जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

चुकीने ईतर हक्कात आलेली नावे कमी करता येतात का
शेतजमीन गट नं,50 मध्ये 1979 रोजी विहीर पड नोंद केली असून ती 1994 पर्यंत आहे तर ती नोंद तलाठी यांच्या चुकीने पुढे राहिली
आहे तर ती नोंद आज रोजी पर्यंत 7/12 वरती करण्यासाठी काय करावे
कळवा,,,,
ध्यावाद,,
विहीर पड नोंद ७/१२ व नसेल तर काय फरक पडणार आहे ? खरतर अशी पड वहीती खाली आणून , हि नोंद कमी झालेली योग्य आहे . अश्या नोंदीमुळे तुम्हाला कोणता अधिकार मिळत आहे अथवा आपल्या कोणत्या हितसंबंधाची हानी होत होत आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Salim Maneri
30-08-2020
salimmaneriias@gmail.com

Does gift deed under Mohammedan Law(Hibanama) legally sanctioned and can bank loan be availed on such deed of immovable property ?
माझ्या वडिलांना माझ्या नावाने घरातील थोडी जागा करायची आहे त्याकरिता बक्षीस पत्र बनविण्यासाठी कोणत्या कार्यालाऊत जावे? बक्षीस पत्र संबंधित GR सांगावा.

जय हिंद
भारतीय नोंदणी अधिनियम 1998, बक्षीस पत्र हे नोंदवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपणाला आपल्या तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागेल. जे आपणास बक्षीस पत्र करून देत आहेत त्यांनीही या कार्यालयात जाणे अभिप्रेत आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की ,३२ग चा ऑर्डर मधे जमिनी सोबत पोट खराबा चां उल्लेख नसेल तर तो जमिनी मधील पोट खराब उर्वरित जमिनी सोबत कुळाला जातो का जमीन मालका कडे राहतो
उपरोक्त उत्तरात “बाळा” च्या ऐवजी “कुळाच्या” असे वाचावे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कूळ कायद्याचा मुख्य उद्देश समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ो दुसर्‍याची जमीन कसतो व त्या बदल्यात त्याच्या जमीन मालकाला खंड देतो त्याला कुळ असे म्हणतात. कृषक दिनी जर जमीन कशात असेल तर तो त्या जमिनीचा मालक झालेला आहे असे मानले जाते. व त्यानंतर मुलाच्या नावे विक्री किंमत निश्चित केली जाते.
पोटखराबा हा वहितीखाली आणता येत नाही. त्यामुळे तो कुरान एक असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. व पर्यायाने बाळाच्या नावे अशा पोटखराबा ची किंमत ठरवण्याचा ही प्रश्न उद्भवत नाही त्यामुळे पोटखराबा हा नेहमी जमीन मालका कडेच राहतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महानगरपालिका क्षेत्रातील शेतजमिनी साठी अकृषक परवानगी साठी काय प्रक्रिया आहे?
महानगरपालिका क्षेत्रामध्ये वेगळ्याने अकृषिक परवानगी घेण्याची ची आवश्यकता नाही. सन 2016 व सन 2017 मध्ये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये कलम 42 ब, 42 क हे अंतर्भूत करण्यात आले. या सुधारणा तरतुदीनुसार, महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्थित असलेल्या जमिनीसाठी, अकृषिक परवानगी न घेता, जमिनीचा विकास करण्यापूर्वी, संबंधित महानगरपालिकेची विकास परवानगी घेणे आवश्यक असते. विकास परवानगी देताना महानगरपालिका मिळकत, अकृषिक झाली असल्याचे, आदेश पत्रातच नमूद करते. तत्पूर्वी महानगरपालिकेकडून, अशा जमिनीच्या भोगवटा बाबत ( मालकीबाबत) अधिभाराबाबत व धारणा अधिकाराबाबत संबंधित जिल्हाधिकारी/ तहसीलदार यांचेकडून खात्री करून घेते. कोणत्या आधारे विकास परवानगी दिली जाते.
वर्ग 2 जमिनी बाबत, ज्या कायद्याखाली जमीन संबंधित व्यक्तीस प्रदान करण्यात आलेली आहे, त्या कायद्यान्वये वर्ग 2 जमिनीचे वर्ग एक प्रवर्गात रूपांतर करण्यासाठी, आवश्यक असलेला नजराणा जिल्हाधिकारी/ तहसीलदार यांचेकडून वसूल केला जातो. व त्या आधारे प्रमाणपत्र विकास परवानगी देण्यासाठी सक्षम असलेल्या नियोजन प्राधिकार याकडे पाठवले जाते. नियोजन प्राधिकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग 2 जमिनीबाबत असलेला नजराणा जमा केले असल्याची पडताळणी करून अशा जमिनीला विकास परवानगी दिली जाते.
नवीन सुधारणा नुसार आपणाला वेगळ्याने अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर....!!
माझा प्रश्न मोजणी विषयक आहे.
गावठाण लगत माझी ४५ गुंठे शेतजमीन आहे. गावठाण मालकाने त्याचे घर बांधकाम सुरू करण्यापूर्वी मूळच्या बांधाची नासधूस केली त्यामुळे हद्दीचा वाद उद्भवला.म्हणून मी भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्या बद्दल मला फारशी माहिती नसल्यामुळे मी कार्यालयातील एका व्यक्तीचा सल्ला घेतला.त्यावेळी त्यांनी मला गावठाण मालकास नोटीस देता येत नाही असे सांगितले.उत्तरेस गावठाण व पूर्वेस गाडी रस्ता ( वेगळ्या सर्व्हे नंबर मधून) आहे. त्यामुळे फक्त दक्षिण व पश्चिमेकडील सर्व्हे नंबर मालकास नोटीस देण्याचा सल्ला त्यांनी दिला.
१) गावठाण मालकास नोटीस देणे अनिवार्य आहे का ?
२) जर असेल तर,मोजणी अर्ज दाखल केल्यानंतर नोटीस देण्यासाठी गावठाण मालकाचे नाव समाविष्ट करायचे असेल तर काय करावे लागेल ( मोजणी येण्यासाठी अजून सहा महिने कालावधी आहे ).
महोदय,
कोणत्याही मिळकतीची मोजणी करण्यासाठी/ सर्वेक्षण करण्यासाठी, भोगवटा धारकाला स्वतःहून लगतच्या खातेदारांना नोटीस देण्याची आवश्यकता नाही. आपण केवळ उपअधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयांमध्ये आपल्या मिळकतीची मोजणी करावयाची आहे या संदर्भातला अर्ज करावा. अर्जामध्ये आपल्या चतुर्सिमा लगतच्या खातेदारांची नावे अर्जात नमूद करा . भूमी अभिलेख खात्याकडून नोटीस देण्याची कार्यवाही केली जाते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Krishna shinde
30-08-2020
shindekb95@gmail.com

आम्ही शासकीय सोसायटीध्ये 25 वर्षापूर्वी घर विकत घेतले होते. आम्ही त्यांना पैसे दिले होते. परंतु त्याची खरेदी करायची राहून गेलेली आहे. आणि घर आजुन घरमालक यांच्या च नावावर आहे. आणि घरमालक आता जीवित नाहीत. त्यांचे वारस आहेत परंतु आता ते तयार होत नाही आहे. या विषयी योग्य मार्गदर्शन करावे..
आपले प्रश्न वरून, विक्रेत्याला आपण पंचवीस वर्षांपूर्वी मिळते जी खरेदी किंमत आहे अदा केली आहे. या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये, मिळकतीचे खरेदी दस्त करून घेण्याबाबत आपण कोणतीही कारवाई केली दिसून येत नाही. शिवाय आपण जे त्याला पैसे दिलेले आहेत ते रोखीच्या स्वरुपात दिलेल्या आहेत ती धनादेशाद्वारे दिलेली आहेत ?जागा कोणाच्या ताब्यात आहे याचा तपशील दिलेला नाही. त्यामुळे 25 वर्षानंतर कारवाई करणे अथवा त्याच्याविरुद्ध दिवाणी दावा दाखल करणे, मुदतीच्या कायद्याच्या बंधना नुसार कितपत योग्य होईल याबाबत संभ्रम आहे. तथापि आपणाकडे दिलेल्या पैशाबाबत काही लिखित स्वरूपात पुरावा असेल व जमिनीचा ताबा जर अद्याप आपल्याकडेच असेल तर त्या आधारे आपण न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकाल असे मला वैयक्तिकरित्या वाटते. आपणाला झालेल्या विलंबाबाबत मात्र न्यायालयाला वाजवी/ सबळ कारण द्यावे लागेल.
अन्यथा आपण , उपरोक्त कोणतीच बाब विचारात न घेता, मिळकतीवर पंचवीस वर्षापासून प्रतिकूल ताबा असल्याचे न्यायालयात जर सिद्ध करू शकला तर विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम १९६३ ( The Specific Relief Act 1963 ) खाली आपणास, मिळकतीवर प्रतिकूल ताबा या तत्त्वाच्या आधारे, मालक म्हणून घोषित केले जाऊ शकते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,. ‌‌‌‌‌‌
सर माझा प्रश्न असा आहे की आम्ही तीन वर्षांपूर्वी ‌‌‌ लोहगाव, गुरूद्वारा कॅलनी, तालुका हवेली येथे कर्ज काढून एक गुठां जागा घेतली , आम्हाला तेथे राहण्यासाठी घर बांधायचे होते, पण ती जागा नावावर करता येत नाही. वकीलाने सांगीतले की तुकडा बंदी कायदा लागु होतो. ती जमीन नावावर करण्यासाठी काय करावे लागेल. कृपया करून योग्य ते मार्गदर्शन करावे.‌ लोहगाव नगरपालिका हद्दीत सुध्दा तुकडा बंदी कायदा लागु होतो का.
नमस्कार सर, माझे आजोबांना 3 मुले आणि 3 मुली आहेत. आजोबांची स्वकष्टार्जित जमीन मोठ्या चुलत्या च्या नावे खरेदी केली. काही जमीन दुसऱ्या चुलत्याच्या नावे खरेदी केली. वडिलांना मिळालेली जमीन वडिलोपार्जित आहे. 7.5 एकर वडिलोपार्जित जमिनीतील 5 एकर जमीन वडिलांच्या नावावर आहे तर 2.5 एकर ही मधल्या चुलत्याच्या नावे आहे. मोठे चुलते हयात असताना त्यांनी त्यांची जमीन (जी आजोबांनी विकत घेऊन दिलेली होती) ती विकली. चुलते वारल्यावार त्यांचा मुलगा आता वडिलांना वडिलोपार्जित जमिनीत वाटा मागतो आहे. वडिलांच्या नावे सर्वच जमीन वडिलोपार्जित आहे. ही जमीन त्याच्या नावे 25 वर्षांपासून तशीच आहे. आजोबांच्या मृत्यू नंतर मोठ्या चुलत्यांचा मुलगा वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीत हक्क मागू शकतो का? वाटप पत्र झालेले नाही. थोडक्यात तीन मुलांना समान जमीन आली आहे परंतु वडिलांना त्यातील सर्व जमीन वडिलार्जित आली आहे. तर यातून काही मार्ग काढता येईल का? वडिलांनी ती जमीन आईच्या नावे केली तरी चुलत्यांचा, आत्यांचा हक्क त्या जमिनीवर राहील का?
हिंदू अविभक्त जमिनीचे वाटप झाल्यावर , ज्याला अशी जमीन मिळते ती जमीन त्याचेकडे स्व-कष्टार्जित म्हणून त्याचेकडे राहते . त्यामुळे आपले चुलते किंवा त्यांची मुले यांना कोणताही अधिकार नाही .
वाटप जर २००५ पूर्वीचे असेल तर आत्यालाही कोणताही अधिकार राहत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kunal
26-08-2020
kkarnawat2803@gmail.com

तलाठी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी या पदांवरील व्यक्तींविरुद्ध CrPC 197 अंतर्गत अभियोजनपूर्व परवानगी साठी सक्षम अधिकारी कोण असतो?
नमस्कार सर..
आम्ही नगरपालिकेच्या हद्दीत नोव्हेंबर २०१९ मध्ये २.५ गुंठे क्षेत्र वाणिज्यक कारण खरेदी केले आहे, सदर जागेचा स्वतंत्र महसूल उतारा (२.५ गुंठ्यांचा) व नगरपरिषद उतारा २०१९ मध्ये जुन्या जमीन मालकाच्या नावे होता. सदर जागेची नोंद लावण्यासाठी गेलो असता मा. तलाठी साहेब यांनी तुकडा बंदी कायद्यातंर्गत चौथाई भरण्यासाठी सांगितले (कारण सदर जागेचा तुकडा २०१७ पुर्वीचा आहे असं सांगितलं ). परंतु तुकडेजोड तुकडेबंदी सुधारित अधिनियम २०१६ कलम ८ (ब) प्रमाणे तुकडेजोड तुकडेबंदी कलम ७, ८, ८-अ यांच्या तरतुदी लागू होणार नाहीत.

कृपया मार्गदर्शन करावे..
तहसीलदार साहेब यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या शेजारच्या शेतातुन रस्ता आहे आणि तो तलाठी नकाशा मध्ये सुद्धा आहे 40वर्षे जुना आहे पण भुमी अभिलेख नकाशा मध्ये रस्ता माझ्या शेतात दाखवतो पण तो कधि चालु नव्हता आता शेजारी जाऊ देत नाही काय मार्ग निघेल
आपण आपल्या शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतातून जाण्यासाठी आपल्याला जर परंपरागत वहिवाटीचा रस्ता असेल होतो आपण वर्षानुवर्षे वापरत असावा आणि जरी तू आता गाव नकाशावर त्यांच्या शेतामध्ये दिसत नसला तरी ते आपणाला त्या रस्त्याचा वापर करण्यापासून प्रतिबंध करू शकत नाही. आपण मामलेदार कोर्ट अधिनियमांतर्गत रस्ता बंद केल्यामुळे तुम्ही शेती वर जाऊ शकत नाही तो खोला करून मिळावा असा दावा मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या न्यायालयात दाखल करा. निश्चित आपल्याला न्याय मिळेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by S.m.pawale
24-08-2020
pawalenath@gmail.com

नमस्कार सर,हिंदू कुंटुबातील(वडील नाहीत) ईतर सर्व (4मुली1मुलगा)हिस्सादाराने आई हिस्सादारास शेतजमिन हाकसोड दिलेले आहे. "त्याच्या नंतर " एका हिस्सादारास सदरील शेतजमिन त्याच्या नावाने करायची आहे .सदरील गोष्टीस आईची संमती आहे .परंतु सदरील शेतजमिनीवर अगोदरच हाकसोड दिलेले आहे आता ती परत नावाने करण्यासाठी काय करावे .
मिळकतीमध्ये मध्ये असलेला आपला हक्क जर नोंदणीकृत दस्ताने सोडून दिला असेल, तर पुन्हा त्यामध्ये जर आपले नाव समाविष्ट करायचे असेल तर त्यासाठी तेवढेच क्षेत्र आपल्याला नोंदणीकृत दस्ताने खरेदी करावे लागेल. नोंदणीकृत दस्त आधारे नाव सातबारा सदरी लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार,
आमचे 7/12 वर काही क्षेत्र पोटखराब म्हणून नोंद आहे तथापि सध्या 7/12 वरील सर्व क्षेत्र बागायती आहे, तरी 7/12 वरील सदर पोटखराब क्षेत्र बागायती म्हणून दुरुस्त करता येईल काय?
सातबारावरील पोटखराबा दाखवलेले क्षेत्र कमी करण्यासाठी आपणाला आपल्या तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागेल. नुकताच महाराष्ट्र शासनाने पोट खराबा जमिनीचे क्षेत्र वहिवाट योग्य जमिनीमध्ये करण्याची कार्यपद्धती शासन निर्णयाद्वारे निर्गमित केलेली आहे. त्याआधारे मेहरबान तहसीलदार साहेब प्रकरणाची चौकशी करून याबाबत निर्णय घेतील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rahul Tupe
23-08-2020
tuperahul87@gmail.com

आम्ही गाव मौजे चांदिवली येथे दिनांक 12/12/20005 रोजी सर्व्हे न. 42/11 व 42/13 या मिळकती खरेदी केल्या त्यापैकी 1) सर्व्हे नं. 42/11 मध्ये खरेदीखतावेळी इतर अधिकारात कोणताही शेरा नव्हता. 2) सर्व्हे नं. 42/13 मध्ये खरेदीखतावेळी इतर अधिकारात महाराष्ट्र खाजगी वन (संपादन) कायदा 1975 चे कलम 22 अन्वये सेक्शन 35 मधून वगळन्यात आला असा शेरा होता. सदर खरेदीखताची नोंद करण्यापूर्वी सदर सर्व्हे न. 42/11 व 42/13 या मिळकतीच्या 7/12 च्या इतर अधिकारात नंतर वन संवर्धन अधिनियम १९८० च्या तरतुदीस पात्र असा शेरा आला. तरी माझा प्रश्न असा आहे कि सदर खरेदीखताची नोंद होऊन आमचे नाव मालक कब्जेदार सदरी दाखल होईल का?
आमच्या गावाचे सरपंच यांनी शासनाची गायरान जमीन ही ग्रामपंचायत च्या नमुना 8 रजिस्टर ला लावलेली आहे.माझ्या निदर्शनास आल्यावर मी तक्रार अर्ज परभणी जिल्हाधिकारी यांना दिला आहे हे सरपंच यांना समजताच त्यांनी मासिक मीटिंग घेवून ती जागा रद्द केली आहे. त्यांना शासकीय जमीन लावण्याचा अधिकार आहे का.आणि त्यांनी पदाचा दुरुपयोग केला तर त्यांचे पद रद्द होते जा
सर नमस्कार '
मूळ मालकाने जमीन एन ए केल्यावर रहिवास प्रयोजनासाठी परवानगी मिळाल्यानंतर प्लॉट पडल्यानंतर मुळ मालकाचा मोकळ्या खुल्या भूखंडावर त्याचा अधिकार असतो काय ?एखादया सेवाभावी शैक्षणिक संस्थेस ग्रामपंचायतीला खुल्या भूखंडा बाबत ताबा पावती करून देण्याचा अधिकार असतो का ? याबाबत कृपया मार्गदर्शन करावे .
सर नमस्कार,
माझा प्रश्न असा आहे की, जमीन क्षेत्र 10 गुंठे असे सामाईक क्षेत्र आहे त्या पैकी एक जणाचा हिस्सा खरेदीखत झाले आहे तरी त्याची तलाठी व सर्कल 7/12 व फेरफार नोंदणीसाठी काय उपाययोजना करावी??

Question by Shubham mane
19-08-2020
manes9443@gmail.com

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की माझे वडील व माझे चुलते यांची जमीन ही खातेफोड न झाल्यामुळे सरकार जमा झाली आहे ते परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल

Question by Shubham mane
19-08-2020
manes9443@gmail.com

नमस्कार सर माझा असा प्रश्न आहे की की माझे वडील व माझे चुलते यांची जमीन खातेफोड न झाल्यामुळे सरकार जमा झाली आहे ती परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल

Question by Amol
19-08-2020
amolsalunkhe@rediffmail.com

आमची कोरेगांव तालुक्यात शेती आहे. शेतीचा online 7/12 पहात असताना त्यावर " या 7/12 वर शेवटचा फेरफार 3715 हा प्रमाणित झाला असून मंडळ अधिकारी यांनी 7/12 वर योग्यरित्या अंमल झाला आहे याचे confirmation करणे बाकी आहे याची नोंद घ्यावी” असा मजकूर येत आहे, परंतू सदर 3715 या फेरफारची नोटीस 'आपली चावडी' या संकेत स्थळावर आजतागायत प्रसिद्ध झालेली नाही (त्याच्या मागच्या पुढच्या फेरफार नंबरच्या नोटीशी प्रसिद्ध झालेल्या आहेत) त्याबाबत तलाठी यांना विचारले असता तो रेकॉर्ड दुरुस्तीचा फेरफार आहे.असे मोगम उत्तर दिले आहे. परंतू याबाबत आम्हाला शंका वाटते.
याबाबत काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
नमस्कर सर ,
अमच्या जमिनिचे वाटनीपत्र २०११मध्ये झाले आहे. पण उतय्रावर त्याची नोंद नाहि . ती नोंद करन्यासाठी कय करावे ? .
आपले वाटप पत्र जर नोंदणीकृत असेल, तर ते आपल्या गावच्या तलाटी महोदयांच्या कडे सातबारा ला अंमल घेण्यासाठी सादर करा. जर वाटप पत्र हे दिवाणी न्यायालय मार्फत झालेले असेल, तर त्याच अंतिम हुकूमनामा मुद्रांकित करून घ्या व मुद्रांकित झालेला हुकूमनामा तलाठी यांच्याकडे सादर करा. जर वाटत हे मेहरबान तसीलदार साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये झालेले असेल, तर तो आदेश मेहेरबान तलाठी साहेब यांच्याकडे सातबारा ला अंमल घेण्यासाठी सादर करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, नमस्कार,
मी सुजित बबन सुपेकर, राहणार केडगाव ता. दौंड, जि.पुणे. मी 2016 साली 4 एकर शेतजमीन खरेदी केली आहे. सदर जमिन हि पानशेत धरण ग्रस्त साठी संपादन झाली होती. मूळ मालक यानी सदर भोगवटा शासकीय नियमा नुसार सर्व कागद पत्रांची पूर्तता करुन वर्ग 1 करुन आम्हाला खरेदी खत करुन दिले आहे. 1982 साली सदर व्यक्तीचा आई ने या जमिनीचे 20 रु चा स्टंप पेपर वर कुलमुखत्यार व गहाण खत करुन शेजारील शेतकर्याला दिले होते त्यावर 50 वर्ष मुदत आहे..फक्त नोटरी आहे.सदर व्यक्तीची आई व तो शेतकरी 1998 व 2000 साली मयत आहेत. सदर जमिनीचा कागदोपत्री मला ताबा आहे, परंतू प्रत्यक्षात मात्र ताबा नाही, मी बरेच प्रयत्न केले गाव पातळी ला तसेच मी शासकीय मोजणी पोलिस बन्दोबस्त घेउन केली आहे..क प्रत मिळालेली आहे, पुनर्वसन चे 1972 साल चे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे नकाशे उपलब्ध असुन हि मला जमिनीचा ताबा मिळत नाही...मी ज्यांचा कडून खरेदी केली आहे ती व्यक्ती सुद्धा मयत झालेली आहे... 7/12 ला माझा नावाची नोंद आहे, मी पिक कर्ज सुध्हा वापरत आहे..शेजारील शेतकर्यचा घरातील मुले, नातवन्ड़े या जमिनीशी काहीही संबंध नसताना, त्यांचाकडे काहीही कागदपत्रे नसताना तिथे येण्यापासून मज्जाव करत आहेत... पोलिस स्टेशन ला बर्याच तक्रारी नोंद दिल्या आहेत तरी सुद्धा काहीही होत नाही.. तरी सदर जमिनिवर ताबा घेण्यासाठी मी कोणत्या पद्धतीने जावे या बद्दल मार्ग दर्शन करावे हि नम्र विनंती..

माझा मो. नं 9970239087/ 9834845589 हा आहे, तसेच email I'd: sujitbsupekar@gmail.com हा आहे..
मी गेली 5 वर्ष प्रयत्न करुन थकलो आहे..तुमचे मार्गदर्शन खुप मोलाचे राहिल सर..
सुपेकर साहेब, या माध्यमातून आम्ही फोनद्वारे आपल्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत नाही. जी माहिती आमच्याकडे आहे की आपणाला आम्ही देण्याचा प्रयत्न याच माध्यमाद्वारे करत असतो.

महाराष्ट्र मुन्द्रांक अधिनियम १९५८ च्या कलम ३४ अन्वये , कोणत्याही दस्तावर यौग्य व यथोचित मुन्द्रांक शुल्क जमा केले नसेल तर , असा दस्त पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकत नाही . गहाण खत व कुल मुखत्यार पत्र नोटरी समोर केलेले आहे . अश्या दस्तास पुरावा म्हणून वापर करता येऊ शकत नाही . त्यामुळे तो शेतकरी या जमिनीचा मालक होत नाही .
आपण हि जमीन नोंदणीकृत दस्ताद्वारे खरेदी केली असेल तर , विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम १९६३ च्या कलम ५ अन्वये व दिवाणी संहिता अधिनियम अंतर्गत आपणास मालक म्हणून घोषित करणे व त्याद्वारे मिळकतीचा ताबा देण्या बाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा .
मात्र ज्या पुनर्वसन कायदा खालील हि जमीन आहे त्यासाठी आवश्यक त्या परवानगी घेतलेल्या असणे आवश्यक आहे . मात्र त्यामुळे दावा दाखल करणे व त्या द्वारे मालकी घोषित करून , ताबा मिळवण्यासाठी अडचण येणार नाही मात्र , पुनर्वसन कायद्याच्या विरुद्ध व्यवहार असल्यास , तो नियामानुकुल करून घेणे हि नन्तर आवश्यक ठरेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या जमिनी पैकी दोन गुंठे क्षेत्र 7/12 वर समाईक दाखवते पण मी सरकारी मोजणी केली आहे त्यात पण एक गुंठे क्षेत्र दाखवले व फाळणी नकाशात पण एक गुंठे दाखवते समोरच्या व्यक्ती ते क्षेत्र मला देत नाही मी काय करू
आपण आपल्या जागेची मोजणी केली आहे . त्याप्रमाणे भूमी अभिलेख खाते यांना , हद्दी निच्छित करून देण्याबाबत विंनती करा . त्यांनी हद्दी दाखवून देल्यावर , नक्की आपली जागा त्यांचे ताब्यात आहे हे कळून येईल . त्या नन्तर त्यांना ताबा देण्यास सांगा . नाही दिला तर न्यायालयात ताबा मिळणे बाबत दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.27 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3