जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

पूर्वजांची जमीन कुल कायद्यात गेली असल्यास परत मिल्वानासाठी काय करावे
आता फारसे काही करता येत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vijay
14-07-2014
vv_rt@rediffmail.com

पानबुडे साहेब धन्‍यवाद अ क्र 5 चे माहिती दिल्‍याबददल


सबब शेतकरी म्‍हणतोय

शेतीची अधिक चागंल्‍यारित्‍या मशागत करणेसाठी तीत सुधारणा करण्‍याचा शेतकरचा अधिकार असतो व शेतीचे नुकसान होऊ नये म्‍हणुन बंाधबंदिस्‍ती केलेली आहे व म्‍हणुन माझोवर कोणतेही दंडनिय कारवाई कायदेच्‍या विरुध्‍द आहे
तरी कोणती कार्यवाही करता येईल


तसेच मजमअ1966 अधीन नियम 1968 प्रमाणे पुर्वपरवानगी घ्‍ेाऊन 100 रुपये मुल्‍यपर्यंत विनामुल्‍य शेतकरी वापरु शकतो तर त्‍यामध्‍ये काही सुधारणा झााली आहे का

याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती

Question by vijay
11-07-2014
vv_rt@rediffmail.com

००२९ या लेखाशिर्षाखाली 800 उपलेखशिर्षाखाली 00291541 या संकेतांक मध्‍ये भाडे,दंड व जप्‍तीच्‍या रकमा भरावयाचे आहेत तर भाडे,दंड किंवा जप्‍तीच्‍या कोणकेाणत्‍या प्राकराचा महसुल समजला पाहीजे
एखाद्या जमिनीवर ५०-५५ वर्षाच्या पीकपेरा असेल तर महसुल कायद्यात हकः मिलावायासाठी काय तरतूद आहे.
कुल कायद्या खाली आपले वहिवाट येते का?
मालकाचे समन्तिने आपण जमीन कसत असाल tar , कुल कायद्या खाली , apnas कुल mhanun घोषित करण्या करिता दावा दाखल करू शकता.
जर मालकाचे संमतीविना कसत असाल तर , दिवाणी न्यायालयात adverse possession चा दावा दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vijay
11-07-2014
vv_rt@rediffmail.com

एका व्‍यक्‍तीने गावातील तलावातुन गाळमाती काढावयासाठी अर्ज केला आहे सबब तलावातुन गाळ काढणेसाठी कोणकोणत्‍या विभागाची नाहरकत दाखला घेणे आवश्‍यक आहे किंवा कागद पत्रे घेतली पाहीजे याचे मार्गदर्शन व्‍हावे
तलाव ज्या विभागाच्या अधिपत्य खाली असेल तो vibhag , sambhandit grampanchayat .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा.सर रस्ता केस मध्ये स्थळ पहाणी करायला गेले नंतर काय काय बघावे? तसेच रस्ता केसेसचा पंचनामा कशा पध्दतीने करावा.
१. दाव्यात नमूद रस्त्याचा वापर वाद्दीला शेती साठी होतो.
२. दाव्यात नमूद रस्ता या शिवाय वाद्दीच्या शेतात जाण्यासाठी अन्य मार्ग उपलब्ध नाही.
३. रस्ता हा परंपरागत शेती साठी वापरात आहे.
4 पंचनामा करताना , लगतच्या शेतकर्यांनी रस्ता वापराबाबत माहिती देणे आवश्यक.( वृद्ध/ जाणकार )
५. कल्पना दर्शक नकाशा काढावा. त्यात रस्ता दाखवावा.
६. रस्ता प्रतिवादीने बंद केलेला आहे याची पडताळणी करावी

मामलेदार अधिनियामाशिवाय , तहसीलदार यांना अडथला दूर करणे बाबत आदेश देण्याचा अधिकार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by विजय
10-07-2014
vv_rt@rediffmail.com

शेतकरयाने त्‍याचाच शेतजमिनीवर नदीच्‍या काठालगत त्‍याचाच शेतजमिनीतील माती उत्‍खनन करुन बांधबंदीस्‍ती केलेली आहे अंदाजे 113 ब्रास मातीचा वापर केलेला दिसुन येतो परंतु या कामी त्‍यांने कुठलेही प्रकारची पुर्वपरवानगी घेतलेली नाही त्‍यामुळे त्‍यांचेवर विनापरवाना उत्‍खनन केले म्‍हणुन दंडनिय कारवाई करता येईल काय? जर होय तर कोणत्‍या कारणास्‍तव व कोणत्‍या कलमा/नियमाखाली व तसेच कशाप्रकारे दंडनिय कारवाई करता येईल याबाबत मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे
म.ज.म.अ १९६६ च्या कलम ४८ अन्वये.
तहसीलदार हवेली विरुद्ध पुणे बिल्डर्स असोशिअशन या दाव्यात , मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी , खनिजाचा वापर जेथून खनिज काढले आहे त्याच ठिकाणी केला अथवा वाणिज्य कारणासाठी केला नसला तरी त्या बाबत स्वामित्व शुल्क भरणे आवश्यक असले बाबत निर्वाळा देलेला आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
एखाद्या शेत जमीनीचा ताबा दील्या नंतर ७/१२ वरुन नाव काढायला सादारन कीति अवधी मीळ्न्याची तर्तुद आहे
सर,
शेत जमीनीचा ताबा नोटीस आल्यानंतर, ताबा देते वेळी तलाठी लगेच त्याच दीवशी आपले नाव ७/१२ वरुन काढु शकतात का? जर नाही तर कीती दिवसांचा अवधी मीळु शकतो.
१५ दिवसाचा कायदेशीर कालावधी पार पडणे हितावह.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची जमीन अजून आजोबा आणि वडिलांच्या नावे आहे ती आम्हाला मुलांच्या नावे करायची आहे त्या साठी काय करावे लागेल मार्गदर्शन करा
नोंदणीकृत बक्षीस patra .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर
आपण मला खालील प्रमाणे माहिती द्यावी हि विनंती.
१. महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधिल कलम ८५ बद्दल सर्व माहिती.
२. कलम ८५ नुसार तहसीलदार यांनी आदेश दिल्यानंतर तलाठी यांना नोंद किंवा फेरफार लिह्ण्यासाठी फी देणे आवश्यक आहे का ?
३. जर नोंद लिह्ण्यासाठी तलाठी यांनी फी मागितली तर काय करावे ?
४. नंतर नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी यांना फी देणे आवश्यक आहे का ?
५. नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी फी मागितली तर काय करावे ?
प्रश्न क्रं १ बाबत म.ज.म. आ १९६६ चे कलम ८५ वाचावे. तसेच त्याखालील नियमही वाचावे
प्रश्न क्रं २ व ४ चे उत्तर " नाही" .
प्रश्न क्रं ३ व ५ बाबत आपण तहसीलदार/ प्रांत अधिकारी यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखादी व्यक्ती ९ वर्षांपासून फरारी आहे. सदर व्यक्ती फरार झाल्यानंतर पोलिस केस रजिष्टर केलेली आहे. तर त्या फरार झालेल्या व्यक्तीच्या नावे असलेल्या जमिनीच्या ७/१२ ला त्याच्या वारसांची नावे चढविता येतील का ?
व्यक्ती मयत झाले वरच त्याचे वारसाची नावे ७/१२ स लागतील.
भारतीय पुरावा कायदा १९०८ च्या कलम १०८ अन्वये , एखादी व्यक्ती ७ वर्षाहून अधिककालापेक्षा जिवंत अथवा ती हयात/अस्तितवात असलेबाबत ऐकण्यात आले नसेल तर ती मयत झाले बाबत न्यायालय जाहीर करते.
आपले प्रकरणात संबंदित व्यक्ती मयत आहे प्रथम न्यायालयाने जाहीर करणे आवश्यक .
न्यायालयाच्या निकालानंतर , वारसांची नावे ७/१२ स लागतील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एका मंडळ अधिकारी यांची एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात बदली झालेली आहे. बदली झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्त केलेले आहे. परंतु, ते बदली होऊन दीड वर्ष झाले तरी बदली झालेल्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. तर त्या कर्मचाऱ्याचे "सेवा पुस्तक व अंतिम वेतन प्रमाणपत्र" कोणत्या कार्यालयाकडे पाठवण्यात यावे ?
जिल्हाधिकारी कार्यालय की बदली झालेले तहसील कार्यालय ? कृपया मार्गदर्शन मिळावे.
बदली झालेले तहसील कार्यालय.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शासकीय सेवेत असताना अपंगत्व आले असेल तर अपंग असल्याचे फायदे घेता येतात का ? त्याबाबत शासन निर्णय असल्यास मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे.
शाशकीय कर्मचार्यास सेवेत astana अपनगतव आल्यास , व तो काम करण्यास असमर्थ असला तरी त्यास नोकरीतून काढून टाकले जात नाही अथवा कमी केले जात नाही. सेवानिवृत्त होए पर्यंत त्यास नोकरीत ठेवले जाते.विहित पद्धतीने त्यास पदोनति हि दिली जाते.
उपचार खर्चाची परतफेड हि शाषण करते.

The Persons with Disabilities (Equal Opportunities, Protection of Rights and Full Participation) Act, 1995
Section 47 प्रमाणे हे सौरक्षण देण्यात आलेले आहे.
या पेक्षा कोणता वेगळे फायदे अश्या कर्मचार्यास आवश्यक आहेत.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mohan
04-07-2014
mohanmsutar@gmail.com

सर
७/१२ मदे इतर हक्कात बिगर कब्जेदार वारसदार यांची म्र्युत्यू झाला आहे. सदर त्यांचे वारसदार २ मुलगा व ३ मुलगी असेल तर त्यामधील एकाचे उपस्तीतीवर अर्युडेत स्टंप करता येईल काय ? एकाच वेळी वारसा नोंद हक्क सोड पत्र दोन्ही करता येईल काय? इतर हक्कातील म्र्युत्यू झाल्यास त्यांचे वारसदारांचे वारसा नोंदीचे नियम सांगावे विनंती.
प्रश्न सोप्या व स्पष्ट शब्दात मांडावा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by मोहन
04-07-2014
mohansutar52@gmail.com

सर
१९९७ मदे भूसंपादन झाले आहे.२०११ मदे १२ नुम्बेर नोटीस दिले सदर व्यक्तींचे ४ एकर शेत जमीन उरले .त्या व्यक्तींना प्रकल्पग्रस्त दाखला मिळतो का ? जर ती व्यक्ती नातेवाईकांचे काहीषेत जमीन नसलेस त्याला प्रकल्पग्रस्त मिळ्वनेसाथि समती देत येईल काय?
कमीत कमी २० गुंठे क्षेत्र जर संपादित झाले असेल तर , प्रकल्प ग्रस्त दखल मिळेल.
नातेवायिक यामध्ये केवळ मुलगा/ मुलगी / नातू/ नात यांचा समावेश होतो.
या पैकी जर असेल , संमती देत येईल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vijay
03-07-2014
vv_rt@rediffmail.com

फळबागावर राेहयो कर व भाजीपालावर शिक्षण कर घेणेबाबत काही शासन निर्णय आहे की,याची माहिती मिळावी
आपला आभारी आहे
महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (अधिभार) कायदा १९६२ च्या कलम ४ ब प्रमाणे शिक्षण कर ऊस ,बागायती कापूस, खाण्याची पाने , केली , द्राक्ष, सुपारी, तंबाखू , हळद , चिकू पिकवणाऱ्या शेत जमिनीबर लावला जातो.
या कायद्याच्या कलम ६ ब प्रमाणे बागायती pike पिकवणाऱ्या जमिनीबर रोजगार हमी कर लावला जातो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाशय माझी माहिती वाचून मला मार्गदर्शन करावे माझ्या वडिलांनी माझ्या चुलत काकान कडून जमीन विकत घेतली आहे . सन 1992 मध्ये पण त्या वेळेस काकांनी खरेदीपत्र न करता तलाठी यांचाकडे फक्त ७/१२ उतारा त्यांचा नावे केला आहे .तसेच ड पत्रकात भाऊ हिस्सा म्हणून फेरफार करण्यात आली आहे .
तसेच काकांनीही जमीन विकत घेतली आहे व तेव्हा त्यांनीही खरेदीपत्र केलेले नाही फक्त ७/१२ उतारा त्यांचा नावे आहे . हे त्यांनी सन १९९० मध्ये केले आहे . व त्याचा ड पत्रकात देखील भाऊ हिस्सा या प्रमाणे नोंद आहे .
आता समस्या अशी आहे कि सन २०११ मध्ये जे मूळ मालक आहेत त्यांनी जिल्हा उप विभागीय अधिकारी यांचाकडे अपिल दाखल केली होती त्यात त्यांनी काकांना जेवढी जमीन विकली त्या सर्व जमिनीचा उल्लेख केला त्यात माझ्या वडिलांनी घेतलेली जमीन देखील आली .त्या खटल्याचा निकाल मूळ मालक (अपिल्कर्ता )यांचा बाजूने देण्यात आला . नंतर आम्ही त्या निकालावर स्थगनादेश आणून जिल्हा अधिकारी यांचाकडे अपिल केली व अपिल मान्य करण्यात आली व तसा आदेश आम्ही इकडील कार्यालयात 17/1 ला जमा केला व इकडील कार्यालयास उप जिल्हाधिकारी यांचाकडून 21/1 आदेश आला कि सदरची जमीन मूळ मालक यांचे नवे करण्यात यावी नंतर तलाठी यांनी तसी नोंद ७/१२ उतार्यावर केली नंतर आम्ही स्थगिती आदेश देवून ति नोंद रद्द करून पूर्वरत परिस्थिती केली .
पण मला आता फक्त माझ्या वडिलाचे नवे असलेली काकाकडून विकत घेतलेली जमीन कुळ कायद्याने खरेदी पत्रासाहित नावावर करण्यासाठी अपिल करायची आहे .यासाठी मी कोणाकडे अपिल करू शकतो ? अपिल मन्य होईल्का ? आणि या प्रकरणात जमीन मूळ मालकाकडे परत जाईल का ? कृपया मार्गदर्शन करावे .
उपविभागीय अधिकारी यांचे आदेश विरुद्ध उपजिल्हाधिकारी स्थगती आदेश देऊ शकत नाही.( ठाणे जिल्हा वगळून)
उपविभागीय अधिकारी यांचे आदेशां विरुद्ध अपर जिल्हाधिकारी यांचे कडे अपील करावे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by raj
03-07-2014
143hasislovemail143@gmail.com

प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद

Question by vijay
03-07-2014
vv_rt@rediffmail.com

रोजगार हमी उपकर कशावरती घ्‍यायाचे व शिक्षण कर व वाढाीव शिक्षण कर कशावरती घ्‍यायाचे व याबाबत शासन परीपत्रक अथवा इतर माहिती मिळावी
सर
मी महसुल खात्यात लिपिक म्हणून सरळसेवा भारती ने ४ महिने आधी रुजू झाले व एक दिवस काम केले आणि आईचे आजारपणासाठी गेले चार महिने बिनपगारी राजा घेत आहे. परंतु मी खाजगी कंपनीत काम करत आहे (नियुक्ती पत्र नाही पण मास्तर वर सही व बँकेत पगार जमा होतो ). आता माझ्या नंतर वेटिंग लिस्ट च्या उमेदवाराने तक्रार केली आहे कि मी शासकीय सेवक असून सुधा खाजगीत काम करत असून त्याने मला धमकी दिली आहे कि महसुल अस्थापना द्वारे तुमची चोव्क्षी करून फौजदारी गुन्हा दाखल करायला लावेन.(जेणे करून मी राजीनामा दिला कि त्याचा वेटिंग मुले नंबर बसेल). तर मला असे विचारायचे आहे कि मी ज्या खाजगी कंपनीत काम करत आहेत तेथे मला नियुक्तीपत्र दिले नाही पण मस्टर वर सही व बँकेत पगार जमा होतो. तर माझ्यावर खरेच फौजदारी होऊ शकते का? कृपया उत्तर द्यावे हि विनंती
राजेश
फौजदारी दाखल होणार नाही परंतु आपण सरकारी नोकरी असतानासुद्धा खाजगी नोकरी का करत आहात?
या मुले आपली लिपिक पदाची सेवा संपुष्टात आणली जाऊ शकते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
माझ्याकडे ४.४० हेक्टर जमिनीपैकी
२.३८ हेक्टर जमीन माझ्या आईच्या नावे आहे,आणि २.०२ हेक्टर माझ्या भावाच्या नावे आधीच करून दिलेली आहे.ती जमीन मला आता
माझ्या नावाने करायची आहे.आम्ही दोन भाऊ एक बहिण आहे,मोठा भाऊ आणि लहान बहिण यांचे लग्न झालेले
आहे.ती २.३८ हेक्टर जमीन माझ्या नावे करण्यास
त्यांची संमती आहे,तर ती जमीन
माझ्या नावाने करता
येईल
याचा कृपया मार्ग सांगा.

नोंदणीकृत दान पत्राद्वारे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mohan
02-07-2014
mohansutar52@gmail.com

साहेब
इतर हक्कातील बिगर कब्जेदार वारसदार किंवा त्यांचे वारसदार यांना भूसंपादना झाल्यानंतर प्रकल्पग्रस्त दाखला मिळतील काय? माहिती द्यावे

Question by Dev shinde
01-07-2014
shindedev74@gmail.com

Please sir....
Answer my previous question about farmer sucide case.

Question by sanchi patil
01-07-2014
sapatil50@gmail.com

सर,
सामाईक घराचे अ ब असे विभाजन करताना सह हिस्सेदाराची परवानगी लागते का?
तशी परवानगी न घेता जर एखाद्याने घराचे विभाजन केले असेल तर त्याची माहिती कशी व कुठे मिळेल?
घर ज्या गावात आहे तेथील ग्रामसेवकाकडे हि माहिती मिलेले.
आपण अपील दाखल करू शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

unless co-holder / co-owner' s consent , division of house cannot be effcted .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.26 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3