जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार सर , एका अर्ध शासकीय संस्था (सिडको ) या संस्थेने आमचे तात्पुरते पुनर्वसन त्यांचे खाली असलेल्या प्लॉट मध्ये केले आहे .आणि तेथे २०१६ मध्ये महानगर पालिका अली आहे . त्याच प्रमाणे त्या ठिकाणी महानगरपालिकेचे काही अधिकारी म्हणाले कि तुम्हाला आम्ही नोटीस ठेऊन उठवू .तर माझा असा प्रश्न आहे कि एका संस्थेच्या जमिनीला महानगर पालिका अधिनियम १९४९ चे कलम 81(ब) एक ची नोटीस देऊ शकतात का .?
सर आपले उत्तर -८१ बी ची नोटीस म्हणजे , महानगर पालिकेच्या मिळकतीवर , अनधिकृतपणे , एखादा इसमाचा कब्जा असेल तर , अश्या इसमास त्या मिळकतीतून काढून टाकण्याचा , महानगरपालिकेस अधिकार आहे .
आपले पुनर्वसन CIDCO ने , महानगरपालिकेच्या जागेवर केले आहे का ?
आलेली नोटीस सिडको अधिकारी यांना दाखवा . त्यांना आपले कायमचे पुनर्वसन करणे बाबत मागणी करा .
परंतु ती जमीन अजून सिडकोने महानगरपालिकेला हात्तान्तरण केलेली नाही . त्यामुळे ती जमीन सिडकोच्या मालकीची आहे . तरी देखील ते ८१ ब ची नोटीस देण्याचा अधिकार आहे का ...?
सर,आदिवासीच्या जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम १९७४ च्या काह्यदया नुसार दावा केला आहे.परंतु ती जमीन कुल कायद्या नुसार १९६४ ला आम्हाला भेटली आहे त्या नंतर ती जमीन शससकीय चुकीमुळे किंवा कसे ती जमीन पुन्हा १९६७ ला एका गैरआदिवासी ला कलम ३२ (ग) नुसार विण्यात अली आहे. त्याच त्यामुळे आम्हाला असं वाटतंय कि हि जमीन आम्हाला भेटणार नाही .याचे उत्तर लकावरत लवकर दयावे हीच नम्र विनंती .
आपले उत्तर -आपण आदिवासी खातेदार आहेत कि बिगर आदिवासी खातेदार ?
हो आदिवासीखातेदार आहे ...
जर जमीन बिनशेती ६ जुलै १९७४ पूर्वी रौपांतरित केली नसेल तर आपणास जमीन परत मिळेल . अन्यथा आपणास मिळणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की आम्ही राहत असलेल्या जागेवर आमचे नाव कुळ म्हणुन 1940पासून 1972पर्यंत होते त्यानंतर आमचे नाव कमी झाले आहे मुळ मालकांनी ती जमिन विकली आहे व घेणारा आम्हांला जागा खाली करण्यास सांगत आहे तरी आम्हांला आमचे नाव कुळ म्हणुन घेण्यास काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
१.४.५७ साली आपण मिळकतीचे कुल होता त्यामुळे आपण , जमिनीचे कुल कायदा कलम ३२ नुसार मानीव खरेदीदार आहेत . आपले नाव कमी झाल्यावर , आपण अपील करणे आवश्यक होते .नाव कमी केल्याचा फेरफार /आदेश प्रांताधिकारी यांचेकडे आव्हानात करा
आता त्या नंतर मूळ मालकाने जमीन विकली आहे .
ज्याने जमीन घेतली जमीन खरेदी करणार्याने , मिळकतीचा title search रिपोर्ट व वर्तमानपत्रात नोटीस दिली होती का ? नसेल तर आपण , दिवाणी न्यायायलायात त्याचे खरेदी रद्द करण्यासाठी दावा दाखल करा .आपणास जमीन परत मिळेल
मात्र

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­नमस्कार सर,
किरण साहेब प्रथमतः आपल्या अमूल्य सल्ल्यांबद्दल आणि वेळेबद्दल धन्यवाद. मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. सर आपण मला माझ्या मागील प्रश्नाचे उत्तर खालील प्रमाने दिले ते असे.
अ या व्यक्तीच्या नावे, सर्वात पहिले खरेदी खत आहे . कायद्या मध्ये
Who is prior in time , is prior in law .........
त्यामुळे जरी फेरफार नसला तरी त्याचा हक्क आहे . त्याचे नाव लागणे आवश्यक आहे.
हे म्हणने बरोबर पंरतु
१) सदरील 'अ' या व्यक्तिच्या तथाकथित खरेदिखताला सुमारे २९- ३० वर्षापुर्वी 'खातेधारकाने' व 'अ' व्यक्तिने अन्य ञयस्थ म्हणजे 'ब' किंवा 'क' वक्तिची फसवणुक किंवा अन्य काहि कारणास्तव तथाकथित खरेदिखत केल्याचे मलिन हेतुने दिसत आहे. 'खातेधारक' मयत आहे खातेधारक मयत झाल्यानंतर 'अ' या व्यक्तिने वाद उपस्थित केलेला आहे व खातेधारक व 'अ' या व्यक्ति नातेवाईक असल्याचे बाहेरील तपासावरून कळते. कृपया सर योग्य उपाय सुचवा.
२)सदरील 'अ' व्यक्तिचा ७/१२,महसुल रेकार्डला, वहिवाटिचा,मालकीहक्क,ताबाहि व उपभोगाची/वहिवाटिची सुमारे ३०/३५ वर्ष कोठेही नोंद नाही.........फक्त पोकळस्त खरेदिखत आहे.अन्य काहि कारणास्तव केलेले आहे. कोठेहि नोंद नाहि.
३)सदरील शेतजमिन 'खातेधाकाकडुन' 'ब' व्यक्तिने नोंदनिकृत खरेदिखताने विकत घेतलि त्यानंतर 'ब' व्यक्तिकडुन 'क' व्यक्तिने नोंदनिकृत खरेदिखताने विकत घेतलि सर्व फेर व्यवस्थित बघुन घेतली ( म्हणजेच 'क' व्यक्ति वडिल व काकाने)घेतलि तेव्हा पासुन ७/१२,महसुल रेकार्डला व प्रत्यक्ष वहिवाटीसह, मालकिहक्का व ताबासहित उपभोगत आहे व अशा नोंदि सुध्दा आहेत.
४)'क' व्यक्ति म्हणजे वडिलांनी व काकाने सदर शेतजमिन 'ब' व्यक्तिजवळुन नोंदनिकृत खरेदिखताने विकत घेतलि तेव्हापासुन आजपावेतो (सुमारे २५ वर्ष ) झाले मालकीहक्कासह कब्जात आहे.व वहिवाटत आहे.व महसुल विभागाचा कर भरणा आजपावेतो भरत आहे.
५)सर ३० वर्षापुर्वी इतर कोणत्याहि कारणास्तव वा फसवणुकिसाठी केलेले पोकळस्त खरेदिखत रद्द बातल करण्यासाठी काय करावे.
सर योग्य मार्गदर्शन मिळणेस विनंती.......
दस्त नोंदणीकृत असेल तर त्यास पोकळीस्थ कसे म्हणता येईल .
ब , क यांनी title search रिपोर्ट घेणे आवश्यक होते . तसेच वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देणे आवश्यक होते . या गोष्टी केल्या असतील तर , आपण Bonafide Purchaser आहेत . अन्यथा , आपणास काहीही हक्क नाही
आपण फसवणूक केली म्हणून ज्याने आपणास जमीन विकली त्याचे विरुद्ध दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pravin kamble
20-10-2018
Kamblepravin221@ gmail.com

7 /12 उतारा त्यात हा Sr. No 2 .2क/1अ हा असुन पण हक्क सोडपत्रकात चुकीचा Sr.No 2.1अ/2क आसा पत्रकात ऊल्लेख आहे . आम्ही हारकत घेतली होती तरी सुद्धा आमचे नाव कमी करन्यात आले आहे. जमीनीवर बांधकाम आता चालू आहे सर आम्हाला मदत करा ही विनंती
आपण हक्क सोडला आहे का ?
हक्क सोडला असेल तर , उगाच सर्वे नम्बर चुकला म्हणून हक्क दाखवणे योग्य नाही
मात्र जर दोन स्वतंत्र मिळकती असतील , तर फेरफार आव्हानात करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Umesh sable
19-10-2018
sable.umesh77@gmail.com

माननीय सर माझा प्रश्न असा आहे .माझे वडील व चुलते यांनी 1987साली जमिनी विकून टाकली .माझे आजोबा मयत झाले त्या नंतर माझी आज्जी 3आत्या वडील व चुलते यांची नावे 7/12पाहीजे होती .पण असे झाले नाही. झालेले व्यवहार रद्द करता येऊ शकते का .आज्जी आज रोजी ह्यात आहे.कुल मुखतयार आज्जी आणि आत्या यांचे करून मला दावा करता येतो का?मी नातू आहे.
७/१२ वर कोणाचे नाव आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर
मला माझ्या गावाच्या ग्रामपंचायतीला २००८ -२०१८ या कालावधी मध्ये निधी किती आला तो कसा कुठे केंव्हा खर्च केला ? ग्रामसभा किती झाल्या ? या सर्वबद्दल माहिती हवी आहे मी हा अर्ज माहिती अधिकारांतर्गत कोणाकडे मागू ?
हो संबंधित ग्राम सेवक यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vikas sanap
18-10-2018
vikassanap1993@gmail.com

Kul kayda 84 k ne kharedi asa ferfar ahe manje kay?
म्हणजे जमीन महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन कायदा , च्या तरतुदी विरुद्ध जमिनीचे हस्तांतरण झाले आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा तहसीलदार यांच्या आदेशानुसार अकृषक झालेली जनीम ग्रामपंचायत ला ले आऊट प्रमाणे नोंद करण्यात आली होती , परंतु सदर जमी 2014 पासून 2018 पर्यंत कोणालाही प्लॉट विकण्यात आले नाही 2018 मध्ये सदर जमीन सरसकट सात बारा आधारे विकण्यात आली तर अकृषक परवाना आपोआप रद्द होईल का ? कृपया मार्गदर्शन व्हावे
नाही
जमिनीमध्ये प्लॉट पाडून त्याची विकास परवानगी /बिनशेती पतवंगी घेतलेली आहे . ज्या आदेशाद्वारे परवानगी दिली आहे , त्या आदेशातील अति व शर्थी पहा . त्या अति शर्थी चा भंग झाल्यास , परवानगी रद्द होऊ शकते . आपण नमूद केलेल्या कारणासाठी परवानगी रद्द होवू शकत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Santosh patil
14-10-2018
Ctpatil71@rediffmail.com

माझ्या वडिलांनी 1986 साली एक गुंठा सामायिक क्षेत्र जागा मालक यांच्याकडून घेतले , पुढे जाऊन जागा मालकने टाउनशिप प्लॅंनिंग करून माझ्या भावाला त्यामध्ये घेतला ,त्यानंतर (जागा मालक) आम्हाला फक्त 1.50 फुटी रोड ठेवला आहे मी कुठे व कशी तक्रार करू कृपया मला मार्गदर्शन द्या
जो लेआऊट आहे त्यामध्ये रस्ता किती रुंदीचा असावा या बाबत , नकाशा मंजूर केलेला असतो . त्या आकारमानाचा रस्ता ठेवलेला नसेल तर , तहसीलदार यांचेकडे तक्रार करा . अथवा ग्राहक मंचाकडे , deficient सेवा दिली म्हणून , दाद मागा.
भोगवटा प्रमाणपत्र त्याने घेतले नसेल , त्या बाबत , planning authority कडे तक्रार करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझी वडिलोपर्जित शेत जमीन आहे. या शेत जमिनीस जाण्यास ०१ कि.मी इतक्या लांबीचा समाईक कच्चा रस्ता आहे. याची नोंद सातबार वरती आहे त्या रस्त्यावरती लागतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे त्यावरील अतिक्रमण काढायाचे आहे त्या करीता मला का्य करावे लागेल
लगतच्या शेतकऱ्याने अतिक्रम केल्याने आपला शेताकडे जाण्याचा मार्ग बंद झाला असेल , तर मामलतदार कोर्ट कायद्याखाली , तहसीलदार यांचेकडे अर्ज दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Kharedi khat banavat v vishvasat n gheta kel asel tr Kay karav
KHAREDI KHAT NONDNIKRUT ASEL TR DIVANI NYAYALAYAT DAVA DAKHAL KARUN RADD KARUN GHYAVE LAGEL

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

नमस्कार सर मी राजेश जोशी सर मला असे विचारायचे आहे कि माझी जमीन राष्ट्रीय महामार्गालगत आहे तसेच माझ्या बांधाला जो शेजारी(मोहन परतुरे ) आहे त्याची जमीन सुद्धा या महामार्गालगत आहे. तसेच आमच्या दोघांच्या गटाला जमिनीलगत जुना शिव रास्ता देखील आहे. परंतु त्या शेजारी परंतुरेंनी तो रास्ता अतिक्रमण करून बंद केला आहे.

व तसेच जुन्या नकाशावर एक गाडी रास्ता दर्शविलेला आहे तो आज रोजी पूर्णतः बंद आहे . वरील शेजारी याचे दोन भाऊ आहेत त्यातील एका भावाला रोड लागत वाटणी आली आणि एका भावाला आतमध्ये वाटणी आली. त्यामुळे ज्याला आतली वाटणी आली तो भाऊ आम्हाला नकाशावरील रस्त्या प्रमाणे रास्ता मागत आहे. परंतु कायद्याने बघितले असता ज्या गटाला राष्ट्रीय महामार्ग आहे तसेच शिव रास्ता देखील लगत आहे त्या गटाला त्या लगत मालकाने रास्ता देणे कायदेशीर आहे . परंतु तो दुसरा भाऊ तलाठी व मंडळ अधिकारी यांना पैसे खाऊ घालून नकाशा नुसार रास्ता मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे . या बद्दल मला मार्गदर्शन करावे हि विनंती. मी यामध्ये कुठले कायदे विषयक निर्णय / पुरावा म्हणून देउ शकतो ते देखील सांगावे .
आपले सरकार पोर्टलवर लॉगिन झालेनंतर महसूल सेवेमधील नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट करिता अनिवार्य कागदपत्रांमधील ऍफिडेव्हिट फॉर कास्ट चा फॉरमॅट ( कोणता फॉर्म) काय आहे? तो सध्या कागदावर द्यावयाचा कि बॉण्ड पेपरवर द्यावयाचा?
तो मा.कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर साक्षांकित करणे आवश्यक आहे काय?
नमस्कार सर, मुळ गैरआदिवासीची जमीन आदिवासी व्यक्तीने खरेदी केली व ती जमीन गैरआदिवासी व्यक्तीला विक्री केली यास कलम 36, 36अ लागू होतात काय? किंवा शासनाची परवानगी घ्यावी लागेल काय?
३६ अ लागू होते
शासनाची परवानगी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपले सरकार या पोर्टलवर नॉन क्रिमिलियर दाखला काढण्यासाठी लॉगिन झाल्यानंतर त्यामधील अनिवार्य कागदपत्रांमध्ये जातीसाठी एफिडेविट चा फॉरमॅट (मजकूर) काय आहे. सदर ॲफिडेव्हिट तहसील कार्यालय मध्ये साक्षांकित करणे आवश्यक आहे काय ?सदर एफिडेविट साध्या कागदावर करावयाचे की बॉंडपेपरवर करावयाचे ?बॉंडपेपरवर करावयाचे असल्यास किती रुपयेचा बॉंड पेपर लागेल ?कृपया माहिती मिळावी
नमस्कार सर,
मी कुळकायदा कलम ३२पी ने मिळालेली जमीन खरेदी केली .विक्री परवानगी न घेतल्याने शर्थ भंग झाला.कुळकायदा नवीन नियम ८४क क नुसार बाजारभावाने ५०% रक्कम भरणा केली आहे.तहसीलदारानी व्यवहार नियमित केला आहे पण जमीन वर्ग २ आहे .सदर जमीन वर्ग १ करण्यासाठी काय करावे लागते याची माहिती कृपया आपणाकडून व्हावी हि विनती
जमीन ३२ प खाली वाटप केली असली तरी त्या साठी ५० % नजराणा नाही .
शर्थ शिथिल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नगर रचना अधिनियम १९६६ मध्ये कलम ५५(१) ची नोटीस आदिवासी किंवा जे ६०-७० वर्षांपासून वास्तव्य करतात त्यांच्यासाठी लागू होते का .? त्याच प्रमाणे त्या जमिनीमध्ये कुळाची भूमिका असताना त्या मध्ये कुळाचे नाव नाही परंतु भूसंपादन अधिकाऱ्याने या मध्ये स्पष्ट लिहिलेले आहे कि , भूसंपादनाच्या वेळी त्यांना घरे मिळावी . त्यावर एखादी संस्था प्रत्यक्ष घरे तोडू शकते का ..? या बद्दल सपाटीकरण द्यावे ..
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायदा १९६६ च्या कलम ५५ अन्वये , तात्पुरत्या स्वरूपाचे काम काढून टाकण्याचे अधिकार आहेत .
आदिवासी ६० ७० वर्षांपासून राहता आहेत . त्यांनी तात्पूत्या स्वरूपाचे काम ( work of temprorary nature ) केलेले असेल .
कलम ३६ अ अन्वये , आदिवासी व्ययक्तीची जमीन बिगर आदिवासी व्ययक्तीस हस्तांतरण करण्यास निर्बंध आहे . या ठिकाणी हस्तांतरण होत नाही . नियोजन प्राधिकरण , विना परवाना तात्पुरते केलेले काम काढून टाकत आहे . किंवा त्यांचे जागेवर असलेले अतिक्रमण , कलम ५५ चा वापर करून काढून टाकत असेल , मात्र या ठिकाणी मिळकतीचे हस्तांतरण होत नाही . त्यामुळे कलम ३६ अ चे सौरक्षण मिळणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by datta kharbade
09-10-2018
dattakharbade7gmai.com

सर आमच्या शेतात जाण्याची पायवाट समोरील व्यक्ती बंद करत आहे व ति पाय वाट म्हणून गावाच्या नकाशा मध्ये उल्लेख आहे.पाय हि खुप जुनी आहे व तो आता म्हणत आहे कि बैलगाडी व ट्रक्टर नेउ देणार नाही.या साठी काय करावे मार्गदर्शन करावे.
नमस्कार सर ,
आमच्या आजोबाच्या नावे ७ एकर जमीaन होती व त्यांना ७ वारस होते एका मुलाला आजार असल्यामुळे तो मुलगा वारला त्याचा मुलगा त्या वेळेस खूप लहान होता नंतर तलाठी यांच्या कडे वाटणी पत्र करून घेतले त्या वेळेस ६ जणांना जमीन वाटणी करून दिली व ७ व्या मुलाला हिस्सा मिळाला नाही आता मी म्हणजे त्यांचा मुलगा कागद पत्र काढले असता मला हि बाब लक्षात आली त्या वाटणी पत्रात वडिलांची संमती नाही परंतु तेव्हा तलाठ्याने त्यात ७ व्या मुलाला मिळणार हिस्सा त्याच्या आजारपणात विकला असे फेरफार ला लिहिले आहे परंतु त्यामध्ये कुठलीही संमती नव्हती .
१) आता त्यामध्ये फक्त २ एकर जमीन उरली आहे बाकीच्यांनी त्यांच्या हिस्स्याला आलेली जमीन विकून टाकली आहे .
२)आता मला माझा हिस्सा मिळेल का हो तर kasa ?
३)जमीन वडिलोपार्जित असून मी लहान होतो त्यामुळे मला हि गोष्ट आता लक्षात आली.
वाटणीपात्र १९९१ साली झाले होते
आपणास हिस्सा मिल्ने आवश्यक आहे . मात्र आपणास आता त्यासाठी , दिवाणी दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१] आमचे वारसा हक्काने मिळालेले घर आहे , पण काका त्यात हिस्सा देणं नाहीत ,घर काका व माझ्या आईचया नावावर कायदेशीर व कमी वेळ लागण्यासाठी व घर शहरात असल्याने PR कार्ड मिळण्या साठी मार्गदर्शन करावे.
१. PR कार्ड जमिनीसाठी असते तर घरपत्रक घरासाठी असते .
२. आपले आईचे नाव PR कार्ड ला नसेल तर , आपणास संबंधित स्थानिक स्वराज्य अर्ज करावा लागेल .
३. त्याठिकाणी हि आपले नाव लावण्यास अडचण असल्यास , न्यायालयात दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वाटणी पत्र कसे करतात , वाटणी पत्र किती प्रकाचे असते .त्याची प्रक्रिया विशद करावी
.धंयवाद सर

Question by सागर
04-10-2018
sagarkandekar@hotmail.com

नमस्कार.गट न.238 हा 60 गुंठेचा असून त्यात 18 सामाईक मालक असून त्याच्या तिल वादामुळे त्याच्यात वाटप झालेले नाही.त्यातील 9 जणांचा त्यात 1/2 (अर्धा) अभिन्न हिस्सा मी इतर व्यक्तीच्या परवानगी शिवाय रजिस्टर खरेदीखताने खरेदी केला 2015 मध्ये व माझे सातबारा सादरी नाव पण लागले. माझ्याच मालकीचा गट न.237 हा गट न.238 ला लागून आहे.पण अत्ता इतर व्यक्तींनी माझ्या विरोधात कोर्टात खरेदीखत रद्द करण्याचा दावा टाकला आहे व ते सांगत आहे की आम्हा हा 1/2 अर्धा हिस्सा विकत घेण्यास तयार होतो.आत्ता न्यायलाय काय निर्णय देणार..? खरेदीखत रद्द झाले तर माझी खरेदी रक्कम मला परत कशी मिळणार..? मार्गदर्शन करावे.

वारसाने प्राप्त झालेल्या जमिनीवर प्रातां विकत घेण्याचा हक्क केवळ , इतर वारसांनाच असतो . अन्य सहधारक आपले वारस नातेवाईक आहेत का ? नसतील तर पाले खरेदी खत रद्द होऊ शकत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब नमस्कार
गावठाण घर मिळकती चे रजिस्टर मृतुपत्र माझ्या नावे केले आहे ,परंतु मी मृतुपतत्रा नुसार नोंद होण्यासाठी मृतुपत्र १ वर्षे उशिरा दिले आहे ,परंतु घर मिळकतीला ग्रामपंचायतीने ठराव करून वारसाची नावे ८ अ च्या उतार्याला नोंद झाली आहे ,मी मृतुपत्र नोंदीसाठी दिले आहे ,ग्रामसेवक मृतू पत्रा नुसार माझी नोंद घालेल का , ग्रामसेवकाने सांगितले कि अगोदर वारसाची नोंद झाली आहे ,काय करता येणार नाही ,व वारसांनी सुद्धा अर्ज दिला आहे कि आमची वारसाने नोंद झाली आहे ,नोंदीत बदल करू नये ,आता मी काय करू ,कृपया साहेब लवकर मार्गदर्शन करावे ,हि आपणास विनंती
आपण गट विकास अधिकारी यांचेकडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मी अमोल मार्च महिन्यात 30 गुंठे जमीन खरेदी केली होती पण त्या 7/12 वर मयत व्यक्तीचे नाव तसेच होते त्या मुळे ती नोंद रद्द करण्यात आली नंतर मी वारस नोंद करून घेतली व नवीन नोंद करण्यासाठी नवीन index पण तलाठयाला दिली परंतू तो आता sub resiter परवानगी घ्यावी लागते म्हणतोय तर मला काय करावे लागेल process काय असेल
जी व्यक्ती मयत होती , तिच्या वारसांनी खरेदी खतावर सहया आहेत का ? केल्या असल्यास आपणास अडचण नाही
मात्र जर त्या मयत व्ययक्तीच्या वारसांनी खरेदी खतावर सह्या नसतील तर , पुन्हा वारसांकडून त्यांचा हिस्सा खरेदी घ्यावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3444
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3