जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सविता sinde
05-04-2016
savishinde12@gmail.com
आदरणीय सर नमस्कार
एकत्रित कुटुंबतले जमिनीचे वाटप पत्र करताना इतर अधिकारतीलअधिकारतील व्यक्तीचे नाव तसेच ठेऊन (तिची परवानगी न घेता) वाटप पत्र केलेले असल्यास त्यावर तलठ्यकडे आक्षेप नोंदवाला । परंतु जानकार लोक सांगतात की महसुली दावे अधिकारी manage होतात, असे होउ नए म्हणून काय करावे? तसेच वाटप नोंद होउ नए म्हणून कोर्टात दावा दाखल करुन नोंद होउ नये म्हणून काय करावे ?
2 नोंद होउ नये म्हणून कोर्ट काही आदेश देऊ शकते काय? त्याला किती वेळ लागेल
तुम्ही केलेल्या वाटप पत्राला कायदेशीर आधार काय याचा खुलासा करावा.
इतर अधिकारातील व्यक्तीचा कायदेशीर अधिकार काय याचा खुलासा करावा.
महसुली दावे अधिकारी manage होतात या गोष्टीत तथ्य नाही, तुमचे पुरावे भक्कम असतील तर काळजी करू नका.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by कुणाल अंकुश जाधव
05-04-2016
mr.k1387@gmail.com
एखादे अधिकारी / कर्मचारी यांची सेवा दुसऱ्या कार्यालयात वर्ग झालेली असल्यास त्यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याचे / प्रतिवेदनाचे अधिकार कोणास आहेत ? सेवा वर्ग कार्यालयाचे कार्यालय प्रमुख की मूळ आस्थापनेचे कार्यालय प्रमुख ?
Question by श्रीनिवास खेडकर
05-04-2016
khedkarshriniwas1987@gmail.com
सर,
जर एखाद्या जमिनीवरती दत्तक मुलाचे नाव वारसाने दाखल करायचे असल्यास त्या अर्जदाराने कोणती कागद पत्रे सादर करणे आवश्यक आहेत
Question by rohit
04-04-2016
rhtpatil168@gmail.com
सर वडिलांनी रजिस्त्टर वाटणी पत्र करुन दिले पण एकच मुलाला सर्व जमीन दिली मग बाकि मुलाना त्यात हक्क नहीं का
Question by शिवाजीराजे
03-04-2016
shivajirajetarale@gmail.com
सर नमस्कार ,
ग्रामसभेने ठरावानुसार नोद बदलली आहे त्यावर ग्रामसेवकाची शी आहे सरपंचाची सहि नाही. त्या ग्रामसभेला सरपंच हजर होते पण उप सरपंचाची सही आहे व उतार्यावर फक्त ग्रामसेवकाचीच सही आहे तसे चालते का ?
Question by सुदाम चौधरी
02-04-2016
sudam.v.chaudhari@gmail.com
माझ्या वडिलांची स्वकष्टार्जित शेतजमिन आहे.
वडलांना माझ्यासहित बहिण,भाऊ व आईच्या नावाने खातेफोड करायची आहे.
नविन कायद्यानुसार फक्त बक्षिसपत्र करून घेतले तर चालेल
का ?
खातेफोड व बक्षीसपत्र दोन्हींपैकी कोणती पद्धत वापरावी ?
धन्यवाद सर.
खातेफोड /वाटणी करता येणार नाही . ज्या जमिनीत/मिळकतीत हिस्सा आहे अश्या जमिनीचे वाटप/ कहते फोड होते . जर हि जमीन वादिलीपार्जीत म्हणून वडिलांकडे आली असती तर , खातेफोड करता आली आली असती
सदर जमीन वडिलांची स्व कष्टार्जित आहे . त्या मुले बक्षीस पत्र करावे लागेल;
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
खातेफोडसाठी बक्षिसपत्रपेक्षा कमी खर्च येईल. निर्णय आपण घ्यावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
01-04-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,मोबदला देऊन १५ वर्षापूर्वी नोटरीद्वारे कुलमुखत्यारपत्र घेतले आहे.त्याद्वारे आता जागेचे रजि.खरेदीखत करता येईल का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
याबात शासन निर्णय आहे निबंधक(रजि.) कार्यालय येथे रजि. कुलमुखत्यार पत्र असेल तरच रजि.व्यवहार केले जातील.आपले तालुक्यतील दुय्यम निबंधक यांचे कार्यालयात आपणास पूर्ण माहिती मिळेल.रजि.खरेदीसाठीनोटरीचे कुलमुखत्यार पत्र चालणार नाही.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
नोटरी समोर केलेल्या कुलमुखत्यारपत्रला कायद्यात काहीही किमत नाही
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by जीवन गोसावी
31-03-2016
jeevan.gosavi@rediffmail.com
देवस्थान इनाम वर्ग ३ या प्रकारातील जमिनीला वारस म्हणून दत्तक घेता येतो का ?
कृपया मार्गदर्शन करा .
घेता येतो. दत्तकाला देवस्थान इनाम वर्ग ३ या प्रकारातील जमिनीसाठी वारस हक्क नाही असे कायद्यात नमूद नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by रोहित जठार
31-03-2016
www.roraj8@gmail.com
आमच्या वडिलांनी मूत्यूपत्र तयार केले आहे. हि जमीन वडिलोपार्जित आहे व या मूत्यूपत्रास आमची हरकत आहे .आम्हाला हे मान्य नाही. माझ्या मोठ्या भवाने लबाडीने हे मूत्यूपत्र तयार करून घेतलले आहे. माझी परिस्थिती या मुत्युपात्राला कायदेशीर आव्हान करण्याची नाही मी खूप गरीब आहे. तरी मला या बाबत साथ मिळावी व माझी जमीन हाच मला एक आधार आहे कृपया सहकार्य करावे.. धन्यवाद
मूत्यूपत्राला फक्त न्यायालयातच आव्हान देता येते. भावाशी, प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने चर्चा करण्याचा प्रयत्न करा.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by Purushottam
31-03-2016
Purushottam.bhanuse@gmail.com
र माझ्याआजोबाच्या मृत्यूपत्राने1973साली माझ्या नावावर शेती आली पण आजी अ.पा.क.होती व पुनःलेखनात अपाक हा शब्द निघून गेला दुरुस्ती कशी करावी?
अ.पा.क याचा अर्थ अज्ञान पालक असा होतो व्यक्ती जर १८ वर्षापेक्षा अधिक असेल तर तो शेरा कमी करावा लागतो.पूर्वी अ.पा.क. लावणेसाठी फेरफार घेत नव्हते तसेच कमी करताना ही फेरफार घेतला जात नाही.फक्त शेरा कमी करुन छोटी तलाठी सही करतात.त्यामुळे आपलेला १८ वर्ष पूर्ण झाले नसतील तर जुना अ.पा.क चा उतारा कडून मा.तहसिलदार यांचेकडून म.ज.म. अधिनियम १९६६ कलम १५५ प्रमाणे दुरुस्ती करून घ्यावी.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
तहसीलदार यांच्याकडे अ.पा.क. च्या फेरफार सह म.ज.म. अधिनियम कलम १५५ अन्वये चूक दुरुस्तीचा अर्ज करा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
30-03-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर दोन गट नं.मिळून एकत्रित बिनशेती आदेश झालेला आहे.सदर आदेशात रस्त्याखालील बाधित क्षेत्र एकत्रित दर्शवलेले असल्याने तलाठी सदर आदेशाची नोंद ७/१२ सदरील इतर हक्कात घेण्यास तयार नाही.तरी कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
आदेशाची नोंद घेणे बंधनकारक आहे. आपण तहसीलदार याना भेटून दाद मागावी.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by rohit patil
29-03-2016
rhtpatil168@gmail.com
श्री किरण पाणबुडे सर मी आपल्याशी फोन वर बोलू शकतो का मला आपला फोन नंबर द्या
Question by गणेश शिंदे
29-03-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,वनीकरण विभागातील जमीन रहिवास विभागात समाविष्ट झाल्यास त्यास चटई निर्देशांक किती मिळेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by rohit patil
29-03-2016
rhtpatil168@gmail.com
सर माझे पणजोबा हरी पाटील हे खूप दारू पीत होते म्हणून गावातील लोकांनी त्यांचा मुलगा भादू हरी पाटील याला १९२१ साली बशीस पत्र करून मग त्यांना १९२३ साली एक मुलगा झाला व १९३३ साली तिसरा मुलगा झाला न १९३५ साली चोथा मुलगा झाला हे सर्व ती शेती करीत होते पण भादू हरी पाटील मरण पावला तर त्या शेतीला त्यांचे मुले वारस लागली राजाराम व एकनाथ पाटील तरी यांनी ती शेती माझ्या वडिलांची आहे असे सांगून सर्व शेती हेच करू लागले मग त्या शेतीवर बाकी काही मुलाचं काही अधिकार नाही का बक्षीस पत्र हे नोंदणी केलेले नाही आहे पण १९२१ सालची फेरफार नोंद मिळत नाही आहे तरी ती शेती बाकी मुलांना कशी मिळणार या विषयी माहिती हवी आहे
बक्षीस पत्र नोंदणीकृत नसेल तर नोंद होणे योग्य नाही. तथापि १९२१ सालचा फेरफार मिळत नाही असे पत्र अभिलेख कक्षातून घ्यावे. प्रांत अधिकार्याशी संपर्क करावा. नोंद बरीच जुनी असल्याने दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागेल. वकीलांचाही सल्ला घ्यावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by rohit patil
29-03-2016
rhtpatil168@gmail.com
मला १९२१ सालचे बशीस पत्र हे नोंदणी झाली आहे किवा नाही हे कुठे पाहायला मिळेल
Question by मिलिंद रमेश खोत
29-03-2016
milind.khot@rediffmail.com
मा. श्री. किरण पाणबुडे सर,
आमच्या गावी( देवस्थान इनाम ) वाहिवातदार या जागेत दरवर्षी दत्तजयंती सप्ताह होत असे नंतर त्या जागेवर सर्व गावकरी लोकांनी असे ठरवले कि त्या जागेवर आपण कायम स्वरूपी सभागृह बांधावे त्या साठी मुंबई मंडळ रजिस्टर केले बांधकाम पण पूर्ण झाले आता त्या जागेवर ज्या चार भोगवाटदार आहेत ती जागा संस्थेच्या नावावर करण्यास राजी नाही पहिले तोंडी परवानगी दिली होती आता देत नाही तर ती नावावर कशी करावी सर्व ग्रामस्थ संस्थेच्या नावावर करण्यास राजी आहेत तसेच सातबारा मध्ये देवस्थान मालक सरकारी आहे तर काय पर्याय आहे नावावर करण्यास ते सांगा
Exemption To Land Revenue Act नुसार , देवस्थान इनाम जमिनीची विक्री होत नाही . त्या मुले ती जागा मुंबई मंडळाचे नावावर होणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनय राऊत
29-03-2016
vinayrt05@gmail. Com
नमस्कार सर
१९८० साली एकञिकरणामध्ये आमची जमिन लबाडीने दुसऱ्याच्या नावावर करण्यात आली
७/१२, ९(३),९(४),च्या नोंदीत दुसऱ्याची नावे असुन
आता २००५ व२०१५ रोजी त्यावर फेरफार होऊन त्याच्या वारसांची नावे लावली गेलीत त्याविरुध्द आम्हाला कोणा कडे अपिल करून दाद मागावि लागेल
Question by रमेश कदम
28-03-2016
rameshkadam410@gmail.com
आदरणीय सर । माझा एक प्रश्न आहे ।की वडिलोपार्जित 70 एकर जमींन ही रायभन् कदम याच्या नावावर होती ती त्या नंतर ती त्यांची 6 मुले यांच्या नावावर गेली पैन खाते फोड़ कही करनस्तव केली नाही , आता ती 6 मुले मयत आहे आणि आम्ही त्यांचे 12 मुले आणि 5 मूल आहोत । त्या 12 पैकि मी रमेश । आमची खातेफोड झाली नसून जो तो आपले हिस्सा ची जमींन करात आहे । परंतु आमची रोड च्या कडेची जमींन भुसंपदित झाली आहे । अजुन मोबादला मिळाला नाही कारण सर्व 12 भावंपैकी त्यांच्या 4 बहिनिनि हककसोड पत्र दिले पण 1 बहिन भुसंपदन कडून आलेली कही रक्कम मागत आहे । म्हणून आम्ही 12 चुलत भावांनी मिळूने वाटपपत्र केले । एका चुलतभावने त्या बहिनीचे नाव वगळून आम्हाला 4 बहिनीव्यतिरिक्त अन्य कोणतेही कायदेशीर वारस नसून असे खोटे प्रतिद्यापत्र बनवून हककसोड त्याच्या हिस्स्यात् केले । 1 त्याच्या बहिनीला वगळून केले (दुय्यम नि बंधककडे नोंद केली ) व् आमचे आपपसत वाटप केले । तलाठी कड़े नोंद टाकतान त्याच्या बहिनीने हरकत घेतली आहे । वाटपपत्र आम्ही भावांनी सहमतीने केले व् त्या बहिनीचे सर्व गटवारील इतर अधिकारतले नाव तसेच ठेवले आहे । तरि ती बहिन वाटपपत्र वर आक्षेप घेत आहे ।
1आमचे वाटपपत्र नोद होण्यासाठी काही अड़चन येईल का?
२ हक्कासोड पत्र तिच्या भावांनी केले आहे तरी ती फौजदारी गुन्हा सर्ववर कराते असे म्हणत आहे । अमच्यावर गुन्हा दखल होउ शकतो का?
3 वाटप नोंद होऊं ती बहिन फ़क्त तिच्या भावच्या हिस्सयावर जाण्यासाठी काय करावे
4 आमच्या वाटपपात्र नोंद होण्यास अड़चन आहे का? कारण आम्ही आपापसत नोंदिव वाटप पात्र केले आहे आणि हरकत फ़क्त हक्कासोड वर असल्याने आम्ही नाहक यात बली जात आहे । काय करावे ? कृपया मार्गदर्शन करा ?
बहिनीने हरकत घेतली असल्यास त्या प्रकरणाचा निकाल होईपर्यंत नोंद प्रमाणित होणार नाही,
हक्कसोड पत्र तिच्या भावांनी केले असले तरी सर्व हक्कसोड पत्र करणार्यांची त्याला संमती असल्याने IPC १२० ब / ३४ खाली सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल होउ शकतो ,
बहिणीला तिचा कायदेशीर हक्क द्यावा हेच चांगले
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष शिंदे
27-03-2016
svshinde67@gmail.com
मा. श्री. किरण पाणबुडे सर,
भूसंपादन विषयी सविस्तर विचारायचे आहे
सर
गांव हदगांव, जी. नांदेड
"१९९२ साली कयाधु शाखा कालवा कि.मी. ३६च्या माती कामासाठी" या शिर्षका खाली जमीन संपादन करण्या साठी
प्रस्तावित गट/ सर्वे न. ७/१,७/२, ४८/४ व ४८/६/१ असे होते.
(जर वरील गट/ सर्वे न.४८/४ व ४८/६/१ संपादन केले तर भूमीहीन होणार )
नंतर राजपत्र , वर्तमान पत्र यात क.४ व ६ ची अधिसुचना, संयुक्त मोजणी यांत ७/१, ७/२ ,४८/३ व ४८/५ या गट/ सर्वे न. चे संपादन पुर्ण होउन निवाडा झाला
४८/३ -३.५७ हे. पैकी १.३८ हे.
४८/५ - २.१० हे. पैकी ०.५६ हे
पण प्रत्यक्षात
४८/४ - १.२२ हे. पैकी १.२२ हे
४८/६/१ - ०.७० हे पैकी ०.७० हे
या जमीनीतुन माती नेली व ह्यांना पैसे दिले
नंतर २००४ साली फेरफार घेउन ४८/४ व ४८/६/१
हे क्षेत्र कमी केले व ती अणपड अडाणी विधवा वय ७५ आता भूमीहीन झाली
हे संपादन पुर्ण पणे चुकीचे आहे?
खालील जी.आर 'भूमीहीन न होउ देण्याबद्दल '
१) महसुल व वन विभाग क्र.एलक्युएन-३०८०-(२११३)अ-२, दि.२४ नोव्हेंबर, १९८०
२) महसुल व वन विभाग क्र.एलक्युएन-३०८०-(२१८४)अ-२, दि.२९ जानेवारी , १९८१
३) महसुल व वन विभाग क्र.एलक्युएन-१८३२-(२११४)अ-२, दि.२० एप्रिल ,१९८३
** शासन निर्णय (English):
Revenue and forest dept. Mantralaya, resolution no.LQN-3080-(2113)A-2,Dated 24th Nov.1980.
सर मार्गदर्शन करावे हि विनंती
कृपया ई मेल एसएमएस करावा जेणे करून सर्व अभिलेख आपल्याला पाठवता येतील.
स्नेहांकीत
संतोष शिंदे,
९८६००५००५६
Question by टेकाळे अशोक
27-03-2016
ashoktekale17@gmail.com
सर नमस्कार
माझ्या आजोबा ने एका शेतकर्यास २० गुंठे जमीन विकली परंतु त्या शेतकर्याने दोन एकरचा फेर घेऊन सातबारा वर नोंद घेतली आहे मी खरेदीखत तपासले असता त्यावर पुर्ण गटाचे म्हणजे २० एकर १३ गुंठे चे क्षेत्र आहे मी प्रांत अधिकारी यांचेकडे सदर फेर रद्द करण्यासाठी अपिल केले होते पण ते विलंब झाल्यामुळे फेटाळले असा निर्णय दिला आहे माझा प्रश्न आहे सातबारा व खरेदीखत यावरील क्षेत्र जुळत नसताना व आम्हाला गावात एक गुंठा सुद्धा जमीन शिल्लक राहिलेली नसताना फेर मंजूर केला आहे आता मला सदर खरेदीखत व फेर रद्द करने साठी काय करावे लागेल सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
प्रांत अधिकारी यांचे आदेशाविरुद्ध अपर जिल्हधिअक्रि यांचे कडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजीराजे
26-03-2016
shivajirajetarale@gmail.com
नमस्कार सर,
माझा प्रश्न असा आहे कि, ग्रामपंचायत ग्रामसभे नुसार eka ग्रामसेवकाने घेतलेला निर्णय दुसर्या ग्रामसभेने दुसर्या ग्रामसेवकाला बदलता येतो ka ?
Question by rohit patil
26-03-2016
rhtpatil168@gmail.com
१९२१ चे बक्षीस पत्र नोंदणी कृत असणे अनिवार्य आहे का तेवा असा कायदा होता का
Question by rohit patil
26-03-2016
rhtpatil168@gmail.com
सर मी फोन लावून तुमच्या शी बोलू शकतो का मला तुमचा फोन नु द्या
Question by किरण गिरे
26-03-2016
thekiran123@gmail.com
आदरणीय सर
मी एक सिटी सर्वे प्लॉट (कुलमुखत्यार म्हणून )घेतला आहे.परंतु। मूळ मालकाचे नाव सिटी सर्वे उतरा वरुन जात नाही .कारण असेकी सदर जागा(प्लॉट) वर्ग ब आहे .आणि सादर जागेच्या उतारा वर "दूसऱ्यास भाड्याने वा कराने अथवा वीकता येणार नाही या शर्थिवर "असा उल्लेख आहे.
प्रश्न
१)सदर जागेवरील शर्थ शिथिल करता येईल का व शर्थ शिथिल करण्यासाठी काय करावे?
2)सदर जागा बिगर शेती करता येईल का?
३) अ वर्ग करण्यासाठी काय करावे लागेल?
कृपया मार्ग दर्शन व्हावे
सदर सेरा कोणत्या आदेसानुसार आला या करिता फेरफार व मुल आदेश पहावे नंतर आदेसानुसार सक्षम अधिकारी यांच्या परवानगीने सर्तीबाबत कार्यवाही करता येयील
Reply by श्री.ओ.आर. अग्रवाल | उप जिल्हाधिकारी
Question by Smita ganpat khatpe
25-03-2016
smitakhatpe87@gmail.com
Maje pati yani jamin vikli ahe to tyancha kakachya mulane fhasawanuk karun getli ahe tari mala majhi jamin parat havi ahe tar mala kes karnyasathi sarkari vakil hava ahe karan amhi sadhya bhadyacha gharat rahto aani majuri karun pot bharti tyamule sarkari vakil mala milel ka aani tyanchi fee kiti asete aani tyasathi mala kai karave lagel mala margadarshan kara
आपणास गुन्हा दाखल करावयाचा असल्यास , आपण स्वत( आपले पती ) नजिकचे पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करू शकता . त्या साठी वकिलाची गरज नाही
मात्र आपणास फौजदारी तक्रार , न्यायिक दंडाधिकारी यांचे कडे करावयाची असल्यास , आपण वकील मिळण्यासाठी तालुका विधी प्राधिकरण यांचे कडे संपर्क साधा . गट विकास अधिकारी , तालुका विधी प्राधिकरणाचे सदस्य सचिव आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
