जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by संतोष जवरे
04-11-2014
jaware_sb@rediffmail.com
कोर्ट वाटप प्रकरणी दिवाणी न्यायालयाचा आदेश्नुसार राहत्या घर च्या खोली वाटणी बाबत आदेश असेल तर त्याची कारवाई करता कोणाकडे पाठविणे योग्य राहील. कृपया मार्गदर्शन करावे.
Question by संतोष जवरे
04-11-2014
jaware_sb@rediffmail.com
७/१२ विभक्त करण्या करिता कोणाच्या परवानगी असणे गरजे आहे. तसेच कोणते अहवाल अपेक्षित आहेत.
तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्या नुसार , विभाक्तीकारनामुळे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र तयार होता कामा नये
जर मिळकत वारसा हक्काने असल्यास , प्रत्येकाचा हक्क निच्छित करणे आवश्यक
जर प्रत्येकाचा hissa निच्छित kelela असल्यास , TILR yanche kade आकार्फोड करून मिळण्यासाठी अर्ज करा
akatphod zalenantar talathinyanchekadun 7/12 vibhakata kela jael.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद शिर्के
02-11-2014
psshirke14@gmail.com
मा. सर
सर मी तहसीलदार यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ८५ प्रमाणे जमिनीचे वाटप करून मिळणेबाबत अर्ज सादर केलेला आहे, अर्ज सादर करून जवळ-जवळ ६ महिने झाले आहेत परंतु तहसीलदार अर्जावर काहीच कार्यवाही करत नाहीत म्हणून मी त्यांना याचे कारण विचारले असता ते मला असे सांगतात कि कलम ८५ प्रमाणे जमिनीचे वाटप करावे असा नियमच नाही म्हणून मी वाटप करू शकत नाही, या कारणामुळे मी प्रांतसाहेबांना भेटलो असता त्यांनी मला असे सांगितले कि, मीसुद्धा काहीच करू शकत नाही.
तरी सर आपण मला योग्य तो सल्ला द्यावा हि विनंती.
आपण लोकशाही दिनी म. जिल्हाधिकारी यांना वस्तुस्थिती निदर्शनास आणून दया .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mahendra
01-11-2014
mahendraj165@gmail.com
सर
कुल कायदा ४३ ची जमीन आहे .३२ ग झाले आहे व ती कुलाकडून खरीदी करून २५ ते ३० वर्ष झाली आहे तर ७/१२ वरील कुल कायदा कलम ४३ लागू आहे हा शेरा कमी होऊ शकेल का?३२ म साठी काय करावे लागेल ?
कुल कायदा सुधारणा कायद्यानुसार १० वर्षापेक्षा खरेदी किंमत निच्छित झालेच कालावधी houn गेला असल्यास , शर्थ काढून taknechi आहे . जमीन धार्याच्या २०० पात नजराणा तहसीलदार यांचे कडे जमा करणे avshyak
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
कुल कायदा सुधारणा कायद्यानुसार १० वर्षापेक्षा खरेदी किंमत निच्छित झालेच कालावधी houn गेला असल्यास , शर्थ काढून taknechi आहे . जमीन धार्याच्या २०० पात नजराणा तहसीलदार यांचे कडे जमा करणे avshyak
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश सु. माजरेकर
29-10-2014
mjrkrganesh@gmail.com
कुल कायद्याच्या जमीनिची सात बा-यावरती नावे असलेल्यांच्या प्रत्येकी seperate वाटणी करु शकतो का... कींवा सदर जमीन विकता येवू शकते का...
१. कुल कायद्याच्या जमिनीची ३२ ग किंमत ठरली असेल तर , परवानगीने जमीन विक्री/वाटप करता येऊ शकेल.
२.जर ३२ ग किंमत ठरलेली नसल्यास , केवळ कुलास त्याचा कुल वहिवाट हक्क (Interest ) विकत येणार नाही . मात्र कुल व मालक एकत्रित( संमतीने ) जमीन विकू शकतात .
३. अद्याप कुळाचे नावे किंमत ठरलेली नसल्यास , व अश्या जमिनीस एका पेक्षा जादा कुले असल्यास , त्यांचे वाहिवातीबाबत क्षेत्र स्पष्ट नमूद असते . जर क्षेत्र नमूद नसेल तर , वाहिवातीप्रमाणे कुल जमीन कसतात . मात्र अश्या क्षेत्राची भूमी अभिलेख खात्य मार्फत मोजणीसाठी तांत्रिक अडचणी येतील . मोजणी वेळी , जमीन मालकास हि notice द्यावी लागेल , त्यावेळी मालक हरकत घेयील व आपली निस्च्छित वहिवाट मोजानिदारास सागणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुहासकुमार दुधे
29-10-2014
s.dudhe12@gmail.com
सर, माझे ७/१२ च्या इतर अधिकार सदरी बोजा सहकारी सोसायटी इकरार कारी सो न ग घेणार असा शेरा आहे. त्याचा अर्थ काय आहे. तसेच तो शेरा काढून टाकण्याकरिता काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे.
Question by Ganesh Pingale
29-10-2014
gpingale8181@gmail.com
अव्वल कारकून संवर्गात मी आक्टोंबर २००६ मध्ये उत्तीर्ण झालो आहे. व ६/१२/१९९३ मध्ये सेवेत रुजू झालो आहे. व माझी जन्मतारीख १६/७/१९६८ आहे. माझ्या बरोबर असलेले अ व ब हे अनुकमे आक्टोंबर २००६ मध्ये उत्तीर्ण झाले मात्र त्यांचा सेवेत रुजू झाल्याचे वर्ष हे जून १९९४ आहे. त्यांचा जन्मतारीख अनुकमे १९६७ आहेत. सेवाजेष्टाता यादीत अ, ब व त्यानंतर माझे नाव दिले आहे हे बरोबर आहे किवा कसे. वर्ष निहाय जेष्ठता करता सेवेत रुजू झाल्याचा १९९३ चा मी एकच कर्मचारी आहे त्यामुळे अव्वल कारकून संवर्गात जरी आम्ही आक्टोबर २००६ पास असलो तरी रुजू होण्याचा दिनक व वर्ष हे १९९३ नंतरचे आहे. तरी याबाबत माझे नाव अ व ब च्या पहिले यावयास पाहिजे हे बरोबर आहे किवा कसे असल्यास कृपया परिपत्रक सह कळवावे हि विनंती.
महाराष्ट्र नागरी सेवा ( ज्येष्टतेचे विनियमन ) नियमावली १९८२ च्या ४ (३) अन्वये ,
जेथे कोणत्याही दोन किंवा अधिक व्यक्तींच्या नवे एखादे पद , सवर्ग किव्न्हा सेवा यातील नेमणुकीच्या तारखा , आवश्यक तर , मानीव तारीख नेमून दिल्यानंतर निर्धारित केलेल्या तारखा एकाच असतील तर , वयाने ज्येष्ट असलेली व्यक्ती ज्येष्टाक्रम निर्धारित करण्याच्या प्रयोजनार्थ ज्येष्ट म्हणून मानली जायील .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल अशोकराव शिंदे , लिपिक जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर
27-10-2014
rahulshinde700@yahoo.com
नमस्कार सर, मी महसुल खात्यामध्ये सन २००९ पासून कार्यरत आहे. मी वि.जा. अ. या प्रवर्गातील असून पदोन्नतीसाठी पात्र आहे. तथापि अव्वल कारकून पदासाठी आमच्या संवर्गासाठी एकूण ६ पदे मंजूर असून त्यापैकी ३ पदे हि आमच्या संवर्गातून भरनेत आली आहेत व उर्वरित ३ पदे हि अंतर्गत परिवर्तनीय पद्धत्तीने भ.ज.ब. या प्रवर्गातून भरनेत आली आहेत. भ, ज,ब, संवर्गासाठी एकूण ५ पदे मंजूर असताना एकूण ८ पदे (५ पदे नियमित व ३ पदे अंतर्गत परिवर्तनीय पद्धतीमुळे) भरनेत आली आहेत. जेव्हा अंतर्गत परिवर्तनीय पद्धतीने वि.जा.अ, या संवर्गासाठी राखीव जागा उपलब्ध असताना पात्र उमेदवार नसलेने भ.ज.ब या प्रवर्गातील उमेदवारांना पदोन्नती देनेत आली. सध्या वि.जा.अ. संवर्गातील पात्र उमेदवार असून रिक्त पद नसलेमुळे पदोन्नतीपासून वंचित राहावे लागत आहे.(कारण वि जा अ व भ ज ब या दोन्ही संवर्गातील पदोन्नती मिळालेले कर्मचारी हे सर्व तरुण वयाचे असलेमुळे नजीकच्या काळात सेवानिवृत्त होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.) त्यामुळे भ,ज,ब संवर्गातील शेवटी पदोन्नत झालेल्या कर्मचार्यास खुल्या संवर्गात वर्ग करून त्याजागी मला पदोन्नती मिळू शकेल काय ? तरी याबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळनेस विनंती आहे.
अन्तागत परिवर्तनीय पद्धतीने पदे भरत येत नाहीत.
आता जर भ. ज. ब मध्ये पदे रिक्त असतील तर त्या प्रवर्गातील पदे जी परावर्तीत केली आहेत ती भ. ज .ब मध्ये पुन्हा दाखवणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by TUSHAR PATIL
26-10-2014
patiltushar9009@gmail.com
सर आम्ही एका गट क्रमांकावरअसणारी जमीन घेतली आहे टोटल २८ गुंठे पैकी मी १/३ म्हणजे ९.३३ घेतली आहे तर हद्द कशी फ़िक्ष करावी
हद्द निछिती करण्यासाठी खरेदी खतात , खरेदी केलेल्या जमिनीचे वर्णन केलेले असते . त्या आधारे हद्दी निछिती करता येतात. अथवा प्रत्यक्श्य वाहिवाती प्रमाणे हद्द निछितिं होते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आदिनाथ मुंगसे
25-10-2014
adinath5@yahoo.co.in
आमच्या आजोबांची ५ एकर जमिन आहे. माझे वडील एमएसईबी मध्ये नोकरी करुन रिटायर्ड झाले. माझ्या वडीलांना दोन बायका. माझी आई मोठी. माझ्या आईला आम्ही दोन भाऊ व एक बहीण. माझ्या दुसऱ्या आईला एक मुलगा व एक मुलगी. सर्वांचे लग्न झालेले. आता वडील आम्हाला जमीन वाटुन देत नाही. ती जमीन सध्या वडील व माझा सावत्र भाऊ जो पेशाने डॉक्टर आहे ते दोघे करतात. तरी आता मला व माझ्या भावास जमीन मिळवण्यासाठी काय करता येईल व संपुर्ण जमीनीत किती हिस्से होतील.
हिंदू सुधारणा कायदा २००५ प्रमाणे , वडील हयात असेपर्यंत , आपले नावावर जमीन होणार नाही . वडिलाचे मृत्य पश्चात , व जर त्यांनी मृत्य पत्र द्वारे अन्य वारसांना जमीन न दिल्यास आपले नावावर होऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
23-10-2014
ravindra.golesar@rediffmail.com
वारस नोंद मंजूर करताना मृत्यू पत्र जर मयताने केले असल्यास ते बघून वारस नोंद मंजूर करतात किंव्हा नाही या बाबत सविस्तर माहिती द्या
म्रुत्यपत्र पाहून legatee ची नावे मिल्कातीस लावली जातात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vilasM
21-10-2014
vilasmhetre1977@gmail.com
तहसिलदार यांची ०१/०१/२०१४ ची जेष्ठता यादी मिळावी
Question by तुकाराम रावसाहेब राहिंज
18-10-2014
tukaramrahinj@gmail.com
आदरणीय सर ,
ल ७४ चा नमुना माझ्या ई मेल आयडीवर पाठ्वाना
Question by तुकाराम रावसाहेब राहिंज
17-10-2014
tukaramrahinj@gmail.com
आदरणीय सर,आमची वडिलोपार्जित जमीन होती तीचे १९७२ साली गट पडले तेव्हा चुकून ७/१२ वर कमी अधिक जमीन लागली आहे तेव्हा ते दुरुस्त करणे साठी काय करावे लागेल.
Question by भगत गणेश प्रकाश
12-10-2014
ganeshbhagat88@yahoo.com
सर मी भगत गणेश प्रकाश. सातारा येथे तलाठी या पदावर १ वर्षापासुन कार्यरत असुन मला पुणे विभागातुन औरंगाबाद विभागात उस्मानाबाद जिल्हात बदली करावयचि असुन महाराष्ट्र शासकीय कर्मच्यार्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणा-या विलांबास प्रतिबंध अधीनियम, 2005 मधील तरतुदीनुसार बदली करण सक्षम असलेल्या प्राधीकार्याच्या मान्यतेने आणि उक्त अधिनियमाच्या कलम 4 (4) (दोन) आणि कलम ४ (5) मधील तरतुदिनुसार माझी बदली होईल काय ?
तीन वर्षे सेवा पूर्ण होणे आवश्यक .
मात्र विशेस बाब म्हणून शाषण आपली बदली करू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रशांत सुरे
09-10-2014
prashantsure1707@gmail.com
घर बांधणी बाबत अग्रीमाची मागणी करताना कोणकोणती कागदपत्रे जोडावीत याबाबतचा शासन निर्णय कोणता आहे
Question by shrikant pisal
09-10-2014
shreekantpisal1@gmail.com
sir, mla vahiwat nondicha form no. 14 mazya mail id var send kara hi vinanti
महाराष्ट्र जमीन महसूल ( अधिकार अभिलेख तयार करणे ) नियम १९६९ मध्ये दिलेला आहे. कृपया पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
महाराष्ट्रास जस्मिन महसूल ( अधिकार अभिलेख तयार करणे ) नियम १९६९ मध्ये दिलेला आहे. कृपया पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नामदेव उखा राऊत
08-10-2014
namdeoraut5@gmail.com
मा.
किरण सर,
मी आपणास मला दोन जुळ्या मुली जन्म दिनांक १ जुन २००५ असुन नंतर एक मुलगा दिनांक १ नोव्हे 2011 झालेला आहे. तर नियमानुसार माझे एकुन किती अपत्य समजले जातील. माझी पत्नीची आंगणवाडी सेविका म्हणुन नेमणुक २४ जुन २०१४ रोजी झालेली आहे. ......... तरी म.रा.शा.परीपत्रका क्र.एबावि-२०१२/प्र.क्र.४२९/का,०६.दिनांक१३/ऑगस्ट,२०१४ नुसार जुळे असल्यास एकच अपत्य समजावे................
Question by तुकाराम GAIKWAD
08-10-2014
tukaramgaikwad@gmail.com
सर , वैदकीय प्रतिपूर्ती आदेशावर माननीय निवासी उप जिल्हाधिकारी यांना स्वाक्षरी करण्याचे अधिकार प्रत्यायोजित करता येतात का. असल्यास शासन निर्णय क्रमांक व विभाग नमूद करावे
Question by तुकाराम GAIKWAD
08-10-2014
tukaramgaikwad2008@gmail.com
खर्चाबाबतचे लेखा परीक्षण करणे बाबतचे मुद्दे कोणते त्याची सविस्तर माहिती मिळावी
Question by PRASHANT BHIMASHANKAR SURE
08-10-2014
prashantsure1707@gmail.com
आदरणीय सर,
घर बांधणी साठी आवश्यक असणारी कागद पत्राची यादी समाविष्ट असणारा शासन निर्णय
Question by vikas kapkar
07-10-2014
vikaskapkar27@gmail.com
sir mi saral sewa bharti2013 madhe jalsampada vibhagat driver mhanun laglo aahe mala yach vibhagat jr clerk mhanun samayojan karta yeil ka?
आपण पदवीधर असाल व तीन वर्षे झाली असतील तर महसूल ख्त्यात लिपिक संवर्गात सामोयोजित केले जाते .
जलसंपदा विभागात पण अश्याच पद्धीतीचे नियम असतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mohan
05-10-2014
mohanmsutar@gmail.com
साहेब
काही भरती प्रकियेत खुला व मागासप्रवर्ग साठी अर्ज मागवतात अर्ज करते वेळी मागासाप्रवार्गात अर्ज करताना त्यांचे वय ३४ असल्यास गुनुवात्तेनुसार त्यांचे खुला प्रर्गात नियुक्ती होण्यास पात्र असल्यास त्यांचे नियुक्ती होते काय ?
Question by संदीप लटके
05-10-2014
latakesandip01@gmail.com
कार्यालयाचे दफ्तर सहा गट्टा पद्धतीत लावणे साठी मोठी अडचण म्हणजे दफ्तर अभिलेखात पाठवणे - एंक तर अन्द्र्सन लिस्ट मराठीत नाही . जे विषय त्यानंतर नव्याने महसूल खात्याकडे आहेत ती बंद झालेली प्रकरणे अ ब क क १ पैकी कशामध्य समाविष्ठ करावी या बाबत कोणतेही निर्देश नाहीत - तरी तालुका झिल्ला स्तरावर हाताळले जाणारे सर्व विषय एकत्रित करून त्याचे एकत्रित अ ब क प्रमाणे वर्गीकरण यादी शासन किवा आयुक्त स्तरावरून जाहीर करणे बाबत कार्यवाही त्दन्य अधिकारी याचे कडून होणेश विनंती
आपला प्रश्न रास्त आहे
मात्र ज्या नवीन विषयांचा समावेश A , B , C , D लिस्ट मध्ये नाही त्या बाबत कार्यालय प्रमुख यांनी निर्णय घेणे अपेक्षित
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप लटके
05-10-2014
latakesandip01@gmail.com
कॅश बुक हे सहा गट्टा पद्धतीतील कोणत्या गाठ्यात समाविष्ठ करावे
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
