जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by दिनेश दाभोलकर
15-09-2019
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
कृपया आम्हाला खालील गोष्टीवर मार्गदर्शन करावे हि विनंती ।
आमचे गावचे घरावर अ आणि ब अशी घरपट्टी आहे , अ मध्ये आम्ही चार कुटुंब आहेत ,आजीच्या निधनानंतर अ मध्ये आम्ही चार कुटूंबाची घरपट्टी वेगळी करून घेतली आहे पण आम्ही सर्व घराच्या अ मध्ये आहोत
त्यापैकी २ कुटुंब आम्हा दोन कुटुंबाना घरावर हक्क सोड देणार आहेत , तर हे हक्क सोड करण्यासाठी कोठल्या कागपत्राची गरज आहे आणि हे कोठे रजिस्टर करावे लागते ।
तसेच उरलेले आम्ही दोन कुटुंब पैकी एक कुटुंब आम्हाला अ विभागातले घर बांधण्याविषयी रिप्लाय करत नाही तर आम्ही अ मध्ये घराची फोड करता येईल का आणि आम्ही आमचे घर बंधू शकतो का , तसेच घर बांधताना कोणत्या सरकारी विभागाची परवानगी घ्यावी लागते ।
अ घरामध्ये आपण चार कुटुंब राहत आहात. आपणास या घराचे हि दोन भाग करायचे आहेत
ग्राम पंचायतीकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
15-09-2019
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
कृपया आम्हाला खालील गोष्टीवर मार्गदर्शन करावे हि विनंती ।
आमच्या ३४२ हा फेरफार वर्ष १९२२ चा आहे ,हा फेरफार खूप पुसट आहे आणि या विषयी तलाठी ऑफिस मध्ये कुठलीहि माहिती उपलब्ध नाही ,आम्हाला जर या फेरफार विषयी डिटेल माहिती पाहिजे असेल तर कुठे निवेदन द्यावं
Question by Kailas patil
15-09-2019
Kaiilaas86444h@yaho.com
माझ्या पणजोबांना भोगवटादार वर्ग 2 ची एकूण 4 हेक्टर शेतजमीन होती. पणजोबांना एकूण 4 मुले होती. पणजोबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या चारही मुलांमध्ये समान वाटणी झाली.माझ्या आजोबांच्या नावे 1 हेक्टर क्षेत्र आले.माझा असा प्रश्न आहे की आजोबा हयातीत असताना या आजोबांच्या 1 हेक्टर क्षेत्रावर त्यांच्या स्वतःच्या मुलांचा वडिलोपार्जित शेतजमीन म्हणून हक्क आहे का ?
Question by कृष्णकुमार प्रमोद शिंदे
15-09-2019
KPSCKT@REDIFFMAIL.COM
मी गेल्या वर्षी एक एकर शेत जमीन गोपालन, वनस्पतीच्या लागवडीसाठी खरेदी खताने घेतली होती त्या नंतर सात बारावर नाव चढल्यावर शासकीय मोजणी करून घेतली आहे माझ्या अगोदर मूळ मालकांनीही शासकीय मोजणी केली होती मग काही दिवसांनी तिथे मी कुंपणाचे आणि शेत घराचे काम सुरु करत असताना तेथील गावातील लोकांनी माझे काम थांबविण्यास सांगितले ते म्हणतात कि जमीन गावठाणाची आहे मग मी सर्वत्र पत्रव्यवहार केले मग मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी केली आणि त्याचा रिपोर्ट तहसील अधिकारी याना पाठवला, काही दिवसांनी त्या गावातील लोक तहसील कार्यालयात गेले आणि माझ्या विरोधात तहसील मॅडम याना माहिती दिली त्या तहसील मॅडम यांनी माझे कागद पत्र न बघता त्यांनी माझे खाजगी शेत जमिनीवर चालू काम थांबवण्यास सांगितले. ते म्हणाले कि जो पर्यंत गावठाणाची मोजणी होत नाही तो पर्यंत तुम्ही काम करायचे नाही त्यांनी सांगितलेल्या दिवसानुसार मी तहसील कार्यालयात गेलो होतो त्यांनी तेव्हा माझे कागद पत्रे पहिले आणि सांगत होते कि त्या गावठाणचे लोक मोठ्या राजकीय नेत्या कडे गेले होते तुम्ही त्यांची मोजणी होई पर्यंत काम बंद ठेवा.
मला सांगा कि मी करून घेतलेली शासकीय मोजणी अधिकृत नाही आहे का? दोनदा झालेली मोजणीत गावठाण येऊ शकते का? त्यांच्या कडे महाराष्ट्र शासनांनी अधिकृत केलेले नकाशे नाही, पुनर्वसन विभागाचे कोणते आदेश नाही, त्या पुनर्वसन गावठणच्या लोकांनी इतर मालकांना न कळवता अनाधिकृत नकाशे बनवत आले आहे तरी माझ्या सात बारा म्हणजे माझ्या शेत जमिनीचा आणि गावठाण चा काहीही संबंध नसताना तहसील मॅडम माझे खाजगी बांधकाम थांबविण्याचे अधिकार आहे का, माझे कोणते हि पेपर न पाहता, मी त्यांना भेटायच्या अगोदर ते माझे काम थांबवू शकतात का
तरी आपण मला मदद करावी, मी काय करावे त्यासाठी मार्गदर्शन करावे, माझा संकल्प गोपालन, गोसेवा आहे
तरी मला योग्य सहकार्य करावे
धन्यवाद
आपण दिलेल्या सुविधा बद्दल मी आपला आभारी आहे
मी कृष्णकुमार शिंदे 9619045696
आपण करत असलेल्या बांधकामास आपण परवानगी घेतलेली आहे का ?
बांधकाम गावठाण जागेत करत असल्यास त्यास , ग्राम पंचायतीची व इतर ठिकाणी म्हणजे , गावठाणाबाहेर , जिल्हाधिकरी यांची परवानगी आवश्यक आहे
जर परवानगी घेतली नसेल तर आपणास बांधकाम थांबवावे लागेल व परवानगी घेतली असले तर बांधकाम थांबवण्याची गरज नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर
14-09-2019
ShankaBrkakde@Gmail.com
माननीय महोदय,
वनविभागातील / सरकारी जमीन देशी गोसंर्वधनासाठी मिळणे साठी काय करावे लागेल, मार्गदर्शन करावे,
Question by सागर माणिक पाटील
14-09-2019
sagar.brfl@gmail.com
माझ्या वडलांनी १९४१ साली जमीन खंडाने दिलेली होती परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा खंड मला मीळालेला नाही शिवाय खंडाने घेणाऱ्याने त्याचे नाव इतर हक्कात कुल मानून लावलेले आहे तरी इतर हक्कतील त्याचे नाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४ अन्वये कुळाने खंड दिला नाही म्हणून त्यास मी वर्तमान पात्रातून ३ महिने कालावधीची नोटीस देऊ शकतो का . जर त्याने रक्कम दिली नाही तर, कुल वहिवाट संपुष्टात आणता येते का . खंड रक्कम दिली नाही मानून कुल वहिवाट संपुष्टात आणता येते का .जर नोटीस पेपर मांडून दिली असेल तर .
सागर राव
नोटीस त्यास वयक्तिक रित्या बजावणे आवश्यक आहे . तो अढळ होत नसेल तर , जमिनीवर नोटीस प्रसिद्ध करा . अन्यथा पेपर मध्ये नोटीस प्रसिद्ध करू शकता
मात्र खंड कुळाने दिल्यास , वहिवाट संपत करता येत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kailas patil
14-09-2019
Kaiilaas86444h@yaho.com
माझ्या पणजोबांना भोगवटादार वर्ग 2 ची एकूण 4 हेक्टर शेतजमीन होती. पणजोबांना एकूण 4 मुले होती. पणजोबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या चारही मुलांमध्ये समान वाटणी झाली.माझ्या आजोबांच्या नावे 1 हेक्टर क्षेत्र आले.माझा असा प्रश्न आहे की आजोबा हयातीत असताना या आजोबांच्या 1 हेक्टर क्षेत्रावर त्यांच्या स्वतःच्या मुलांचा वडिलोपार्जित शेतजमीन म्हणून हक्क आहे का ?
Question by Kailas patil
14-09-2019
Kaiilaas86444h@yaho.com
माझ्या पणजोबांना भोगवटादार वर्ग 2 ची एकूण 4 हेक्टर शेतजमीन होती. पणजोबांना एकूण 4 मुले होती. पणजोबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या चारही मुलांमध्ये समान वाटणी झाली.माझ्या आजोबांच्या नावे 1 हेक्टर क्षेत्र आले.माझा असा प्रश्न आहे की आजोबा हयातीत असताना या आजोबांच्या 1 हेक्टर क्षेत्रावर त्यांच्या स्वतःच्या मुलांचा वडिलोपार्जित शेतजमीन म्हणून हक्क आहे का ?
Question by सागर
13-09-2019
sagarkandekar1990@gmail.com
एक व्यक्ती त्याची सर्व 30 गुंठे वडिलोपार्जित शेत जमीन त्याच्या पत्नी व मुलं यांच्या संमतीने मला विकण्यास तयार आहे.त्याला जमीन विक्री तुन आलेल्या पैसा तुन शहरा मध्ये घर खरेदी करायचे आहे व शहरात राहून व्यावसाय करायचा आहे.जर त्याची शेत जमीन मी विकत घेतली तर तो भूमिहीन होईल व मला त्याचा काही त्रास होईल का? माझी खरेदी रद्द होईल का ?सदर व्यक्ती अनुसूचित जाती मधील आहे.
आपण जे खरेदी कराल त्यावर , अन्य त्याच्या वारसांची सही घ्या .
आपणास काही अडचण येण्याचे काही कारण नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rahul K
12-09-2019
rahulkalwel@gmail.com
प्रश्न- जर एखादे कुटुंब तीन पिढ्यान पासून सामायिक क्षेत्र जमिनीवर घर बांधून राहात असेल आणि त्या घराच्या जागेची खणपट्टी भरत असेल.तसेच त्या घर जागेचा मिळकत उतारा मिळत असेल तर सदर जागेवर त्या व्यक्तीचा हक्क राहू शकतो का? किंवा पुढे तो व्यक्ती त्या ठिकाणी कायद्याने राहू शकतो का? त्याविषयीची अधिक माहिती कुठून मिळवता येईल.
सामायिक क्षेत्र कोणाचे मालकीचे आहे ?
जर अश्या क्षेत्रावर आपले वास्तव्य १२/२० वर्षाहून अधिक काळ असेल तर आपण , adverse possession चा दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar
12-09-2019
sagarkandekar1990@gmail.com
नमस्कार सर ,
मला सख्या 4 बहीण व 4 सख्खे भाऊ आहेत.तसेच मला 3 चुलत बहिणी व 4 चुलत भाऊ आहेत.माझे वडिल व चुलते यांनी 10 एकर जमिनीचे कधी वाटप च केले नाही त्यामुळे आमच्या सर्वांचे (सख्खे + चुलत भाऊ बहीण) एकमेकांत वाईट संबंध असल्याने सातबारा सदरी सामाईक मालक म्हणून नाावे वारस नोंदीने लागली आहेत.ही 10 एकर शेती असून एकूण 8 गट आहेत.ह्या पैकी 4 गट हे राज्य महामार्ग ला लागून आहे व उर्वरित गाव शिवराकडे आहे.मी दिवाणी न्यायालयत दावा टाकला आहे तर..
१.तर न्यायलय कुठल्या अनुषंगाने वाटप करेल.
२.मी न्यायलयला मला सोयीस्कर असलेला गट देण्याची विनंती करू शकतो का ? व न्यायालय ते मान्य करेल का ?
३.तसेच प्रतिवादी कडून भरपाई मागू शकतो का?.
न्यायालय केवळ आपले हिस्से निश्चित करेल . प्रत्यक्ष वाटप , जिल्हाधिकरी यांचे आदेशाने उप अधीक्षक भूमी अभिलेख / तहसीलदार करतील . या वाटपसा सर्रास निरास वाटप असेच संबोधले जाते
प्रत्येकाला समान किंमत /उत्पादकता असलेली जमीन दिली जाते . जर असं करणे शक्य नसेल तर , ज्यांना जामी नेता येत नाही त्यांना नुकसान भरपाई दिली जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संम्राट पाटील
11-09-2019
samrat_patil2002@rediffmail.com
प्रश्न :- मुंबई वरील लोकसंख्येचा वाढता भार कमी करण्यासाठी ,शासनाने सिडको या प्राधिकरनाची निर्मिती करुन 1970 साली ठाणे,पनवेल,ऊरण या तालुक्यातील शेतकर्यांच्या जमिनी आमच्या मुळ गावांचा गावठाण विस्तार न करताच संपादीत करन्यात आल्या..आमच्या ग्रामस्थांच्या नैसर्गिक कुटुंब विस्तारा मुळे आम्ही आमच्या गावालगत गरजेपोटी बांधकामे बांधली आहेत.ज्या बांधकामांना शासन अनाधिक्रुत ठरवुन तोडक कारवाई करत आहेत ,,,,माझे प्रश्न आहे की 1) आमच्या नवी मुंबईतील गावांचे ईग्रज काळा पासुन गावठाण विस्तार झालेले नाही ,आमच्या ताबे कब्जातील जमिनीवर आम्ही पर्यायी बांधलेली ज्यांना महानगर पालिकेचा कर लागु होतो,पाणि बील,विज बील लागु आहे ती अनाधिक्रुत कशी काय ठरविली जातात ? 2) आमच्या गावांचे, घरांचे नगर भमापन होऊन ,सनद मिळविन्यासाठी काय तरतुद आहे ?3)आमच्या ताबे/कब्जातील जमिनीच्या 7/12 ऊतार्या वरील सिडकोचे नाव कमी करण्यासाठी कायद्यात काय तरतुद आहे ?
Question by Nandu Shelake
11-09-2019
nsshelake9@gmail.com
शेत जमीन खरेदी माहिती बाबतनमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
नंदू शेळके साहेब ,
आपणास या पूर्वी उत्तर दिल्या प्रमाणे ,कुल कायद्याच्या कलम १८ प्रमाणे , शेत जमीन साधी करणाकडे दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नंदू शेळके
11-09-2019
Nsshelake19@gmail.com
नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
नन्दु साहेब
कुळवहिवाट कायदा कलम १८ अन्वये आपण शेत जमीन न्यायाधीरं यांचेकडे अर्ज करा . आपण घरच्या खालील जागेचे मानीव खरेदीदार आहेत . त्यामुळे आपले नावे जागा होईल

nsshelake99@gmail.com
नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
Question by नंदू शेलके

Question by komal lonkar
11-09-2019
komallonkar117@gmail.com
नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
Question by सागर
10-09-2019
sagarkandekar1990@gmail.com
१.एखाद्या व्यक्तीला आपण पैसे उधार दिले आहे बिनव्याजी तर कुठल्या योग्य दस्त आपन समोरच्या कडून बनवून घेतला पाहिजे.
२.फक्त 100 रु स्टॅम्प वर लिहुन घेतलेले किती योग्य राहील?
३.नॉटरी दस्त किती दिवस valid असतो?
४.जमिनीचे गहाणखत करून सातबारा इतर हक्कात नोंद घेऊ शकतो का?
आपण पैसे धनादेशाद्वारे द्या .
सदरचे दिलेले पैसे हे loan समजले जातात .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल मोतीराम सुर्यवंशी
10-09-2019
amolmsuryawanshi@gmail.com
मा.मंत्री महोदय महाराष्ट्र शासन विषय - चांदोरा -पिंपरखेड शिवाररस्त्यावरील अतिक्रमण काढणे बाबत संदर्भ - 1)मा. तहसीलदार साहेब नांदगाव यांच्या कार्यालयास दि. 25/3/19 रोजी दिलेली तक्रार 2) मा. जिल्हाधिकारी साहेब यांना आपले सरकार पोर्टलवर दिलेली तक्रार.टो.क्र. DIST/CLNS/2019/3807 दि.25/3/19 3). मा.तहसीलदार साहेब नांदगांव यांच्या कार्यालयास दि.18/4/19 रोजी दिलेली तक्रार 4) मा.जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र क्र/कक्ष-1/रवका/कावि/495/19 नाशिक दि.15/7/19 5) मा.तहसिलदार साहेब नांदगांव यांच्या कार्यालयाचे पत्र क्र./आरटीएस/कावि/793/19 दि.18/7/19 6) मा. जिल्हाधिकारी साहेब यांना आपले सरकार पोर्टलवर दिलेली तक्रार.टो.क्र. DIST/CLNS/2019/4374 दि.6/8/19 7) मा.जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र क्र/कक्ष-1/रवका/कावि/543/19 नाशिक दि.14/8/19 मा. महोदय, वरील संदर्भिय विषयास अनुसरून विनंती करण्यात येते की, आम्ही मा.तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयात संदर्भ क्र 1 नुसार व संदर्भ क्र 2 नुसार मा.जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार दाखल केली असता मा.तहसीलदार साहेब यांनी संदर्भ क्र 5 नुसार प्रयक्ष स्थळाची पाहणी केली असता त्यांच्या अहवालात अतिक्रमण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मा.महोदय, रस्ता हा माहे फेब्रुवारी 2019 पासून बंद आहे. सदर रस्ता अतिक्रमण दूर करणे बाबत मा.तहसीलदार साहेब नांदगांव व मा.जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांना वारंवार अर्ज देऊन देखील अद्याप रस्ता अतिक्रमण मुक्त झालेला नाही. शेतातील माल हा बाजारपेठेत नेण्यासाठी रस्ता नसल्याने शेत माल बाहेर काढणे अशक्य झाले आहे. तसेच आम्हा सर्व शेतकऱ्यांना आमचा शेतातील पीक काढणे देखील गरजेचे आहे. जर सदर काळात अतिक्रमण दूर न झाल्यास व शेतातील माल बाहेर काढतांनी अपरिहीत घटना घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी ही मा. तहसीलदार साहेब नांदगाव यांची असेल याची आपण नोंद घेऊन आपल्या स्थरावरून तशी त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी. तसेच आम्हा सर्व शेतकरी बांधवांना होणाऱ्या अडचणी या केवळ मा.तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयाच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे होत आहे. मा जिल्हाधिकारी साहेब यांनी मा तहसीलदार साहेब यांना वेळेत अतिक्रमण मुक्त करण्यात सांगून देखील अतिक्रमण मुक्त झालेले नाही. तरी मा महोदय, सदर प्रकरणी चौकशी करून अतिक्रमण लवकरात लवकर दूर करावे ही विनंती
आपला विश्वासू
अमोल मोतीराम सुर्यवंशी
मु.पो.जळगांव खुर्द तालुका नांदगांव जिल्हा नाशिक
संपर्क क्र.९१४५५७२३०१
(मा महोदय हे तक्रारीचे ठिकाण नाही हे माहीत असून देखील हिथे तक्रात करीत आहे या मागील उद्देश फक्त आमचा समस्यांचे निवारण होण्यास व आपल्या पर्यंत आमची तक्रार पोहोचावी व आमचे समस्या दूर होव्या या आहेत. धन्यवाद)
आपण तहसीलदार यांचेकडे मामलतदार कोर्ट ऍक्ट खाली दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल Sawant
10-09-2019
rahul9619309796@gmail.com
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे कडे अर्ज करा . JMFC मृत्यू नोंद दिनांक जाहीर करतील . त्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थेत मृत्यूची नोंद होईल व आपणास मृत्यू दाखला मिळेल
JMFC म्हणजे काय साहेब समजले नाही कृपया स्पस्ट करावे
judicial Magistrate First Class
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकरी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sayyad
10-09-2019
Sayyadaktar53130@gmail.com
जमीनीत एन.ए.लेआऊट करून प्लाॅट पाडण्यासाठी ओपन स्पेस किती सोडावा व रोड किती फुटाचे असावेत.
आपली जागा कोणत्या प्रादेशिक विभागात आहे त्यावर अवलंबुन आहे
साधारपणे , सगळीकडे बांधकाम नियंत्रण नियमावली सारखी आहे . बांधकाम नियंत्रण नियमावली आपण पहा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sayyad
10-09-2019
Sayyadaktar53130@gmail.com
जमीनीत एन.ए.लेआऊट करून प्लाॅट पाडण्यासाठी ओपन स्पेस किती सोडावा व रोड किती फुटाचे असावेत.
Question by दत्तात्रय ओव्हळ
08-09-2019
ovhaldattatraya7@gmail.com
माझा महानगर पालिकेच्या हद्दीत ओपन प्लॉट आहे. तरी मला तलाठी कार्यालयाचा आणि महानगर पालिकेचा टॅक्स भरावा लागेल का ? कारण मला दोन्ही कडे टॅक्स भरण्यास सांगितलं आहे त्याशिवाय कागदपत्रे (७/१२,फेरफार,महानगर पालिका NOC) मिळणार नाही
तलाठी यांचेकडे भरावा लागणार टॅक्स हा बिनशेती आकार आहे
महानगर पालिका यांचेकडे भरावा लागणार टॅक्स , हा घरपट्टी आहे . मोकळ्या जागेवरही घरपट्टी भरावी लागते
दोनीही टॅक्स भरावे लागतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dattatraya Ovhal
08-09-2019
ovhaldattatraya7@gmail.com
माझा प्रश्न असा आहे कि, माझा महानगर पालिकेच्या हद्दीत ओपन प्लॉट आहे तरी मला तलाठी आणि महानगर पालिकेत ओपन प्लॉट चा टॅक्स भरण्यास सांगितलं आहे. तरी दोन्ही ठिकाणी भरावा लागेल का ?कारण एकच प्लॉट चा दोन ठिकाणी टॅक्स का भरायचा? टॅक्स न भरल्या मुळे मला कागदपत्रे(७/१२, फेरफार ,महानगर पालिका टॅक्स NOC) देत नाहीत. तरी वरील प्रश्नांची माहित मिळावी.
Question by नंदू शेळके
08-09-2019
NSSHELAKE99@GMAIL.COM
नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |