जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by ganesh babasaheb gite
06-03-2015
ganeshgite@7875mail.com
सर, जिल्हाधिकारयांनी दिलेल्या अकृषक आदेशातील अटिंचा भंग व ऊल्लंघन झाले असेल तसेच आदेशाकामी बोगस ७/१२ ऊतारे व फेरफर सादर केले असतिल तसेच बोगस संमतीपत्र , व आदेश मिळण्याकामी ख़ोटी माहीती सादर केली असेल तर सदर अकृषक आदेश रद्द होऊ शकतो ना?
Question by महाडीवाले के व्ही
06-03-2015
mahadiwalek.v2009@gmail.com
पुर्विपासुन वहीवाट असलेल्या स्मशानभूमीची नोंद 7/12 वर कशी घ्यावी ?
७/१२ वरती फक्त पिकन संदर्भात नोंद होते
स्मशान भूमीची नोंद घेता येत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रणजीत भोसले
06-03-2015
ranjit@gmail.com
सर,
आम्ही तलाठी याला विचारले असता त्याने सांगितले कि ए.कु. में. ची नोंद नजरचुकीने झाले आहे,पण सर यामुळे आमची जमीन ७/१२ वर ए.कु. में नाव कमी करून चुलत्याने जमीन विकलेली आहे आता आम्ही काय करू शकतो ,तलाठी यांच्या विरोधात कोणाकडे अपील करू तसेच दावा कोणावर करू चुल्त्यावर करू का तलाठी यांच्यावर करू कृपया मार्गदर्शन करुन सहकार्य करावे. याला जबाबदार कोण .
Question by Pradip Namdeo Borle
06-03-2015
pradip.borle6226@gmail.com
'अ' ह्या व्यक्तीला दोन पत्नी आहेत.त्याचे मृत्यु नंतर शेतजमिनीमध्ये हिंदू वारसा कायद्यानुसार त्याचे वारस दोन पत्नी,मुले व मुली होतील काय ?
Question by कुणाल अं. जाधव, लिपीक
05-03-2015
mr.k1387@gmail.com
महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक : प्रभ २०१२/प्र. क्र. ३१७/ई-१० दि. २१/११/२०१४ अन्वये मंडळ अधिकारी व तलाठी यांना कायम प्रवास भत्ता रु. १२७५/- दरमहा देण्याबाबत शासन निर्णय पारित झालेला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी बऱ्याच तालुक्यामध्ये झालेली दिसून येत नाही. तसेच सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट मधूनही काढून टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. तरी, मंडळ अधिकारी व तलाठी यांना कायम प्रवास भत्ता देण्यात यावा अगर कसे ? याबाबत मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे.
तसेच जर कायम प्रवास भत्ता द्यायचा असेल तर कायम प्रवास भत्ता रु. १२७५ + प्रवास भत्ता रु. ४०० असे दोन्ही मिळून द्यायचा आहे का ?
Question by kitan
05-03-2015
kirant.lote94@gmail.com
Kharedi khatache paper kiti varshacya aat Talati karyalat jama karne bandhan kark ahe.
नोंदणीकृत दस्ताची वैधता हि कायम असते
मात्र ते वेळीच नोंद घेण्यासाठी तलाठी यांचे कडे सदर करणे आवश्यक
आपले खरेदी खताची नोंद न केल्यास , मुल मालक अन्य इसमास जमीन विकू शकतो , व त्या मुले आपला मालकी हक्क मिल्नेस आपणास कायदेशीर लढाई पार पाडावी लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजी राजेमाहादिक
05-03-2015
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरन पाणबुडसो,
नमस्कार ,
मला स्मशानभूमी गावठाणात येते का? व बरेच वर्षापासून वाणी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा वापर स्मशानभूमीसाठी होत नसेल तर त्या जागेवर त्या समाजाला व्यक्तीशहा खाजगी व्यवसाय करता येतोका? ती जागा आम्ही त्यावेळी वाणी समाजाला स्मशानभूमीसाठी दिली होती व आता त्यांनी ६ गुंठे जागेची वाढून शेजारील आमच्या जागेच्या हद्दी पर्यंत जागा सिटी सेर्वेला लावली आहे कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
१.आपण वाणी समाजास जागा दिली म्हणजे , आपली खाजगी जागा दिली आहे का ?
२. शासनाने ने जागा दिली आहे?
जर आपण आपली खाजगी जागा दिली असेल तर , ती दान पत्राने दिली आहे का ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रणजीत भोसले
05-03-2015
ranjit@gmail.com
सर,
आपले उत्तर मिळाले पण माझा हा प्रश्न होता कि ७/१२ वरील ए.कु. में.म्हणून लागलेले नाव कोण कमी करते आणि ते करण्यसाठी काय करावे लागते.अचानक नाव कमी झाल्यवर कोणाकडे अपील करावी लागते ते कसे होते आमची कोणाचीही सम्म्न्ती नसताना नाव कमी केले गेलेले आहे व ७/१२ वरील ए.कु. में नाव कमी करून जमीन विकलेली आहे.कुपया मार्गदर्शन करा.
ए कु मे हे नाव कमी करून , संबंधित इसम ज्या कुटुंबाचा म्यानेजर आहे त्या कुटुंबातील , अन्य सह धारकांची नावे , तलाठी याने लावणे आवश्यक
आपले प्रश्नाप्रमाणे , ए कु म्या हे अक्षरे कमी करून , अन्य सदस्यांची नावे न लावता , केवळ त्या प्रमुखाचेच नाव ७/१२ सादरी ठेवले . त्याचा फायदा घेत त्या इसमाने , जमीन विक्री केली आहे .
या बाबत आपणास , अपील करावे लागेल
मात्र ज्या इसमाने जमीन खरेदी केली आहे त्याचा यात दोष नाही
त्या मुले आपणास जमीन परत मिळणे कठीण आहे . मात्र आपण आपले हिस्स्याचे जमीन मुल्य आपले चुल्त्याकडून दिवाणी दावा दाखल करून वसूल करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेंद्र पाटील
05-03-2015
patil.rajendra@gmail.com
एक्स व्यक्तीस गांवठाण प्लॉट मिळालेला आहे. सदर गांवठाण प्लॉटमध्ये सुधारणा करणेसाठी कर्ज काढणेची परवानगी देता येईल का ? येत असेल तर कोणत्या शासननिर्णयानूसार अथवा नियमानूसार
माहिती मिळावी हि विनंती
होय
मात्र , कर्ज फेड न झाल्यास , जे बँकेकडून कर्ज दिले जाणार आहे , त्या बँकेस , प्लॉट प्रदान करणाऱ्या , अधिकार्याच्या परवानगी शिवाय , प्लॉट ची विक्री करता येणार नाही ,अशी शर्त टाकावी .
या बाबत शासन निर्णय आहे , त्याचे अवलोकन करावे .शासन निर्णय प्राप्त करून घ्यावा ( माझ्याकडे प्रत नाही ) .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जयंत जेस्ते
05-03-2015
jpjeste@gmail.com
माझ्या आईला पूरग्रस्त म्हणून भाडेकरारावर सोसायटीमध्ये भूखंड मिळाला आहे व त्यावर घर बांधले आहे. आई व वडिलांच्या मृत्युनंतर प्रॉपर्टी कार्डवर आमच्या दोघा भावांची नांवे लावून घेतली आहेत. आतां एका भावाच्या संमतीने एक नांव कमी करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?
Question by गणेश शिंदे
05-03-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,जमीन इनामवर्ग ६ ब ची असून शासन निर्णया नुसार मुलाने वडील व चुलत्याकडून रजि.खरेदीखताने विकत घेतली असून त्याचे नाव ७/१२ सदरी दाखल आहे .सदर जमीन बिनशेती प्रयोजनार्थ विकसित करुन जुन्या शर्तीवर करुन भविष्यात बांधकाम करुन वेगवेगळ्या व्यक्तींना flat विक्री करावयाचे असल्यास आता नजराणा भरून सदर शेतजमीन बिन्शेतीकामी जुन्या शर्तीवर होऊ शकेल क?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by Sandeep Sutar
04-03-2015
sandeepms30@gmail.com
Dear sir,
We r constricting home on our land .road(10 x10 ) feet approx for going to home goes from other's land from main road.currently he is allowing but we think that in future he will oppose us or demand money for road so please tell us that what precautions should be taken to avoid dispute /inconvenience.Is there any option to get register if we pay money to that person for road?
@ संदीपजी ,
You need to purchase the piece of the land form the owner (if he is willing ) to avoid the future problem . You can purchase the land and get it registered.
If he is not willing , then there is no law under which he can be compelled to sell land to you .
only legal recourse you can avail is under Indian Easement Act .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रणजीत भोसले
04-03-2015
ranjitbhosale@gmail.com
सर,
माझे आजोबा १९७० साली मयत झाले आहेत ,७/१२ वरती १९७० ते १९७९ पर्यंत माझ्या मोठ्या चुलत्याचे नाव ए.कु. में.म्हणून लागलेले होते परंतु १९८० पासून ए.कु. में नावाचा कुठेही उल्लेख नाही हे नाव कसे कमी झाले, कोणी केले याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विंनती आम्ही याबाबत कोणाकडे अपील करावी ,तसेच नाव कमी करून जमीन विकलेली आहे ती आम्हला परत मिळेल का.आमची कोणाची समंती सही घेतलेली नाही.( फेर्फारला माझ्या वडिलांची व आत्यांची नावे वारसदार म्हणून लागलेली आहेत तेंवापासून ७/१२ वरती माझ्या मोठ्या चुलत्याचे नाव ए.कु. में.म्हणून लागलेले आहे चुलत्याने आमची कुणाची आणेवारी न लावता जमीन विकलेली आहे आमचे वाटप पत्र ,साम्म्न्ति पत्र ,हक्क सोड पत्र झालेले नाही .वडिलांच्या/ फेर्फारला माझ्या वडिलांची व आत्यांची नावे वारसदार म्हणून लागलेली आहेत )
आपले चुलत्याने जमीन विकलेली असल्याने , आपणास जमीन परत मिळणे थोडे कठीण आहे .
ज्या इसमाने जमीन खरेदी केली असेल , त्यास जमीन एकट्या चुलत्याच्या मालकीची होती कि एकत्र कुटुंबाची होती हे केवळ जमीन खरेदी करतेवेळी असलेल्या ७/१२ स्थितीवरून समजणे अश्यक्य होते . जर जमीन खरेदी करणाराने वर्तमानपत्रात जाहीत सूचना प्रसिद्ध केली असेल व आपण त्याचे खरेदीस हरकत घेतली नसेल , तर आपणास जमीन मिळण्याचा हक्क उरत नाही .
मात्र आपण आपले चुल्त्याकडून विल्क्लेल्या तुमच्या मिळकतीच्या जमिनीची किंमत दिवाणी न्यायालयाकडून वसूल करून घेऊ शकता . आपणास दिवाणी न्याय्यालाय्त दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नवनाथ चौधरी भोडणी
04-03-2015
navnathchoudhari.sibar@gmail.com
सर मी विचारलेल्या प्रश्नाचे क्रमांक ३८ हा रोजी ४/३/१५ यादिवशी होता .
सर आपण दिलेल्या प्रतिसाद बद्दल मनपूर्वक धन्यवाद , त्या उत्तर दाखवले आणि काम यशस्वी झाले.
Question by atul ambhore
04-03-2015
ambhorea@yahoo.com
मा.सर्वेाच्य न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकामाच्या वेळी पायाभरणी वा सपाटीकरणासाठी गौणखनिजा स्वामित्वण्धनाची रक्कम भरणेची आवश्यकता नाही माझा अशी शंका आहे की, केवळ रहीवाशी प्रयोजनार्थ असलेल्या इमारती बांधकामसाठी लागु आहे की सर्व प्रकारच्या इमारतीचे बांधकाम जसे की व्यापारी किंवा औदयोगिक प्रयोजनार्थसाठी
कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती
Question by मनोज पाटील
04-03-2015
manoj@gmail.com
तुकडे पद्धत म्हणजे नेमके काय ती कोण करतो त्यासाठी सह्या लागतात का
कृपया आपण तुकडे जोड व तुकडे बंदी कायदा वाचवा .
१. तुकडा म्हणजे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र, वाटप, विक्री या मुले निर्माण करणे
२. क्षेती किफायतशीर होण्यासाठी , जमिनीचे वापराप्रमाणे ( बागायत/एकपिकी/वर्कस) प्रमाणभूत क्षेत्र निच्छित करण्यात येते ,
३. या कायद्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र जर , विक्री , वाटप या मुले होणार असेल , तर अशे वाटप , विक्री करता येत नाही.
४. सर्व्साध्राणपणे ,
बागायत -०-०५-० हे आर
एकपिकी- ०-१५-० हे आर
वर्कस- ०-२०-० हे आर
हे प्रमाणभूत क्षेत्राचे प्रमाण आहे .
जर एखादे जमिनीचे ऐकून सर्वेय नंबर क्षेत्र २९ गुंठे आहे . हि जमीन वर्कस स्वरूपाचे आहे . जर या पैकी , मालकाने १५ गुंठे क्षेत्र विकावयाचे ठरवले तर , १४ गुंठे क्षेत्र उरते . मुल मालकाकडे व घेनाराकडे , प्रमाणभूत क्षेत्र पेक्षा क्षेत्र कमी राहत आहे , त्या मुले अश्या क्षेत्राची विक्री करता येत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल राउत
03-03-2015
rraut152@gmail.com
कार्यालयात सफाई कामगार पद मंजूर नसल्याने इतरत्र मजुरांना सफाई कामगार मानून तात्पुरत्या स्वरुपात घेत येईल का व त्याबाबत शसणाच्या काय सूचना आहे
पद मंजूत नसेल तर , घेत येणार नाही
काही पदना , उदा . data entry operator , यांना कंत्राटी पद्धतीने भरण्य बाबत शाषण विशेष शाषण निर्णयाने मान्यता देते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजय
03-03-2015
ajypsri@rediffmail.com
Question by atul ambhore
02-03-2015
ambhorea@yahoo.com
समजा एखादया कंपनीने 20 किमी लाबुंन पाण्याची पाईपलाईन आणुन वापर करत असेल तर सदर जमनीचे बिनशेती वापर झाला आहे असे समजून बिनशेती रकमेची वसुली करता येईल काय? व कसे याचे मार्गदर्शन करा
१. pipeline कोणत्या जमिनीवरून जाते , त्या वर अवलंबून आहे .
२. जर सरकारी जमिनीवरून जात असेल तर , त्या बाबत अतिक्रमण ( विना परवाना असेल ) शुल्क वसूल करावे .
३. अन्य खाजगी मिळकती बाबत , बिन शेती दंड प्रथम वसूल करून . नंतर बिन शेती आकार वसूल करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रेणूका रामराव पांडे
02-03-2015
rp171081@gmail.com
मा.सराना माझा नमस्कार ,
1. सर मी 23 फेब्रुवारी 2010 रोजी शासन सेवेत रूजू झाले आहे. तसेच मी विभागीय दुययम परिक्षा 2012 मध्ये उर्तीण झाले व महसूल अर्हता जानेवारी 2014 मध्ये उर्तीण झाले माझया पूर्वी रूजू झालेले माझे सहकारी हे डिसेंबर 2014 मध्ये महसूल अर्हता उत्तीर्ण झाले आहेत. तर त्याची विभागीय पदोन्न्ाती समीती मध्ये कर्मचारी ज्याची जेष्ठता क्रंमाक हा माझे पूर्वीचा आहे तर त्यांची निवड अ.का. म्हणून माझे नंतर होईल की माझे अगोदर.
1. ज्यावेळी पदोन्नती समितीची बैठक होईल त्यात माझे नावाचा विचार अगोदर होइल की नंतर परिक्षा उर्तीण झालेली दिनांक अगोदर धरतात की जेष्ठता क्रमाका नुसार निवड करतात कृपया याबाबत स्वंयस्पष्ट मार्गदर्शन करावे ही नम्र विंनती
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकन यांचे नुकत्याच रायगड जिल्हा कर्मचारी प्रकरणात दिलेल्या निर्णय नुसार आपली , ज्येष्टाथा , आपले सहकाराच्या पेक्षा वर राहील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by prakash korade
28-02-2015
alkashivam@rediffmail.com
एका व्यक्तीने पुनर्वसनात मिळालेली जमीन विकायला काढली आहे.विकत घेता येते का ? कोणत्या बाबी तपासाव्यात ? ...धन्यवाद
Question by श्रीकृष्ण कुटे
28-02-2015
dipakkute123@gmail.com
आपला प्रश्न/सूचना ... कोतवाल लोकांचे मानधन वाढवा 5000 रु मधे भागत नाही
Question by अजय पसरी
27-02-2015
ajypsri@rediffmail.com
सर उपविभागीय अधिकारी 4 वर्ष पासून अकुष्क कर त नहीं 90 दिवसा च्या कायदे ने काय कारवाई करावीय
आपण त्या बाबत sdo यांना , तसे पत्र द्या
"आपण ९० दिवसात अकृषक परवानगी न दिल्याने , कायद्या प्रमाणे जमीन अकृषक झाली आहे असे समजून मी , जमिनीचा अकृषक वापर सुरु करत आहे "
मी आपणास हे हि सांगू इच्छ्तो कि , आता जमीन अकृषक करण्याची आवश्यकता नाही
आपणास विकास परवानगी घ्यावी लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राकेश
27-02-2015
r.kakare@gmail.com
तुम्ही जर खालील कायद्याच्या कलम ६ नुसार
Hindu succession act Amendment २००५
६. Devolution of interest of The Hindu Succession (Amendment) Act, 2005-
6 (l). Devolution of interest in coparcenary property.
(1) On and from the commencement of the Hindu Succession (Amendment) Act, 2005, in a Joint Hindu family governed by the Mitakshara law, the daughter of a coparcener shall,--
(a) by birth become a coparcener in her own right the same manner as the son ;
|
|
मला प्रश्न आहे कि हि amendment - On and from the commencement of the Hindu Succession (Amendment) Act, 2005,
ह्याचा नक्की अर्थ कसा लावावा ??
amendment संमत झाले पासून , त्याची अंमलबजावणी पर्भावापासून
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सोनल तरटे
27-02-2015
tartesonal@gmail.com
sir, patil watan asle tar najarana bharawa lagto ka
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
