जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सचिन पराते
24-09-2020
Sachin.my passion@Gmail.com
सर नगर परिषद हदितील ग्रीन झोन मधील शेत जमीन कलम ४२/ड मधून अकृशक होते का ? होत असल्यास अर्ज कोणाला सादर करावा , कसा करावा या संबंधी माहिती द्यावी हीच विनंती
पराते साहेब
४२ ड ची तरतुदीनुसार , गावठाणा पासून २०० म च्या आतील सर्व मिळकती त्या जमिनीच्या मालकाच्या इच्चेनुसार बिन शेती झाल्याचे मानीव तरतूद आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आदेश प्रभाकर लांजेकर
23-09-2020
adeshlanjekar1998@gmail.com
नमस्कार सर,
आमच्या घराची 'अ' व 'ब' घरपट्टी केलेली होती त्यापैकी 'अ ' घरपट्टी भरत नसल्याने मुले 2012 नगरपंचायत झाल्यावर ती रद्द झालेली आहे.. तर ती मला पुन्हा सुरू करायची आहे त्यासाठी काय काय करावे लागेल याची माहिती द्यावी.. 'अ' घरपट्टीचा केवळ चहूतरा बांधलेला आहे...
Question by Jadhav subham
23-09-2020
Jadhavsubham@gmail.com
सर, वर्ग 2 च्या जमिनीचे मृत्यूपत्र करता येते का?
Question by Nitin dhum
23-09-2020
Nitindhum@gmail.com
सर मी आदिवासी खातेदार आहे, मी रजिस्टर दस्ताने जमीन खरेदी केली आहे पण तलाठी सांगतात इतर हक्कात 1966 चे 36 व 36 ला अधीन अशी नोंद टाकावी लागेल, पण माझी स्वतःची मिळकत आहे तर इतर हक्कात नोंद का? आणि मला तोंडीं सांगतात नोंद करण्याची काही पद्धत असेल तर plz सांगा आणि नोंद झाली तर मला जमीन विकता येणार नाही
नितीनराव , हि तरतूद कायद्यानुसार ठेवायचीच आहे . त्याला पर्याय नाही . ती आपल्या फायद्यासाठी आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sanjay koli
23-09-2020
sanjaypkoli1996@gmail.com
कोर्टात अपील चालू असताना बांधकाम करत असतील तर याबाबत कोणाकडे तक्रार करावी.
करत असलेल्या बांधकामास त्याने परवानगी घेतली असेल तर केवळ हि बाब आपण न्यायालायचे निदर्शनास अनु शकता . न्यायालय प्रकरण गुणवत्तेच्या आधारे मनाई हुकुम देऊ शकेल . परवानगी नसेल तर , नियोजन प्राधिकारी यांचे कडे तक्रार करा
नियोजन प्राधिकर -
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sayeed Abdul Ajij Pirjade
22-09-2020
sayeedpirjade9922@gmail.com
Wakf property( shet jamin) var varas nond karta yete ka ?
Question by शितल
22-09-2020
shitalwaghmare4491@gmail.com
तहसीलदार यांच्या कडून वारस नोंदणी ची प्रकिया कशी करावी या बद्दल माहिती पाहिजे
वारस तपास व नोंदणी हे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मार्फ्फात होते . तक्रार झाली तरच , प्रकरण तहसीलदार यांचेकडे जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by NIKHIL ZAMBRE
22-09-2020
nikhil.zmabre06@gmail.com
नमस्कार
आमचे वडिलांचे नावे काही जमीन आहे ज्याच्या सातबारा उताऱ्यावर आम्हा तीन भावांचे नाव लागलेले आहेत. आता आम्हाला खातेफोड करून जमीन आपल्या आपल्या नावावर करणे आहे. तर यासंबंधी ची प्रक्रिया आणि शुल्क किती असेल यासंबंधीची सविस्तर माहिती हवी आहे. जमिनीच्या संबंधित सगळे कर भरलेले असल्यास किती शुल्क भरावा लागेल हे कळावे.
धन्यवाद.
आपल्या तिघांची नावे जर सातबारा ला असतील व वाटणीसाठी जर कोणाची काही हरकत नसेल तर आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये आपल्या तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकता. अर्जासाठी जी काही दहा ते वीस रुपये इतकी आहे तेवढीच आपणाला भरावे लागेल. अन्य कोणताही त्यासाठी खर्च नाही.
तहसीलदार यांनी हिस्सा वाटप केल्यानंतर, स्वतंत्र सातबारा करण्यासाठी आपणाला उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे सरस निरस वाटप कार्यवाही करावी लागेल. सरस निरस वाटप झाल्यावर त्याची प्रत्यक्ष मोजणी केली जाते. या मोजणीसाठी चे शुल्क मात्र आपणाला भुमिअभिलेख खात्याकडे जमा करावे लागेल. सरस निरस वाटप झाल्यानंतर त्याच्या आधारे आकारफोड पत्रक तयार केले जाईल व प्रत्येक च्या हिस्सायला स्वतंत्र पोट हिस्सा नंबर दिला जाईल.
मात्र जर या वाटपामुळे तुकडे बंदी तुकडे जोड या कायद्याचा भंग होत असेल व प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र आपणा तीन भावाकडे राहत असेल किंवा कोणा एकाकडे राहत अईल , तर मात्र त्याचे वाटप करता येणार नाही.
त्या जमिनीची अशा पद्धतीने वाटप केले जाईल की प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र निर्माण होणार नाही मात्र असे होत असेल तर एका भावाला किंवा दोन भावांना मध्ये जमिनीचे वाटप केले जाईल व ज्या भावाला जमीन देता येणार नाही किंवा जो जमीन इतरांना देण्यास तयार होईल त्याला त्याच्या बदल्यात त्या जमिनीची नुकसानभरपाईची ज्यांना जमीन मिळत आहे त्यांना द्यावी लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by VINOD PATIL-GAVADE
22-09-2020
ovi20122016@gmail.com
आम्ही 1995 ला 32 ग ची जमीन 50रु च्या स्टॅपपेपर वर खरेदी केली व घर बांधले.1996 पासुन आम्ही सर्व ग्रामपंचायत कर भरतो आहे.25वर्षाने मुळ मालक आता वाद करत आहे.फसवुन जमीन घेतला म्हणतात.कायदेशीर कार्यवाही करतो असे बोलतो.तर आम्ही कायदेशीर होईन का.
काहीही मार्ग नाही . आता घर बांधले आहे . त्यामुळे त्याला काही रक्कम देऊन प्रकरण मिटवून टाकणे व रीतसर खरेदी खात करून घेणे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kunal kolhe
21-09-2020
amolhole777@gmail.com
मी कुणाल
माझी आई १९९५ ला मयत झाली व वडिलांनी दुसरे लग्न केले , वडिलांच्या नावावर (वडिलोपार्जित) ५ एकर होती तसेच माझ्या आईच्या नावे १ घर आहे (स्वकष्टचे ) माझ्या वडिलांनी मला न सांगता त्यांनी पूर्ण जमीन सावत्र आईच्या नावावर बक्षीस पत्र २०१९ ला केली आहे तसेच घरावर वारस नोंद केली आहे
प्रश्न - मला जिमिनीत तसेच घरामध्ये माझा हिस्सा मिळेल का व काय करावे लागेल
Question by बिरुदेव महादेव दाईगडे
21-09-2020
dbirudev@gmail.com
सर १९४६ साली करण्यात आलेल्या दस्त ची मूळ प्रत कोणत्या ठिकाणी अर्ज करून प्राप्त करता येईल .
Question by RAMESH REJENDRA SONAR
18-09-2020
rameshrs2010@gmail.com
सर, माझा वडिलांनी स्वतचा मालकीचा एन. ए. प्लॉट वर जळगाव मनपा नगररचना विभागाची परवानगी न घेता घराचे बांधकाम आठ वर्षापूर्वी केले आहे तसेच आठ वर्षांपासून सदर घराची मनपा घरपट्टी व पाणीपट्टी ही नियमित भरीत आहे तरी आता सदर घर बांधकामाची नगररचना विभाग मनपा परवानगी व भोगवटा परवानगी घेता येईल का व कशाप्रकारे सविस्तर माहिती द्यावी ही विनंती
Question by कुणाल अंकुश जाधव
18-09-2020
mr.k1387@gmail.com
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे "कलम 36 व 36 अ" ला पात्र जमिनीचे 7/12 उताऱ्यावर सहकारी पतसंस्था यांचेकडील थकबाकीच्या बोजाची नोंद घेता येईल का ?
Question by Nilesh Gophane
17-09-2020
nileshgophane1992@gmail.com
सर,
माझा प्रश्न असा आहे की, नवीन बांधकाम करताना कोणाची परवानगी आवश्यक आहे. आणि जर परवानगी नसेल आणि कोणी बांधकाम करत असेल तर त्या बांधकामास स्तगीती कशी देता येइल.
बांधकामाबाबत च्या तरतुदी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायदा 1965 व त्या अंतर्गत तयार करण्यात आलेली बांधकाम नियमावली व प्रादेशिक योजना यामध्ये आढळून येतात. जर गावठाणा मध्ये बांधकाम असेल तर संबंधित ग्रामपंचायतीची उपरोक्त कायद्यान्वये परवानगीची आवश्यकता आहे.
जर बांधकाम हे नगरपालिका हद्दीत असे संबंधित नगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे त्याचप्रमाणे जर बांधकाम महानगरपालिका क्षेत्रात असेल तर संबंधित महानगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे. याव्यतिरिक्त जर विशेष नगरी योजनेमध्ये जर बांधकामाचे उदाहरणार्थ सिडको, म्हाडा किंवा एमआयडीसी , रिया नियोजन प्राधिकरणाची ते परवानगी लागेल.
याव्यतिरिक्त जर गावठाणा बाहेर सर्वे नंबर वर बांधकाम असेल तर त्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी लागेल.
जर बांधकामासाठी परवानगी घेतलेली नसेल तर त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1965 च्या कलम 52 व 53 कारवाई व कार्यवाही करण्याचे अधिकार संबंधित नियोजन प्राधिकारी यांना आहेत.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मिनहाज मुख्तार शेख
15-09-2020
shaikhminhaj786@gmail.com
अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदींनुसार अंध व अपंग व्यक्तींना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी व अभिमानाने जीवन जगण्यासाठी सवलतीच्या दराने जमीन देण्यात येते का नाही
होय
अपंग व्यक्तींना महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम व त्या अंतर्गत असलेल्या नियमन अतर्गत दिली जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
होय
अपंग व्यक्तींना महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम व त्या अंतर्गत असलेल्या नियमन अतर्गत दिली जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rajesh yashwant khobragade
15-09-2020
rajeshkhobragadessm@gmail.com
सर माझ्या वडीलानी २०१७-१८ मधे २०r शेत जमीन काका ला गट१ जमीन विकली अद्याप् जमिनीची रेजिस्ट्री झाली नाही.कारण बँकेचे लोन आहे आता लोन भरूँण त्यान जमीन विक्री करू ई छिसर माझ्या वडीलानी २०१७-१८ मधे २०r शेत जमीन काका ला विकली अद्याप् जमिनीची रेजिस्ट्री झाली नाही.कारण बँकेच लोन आहे पन लोन भरूँण त्यान रेजिस्ट्री करून द्यायची आहे पन काही करना मुड़े गट २ ची जी जमीन लागूंनच आहे तिची रेजिस्ट्री करून द्यायची आहे. अस करता येईल का ? (पूर्व न देता पश्चिम कडली मंजे गट १- न विकता गट २ देउ शक्तो का?)
Question by bhagwat prakash dhoran
14-09-2020
bhagawatdhoran@gmail.com
सर मी माझ्ये आजीने बहिणी जवळून 0.50 आर जमीन २००१ मध्ये खरेदी करून घेतली 0.50 परतू आता तिच्या दुसऱ्या बहिणीचा मुलाने दावा केला आहे कि ह्यांनी केलेळी खरेदी हि बेकायदेशीर आहे तर sdo ह्यांनी त्य्च्यक्डून निकाल लावून जमीन सरकार जमा करायचे आदेश पारित केला आहे मी आयुक्ताकडे अपील मध्ये गोलो तर त्यांनी sdo निकाल कायम ठेवला व नंतर मी राज्यमंत्री महसूल ह्याच्या कोर्टात दाद मागितली तर त्यांनी ०२ जानेवारी २०१८ च्या सुधारित परिपत्रकावरून मला माझ्याकडून 25% टक्के दंड आकारून निकाल दिला नंतर दुसऱ्या बहिणीचा मुलगा उच्च न्यायालय नागपूरला कोर्टात गेला व तेथे या मुद्यावर लढला कि आयुक्ताची नेमणूक राज्यमत्री ह्यांनीच केलेली आहे तर आयुक्ताच्या निर्णय विरुध्द तुम्ही उच्च न्यायालयात यायला पाहिजे पण तुम्ही राज्यम्त्री ह्याच्या कोर्टात गेला त्य्मिले तुमच्या राज्यमंत्री ह्याच्या निल्काल रद्द केला व आयुक्ताच्या निर्णयाला अपील करण्याची परवानगी दिली तर निकाल आपल्या बाजूने लागेल आसे काय करावे मार्गदर्शन द्या
कृपया आपला प्रश्न समजून येत नाही . आपला जो निकाल नागपूर उच्च न्यायालयाने दिला आहे . तो निकाल पत्र सादर करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुधीर रघुनाथ मसलगे
14-09-2020
sudhirm70@gmail.com
एन ए नसताना 1200चौ.फुट जागा सन 2017 मध्ये रजिस्ट्री करून घेतली आहे त्यासाठी 7/12 वर नोंद करून घेण्यासाठी काय करावे लागेल
Question by गणेश मोरे
13-09-2020
gmore8624@gmail.com
सर मी एका गावातिल व्यक्त्ती कडुन त्याच्या शेतात प्लॉट घेतला आहे, पण त्यानी तो फक्त बॉन्ड वर ग्रामपंचायत ला लावुन दिला आहे. मला नमूना नं 8 भेटतो पण माझे नाव त्या व्यक्त्ती च्या सातबारा मध्ये येत नाही आणि आता तो मला खरेदीखत करुन देत नाही मी त्या जागेत घर बांधले आहे माझ्या नाव त्या सातबारा वर नाही आले तर मला काही अडचण येईल का. उद्या तो माणुस शेतीचा मालक मला परेशान करु शकतो का माझ्याकडे फक्त नमूना नं 8 आहे सातबारा मध्ये माझ नाव नाही. मला तो पुढे चालुन परेशान करु शकतो का. मार्गदर्शन करा सर की मी आता समोर काय करावे.
आपण जो बोंड पेपरवर जमीन घेतली आहे . त्यावर आपण मुन्द्रनंक शूल्क्शुल्क भरून घ्या . त्याला कायदेशीर पुरावा महत्व येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोरख सामोरे
13-09-2020
GorakhSamore0@gmail.com
सर नमस्कार
माझे वडील एक वर्षा पुर्वी वारले असून त्यांचे श्राद्ध आताच झाले आहे म्हणून आम्ही आता संपत्ती वाटपचा विषय घेतला आहे. परंतू संपत्तीच सर्व बरोबरीने वाटप होत नाही आहे, आम्ही तीन भाऊ असून अजून आई पण आहे. समसमान वाटणीस एका भावाचा आक्षेप आहे, त्यावर कायदेशीर तोडगा काय काढता येईल
त्याबद्दल सहकार्य करावं
धन्यवाद
सर्व सह्धाराकांची संमती असेल तर जमिनीचे वाटप महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये तहसीलदार यांच्यासमोर करता येते. परंतु वाटपाबाबत एका भावाची हरकत आहे. यासाठी दिवाणी न्यायालयात दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54 अन्वये आपलेही हिस्से ठरवून मिळण्यासाठी व त्याप्रमाणे ताबा मिळण्यासाठी दावा दाखल करावा लागेल. िवाणी न्यायालयाने आपले सर्व सह धारकांची हिस्से निश्चित केल्यानंतर प्रकरण सरस निरस वाटपासाठी संबंधित जिल्हाधिकार्यांकडे न्यायालयामार्फत पाठवले जाते. जिल्हाधिकाऱ्यांकडून सदर प्रकरण हे तहसीलदार यांच्याकडे व प्रत्यक्षात सरस निरस वाटपासाठी आपल्या तालुक्याचे उप अधीक्षक भूमिअभिलेख यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले जाते. त्यांच्यामार्फत सरस निरस वाटप केल्यानंतर सरस निरस वाटप तक्ता व सर्व प्रकरण पुन्हा जिल्हाधिकारी यांचेमार्फत ज्या न्यायालयाकडून प्राप्त झालेले आहे त्यां न्यायालयाकडे प्रकरण परत पाठवले जाते. या झालेल्या सरस निरस वाटपाचे आधारित संबंधित दिवाणी न्यायालय अंतिम हुकूमनामा काढते . सदरच्या हुकूमनामा वरती आपणाला महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मुद्रांक शुल्क जमा करावे लागेल. व त्यानंतर सरस निरस वाटप प्रमाणे जमिनीचे स्वतंत्र सातबारा तयार होतील.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal Malode
12-09-2020
vishal.d.malode@gmail.com
माझ्या वडिलांनी जमीन खरेदीखत करून घेतली १९९१ मध्ये ६०गुंठे जमीन विकत घेतली त्यानंतर २००८ मध्ये माझ्या चुलत्या ने त्यातील जमीन २०गुंठे स्वतः च्या नवे करून घेतली वडिलोपार्जित जमीन ३९ गुंठे व हे २० गुंठे म्हणजे त्याच्याकडे पूर्ण ५९गुंठे झाले हे प्रकरण कळल्या नंतर आम्ही त्यावर गुन्हा दाखल करणार होतो पण त्याने आत्महत्यांचे नाटक केलं म्हणून हे प्रकरण मिटावे म्हणून तो म्हणाला अदला बदली पत्रक करू त्याच्या कडले ५९ गुंठे देईल व आमच्याकडे ४०गुंठे राहिलेले त्याला देवू पण त्याने त्यात ५४ गुंठे नावावर लावले बाकीचे राहिलेले ५ गुंठे चा उल्लेख केला नाही त्यात चातुसिमेत त्याचे नाव टाकले व तो त्या आधारे त्यात त्याची जमीन आहे असा दावा करत आहे तर त्याला जमीन मिळेल का राहिलेले ५ गुंठे मध्ये
Question by सचिन पाटील
12-09-2020
patilsachin4978@gamil.com
सर मी बक्षिसपत्र केले आहे.माझे 3 गट आहेत.प्रत्येक गटात पुढीलप्रमाणे 27 गुंठे,13.5 गुंठे,31गुंठे आहे.उर्वरित एवढीच जमीन चुलत्याच्या नावावर आहे.सर्कल 125000 रुपये भरा म्हणत आहे.कशाचे पैसे भरायचे.
Question by Anmol patil
12-09-2020
amolmore907@gmail.com
नमस्कार सर,
आमची वडिलोपार्जित जमीन असून आजोबांना 3 मुले 4 मुली आहेत.परंतु कर्ज घेण्यासाठी आजोबांनी पहिला मुलगा मोठा असल्याने मुलाच्या नावे जमीन करून कर्ज घेतले होते.तेव्हा उरलेल्या दोन मुलांपैकी एक मुलगा 1 वर्षाचा आणि दुसऱ्याचा तर जन्मच झालेला नव्हता.आजोबांचे निधन झाल्या नंतर पहिला मोठा मुलगा इतर 2 भावांना जमीन देण्यास नकार देत आहे.कारण 7/12 उताऱ्यावर त्यांचे एकट्याचे नाव लागले आहे.
वारसाहक्काने जमीन मिळवण्यासाठी काय करावे लागेल..
Question by Sunil Kshirsagar
12-09-2020
sunil.kshirsagar97@gmail.com
माझा प्रश्न असा आहे की समजा एक गट नं (उदा ... गट नं ३४०) हा दोन शेकऱ्यांच्या नावे असून, या गट नं मध्ये दोन्ही शेतकऱ्यांचा सामान क्षेत्र वेगळे दिलेले आहे आणि त्या मध्ये एक विहीर आहे, पण विहीर ही दोन्ही शेतकऱ्यापैकी एका शेतकर्यांचा शेतात पूर्णपणे येते. आणि विहिरीसाठी लागणारी विहीर पड याची नोंद पण ७/१२ उतारा मध्ये नाही .. तर ज्या शेतकऱ्याच्या शेतात विहीर येते व त्या शेतकऱ्याच्या संपूर्ण क्षेत्रा पैकी काही क्षेत्र त्या विहारी मध्ये गेले आहे त्यामुळे तो शेतकरी त्या विहिरीवर त्याचा पूर्ण अधिकार समजतो , पण ७/१२ उतारा नुसार व गट नं एक असल्यामुळे ती विहीर दोन्ही शेतकऱ्याच्या नावाने लागते व उतारा मध्ये "विहीर सामाईक आहे" अशी नोंद आहे तर त्या विहिरीवर खरं हक्क कोणाचा असेल ?? ज्या शेतकऱ्याच्या शेतात ती विहीर येते त्याचा का दोन्ही शेतकऱ्यांचा ...????
Question by रणधीर मारुती बनकर
11-09-2020
brandhir36@gmail.com
सामायिक शेत जमीन वेगळी करून घेण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांना अर्ज कसा करावा
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
