जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by विनोदसिंग राजपूत
29-04-2016
sonurajput113.sr@gmail.com
माझ्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये आम्हाला अधिकार मिळाला नाही. वडिलांचे खोटे हक्कसोड पत्र चुलत्याने तयार केले.त्यामुळे आता ७/१२ ला आमचे नाव नाही.पण जमीन आजही आमच्या ताब्यात असून हक्क आम्ही सोडलेला नाही. टी मी कसतो आहे. तरी आपण मला जमीन परत मिळवण्यासाठी काय करावे ते सांगावे.
हक्कासोद्पात्र खोटे होते आणि तुमचा ताबा आहे सिद्ध करून दिवाणी न्यायालयातून जमीन मिळवता येयील.
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by सतीश आव्हाड
29-04-2016
s.avhad124@gmail.com
आदरणीय सर दुय्यम निबंधकांकडे खोटी कागदपत्रे जोडून मामाने दस्त तयार केला आहे .त्याविरुद्ध नोंदणी अधिकारी दुय्यम निबंधकांकडे तक्रार दाखल करता येते का ? दुय्यम निबंडक नोंदणी अधिनियम ८२ नुसार कोणती कार्यवाही करू शकतात ?
दस्त नोंदणीकृत असेल तर तो रद्द करण्या साठी दिवाणी न्यायालयात जावे लागेल.
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by bhaurav kekan
28-04-2016
bhaukkd84@gmail.com
Adaraniy पानबुडे सर अगोदारच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल आभारी अपन date 17 एप्रिल ला दिलेल्या उत्तरप्रमाने माझी आई ही वारस आहे व् वारस म्हणून तिचे नाव रिकॉर्ड ऑफ़ राईट ला इतर अधिकारत दाखल आहे, आईचा आक्षेप वाटपाल आहे , कारण मामने काही आर्थिक देवघेव 5लाख रुपये आइकडून 1998 साली घेतले होते, तेव्हा मामचे अणि आईचे सम्बन्ध चांगले होते ,आज रोजी अनेक टाळाटाळ करुन मामने पैसे बुडविल्यातच जमा आहे, तरी ते पैसे परत मिळवण्यासाठी आई भावमधे वाटप हिस्सा मागणी करात आहे , पण त्यानी आईचे नाव इतर अधिकार सदरी कायम ठेवून आपपसत वाटप केले आहे ,,,,, हे वाटप योग्य आहे का? आईने यावर तलाठी कड़े आक्षेप घेतला आहे, नोंद प्रमाणित न होण्यासाठी काय करावे ? आपण विचारल्यावरुं मावशिने हककसोड पत्र नोदिव दुय्यम नि कड़े केले आहे . आणि आईचा आक्षेप तिल मिलकतीत हिस्सा मिळावा म्हणून आहे ,.दिवाणी दावा दखल करावा का?
वारसदार यांचे नाव इतर अधिकारात ठेवण्याचे कारण नाही ते कब्जेदार सदरी असणे आवश्यक आहे . तहसीलदार यांचेकडे कलाम 155 खाली लेखन प्रमाद चूक दुरुस्त करण्याचा अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sandip darade
28-04-2016
sandidarade23@gmail.com
आदरणीय सर A ,B,C अशी भावंडे व् C (सीताबाई) त्यांची बहिण आहे , वडिलोपार्जित जमींन 20 एकर असुन गट no 234 , 238 ,383 437, 492 , आशा पाच गट असून गट no 234,238 ची कही जमिन natinal highway साठी भुसंपदित झाली आहे त्याचा मोबादला आला असून त्यसाठी सर्वांच्या सम्मतीची आवश्यकता होती , सिताबाईचे नाव सर्व गटांवर इतर अधिकार सदरी असून ती मोबादला मागते व खातेफोड करण्यास विरोध करते आहे म्हणून A ,B,C यानि परस्पर सहमतीने वाटपपत्र दुय्यम निबंदक पुढे केले, असे करताना सिताबाईचे नाव इतर अधिकारत कायम ठेऊन ते गट no मोठा भाऊ A च्या गटावर ठेवले , वाटपपत्र नोंद केलि। सिताबाईचे नोंदिवर आक्षेप घेतला असता मंडलअधिकारी यानि नोंद बरोबर ठरवून प्रमाणित केलि, वाटप पत्राला सीता बाईची सम्मत्ति नव्हती। तरी मंडल अधिकारी यानि निर्णय दिला ।यामुळे पुढे अपील प्रांताधिकारी कड़े करूँ महसुली यंत्रनेवर विस्वास नसल्याने वाटपपत्र रद्द करेनेसाठी काय करावे । गट no 234 ,238 भुसंपदित झाला व् त्यावर आता सिताबाईचे नाव नसल्याने त्याचे मोबादल त्याना मिळणार , तो मिलु नए म्हणून काय करता येईल , महसुली न्यायवर विश्वास नहीं । न्यायालयात वाटप पत्र नोंद रद्द होण्यास अणि प्रमाणित नोंद दाखवून B C पैसे भुसंपदन कडून घेऊ शकता , ते थाम्बवन्यसाठी काय करावे , सीताबाई वृध्द व् गरीब असल्याने योग्य मार्गदर्शन करावे
आपण नोंदीविरुद्ध प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करा . त्याच बरोबर सीताबाई हि वारस आहे म्हणून तिचे नाव कब्जेदार सदरी लावनेबत तलाठी व मंडळ अधिकारी यांना आदेश देण्याबाबत मागणी करा .
स्थानिक प्रांत अधिकारी यांच्याकडूनही आपणास न्यायाची अपेक्षा नसल्यास , म ज अ नि 1966 च्या कलाम 226 खाली अन्य उपजिल्हाधिकाऱ्याकडे अपील / प्रकरण वर्ग करण्याबाबत मागणी करा .
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जमीन संपादन केल्यामुळे , नुकसान भरपाई वाटपाचा प्रश्न आहे . संबंधित काला ( Competant Authority Land Acquisition ) प्रकरण राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 च्या कलम 3 हा (4 ) अन्वये , आपला वाद जिल्हा दिवाणी न्यायालयात निर्णयासाठी refer करतील .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sujit
27-04-2016
sujitchavan456@gmail.com
सर आमचे गावाचे पुर्नरवसन झाले आहे गावामधील घराचा प्लाँट आजीच्या नावावर आहे ती मयत आहे तिला ३मुले आहेत तो प्लॉट ३मुलांच्या नावावर करायचा आहे ग्रांमपंचायत अर्ज केला असता ग्रामसेवक म्हणतायेत कि रजिस्ट्रर वाटणी पत्र करुन आणा मगच वारसाची नोंद घेतो ग्रामंपंचायत मध्ये अर्जावर वारस नोंद घेता येते का रजिस्ट्रर वाटणी पत्र करण्याची आवश्यकता आहे का तसेच आम्हाला घराच्या प्लॉटचे कब्जा पावती मिळाल्या नाहीत कब्जा पावती कोठे मिळेल तसेच घराच्या प्लॉटची मोजणी करायची आहे मोजनी कोण करते व कशी करतात आमचे जुने गाव धरणा मध्ये गेले आहे योग्य माहिती मिळावी विनंती
आणि जर का नवीन गावठाण अद्याप ग्राम पंचायत ला हस्तांतरित नसेल तर वारस तहसील मधून स्थानिक चोकशी ,तलाठी ,मंडळ अधिकारी अहवालानंतर निश्चित होतात .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
नवीन गावठाणातील प्लॉट विषयी : तुम्हाला वारस नोंद करायची आहे कि वाटणी ? वारस नोंदी साठी नोंदणीची आवश्यकता नाही . स्थानिक चौकशी करून ग्रामसेवक नोटीस काढून वारस चढवतील . कब्जा पावती तहसील कार्यालयात मिळते . मोजणी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात करावी .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by jyoti काकड
27-04-2016
jmaruti7@gmil.com
आदरणीय सर माझा प्रश्न important आहे कृपया उत्तरासाठी घ्यावा हक्कावरुण वाद असल्यास (भाऊ व् बहिनीचे हिस्सा वाद) बहिनीं ने भुसंपादित जमिनित हिस्साहिस्सा मिळावा म्हणून वाद निर्माण केल्यास रक्कम मिळावी म्हणून काय करता येईल, ?
आपण भूसंपादन अधिकार्यांकडे रकमेसाठी आक्षेप नोंदवू शकता . तुमच्यात आपसी सहमती होत नसेल तर भूसंपादन अधिकारी अशी प्रकरणे मा दिवाणी न्यायालयात दाखल करतात . व तेथे निकल अंती रक्कम मिळते .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by VIKRAM YADAV
27-04-2016
vikram.vy11135@gmail.com
नामकर सर, आपण माझ्या प्रश्नानाचे उत्तर दिले तय्साठी धन्यवाद पुढे मला असे विचारायचे आहे कि माझ्झे राहते घर वडिलोपार्जित आहे .ते मात्र आता पडले अह्हे मी ते दुरुस्ती करून बध्नाय्साठी तयारी केली ,तेओह आई व बहिणीने ते आमचे घर आहे व आमचा मंजे आईचा नवे अह्हे त्यामध्ये तुज कहीही आदिकर नाही असे सगुण घर बध्ण्यास अडथला आणत आहेत.मी ग्राम्पुंचात मध्ये मागि घर्साठी नोद लागावी त्या साठी अर्र्ज केला पुन काही प्रठीसाद दिला नाही .तर माझ्झा त्या घरावर हक्क अह्हे कसे शिध करू ? त्या घरावर माझ्झा बहिणीचा हाक अह्हे का ?दोघी विवाहित अह्हेत .कृपया मार्गदर्शन करा.
वडिलोपार्जित मिळकतीवर तुमच्या सोबतच आई आणि बहिणीचा हि हिस्सा असेल . आपसी सहमतीने वाद मिटवा .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by प्रवीण पाटील
27-04-2016
pypatil77@gmail.com
नमस्कार सर आमचा गट न ४०/१ (५ .०४ हेक्टर ) व शेजारी गट न ४०/२ ( ४.२० हेक्टर ) आहे तसेच ४०/१ मधून ५.०४ हेक्टर पैकी २.२ हेक्टर २ इसमांना विकले आहे आम्ही सरकारी मोजणी केली पण त्यांनी पूर्ण गट मोजला आमचे पोट हिस्से मोजले नाहीत तरी महाशयांना विंनती आहे कि पोट हिस्सा सरकारी मोजणी करणेबाबत आम्हाला माहिती द्यावी
Question by भाऊसाहेब केदार
27-04-2016
bhausaheb.kedar@gmail.com
आदरणीय प्रशाषण अधिकारी वर्ग , एखादे वाटप पत्र करताना सह हिस्सेदार बहिण जिचे नाव जुन्या नियमाने इतर अधिकार सदरी जरी असले तिला टाळून तिचे कोणतेही हक्कसोड न करता केलेले वाटप पत्र जर ते दुय्यम निबंदाकाकडे केले असले तर त्याची नोंद होते का?
२) जर बहिणीला वगळून इतर चुलत भवानी व सक्ख्या भावाने जर वाटप केले तर गुन्हा होतो का.? कोणावर दाखल होईल .ni
३) जर दुय्यम निबंधकांनी असा दस्त नोंदणी केली ज्यावर भावाने बहिण वारस नाही असे खोटे प्रतीण्यापात्र सदर केले व दस्त नोंदणी केली तर याविरुद्ध तक्रार कोठे करावी नोंदणी करताना खोटे दस्त तयार करून नोंदणी केलू तर काय karavE
Question by VIKRAM YADAV
26-04-2016
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर , एक छोटा प्रश्न अह्हे कि खरेदीखत नोदानिकृत झालेआसेल तर ते रद्ध कार्नायचा अधिकार कोणाला आहे ,तय्साठी काय करावे लागेल ?
केवळ न्यायालय नोंदणीकृत दस्त रद्द करू शकते.न्यायालयात आपण तो दस्त कसा खोटा आहे हे पुरावे देऊन सिद्ध करावे लागते.वकिलाशी चर्चा करून पुढील कोर्टातील कार्यवाही करावी
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by प्रविण तांबे
26-04-2016
tambepm@rediffmail.com
माझे मी नगर मधील संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे,सर गट स्कीम जेव्हा आली तेव्हा आमच्या गट नं मध्ये शेजारील लोकांचे क्षेत्र समाविष्ट करण्यात आले,परंतु आमच्या क्षेत्रातील पोट खराबा हा शेजारील शेतकऱ्यांच्या नावावर वर्ग झाला असे ऑनलाईन सातबारा काढल्यावर दिसते ,परंतु तलाठी दप्तरी रेकॉर्ड ला त्याची नोंद नाही व फेरफार रेकॉर्ड नाही ,मा.तलाठी साहेबाना विचारले असता त्यांनी सांगितले कि ते कसेकाय झाले ते आम्ही सांगू शकत नाही ,पाच ते सहा वर्षा पूर्वीचा उतारा पहिला असता त्यात पोट खराबा नोंद नावावर नाही ,परंतु ऑनलाईन आता ऑनलाईन दिसते ,तर काय करावे , व जुने १९९५ ते २००० उतारे व फेरफार कुठे भेटलीत ,कृपया मार्गदर्शन करावे.
तहसील कार्यालयात अभिलेख कक्षात आपणाला सर्व जुने उतारे व फेरफार मिळतील.तसेच गट स्कीम उतारा तालुका भूमी अभिलेख यांचे कडून घेऊन गटाचे एकूण क्षेत्र व पोटखराबा क्षेत्र तपासून घ्यावे.गट स्कीम उतारा पाहणे गरजेचे आहे.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by प्रशांत p
25-04-2016
vv_rt@rediffmail.com
नैसर्गिक/कृत्रिम गाव तलाव बंधारे यामधील मुरुम/माती खोदकाम करुन खोली वाढविणेची परवानगी अर्जास तहसिल कार्यालयातुन परवानगी देता येते का व जर देता येत असेल तर कोणत्या शासन निर्णय/योजना/नियमाखाली तसेच कोणकोणत्या विभागाचे ना हरकत/अभिप्राय/अहवाल घेतले पाहीजे कृपया मार्गदर्शन करणेंस विनंती आहे
Question by रुपाली घाडगे
25-04-2016
piya_ghadge21@yahoo.co.in
नमस्कार सर,
माझ्या आजोबांची कसबा पेठ, पुणे येथे एका वाड्यामध्ये ७० ते ८० वर्षे पूर्वीची किंवा त्या पेक्षाही जास्त अशी ५०० SQFT ची जागा भाड्याने आहे. त्या जागेमध्ये त्यांचा "बी. बी. घाडगे & सन्स " या नावाने मोल्डिंग & कास्टिंग चा व्यवसाय चालू होता. व भाडे पावतीही त्याच नावाने होती. परंतु आजोबांच्या मूळ चार वारसदार (मुलांपैकी) मोठ्या मुलाच्या मुलाने (नातवाने ) ती भाडे पावती बदलून स्वताच्या टर्निंग व्यवसायाच्या "प्रशांत इंजिनीरिंग वर्क्स " नावाने फसवून मूळ मालकाकडून आम्हाला न सांगता १० वर्षापूर्वी बदलून घेतली. व ते एकटेच या जागेचे मालक व्हायला बघत आहेत. कालांतराने हा वाडा एका बिल्डर ने विकत घेतला आहे. व तो विकसित करणार आहे. (हा वाडा CPG आरक्षित आहे ).तेथील रहिवासी व आम्हाला तो जागेला जागा देऊन आमचे पुनर्वसन करणार आहे व जागा महापालिकेला सुपूर्द करणार आहे.
पण काकांची मुले बिल्डर बरोबर परस्पर काय व्यवहार केला आहे याची आम्हाला जर सुद्धा कल्पना देत नाहीत व समान (चार शेअर होल्डर) असताना आम्हाला तुटपुंजी रक्कम देऊन या व्यवहारातून मुक्त करायला बघत आहेत. आम्ही या व्यवहारात आमच्या हिस्शाचे पैसे घेवून सेटलमेंट करायला तयार आहोत. पण बिल्डर हि आम्हाला योग्य मोबदला देत नाहीये असे दिसते आहे. या व्यवहारात आमची फसवणूक होत आहे असे आम्हाला वाटते.
या केस मध्ये काकांच्या मुलांनी आमचा मोल्डिंग & कास्टिंग चा धंदा बंद करून, जागेची मूळ भाडेपावती बदलून दुसऱ्या नावाने बदलून फसवणूक केली. व बिल्डर हि त्यांना साथ देत आहे. त्यांच्या विरोधात कुठला कायदा आहे ? अशा परिस्थितीत आम्ही काय करावे. आम्हाला न्याय हवा आहे.
एवढे जुने भाडेकरी असताना , त्या जागेचा FSI वगैरे गोष्टी , त्या जागेची योग्य ती किंमत आम्हाला कोण काढून देऊ शकेल ? व कशी कळू शकेल ? कृपया मार्गदर्शन करावे. खूप मदत होईल.
रुपाली घाडगे
९८२२०१३५०८
आपली भाड्याने घेतलेली मिळकत पुणे शहरात आहे . पुणे शहरास महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा लागू आहे . ( Maharashtra Rent Control Act 1999) लागू आहे . या कायद्यातील कलम ७ (१५) मध्ये कुल म्हणजे काय आहे याची व्याख्या दिली आहे .
या व्याख्यानुसार कुल म्हणजे - जर मुल कुल मयत असेल तर , कुळाचे मृत्य पूर्वी जी व्यक्ती मुल कुलाबाब्रोबर राहत असेल / त्याचे बरोबर व्यवसाय करत असेल , तर ती व्यक्ती कुल होते ( भाडेकरू) .
जात अशी कोणतीही व्यक्ती मुल कुलाबरोबर राहत नसेल तर , मुल कुळाचे वारस संमतीने वारस कुल ( भाडेकरू) म्हणून निच्छित होऊ शकतात . जर मुल कुळाचे वारस यांचे मध्ये संमती होत नसेल तर , न्यायालय ठरवेल ते वारस मुल कुळाचे जागी कुल निच्छित केले जातात .
आपण नमूद केल्याप्रमाणे , मुल मालकास असे कुल बदलून ( भाडेकरू ) देण्याचा अधिकार नाही . आपण आपली फास्वनुल झाली आहे असे नमूद केले आहे .
आपण मुल मालकाचे या कृतीबाबत ( आजोबांचे जागी -बी बी घाडगे अन्ड सन्स ऐवजी प्रशांत इंजिनीरिंग बदल करण्याची ) दिवाणी न्यायालयात आव्हानित करा .
त्या जागेस FSI किती मिळेल याची माहिती पुणे महानगर पालिका येथे मिलेले . जागेच्या किंमती बाबत , आपणास स्थानिक चौकशी करूनही माहिती मिलेले .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजी सूर्यवंशी
25-04-2016
shivajisuryawanshi@mahapwd.com
R/Sir, आम्ही 3 भाऊ आहे.
वाडीलोपर्जीत जमिन वैयक्तीक नांवे वाटप करायला काय कार्यवाही करावी लागेल. कृपया ईमेल वर माहिती मिळणेस विनंती.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ (२) अन्वये तहसिलदार यांचेकडून आदेश घ्यावा किंवा दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणीकृत वाटपपत्र करावे.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
24-04-2016
ravindra.golesar@rediffmail.com
मा.सर, एखाद्याने आपल्या जमिनीवर दंडेल शाहीने कब्जा केला असेल तर त्यास कसे घालवून देता येते. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ मध्ये काय तरतुदी आहे. सदर व्यक्तीशी दंडेलशाही न करता आपली जमीन त्याच्या कब्जातून कशी सोडवावी याबद्दल मार्गदर्शन करावे.
Question by अमन
24-04-2016
ymm6339@gmail.com
सर
मी सांगलीचा राहवशी आहे. काही दिवसपूर्वी माझ्या ओळखीचा एक एजेंट आला व म्हणाला की हमीद (जागा मालकाचे नाव) या मालकास 1 गुंठा जमीन विकायची आहे व त्यास पैशाची फार गरज आहे. मी संगितले की कागदपत्रे असल्याशिवाय मी काही घेणार नाही. फारच हाता-पाया पडल्यावर कागदपत्रे देवून काहीही करा पण माझा गुंठा घेवून माला पैसे द्या असे सांगून हमीद निघून गेला. मुलीचे लग्न कार्य आहे मदत करा.
कागदपत्रे तपासल्यावर लक्षात आले की जमीन गुंठेवरी मध्ये आहे व महानगर्पालिके कडून बिगर शेती परवाना घेतलेला आहे. परंतु अजून कलेक्टर कडून बिनशेती आदेश घेतला नाही व 7/12 वर नावही नाही. म्हणून जागेची खरेदी होत नाही. फारच जबरदस्ती केल्यानंनातर मी त्याला नोटरी करून 1) कबजेपट्टी 2) खरेदीपूर्व करार व 3) वतमुखत्यार पत्र नोटरी करून 2 लाख दिले व 7/12 वर नाव लावलेनंतर उरलेले 2 लाख देवून जागा खरेदी करन्याचे ठरले. मी सावध राहून 2 लाख रूपयांचा बँकेचा चेक दिला त्याने बँकेतून पैसे काढून घेतले. मी त्याच्या जागेवर त्याचे नाव 7/12 वर लावून घेतले. व नंतर मी त्याला ठरलेला व्यवहार पूर्ण करण्यासाठी रेजिस्टर कार्यालयात येवून सही करण्यास संगितले. आता तो साफ नकार देत आहे. म्हणतो तुम्ही देत असलेला दर फार कमी आहे. पैसे वाढवून द्या. व फारच जास्त पैसे मागत आहे.
त्याचे जागेची मूल कागदपत्रे व नोटरी केलेले कागदपत्रे, बँकेतून पैसे काढलेला पुरावा माझ्याकडे आहे. कृपया मार्गदर्शन करावे
आपण खरेदी पूर्व करार केलेला आहे . या करारात जर जमिनीचा दर नमूद केलेला असेल तर , आपण The Specific Relief Act खाली दावा दाखल करू शकता . या दाव्यामध्ये आपण हमीद ने आपले कराराप्रमाणे खरेदी करून देण्याबाबत हमीदला आदेशित करणे बाबत न्यायाय्लायास मागणी करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by माधुरी निवेंडकर
24-04-2016
madhurinivendkar@gmail.com
माझ्या पतींनी ३५ वर्षापूर्वी १ जागा त्यांच्या ३ चुलत भावांकडून विकत घेतली, परंतू ती नावावर करणे राहून गेले. आता ते तिन्ही भाऊ हयात नाहीत पण जागा माझ्या दिरांच्या पर्यायाने आमच्याच ताब्यात आहे कारण आमच्या वडिलोपार्जित जागेच्या वाटण्या झालेल्या नाहीत. वडिलोपार्जित जमिनी ३ भावांच्या नावावर आहेत. या विकत घेतलेल्या जागेच्या 7/१२ वर अजूनही त्या मयत भावांचे नाव आहे. आत्ता आमच्याकडे खरेदीची कुठलीच कागदपत्रे नाहीत. त्या ३ भावांच्या सगळ्या वारसांबद्दल माहिती मिळत नाही. जे भेटले, त्याना त्या जागेत स्वारस्य नसल्याचे सांगतात. तर ती जागा माझ्या पतींच्या नावावर करण्यासाठी काय करावे लागेल.
खरेदी चे कोणतेही कागदपत्रे नसतील तर , जमीन आपले नावावावर होण्यास अडचणी आहेत .
मात्र जर कमिन गेले ३५ वर्षाहून अधिक काळ , ताब्यात असेल तर आपण Adverse Possession या तत्वाचा आधार घेऊन दिवाणी न्यायायालयात आपली मागणी जाहीर करून मिळणे बाबत दावा दाखल करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by VIKRAM YADAV
23-04-2016
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर ,माझा प्रश्न असा आहे कि माझे दत्तक पत्र झाले आहे माझे वडील मयत आहे ,आई व वडिलांचा संमतीने दत्तक पत्र झाले ,खी दिवसनी वडिलांनी एकूण जमिनीतले स्वत खरेदी केलेली जामीन वाटणी पत्र द्वॉर्य ती जामीन माझा नवे केली व राहिलेली जामीन स्वताचा नवे तेवली पुडे वडील मृत झाल्यावर आई व २ बहिणीने talathi कडे वारस नोड अर्ज दिला कि मला मुलगा नाही व वडिलांचा नावे असलेली जमीन ताल्याठी ने ३ चा नवे केली ताय्नी माझे नाव वगळून ती जमीन विकून टाकली पुन त्याविरुद्ध दिवाणी न्यालयात मी अपील करून मी मुलगा आहे हे सिद्ध केले .त्या नंतर दिवाणी नायालयात तडजोड हुकुम नामा झाला .व आई व २ बहिणीने विक्लाले जमिनीचे रुपय मी समोरच्या पार्टीला परत केले कोर्टात व तो दस्त रद केला पुन त्या बदल्यात मी ३ कडून हक्क सोड पत्र कोर्टातच लिहून घेतले त्या मध्ये असा उलेख केला समोरचा वकिलाने कि आईला मी पोद्गी रुपात दर महिना रुप्पय द्य्वेअत पुन ती माझाकडे राहत होती .हा हुकूमनामा तलाठी उपलब्ध नाही व कामचुकार पण मुले सातबारा वर माझे नाव न लागता त्या ३ चे नवा कायम राहिले व फुडे जावई मंडळी आले व आईला ग्घेउन गेले व त्या सर्वांनी मिळून ती जमीन पुन विकली .व नवीन दस्त नोंदणीला आलाय्वर मी तक्रार अराज देवून दिवाणी नाय्लायात झालेला हुकूमनामा दाखून माझे नवे ७/१२ नोद करून घेतली .आत्ता जावी मंडळी माझाकडे रक्कम मागत आहेत .आमची वाटणी अम्मल दे तू फसवून हक्कासोड पत्र केले अह्हेस .त्यावर टायनी प्रांत यांचाकडे नोद रद्द वाहावी म्हणून अप्पील केले अह्हे .मला आईला पोद्गी दायची नाही कारण ती माझाकडे न राहता जावई यांच्कडे राहून माझी बदनामी करते अह्हे
१) आईला मला पोद्गी द्याची नाही .(मी तिला सबळ करण्या साठी तयार अह्हे कोणत्या पण आठीवर)
२) ३- घीचा हिसा मी अद्धिच कोर्टात दिला आहे .
मी पुढे काय करू ती जमीन कासताना मला दम देण्यात यतो .ह्यावर उपाय काय ? काय मला आईला पोद्गी न देनाय्साठी काय्कार्वे लागेल ?
(सदरचा प्रश्न हा या संकेत स्थळाचे उत्तर देण्याचे कार्य क्षेत्रातील नाही . या संकेत स्थळावरून जमीन , त्या साम्भांडीचे कायदे व अनुषंगिक प्रश्नांना उत्तरे दिली जातात . तथापि उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे )
Consent -Decree होताना आपण , आपले आइस पोटगी देण्याचे मान्य केले आहे . त्यामुळे आपणास पोटगी देणे क्रमप्राप्त आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजू परभणीकर
22-04-2016
ravisudewad7755@gmail.com
गैरअदिवासीची जमिन अदिवासी व्यतक्तीिने खरेदी केली तर त्याी जमिनीचा मालक अदिवासी झाल्या मुळे पुढे हस्तांीतरण होऊ नये यासाठी त्याक जमिनीवर अदिवासी म्ह णून नोंद घेणे गरजेचे आहे काय.
सात बारावर ३६ अ च्या तरतुदी लागू असा शेरा पूर्वीचा ठेवलेला असेल . त्यामुळे आता नवीन खरेदीदाराचे नावे जमीन दाखल असल्यास , पुन्हा नोंद ठेवण्याची आवश्यकता नाही .
हे लक्षात ठेवणे आहे कि - आदिवासी कडून आदिवासी खातेदार जमीनखरेदी करत असला तर त्यास , जिल्हाधिकारी यांचीन परवानगी आवश्यक आहे
या हस्तांतार्नास परवानगी आहे का पहा ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rameshwar
22-04-2016
rameshwarkarpe@gmail.com
नमस्कार
सर मी जामखेड तहसील ऑफिस मधे लिपिक आहे
सर
मला गावठाण विस्थार kase केले जाते याबाबत माहिती मिळावी हि विनंती
For Information:
Revenue Staff Karmachari vargasathi, tyanche prashna, Shanka ani Charcha yasathi " Karmchari Vyaspith " chi vyavstha keleli ahe.
Mohsin Shaikh te monitor kartat.
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by anand salve
22-04-2016
salveanand@gmail.com
निरंतर ताकीत मनाई हुकुम म्हणजे काय ? कनिष्ठ न्यायालय तो property matter मध्ये देऊ शकतो का
निरंतर मनाई हुकुम ( Permanent Injunction ) म्हणजे एखादी गोष्ट कायमची करण्यापासून प्रतिबंध करणे .
The Specific Relief Act च्या कलम ३७ (२) अन्वये निरंतर मनाई हुकुम आदेश काढला जातो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रवि
22-04-2016
ravindra171282@gmail.com
मोहसीन सर धन्यवाद माझा प्रश्न हा दिनांक 08.04.२०१६ तथा 21.04.२०१६ च्या प्रश्नाला अनुसरून आहे . प्रश्न असा आहे कि जर वरील प्रश्ना प्रमाणे जर परिस्थिती असेल तर आणि आज त्यांच्या सात बारा उतारा मध्ये जर सर्व वारसांचे सम समान क्षेत्र असेल तर आपण सत बारा दुरुस्ती साठी दिवाणी न्यालयात चा मार्ग सांगितला आहे , सदर बाबतीत माझा प्रश्न असा आहे कि , जर सात बारा मधील सर्वाना सम समान क्षेत्र हे कश्या प्रकारे किवा कुठल्या नियमानुसार लावले जाण्याची शक्यता आहे ती सांगावी कारण या मध्ये संबधित व्यक्तींनी कुठल्याही प्रकारचे वाटप पत्र किवा इतर कुठलाही दस्त केला नसेल तरी ह्या प्रकरच्या नोंदी कश्या लागू शकतात या व्यतिरिक्त जर वरील नोंदी किवा क्षेत्र दाखवण्यात जर काही तांत्रिक चूक किवा नजर चूक असू शकते का आणि अशी नजर चूक जर तलाठी कार्यालयातून झाली असेल तरी आम्हास दिवाणी न्यायालयात जावे लागेल kaa.किवा ती नजर ,तांत्रिक चूक तलाठी किवा इतर कुठल्या कार्यालयातून दुरुस्त होवू शकते
पूर्वी सर्व वारसांना सामाईक रित्या महुरूपी कंस द्वारा क्षेत्र दाखवले जात होते परंतु कालांतराने तेच क्षेत्र विभागून दाखवू लागले ते कसे त्या बद्दल आम्हास काही माहिती तलाठी कार्यालयातून मिळू शकेल का ......आणि ती माहिती आम्ही कशी मिळवावी ...
Question by रवी
21-04-2016
ravindra171282@gmail.com
आदरणीय मोहसीन सर धन्यवाद आपले प्रतिसादाबद्द्ल दिनांक 08.04.२०१६ ला विचार् लेले प्रश्नआला आपण जे मत व्यक्त केले ते असे आहे कि, प्रश्न अतिशय योग्य आहे वडील जर १९९४ पूर्वी मयत असतील हिंदू वारस कायद्यातील १९९४ व २००५ च्या सुधारणा व तरतुदी त्या वारसांना आजरोजी लागू होणार नाहीत.या बाबत मा.सुप्रीम कोर्टाचा मागील वर्षीचा निकाल आहे.तो निकाल आपण प्राप्त करून घ्यावा. सर मग आज रोजी त्यांच्या मध्ये जमिनिचे वाटप कसे होईल आणि आज रोजी जर सर्व जन सम समान जमीन धारण करीत असेल तर ते त्या सात बारा मध्ये आज रोजी कश्या प्रकारे दुरुस्ती करावी आणि सर त्या सर्व जन मध्ये जमिनीचे वाटप कश्या प्रकारे होईल कृपया मार्गदर्शन
मा.सुप्रीम कोर्टात झालेले निकालाचा आपणाला न्यायालयात हिस्सा ठरवताना हवाला देणेस उपयोग होईल .
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
सातबारा मध्ये दुरुस्ती करणेसाठी सर्वांची संमती असेल तर तहसिलदार अगर दुय्यम निबंधक यांचे कार्लायातून जमिनीचे वाटपपत्र करता येईल परंतु संमती नसेल तर आपण दिवाणी न्यायालयातून प्रत्येकाचा हिस्सा ठरवून घ्यावा व त्यानंतर ७/१२ वर दुरुस्ती होईल.यासाठी आपणास दिवाणी न्यायालयात जावे लागेल.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by bhaurav kekan
19-04-2016
bhaukkd84@gmail.com
Adaraniy panbude sir ......krupaya majhya shankeche samadhan karave ......नमस्कार सर , माझ्या आईचे वडील १९९१ ला मयत झाले त्यापाच्यात ३ मुले व २ मुली होत्या . त्यापैकी एका बहिणीने हक्कसोड केले . भवानी आपापसात वाटप पत्र करताना एका बहिणीचे नाव सर्व ३ गटांवर कायम ठेऊन वाटप पत्र दुय्यम नि . समोर केले त्यास आईची परवानगी नव्हती ? त्यावर आक्षेप आईने घेतला आहे .
१) सदर नोंद होऊ शकते का ?
२)नोंद न होण्यासाठी काय करावे ?
३)सदर वाटप पत्र रद्द करण्यासाठी काय करावे ?
४)दिवाणी दावा टाकावा कि नाही ?
कृपया मार्ग दर्शन करावे
आपले प्रश्नावरून
वारस म्हणून , आपले आजोबांचे खालील वारस असावेत
१. आपले मामा १ २. आपले मामा २ ३. आपले मामा ३ ४. आपली मावशी ५. आपली आई
एका बहिणीने हक्क सोडला म्हणजे , आपले आई ने हक्क सोडला कि मावशीने हक्क सोडला ?
हक्क सोड नोंदणीकृत पत्रकाने सोडला कि केवळ तलाठी यान्हेकडील नोंदीमध्ये , वर्दी हक्क सोडला असा उल्लेख आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल शिर्के
19-04-2016
shirke.amol238@gmail.com
नमस्कार सर माझ्या वडिलांनी गरजेपोटी एक जमीन सन १९९१ ला श्री विश्वास शंकर शिर्के या व्यक्तीस मुदत खरेदी दिली होती, तसे रिकन्वेंस बनविले होते परंतु सातबारावर श्री विश्वास शंकर झांजुर्णे असे नाव लागले होते , नमूद नोंदीच्या फेरफार मध्ये सुद्धा सातबारावरील नावाप्रमाणे नोंद होती, कालांतराने त्यामध्ये तलाठी साहेबांनी दुरुस्ती करून विश्वास शंकर शिर्के अशी नोंद केली आणि माझ्या वडिलांचे नाव मूळ अधिकारातून काढून इतर अधिकारात दाखविले . आता ती जमीन माझ्या वडिलांनी सन २००५ ला मुदतीनंतर मा सब रजिस्टर यांचे समक्ष रिकन्वेनस पत्र करून सोडवली आहे, नमूद जमिनीच्या सातबारा उतार्यावरून मुदत खरेदीदार श्री विश्वास शंकर शिर्के यांचे नाव कमी करून माझे वडिलांचे नाव दाखविण्यासाठी त्यावेळी कार्यरत तलाठी यांचेकडे रिकन्वेनस पत्राची फोटो कॉपी दिली होती परंतु त्यांनी विश्वास शंकर शिर्के यांचे नाव कमी न करता इतर अधिकारात असलेल्या माझ्या वडिलांच्या नावाला चौकट केली याचा अर्थ माझ्या वडिलांचे नाव कमी केले. आता ती जमीन माझ्याकडेच आहे परंतु सातबारावर नाव नाही. याबाबत मी पुन्हा नवीन तलाठी साहेबांना नाव लावण्याबाबत विचारणा केली तर त्यांनी हे खूपच जुने प्रकरण आहे मला यामध्ये बदल करण्याचे अधिकार नाहीत ते फक्त मा . तहसीलदार यांना आहेत असे सांगितल्यावरून मी वडिलांच्या नावे मा. तहसीलदार यांना उशिराचे रिकन्वेनस पत्राची नोंद सातबारावर होनेकारिता विनंती अर्ज दि. ०८/०५/२०११ ला केला होता. नमूद अर्ज पुढील कार्यवाहीकरिता मंडल अधिकार्याकडे पाठविला तेव्हा कार्यरत मंडल अधिकारी यांनी नमूद अर्जाच्या कार्यवही मध्ये काही त्रुटी दाखविल्या त्यानुसार मुदत खरेदी दिल्या पासून ते २०१२ पर्यंतचे सातबारा उतारे , सातबारा उतार्यामध्ये नोंद सर्व फेरफार उतारे मुदत खरेदी दिलेल्या रिकन्वेनस पत्राची प्रत इ. सर्व कागद पात्रांची पूर्तता केली दरम्यान दोन तहसीलदार व दोन मंडल अधिकारी आणि तीन तलाठी यांची बदली होऊन नवीन अधिकार आले , प्रत्येकाकडे मला हे प्रकरण वारंवार निदर्शनास आणून द्यावे लागत आहे तरी आजपर्यंत नमूद अर्जावर कार्यवाही पूर्ण झालेली नाही. मी सरकारी नोकरी निमित्त बाहेगावी असतो , माझे वडिलांना यामधील ज्ञान नाही त्यामुळे मलाच वेळ काढावा लागतो. सरकारी नोकरी करीत असल्यामुळे ५ वर्षामधील माझ्या बर्याच रजा फक्त या कारणासाठीच खर्च झाल्या आहेत तसेच वित्तहानी झाली ती वेगळीच.
महोदय मी सरकारी कर्मचारी असल्यामुळे वेळोवेळी विनंतीच्या मार्गाने प्रयत्न करीत असून सुद्धा अद्याप मला न्याय मिळाला नाही. फेरफार व सातबारावरील नोंदी या तलाठी यांनी केलेल्या असून चुकीच्या नोंदी दुरुस्ती साठी मूळ जमीन मालकाला होणारा त्रास हा खूप लाजीरवाणा आहे.
सर याबाबत आता माझा सय्यम सुटत चालला आहे तरी कृपया आपण मला मार्गदर्शन करून या प्रकरणाची मी आता कोणाकडे दाद मागावी हे सांगावे.
शक्य असल्यास श्री कुंडेटकर आपण आपला संपर्क नं द्यावा
प्रश्नाचे स्वरूपावरून -
आपले वडिलांनी English Mortgage -इंग्लिश गहाण- श्री शिर्के यांना करून दिल्लेले होते . या गाहाण प्रकारानुसार , कर्जाची परत फेड केल्यानंतर , शिर्के यांनी जमीन पुन्हा आपले वडिलांना हस्तांतरित करून दिली आहे .
उपरोक्त कथन केल्याप्रमाणे वस्तुस्थिती असल्यास , आपले वडिलांचे नाव अधिकार अभिलेख सादरी लागणे आवश्यक आहे . तहसीलदार प्रकरणाची दाखल घेत नसल्यास , त्यांना अर्जाचे अनुषगाने लेखी उत्तर देनेबाबत सांगा . अथवा सदर आपण , लोकशाही दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
