जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by vinod
17-04-2015
vinodkumarchandnani@gmail.com

sir
मला शेत खरीदी करायची होती पण ती इनामी तर नाही हे तपासायची होती ते कसे तपास करू कृपया करून कडवा

७/१२ पहा
गाव नमुना नंबर ३ पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vinod
17-04-2015
vinodkumarchandnani@gmail.com

dear sir
जमीन कायदा ३६' ३६अ ३६ब म्हणजे काय ?
कलम ३६- जमिनीचा भोगवटा ( मालकी) हस्तांतरणीय व वंश परंपरागत आहे .
थोडक्यात जमिनीची विक्री करता येते ( शर्ती लागू नसतील तर )
जमीन भोगावातादाराचे निधन झाल्यावर , जमीन त्याचे वारसाचे नावावावर होते

३६ अ- आदिवासी मालकीच्या जमिनी बिगर आदिवासी व्यक्तीस हस्तांतरित ( विक्री , गहन ए ) करता येत नाही . बिगर आदिवाशीस हस्तांतरित करावयाची असल्यास शासनाची परवानगी आवश्यक

३६ ब- बिगर अदिवशी व्यक्तीकडे हस्तांतरित केलेली मिळकत , आदिवाशीस प्रत्यावार्तीत ( परत ) करण्यात आल्या ननतर हि , सदर जमीन बिगर अदिवशी व्यक्तीकडे भोग्वात्याखाली असल्यास , अश्या वापर बद्दल , नुकसान भरपाई देणे , अश्या बिगर आदिवासी व्यक्तीवर बंधनकारक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, MLRC च्या कलम १५७ चा अन्वेय वापर करण्याचा अधिकार कोणाला आहे?
अधिकार अभिलेख ( ७/१२ इ ) व फेरफार अभिलेख , यामधील नोंदी सत्य आहेत असे मानणे , अशी तरतूद आहे

यात कोणतेही अधिकार दिलेले नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

res. Sir,
is there any G.R. regarding to paternity leave?
सर, माझे आजोबा आणि चुलत आजोबा हे दोन सख्खे भाऊ होते. ते एकत्र शेती करायचे . पण जेव्हा कुळकायदा झाला तेव्हा ती जमीन चुलत आजोबांच्या नावे झाली. चुलत आजोबाना चार मुले होती, पण नंतर ती जमीन फक्त मोठ्या मुलाच्या नावे झाली. त्या जमिनीला त्यांनी वारस म्हणून इतर कोणाची नावे लावली नाहीत. आता माझ्या वडिलांचे व इतर तीन चुलत भावांची नावे लावली आहेत. पण फेरफार मध्ये माझ्या आजोबांचे नाव सापडत नाही. परंतु मोठ्या काकांनी त्या जमिनीला इतर वारस लावण्यास समती दिली होती. पण आता त्यांचा मुलगा एकट्याला अखंड हिस्सा मागतो, तर आम्ही काय करावे , आणि जर फेरफार मध्ये आजोबांचे नाव नसेल तर आम्ही हिस्सेदार होऊ शकत नाही का?असे झाले तर आम्ही काय करावे?
कुल म्हणून आपले आजोबा व चुलत आजोबांचे नाव लागले असेल तर , त्या दोघांचे सर्व वारसांची नावे आत्ता लागू शकतात /लावणे आवश्यक

मात्र कुल म्हणून फक्त आजोबांचे नाव लागले असेल तर , आत्ता काही करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी एक NA प्लाॉट घेतलेला अाहे.सर्हे नं १२४/१ मध्ये एकून क्षेत्र ६८४ आर आहे.२०० चौरस मीटर क्षत्र खरेदी केले आहे. परंतू आणेवारी शून्य प्वाईंट चव्वेचाळीस पै अशी आहे.परंतू अ नावाची व्यक्ती म्हणते की आणेवारीनुसार क्षत्र जुळत नाही.२०० चौरस मीटरला आणेवारी शून्य प्वाईंट छप्पन्न असायला पाहीजे.खरेदीपत्रातील आणेवारीनूसार क्षत्र घ्यावे लागेल.सदर प्लाॉट घेणारी मी चौथी व्यक्ती आहे.आणेवारीची दुरूस्ती कशी करावी.याबाबत मार्गद्रशऩ करावे.
६८४ र म्हणजे ६-८४-० हे र

बिनशेती आदेश झालेवर , प्लॉट चे क्षेत्र नौद केले जाते
७/१२ प्लॉट नंबर नमूद करून असतो

सदर जागा बोन्षेत आहे का पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ganesh pingale
15-04-2015
gpingale8181@gmail.com

धुळे येथे देश बंधू आणि मंजू गुप्ता faundation या नावाने trust आहे. सदर trust ला शेतजमीन विकत घ्यावयाची असल्यास परवानगीची आवशकता आहे का. परवानगीची आवशकता असल्यास कोणत्या नियम खाली परवानगी मागावी व कोणा कडे.
होय
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३ व या कायद्या खालील नियम अन्वये हि परवानगी घ्यावी लागेक्ल
जिल्हाधिकारी/अपर जिल्हाधिकारी हि परवानगी देण्यास सक्षम आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर आमची ग्रामपंचायत मधील घर मिळकत माझ्या चुलत भावाने तो स्वतः सरपंच असताना ग्रामसेवकला हाताशी धरून ती मिलकत दुसरया व्यक्तीच्या नावे करुण नंतर ती खरेदी खताने स्वताच्या एकट्याच्या नावावर केली व् नंतर ती जागा एका मोबाइल टावर कंपनी ला २००७ साली दिलली दिलीदिली . आता मला ती मिलकत परत मिलाव्न्यासाठी कोर्टात जावे लागेल का गट विकास अधिकारी कड़े तकरार देऊ???
आणि मोबाइल टावर वर स्थगिती आणून त्याचा मोबदला मागता येइल का??
जमिनीची शासकीय मोजणी पूर्ण होऊन त्यानूसार मिळालेल्या क प्रतीस एक वर्ष पूर्ण झालेले आहे. तर मिळालेली क प्रत तक्रारीवरून रद्द करता येते का? असल्यास तसे अधिकार कोणाला आहेत?
आपण फेरमोजणी करू शकता. संबंदित उपाधिक्षक भूमी अभिलेख , पहिली मोजणी रद्द करतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by kiran
12-04-2015
kirant.lote94@gmail.com

8/4/2015 roji act chi mahiti apn mala dili sir mi apla abhari ahe Kiran sir aapn mala tumcha phone number dila tr kup br holi kiwa mala .SMS 9637574810 ya number vr kra plz sir......
सर धरना ची जमींन पडित आहे ती जमींन शासन पिका करीता लिज वर देते काय कोना कड़े अर्ज करावे लागेल त्या बाबत शासन निर्णय आहे काय असेल तर mail करावा हि विनंती
लाभ क्षेत्रातील जमीन भाडे पत्त्याने देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना जमीन बाधित व्यक्तीस देई पर्यंत. आहेत तर
बुडीत क्षेत्रातील जमीन घळ भरणी पर्यंत देण्याचा अधिकार प्रकल्प प्राधिकर यास आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर जमीन खरेदी आणी नोंदणीची प्रक्रिया काय आहे आणि कमीतकमी किती गुंठे जमिनीची खरेदी आणि नोंदणी होऊ शकते .
तुकडे बंदी कायद्यान्वये , प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र निच्छित करण्यात आले आहे

सर्वसाधारण पाने
बागायत क्षेत्र-०५ गुंठे

एकपिक उत्पन्न देणारी जमीन - १५ गुंठे

वर्कस क्षेत्र- २० गुंठेक्षेत
या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची विक्री करता येत नाही
आपली जमीन, कोणत्या प्रवर्गात बसते त्या वरून , निच्छितकरा .

जमिंची नोंदणी म्हणजे , दुय्यम निबंधक यांचे कडे विक्रीबाबत , जमीन देणार व घेणार यांनी मुन्द्रंक शुल्क व नोंदणी फी भरून नोंदणी करणे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माजे आई आणि वडील हे दोनीही ह्यात नसून मला चार बहिणी असून त्या पेकी जर एक मयत असेल तर शेत जमीन आणि इतर मालमता नावावर करताना मयत बहिणीच्या वारसांचा कायी संबंध येतो काय का फक्त मृतूचा धाकला जोडला तर चालतोय
मयत बहिणीस मुलगा / मुलगी असल्यास ते वारस म्हणून त्यांची नावे मिल्कतीस लागतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मयत बहिणीच्या वारसांना मिळकती मध्ये हिस्सा आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, महसूल विभागातील कामाचा वाढता ताण व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या या वर काय तोडगा काढावा तसेच महसूल विभागातील वाढत चाललेल्या कामाचे व्यवस्थापन कसे करावे, बाबत मार्गदर्शन मिळावे.
मी कुळ आहे मी बांधकाम केले आहे मला परवागी घेणेआहे
कुल कायद्याखालील milaleli जमीन कुळाने कसणे आवश्यक आहे . कुलास jaminicha बिनशेती वापर करावयाचा असल्यास , जमीन कुळाचे नवे होणे आवश्यक. ३२ ग किंमत होणे, आवश्यक
जर ३२ ग किंमतया पूर्वी निच्छित झाली असल्यास, त्यास १० वर्षाहून जादा कालावधी झाले
आ असल्यास , आपण , नियोजन अधिकारी ( जिल्हाधिकारी - प्रादेशिक योजना जेथे आहेथेथे , मुख्याधिकारी - नगरपालिका क्षेत्र ) यांची परवानगी घेणे आवश्यक.
३२गकिंमत निच्छितझालेला कालावधी १० वर्षापेक्षा कमी असल्यास, बिनशेती वापरनिर्बंध दूर करण्यासाठी प्रथम प्रांत अधिकारीयांचीपरवानगी घेणे आवश्यक. नंतर बांधकाम परवानगीघ्यावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या मामाने माझ्या आई चे सात वर्षे पुर्वी फसवणूक करून हक्क सोड पञ केले वआता जमिन विकली आईला मोबदला दिला नाही आम्ही काय हरकत घेऊ
मामा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे आवश्यक . फौजदारी दाव्यात मोबदला मागणी करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. किरण पानबुडेसाहेब
उपजिल्हाधिकारी

मी प्रांत अधिकाऱ्यांकडे हिंदू- कुणबीचा दाखला मिळणेबाबत अर्ज सदर केलेला आहे. आणि त्यांनी त्यामध्ये खालील क्युरी काढली आहे.
१. आपण वडिलांचा शाळेचा दाखला जोडावा.
२. आपण आजोबांचा शाळेचा दाखला जोडावा. किंवा त्यांचे वाटपपत्र जोडावे.

परंतु वरीलप्रमाणे कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध नसल्यामुळे व आजोबांनी जमिनीचे वाटपपत्र करून न दिल्यामुळे मी अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडली आहेत.
१. वडिलांचा शाळेचा दाखला नाही म्हणून त्यांचे रेशनकार्ड, मतदानकार्ड आणि आधारकार्ड.
२. आजोबांचा शाळेचा दाखला व वाटपपत्र नाही म्हणून त्यांचे रेशनकार्ड, मतदानकार्ड आणि आधारकार्ड.

तरी सदर कागदपत्रानुसार मला कुणबीचा दाखला मिळेल का ? जर मिळत नसेल तर योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती.
आजोबांचे शाळेचे दाखल्यावर जातीचा , " kunbi " असा उलॆख असणे आवश्यक .
अन्य नातेवायिक काका , यांचा दाखला जोड .
या पैकी कागद पत्र नसल्यास तश्या आशयाचे प्रतिज्ञा पत्रदाखल करा .
मात्र सक्षम अधिकारी ( उपजिल्हाधिकारी ) अस्य प्रकरणात ( जेथे उपरोक्त कागदपत्र दाखलकेलेली नाहीत ) , chaukashi karun गुणवत्तेनुसार निर्णय घेतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by kiran
08-04-2015
kirant.lote94@gmail.com

Specific rilip act 22, 34, 37 plz sir ya act chi mahiti sanga...
आपण सदर कायदा वाचवा

त्यामध्ये नक्की कोणती अडचण आहे ती सांगा
कलम ३७ अन्वये , तात्पुरता व कायमचा मनाई हुकुम देण्याचा न्यायालयास अधिकार आहे

कलम२२ अन्वये - कराची अंमल बजावणी दुसरे पक्षाने करण्यासाठी , तसेच करार स्थावर मिळकती संदर्भातील असल्यास , अश्या मिळकतीचा ताबा मागण्याचा अधिकार या कलमाद्वारे आहे

कलम ३४ अन्वयेएखादे मिळकतीत मालकी हक्क मागण्याचा/ दुसर्याचा मालकीहक्कनाकारण्याचा दावा करण्याचा अधिकारदिलेला आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by rameshdthat
08-04-2015
ambhorea@yahoo.com

एखादया आदीवासी खातेधारकाकडे 30 गुंठे कुळाची 36 अ ला पात्र अशी जमिन आहे तर त्यापैकी २ गुंठे जमिन दुसऱ्या आदीवासी खातेधारकास विकत घेता येईल काय व असल्यास कसे या बाबत मार्गदर्शन करा
प्रथम आदिवाशी kulache नवे किंमत झालेली असावी .
किंमत निछिती कालावधी १० वर्षापेक्षा कमी असल्यास प्रथम, जिल्हाधिकारी यांची ३६ अ व त्या खालील नियाम्नांतर्गत परवानगी घ्यावी लागेल . नंतर प्रांताधिकारी यांची परवानगीघ्यावी. लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
एक प्रकरणात 7/12 वर अ, ब, क,ड, इ यांच्या नावे समाईक क्षेत्र आहे

प्रकरणात तहसिल कार्यालयात समान हिस्याने वाटणी करीता अर्ज आलेला आहे.

अ ही आई असुन इतर भावंडे आहेत

अशा प्रकरणात समान हिस्सा देण्याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत का ?

तुकडे बंदिचा भंग होत असल्यास काय करावे.?
जमिनीचे मालकी हक्क बाबत वाद नसल्यास , तहसीलदार म.ज.म.अ १९६६ चे कलम ८५ , म.ज मअ नियम अन्वये वाटप करू शकतात
मात्र तुकडे बंदीचा भंग होत असल्यास , तुक्देबंदी कायदा कलम८ अअ प्रमाणे , अश्या वाटपावर निर्बंध आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एकत्रित आणेवारीत असणार्‍या गटातील ७/१२ वरील सर्व लोकांची मिळून आणेवारी १९२ पै ऐवजी ११० पै भरत आहे. एकत्रितकरणापुर्वी ती १९२ पै होती. परंतू एकत्रिकरणानंतर काही लोकांची नावे विनाफेरफार नवीन ७/१२ वरून काढून टाकण्यात आली व काही नावीन घालण्यात आली. काही लोकांच्या नावांना कंस करण्यात आलेला आहे. परंतू आजपर्यंत कोणाच्याही ते लक्षात आलेले नाही व त्याच्याबद्दल तक्रारही नाही. ७/१२ वरील बर्‍याच लोकांचा अथवा त्यांच्या वारसांचा आजतागायत तपास नाही. वहीवाट फक्त आमचीच आहे. बाकी जमीन पड आहे. पण आणेवारीपेक्षा जास्त क्षेत्र गेली ५० वर्षे आमच्या ताब्यात व वहिवाटीत आहे. तर भविष्यात त्याची नोंद ७/१२ सदरी लावण्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन व्हावे.
एकत्रीकरण योजना या बाबत काही , मालकी हक्क बाबत, अभिलेखाबाबत वादअसल्यास त्याचे निरसन करण्याचा अधिकार तुक्देबंदी व तुक्देजोड कायद्याने , जमाबंदी आयुक्त यांना आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

देवस्थान इनाम जमिनीस कुळ कायदा लागु शकतो का?
नविन शर्तीने कुळ कायदा कलम ४३ अन्वये हस्तांतरीत होऊ शकते का?
कुल लागू शकतो
मात्र कलम ८८ k अ नुसार , किंमत निच्छित होऊ शकत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by arun tambile
07-04-2015
aruntambile789@gmail.com

Amchya आजोबा पासून dदेव्स्तांचीजमीन कसत आहोत tya मध्ये वाटेकरी mhanun jam इन मालकाचे नाव आणि माझ्या वडिलांचे व चुलत्याचे नाव उतार्यावर लागले आता ती jam इन वाटेकरी खाते फोडून magto अशे करता येदिअल का
जमीन देव्स्तःन इनाम आहे
आपला या जमिनीत कोणत्या कारणामुळे सम्भंद आहे?
देवस्थान जमिनीस मालक कसा असू शकतो .
देवस्थानजमीन देवासाठी दिलेली असते . त्यामुळे कायद्याने अश्या जमिनीचा मालकदेव आहे.
आपलाप्रश्न विस्ताराने मांडा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

देव्स्तान जमीन हक्कसोड़ पत्र होते का?
हक्क कोण सोडत आहे ?

स्वत देव हक्क सोडत नाहीत न ?????

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मला महाराष्ट्र गौणखनीज उत्खनन नीयम 2013 अन्वये गौण खनीजांचा ( रेती )साठा आणी वीक्री करण्यासाठी परवाना मीळू शकतोका

This page was generated in 0.27 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3