जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by संजय पांडुरंग पाटील
06-06-2015
patilsanjya@gmail.com
मी राधानगरी तालुक्यातील न्यू करंजे या गावातील रहिवाशी असून या गावास पुनर्वसन अधिनियम १९९९ मधील कलम ११(१) नुसार पुनर्वसना करिता अधिसूचना लागू करण्यात आलेली आहे. गावात माझ्या वडिलांच्या नावे वडीलोपार्जित घर असून चुलत काकांच्या नावे जमीन आहे. मी नोकरी निमित्त बाहेर गावी असल्याने माझा गावात कोणताही पुरावा नाही परंतु मी कामाच्या जागी स्थायिक नाही तरी मी पुनर्वसनास पात्र होतो का? पुनर्वसानाचा लाभ मला कशा प्रकारे मिळेल. या बाबत शासन निर्णय असल्यास त्याचा संदर्भ मिळावा.
आपली स्वताची जमीन प्रकल्पात गेली तरच आपल्या कुटुंबातील एकाला पुनर्वसनाचा लाभ मिळेल
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by संजय पांडुरंग पाटील
06-06-2015
patilsanjya@gmail.com
महोदय,
पुनर्वसना संदर्भात माहिती तसेच प्रक्रिये करिता करिता संदर्भ, फुस्तक सुचवावे
१. महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन कायदा १९९९
२. भू संपादन व पुनर्वसनकायदा -2013
हे दोन कायदे वाचा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गफार शेख
06-06-2015
shaikhgaphar26@gmail.com
माझ्या वडिलांचे 23-04-2015 रोजी निधन झाले आहे. माझ्या लहान भावाने माझ्या वडिलांकडून 15-11-2014 रोजी ते अडाणी असल्याचा फायदा घेऊन रजिस्टर मृत्यूपत्र करून घेऊन त्यांचे(माझ्या वडिलांचे ) नावावरील सर्व जमीन माझी व माझ्या बहीणींची सहमति न घेता स्वताच्या मुलाच्या एकट्याच्या (माझ्या पुतण्याच्या) नावावर, करून घेतली आहे. तर मला माझा हिस्सा कोणाच्या सहिने किवा न्यायालयात कोणत्या आधारे मिळवावा लागेल.
मिळकत स्वकस्तर्जित त आहे का वडिलोपार्जित ..............वडिलोपार्जित असेल तर आपल्याला केस चालवता येईल . वडिलांची जमीन स्वकास्तार्जीत असेल तर ते कोणालाही देवू शकतात
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by Dnyaneshwar yadav
05-06-2015
dnyaneshwaryadav67@gmail.com
maze sakhye chulat bhau &vadil ya madhye jaminiche vatni patra karayche ahe tyasathi mudrank shulk lagel ka ? Mudrank shulk Total bajar mulyachya kiti percent bharave lagte ?
आपण तहसीलदार यांचेकडून म ज मअ १९६६ चे कलम ८५ अन्वये वाटप करण्यासाठी तहसीलदारयांचे कडे अर्ज करा .
मात्र आपले वडील व चुलत भाऊ यांचेत , हिस्स्याबाबत वाद नसावा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Sir I am serving in Indian Army and residing in Motala, Distt Buldhana. I will apply many time for waste land for cultivation but not any reply till date : My name is Vijay Eknath Narwade Vill : Motala Dist Buldhana
A serving member of armed forces can get a agricultural land to the extent of 2 Ha of Jirayat or 1 Ha of seasonally irrigated land or 0.5 Ha of perenially irrigated land. Despite your application , you did not get any response , you may approach the concerned Collector and put your grievainces before him
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahamuni haribhau dattopant
04-06-2015
harishmahamuni@gmail.com
एक व्यक्तीचा स्मरणपत्र आधारे फेर झालेला आहे. त्यात वहिवाटी साठी सोयीचे व्हावे म्हणून स्मरण पत्र करून तेवले आहे. आसा उलेख आहे. तरी आता त्या व्यक्ती ला त्या वहिवाट शब्दा ऐवजी मलिकी हक्क आसा उलेख हवा आहे...तरी असा बदल करता येयील का.?.त्या व्यक्तीची ७/१२ वर मालकी हक्कातच नोंद आहे....
Question by नूतन संतोष कोलते
04-06-2015
smitakhatpe87@gmail.com
सर मी काळ दोन प्रश्न विचारले आहेत त्याचे उत्तर मला हवे आहे परंतु माझ्या नवर्याला जमीन हि वारसाहक्काने मिळाली आहे त्यामधे त्यांच्या तीन बहिणीची नावे लावली नाहीत कारण त्या हिस्सा मागतील पण जेव्हा माझ्या नवर्याने जमीन विकली तेव्हा त्यांची सही घेतली नाही तर त्या हक्क मागता येईल का आणि त्या तक्रार दाखल करू शकतात का त्यांच्या भावाने फसवले आहे आणि बहिणीच्या सह्या घेतल्या नाहीत मग मला कोर्टामध्ये दावा लावता येईल का कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
Question by NUTAN SANTOSH KOLTE
03-06-2015
smitakhatpe87@gmail.com
maje lagna 2008 sali jale majhya navryane lagna aghodar 1.5 ekar sheti tyancha mothya chulta tyanchya mulala vikli aani lagna jhalyawar 1.25 ekar vikali parantu maje mister he thode bolsat aani garib vrutivhe ahet yacha fayda gheun tyani kami paishamadhe jamin ghetali parantu majhya he aatta lakshyat alayane mi kahi karu shakte ka krupaya mala upay sangawa
Question by NUTAN SANTOSH KOLTE
03-06-2015
smitakhatpe87@gmail.com
मी प्रश्न केल्याप्रमाणे माझ्या नवर्याचे वडील हे ते लहान असताना वारले आणि आई हि आता साथ आठ वर्षापूर्वी वारली आहे आणि ह्याचा फायदा घेत त्यांचा चलत भावाने त्यांना फसून जमीन घेतली आणि जमीन दे मी तुला घर घेऊन देतो असे देखील सांगितले आणि माझ्या नवर्याला ते खरे वाटले परंतु त्याने घर घेऊन दिले नाही व २ लाख रुपैऎ फक्त दिले जमिनीला भाव नाही असे सांगितले तर मी यासाठी की करावे याची मला माहिती ध्यावी व उपाय सांगावा
Question by gaphar shaikh
03-06-2015
shaikhgaphar26@gmail.com
माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. माझ्या लहान भावाने माझ्या वडिलांकडून मृत्यूपत्र करून घेऊन त्यांचे(माझ्या वडिलांचे ) नावावरील सर्व जमीन माझी व माझ्या बहीणींची सहमति न घेता स्वताच्या मुलाच्या एकट्याच्या (माझ्या पुतण्याच्या) नावावर, करून घेतली आहे. तर मला माझा हिस्सा कोणाच्या सहिने किवा कसा मिळवावा लागेल.
वडिलांचे निधन केव्ह्ना झाले ?
वडिलांना त्यांची मिळकत मृत्यापत्र द्वारे देण्याचा पूर्ण अधिकार आहे
आपणास शंका असल्यास , मृत्यापत्राचे वैधतेबाबत न्यायालयात आव्हान द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पूजा मातोडे
02-06-2015
pajaamatode@gmail.com
दिवाणी न्यायालय च्या preciept अनुसार वाटणी करताना जमिनीचा तुकडा पडत असल्यास व पक्षकारा पैकी कोणीही पैश च्या स्वरूपात मोबदला घ्यायला तयार नसल्यास कोणत्या पद्धतीने विभाजन करावे या बाबत मार्गदर्शन करावे
Question by ज्ञानदेव पोळ
02-06-2015
dnyandev.pol@gmail.com
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील सासपडे या गावी आमची वडिलोपार्जित जमीन आहे. यापैकी सुरवे न. २४३ मध्ये ७१ गुंठे जमीन असून ती दोन्ही भावाच्या नावे प्रत्येकी ८ आणे अशी असून आमच्या ८ आणे हिश्यामध्ये आम्ही विहीर पडली आहे. मात्र दुसरा भावू विहीर नोंद करणेसाठी अर्जावर सही देत नाही त्यामुळे तलाठी विहीर नोंद करीत नाही व नोंद नसल्यामुळे वीज कने शन मिळत नाही तरी आम्ही नक्की काय करावे म्हणजे आमची विहीर नोंद होईल.
जमीन दोन भावांचे नावावर आहे . क्षेत्रानुसार भूमी अभिलेख खात्याकडून मोजणी करून घ्या
आकार्फोड पत्रकानुसार , स्वतंत्र 7/12 तयार होतील . भावाच्या संमतीची गरज भासणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Narshing
01-06-2015
narshingtugave@gmail.com
Sir नमस्ते
Kharedi khatache register yka vyaktine krun file parntu to achank myt zala tr ferfar nandvta yto ka ? Jr ferfar nandvla tr notice koala lavaychi ? Kiwa ferfar nondvaycha ki mytachi cars chavkasi krun cars bond kraychi ? Mytalacha varsacha ferfar nondvaycha ki kharedicha ferfar takaycha ? Kharedicha ferfar none krun tyacha varsala notice lagu krta yte ka ? Agodr varsachi none kraychi ki kharedichi bond kraychi yabdl details mahiti dya
Question by सुधाकर कामडी
01-06-2015
kamdisudhakar@gmail.com
पावर आॅफ अॅटर्नी वरून खरेदी केली असेल तरी मुळ जमिन मालकांना १५०(२) ची नोटीस बजावणे आवश्यक आहे का?
Question by नागेश काळे
31-05-2015
nageshkale051@gmail.com
अ.क्र. 65 ता . 29 - 4 - 20 १५ विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही दोन प्रश्न विचारले
१) सध्या जमिन कोणाचे ताब्यात आहे?
- ज्या लोकांनी खरेदी केली होती त्यांच्या वारसांच्या ताब्यात आहे.
२) जमीन शासन जमा झाली आहे का?
- नाही.
क्रुपया मार्गदर्शन करावे
Question by Dattatrayashinde
31-05-2015
dattatrayashinde315@gmail.com
1930 पुर्वी पासूनची कुळ आसुन् तहशीलदर, प्रांत,कोकण कमिशनर.याचे आदेश/निकाल कुलाच्या बाजूने तशीलदाराना आदेश देउनही बोरीवली तहशीलदारानी ट्रस्टचे नाव कमी करुण कुलाचे नाव लाउन् दिले नाही
Question by पी. कल्याण
31-05-2015
kalyan.pande789@gmail.com
माझ्या मित्राचे कर्क रोगाने निधन झाले तो ज्या ठिकाणी राहत होता ती सदनिका त्याच्या पत्नी च्या नावाने व ६ वर्षाची मुलगी च्या नावाने कोर्टा च्या आदेशाने झाली परंतु त्या सदनिकेवर बँके चे कर्ज असल्यामुळे ती सदनिका विक्री करणे आवश्य आहे सध्या पी आर कार्ड वर सुद्धा त्याच्या पत्नी चे व मुली चे नाव आहे तर ती सदनिका त्याच्या पत्नीला विक्री करता येईल का ? विक्री करताना मुलगी लहान असल्यामुळे आज्ञान पालन कर्ता म्हणून त्याची पत्नी सदर विक्री खत करू शकते का ? विक्री केल्या नंतर समोरील लोकांना पी आर कार्ड साठी काही आडचन येऊ शकते का ?
सदनिका आई व अज्ञान मुलीचे नावावर आहे
मुलीचा हिस्सा विकण्यासाठी न्यालायाची परवानगी घेणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महेंद्र हरीचंद्र कोरडे
31-05-2015
korademahendra@gmail.com
सख्ख्या काकांचा म्रुत्यु झाला ते अामचेकडे राहत होते त्यांचा सर्व सांभाळ अाम्हीच केला. त्यांना कोणीही वारस नाही. इतर सख्ये काका व अात्या यांचा सुद्धा म्रुत्यु झाला अाहे. त्यापैकी इतर सख्ये काका व एक अात्या यांचे म्रुत्यु दाखले अामचेकडे अाहेत. व एका अात्या बद्दल काहीच माहीती अवगत नाही. तरी सदर जमिन अामचे नावे करणेसाठी काय करावे लागेल.
सांभाळ केला म्हणून आपण केवळ एकटे वारस होऊ शकत नाही अथवा काकांची मिळकत आपले ektyache नावावर होऊशकत नाही. हिंदू वारस कायद्यानुसार जे वारस आहेत , त्या सर्वांची नावे मिल्कातीस लागतील
काकांनी मृत्यापत्र केले होते का ? केले असल्यास तहात कदाचित आपणास मिळकतदिली असेल . अशी वस्तुस्थि असेल तर , आपलेनावे जमीन होयील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सोमनाथ लोखंडे
29-05-2015
somnathlokhanderx@gmail.com
तीन भाऊ व एक बहीण यांच्या सामायिक क्षेत्रात बहिणीचे हक्क सोड पञ नोंद णीकृत दस्ताने एका च भावाने स्वताच्या नावावर करून घेतले तर बहिणीचा हिस्सा त्याचा नावावर होतो का
Question by प्रशांत कदम
29-05-2015
prashant.kadam7@gmail.com
श्री.किरण पानबुडे साहेब, धन्यवाद आपला प्रतिसादाबद्दल अभारी आहेत. कृपया खालील बाबत मार्गदर्शन मिळाल्यास आपला अभारी असेल
सदर जमिनीचा सातबारा उतारा पाहीला असता वर्ग-2 असा उल्लेख आहे. सदर जमिनीचा व्यवहार नोंदनिकृत खरेदी व्दारे दुय्यम निबंकाकडे नोंदविला आहे. तरी देखील याजमिनीस खरेदी देणा-या व्यक्तीचे नाव सातबारा उता-यावर आहे (सन.1971 रोजीच्या मालकाचे नाव). प्राप्त माहीतीनुसार ही जमिन इनामी आहे परंतु कोणता ईनाम हे माहीत नाही. तरी कृपया खालील बाबत मार्गदर्शन करावे.
1. या जमिनीचा नजराना आजच्या बाजार भावाने भरणे अपेक्षीत राहीत
किंवा खरेदी च्या वेळच्या मुल्यानुसार व त्याची प्रक्रिया काय असते
2. या संबधीत काही शासन निर्णय, कायदा असल्यास त्यांचे दि. अथवा
क्रमांक , विभाग
3. वरील जमिनीस भोगवट वर्ग -2 म्हणुन नाव लावता येवशकते का व
त्यासाठी काय प्रक्रीया असते. (कारण आम्ही ज्याचेकडुन खरेदी केलेले आहे त्या व्याक्तीचे नाव 7/12 आहे. )
Question by Ganesh Majarekar
28-05-2015
mjrkrganesh@gmail.com
साहेब, मीआपल्याकडे वादामध्ये असलेल्या कडूनिंब वृक्ष विषयी (अधिनिय) मा. प्रांत साहेबांकडे जुनाट व धोकादायक वृक्ष कडूनिंबाचे घराजवळचे २ते३ फूट अंतर असलेले वृक्षा बद्दल मा. प्रांताकडे २ ते अडीच महीन्यापूर्वी अर्ज केलेला आहेय तरी त्यानंतर त्यावरती गावातील पोलीसांनी फक्त अहवाल घेवून गेले. त्यानंतर अद्याप काहीच सुनावणी वा कारवाई झाली नाही. तरी साहेब पावसाळा सुरू होण्यापूर्वी सदर वृक्ष तात्कालळ तोडण्यासाठी आम्ही काय करावे...वा कुणाकडे पुन्हा अर्ज करावा..कृपया मार्गदर्शन करावे
Question by राकेश धिवरे
26-05-2015
rakeshdhivare@gmail.com
पडीत गायरान जमीनी वरील अतीक्रमन नियमीत होने साठी कुठे दाद मागावी सदर अतिक्रमन 1990 पूढील सदर जमीनीची वहिवाट असुन तिचा भोगवटा वाडवडीलान पासुन घेत आहेत तरी योग्य मार्गदर्शन हवे
गुरचरण , गायरान जमीन , केवळ सार्वजनिक प्रयोजनासाठी दिली जाते . अन्य कारणासाठी दिलीजात नाही . त्यामुळे अतिक्रमण निय्मंकुल होणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक पाटील
25-05-2015
rachnavinay123@gmail.com
सर, नमस्कार,
१) ४ वर्षांपूर्वी आजोबा व त्यांचे भाऊ (चुलते) ह्यांचे वाटप- पत्र रजिष्टर ऑफिस अलिबाग येथे नोंदणीकृत झाले होते. दस्त नंबर उपलब्ध आहे.
२) तसेच काही दिवसां-पूर्वी माझे वडील आत्या व काका ह्यांचे वाटप-पत्र रजिस्टर ऑफिस मध्ये झाले आहे.
दोन्ही वाटप-पत्राची प्रत हवी आहे. certified प्रत मिळण्यासाठी काय procedure आहे ?
Question by santosh jaware
25-05-2015
jaware_sb@rediffmail.com
एका ७/१२ उताऱ्यावर एकाच व्यक्तीचे नांव असून त्या व्यक्तीने त्यांच्या काका, चुलत भावांचे नावे हक्कसोड पत्र तयार करुन काही प्रत्येकी काही क्षेत्र दिले त्यानुसार नावे ७/१२ उताऱ्यावर दाखल करता येतील का?
Question by B Y Bhide
23-05-2015
eezpworkswardha@gmail.com
पूरग्रस्तांचे गावठाणात नागरी सुविधा पुरविणे बाबत शान निर्णय
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
