जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

मा. सर
मी तहसीलदार यांच्याकडे जमिनीचे वाटप करून मिळणेबाबत कलम ८५ नुसार अर्ज सादर केला होता आणि त्यांनी माझा अर्ज निकाली काढला आहे व उत्तरामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे कि, कलम ८५ प्रमाणे फक्त ७/१२ उतारा विभक्त करता येतो जमिनीचे वाटप करता येवू शकत नाही, तरी आपण मला खालील माहिती द्यावी हि विनंती.
१. मा. सर, जर एखाद्या व्यक्तीने ठरविले कि, मला आपल्या जमिनीचे वाटप माझ्या मुलांच्या नावावरती करून द्यावयाचे आहे तर ते कलम ८५ प्रमाणे करता येवू शकते का ?
२. तहसीलदार यांचे असे म्हणणे आहे कि, कलम ८५ प्रमाणे वाटप म्हणजे एखाद्या ७/१२ उतारयामध्ये जर दोन जमिन धारकांची नावे असतील तर तेच फक्त आपापल्या नावावरील जमीन आपापसांत वाटप करून घेवू शकतात. तर हा निर्णय योग्य आहे का ?
३. सर, तहसीलदार यांनि दिलेल्या निर्णयाच्या विरुद्द मी प्रांत साहेबांकडे अपील दाखल करायला गेलो असता त्यांनी माझे अपील दाखल करून घेतले नाही व मला असे सांगितले कि तुम्ही कलेक्टर साहेबांकडे अपील सादर करा. तर मी आता काय करू.
४. कलम ८५ बाबतची माहिती द्यावी.
५. तहसीलदार म्हणतात कि, कलम ८५ प्रमाणे वाटप होते असा शासन निर्णय आणून द्या मग मी लगेच तुमचे वाटप करून देतो, तरी सर आपण मला सदर शासन निर्णय द्यावा हि विनंती.
१. नाही
2. hoy
३. अपील दाखल करून घेतले pahije
4. Read MLRC
5. under section 85 , holding is divided amongst the co holders . But father cannot partition his land in the name of son .
Fathet will have to either sale or gift the land to son

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तलाठीने कोणते पुस्तक रेफर करावे?
तलाठ्यांनी संदर्भासाठी वापरावयाची पुस्तके.
१) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ व त्या अन्वये तयार केलेले नियम
२) जमीन महसूल नियमपुस्तिका- खंड १ ते ४
३) महाराष्ट्र नागरी सेवा नियम (सर्व)
४)श्री. शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांसाठी लिहिलेली सर्व पुस्तके.
५) लेखा विषयी, परभणी जिल्हा कोषागार कार्यालयाच्या ब्लोग वर उपलब्ध असलेले साहित्य.

Reply by डॉ.जयकृष्ण फड | उप जिल्हाधिकारी

Question by atul ambhore
20-11-2014
ambhore.79@gmail.com

गयरान शेतजमिनिवर तलाव खोद्कामाचि परवांनगि तहसिलदार याना देता येते का
नि.स.प.जमिनीचा कायदा काय आहे.?खालसा करण्यासाठी जमिन मालकाने काय करावे.
maharashtra Tenanacy and Agricultural land Act

parvangi ghene

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sandeep Sutar
20-11-2014
sandeepms30@gmail.com

Sir,what is procedure to do N.A.land comes under R1 zone of MMRDA BSNA For personal home construction .land area is 0-03-00(3 are).

Question by Sandeep Sutar
20-11-2014
sandeepms30@gmail.com

Sir,what is procedure to do N.A.land comes under R1 zone of MMRDA BSNA For personal home construction .land area is 0-03-00(3 are).
जर तहसिलदार हे किमान ८ दिवस रजेवर असतील तर मा. लोकायुक्त व उपलोकायुक्त यांचेकडून प्राप्त झालेल्या पत्रास उत्तर देताना नायब तहसिलदार यांचे स्वाक्षरीने अहवाल सादर करता येईल का ?
तसेच मा. लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या पत्रास उत्तर देताना प्राप्त दिनांकापासून कालमर्यादा किती आहे ?
ज्या अधिकार्याकडे कार्यभार असेल त्याचे सहीने उत्तर पाठवणे
काल्मार्यदा पत्रात नमूद केलेली असेल
नसेल तर , लवकर पाठवणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर भुमि अभिलेख एकत्रिकरण योजनेच्या आगोदर सन १९७३/७४ शेतपुस्तिका मध्ये २११/१ते ८ हिश्यांची नोंद एका पानावरती आहे २११/१ते ११असे हिशे आहेत तर त्या पानावरती शिसपेन्सिलने पुढचे हिसे म्हणजे ९.१०.११ हे शेवटच्या पानावरती पाहवे असे लिहले आहे शेवटच्या पानावरती सुद्धा शिसपेन्सिलने बाकीच्या ९.१०.११ हिश्याची नोंद केली आहे हिस्सा नंबर ११ या मध्ये गेणु व पांडु यांचे दोघाचे आठ आणे प्रमाणे हिस्सा आहे परंतु गेनु यांच्या नावाला कंस केला आहे व त्याच्या समोर ४२०३ फेरफार नं लिहला आहे तो फेरफार त्याचा वारस मुलगा गोरखनाथ याच्या वारस नोंदिचा आहे तसेच पांडु यांच्या दोन मुलाची नावे सोपान व तुकाराम यांची नावे आहेत तसेच गोरखनाथचे नाव आहे ते वारासाने आले आहे पांडु व तुकाराम यांच्या नावाला कंस केला आहे त्यामध्ये तुकाराम यांच्या पुढे फेरफार नं४२०२ आहे तो फेरफार गेनु यांनी तुकाराम यांच्या कडुन २११/११ मधील आठ आने विकत घेतला असा आहे पण पांडु यांच्या कंसा पुढे फेरफार नं नाही व त्यांच नाव मग दुरुस्ति शेत पुस्तिका मध्ये कमी झाले व सोपान व गोरखनाथचे नाव आले १९७५/७६ च्या त्या शेतपुस्तिका मध्ये सोपान यांच्या नावाला कंस झाला आहे व नाव खोडले आहे त्याच्या कंसा समोर फेर फार नं नाही तर पांडु यांचे नाव कसे कमी झाले कारन त्याचा फेरफार नाही तसेच सोपान यांचे नाव कसे आले शेत पुस्तिकाला १९७३/७४ च्या व सन १९७४/७५ दुरुस्ति शेत पुस्तिका मध्य नाव येऊन ते कंस का झाला वनाव का खोडले गेले यांचे स्पष्टिकरण रेकॉर्ड ऑफिसला मिळेल का भुमिअभिलेखला पानबुडे सर मला योग्य मार्गदर्शन मिळावे विनंती
सेक्शन 36A म्हणजे काय सर सविस्तर माहीती मिळावी नम्र विनंती
दुरुस्ती.....
पहिल्या उत्तरात अनुसूचित जाती ऐवजी अनुसूचित जमाती असे वाचावे.

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

१)अनुसूचित जाती समाजातील व्यक्तींच्या जमिनी बाबतची माहिती ( म.ज.म. अ. १९६६ कलम ३६ अ ) आहे.
२)विशेषतः जमीन हस्तांतरण बाबतचे नियम ( निर्बंध आणी परवानगी ) त्यात नमूद केलेले आहेत.

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by Sandeep Sutar
16-11-2014
sandeepms30@gmail.com

Kiran sir request u to answer this question majhi zamin (0-03-00) Modified Draft development plan 2008-2028 for bhiwandi surrounding notified area prepared for MMRDA ya madhye rural areat aahe.NA karnesathi konachi permission & kiti period lagel? Mage asa vachle hota ki Na sathi collector chi permission not required plz help I want loan for construction of house.thanks in advance
धुळे जिल्हा LALING SHIVAR YETHIL GAT नो ९७/1, ९७/२, - क्रमांक - आदिवासी-३११४/६८३/प्र.कर.२९/ल-९, महसूल व वन विभाग, जागतिक व्यापार केंद्र, ३२ व मजला कफ परेड, मुंबई-४००००५
नमूद केलाला क्रमांकाची आज दिनक १६/११/१४ रोजी पर्यंत FILE POSITION KALNYABABAT विनंती
क्षमस्व! अशा स्वरुपाची माहिती आपणास संबंधित विभागाकडूनच प्राप्त करून घ्यावी लागेल.

Reply by MCS Maharashtra | इतर

Question by Vishwas Mande
15-11-2014
vishwasmande@yahoo.com

I have 15 gunthe land on my 7/12 extract. I hold this land by nomination from my fathers after his death. Actual vahivat area is more than 15 gunthe which is in our hold from the dividation 1978 after the death of my grandfather. This land is along the state high way I would like to know 1)how the actual land area is calculated
2) What is the distance limit from the center of the road state highway
3) To whom to contact for correct measurement
१) जमिनीचे क्षेत्र हे हेक्टर /एकर/गुंठे तसेच मीटर मधेही मोजतात
२) राज्य महामार्गासाठी साधारणतः ३० मीटर चा रस्ता असतो
३) आपण शेती मोजणीसाठी उप अधीक्षक तालुका मोजणी कार्यालयात संपर्क साधा . तसेच रस्त्याचे नकाशा साठी कार्यकारी अभियंता राज्य महामार्ग /सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेसी संपर्क साधा

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

गौण खनिज उतखानन विषये अपिल मध्ये असा निर्णय दिला कि केलेले उत्खनन हे जमीन सपाटीकरण करून शेती लागवड केली आहे व उत्खनन मध्ये निघालेले दगड व माती सभोवती जमा करून ठेवली आहे व त्याची कुठेही वाहतूक केलीली नाही त्यामुळे दंडाचा आदेश रद्द करून नवीन नियम महाराष्ट गौन्खानीज उत्खनन नियम २०१३ मधील तरतुदीचा विचार करून फेर चौकशी करून निर्णय घ्यावा
आता प्रश्न असे आहेत
१ तालुका ecz मध्ये येतो त्यामुळे दगड उत्खनन बंदी आहे .
२ सबब झालेले उत्खनन हे शेतीकरिता आहे परंतु जवळपास ५०० ब्रास पेक्षा जास्त उत्खनन दगड माती चे झाले आहे
३ सबब उत्खन करिता कुठेलेही पूर्वपरवानगी घेतलीलि नाही
४ तसेच एखादा माणूस शेती करिता किती विनामूल्य ब्रास माती उत्खनन करू शकतो

वरील सर्व मुद्द्याचे माहिती मिलाल्वी
Pune Builders Association Vs Tahsildar Haveli , या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने , जमीन सपाटीकरण केले असले तरी , स्वामित्व शुल्क वसूल करणे आवश्यक असले बाबत निर्वाळा दिलेला आहे .
मोजमापाप्रमाणे दंड वसूल करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जर बिनशेती परवानगी ग्र्मापंचायत हद्दीत तहसीलदार यांच्याकडून घेतली असेल त्यानुसार बांधकाम परवानगी देखील घेतली असेल (१९८८ मध्ये) तर अशा जागेवर खातेदारास सुधारित बांधकाम परवानगी हवी असल्यास कोण देऊ शकतो ?
ज्या planning authority च्या अखत्यारीत मिळकत येत असेल , ती planning authority

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वारस तपास एखाद्याच्या मुत्यूनंतर कीती दिवसातं वा कीती महीन्यात करणे अशी अट आहे का... असेल तर कीती कालावधी. त्याच प्रमाणे वारस तपास प्रकरण गावा मधील असेतर तर आपण तलाठी, तहसिलदार यांच्यापैकी कोणाकडे करावे... तहसिलदारांकडे चालेल का. त्याच प्रमाणे वारस तपास प्रकरण दाखल झाल्यानंतर कीती दिवसांत पुर्ण झाले पाहीजे वा सात बारा मध्ये नांव लावले गेले पाहीजी याचा कालावधी सांगणे
तीन महिन्यात करणे आवश्यक . मात्र विलंब झाला तर , १ रुपया दंड घेऊन , केव्हाही वारस नोंद करता येते.
मयत व्यक्तीबाबत , त्याचे वारसाने तलाठी यांचे कडे वर्दी द्यावी.
वारस नोंद १५ दिवसात पूर्ण करणे आवश्यक .( वाद नसेल तर )
जर वाद असेल तर , तलाठी , उताराधिकारी प्रमाणपत्र न्यायालयाकडून आन ने बाबत आपणास असण्गु शकतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

किरण पाणबुडे साहेब,

नमस्कार.

प्रांत साहेबांच्या म्हणण्यानुसार, 2001-2002 दरम्यान इतर हक्कातील वारस नोंद कब्जेदार सदरी दाखल करण्यासंदर्भात शासन निर्णय झाला. परंतु तो कुठेही आढळत नाही. कृपया मार्गदर्शन असावे.
स्वप्निलजी,
आपण रीतसर लोकशाही दिनात अर्ज करा . तत्काळ दाखल घेतली जायील . यासाठी शःसन निर्णयाची गरज नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१ पडदा चित्रपत गृह multiplex करण्यासाठी बंद असेल तर बंद असल्याच्या कालावधीत करमणूक कर भरावा लागतो का असेल तर शासन निर्णय

नाही . बंद असले बाबत तहसील कार्यालय/ कार्मुणूक कर विभाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे कळवणे आवशयक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sandeep
11-11-2014
mechmaster7@gmail.com

नमस्कार सर
अत्यंत स्तुत्य असा हा आपला उपक्रम आहे

विषय -विवाहोत्तर जात प्रमाणपत्र
लग्न झालेल्या 'X' स्त्रीला मराठा जातीचे प्रमाणपत्र काढायचे आहे
सदर प्रमाणपत्रासाठी
१)१९६७ पूर्वीचा वडिलांचा शाळेचा दाखला उपलब्ध आहे .
२)तसेच दिराचा शाळा सोडल्याचा दाखला पण आहे.
(तहसील कार्यालयात स्त्री च्या लग्नापूर्वीच्या नावावर प्रमाणपत्र मिळेल असे कळले )
सदर प्रमाणपत्र "X" स्त्री च्या लग्नानंतरच्या नावावर मिळण्यासाठी काय करावे लागेल.
विवाहोत्तर मराठा जात प्रमाणपत्रे शासनाची मार्गदर्शक तत्वे काय आहेत त्याविषयीचा GR मिळावा
कृपया मार्गदर्शन करावे
हि विनंती
विवाहानंतर नाव बदल झाले बाबत शाषण राजपत्रात प्रसिद्धी देणे आवश्यक .
GR महाराष्ट्र शाश्नाचे संकेत स्थळावर मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

7/12 आनेवारी करण्यासाठी काय प्रोसेस आहे?
आणेवारी म्हणजे मिळकतीतील सह्धारकांचे हिस्से निच्छित करणे.
हिस्स्याबाबत वाद नसेल तर , परस्पर समितीने हिस्से निचित करता येतील.
मात्र वाद असेल तर , न्यायालय हिस्से निछिती करून देते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा.महोदय, मुस्लिम शेतकरी मयत झाला.त्याचे वारसान नोंद मुस्लिम वारस कायदानुसार करावी असा अर्ज तलाठ्याला प्राप्त झाला. मुस्लिम वारस कायदानुसार नोंद मजूर करता येईल काय ? तसेच मयत शेतकरी ह्याचे वारस कोणते होईल.कृपया माहिती द्यावी.
वारस नोंद व्यक्तीचे व्यक्तीक कायद्याप्रमाणे करणे आवश्यक .
प्रशांधीन वारस नोंद मुस्लिम वारस कायद्याप्रमाणे करणे आवश्यक
मुस्लिम कायद्यात , शिया व सुन्नी असे दोन शाखा आहेत . त्या प्रंमाणे वारस नोंद करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर आमचे वडिलांचे २००८ मध्ये निधन झाले वडिलाचे नावे स्वकष्टित व वडिलोपार्जित जमीन आहे वडिलांनी मृतू पत्र तयार करून ठेवले आहे त्यानुसार मोठाभाऊ वाटणी करून देण्यास तयार नाही कारण त्यास खराब जमीन वडिलांनी दिली आहे त्याचे म्हणणे आहे कि मृतू पत्र रागीस्तेर नाही त्यमुळे काही होणार नाही वडिलांनी मृतू पत्र नोटरी केले आहे गावाकडील शेती करणाऱ्या भावच्या मुलाने आमच्या वडिलांचे मृतू पत्र असताना वारस नोंद केली व आमच्यावर वाटपाचा दावा कोर्टात केला आणि संपूर्ण जमिनीवर कब्जा सेल कृपया खालील माहिती द्या
१ लवकर वाटणी होण्यासाठी मृतुपत्र कोर्टाला दिले तर वाटपाचा दावा निकाली निघेल का
२ मृतुपत्र रेगीस्तेर पाहिजे का
३ मृतुपत्र होऊन ७ वर्ष झाली आत्ता मृतुपत्र वाटणीसाठी ग्राह्य धरले जाईल का
४ वडिलांनी मृतुपत्रात वडिलोपार्जित जमिनी मध्ये आईस हिस्सा दिला नाही त्यासाठी आईस भांडता येईलका
५ गावाकडील भावाने शेतीची वाटणी नसताना जमिनी मध्ये घर बांधले आहे त्याची तक्रार कुठे करता यईल
६ भावाच्या मुलास वारस नोंद करण्याचा व कोर्टात दावा दाखल करण्याचा अधिकार आहेका
१. होय
२.आवश्यक नाही
३.होय.
४.नाही
५.घर विनापरवानगी बांधले असेल तर स्थानिक महसूल अधिकारी -Tahsildar
६. दावा कोणीही दाखल करू शकतो. आपण मृत्युपत्राची प्रत न्यायालयात सादर kara.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by santosh jaware
06-11-2014
jaware_sb@rediffmail.com

एखाद्या खातेदाराने शासकीय जमिनीतून ( महसुल खाते) उपलब्ध कच्चा रस्ता डांबरीकरण करणे करिता मागणी केली आहे. आशा वेळी रस्ता परवानगी देता येत नाही. परंतु खातेदारास लेखी उत्तर की द्यावे?
उत्तर देऊन टाका. त्यांना कळवा , शाश्नाकडून जमीन प्रदान करून घ्या. मग dambarikaran kara

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sandeep Sutar
06-11-2014
sandeepms30@gmail.com

Sir majhi zamin (0-03-00) Modified Draft development plan 2008-2028 for bhiwandi surrounding notified area prepared for MMRDA ya madhye rural areat aahe.NA karnesathi konachi permission & kiti period lagel? Mage asa vachle hota ki Na sathi collector chi permission not required plz help I want loan for construction of house.thanks in advance
एका लिपीक कर्मचाऱ्याची सेवेत रुजू होताना शाळेतील दाखल्यावर असलेली जन्मतारीख कार्यालयीन अभिलेख व नियुक्ती अधिकारी यांचे कार्यालयात नोंद करण्यात आलेली आहे. परंतु, सदर कर्मचाऱ्याची जन्मतारखेच्या दाखल्यावरील जन्मतारीख 1 वर्ष 5 महिने कमी असून ती कार्यालयीन अभिलेखात नोंद करणेसाठी कोणती प्रक्रिया आहे व त्याबाबतचे शासन निर्णय मिळणेस विनंती आहे.
एखाद्या खातेदाराने शासकीय जमिनीतून ( महसुल खाते) उपलब्ध कच्चा रस्ता डांबरीकरण करणे करिता मागणी केली आहे. आशा वेळी रस्ता परवानगी देता येतो का?

This page was generated in 0.31 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3