जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by rahul rambhajani
04-08-2020
rambhajani.rahul@gmail.com
We have land in Village Salaidabha, Taluka Hingna, District Nagpur. According to Adhikar Abhilkeh Panji of 1954-55 my late grandfather have their names on it. But Due to Kul kayda & Ceiling act we lost our entire land. Can you please guide what is the remedy available with us ? Can original Landlord to be landless ?. If the name of Kul are available on the Adhikhar abhilkeh then how can a third persons name included in it ? what is the remedy to delete the name of third person?
The various States adopted post-independence Land Reforms measures across India. Amongst these land reform measures, the Bombay tenancy and agricultural land act and the agricultural land ceiling on holding act were enacted to have equitable land distribution.
If your forefathers have been divested of lands due to the operation of the above statutes, nothing can be done. Only you have to check whether this divestiture is as per the procedure and is not illegal, irrational and illogical.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by चव्हाण एन ए
04-08-2020
keshav27.chavan@gmail.com
नोंद खरेदीखतात चतु:सिमा व जमिनीचे चुकीचे वर्णन, स्थान (Location) असल्यास, व त्या नुसार फेरफार नोंदी झाल्यास , त्या फेरफार नोंदी वैध असतात का?
खरेदी दस्त या मध्ये स न / ग न अथवा नगर भूमापन क्रमांक योग्य असेल तर चातुर्सिमा चुकीच्या असल्या तरी काही अडचण नाही . मात्र जागेचे वर्णन चुकीचे असेल व त्यामुळे मिळकतीचा स न . /ग न या बाबत निछितता येत नसेल तर दुरुस्त दस्त करणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नितीन जाधव
03-08-2020
nitinjadhav7878@gmail.com
कूळ कायदा कलम 84 क पत्र हा शेरा कमी करण्यासाठी काय करावे ??
सातबाराच्या इतर हक्क सदरी 84 क शेरा असणे म्हणजे , महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 63 अन्वये , शेतजमीन खरेदी करण्यासाठी व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे . परंतु खरेदीदार हा शेतकरी नसताना , शेतजमीन खरेदी करणे .
खरतर असा खरेदी व्यवहार यास कायदा मान्यता नाही . ८४ क अन्वये अशी शेतजमीन शासन जमा करणे आवश्यक आहे .
आपले नसीब समजा कि जमीन शासन जमा करण्याची कार्यवाही सुरु केलेली नाही . असा शेरा कमी होणार नाही .
मात्र हे हि लक्षात घ्या कि , ८४ अन्वये कारवाई किती दिवसात करावी या बाबत कोणताही काल मर्यादा दिलेली नाही . मा न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिले आहेत का , एखाद्या कृतीसाठी कालावधी कायद्यात दिलेला नसेल तर ती कृती /कारवाई विहित वेळेत करणे आवश्यक आहे . या न्यायनिर्णय तत्वाचा आधार , आपणाविरुद्ध कारवाई सुरु झालीच तर , घ्यावा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नितीन जाधव
03-08-2020
nitinjadhav7878@gmail.com
कूळ कायदा कलम 84 क पत्र हा शेरा कमी करण्यासाठी काय करावे ??
नितीन जाधव साहेब नमस्कार,
मिळकतीच्या अधिकार अभिलेख सदरी इतर अधिकारांमध्ये 84 क ला पात्र असा जो शेरा असतो याचा अर्थ, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या तरतुदी विरुद्ध मिळकत खरेदी करण्यात आलेले आहे. बहुतांशी प्रकरणांमध्ये, जमीन खरेदी करताना खरेदीदार हा शेतकरी असणे आवश्यक असताना, बिगर शेतकरी व्यक्तीने जर शेत जमीन खरेदी केली असेल, तर अशा प्रकरणाची 84 क अन्वय सुनावणी घेऊन, जमिनीचे संपादन कूळ कायद्याच्या तरतुदी विरुद्ध आहे किंवा नाही याची पडताळणी करणे व असेच जमिनीचे संपादन कूळ कायद्याच्या तरतुदी विरुद्ध असेल तर जमीन शासन जमा करणे हे अभिप्रेत आहे.
पूर्वीच्या काळी व्यक्ती शेतकरी नसतानाही जमिनी खरेदी केलेले आहेत मात्र संबंधित मंडळाधिकारी यांनी असे फेरफार मंजूर न करणे आवश्यक असतानाही फेरफार मात्र मंजूर केलेले आहेत व इतर हक्कात 84 क च्या विरुद्ध असा शेरा लिहिलेला आहे. त्यामुळे अशा जमिनीचे संपादन हे खरंतर कायद्याच्या तरतुदी वृद्ध आहे त्यामुळे इतर हक्कात असलेला असा शेरा काढणे हे दुरापास्त आहे.
मात्र अश्या प्रकरणात , जर ८४ क ची कारवाई सुरु झाली तर , आपण खालील मा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेयून , आपली जमीन शासन होण्यापासून वाचवू शकाल .
Asha Jamnadas Chandarana 40, Honister Heights vs State of Gujarat (16.10.2000 - GUJHC) :
"Where the power is conferred to effectuate a purpose, it has to be exercised in a reasonable manner, and the reasonable exercise of power inheres its exercise within as reasonable time.
In case of MOHAMAD KAVI MOHAMAD AMIN Vs. FATMABAI IBRAHIM
Even more than 1 year delay has been considered by the Apex Court unreasonable while exercising the suo motu powers under Section 84-C of the Bombay Tenancy and Agricultural Lands Act, 1976.
कायद्यांमध्ये एखादी कृती करण्यासाठी जर कालावधी दिलेलं असेल तर ती कृती योग्य कालावधी मध्ये करणे आवश्यक आहे. योग्य कालावधी हा कारणपरत्वे बदलत असतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by santosh bakale
03-08-2020
sandipbakan@gmail.com
सर
माझ्या आजाेबाला १८एकर व चुलत आजाेबाला १८एकर जमिन हाेति. माझ्या आजाेबाला A B C D E अशि पाच मुले आहेत. चुलत आजाेबाला अपत्य नव्हते म्हणुन माझ्या आजाेबाच्या A ला दत्तक घेतले. परंतु चुलत आजाेबाने दत्तक घेतलेले A अपत्य चुलत आजाेबाच्या नावाने असलेले १८एकर शेत घेवुन अलग झाले नाहि. माझे आजाेबा व चुलत आजाेबा दाघेहि मयत झाल्यानंतर २० वर्षे A B C D E सर्व जण एकत्र राहिले.
माझ्या आजाेबाचे व चुलत आजाेबाचे १८ +१८=३६एकर क्षेत्र A B C D E या पाच जणांनि एकत्रित जाेपासुन कसुन आता २० वर्षानंतर १००एकर क्षेत्र केले. परंतु आता A B C D E मधे वाद हाेत आहे . B C D E यांना वाटत आहे कि A ने १००एकरचे समान वाटप करुन द्यावे. परंतु A आता ५० एकर वर हक्क दाखवत आहे . २० वर्षे पासुन B C D E हे A कडे समान वाटपाची मागनि करत आहे. परंतु B C D E यांनि कंटाळुन आता आपले नाव ज्या ज्या क्षेत्रावर आहे त्या ठिकाणि कब्जे केले आहेत. परंतु आता असे झाले कि १००एकर क्षेत्रामधिल A च्या नावे ४० एकर B -२०एकर C-१५एकर D-१५एकर E- १०एकर नावाने आहे. यातहि A B C D यांच्या जमिनि भारि काळिच्या आहेत . आणि E च्या १० एकर शेतातुन वढे नाले वाहतात नेहमि ३एकर क्षेत्र पावसाळ्यात खरडुन जाते. परंतु E ला आपल्यावर अन्याय झाल्या सारखे वाटत आहे. यात E ने आपला हक्क मिळवण्यासाठि काय करावे ? दत्तक पुत्र A ला वाटते कि ५०एकर क्षेत्रावर आपला अधिकार आहे. हे याेग्य आहे का ? यात E ने काय करावे?
हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम १९५६ च्या अन्वये दत्तक विधानाच्या पूर्वी, जी मिळकत दत्तक अपत्यास निहित झालेली असते , अशी मिळकत दत्तक अपत्यास दत्तक विधान झाल्यावर हि त्याचेकडे निहीतच राहते त्याच्यापासून निर्निहीत करता येत नाही . तसेच दत्तक पालकांची मिळकत त्यांचे पश्चात , दत्तक गेलेल्या मुलाचेच नावावर होते .
आपली प्रकरणांमध्ये ज्या घरामध्ये तो दत्तक म्हणून गेला, त्यात दत्तक माता पिता कडील अठरा एकर जमीन ही अ ला मला मिळालेली आहे. इतर ब क ड व इ यांनी दोन्ही जमिनी एकत्र कसून , क्षेत्र १०० एकर वाढवले आहे .
खालील बाबींचा खुलासा होणे आवश्यक आहे .
१. १८ एकर क्षेत्र आजोबांचे पश्चात कश्या प्रकारे ७/१२ ला दाखल झाले . एकत्रित ५ जणांची नावे दाखल झाली का ?
२. आजोबांचे जमिनीचे वाटप ४ लोन्कात होऊन , प्रत्येकी ४.५ एकर झाले ? अ च्या नावे दत्तक पालकांपासून प्राप्त झालेले १८ एकर क्षेत्र अ च्याच नावे होते ?
३. नवीन खरेदी क्षेत्र कश्या प्रकारे ७/१२ ला दाखल; झाले ? प्रत्येकाचे वाट्याला किती क्षेत्र आले ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रमेश मारुती पाटील
02-08-2020
rpatil7504@gmail .com
सर मी दुसऱ्याच्या जागेवर घर बांधले आहे त्या साठी त्यांना पैशाच्या स्वरूपात मोबदला दिला आहे,आणि तहसीलदार कार्यालयात 30 वर्षासाठी चे रजिस्टर मुदत पूर्व खरेदी पत्र केले आहे ,पण ते आत्ता घरातून बाहेर निघा म्हणतात आता फक्त 12 वर्ष झालीत ,काय करावे
आपल्या प्रश्नावरून आपण , भाडे पत्त्याने जमीन घेतली असल्याचे दिसून येते . मात्र जमीन भाडेपट्ट्याने घेतल्यावर , त्यातीअटी व शर्तींचा भंग झाला असेल तरच , मुदत पूर्वी भाडेकरू यास मिळकतीचा ताबा सोडवा लागतो . मात्र त्यासाठी अगोदर नोटीस द्यावी लागते . तसेच आपणाला अन्याय झाला आहे असे वाटत असेल तर आपण न्यायालयात जाऊ शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रफुल शेलार
02-08-2020
Prafullshelar130@gmail.com
Sir. माझ्या मामाने 25 गुंठे जागा 2000 साली विकली आणि रजिस्टेशन मधे माझ्या मम्मी चे कुलमुखत्यार पत्र no.1 ला म्हणजे माझा मामा. आणी रजिस्टेशन सोबत त्याची प्रत का नाही तर म्हणतात कि ते पत्र रजिस्टर नाही म्हणून. आता 50 गुंठे जागा शिल्लक आहे तर त्यातला हक्क मला मम्मीला कसा मिळवून देता येईल?
Question by स्वाती गणेश माली
02-08-2020
kunjirsurekha19@gmail. com
सर नमस्ते माझ्या बहिणीने सात गुंठे जागा घेतली त्याचे खरेदी खत झाले असून सात बाराचा उतारा मिळाला होता परंतु आता ऑनलाईन सात बारा चेक केला असता तो दुसऱ्याच्या नावावर आहे असे दिसते यावर कायदेशीर काय करावे लागेल
तहसीलदार यांचे कडे अर्ज करा . माहिती करून घ्या कि आपले नाव आपणाला कोणतीही नोटीस / पूर्वकल्पना न देता कसे कमी करण्यात आले
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विरेश स्वामी
01-08-2020
vrswami42@gmail.com
साहेब मी विरेश सुभाष स्वामी नळदुर्ग ता तुळजापूर जि उस्मानाबाद असून माझ्या शेजारी गुंडू डुकरे हा शेजारी असून माझा प्लॉट तुमच्या जागेत आले आहे म्हणून माझे बांधकाम 1 वर्षपासून अडवणूक करत आहे, माझ्या प्लॉट चा पाठीमागे रोड असून त्या रोड़ची जागा माझ्या प्लॉट मध्ये आत अली आहे,असे म्हणून खोटं बोलत आहे तरी यामधून मला योग्य मार्ग सांगा, documentry title clear आहे
आपला शेजारी हा काही , नियोजन प्राधिकारी नाही त्यामुळे त्याचे बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही . मात्र त्याचा अडथळा वाढत असेल तर , आपण प्रथम त्याचे विरुद्ध नजीकचे पोलीस ठाण्यात त्याचे विरुद्ध तक्रार द्याल . पोलीस महोदयांनी सांगून काही उपयोग होत आहे का? . नसेल तर न्याया लयात त्याला मनाई हुकूम देण्याबाबत दिवाणी दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by AKSHAY RAJENDRA BANE
31-07-2020
arbane5005@gmail.com
SIR AMCHA RATNAGIRI BAVNADI GAVAT ADHICHA SAPURN 31पै. CHA HISA AAHE V AMHI दस्त 1800₹ BHARATO TRI AMCHYA NAVAVR 1 HECTOR JAGA DAKHAVAT AAHE SO AMCHI AMCHI JAGA 1 HECTOR PESHA JAST ASU SHAKTE KA SIR PLEASE GUIDE ME
Question by दत्तात्रय कुकडे
31-07-2020
Nil.kukade@gmail.com
सर
मी २०१२साली एक बांधकाम व्यावसायिक कडुन १ गुंठा जागा ५ लाख ५०हजार खरेदी केली होती माझ्या सोबत १५ इतर काही लोकांची खरेदी झाली सदर जागा ही मी गुंतवणूक म्हणून घेतली होती वारंवार नावे लागावी म्हणून आम्ही व्यावसायिकस सांगितले परंतु आता लागतील नंतर लागेल असे सांगून टाळाटाळ करत होता मी तलाठी कार्यालयात चौकशी केली असता सदर जागा ही महार वतन ची असल्याने ती नावे लागली जाणार नाही मी ३ वर्षांपासून ती जागा विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु नावे लागली नसल्याने व महार वतन मुळे ती जागा लोक घेण्यास तयार होत नाही कोणी खरेदी स तयार झाले तर २ ते ३लाखात मागतात मी व्यावसायिकास माझी अडचण सांगितली तर त्याने शेजारी असलेल्या दुसऱ्या लेआऊट मधील एक जागा देतो व पुढील तीन महिन्यांत ५ लाख देऊन मीच खरेदी करतो अशी नोटरी करून दिली परंतु आता ५ सहीने झाले परंतु मला पैसे मिळाले नाही ५महीन्यापासुन फक्त टाळाटाळ चालु आहे मी सदर जागा गुंतवणूक म्हणून घेतली होती परंतु मला तोटाच होतोय झालेल्या फसवणूक बद्दल काही कायदेशीर कारवाई करता येईल का ? काही नुकसान भरपाई मिळण्यासाठी काय करावे लागेल
आपण बांधकाम व्यावसायिकास , मोबदला म्हणून दिलेली रक्कम धनादेशाद्वारे दिली असेल तर , आपण त्याचे विरुद्ध फसवणूक झाली आहे म्हणून प्रथम खबर अहवाल पोलीस ठाण्यात दाखल करू शकता . अथवा आपण त्याचे विरुद्ध दिवाणी दाखल करून जमिनीचे खरेदी खत आपले लाभत करून देण्या बाबत न्यायालयाने हुकुम पारित करावा , असा मागणी करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by समीर बनसोडे
31-07-2020
sam.bansode59@gmail.com
माझ्या आजोबांच्या नावावर असलेले घर हे वडिलोपार्जित आहे पण आता आजोबा मयत आहे तर ते घर आता चुलत्या च्या नावावर दिसत आहे ,घरपट्टी पण थकलेली आहे... माझे वडील मयत आहे तर मला त्या घरावर नाव लावण्यासाठी काय करावे लागेल
ग्राम पंचायत हद्दीत घर असेल तर , आपले आजोबा मयत झाल्यावर , केवळ आपले चुलत्यांचेच नाव कसे लागले याचा शोध घ्याव. गट विकास अधिकार यांचेकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandip Tukaram Darekar
31-07-2020
sandipstd42@gmail.com
नमस्कार सर, कुळकायदा कलम ४३ अन्वये १९६८ साली कु का ३२ ग प्रमाणे कुळाचे नाव कब्जेदार सदरी दाखल करून मूळ मालकांची नावे हफ्ते घेणार म्हणून इतर हक्कात दाखल आहे. तसा फेरफार हि झाला आहे आता मात्र इतर हक्कातील त्यांची नावे कमी करून भोगवटा वर्ग २ चे १ करण्यासाठी काय प्रक्रिया आहे. कोणत्या कायद्याचे कलमाचे आधारे कोणाकडे अर्ज दाखल करावा.माहिती मिळावी
आता परवानगीची आवश्यकता नाही . तहसीलदार यांचेकडे नझराणा जमा करीन वर्ग १ जमिन होईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandip Tukaram Darekar
31-07-2020
sandipstd42@gmail.com
नमस्कार सर, एकुमॅ शेरा काढायचा असेल तर काय प्रक्रिया आहे आणि कोठे अर्ज करावा.
वास्तविक असे शेरे ७/१२ संगणकी करण मध्ये , कमी करण्यात येऊन सर्व येकुम्या च्या पोटातील( इतर वारस ) वारसांची नावे ७/१२ सादरी दाखल केली आहेत . तरी हि अजून अश्या नोंदी असतील तर मंडळ अधिकारी , तलाठी यांचेकडे अर्ज करा . त्याची एक प्रत तहसीलदार यांना द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मंगेश गावडे
28-07-2020
gurufour99@gmail.com
सन 1974 मध्ये वडिलांच्या विधवा आत्याने बक्षीस पत्राने ९ हेक्टर जमीन वडिलांच्या नावावर केली.आत्या जिवंत असताना 1963 साली जमीन कसणाऱ्या ने कुळकायद्या द्वारे नाव लावण्याचा प्रयत्न केला. पण विधवेस कुळ लागत नाही टेंडेन्सी खटला रद्द करण्यात आला. त्याच कुळाचे 1983 शाली सदर स्वतःचे नाव लावून घेतले व नंतर १९९४ साली वडिलांच्या नावे खोटा अर्ज देऊन सदर जमीन मला नको आहे गावाकडे माझ्या नावावर 25 एकर जमीन असल्याने हि जमीन मला नको आहे ही जमीन माझ्या कुळाला देण्यात यावी असा खोटा अर्ज देऊन सदर जमीन 32ग कायद्याने नाव लावून घेतले आहे सरकारी किंमत ठरवून मिळण्यासाठी वडिलांच्या नावे अर्ज करून सरकारी किंमत ठरवून घेऊन वडिलांना ती पोहोचली अशाप्रकारे खोट्या सह्या घेऊन जमीन हडप केली आहे. तहसीलदारांकडे अपील केल्यानंतर लिमिटेशन ॲक्ट ने अपील रद्द करून दिवाणी दावा दाखल करावा अशा प्रकारचे आदेश दिले आहेत सध्या एम आर टी मध्ये (महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण ) केस चालू आहे मार्गदर्शन व्हावे.९८५०७५४३९४
MRT कुल कायद्या अंतर्गत असलेले दाद मागण्याचे अंतिम स्थळ आहे . MRT योग्य निर्णय घेतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दशरथ धूळसैदर
27-07-2020
dhulsainder21@gmail.com
मी मौजे लोहारे तालुका संगमनेर मध्ये राहत असून माझ्या पंजोबा पासून आम्ही त्या जागेमध्ये राहतो व त्या जागेची नोंद ग्रामसेवक का कडे आहे व त्याचा नमुना 8 पण आहे तसेच त्या जागेचा स्टॅम्प पेपर पण आहे परंतु समोरील व्यतीच्या 7 12 वर नोंद नाही त्यामुळे ते आम्ह्यला त्रास देतात व तुमचे येथे काही नाही तुम्ही जा असे बोलतात तर कृपया यावर काय उपाय आहे.
भारतामध्ये द्वी मालकी संकल्पना आहे . म्हणजे जागा एकाची व त्यावरील घर दुसर्याच्या मालकीचे . त्या दुसर्या व्यक्तीस आपणाला त्रास देण्याचा कोणताही हक्क नाही . त्याचे विरुद्ध तक्रार दाखल करा . अन्यथा न्याया लयात दाद मागा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Yogesh Jagadish supekar
27-07-2020
yogesh.supekar.mcm@gmail.com
मी योगेश जगदीश सुपेकर रा. सारोळा सोमवंशी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर माझे वडील जगदीश लक्ष्मण सुपेकर यांचं नावे असणारी शेत जमीन ते हजन नसतं नामदेव सुपेकर व इतर ३ जण नी खोटे प्रतिज्ञा पत्रक दिनांक १३/०१/२०२० रोजी श्रीगोद्यातील तहीलदारात सादर करून खोटा व्यक्ती दाखुन ७ एकर २० आर जमीनच अपहरे केला आहे तलाठी साहेबांनी नियमबाह्य नोद केले आहेत.७/१२ वर
Question by विजयसिंग भास्कर देशमुख
27-07-2020
vijaysing.deshmukh@gmail.com
महाराष्ट्रात जसा महाराष्ट्र कमाल जमीन धारणा कायदा आहे तसा उर्वरीत भारतात काय परिस्थिती आहे ? मध्य प्रदेशात शेतकरी किती एकर जमीन धारण करू शकतात?
Question by Jaydip nikude
27-07-2020
jaynikude@gmail.com
सर. एकत्र कुटुंब असताना काही मालमत्ता खरेदी केली पण मोठे चुलते घरचे कर्ता पुरुष म्हणुन त्यांचा नावे खरेदी केली.. आता कुटुंब वेगळे झालेत पण चुलते चा नावे आसल्या मुळे ते आता म्हणत्यात मीच खरेदी केली याला काही कायदा आहे का..
जयदीप निकुडे महोदय
आता काही हि करता येत नाही
आपणाला सिद्ध करावे लागेल किं जमीन खरेदी करताना , एकत्रित कुटुंबाचा पैसा खार्देदिसाठी वापरला होता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय
26-07-2020
sanjayraut1755@gmail.com
सर, माझ्या आजोबांनी 1999 साली त्यांचे नावे असलेली वडिलोपार्जित संपत्ती माझे आजी, वडील, आत्या, यांची संमती न घेता विकली आहे , 1999 पासून ती ज्यांनी घेतली त्यांचे नावे त्यांच्या कडेच आहे, ती माझ्या वडील, आत्या यांना कायदेशीर परत मिळेल का??
आपले आजोबा हयात आहेत का ?
ज्या व्यक्तीने जमीन खरेदी केली आहे तो जर Bonafide Purchaser for value without notice असे सिद्ध करू शकला तर , काही ही करता येणार नाही . केवळ आजोबा हयात असतील तर , आजोबांकडून आपणाला त्यांच्या हिस्स्यास येणार्या जमिनीपेक्षा जे क्षेत्र त्यांनी विकले आहे , त्याची विक्री किंमत व त्यावरील व्याजासह आपणाला मागता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राकेश हरिचंद्र सावळे
24-07-2020
savalerakesh19@gmail.com
सर, आमची वडिलोपार्जित जमिन आहे, म्हणजे ती जमिन माझ्या आजोबांनी खरेदी करुन माझ्या आजीच्या नावे केलेली होती,त्याच जमिनीतुन माझ्या आजोबांचे भाऊ यांना वाटणी दिलेली आहे,व राहिलेल्या माझ्या आजीच्या हिस्यावर वारस लावलेला नव्हता याचा फायदा घेत माझ्या लहान भावाने वडिलांच्या (आजीला दोन मुले व एक मुलगी आहे,माझे वडिल लहान व काका मोठे आहेत.)संगनमतीने आजीचे वय 65 वर्ष होते व आजारी होऊन बेडवर पडलेली होती,ऐकुही येत नव्हते,अशा स्थितीत आजीला उचलुन घेऊन जाऊन नातवाने परस्पर कोणाला न माहित होता जमिन खरेदी केलेली दाखवुन स्वत:च्या नावे करुन घेतली, आजी आजारी होती व ऐकुही येत नसल्यामुळे काय केले ते आजीला समजले नाही व आजी काही दिवसांनीच मरण पावली, हे प्रकरण आम्हांला (काकांना,मला व नातेवाईकांना नंतर समजले). आता मला काय करावे लागेल जेणेकरुन वारस नोंद होऊन वाटणी पडेल. कृपया मार्गदर्शन करावे.
आपली आजी आजारी असताना तिला पासून बक्षीस पत्र करण्यात आले हे आपणाला सिद्ध करावे लागेल त्याच वेळेस ते बक्षीस पत्र रद्द होईल व त्या बक्षीस पत्राच्या आधारे जे आपल्या भावाचे नाव लागलेले आहे ते कमी होईल.
आपण कथन केल्या प्रमाणे आपल्या आजीबाई सध्या हयात नाहीत त्यामुळे त्या आजारी असताना त्यांच्याकडून फसवून बक्षीस पत्र करण्यात आलेले आहे हे सिद्ध करणे थोडेसे कठीण व जिकिरीचे काम मला दिसते. पहा आपणाला काय करता येईल ते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिगंबर गणपत वाघ
23-07-2020
waghd001@gmail.com
7/12 वर भोगवटादार वर्ग २,भोगवटादार नाव -श्री बालसिद्ध नाथ देव वहिवाटदार असा उल्लेख असून त्याखाली आमची दोन भावांची नावे आहेत तसेच सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरास बंदी -कुळ कायद्याने प्राप्त जमीन ,नवीन अविभाज्य शर्त, कु.का. क ४३प्रमाणे (१) (हस्तांतरास बंदी-पुनर्वसन कायदा १९८६ कलम १२ अन्वये पासून बंदी १३-११-१९९६ असा उल्लेख आहे तरी सदर जमीन आम्हाला कृषी वापरासाठी विक्री करावयाची आहे त्यासाठी आम्हाला कोणाची परवानगी घ्यावी लागेल तसेच सदर जमीन भोगवटादार वर्ग १ मध्ये आणायची असल्यास काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन व्हावे हि विनंती
जमीन बाल-सिद्धनाथ यांचे मालकीची आहे . आपण केवळ वाहिवातदार आहात .
खालील प्रकरणांमध्ये माननीय उच्च न्यायालय अलाहाबाद यांनी देवस्थानाला देण्यात आलेल्या मिळकतीच्या हस्तांतरणाबाबत खालील निरीक्षणे नोंदवली आहेत
Shyamal Ranjan Mukerjee Vs Respondent: Nirmal Ranjan Mukerjee and Ors.
(i) Property dedicated to and vested in Deity is unalienable if there is a restriction in the Deed of Dedication, and any alienation made in contravention of such restriction is not binding on the Deity
(ii) The Temple, which is the abode of the Deity, is unalienable on any condition, and the other properties vested in Deity may be alienable in the event of legal necessity if there is no restriction in the Deed of Dedication with the prior permission of the concerned District Judge.
उपरोक्त न्याय निर्णयाचा विचार करता देवस्थानाच्या नावे असलेली मिळकत माननीय जिल्हा न्यायालयाच्या परवानगीशिवाय हस्तांतरीत करता येत नाही.
खालील प्रकरणांमध्ये माननीय उच्च न्यायालय अलाहाबाद यांनी देवस्थानाला देण्यात आलेल्या मिळकतीच्या हस्तांतरणाबाबत खालील निरीक्षणे नोंदवली आहेत
Shyamal Ranjan Mukerjee Vs Respondent: Nirmal Ranjan Mukerjee and Ors.
(i) Property dedicated to and vested in Deity is unalienable if there is a restriction in the Deed of Dedication, and any alienation made in contravention of such restriction is not binding on the Deity
(ii) The Temple, which is the abode of the Deity, is unalienable on any condition, and the other properties vested in Deity may be alienable in the event of legal necessity if there is no restriction in the Deed of Dedication with the prior permission of the concerned District Judge.
उपरोक्त न्याय निर्णयाचा विचार करता देवस्थानाच्या नावे असलेली मिळकत माननीय जिल्हा न्यायालयाच्या परवानगीशिवाय हस्तांतरीत करता येत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by pravin lokhande
23-07-2020
nil.lokhande88@gmail.com
sir me adiwasi (ST ) Ya Category cha asun , mala majha NAP-34 aslela plot sell karaycha ahe..tar sell karnyasathi kahi adchan yeil ka.
Question by श्रीधर दौलत कुताळ
23-07-2020
Shridhar.kutal@gmail.com
सर माझी शेतजमिन चौघे गुंडेगाव ता.नगर.जि.अहमदनगर येथिल गट नं.657 पैकी 48आर क्षेत्र शासनाने पाझर तलावाच्या खोदकामासाठी संपादित केली त्याचा मोबदला मिळाला ते क्षेत्र बुडीत क्षेत्र नाही किंवा पाण्याखाली गेलेले नाही ते क्षेत्र 7/12ऊतार्यावरून किम झाले आज मी या क्षेत्रावर पिक घेत आहे ते शासना कडून मला परत मिळेल का किवा ऊतार्यावर पुन्हा या क्षेत्राची नोंद करता येईल का शासनाचे तसे राजपत्र प्रसिध्द झालेले आहे त्यासाठी मि काय करावे मार्गदर्शन मिळावे हि विनंती
आपले प्रश्नावरून १८९४ च्या भू संपादन कायद्याखाली जमीन संपादन झाली आहे . जमिनीचा संपादन प्रयोजनासाठी वापर झाला नाही तर अश्या जमिनीचा अन्य सार्वजनिक वापरासाठी वापर करण्याचा आहे . अन्य सार्वजनिक वापरासाठी आवश्यकता नसल्यास , जमिनीचा जाहीर लिलाव करण्याचा आहे . त्यामुळे आपणाला जमीन परत मिळणार नाही . तसेच ७/१२ उतार्यावर आपली नोंद करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रश्मी बागुल
22-07-2020
rashmisbagul@gmail.com
माझ्या आजीची ६ एकर जमीन आहे. आजी गेल्या नंतर माझे वडील आणि काका यांचे नाव लागले आहे. नुकतेच माझ्या काका चे निधन झाले. आता मला काका ची जमीन विकत घ्यायची आहे तर काकाच्या वारसांना मला किती पैसे द्यावे लागतील. Government valuation प्रमाणे की वारसदार मागतील तेवढे. घरातल्या घरात खरेदी विक्री बद्दल काही नियम असेल तर कृपया मार्गदर्शन करावे
हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 22 मध्ये, वर्ग 1 मधील , दोन वारसांमध्ये मिळकतीचे वारसा हक्काने हस्तांतरण झाले असेल व या दोन वारसा मधील एक व्यक्ती मिळकतीतील त्याचा हिस्सा विक्री करू इच्छित असेल तर दुसऱ्या वारसाला तो घेण्याचा प्राधान्याने हक्क असतो.
या हस्तांतरणासाठी मोबदला , घेणाऱ्या व देणाऱ्या व्यक्तीने परस्परांमध्ये निश्चित करावयाचा असतो. जर हा मोबदला निश्चित केलेला नसेल तर मोबदला विकत घेणाऱ्या व्यक्ती च्या अर्जावरून माननीय न्यायालयाने निश्चित करावयाचा असतो.
आपल्या प्रश्नावरून आपल्या काकांची चे वारस आहेत व आपण वर्ग 1 मधील वारस नाही. त्यामुळे अशी मिळकत घेण्याचा प्राधान्याने हक्क आपणाला नाही. त्यामुळे आपणा परस्परांमध्ये ची किंमत निश्चित होईल ही आपणाला द्यावी लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
