलेली असावी .
कायदेशीर रित्या कसणे म्हणजे , भाडेपट्ट्याने जमीन दिलेली असणे / कसण्याबाबत बाबत लेखी संमती असणे , अथवा आपण जमीन कसत आहेत , हे जमीन मालक यांना माहित आहे व ए आपण कडून कासवणुकीबाबत , जमिनीतील उत्पन्नाचा हिस्सा दरवर्षी मोबदला म्हणून घेत आहेत .
आपण जर अनाधिकारे जमीन कसत असाल तर , केवळ आपले एकट्याचे नाव पीक पाणी सदरी लागू शकणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by साठे दीपक
15-12-2016
sathe.dipak@gmail.com
तलाठी स्तरावर एखाद्या गटाची फोड करून वेगळा ७/१२ केला असेल तर तो योग्य व कायदेशीर ठरतो का?. सदरच्या गटाची फोड फेरफार करणे अगोदर केलेली आहे त्यामुळे सदरचा ७/१२ कायदेशीर कामासाठी वापरता येईल का ?
महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडेजोड कायदा १९६१ च्या कलम ३१ अन्वये गटाची विभागणी /फोड जिल्हाधिकारी यांचे परवानगीशिवाय करता येत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
