जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by किशोर साळुंके
05-12-2014
kishorsalunke2828@gmail.com
नमस्कार, आपण हे संकेतस्थळ सुरु केल्याबद्दल प्रथमत; आपले मनपूर्वक अभिनंदन !!!! महोदय, मा.तहसीलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अन्य शासकीय-निमशासकीय कार्यालयातील गैरहजर अधिकारी व कर्मचा-याच्या गैरहजेरीचा पंचनामा करण्याचा अधिकार आहे का ? असल्यास कोणत्या नियमाने ? गैरहजर अधिकारी वा कर्मचा-याविरुद्ध ते कोणती कारवाई प्रस्तावित करू शकतात, कृपया याची माहिती द्यावी हि विनंती.... पुन्हा एकदा आपले अभिनंदन धन्यवाद .
अन्य शासकीय कार्यलयातील कर्मचारी gairhajar असतील तर , तहसीलदार त्या बाबत , साम्भांडीत विभाग प्रमुखास कळवू शकतात
नागरिक हि सदर बाब त्याविभागाचे प्रमुखांचे निदर्शनास आणून देऊ शकतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नरेंद्र पाटील
04-12-2014
np36456@gmail.com
After plot/land registered development agreement between owner and developer,
(1) whose responsibility for name enter/entry on 7/12 extract of developer.
(2) Is it require name of developer on 7/12 extract.
(3) after registered of deemed conveyance deed of co-operative housing society's, is it require name of developer on 7/12 extract for while change of name of co-operative housing society's on 7/12 extract.
Development agreement is for the development of land . It does not transfer title in the property to devloper. Hence mutation entry on the basis of such development agreement cannot be certified.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vaibhav
03-12-2014
vmazodkar@gmail.com
सर, माझे मोठे भाऊ १८ वर्षापूर्वी शासकीय सेवेत वर्ग ४ शिपाई पदावर नोकरीस लागले नंतर एकाच महिन्यात त्यांचे चालक पदावर प्रोमोशन झाले. १३ वर्ष सेवेत असताना त्यांना प्यारालीसीस झाला. त्यामध्ये त्याच्या शरीराचा एक भाग निकामी झाला. उपचारानंतर ते ऑफिसला गेले असता कार्यालयाने त्यांना मेडिकल बोर्डाकडे पाठविले. मेडिकल बोर्डाने त्यांना ५० टक्के अपंगाचे प्रमाणपत्र दिले. त्यावरून कार्यालयाने त्यांचे डिमोशन करून मूळ शिपाई पदावर टाकले. ३, ४ वर्षापासून ते शिपाई पदावर असून ते काहीच काम करू शकत नाही. फक्त बसून राहतात. त्यांना फक्त बोलता येते. मदतीशिवाय ते चालू शकत नाही.
प्रश्न - अशा परीस्तीतीत त्यांना पेन्शन युक्त सेवानिवृत्ती मिळेल काय व त्याबदल्यात त्यांचा वारस नोकरी मिळण्यास पात्र राहील काय ?
तसेच त्यांना डिमोशन देता येते काय ? मार्गदर्शन मिळावे व त्याबाबत शासन परिपत्रक असल्यास मला ई मेल वर कळवावे हि विनंती.
१. नोकरीत असताना , व्यंग आले असता , अश्या कार्माचार्याचार्यास पदावन्नात करता येत नाही.
आपण या निर्णय विरुद्ध दाद माग
२. The Pesn With Disabilties ( Equal Oppirtunities , Protection of Right , and Full Participation ) Act 1995
च्या कलम ४७ प्रमाणे हे सौराक्सःन आहे
३ आपले बंधूस सेवा निउरुति मिळेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वप्नील जैन
03-12-2014
swapnil-jain2010@hotmail.com
सर आमचा औरंगाबाद येथे 47B (गायरान जमीन) चा प्लॉट आहे तरी मला प्लॉट वर बांधकाम करावयाचे आहे तरी मला कोण कोणत्या Permission घ्याव्या लागतील
Question by म्हस्कू शिंगाडे
02-12-2014
mbshingade@gmail.com
५ वर्षे मुदतीचे म्हणजे , १९६२ मद्ये असलेल्या फेरफार वर , सदर जमीन ही रक्कम रु .४०० (५ वर्षे मुदतीने ) खरेदी देत आहोत .
सदर फेरफार व ७/१२ आपल्या माहिती साठी पाठ वतो आपला इमेल द्यावा वि विनती.
Question by म्हस्कू शिंगाडे
01-12-2014
mbshingade@gmail.com
नमस्कार सर , आपण सुरु केलेल्या या सुविधेस खूप धन्यवाद .
माझा प्रश्न १- फेरफार आपील केल्यानंतर त्यचा निकाल किती दिवसात मिळतो.२. १९६२ मद्ये आजोबांनी ५ वर्षे मुद्तॆची जमिन विक्री केली होती. सदर जमीन ५ वर्षात त्यांना पैसे न दिल्याने त्यांच्या नावावर झाली . सदर जमीन आम्ही पुन्हा त्याचां पुर्ण रक्कम देवून व्याज सहित , आम्हाला जमीन पुन्हा मिळेल का?
५ वर्ष मुदतीची विक्री ? विस्तृत माहिती द्यावी.
अपील किती कालावधीत निकाली काढावे या बाबत कायद्यात तरतूद नाही. मात्र वाजवी कालावधीत निकाल देणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रवीण खांदवे
01-12-2014
pravinskhandve1979@gmail.com
मी तालुका शिरूर ,जिल्हा पुणे, येथील शेतजमीन खरेदी केली आहे. मात्र सर्कल अधिकारी यांनी 7/12 नोंद केली नाही. तीन महिने झाले. उपाय काय?
Question by mahendra
29-11-2014
mahendraj165@gmail.com
सर ...
माजी कुल कायदा ४३ ची जमीन आहे ३२ ग १९६४ साली झाले आहे .तर त्या ७/१२ वरील कुल कायदा ४३ काढण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल योग्य मार्गदर्शन आपण करावे
Question by तानाजी जाधव
29-11-2014
tvjadhav@bjscollege.org.in
नमस्कार सर,
माझ्या आजोबांचे वडिल १९४७ मध्ये मयत झाले वारस नोंद करताना आजोबाचे मोठे भाऊ यांच्या नावावर ए .कु.म्या . म्हणुन वारस रजी वर नोंद झाली . परंतु ७/१२ वर ए.कु.म्या चा उल्लेख नाही. वारस नोंद रजीष्टर मध्ये सर्व आजोबाची नावे आहेत . आमच्या आजोबांचे नाव ७/१२ वर येण्या साठी काय करावे. २) थोरल्या आजोबांनी काही क्षेत्र २००३ मद्ये विकले आहे . थोरले आजोबा २००४ मध्ये मयत झाले असून त्याच्या वारसांची वारस नोंद झाली आहे .
जे क्षेत्र सध्या आजोबांचे वारसाचे नावावर आहे , ते इतर वारसांचे नावावर लावण्यासाठी अपील दाखल करा
ज्या क्षेत्राची २००३ मध्ये विक्री झाली आहे ते, आता तुमचे नावावर होणे अश्यकय, आजोबांचे वारसांकडून विकलेल्या जमिनी मध्ये तुमचा जेवढा हिस्सा होते , त्याची भरपाई मिळणे बाबत दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नवनाथ शिर्के
27-11-2014
psshirke14@gmail.com
मा. सर
१. माझे आजोबा तात्याबा तुकाराम शिर्के यांना २ पत्नी होत्या, भामाबाई तात्याबा शिर्के व लक्ष्मिबाई तात्याबा शिर्के.
२. तरी भामाबाई यांना दोन मुले गणपत तात्याबा शिर्के व माझे वडील शिवराम तात्याबा शिर्के.
३. लक्ष्मिबाई तात्याबा शिर्के यांना एकही अपत्य नव्हते, ज्यावेळी त्या ह्यात होत्या त्यावेळेस त्यांच्या नावावरती १५० एकर एवढी जमीन होती आणि त्या मयत झाल्यानंतर त्यांना वारस म्हणून त्यांचे पती व माझे आजोबा तात्याबा तुकाराम शिर्के यांचे नाव दाखल झालेले आहे.
४. माझे चुलते गणपत तात्याबा व वडील शिवराम तात्याबा यांना आपली सावत्र आई लक्ष्मिबाई तात्याबा शिर्के यांच्या नावावरील १५० एकर या जमिनिची काहीच कल्पना नव्हती.
५. माझे आजोबा तात्याबा तुकाराम शिर्के, आजी भामाबाई व सावत्र आजी लक्ष्मिबाई हे सुमारे १९७० ते १९८० या कालखंडामध्ये मयत झालेले आहेत.
६. तरी सध्या एका एजंटने आमच्या सावत्र आजीच्या नावावरती असलेल्या जमिनीचा फेरफार आम्हाला वाचून दाखविला आहे व आम्हाला असे सांगितले आहे कि, सदर जमिनीला तुमचे आजोबा तात्याबा तुकाराम शिर्के हे वारस आहेत. आणि मी हि जमीन तुम्हाला मिळवून देतो परंतु तुम्हाला त्या बदल्यात मला सदर जमिनीपैकी ५० एकर एवढी जमीन द्यावी लागेल.
७. तरी ते एजंट आम्हला सदर जमीन कोठे आहे याची काहीच माहिती सांगत नाहीत फक्त फेरफार वाचून दाखवितात.
८. तरी आम्ही सदर जमिनीचा तपास लागण्यासाठी काय करावे याची माहिती द्यावी.
९. जर जमिनीचा तपास लागणे अशक्य असेल तर आम्ही एजंटलाच ५० एकर जमीन द्यायला कबुल व्हावे किंवा नाही याची माहिती द्यावी. हि विनंती.
१०. जर जमीन खरच असेल तर ती आम्हाला मिळेल का ?
प्रथम तुम्हाला आजोबांच्या मूळ गावातील सर्व मोठ्या गटांचे सध्या उपलब्ध ७ -१२ व ८ अ पाहून ही सर्व जमीन एका गावातील आहे काय याबाबत खात्री करून घेणे आवश्यक आहे. सदर जमीन कोणती हे कळल्यानंतरच त्याबाबातची तत्कालीन फेरफाराबाबत कागदपत्रे संबंधित तहसील मधून प्राप्त करून घेऊन पुढील निर्णय करता येईल. एजंटवर आंधळा विश्वास नको.
Reply by श्री.संजय ज्ञानदेव पवार | अपर जिल्हाधिकारी
Question by प्रमोद शिर्के
27-11-2014
psshirke14@gmail.com
मा. किरण पाणबुडे साहेब
उपजिल्हाधिकारी
महोदय
मी विचारलेल्या सर्व प्रश्नांच्या माहितीबद्दल, आपण जि काही सर्व माहिती मला दिली त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे.
धन्यवाद सर
Question by निलेश फेगडे
27-11-2014
nileshfegade@yahoo.co.in
सर,
शेतकरी दाखल्याचे दर वर्षी नूतनी करण करावे लागते का?
मात्र फार जुना दखल असल्यास , नवीन दाखला, नजिकचे काळातील मागितला जातो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शेख अन्सारोद्दीन तलाठी
26-11-2014
ansarhisam@gmail.com
सर,
तुकडेबंदी कायदयाअंर्गत अकोला जिल्हयासाठी क्षेत्राचे प्रमाण किती ?
Question by AJINKYA PAWAR
26-11-2014
ajinkya.likes@gmail.com
majhe city madhhe plot aaahe mahanagar palika manjur lay out aahe seprate utara aahe...taridekhekhil bhumi abhilekh karyalay mojani karta yet nahi mhantat...
महानगर पालिका क्षेत्रामधील आपल्या मिळकतीचा मिळकत उतारा घेऊन मोजणी फीस भरावी. तर जर ते मोजणी साठी तयार होत नसती तर जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करावी. कारण जिल्हधिकारी हे जिल्ह्याचे पदसिद्ध सह संचालक, भूमी अभिलेख आहेत. तरीही समाधान न झाल्यास लोकशाही दिनात तक्रार करावी.
Reply by डॉ.जयकृष्ण फड | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष जवरे
25-11-2014
jaware_sb@rediffmail.com
पाटीलवतन नवीन अविभाज्य शर्तीची जमिन असून त्या जमिनीचा फेरफार मध्ये इनाम वर्ग ६ब ची जमिन रिग्रेट करुन वरीष्ठ कार्यालयानी शर्ती व अटी चे अधिन राहुून सरकार नोंद कमी करुन कब्जेदार यांचे नाव दाखल केले आहे. तर पाटीलवतन नवीन अविभाज्य शर्तीची जमिन बाजार भावाच्या ५० टक्के नजराणा भरुन भोगवटदार १ करता येईल का?
Question by संदीप
25-11-2014
mechmaster7@gmail.com
नमस्कार सर,
शासनाकडून "जात प्रमाणपत्र " मिळवताना जी कागदपत्रे द्यावी लागतात ती साक्षांकित प्रत हवी का ?
२) "साक्षांकित प्रत" कोणाकडून केलेली चालते?
"वकील नोटरी" कि "विशेष कार्यकारी अधिकारी " ?
याबाबतचा शासन निर्णय प्रत मिळेल का?
Question by sanjay shekokar
25-11-2014
sanjayshekokar71@gmail.com
maharashtra जमीन महसुल अधिनयम १९६६ ८५ आणी ८५ (२) नुसार जमिनीचे वाटप विभाजन करण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहेत का ? या साठी सक्षम अधिकारी कोण आहेत व हि केस कोणत्या महुसूल अधिकारी मार्फत चालवली जाते
मुल अधिकार जिल्हाधिकारी यांचे आहेत
बहुतांशी ठिकाणी तहसीलदार यांना अधिकारप्रदान करण्यात आले आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by atul ambhore
24-11-2014
ambhorea@yahoo.com
गयरान शेतजमिनिवर तलाव खोद्कामाचि परवांनगि तहसिलदार याना देता येते का
धन्यवाद पाणबुडे सर उत्तर दिल्यबद्दल
सर सदर कामी ग्राम्पान्चायातीस काय कळवून नाकारता येईल
कुर्पया मार्ग दर्शन करावे
गायरान जमीन गुरांना चरण्यासाठी आहे . त्याचा वापर तलावासाठी करता येणार nahi
तसेच अशी parvangi देण्यास तहसीलदार यांना adhikar nahi
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष जवरे
24-11-2014
jaware_sb@rediffmail.com
जर एखाद्या व्यक्तीला कोळंबी प्रकल्पासाठी भाडेपट्ट्याने जमिन दिली असेल व तो व्यक्ती मयत झाला असल्यास त्याच्या वारसाची नोंद ७/१२ सदरी करता येईल का ? तसेच बॅकेचा बोजा सदर जमिनीस नोंद करता येईल का ?
वारसांची नवे लावता येतील
Government leased land cannot be mortgaged to financial institution without permission
See permission was taken
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शशिकांत रामचंद्र नाचण
23-11-2014
vsn2577@gmail.com
ज्या जमिनी २ टक्के नजराणा भरून खरीदी केल्या जातात त्या पुन्हा विक्री करण्यासाठी कोणती कारवाई केली जाते
कायद्यात सध्या स्पष्ट तरतूद नाही . मात्र
२ % नजराणा हा जर जमीन वर्ग ईई ची असेल तर भरण्याचा आहे. कलम ६३ १ अ अन्वये जमीन खरेदी करताना , बिगर शेतकरी व्यक्ती , औद्योगिक कारणासाठी जमीन विकत घेऊ शकते. त्यामुळे तो शेतकरी नसला तरी चालू शकते. मात्र जमीन वर्ग २ ची असल्यास , म्हणजे शाषण प्रदान ( अ. वि. स. ) असल्यास , ती वर्ग २ ची राहणार , नंतर च्या प्रत्येक हस्तांतरास , जर ती शेतकरी व्यक्तीस विकावयाची असल्यास , अनार्जित उत्तपानाची रक्कम शाश्नास जमा करावी लागणार.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शब्बीर फरास
23-11-2014
faras_shabbir@yahoo.co.in
"म" सत्ता प्रकार म्हंजे काय ? थोडे सविस्तर माहिती सांगा, तो कमी करणे साठी काय करव्यास हवे कृपया सविस्तर माहिती द्या .
Question by फरास शब्बीर अप्पासाहेब
23-11-2014
faras_shabbir@yahoo.co.in
नियंत्रित सत्ता प्रकार मध्ये, बिन शेती प्लॉट सेकंड सेल करताना किती वेळा सरकार ला नजराणा भरणे ?
केवळ जमीन शेत प्रकारातील असेल तर , ती नि.स.प्र असते.
बिनशेती आहे म्हणजे शर्थ शिथिल करण्यात आलेली आहे
पुन्हा नजराणा भरण्याची गरज nahi
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्रीकांत राऊत
22-11-2014
raut1959@gmail.com
नमस्कार,
आम्ही म्हणजे माझे वडील,मी, व माझा भाऊ यांचेत सुमारे ३३ वर्षापूर्वी रजिस्टर वाटणी पत्र झाले आहे परंतु त्यानुसार प्रत्यक्ष जमीन वाटणी कागदोपत्री आहे. तरी सदर जमिनीची पुनरवाटणी रजिस्टर करता येईल का व सदर वाटणीसाठी किती स्टम्प लागेल.पूर्वीच्या वाटनीनुसार तिघांचे ८ अ व ७/१२ झाले आहेत. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
Question by संजय वाघमारे
22-11-2014
sanjaywaghmare70@rediffmail.com
नमस्कार सर, तलाठी,मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार, तहसिलदार यांचेकरिता उत्पन्नाचे दाखले देण्याबाबतचे शासन निर्णयाची किंवा परिपत्रकाची प्रत असल्यास कृपया अपलोड करावी हि विनंती.
Question by कृष्णा गणपत तेली
21-11-2014
kgteli53@gmail.com
मृत्युपत्र हे कोर्टाकडून मान्यता प्रमाणपत्र (PROBATE) मिळविले नसतांना सुद्धा तलाठी /मंडळ अधिकारी ७/१२ वर वारसदाराची नोंध करू शकतात का?
Yes
Probate is essential in mumbai only and not else where
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
