जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by kiran tambe
22-07-2020
kirantambe375@gmail.com
नमस्कार साहेब
१९८० मध्ये फेरफार झाला आहे कि जमिन मालक माझी पणजी यांनी वर्दी दिलेवरून व वर्दी पाहून नोटीस लागू केली .असा शेरा आहे. व त्यानुसार सदर व्यक्तीची कुळ म्हणून नोंद ७/१२ मध्ये आली आहे. पूर्वी पासून हि शेती माझ्याच कब्जावहिवाट मध्ये आहे आणि त्याचा खंडही मीच भरत आहे. तसेच २००९ पासून चे ७/१२ माझ्याकडे आहेत त्यामध्ये त्या व्यक्तीचे नाव ब्रॅकेट आहे .हे त्याला माहित होत व त्यानंतर त्याने मला नोटीस मारली आणि सांगितले कि हि शेतजमीन मी तुमच्या पणजी कडून ३ जानेवारी १९७९ च्या कराराने विकत घेतली आहे तेव्हा तू त्याचे खरेदीखत करून दे.त्याच्या नोटीसला मी सविस्तर उत्तर दिले व त्याला त्या नोटीसच्या माध्यमातून सांगितले कि तू खोटे बनावट दाखले बनवून त्यांचा आधार घेऊन माझी व महसूल खात्याची दिशाभूल करीत आहेत शिवाय सदरील शेतीमध्ये माझा आतापर्यंत कबजावहीवाट आहे. तसेच असा चावटपणा पुंन्हा करू नये . असे झाल्यास आपल्यावर कायदेशीर करण्यात येईल असे त्याला मी नोटीसच्या माध्यमातून सांगितले . त्या नोटीस ला त्याने काही उत्तर दिले नाही. परंतु आता त्याने फेरफार दुरुस्ती करून स्वतःच्या नावाची नोंद करून पुन्हा त्या शेतीमध्ये वहिवाट सुरु केली आहे तरी याबाबत काय करायला हवे.
सहकार्य अपेक्षित
किरण तांबे साहेब नमस्कार
वास्तविक मिळकतीच्या इतर हक्क सदरी असलेल्या कुळांच्या ज्या नोंदी असतात त्या महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या तरतुदीनुसार नोंदी केल्या जातात. आपले मिळकतीला प कूळ म्हणून आपल्या पूर्वअधिकार्यांचे म्हणजे पणजीचे नाव होते. व त्यानंतर आपल्या म्हणण्यांनुसार आपले नाव लागले मात्र खोटे अभिलेख सादर करून दुसर्या व्यक्तीने तिचे नाव कूळ म्हणून लावले असल्याचा आपले म्हणणे आहे.
आपले इतर हक्क मध्ये असलेले कुल हे नाव कमी केलेले आहे ते कोणत्या फेरफाराची आधारित कमी केलेले आहे व त्या फेरफार मध्ये कोणता आदेश नमूद केलेला आहे या दोन्हीचाही प्रमाणित प्रति प्राप्त करून आपले नाव कोणत्या आधारावर कमी केले याचा बोध होईल व तदनंतर पुढील कार्यवाही/ कारवाई करता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अशोक बाबुराव शिंदे
22-07-2020
sunilgavate459t@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की,आमच्या चुलतयाने तयानचया नावे असलेली वडीलोपरजित जमीन आम्हाला न विचारता दुसरयाला विकली दुसरयाने ति जमीन तिसरयाला विकली तर ति जमीन आम्ही परत कशी मिळवू शकतो? कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
दुसऱ्या व तिसऱ्या व्यक्तीने या मिळकती , वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करून व मिळकतीचा मालकी हक्क शोध प्रमाणपत्र घेयून खरेदी केल्या असतील तर , दुसरे व तिसरी व्यक्ती , या Bonafide Purchaser for Value without notice स्वताला सिद्ध करू शकतील . त्यामुळे या व्यवहारात त्यांचा काहीही दोष नसल्याने , आपणाला जमीन परत मिळणार नाही .
मात्र या मिळकतीत असणार्या हिस्स्याच्या प्रमाणत मोबदला रक्कम जी चुलत्याने घेतली असेल ती व्याजासह आपणाला न्यायालयात दावा दाखल करून मिळू शकेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप पतांगे
21-07-2020
sandeep.patange111@gmail.com
Hii
सर नमस्कार
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - कुळ कायद्याने प्राप्त जमीन आसा शेरा 7/12 वर आहे कसे काढता येऊ शकेल व किती खर्च यईल या बद्दल माहिती मिळेल काय
Question by संदीप पतांगे
21-07-2020
sandeep.patange111@gmail.com
Hii
सर
नमस्कार सर जमीन कुलकायदा ने मिळालेली आहे 25 गुंठे क्षेत्र आहे त्या पैकी 12-५० गुंठे क्षेत्र ती जमीन चुलत बहीण सख्या काकाची मुलगी आपल्या चुलत भावाच्या नावे करण्याचा विचार केला आहे पण कसे करता येऊ शकते . दान पत्राने करता येऊ शकेल काय , काय करावे लागेल, किती खर्च येऊ शकेल ,माहिती मिळेल काय .
त्यांना ते क्षेत्र विकावे लागेल . मुद्रांक शुल्क १२.५० गुंठे क्षेत्राच्या शीघ्र सिद्ध गणक दर तक्त्यातील बाजार मूल्याच्या ५% दराने भरावे लागेल . तसेच मोजणी फी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सिताराम फलके
20-07-2020
sphalke1955@gmail.com
मला सात बाऱ्या प्रमाने जी जमीन आली आहे तीची मोजनी करावयाची आहे.पण त्या गटात भावाच्या वारसाची नावे आहेत. ते मोजनी अर्जावर सह्या करीत नाहीत. व महसुलवाले सांगतात सर्वांच्या सह्या पाहिजेत. अन्यथा कोर्टात जा. तरी मी काय करावे
नवीन शासन निर्णयानुसार , आपल्या एकट्याच्या अर्जावरून मोजणी होऊ शकते .
मात्र तो शासन निर्णय आपणाला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावरून घ्यावा लागेल . माझ्याकडे उपलब्ध नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by धनचंद सुखलाल परदेशी
20-07-2020
dspardeshi55@gmail.com
माननीय श्री साहेब
शहर तील मालमत्ता पत्रक वर ची जागा ची लांबी रुंदी आणि प्रत्येकक्षात मोजल्यावर जागा ची लांबी रुंदी जास्त भेटत आहे. उदाहरण - मालमत्ता पत्रक वर जागा - ३०' १२' व प्रत्येकक्षात मोजल्यावर जागा - ३०' २२' भेटतं आहे काय करावे लागेल
तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे.
क्षेत्र दुरुस्ती अर्ज जिल्हाधिकारी /अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जालिंदर बाबुराव सिरसट
20-07-2020
jalindar.b.sirsat@gmail.com
महोदय, मी बीड जिल्ह्यातील शेतकरी असून माझे नावे 64 गुंठे तुकडेबंदी कायदा लागू होण्याच्या पूर्वी प्राप्त झाली आहे . सदर शेतजमीन भोगवटा वर्ग ०१ असून जिरायती जमीनचे प्रमाणभूत क्षेत्र दोन एकर आहे मला त्यातील 20 गुंठे विकायची आहे सदर व्यवहार झाल्यास कायद्याचं उल्लंघन होऊ शकते का ?याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी.
६४ गुंठे क्षेत्र म्हणजे अगोदरच तुकडा आहे . विकण्याचा प्रयत्न करू नये . सदरचा व्यवहार नोंदणीकृत होऊ शकणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जालिंदर बाबुराव सिरसट
20-07-2020
jalindar.b.sirsat@gmail.com
महोदय, माझ्या वडिलांनी त्रेचाळीस गुंठे शेतजमीन एका शेतकऱ्याने शेतकऱ्याकडून भोगवटा वर्ग वनची विकत घेतली आहे. सदर शेतकऱ्याकडे वारस हक्काने शेतजमीन प्राप्त झाली होती. माझ्या वडिलांना सदर शेत जमिनीचे सर्व क्षेत्र सर्वांच्या सहमतीने विकले असताना एका व्यक्तीच्या नावे काही गुंठे दाखवण्यात आले होते. त्याचा फायदा घेत त्या वारस व्यक्तीने तेवढे क्षेत्र दुसऱ्या व्यक्तीला विकले आहे सदर व्यक्तीचे नाव सातबारा वरून कसे कमी करावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी
७/१२ वर जेवढे क्षेत्र नमूद आहे , तेवढ्याच क्षेत्र खरेदी दसतात नमूद करण्यात आले असेल तर , महाराष्ट्र जमीन मह्सील अधिनियम १९६६ च्या कलम १५५ अन्वये दुरुस्तीचा अर्ज मेहेबन माम्लेतदार यांचेकडे करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्री.चंदन रमाकांत म्हात्रे.
19-07-2020
Chandanmahtre 2727@gmail.com
माझ्या आजीची आई हि मौजे राई,जिल्हा ठाणे येथील, तेथील वडीलोपजित जमिनीवर ५ भाऊ व २बहिणी वारस होते. पण ५ भावाने वडील वारल्यानंतर ७/१२ ला भावाची नोंद करून २ बहिणीची नोंद केली नाही., आजतागत भावाची नावे ७/१२ सदरी आहेत तरी २ बहिणीचा अधिकार लागतो का?? व त्या साठी कुठे अपील करावा ते सांगावे.
हो बहिनान अधिकार आहे . त्यांचे नाव लागणे आवश्यक आहे . ज्या फेर्फाराने केवळ भावांची नावे लागली आहेत त्या विरुद्ध अपील दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुहृद वाघ
19-07-2020
shswaghmode@gmail.com
सर नमस्कार, माझे आजोबांचे नावे 1970 सालापर्यंत 16 एकर क्षेत्र सर्वे नं 22 मध्ये होते. त्यामध्ये 20 गुंठे वस्तीपड होती व 12 खोलींचे घर होते. सन 1971 साली आजोबांनी 4 मुलांच्या नावे प्रत्येकी 4 acer क्षेत्र केले फक्त खातेफोड केली. व वस्तीपड जागेची प्रत्येकी 5 गुंठे सर्वे नं 22 सातबारा वरती नोंद केली, परंतू 1973 साली सर्वे नं 22 चे चार गट चार मुलांचा हिस्सा नुसार अनुक्रमे 75,76,77,78 पडले. सदर वस्तीपड 20 गुंठे हि गट नं, 75 मध्ये आहे. सदर गट नं पडल्यानंतर वस्तीपड जागेची नोंद गट नं 75 च्या मुलाने परस्पर रद्द केली. सदर जागेत उर्वरित 3 मुलांचे घर आहेत व त्याची ग्रामपंचायत मध्ये नोंद आहे. व ती घर गट नं 75 चा मुलगा पाडत आहे. तर उर्वरित 3 मुलांनी काय करावें . कृपया मार्गदर्शन करावे.
अधिकार अभिलेख पत्रकी ( ७/१२ चा न न १२ ) ला केवळ पिकांच्या नोंदी घेतल्या जातात . त्यामुळे त्याठिकाणी वस्तीपड नोंद घेणे अभिप्रेत नाही . आपल्या घराची नोंद ग्रामपंचायत अभिलेख सदरी आहे हे पुरेसे आहे . आपला हक्क त्यामुळे जतन होत आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by इरफान गुलामअली शेख
18-07-2020
irfaan.shaikh313@gmail.com
नगर परिषद हद्दितिल विकास आराखड़ा मंजूर झालेल्या ७/१२ ला बागायती शेती म्हनून नोंद असलेली शेतजमिन जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय शेतकरी नसलेल्या शिक्षण संस्थेला बक्षीसपत्र करुन देणे विधिअग्राह्य असेल काय ? याबाबत मार्गदर्शन करावे.
हो निच्छित . महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६३ - ( 1C) नुसार , नगरपालिका हद्दीत स्थित जमिनीला कलम ६३ च्या तरतुदी लागू होत नाही . त्यामुळे शिक्षण संस्थेला बागायती शेत जमीन हस्तांतरण करता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जालिंदर बाबुराव सिरसट
17-07-2020
jalindar.b.sirsat@gmail.com
तुकडेजोड व तुकडी बंदी कायद्यानुसार शेत जमिनीचा व्यवहार झाल्यास कीती दिवसांत तो व्यवहार रददबातल होतो
सध्या परिस्थितीत जमिनीचा तुकडा पडत असेल तर अश्या जमिनीचे दस्त नोंदणीकृत होत नाही .
तसेच अश्या जमिनीचे नोंदणीकृत दस्त झाल्यास , व्यवहार रद्द होत नाही तर , खरेदी खत निष्फळ होते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ज्ञानेश्वर अंतरकर
17-07-2020
Dnyaneshwarantarkar1844@gmail.com
सर, सर्व्हे नंबर २७ मध्ये १२एकर १२ गुंठे मुळ शेतकऱ्याच्या नावे होती.त्यातील आजोबांनी (१९६५)लावला ६ एकर जमीन विकत (खरेदी) घेतली आहे.त्याची सातबारा नोंद लावला करण्यात विलंब झाला.नंतर त्या शेतकऱ्यानी शिल्लक राहिलेली जमीन xy व्यक्तीला (१९६७)ला ६एकर १२ गुंठे विकली .गट एकत्रीकरणामध्ये गट नंबर ११५ मध्ये आजोबांच्या नावे ३ एकरची नोंद झाली वxy व्यक्तीच्या नावे ६एकरची १२ गुंठे नोंद झाली. आज फक्त गट ९एकर १२गुंठे आहे. तर ३ एकर जमीन ही तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने झाली आहे . तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने त्याची मुळं जमीन कमी आहे . तसेच भुमी अभिलेख विभागात जाऊन पाहणी केली व प्रत घेतील आहे तर ३ एकरची कशाप्रकारे नोंद करण्यात येईल.कारण गट एकत्रीकरण मधील चुक दुरुस्त करण्यासाठी कोणाकडे अपील करावे कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत कायद्या अंतर्गत दुरुस्तीची तरतूद नाही . केवळ पूर्ण योजना ( Scheme) हि सदोष , अयोग्य असेल किंवा लेखन प्रमाद चूक अथवा गणितीय चूक असेल ज्यामुळे , पूर्ण योजनेवर कोणताही परिणाम होणार नसेल तरच दुरुस्ती होते . आपली चूक दुरुस्त होणे अशक्य वाटते . शिवाय मुदतीच्या कायद्याची बाधा हि आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिपाली आजवेलकर
16-07-2020
dipalee747@gmail.com
ज्या गावात आम्ही राहतो तीथे 7 पिढ्या गेल्या असून 1गुंठा जमिन आमच्या मालकीची असून त्या जागेचा कर आम्ही भरतो.त्या जागेत मूळ घर आहे पण अंगणासमोरील 1 गुंठा जागा जमिन मालकाने पुवॆंजाना तोंडी दिली होती त्या जागेत आमचा 30 वषाॆंपासून वावर आहे आणि आमचा वडीलोपाजिॆत गोठा त्याठीकाणी 30 वषाॆंपासून आहे .पण आमच्याकडे कागदोपञी काही पूरावा नाही.आणि आता आमच घराच बांधकाम चालू आहे आम्ही घर 10 फूट पूढे घेत आहोत पण जमिन मालकाने घर बांधकाम अडवले आहे घर मागे घेन्यास सागत आहे तर अंगणासमोरिल जागा कूळ कायद्याने ताब्यात कशी घेता येईल? 100 रू. च्या bondpaper त्याने लिहून दिले होते पण नोटरी नाही आमच्याजवल..मागॆदशॆन करावे.
आपली जागा अथवा घर हे गावठाण जागेत असेल व आपण त्या जागेवर गेले ७ पिढ्या राहत असाल तर अन्य दुसरा मालक कसा असू शकतो ? ग्रामपंचायत अभिलेख तपासून घ्या . त्यामध्ये आपल्या घराच्या पुढील जागेला , आपल्या पूर्वजांची नावे असतील तर , दुसर्या कोणाशी आपणाला अडवण्याचा अथवा आपल्या प्रस्तावित बांधकामास अडथला करण्याचा अधिकार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ज्ञानेश्वर अंतरकर
14-07-2020
Dnyaneshwarantarkar1844@gmail.com
सर नमस्कार
सर्वे नंबर ३७ मधील एकुण जमीन १२एकर १२ गुंठे तर त्यातील ६ एकर जमीन आजोबांनी १९६५ लावला विकत घेतली आहे.उरलेली जमीन दुसऱ्या शेतकरी यांनी १९७२ लावला ६एकर१२ गुंठे घेतली आहे.तर गट एकत्रीकरणामध्ये आजोबांच्या नावे ३ एकरची नोंद झाली आहे.आज गटामध्ये ९ एकर१२ गुंठे नोंद आहे. तर ३एकरची नोंद होऊ शकते का? त्यासाठी अपील कोणाकडे करावी.
अपील करून काही उपयोग नाही . जमीन एकत्रीकरण यामुळे गटाची बांधणी / रचना , जमिनीच्या उत्पादकतेच्या अनुषगाने व पूर्वजांनी दिलेल्या संमती मुले झाली आहे . महाराष्ट्र धारण जमिनीचा एकत्रीकरण करण्याचा व तुकडे पडण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम , या मध्ये एकत्रीकरण योजना या विरुद्ध अपील करण्याची तरतूद नाही . एकत्रीकरण योजना प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर लगेच हरकत घेणे आवश्यक होते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ganesh chavan
14-07-2020
ganeshrajemech@gmail.com
ग्रामपंचायत मिळकत नंबर 220 जागा माझ्या आईच्या नावे होती तरी ती 2012मध्ये गावातील एका इसमाच्या नावे नोंद ग्रामपंचायत द्वारा करण्यात आली ही नोंद करताना त्याने बनावट नोटरी त्यावरील बनावट साक्षीदारांच्या सही व बँकेच्या कर्जमुक्तीचा बनावट स्कॅन केलेला दाखला जोडून ग्रामपंचायत मार्फत नोंद स्वतःच्या नावे केली त्यावेळेस मी शाळेत शिकत होतो ही बाब मला मार्च 2020 मध्ये उघडकीस आली तरी या जागेवर या जागेवर माझ्या आईची ची नोंद पुरवत कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे
कर्जमुक्ती दाखल्याच्या आधारे त्रयस्थ व्यक्तीने ग्रामपंचायत अभिलेखांमध्ये/ ग्रामपंचायत कर आकारणी दोन्ही मध्ये त्याचे नाव दाखल केल्याचे आपले म्हणणे आहे. याचा अर्थ आपले घर कर्ज उभारणीसाठी त्या व्यक्तीकडे अथवा त्याच्या पूर्वजांकडे गहाण म्हणून ठेवले होते किंवा कसे? अथवा त्या व्यक्तीने अथवा त्याच्या पूर्वजांनी आपण ज्या घरात राहता ते घर आपल्या पूर्वजां कडे गहाण ठेवले होते काय? जर आपले घर हे त्या व्यक्तीकडे अथवा त्याच्या पूर्वजांकडे जर गहाण ठेवलेले असेल व त्याबाबतची घेतलेली कर्जाच्या रकमेची परतफेड त्या व्यक्तीने केलेली असेल तर सहाजिकच त्याने गहाण म्हणून ठेवलेले घर, त्याला मिळण्याचा हक्क आहे. आपल्या म्हणण्यानुसार जर त्याने बनावट कागदपत्र तयार करून म्हणजे कर्जाची परतफेड न करताच, खोटे कागदपत्र तयार करून कर्जाची परतफेड केलेली आहे असे दाखवलेले असेल व त्या आधारे ग्रामपंचायत अभिलेखा मध्ये त्याच्या नावाची नोंद केलेली असेल तर आपणाला सर्वप्रथम त्याने तयार केलेले कागदपत्र हे बनावट अथवा खोटे आहेत हे फौजदारी दावा दाखल करून सिद्ध करावे लागेल. तदनंतरच त्या व्यक्तीचे नाव कमी होऊन आपले नाव ग्रामपंचायत अभिलेख सदरी दाखवू शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनय कुळाने
13-07-2020
arisrajya1997@gmail.com
नमस्कार सर,
एका गटा मधे ४ लोकांची नावे आहेत. आणि ४ समान प्लॉट करण्यात आले आहेत. आमच्या प्लॉट वर गणेश चा कब्जा आहे आणि गणेश च्या प्लॉट वर आमचा. तर आम्हाला घर बनवायचे आहे. घर बनवून झाल्यास गणेश घरावर हक्क सांगू शकतो का ? की एकाच गटात असल्यामुळे काहीही फरक पडत नाही ?
आपला परस्परांच्या भूखंडावर/ गटावर कब्जा असल्याचे आपले कथन आहे. यावर उत्तम उपाय म्हणजे आपण प्रत्येकाच्या कब्जा खालील असलेल्या भूखंडाचे एक्सचेंज डिड/ देवाणघेवाण दस्त करून घ्यावा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sainath
13-07-2020
sainathrathod5@gmail.com
एकदा फेरफार मंजूर झाल्या वर त्यप्रमाने 7/12 वर नोंद होणे अपेक्षित आहे मात्र तसे झाले नसल्यास उपाय योजना काय कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती
Question by आशिष सुनिल श्रीवास
13-07-2020
ashishshriwas1991@gmail.com
नमस्कार साहेब,
मी आशिष सुनिल श्रीवास, अकोला जिल्ह्यातील रहवासी आहे माझे प्रश्न खालील प्रमाणे आहेत.
1) माझ्या आजोबांना आपल्या नावावर असलेल्या शेत जमीनीचा हीस्सेवाटप करुन ती शेत जमीन सरळ आपल्या नातवंडांच्या नावावर करायची आहे.
2) मी आणि चुलते मिळुन 4 भाऊ आहोत. माझे वडील जिवंत नाही आणि माझ्या काकाला असे करण्यास काहीच हरकत नाही.
3) आम्ही सगळे कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे अपुरी माहिती असल्यामुळे पुढील पद्धतीत काय करायचे कळत नाही.
4) माहिती काढल्यास खुपच गुंता गुंतीची पद्धत व भरपूर मोठा खर्च लागते जवळपास एक लाख रुपये असे गावातील लोक, शेजारीपाजारी कडुन सांगितले गेले.
5) आपणासनम्र निवेदन आहे की, वरील बाबतीत मला आपण विस्तृत माहिती देऊन पुर्ण पद्धत सांगावी, मी आपला खुप आभारी राहीन. धन्यवाद !
आपल्या आजोबांना जर ती मिळकत वडीलोपार्जित मिळालेली असेल तर अशा मिळकतीमध्ये आपणाला जन्मताच मालकी हक्क प्राप्त होतो. त्यामुळे अशा जमिनीचे वाटप करून आपल्या हिश्याला त्याचे नाव लावण्याचा अधिकार आपणास आहे. तसेच या वाटपाला आपल्या चुलत्यांचीही कुठलीही हरकत नसेल तर नोंदणीकृत वाटप पत्राशिवायही, तहसीलदार यांच्याकडे जमीन महसूल संहितेच्या कलम 85 खाली अर्ज करून वाटप करून घेता येईल व मिळकतीला तशी नावे दाखल करता येतील. मात्र आजोबा हे हयात असल्याच्या कारणास्तव, ंनी त्यांना त्यांच्या हिश्याच्या मिळकतीला त्यांचे नाव दाखल राहील.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shankar kakde
13-07-2020
Shankarkakde@gmail.com
माननीय श्री पाणबुडे सर
आम्हाला आदिवासी जमीन शेतीसाठी घ्यावयाची आहे 15 वर्षासाठी, भाड्याने त्यासाठी काही कायदेशीर बाबी असतील का, किंवा विकत घेण्यासाठी काही मार्ग असेल तर सांगावे.,
आपण आदिवासी व्यक्तीच्या मालकीची जमीन शासनाच्या पूर्व -संमतीने व जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने खरेदी करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्री. सुरेंद्र शा. चोपडे
13-07-2020
Sschopde65@gmail.com
मा. सर, 1956 साली माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित शेतजमिनीत घर बांधले. घरात प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र रस्ता नसल्याने शेजारच्या जमीन मालकाच्या शेतजमिनीतून 1956पासून वहिवाट आहे. पण आता शेजारचा जमीन मालक घरासमोर शेत नांगरून व पीक पेरून घरात जाण्यास अडथळा निर्माण करत आहे. ती फक्त दोन गुंठे असलेली जमीन बाजारभावापेक्षाही अधिक किंमत देऊन विकत घ्यायला तयार आहोत. पण तो देत नाही. काय करावे?
भारतीय सुविधाधिकार अधिनियम १८८२ च्या कलम ३३ अन्वये सुविधाधिकार यामध्ये व्यतय्य आणल्याबद्दल, आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
भारतीय सुविधाधिकार अधिनियम १८८२ च्या कलम ३३ अन्वये सुविधाधिकार यामध्ये व्यतय्य आणल्याबद्दल, आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by लक्ष्मण पाखरे
12-07-2020
LAXMANPAKHARE77@GMAIL.COM
नमस्कार
जमीन वडलांच्या नावे असलेली मुलांच्या नावे कशी करावी वडील ह्यात आहेत जमीन वाडलोपर्जित आहे.
Question by लक्ष्मण पाखरे
12-07-2020
LAXMANPAKHARE77@GMAIL.COM
नमस्कार,
माझा प्रश्न असा आहे की वडिलोपार्जित जमीन वडील मुलांच्या विना परवानगी विकू शकतात का ७/१२ मध्ये वडिलांचे नाव आहे. समजा, जमीन आजोबांना त्यांच्या वडलाकडून मिळाली होती आणि तीच जमीन पुन्हा माझ्या वडिलांना मिळाली आहे पण वडील ती जमीन माझ्या परस्पर विकू शकतात का ?
प्रश्न दुसरा,
माझ्या वडील आणि त्यांचा दोन भवानी मिळून एकत्र जमीन विकत घेतली होती आणि ती जमीन काही वर्ष तीन हिस्से करून कसवली पीक घेतले पण तिघांमध्ये मोठयाने बाकी दोघांना न कळवत ती जमीन चा व्यवहार केला आणि जमीन दुसऱ्याच्या(जावई च्या नावे) नावावर केली मात्र जमीन घेतंना दोन्हीं भावकडू पैसे घेतले. मोठयाने काही तरी वादच कारण उत्पन्न करून दोघांना बाजूला केले आहे आणि स्वःतच्या बायकोच्या नावे जमीन केली पैसे मात्र त्या दोघे चे पण वापरले आणि त्या च जमिनी मदली काही जमीन जावई च्या केली जमीन ७/१२ जावई व मोठ्या भावाच्या बायको च्या नावे आहे....आणि जमीन जो पर्यंत बायको च्या नावे नवती तो पर्यंत तिघे एकत्र पीक घेत होते. तर ही जमीन तिघांनी घेतली पण नाव मोठयाने बायको च लावलं... या वर काय करता येईल
Question by Sonali
12-07-2020
sonisonali58@gmail.com
माझ्या वडिलांनी २००६ मध्ये एक कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यार पत्रद्वारेJoint POA मध्ये एका डायरेक्टरला wind power pvt ltd ,ला दिली होती त्यानंतर कुलमुखत्यार पत्र करुन देणार दुसर्या व्यक्तीने २०१२ मध्ये कुलमुखत्यारपत्र रद्द होणे साठी नोटीस कंपनीला पाठवली सदर कंपनीने जमीनीचा कब्जा किंवा सातबारा वर त्यांची नोंद करण्यात आली नव्हती सातबारा हा वडीलांच्या व त्या व्यक्तीच्या नावाने होता ३०/०९/२०१९ रोजी कुलमुखत्यार द्वारे कंपनीने सदरची जमीन ही डायरेक्टर बदलुन एका व्यक्तीला सेल डीड करुन दिली त्या दरम्यान च्या कालावधीमध्ये वडील हे खुप सिरीयस आजारी असल्याने ICU हॉस्पिटल मध्ये होते व ०५ दिवसांत ०६/१०/२०१९ रोजी वारले त्या दरम्यान कोणतीही नोटीस किंवा माहीती कंपनी द्वारे किंवा इतर व्यक्ती द्वारे देण्यात आली नव्हती. दस्त नोंदीस दिल्या नंतर त्याबाबत आम्ही फेरफार वर हरकत वेळेत मंडळ अधिकारी यांच्याकडे नोंदवली. आमचे वारस नोंद नमुद जमीन व इतर मिळकतीवर झाली.हरकती बाबतसुनावणी अजुन झाली नाही तरी सदरच्या प्रकरणी दस्त ऐवज ची ७/१२ वर नोंद न होणेसाठी काय करणे उपयुक्त आहे ?
Question by कृष्णदेव पवार
11-07-2020
krushnadpawar@gmail.com
वडिलांच्या निधनानंतर वारस नोंद झाली .त्यानंतर एका मोठ्या भावाने घरात आई व भावंड सांभाळण्यासाठी पैसे घातले म्हणून वडिलोपार्जित ११एकर जमीन खरेदीखत करून २००९ सालि बळकावली आहे .परंतु त्याची ७/१२ सदरि अद्याप नोंद झालेली नाही .आता तो कामगार तलाठी यांच्याकडे अर्ज देऊन नोंद करण्याच्या तयारीत आहे .खरेदीखत करताना एक बहीण अज्ञान पालक होती .त्याला ती नोंद न करण्यासाठी व खरेदीखत रद्द करण्यासाठी काय करता येईल याबाबत मार्गदर्शन करावे
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
