जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नगर परिषद हद्दीत असूनही माझा प्लॉट नगर परिषद नकाशावर नाही कारण आमचे प्लॉट तहसीलदार लेआऊट ३६ चे आहेत व नोंद नगर परिषद मध्ये नाही.
करिता नगर परिषद बांधकाम परवानगी देत नाही, गुंठेवारी मध्ये संपूर्ण प्लॉट चे एकदाच रूपांतरण करा असा त्यांचा आग्रह आहे आणि खर्च व उशीर दोन्ही लागेल, एका होम लोन कंपनीने अश्या वेळी तहसीलदारांची बांधकाम परवानगी काढणे सोपे आहे आणि मिळते असे सांगितलं हे खरे आहे काय आणि असल्यास कृपया माहिती द्यावी.
सर, गायरान जमीनीचा वारसा फेर घेण्याकरीता परवानगीची आवश्यकता असते का ? असल्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते.
प्रश्न कळत नाही. गायरान जमीन शासनाच्या मालकीची असते

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

खेरदी खता पूर्वी वक्ती मयत झाली असेल तर मालमत्ता हस्त्तरण कायदा १८८२ कलम ५ नुसार नोद रद्ध करता येते का
नाही
व्यक्ती हयात असताना , खरेदी खद नोंदणीकृत झाले त्या क्षणी मिळकत घेनाराचे नावे हस्तांतरित होते .
कलम ५ मधील living person म्हणजे biological person and not artificial person

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, पट्टा मंजुर झालेल्या गायरान जमीनीचा वारसा फेर घेण्याकरीता परवानगीची आवश्यकता असते का ? असल्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते.
१. गुरचरण जमीन शासने भाडेपट्ट्याने दिली आहे का ?
२. शासनाने भादेपात्याने दिलिअस्ल्यस , त्या प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय /तहसील कार्य्लायाने , आदेश काढले असतील . त्यामुळे पुन्हा परवानगीची गरज नाही

३. मात्र एक घोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक , म. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानुसार , खूप अपवादात्मक परस्स्थितीत , गुरचरण/गिरण जमीन दिली जाते .

ग्रामसभा मान्यता , मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संमती , भाडेपट्टा देण्यापूर्वी घेतली जाते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा.सराना माझा नमस्‍कार ,
1. सर मी 23 फेब्रुवारी 2010 रोजी शासन सेवेत रूजू झाले आहे. तसेच मी विभागीय दुययम परिक्षा 2012 मध्‍ये उर्तीण झाले व म‍हसूल अर्हता जानेवारी 2014 मध्‍ये उर्तीण झाले माझया पूर्वी रूजू झालेले माझे सहकारी हे डिसेंबर 2014 मध्‍ये महसूल अर्हता उत्‍तीर्ण झाले आहेत. तर त्‍याची विभागीय पदोन्‍न्‍ाती समीती मध्‍ये कर्मचारी ज्‍याची जेष्‍ठता क्रंमाक हा माझे पूर्वीचा आहे तर त्‍यांची निवड अ.का. म्‍हणून माझे नंतर होईल की माझे अगोदर.
1. ज्‍यावेळी पदोन्‍नती समितीची बैठक होईल त्‍यात माझे नावाचा विचार अगोदर होइल की नंतर परिक्षा उर्तीण झालेली दिनांक अगोदर धरतात की जेष्‍ठता क्रमाका नुसार निवड करतात कृपया याबाबत स्‍वंयस्‍पष्‍ट मार्गदर्शन करावे ही नम्र विंनती
सर श्रीमती रेणूका पांडे यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नाचे उतर आपण असे दिले आहे
महाराष्‍ट्र प्रशासकीय न्‍यायधिकरण यांनी नुकत्‍याच रायगड जिल्‍हा कर्मचारी प्रकरणात दिलेला निर्णया नुसार रेणूका पांडे यांचा क्रम त्‍यांचे नंतर अर्हता पास होणा-या कर्मचा-या पूर्वी त्‍यांचा अगाेदर लागेल तर मा.महाराष्‍ट्र प्रशासकीय न्‍यायधिकरण यांचे निकालाची दिंनाक आमच्‍या ई-मेल आयडी वर मिळेल तर मी आपला आभारी राहील
या संकेत स्थळावरही upload करण्यात आली आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपणास सदर निकालाची प्रत e mail करण्यात आली आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एका शेतकर्याने माहितीचा अधिकार मध्ये दहा शेतकर्याचे ७/१२ ची मागणी केली आहे ते ७/१२ देता येतील का व २०१४-१५ च्या खरीप पिकांचे पंचनामे ची मागणी केली आहे ती देता यईल का .
सर,
आम्ही तलाठी याला विचारले असता त्याने सांगितले कि ए.कु. में. ची नोंद नजरचुकीने झाले आहे,पण सर यामुळे आमची जमीन ७/१२ वर ए.कु. में नाव कमी करून चुलत्याने जमीन विकलेली आहे आता आम्ही काय करू शकतो ,तलाठी यांच्या विरोधात कोणाकडे अपील करू तसेच दावा कोणावर करू चुल्त्यावर करू का तलाठी यांच्यावर करू कृपया मार्गदर्शन करुन सहकार्य करावे. याला जबाबदार कोण .
सर, गायरान जमीनीचा वारसा फेर घेण्याची पध्दत काय आहे.
गुरचरण जमीन ग्रामपंचायत कडे व ग्रामपंचायतीचे ताब्यात असते .

त्यामुळे तीस वारस नोंद लावण्याचे प्रयोजन काय ?

गुरचरण जमीन , कब्जे हक्काने अथवा भाडे पत्त्याने खाजगी व्यक्तीस दिली असल्यास , वारस लावण्याचा प्रश्न उद्भवेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by atul ambhore
07-03-2015
ambhorea@yahoo.com

वाढीव जमिन महसुलावर इतर उपकर वसुल करता येतेा का? जसे १ रुपया जमिन महसुलवर ‍जि.प व ग्राप उपकर एकुण ९ पट वसुल केला जातो तसे

कृपया मार्गदर्शन मिळावे
नाही

वाढीव जमीन महसुलावर , उपकार आकारणी केली जात नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by atul ambhore
07-03-2015
ambhorea@yahoo.com

विज निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून महसुल आकारणी औद्यागिक अथवा व्यापार या दोन्हीपैकी कोणत्या वापरासाठी आकारणी करावी
वीज निर्मिती करणारी कंपनी केवळ वीज निर्मिती करत आहे का वितरण हि ?

व्यावसायिक दराने कर आकारणी करणे व्यवहार्य

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मु. पोयरे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथील जमिनीतील सात बारा मधील नाव कमी करण्यासाठी कृपया देवगड येथील तहसीलदार कार्यालयाचा तसेच संबंधित व्यक्ती , त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि इमेल चा पत्ता देण्याची कृपा करावी किंवा मला इमेल करावे जेणेकरून माझे सात बारातील नाव कमी करण्याचे प्रकरण त्यांना इमेल करून तसेच त्यावर त्यांचे मत घेऊन लागणाऱ्या कागद पत्रांची पूर्तता करता येईल आणि .त्यांची व्यक्तिश भेट घेता येईल.

आपला विश्वासू

कृष्णकांत पुजारे
०९८६७३९१५५५
krishnakantpujare@outlook.com
office no -02364-262204
e mail -tahsildardevgad@gmail.com
Jeevan Kambale, Tahsildar Devgad -9923897575
RNT-8856831923

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पानबूडे सर,
जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी जमिनीस अकृषक आदेश दिला आहे. कामगार तलाठी याने सदर अकृषक आदेशाची ७/१२ ऊतारयावर फेरफार टाकून नोंद घेतली आहे .सदर अकृषक आदेशामूळे मूळ ७/१२चे प्लाट्स पडल्यामूळे प्रत्येक प्लाट्स चा वेगवेगळे असे [१७] ७/१२ ऊतारे तलाठी याने तयार केले.व सदर प्लाटस वेग़वेग़ळ्या व्यक्तिंनी खरेदी घेतले आहेत.अशी वस्तूस्थिती असताना
सदर अकृषक आदेश बोगस आहे ,सदर आदेशाकामी बोगस ७/१२ ऊतारे व फेरफार,बोगस समंतीपत्र सादर केल्याचे चौकशीअंती सिध्ध झाले आहे.तसेच आदेशातील अटींचा भंग व ऊल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे
१. सदर अकृषक आदेश रद्द होऊ शकतो क?
२. सदर अकृषक आदेश रद्द झाल्यानतंर आदेशामूळे तयार झालेले प्लाट्स चे [१७] ७/१२ ऊतारे रद्द होतील का?
३.सदर बोगस ७/१२ ऊतारे ,फेरफार अजदार, कामगार तलाठी व मंडळाधीकारी यांनी संगनमताने तयार केले , सादर केले, व ख़रे आहेत म्हनून वापरले आहेत हे चौकशीकामी सिध्ध झाले आहे .तर सदर व्यक्तिंवर कोनती कारवाई केली जाईल.
१. बोगस सिद्ध झाले आहे असे आपण म्हणत आहात , पण कोठे बोगस सिद्ध झाले ? याचा उल्लेख करा.

२. आपणास जिल्हाधिकारी , ज्यांचे आदेशाने अकृषक परवानगी देण्यात आली , त्यांचे पुढे हि वस्तुस्थिती मांडून , अकृषक आदेश रद्द करून घ्या

३. अकृषक आदेश रद्द झाला कि , पुढील सर्व बाबी अपॉप रद्द होतील ( होणे अपेक्षित )

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
बेकायदेशीररित्या शेतजमीनीवरती केलेले अतिक्रमन दूर करण्याबात तहसिलदारांना. प्रांताना, अथवा जिल्हाधिकारयाना अधिकार आहेत का ?
खाजगी जमिनीवर झालेले अतिक्रमण , दूर करणे हे त्या जमीन मालकाची जबाबदारी

तहसीलदार , प्रांत हे केवळ सरकारी , जी महसूल खातेचे ताब्यातील मिळकतीतील अतिक्रमण काढण्यास सक्षम आहेत

कृपया ऑक्टोबर २०१३ चा शासन निर्णय पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
शांताबाई पवार या महिलेने सन 1990 मध्ये गट नं.362 क्रमांकाचे शेत घेतलेले आहे.खरेदीखतानुसार ज्या चतुरसिमा आहेत त्याच चतुरसिमेच्या आतील क्षेत्रफळवर सदर महिलेच्या आतापर्येंत वहिवाट व ताबा आहे. प्रत्यक्ष ताबा व चतुरसिमा ह्या गट नं 361 च्या आहेत.
त्यानंतर माझे वडिलांनी सन 2006 ला खरेदीखतानुसार गट नं. 361 क्रमांकाचे शेत विकत घेतले आहे.खरेदीखतानुसार ज्या चतुरसिमा आहेत त्याच चतुरसिमेच्या आतील क्षेत्रफळवर आमचा आतापर्येंत वहिवाट व ताबा आहे.प्रत्यक्ष ताबा व चतुरसिमा ह्या गट नं 362 च्या आहेत. या बाबत असे की,दोन्ही शेताचे वहिवाट, प्रत्यक्ष ताबा व चतुरसिमा बरोबर आहेत . परंतु खरेदी खतावरच गट नं. अदलाबदल झालेले आहेत. आम्ही शेतामध्ये विहिर खोदलेली आहे. सदर महिलेच्या शेतात विहिर नाही. तरी सदर गट नंबरचा झालेला तिडा कसा सुटेल ? या बाबत मार्गदर्शन करुन सहकार्य करावे.
आपणास पुन्हा नव्याने खरेदी करावे लागेल

अथवा मुन्द्रांक शुल्क व नोंदणी फी भरावयाची नसल्यास , प्रथम दुरुस्त खरेदी खात करण्यासाठी , दोघांनी अर्ज करावा . अर्ज मान्य झाल्यास , त्या प्रमाणे , दुरुस्त खरेदी खाते दोघांनी करून घ्यावीत .
अर्ज मान्य न झाल्यास , दिवाणी न्यायालयात , जुनी दोघ्जांची खरेदी खते रद्द करण्यासाठी दावा दाखल करावा . दाव्यामध्ये , प्रत्यक्ष अभिलेखापारमाणे , मालकी जाहीर करून मिळण्याची मागणी करावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by yogesh thorat
06-03-2015
thorat.yogesh4@gmail.com

सर मी १0 गुंठे भागायती शेत जमीन खरेदी करणार आहे तर stamp duty किती भरावी लागेल.
१. ग्रामीण भागात -जमिनीच्या शीघ्र सिद्ध गणकातील नमूद किमतीच्या ४ % + १ % नोंदणी शुल्क ( जास्तीत जास्त -३००००/- )

२. मुंबई महानगर प्रभाव शेत्र -जमिनीच्या शीघ्र सिद्ध गणकातील नमूद किमतीच्या ५ % + १ % नोंदणी शुल्क ( जास्तीत जास्त -३००००/- )

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, जिल्हाधिकारयांनी दिलेल्या अकृषक आदेशातील अटिंचा भंग व ऊल्लंघन झाले असेल तसेच आदेशाकामी बोगस ७/१२ ऊतारे व फेरफर सादर केले असतिल तसेच बोगस संमतीपत्र , व आदेश मिळण्याकामी ख़ोटी माहीती सादर केली असेल तर सदर अकृषक आदेश रद्द होऊ शकतो ना?
पुर्विपासुन वहीवाट असलेल्या स्मशानभूमीची नोंद 7/12 वर कशी घ्यावी ?
७/१२ वरती फक्त पिकन संदर्भात नोंद होते
स्मशान भूमीची नोंद घेता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
आम्ही तलाठी याला विचारले असता त्याने सांगितले कि ए.कु. में. ची नोंद नजरचुकीने झाले आहे,पण सर यामुळे आमची जमीन ७/१२ वर ए.कु. में नाव कमी करून चुलत्याने जमीन विकलेली आहे आता आम्ही काय करू शकतो ,तलाठी यांच्या विरोधात कोणाकडे अपील करू तसेच दावा कोणावर करू चुल्त्यावर करू का तलाठी यांच्यावर करू कृपया मार्गदर्शन करुन सहकार्य करावे. याला जबाबदार कोण .
'अ' ह्या व्यक्तीला दोन पत्नी आहेत.त्याचे मृत्यु नंतर शेतजमिनीमध्ये हिंदू वारसा कायद्यानुसार त्याचे वारस दोन पत्नी,मुले व मुली होतील काय ?
दुसरी पत्नी वारस होणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक : प्रभ २०१२/प्र. क्र. ३१७/ई-१० दि. २१/११/२०१४ अन्वये मंडळ अधिकारी व तलाठी यांना कायम प्रवास भत्ता रु. १२७५/- दरमहा देण्याबाबत शासन निर्णय पारित झालेला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी बऱ्याच तालुक्यामध्ये झालेली दिसून येत नाही. तसेच सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट मधूनही काढून टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. तरी, मंडळ अधिकारी व तलाठी यांना कायम प्रवास भत्ता देण्यात यावा अगर कसे ? याबाबत मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे.
तसेच जर कायम प्रवास भत्ता द्यायचा असेल तर कायम प्रवास भत्ता रु. १२७५ + प्रवास भत्ता रु. ४०० असे दोन्ही मिळून द्यायचा आहे का ?

Question by kitan
05-03-2015
kirant.lote94@gmail.com

Kharedi khatache paper kiti varshacya aat Talati karyalat jama karne bandhan kark ahe.
नोंदणीकृत दस्ताची वैधता हि कायम असते

मात्र ते वेळीच नोंद घेण्यासाठी तलाठी यांचे कडे सदर करणे आवश्यक

आपले खरेदी खताची नोंद न केल्यास , मुल मालक अन्य इसमास जमीन विकू शकतो , व त्या मुले आपला मालकी हक्क मिल्नेस आपणास कायदेशीर लढाई पार पाडावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री. किरन पाणबुडसो,
नमस्कार ,
मला स्मशानभूमी गावठाणात येते का? व बरेच वर्षापासून वाणी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा वापर स्मशानभूमीसाठी होत नसेल तर त्या जागेवर त्या समाजाला व्यक्तीशहा खाजगी व्यवसाय करता येतोका? ती जागा आम्ही त्यावेळी वाणी समाजाला स्मशानभूमीसाठी दिली होती व आता त्यांनी ६ गुंठे जागेची वाढून शेजारील आमच्या जागेच्या हद्दी पर्यंत जागा सिटी सेर्वेला लावली आहे कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
१.आपण वाणी समाजास जागा दिली म्हणजे , आपली खाजगी जागा दिली आहे का ?

२. शासनाने ने जागा दिली आहे?

जर आपण आपली खाजगी जागा दिली असेल तर , ती दान पत्राने दिली आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
आपले उत्तर मिळाले पण माझा हा प्रश्न होता कि ७/१२ वरील ए.कु. में.म्हणून लागलेले नाव कोण कमी करते आणि ते करण्यसाठी काय करावे लागते.अचानक नाव कमी झाल्यवर कोणाकडे अपील करावी लागते ते कसे होते आमची कोणाचीही सम्म्न्ती नसताना नाव कमी केले गेलेले आहे व ७/१२ वरील ए.कु. में नाव कमी करून जमीन विकलेली आहे.कुपया मार्गदर्शन करा.
ए कु मे हे नाव कमी करून , संबंधित इसम ज्या कुटुंबाचा म्यानेजर आहे त्या कुटुंबातील , अन्य सह धारकांची नावे , तलाठी याने लावणे आवश्यक

आपले प्रश्नाप्रमाणे , ए कु म्या हे अक्षरे कमी करून , अन्य सदस्यांची नावे न लावता , केवळ त्या प्रमुखाचेच नाव ७/१२ सादरी ठेवले . त्याचा फायदा घेत त्या इसमाने , जमीन विक्री केली आहे .

या बाबत आपणास , अपील करावे लागेल
मात्र ज्या इसमाने जमीन खरेदी केली आहे त्याचा यात दोष नाही

त्या मुले आपणास जमीन परत मिळणे कठीण आहे . मात्र आपण आपले हिस्स्याचे जमीन मुल्य आपले चुल्त्याकडून दिवाणी दावा दाखल करून वसूल करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एक्‍स व्‍यक्‍तीस गांवठाण प्‍लॉट मिळालेला आहे. सदर गांवठाण प्‍लॉटमध्‍ये सुधारणा करणेसाठी कर्ज काढणेची परवानगी देता येईल का ? येत असेल तर कोणत्‍या शासननिर्णयानूसार अथवा नियमानूसार
माहिती मिळावी हि विनंती
होय
मात्र , कर्ज फेड न झाल्यास , जे बँकेकडून कर्ज दिले जाणार आहे , त्या बँकेस , प्लॉट प्रदान करणाऱ्या , अधिकार्याच्या परवानगी शिवाय , प्लॉट ची विक्री करता येणार नाही ,अशी शर्त टाकावी .

या बाबत शासन निर्णय आहे , त्याचे अवलोकन करावे .शासन निर्णय प्राप्त करून घ्यावा ( माझ्याकडे प्रत नाही ) .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आईला पूरग्रस्त म्हणून भाडेकरारावर सोसायटीमध्ये भूखंड मिळाला आहे व त्यावर घर बांधले आहे. आई व वडिलांच्या मृत्युनंतर प्रॉपर्टी कार्डवर आमच्या दोघा भावांची नांवे लावून घेतली आहेत. आतां एका भावाच्या संमतीने एक नांव कमी करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?
आपले भावाने नोंदणीकृत दस्त द्वारे हक्क सोडणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.48 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3433
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3