जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

PWR-219 अंतर्गत असणा-या गृहनिर्माण संस्थांचे सभासद हस्तांतरण, सभासद मंजूरी, पुनर्विकास, फ्रीहोल्ड इत्यादीबाबत कार्यवाही सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग किंवा जिल्हाधिकारी यांनी करावी याबाबत संभ्रम आहे. या बाबतच्या स्पष्ट तरतुदींचे संदर्भ कृपया उपलब्ध होणेस विनंती आहे.
मुंबई उपनगर जिल्याहेतील भूखंड मागणीचे प्रस्ताव रद्द करण्याबाबतचे महसूल व वन विभागाचे पत्र क्रमांक एलसीएस-2605/1554/प्र.क्र.2456/पुनर्बांधणी-270/ज-3 दिनांक 30/06/2018 उपलब्ध होणेस विनंती आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूखंड मागणीचे प्रस्ताव रद्द झाल्या बाबतच्या पत्राची प्रत मागणी केली आहे. सदरचे पत्र हे मुंबई उपनगर जिल्हा, जिल्हाधिकारी यांना अग्रेषित केलेले असणार. सदरचे पत्र हे Public Domain मध्ये असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आपण पत्राची प्रत जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडून प्राप्त करून घेऊ शकता. मागणी केलेले हे पत्र आहे हे शासन निर्णय नाही अथवा अधिसूचना नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनी कुठल्या शाईच्या पेन ने स्वाक्षरी करावी या बाबत काही नियम अथवा शासन निर्णय आहे का? कारण आमचे कार्यालयातील काही अधिकारी हे हिरवा, जांभळा, लाल शाईच्या पेन ने स्वाक्षरी करतात त्यावर एका व्यक्तीने माहिती अधिकार अर्जाद्वारे आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना हिरवा, जांभळा व लाल शाईचा पेन वापरण्याचे अधिकार आहेत का? याबाबतच्या शासन नियमाची मागणी केलेली आहे. तरी कृपया याबाबत माहिती द्यावी हि नम्र विनंती
No.46012/1/2006-O&M. Vol.
Government of India Ministry of Personnel, Public Grievances & Pensions Department of Administrative Reforms & Public Grievances
5th Floor, Sardar Patel Bhawan Parliament Street, Dated October 17, 2014
OFFICE MEMORANDUM
Subject:
Amendment of the 13th Edition of the Central Secretariat Manual of Office Procedure.
Revised 32(9) "Notes and orders will normally be recorded on note sheets in the notes portion of the file and will be serially numbered. All category of officers will use either blue or black ink in signing notes and drafts

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

तलाठी कार्यालयात सात-बारा, ८अ किंवा तत्सम कागदपत्रांची मागणी केली असता त्याकरिता जे शुल्क रोखीने घेतले जाते, त्याचे विवरण, म्हणजे किती उतारे किंवा प्रती घेतल्या, त्याच्या शासनमान्य पावतीचा आग्रह धरला तरी तशी पावती देण्याची पद्धत नाही, असे सांगितले जाते. यात तथ्य आहे का? काही वेळा वेगवेगळी कारणे सांगून संबंधित उतारे, प्रती देण्यास विलंब केला जातो. तलाठी भाऊंकडे जमा होणाऱ्या रक्कमेची शासनाकडे नोंद असते का?
आपण ऑनलाईन उतारा घेता त्यावर रक्कम नमूद असते तसेच प्रत्येक प्रति नुसार रक्कम शासनाकडे जमा करावी लागते त्याबाबत नोंद असते

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

तलाठीकडे जमा होणाऱ्या रक्कमेची शासनाकडे नोंद असते

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माझी व इतर चुलत भावंडांची जिल्हा पालघर मौजे चिंचणी येथे पोटखराब्यासह १२ आर जागा आहे. सदर सातबारा उताऱ्यावर पीकपाणी घरपड म्हणून गेल्या ३० वर्ष नोंद आहे. चुलत भावंड मला सदर जागेस माझ्या भागास कुंपण करू देत नाहीत. तरी सदर जागेत असलेला माझा हिस्याचा स्वतंत्र सातबारा होईल का? त्यासाठी कोणाकडे दाद मागावी लागेल. याची माहिती द्यावी हि नम्र विनंती.
केवळ १२ गुंठे क्षेत्र आपण व आपले चुलत भाऊ यांचे एकत्रित मालकीचे आहे . आपल्या भागासाठी जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र किती आहे ?
पालघर साठी , रायगड जिल्ह्याप्रमाणेच वरकस जमिनीसाठी २० गुंठे , भातशेतीसाठी १५ गुंठे व बागायत जामिनासाठी ५ गुंठे एवढे प्रमाणभूत क्षेत्र मर्यादा आहे .
स्वतंत्र ७/१२ करणे म्हणजे जमिनीचे वाटप करणे आहे .
या वाटपामुळे तुकडा निर्माण होईल त्यामुळे स्वतंत्र ७/१२ करता येणार नाही .
त्यासाठी दिवाणी न्यायालयात जाऊन रीतसर वाटप करून घेणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या आजीच्या नावावर शेत जमीन आहे व एका सावकाराने तिला फसवुण तिच्या कडून जनरल मुखत्यारपत्र करून घेतले आणि त्याने त्याच्या नावावर साठेखत करून घेतले आता तो जमिनीची खरेदी खत करून मागतोय तरी काय करावे लागेल आमची फसवणूक झाली आहे
आपली फसवणूक झाली असेल तर , आपण त्यांच्याविरुद्ध फौजदारी दावा दाखल करावा व मुखत्यारपत्र व त्या आधारे झालेले साठे खात रद्द करून घयावे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by मनोज
25-01-2022
sagar06731@gmail.com

सर ,
एक शेत मिळकत ९४ गुंठे असून न.अ.शर्त , सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व पर्वागीशिवाय हस्तांतरण बंदी व भोगवटदार वर्ग -२ ची आहे.सदर जमिनिच्या सातबारा सादरी 55 सामाईक खातेदार असून मी त्यांपैकी एक आहे.सदर जमीन ही काही सामाईक खातेदारांनी शेजारील शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिली आहे व शेजारील शेयकऱ्यांनी त्यात अतिक्रमण केले आहे व मला ती कसण्यासाठी मज्जाव करत आहे . वाटप पण करण्यास समाईक खातेदाराची तय्यारी नाहीं तर मी मा.जिल्हाधिकारी याना अर्ज देऊन जमीन शासन जमा होवा ह्या साठी अर्ज देऊ शकतो का ? कारण मला ह्या पासून काहीच फायदा नाही.
शासनाने दिलेली जमीन त्याच व्यक्तींनी कसणे आवश्यक आहे .
आपणच योग्य निर्णय घ्यावा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शासनाने दिलेली जमीन त्याच व्यक्तींनी कसणे आवश्यक आहे .
आपणच योग्य निर्णय घ्यावा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shrikant Thakare
25-01-2022
svthakare74@gmail.com

महोदय,
सोसायटीच्या सभासदांनी मिटींग मध्ये एक मतांनी नवीन कार्यकरणी निवडल्यानंतर त्या कार्यकारणीचा 14 दिवसाचा कालावधी झाल्यानंतर एका सभासदाने सदर कार्यकारणी Society Bye laws प्रमाणे नसल्यामुळे सदर कार्यकारणीला आक्षेप घेतला. त्यानंतर सदर नवीन कमिटी बेकायदेशीर ठरवून तसे मिटींग मध्ये जाहिर करण्यात आले. त्यानंतर सोसायटीचा कारभार जूनीच कमिटी पाहिल असे सर्वानुमते ठरवण्यात आले. ज्या सभासदाने बेकायदेशिर कमिटी असल्याचे आक्षेप घेतला होता तोच सभासद बेकायदेशिर कमिटीचा अध्यक्ष म्हणून राजिनामा द्यायला पाहिजे अशी मागणी करत आहे. जर निवडलेली कमिटी बेकायदेशिर ठरवल्यामुळे त्या कमिटीचा अध्यक्षानी राजिनामा पण द्यायला पाहिजे का? कृपया याबाबत मार्गदर्शन खुलासा करावा हि नम्र विनंती.
निवडलेली कमिटी बेकायदेशिर ठरवल्यामुळे त्या कमिटीचा अध्यक्षानी राजिनामा पण द्यायला पाहिजे

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर/ मॅडम
सर माझ्या वडिलांनी विकत घेतलेल्या जमिनीत माझ्या चुलत्यानी अनधिकृत घराचे काम केलंय तर त्याच्यावर कारवाई करायची असेल तर काय काय करावे लागेल
न्यायालयात दावा दाखल करून अतिक्रमण काढून मिळावे हि मागणी करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Sir नमस्कार. माझे नाव भास्कर काशिनाथ पवार माझे वय 76 आहे. आम्ही पांच भाऊ आहे. 424/1 गट नंबर मध्ये सुरेश पवार 50 गुंठे 10 गुंठे पोत्खराबा आहे तसेच 424/2 युवराज पवार 50 गुंठे 10 गुंते पोत्खराबा आहे 424/3 मधे आबा पवार 50गुंठे 10 गुंठे पोत्खराबा आहे 424/4 माझे सर्वात मोठे भाऊ रामराव पवार शेत्र पण 50 गुंठे 10 गुंठे पोत्खराबा आहे पण मी जमीन rail शेजारी आहे हलकी आहे म्हणून मला 50 गुंठे 34 गुंठे पोट खराब आहे म्हणजे मला 24 गुंठे. जास्त मिळाले आहे. 25 वर्ष पूर्वी खात वाटप झालं होते . मी 24 गुंठे पोत्खराब मघे गाल मशगत करून त्या शेत्रात. 24 गुंठे शेती करत आहे पण माझा एक भाऊ म्हणत आहे की तुला जास्त शेत आहे तुला द्वावे लागेल त्या साठी मला कायदेशीर माहिती द्यावी ही विनंती करतो..
आपले रीतसर वाटप झाले असेल व पीकपाणी सादरी आपले नाव त्या क्षेत्रात दरवर्षी म्हणजे वाटपासून लागत असेल तर , आपणास काही घाबरण्याचे कारण नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपले रीतसर वाटप झाले असेल व पीकपाणी सादरी आपले नाव त्या क्षेत्रात दरवर्षी म्हणजे वाटपासून लागत असेल तर , आपणास काही घाबरण्याचे कारण नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sagar
19-01-2022
sagarkandekar1990@gmail.com

महोदय ,
माझा वडिलांची 2 एकर वडिलोपार्जित शेती माझा नांवे करायची आहे कारण वडील शेती करु शकत नाही तसेच बँके तुन कर्ज घेण्यासाठी पण ते जाऊ शकत नाही तर काय करावे लागेल व किती खर्च येऊ शकतो?
तुमच्या नावे नोंदणीकृत बक्षिसपत्र करून घ्या

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महोदय सर,
सर , माझ्या गावामध्ये एक प्रसिद्ध देवस्थान आहे, याची कसलीही सरकारी नोंद नाही, देणगी स्वरूपाने जमणारी संपती ची हि वार्षिक 10 ते 12 लाख आहे, कारभारी मंडळी व्याज रूपाने पैसा देवून टाकतात , या संपतीचा योग्य उपयोग होत नाही. म्हणून यावर शासकीय नियंत्रण करण्यासाठी काय करावे लागेल ?
धर्मदाय आयुक्‍तांकडे तक्रार करावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर माझे जमिनीला एक एकरला 1/4/57 चे कुळ लागले आहे. बाकी 8एकर जमिन माझे ताब्यात आहे. कुळ एक एकराची होऊ शकेल का? कुळ व त्याचा मुलगा मयत आहे. नातू जमिन ख,रेडी करु इच्छित नाहि. 53/54च्या 7/12 मध्ये एक एकरची नोंद आहे
एक एकर जमीन क्षेत्राची विक्री (कलम ३२ ग ) कुळाचे लाभात होऊ शकते .
मात्र कुल घेउ इच्छित नसेल तर , जमीन शासन जमा होऊन , ३२प प्रमाणे वाटप होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,माझे जमिनीला 1/4/57 चे कुळ लागले आहे.एकूण क्षेत्र 9 एकर आहे. त्यापैकी एक एकर जमीन कुळ कसत होते .त सी नोंद 53/54 च्या 7/12 वर आहे. कुळ खरेदी एक एकर ची होइल का? करु व त्याचा मुलगा मयत आहे नातु जमिन खरेदी करु इच्छित नाही.
आपला प्रश्‍न निट कळला नाही. एक एकर जमीन कुळ कसत होते तर, एक एकर जमीन कुळ खरेदी करू शकेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार, मला माझी स्वकष्टार्जित जमीन माझ्या नातवाच्या नावाने बक्षीस पत्राने करायची आहे. त्याचे वय 10 वर्षे आहे. आणि जमीन देखील वर्ग 1 आहे. तरी त्याबद्दल मार्गदर्शन करावे. शिवाय त्याचे नाव 7/12 वर लागेल का.. किंवा इतर खरेदी जमीन मालकाप्रमाणे त्याला सर्व अधिकार प्राप्त होतील का??? धन्यवाद...
जर मिळकत हि शेतजमीन स्वरूपाची असेल तर आपण नातवाचे नावे मिळकत बक्षीस पत्राने देऊ शकता . मुंद्रणक शुल्क २०० रुपये आहे .
मात्र नातू हा अज्ञान असल्याने त्याचे बरोबरच त्याच्या वडिलांचे अथवा आईचे Guardian म्हणून नाव लागणे आवश्यक आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

उपविभागीय अधिकारी यांनी एका व्यक्तीस मागील कालावधीत वैध असलेले ओ बी सी नॉन क्रीमिलेयर दिले आहे माझ्या माहिती प्रमाणे नॉन क्रीमिलेयर हे ज्या दिवशी ईशु केले जाते त्या दिवसा पासून पुढील कालावधीस वैध असते ते एक दोन किंवा 3 वर्षा पर्यंत वैध असते या बाबत मार्गदर्शन मिळावे जसे मागील कालावधीत वैध प्रमाणपत्र देण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांचे अधिकार शासन निर्णय परिपत्रक नियमावली

Question by सागर
15-01-2022
sagarkandekar1990@gmail.com

महोदय
माझ्या पणजोबाची आम्ही राहत असलेला गाव सोडून दुसऱ्या गावी ५ एकर जमीन होती.पणजोबाना ४ मुले होते व त्या मध्ये माझे आजोबा सर्वांत लहान होते. पणजोबा हे १९५० रोजी मयत झाला नंतर ए.कु.क म्हणून मोठ्या मुलाचे नाव वारस म्हणून लागले होते व नंतर ह्या जमिनीचे जुने नोंदी बघितले तर असे समजले की मोठ्या मुलाने १९८८ रोजी एक त्रयस्थ व्यक्ती ला सदर जमीन तहसीलदार यांना अर्ज देऊन जमीन माझा ताब्यात नाही असे लिहून नावे केली असा तहसीलदार चा आदेश आहे.आज पणजोबाची ची ४ ही मुले मयत आहे व माझा वडिलांना ह्या बद्दल काहिच माहिती नाही तर आज मितीला ति जमीन मला मिळाली म्हणुन मला काही अधिकार उरला आहे का ? मार्गदर्शन करावे.
केवळ तोंडी वर्दीने ( सूचनेने ) जमीन हस्तांतरण होत नाही . नोंदणीकृत दस्ताशिवाय जमिनीचे हस्तांतरण होत नाही .

ज्या फेरफाराने , त्रयस्थ व्यक्तीचे नाव लागले आहे , तो फेरफार अहवानीत करा . त्याचे विरद्ध प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझे आईचे वडील २०१७ साली वारले होते आणि त्यानंतर लगेच आमच्या दोन्ही मामांनी आईला व मावशींना न विचारताच संपूर्ण ४० एकर जमीन नावावर करून घेतली. आता मावशा पचतावा करत आहेत काय करायला पाहिजे उपाय सुचवा.
दिवाणी न्‍यायालयात दाद मागावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सन 1988 दरम्यान माझे वडील व इतर दोघांमध्ये एक गुंठा जागा खरेदी झालेली आहे कालांतराने 1992 पर्यंत वडिलांनी उर्वरीत दोघांकडून त्यांचे हिस्स्याची असलेली जमीन खरेदी केली परंतु 7/12 वर वडिलांच्या नावासमोर 84 क चा शेरा नोंदविला गेलेला असल्याने, 7/12 वरून उर्वरित दोघांची नावे निघत नाहीत. वडील शेतकरी नाहीत. तथापि सदरची जागा 1998 पासून पुणे महानगरपालिका मध्ये समाविष्ट झालेले आहे आणि सद्यस्थितीत सदर सर्व्हे नंबर पुणे महानगरपालिका अंतर्गत निवासी झोन मध्ये आहे. त्यामुळे सदरची जागा निवासी झोन मध्ये असल्याने त्याआधारावर 7/12 वरून 84 क शेरा काढता येईल काय?
अशी खरेदी नियमानुकुल करण्‍याची तरतुद आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

वाडीलोपार्जित शेत जमीनीचा सातबारा एकत्रित आहे, भाऊ आणि बहिनीच्या नावे एकत्रित क्षेत्र दाखवते आहे , क्षेत्र वेगवेगले करून घेण्यासाठी काय करावे लागेल। वाटनी करण्यासाठी भाऊबंद तयार नसतील तर क्षेत्र वेगवेगले करण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल
न्यायालयात हिस्स्याप्रमाणे वाटप करून मिल्ने व त्याप्रमाणे क्षेत्राचा ताबा मिळण्यासाठी आदेश देणे या करीत The Specific Relief Act खाली दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vikas Kanse
01-01-2022
kansevikas@gmail.com

नमस्कार सर,
मी 1998 साली 54 गुंठे जमीन गहाणखताने घेतली होती. त्याचा फेरफार 7/12 उताऱ्यावर दाखल आहे. त्याच जमिनीचे पुढे 2007 साली मी कायम स्वरूपी खरेदी खत करून घेतले. त्यावेळेस मी खरेदी दस्ताची प्रमाणित कॉपी तलाठी ऑफिसला नोंद करण्यासाठी दिली होती. पण त्यांनी नोंद केली नाही. खरेदी दस्ताचा फेरफार झालेला नाही. ती चुकी माझ्या आता लक्षात आल्यामुळे मी तलाठी ऑफिसला मूळ दस्तासोबत भेट दिली. तर त्यांनी जुने फेरफार आणि जुने 7/12 आणण्यास सांगितले. मी जुने 7/12 1993 सालापासून ते आतापर्यंत आणि गहाण खताचा फेरफार जमा केले आहेत. जमिनीचा मूळ मालक मयत आहे. माझ्या नावे संबंधित गटात योग्य ती जमीन आहे. पण मूळ जमीन मालकाचे नाव इतर अधिकारात आहे. गहाण खताचा फेरफार अद्याप रद्द झालेला नाही. तरी माझा प्रश्न आहेत- 1. त्या गटातील गहाण खताचा फेरफार रद्द होऊन खरेदी दस्ताप्रमाणे फेरफार करण्यासाठी काय करावे लागेल?

धन्यवाद सर..
आपल्या कथनावरून खरेदी खताचा अंमल ७/१२ ला दिला आहे . मात्र गहाण खताची अजूनही ७/१२ सदरी नोंद आहे . आपण प्रांताधिकरी यांचेकडे हि नोंद टाकण्यासाठी अपील दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय
आम्ही आमच्या आईच्या नावाने मागील वर्षी जमीन खरेदी दस्त केला आहे. सदरची जमीन खरेदी करताना सातबारा वरती भोगवटदार वर्ग 1 असा उल्लेख होता, मंडल अधिकाऱ्यांनी सदरची जमीन महार वतन म्हणून नोंद नाकारली आहे, सदरच्याच जमिनीचे अगोदर 4 व्यवहार झाले आहेत तेव्हा कुठेही नोंद नाकारण्यात आली नाही. जुने फेरफार तसेच 9-3,9-4 उतारे काढून बघितले तर सदरचा गट कुठेही महार वतन म्हणून नोंद नाकारलेली नाही. आता तहसीलदार यांनी जमिनीचा सत्ता प्रकार भोगवटदार वर्ग 2 केला आहे. आम्ही दस्त केला तेव्हा व त्या अगोदर कित्येक वर्ष वर्ग 1 च होता. आमच्याकडे जुना दस्त सुद्धा आहे. जमीन विकानाऱ्यांची पण काही हरकत नाही. प्रांत अधिकारी यांचेकडे अपील केले आहे. तर जमीन नावावर होईल का? त्यासाठी काय करावे लागेल.? मार्गदर्शन मिळावे.
The Maharashtra Inferior Watan ( Abolition ) Act 1959 , अन्वये महार वतन जमीन हस्तांतरणास २००८ पूर्वी निर्बंध होते . २००८ नंतर हस्तांतरणावरील निर्बंध दूर करण्यात आले आहेत . आपण केलेल्या नोंदणीकृत दस्ताची प्रत अपील मेमो समवेत प्रांत अधिकारी यांचेकडे द्या . आपली नोंद मंजूर करण्याचे आदेश प्रांत अधिकारी देतील . मात्र २००८ पूर्वी विना परवाना हस्तांतरने झाली असल्याने , जमीन वर्ग २ च राहणार . वर्ग १ करायची असल्यास चालू बाजार मूल्याच्या ५०% रक्कम जमा केल्यास , ती वर्ग १ होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय सर,
या वर्षा पासून महाराष्ट्र तुकडे बंदी अधिनियम १९४७ ची अंबलबजावणी महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी काढलेल्या परिपत्रकामुळे कडक झालेली आहे म्हणून मला खालील प्रश्नाविषयी मार्गदशन हवे आहे.
१ ) १९४७ ते २०२१ पर्यंत झालेले जमिनीचे तुकडे कसे काय कायदेशीर ठरू शकतील या सर्व नोंदी बेकायदेशीर असतील का ?
२ ) हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ नुसार वारसामध्ये सम प्रमाणत वाटप होईल, हे हक्क संपुष्टात येईल का ? कारण २ एकर जमीन ३ भाऊ व १ बहिण यांच्यात सम प्रमाणत वाटप हे अर्धा एकर येईल हे वाटप तुकादेबंडीचे उलंघन ठरेल का?
३ ) आज पर्यंत झालेले भाव-भावात वाटणी पत्र हे सुद्धा रद्द होतील का?
४ ) आजही मा.न्यायालात नागरिक तडजोड करून आपली वाटणी करून घेतात, मा.न्यायालयाच्या नजरेत असे तडजोड पत्र, वाटणी ,ई. नजरेत येत नाही का?
बालाजीराव खूप मूलभूत प्रश्न आपण मांडले आहेत . त्याची उत्तरे खालील प्रमाणे .
१. मंध्यतरी झालेल्या सुधारणांनुसार , ज्या मिळकती /जमिनी बिगर शेती जमीन वापर विभागामध्ये असतील , अश्या जमीनि / मिळकती २५% चालू बाजारभावाच्या रक्कम भरून नियमित होऊ करता येतात . मात्र ज्या मिळकती /जमिनी बिगर शेती क्षेत्रात नसतील , अश्या जमिनी चे व्यवहार सुरवातीपासूनच अवैध आहेत .
२. खरतर वारसांमधील वाटपामध्ये जर Fragment( तुकडा) निर्माण होत असेल , तर काही वारसांनि जमिनीच्या ऐवजी , पैसे घेणे अंतर्भूत आहे . हे पैसे ज्यां वारसांना , त्यांना मिळणाऱ्या हिस्स्यांपेक्षा जादा जमींन देऊ केली जाते ( तुकडा पडू नये म्हणून , ज्या वारसांनी जमीन ऐवजी पैसे घेण्यास संमती दिली आहे व त्यांचे हिस्स्याची जमीन ज्या वारसांना मिळणार आहे ) . अशे वाटप जिल्हाधिकारी यांनी करण्याचे आहे .
३. खरतर कायद्याचा भंग झाला असेल तर , व्यवहार /हस्तांतरण हे आरंभापासूनच अवैध व रद्द आहे .
४. न्यायालय फक्त सह हिस्सेदाराचे हिस्से ( share ) निश्चित करते . प्रत्यक्ष वाटप जिल्हाधिकारी यांनी करण्याचे आहे . हे सरस निरस वाटप प्रश्न २ च्या उत्तरात नमूद केल्याप्रमाणे तुकडा निर्माण होणार नाही या प्रमाणे करण्याचे आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rajendra Karnde
25-12-2021
rajendra5471@gmail.com

महोदय,
गट न. ६७८, गाव कोळे, तालुका कराड , जिल्हा सातारा या गटातून कराड-ढेबेवाडी हा रस्ता कोळेवाडी गणेश मंदिर या ठिकाणी गेला आहे ( संपादित झाला आहे ). तर त्या वेळेचा फेरफार उदा. गट न. ६७८ मधील कोणत्या हिस्सेदाराची जमीन गेली, किती गेली, त्याबद्दल त्याला काय मोबदला दिला किंवा दुसरीकडे कुठे जमीन दिली, किंवा त्या गटातील सर्वांची सामाईक जमीन गेली का, किती गेली ? या गटातिल हिससेदार कृष्णा आबा मांग ( तडाखे ) व यशवंत आबा तडाखे हे सख्खे भाऊ आहेत. ७/१२ वर दोघांची क्रमशः १४/१४ गुन्ठे जागा दिसते परंतु प्रत्यक्ष १३ गुन्ठे जागा आहे. संपूर्ण गत १०७ गुन्ठे आहे परंतु प्रत्यक्ष कमी आहे.
तर त्या गटातुन सरकारी रस्ता गेलेला फेरफार मिळेल का ?
कृपया मार्गदर्शन करावे आपला आभारी आहे
आपण ७/१२ अथवा संयुक्त मोजणी पत्रक पहा .
संयुक्त मोजणी पत्रक जिल्हाधिकारी कार्यालय येथे भूमी अभिलेख शाखेत मिळेल
७/१२ तलाठी कडे पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

निर्वासित लोकांची मालमत्ता असलेला गटांची खरेदी करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल तसेच भू धारणा पध्दत - वर्ग 1 करायचे आहे तर मार्गदर्शन पाहिजे धन्यवाद
निर्वासित मालमत्ता एखाद्याला प्रदान केली कि , ती वर्ग १ ची आहे . त्याचे विक्रीस परवानगीची गरज नाही .
जर शासनाच्या मालकीची मिळकत एखाद्या व्यक्तीस दिली असल्यास , ती वर्ग २ ची आहे . निरवासित व्यक्तीस , त्याची पाकिस्तान मध्ये असलेली जमीन , स्थलांतरण केल्याने गेली असल्याने , त्याचे बदल्यात त्याला दिलेली मिळकत आहे . त्यामुळे पुनर्वसन खाली दिलेल्या जमिनीप्रमाणे ती वर्ग १ ची असते . जमीन विक्री वर काही निर्बंध नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.40 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3