जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by devendra
01-05-2015
jyotitandel82@gmail.com

सर
जमिनीस दोन कुले कमला व राघो आहेत मालक पुशोत्तम कडून कुळ राघोने १९५६ साली खारेदिखाताने जमिनीपैकी १७ गुंठे जमीन खरेदी केली व सदर जमीन कुळ राघोने दुसर्या व्यक्ती जनार्दन ला विकली आता सातबारा उतार्यावर मालक म्हणून मुल मालक पुरषोत्तम व जनादन आहेत व कुल म्हणून कमला आहे एकूण जमीन ९३ गुंठे आहे सदर जमीन कुल कमला सर्वे करू शकत नाही परतू सदर मालक जनार्दन च्या हिस्सा १७ गुंठे चा आकार फोड करू शकतो काय कारण जनार्दन जमीन मोजणीसाठी परवानगी देत नाही व मुल मालक मयत असून ते बाहेगावी राहतात सदर जमिनीचा धारा कुल भरतो तेव्हाजनार्दन च्या खरेदी खताच्या आधारे आकार फोड करू शकतो काय व आकार फोडाच्या आधारे सातबारा विभक्त करू शकतो काय मार्गदर्शन करावे
या पूर्वी उत्तर दिले आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by devendra
01-05-2015
jyotitandel82@gmail.com

सर
श्री बेंडू यास जमीन मालक श्री बाजी यांनी १८९२ साली एकूण २० सर्वे नंबर च्या जमिनीपैकी त्यांचा १/२ हिस्सा फारोखात खताने विकला परंतु फरोक्त खातात तुम्ही सांगाल तेव्हा स्व खर्चाने नावी करून देवू असा उल्लेख केला बेंडू हे अशिक्षित होते सदर खरेदी खात करणारे बेंडू व बाजी मयत झाले १९४५ साली बेंडू चा मुलगा राम हा बाजीचा मुलगा पुरषोत्तम कडे गेल्यावर त्यांनी सदर खरेदी खताचे पुन्हा साठे पत्र तयार करून राम कडून ३००० रुपये पुन्हा घेतले पण साठे पत्र तील जमीन हि बाजी किवा पुर्शोतामच्या नावी नोवती तेवा त्यांनी त्यांच्या नवे असलेल्या २० जागा नावी करण्याचा कागद तयार केला पण त्या पैकी १० जागा नावी करून देण्यात आल्या व १८९२ च्या खरेदी खतावर १९४६ साली सदर जागा देण्या आली असा शेर मारून पुरषोत्तम याने सही केली आहे राम हा अशीषित असल्याने १८९२ च्या खरेदी खात काय लिहिल्याच माहित नोव्हात अश्या वेळी १८९२ च्या खरेदी खातात दिलेल्या जमिनी बाजीच्या नावी नसतानाही त्यांनी खरेदीखत करून दिले व त्यांच्या मुलाने स्व खर्चाने नावी करून द्यावयाचे असतानाही राम कडून १९४६ साली ३००० घेतले व जमीनही दिली नाही व जमीन दिल्याचा शेर लिहिला आहे सदर व्यवहारात रामची फसवणूक झाली अशावेळी जमीन मालकावर दावा करू शकतो काय
नमस्कार सर , मी 2007 साली श्री बालू जमभुलकर या व्यक्ति कडून 47 गुंठे जमीन विकत घेतली . हा व्यवहार चालू असताना ती व्यक्ति मयत जाली . नंतर आम्ही त्याच्या पत्नी कडून व आई कडून सदर व्यवहार पूर्ण करून घेतला. बालू जामभुलकर याला 3 भाऊ व 5 बहिनी आहेत . त्यातील एक बहिन मयत आहे. व्यवहार चालू असताना आम्ही त्याच्या 4 बहिनिंच हक्क सोड पात्र बनावुन घेतल आहे व त्याचा मोबदला त्याना दिलेला आहे.जी बहिन मयत आहे तिच्या मुलानी व बालू जामभुलकर च्या एका भावाने अत्ता (2014 साली)कोर्टात दावा दाखल केलेला आहे. 1992 साली त्यांच वाटनी पत्र ज़ल्याची नोंद फेरफार वर आहे.( वडिल मयत ज़ल्यावर 8 वर्षानी वतनी जाली) त्यावेळी बहिनिना कुठलाही वाटा दिल गेल नवत .म्हणून आम्ही जमीन घेताना त्यांच हक्का सोड करूँ घेतल. त्याच्यात वाटणी पत्र जाला त्याच्या आधी (अंदाजे 10 वर्ष) बहिणीचा मृतु जाला आहे . वाटणी पत्र जाल तेव्हा त्याच्या भावाच्या वाट्याला दूसरी जमीन दिलेली आहे. त्यानी आमच्यावर केलेला दावा योग्य आहे का ? भावाला दूसरी जागा दिली असताना ह्याजगेत कितपत हक्क आहे? असल्यास कोणत्या कायद्या प्रमाने त्याना दोघना हिस्सा मिळेल ? व किती हिस्सा मिळेल? कायद्या नुसार पुरावा म्हणुन फेरफार योग्य व पुरेसा आहेका?
१.दावा दाखल करण्याचा प्रत्येकाला हक्क आह्रे . त्यांचा दावा योग्य आहे का नाही त्या बद्दल , न्यायालय ठरवेल .

२.जमीन घेताना आपण title search केला असेल व papar notice दिली असेल व त्या वेळी कोणी हरकत घेतली नसेल तर , आपणा विरुद्ध निकाल जाणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमचे गावी वडिलोपार्जित घर असूनत्यावर चुलतभावांचा ताबा असून घरपट्टी व सर्व कर आम्ही
भरत असूनआम्हाला ताबा मिळण्यासाठी काय करावे लागेल
कोठे अर्ज केला पाहिजे याची
माहिती मिळावी







वडिलोपार्जित घर म्हणजे आजोबांचे घर आहे का ?
जर आजोबांचे घर असेल तर आपणास त्या मध्ये हक्क आहे
आपण आपला हिस्सा मिल्नेसाठी व हिस्स्याच्या मिळकतीचा ताबा मिल्नेसाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
शासनाने सेवा अधिनियम लागू केला आहे सदर अधिनियमाची अंमलबजावणी करतांना ब-याच अडचणी समोर येतील असे वाटते उदा. जून-जूलै या महिन्‍यामधे मोठया प्रमाणावर जातीची,उत्‍पन्‍नाची रहीवाशी प्रमाणपत्र द्यावी लागतात द्याव्‍या लागणा-या प्रमाणपत्र्ाची संख्‍या विचारात घेता कमी वेळात जास्‍तीतजास्‍त प्रमाणपत्र्े निर्गमीत करतांना अडचण निर्माण होणार आहे
त्‍यासाठी जादा कर्मचारी वर्गही नाही तसेच सदरचे काळात प्राथम्‍यक्रमाने करावयाची कामे जसे नैसर्गीक अपत्‍ती निवडणूका इ.मुळे वेळेत कामे करणे अवघड होणार आहे अशा प्रसंगी सेवा अधिनियमातील तरतुदीनुसार होणारा दंड इ. बाबत मार्गदर्शन करणेस विनंती आहे.

Question by SHAM
30-04-2015
choudhary.sham64@gmail.com

मा.सर नमस्‍कार ,
सर ज्‍यावेळी पदोन्‍नती समतिीची बैठक असते त्‍यात तलाठी तून मंडळ अधिकारी यापदासाठी निवड करायची असल्‍यास त्‍याची नियमावली ही वेगळी असते की लिपीक जक अ.का याचे सारखी त्‍याची निवड करण्‍याची पध्‍दत आहे जर वेगळी असेल तर त्‍याचे शासन निर्णय किंवा परिपत्रकाची दिंनाक देण्‍यात येवून मार्गदर्शन व्‍हावे ही विंनती आहे
नियामवली वेगळी आहे . मात्र पदोन्नती तत्वे सारखीच आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

38 e pramane jamin decleare hone mhnje kay
नमस्कार

साहेब मी करमाळा तालुकयातील रहीवासी आहे. आमच्या आजोबांना 1955 साली कुळ कायद्याने सर्व साधारण कुळ म्हणून जमीन मिळाली. माझे आजोबा अशिक्षित असल्याने २ पार्ट्यानी त्याचा बरोबर व्यवहार करून जमीन विकत घेतली. त्यानंतर ७/१२ काढला तर त्यावर कुळ कायद्या विरूद्ध व्यवहार असा ईतर हक्की शेरा येतो. साहेब आज विचार केला तर या घटनेला खूप वर्षे लोटली आहेत. त्यामुळे आम्ही काय करावे क्रुपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
आता काही करता येणार नाही

१. सध्या जमीन कोणाचे ताब्यात आहे ?
२. जमीन शासन जमा झाली आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, महाराष्ट्र जमिन महसुल अधिनीयम १९६६ चे कलम ३६ मघ्ये कोणकोणत्या प्रकारच्या जमिनीचा समावेश केलेला आहे./अंतर्भाव आहे.

Question by Vinod Dapat
29-04-2015
vinoddapat@gmail.com

नमस्कार सर
१.कुळ कायदा कलम ४३ च्या शती॓स पात्र.
म. ज. म. अ. १९६६ कलम ३६ व ३६ अन्वये हस्तांतरणास बंदी .
२. फोरेस्ट खात्याच्या खाजगी वन म्हनून १ ते ६ अटीवर.
ही जागा नावावर करने आहे आदीवासी कडून आदीवासी कडे.सूरवाती प्रसून या बद्दल माहीती सांगावी. ?
१. कुल कायद्या अंतर्गत जमीन व्यक्तीचे नावे झाल्यावर , अश्या कुल मालकास , १० वर्षाचे आत मिळकत विकावयाची असल्यास , प्रांत अधिकारी यांची परवानगी आवश्यक

२.सदर उजमीन आदिवासी खातेदार यांचे मालकीची आहे त्यामुळे , अशी जमीन शासनाचे पूर्व परवानगी शिवाय विकत येत नाही

३.जमि खाक्गी वन आहे त्या मुले या जागे वर वन या प्रयोजानाशिवाय अन्य वापर करता येनात नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vinod Dapat
29-04-2015
vinoddapat@gmail.com

नमस्कार सर
१.कुळ कायदा कलम ४३ च्या शती॓स पात्र.
म. ज. म. अ. १९६६ कलम ३६ व ३६ अन्वये हस्तांतरणास बंदी .
२. फोरेस्ट खात्याच्या खाजगी वन म्हनून १ ते ६ अटीवर.
ही जागा नावावर करने आहे आदीवासी कडून आदीवासी कडे.सूरवाती प्रसून या बद्दल माहीती सांगावी. ?

Question by SHAM
29-04-2015
choudhary.sham64@gmail.com

नमस्‍कार सर मी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे लिपीक या पदावर आहे .आमच्‍या येथे पदोन्‍न्‍ाती समितीची बैठक होणार आहे .बैठकी पूर्वी लिपीक संर्गातून पात्रता यादरी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे .परतु या यादी मध्‍ये जे अगोदर महसूल अर्हता उर्तीण झाले त्‍यांचा क्रंमाक हा नंतर पास झालेल्‍या लिपीका नंतर आहे मी महसूल अर्हता परिक्षा उर्तीण 18.01.2014 रोजी झालो .पंरतु यादी मध्‍ये लिपीक संर्गातील जेष्‍ठते नुसार यादी प्रसिध्‍द केली आहे.माझा त्‍यात 20 क्रंमाकावर माझे नांव आहे जे 19 जण आहे त्‍याचा जेष्‍ठता क्रमाक हा माझे पूर्वीचा आहे म्‍हणजे 870 व माझा जेष्‍ठता क्रमाक 890 आहे व ज्‍याचा 870 हा जेष्‍ठता क्रमाक आहे तो नंतर अर्हता परिक्षा उर्तीण केलेला आहे आता पदोन्‍नती च्‍या बैठकीत जेष्‍ठते नुसार निवड करणार की अर्हता परिक्षा उर्तीण दिनांका नुसार जर जेष्‍ठते नुसार निवड होत असेल तर मी कोणती भूमीका घ्‍यायला पाहिजे या बाबत कृपया मार्गदर्शन.
साहेब, नमस्ते
१. वडिलांच्या कालावधीत झालेल्या मोजणीची माहिती आता हवी असल्यास कुठे आणि कशी मिळेल?
२. खरीप जमिनीची मोजणी झाली आहे परंतु त्याचे रेकॉर्ड आमच्या कडे नाहीत कसे मिळतील?
३. एकत्र कुटुंबा मध्ये मोजणी कारवाया तयार नसतील तर काय करावे?
४. ठाणे आत्ताच्या पालघर जिल्यात मोजणी साठी कोणाकडे जावे व त्यास किती वेळ व खर्च येईल?

आपला कृपाभिलाषी
आपण जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पालघर या कार्यालयाशी संपर्क करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
जिल्हाधिकारी यांनी दीलेला बिगरशेती आदेश रद्द करण्याचा कोनाला अधिकार आहे .
सरकारी कर्मचारी यांना निवडणूक लडता येते का
Gd.evng sir.
Maza asaa question aahe ki geli 9 varsh amhi mhanje maze kaka ani maze vadil hyani bahinicha hakk sod patrak ani power of atony amchya navi kelay resistar kelay..ani amchya zaminit mazi aatya hine geli 25 years ghar bandlay pan ti zaimin navavar karnyas sagte tar ti hou shakte ka?ani hakksod karun dilay utter have aahe
देवस्थान इनाम जमिनी (७) भोगवटदार वर्ग-२ या जमिनीच्या विक्री परवानगीसाठी काय करावे लागेल?
देवस्थान जमीन la जमीन महसूल सूट कायदा १८६३ लागू आहे .
या कायद्याच्या उपकलम ३ कलम ८ , नुसार देवस्थान जमीन विक्री करता येत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

संगणकावरील ७/१२ उतारा काढला असता मुल मालकांना कंस असून हा ७/१२ बंद झाला आहे,असे म्हटले आहे.कृपया स्पष्ट करावे..
Sir
Maza ha khup mahatvacha que ahe plz to kasa solve hoil he sanga
Prashna mi samor mandt ahe
Mi chandrapur jilha cha rahvasi ahe
Amche ajoba name karuji he shet krit hote 1952 te 1958 paryant asa record ahe mi goda kela tya khasra patrakavr mud malkache nav patta kulache adhikar mhnje mazya abajiche nav ahe tyana 2 mul ahet maze ajoba 1959 madhe marn pavle tr mazya ajine dirashi lagn kel tyache nav mengaji ahe tya record nusar 1960-61 madhe tyani te shet aplya navani kel ani te 2001 madhe marn pavle tya nantr 2003 madhe tyachya varsani aple nav 7/12 vr chadhavile pan amche nav nai chad vile tr amhi prashna kela tyana amche nav ka nai chadhvile mhntl tr te mhnale ki tumchya vadilach ethe kahich nai tr kas chadhvaych nav
Tr sir mala he sanga mazya abaji cha kahich nai ka tya shetavr adhikar ani part ek que kul he badlt jate ka. Kulat nav rahil tr patta tyachyach navacha asto ka
Plz sir mala hya que che ans lavkr dya karn mala maza adhikar midvaycha ahe
आपले आजोबा १९५२ ते १९५८ कालावधीत कुल होते . कुल कायद्यानुसार ते कृषक दिनी म्हणजे १ एप्रिल १९५७ रोजी मिळकतीचे मालक होते. त्यांचे पश्चात आपलेवडील , चुलते व आजीचे नाव वारस म्हणून मिल्कातीसलागणे आवश्यक होते.
ज्या फेरफार पत्रकाने चुलत आजोबांचे वनंतर त्यांचे वारसांचे नावदाखल झाले त्या विरुद्ध प्रांत अधिकारी यांचे कडे अपील दाखलकरा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

What is mean by Probate ?
Probate chi nond karnyasathi 1 application majhyakade aale ahe tya sambhadhi, which document i need with this probate mahiti dyawi
Probate is a legal document. Receipt of probate is the first step in the legal process of administering the estate of a deceased person, resolving all claims and distributing the deceased person's property under a will. A probate court (surrogate court) decides the legal validity of a testator's (person's) will and grants its approval, also known as granting probate, to the executor. The probated will then becomes a legal instrument that may be enforced by the executor in the law courts if necessary. A probate also officially appoints the executor (or personal representative), generally named in the will, as having legal power to dispose of the testator's assets in the manner specified in the testator's will. However, through the probate process a will may be contested.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

The court process by which a Will is proved valid or invalid. The legal process wherein the estate of a decedent is administered.
When a person dies, his or her estate must go through probate, which is a process overseen by a probate court. If the decedent leaves a will directing how his or her property should be distributed after death, the probate court must determine if it should be admitted to probate and given legal effect. If the decedent dies intestate—without leaving a will—the court appoints a Personal Representative to distribute the decedent's property according to the laws of Descent and Distribution. These laws direct the distribution of assets based on hereditary succession.
In general, the probate process involves collecting the decedent's assets, liquidating liabilities, paying necessary taxes, and distributing property to heirs.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

साहेब, नमस्कार
आमची वडलोपार्जीत जमिनीचे वाटप वडिलांनी त्यांच्या भावान मध्ये केले आहे. परंतु जमीन नावी असल्या प्रमाणे ताब्यात नसून अ ची नवी जमीन ब च्या ताब्यात आहे ताब्यात दिलेली जमीन एक गठ्ठा आहे व नावी असलेली जमीन वेगवेगळय ठिकाणी आहे.
१. सदर जमीन ताब्या प्रमाणे नावी करायची असल्यास काय करावे ?
२. त्यास किती खर्च येईल?
३. नावी असल्या प्रमाणे ताबा घ्यावयाचा असल्यास काय करावे लागेल व खर्च काय येईल ?
४. तसा अर्ज कुणाकडे करावा लागेल?
आपला कृपाभिलाषी
दुरुस्ती वाटप पत्र करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब,
आम्ही मित्र मिळून शेतजमीन खरेदी करत आहोत तरी सदरहू जमिनीचा एक ७/१२ ज्यात आम्हा मित्रांची नवे लागू शकतात काय? पुढे आम्हा पैकी कुणालाही त्यातील जमीन विक्री करताना काही त्रास होवू शकतो का? त्यासाठी काय करावे?

आपला कृपाभिलाशी
आपण सर्व मित्र एकत्रित जमीन खरेदी करू शकता . मात्र आपण शेतकरी असणे आवश्यक . म्हणजे आपले नावे शेतजमीन असावी . महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन कायदा १९४८ व त्या खालील नियम मध्ये बिगर शेतकरी व्यक्तीस शेत जमीन खरेदी करावयाची असल्यास , जिल्हाधिकारी परवानगी देण्याची तरतूद आहे . मात्र अश्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न १२००० पेक्षा जादा असता कामा नये . त्या मुले परवानगी मिळणे अशक्य . मात्र आपण बिनशेती जमीन खरेदी करू शकता .
महाराष्ट्र तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्या नुसार , प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र खरेदी करता येत नाही .

प्रमाणभूत क्षेत्र प्रमाण प्रत्येक जिल्ह्यात वेगळे आहे . त्या बाबत आपणास तलाठी , भूमी अभिलेख खाते यांचे कडे माहिती मिळेल .
कोंकण जिल्ह्यात हे प्रमाण
वर्कस शेती २० गुंठे
भात शेती १५ गुंठे
बागायत शेती ५ गुंठे
असे आहे

त्यामुळे आपण चार मित्र असाल , तर खरेदी करताना , प्रत्येकी या प्रमाणभूत क्षेत्र एवढे अथवा त्या पेक्षा जादा क्षेत्र खरेदी आवश्यक


उदा
खरेदी करण्यात येणाऱ्या जमिनीचे क्षेत्र ६५ गुंठे आहे . जमीन भातशेती स्वरुपाची आहे . व आपण ३ मित्र आहात तर , प्रत्येकी कमीत कमी १५ गुंठे क्षेत्र खरेदी करणे आवश्यक

एकास जमीन विक्री करावयाची असल्यास दोन मित्रांना अथवा एका मित्रासच विकण्याचे बंधन नाही . आपण कोणास हि विकू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by devendra
27-04-2015
jyotitandel82@gmail.com

सर
जमिनीस १९३२ सालापासून सावर्क्षित कुल असल्यास परतू ३२ग ते ३२ आर लागू नसल्यास त्या जमिनीवर कुलाचा काही हक्क राहतो का तसेच सदर जमीन कुलाच्या ताब्यात आहे अशावेळी कुल सदर जमीन मालक कडून कश्या प्रकारे नावे करता येईल याचे मार्गदर्शन करावे
जमिनीचे स्वरूप काय आहे त्यामुळे ३२ ग ते ३२ र लागू होत नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir E- Class(VARG ) jaminivar Atikarman Gayran jamin kadhi purvi kadhalyas niymit hote tyachi prarkiya kay ahe sadar atikarman Mouja chakur tq manora dist washim yethe kele ahe
सर
स्टे आडर बद्दल माहीती सांगा
१. स्टे आडर देण्याचा कोनाला अधिकार आहे.
२.एखाद्या जमीनीच्या बाबतीत प्रांताधिकारी यांच्या कोटात वाद अथवा अपिल चालू असेल तर प्रांत साहेब त्या न्यायप्रलबिंत जमीनीच्या खरेदी विक्री बाबत व वहीवाटी बाबत स्टे आडर देवू शकतील का?
. अ‍ . जर प्रांत साहेब परवागनी देवू शकनार नसतील तर अशी वस्तूस्थिती असताना त्या जमीनीबाबत स्टे आडर कोन देईल .त्या साठी काय करावे लागेल.
. ब जर प्रांत साहेब परवागनी देनार असतील तर त्यासाठी काय करावे लागेल .
३. सर स्टे आडर कोन देवू शकतो ,स्टे आडर देनेबाबत कोनाला - कोनाला अधिकार आहेत . याबाबत कायद्यात काय तरतूदी आहेत .
४. स्टे आडर देताना काय पाहीले जाते.
५. सर मला स्टे आडर बाबतीत सखोल माहीती हवी आहे मला ती माहीती कशातून ऊपलब्ध होईल .
१. म ज म आ १९६६ चे कलम २५६ अन्वये , ज्या अधिकार्याने निर्णय प्रारीत केला आहे त्यास किव्न्हा अपिलीय अधिकार्यास आदेशाचे अंमल बजावणीस स्थगिती देता येते .
२. स्थगिती आदेश हा अपील / दावा चालू असेल त्या बाबतीत असतो
३. आपण परवानगीचा उल्लेख केला आहे . कोणती परवानगी ?
४. आपण म ज म आ १९६६ चे कलम २५६ वाचा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.30 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3