जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Nandu Shelake
08-09-2019
nsshelake99@gmail.com

नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का

कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
नमस्कार सर, माझा प्रश्न निवाड्यामधील क्षेत्राशी आहे. आमची १९७६ साली पाझर तलावासाठी जमीन संपादित झाली आहे. सर्वे क्र- १८५ मध्ये आमचे ५.६६ व ग्रामपंचायत चे ३.२४ असे ८.९० हे क्षेत्र होते. त्यापैकी निवाड्यामध्ये निवृत्ती बाबू आणि ग्रामपंचायत यांचे संयुक्त ५.८० असे क्षेत्र दिले आहे. मोबदला दोघांना संयुक्त रित्या वाटप करण्यात आला आहे. परंतु ७/१२ मधून फक्त निव्रुती बाबू पुदाले यांचे नाव कमी केले आहे.प्रत्यक्षात आमची एकून १४ पैकी ७ एकर जमीन तलावामध्ये गेली आहे.उर्वरित ७ एकर जमीन आम्ही आजपर्यंत कसत आहोत ग्रामपंचायत यांची पूर्ण जमीन जाऊनही त्यांचे नाव कमी करण्यात आले नाही. संयुक्त जमीन मोजणी अहवाल नक्कल हि फार जुनी असल्यामुळे शोधून मिळत नसल्याचे संबंधित कार्यालयांनी लेखी कळविले आहे. (एकूण क्षेत्र ८.९०- (संपादित क्षेत्र)५.८० =३.१० हे क्षेत्र चातुर्सिमेप्रमाणे आमचे आहे. तसेच संबंधित सिंचन विभागाकडील तलावाच्या नकाशामध्ये जे शिल्लक क्षेत्र दाखवीत आहे ते आमच्या गटातील आहे.
त्यामुळे आम्हाला अवार्ड मधील आमचे किती क्षेत्र संपादन झाले आहे याची माहिती मिळून शिल्लक जमिनींचा ७/१२ तयार करावयाचा असल्यास तो आम्हाला मिळेल का?

Question by indrajit pudale
07-09-2019
indarjitpudale@gmail.com

नमस्कार सर, माझा प्रश्न निवाड्यामधील क्षेत्राशी आहे. आमची १९७६ साली पाझर तलावासाठी जमीन संपादित झाली आहे. सर्वे क्र- १८५ मध्ये आमचे ५.६६ व ग्रामपंचायत चे ३.२४ असे ८.९० हे क्षेत्र होते. त्यापैकी निवाड्यामध्ये निवृत्ती बाबू आणि ग्रामपंचायत यांचे संयुक्त ५.८० असे क्षेत्र दिले आहे. मोबदला दोघांना संयुक्त रित्या वाटप करण्यात आला आहे. परंतु ७/१२ मधून फक्त निव्रुती बाबू पुदाले यांचे नाव कमी केले आहे.प्रत्यक्षात आमची एकून १४ पैकी ७ एकर जमीन तलावामध्ये गेली आहे.उर्वरित ७ एकर जमीन आम्ही आजपर्यंत कसत आहोत ग्रामपंचायत यांची पूर्ण जमीन जाऊनही त्यांचे नाव कमी करण्यात आले नाही. संयुक्त जमीन मोजणी अहवाल नक्कल हि फार जुनी असल्यामुळे शोधून मिळत नसल्याचे संबंधित कार्यालयांनी लेखी कळविले आहे. (एकूण क्षेत्र ८.९०- (संपादित क्षेत्र)५.८० =३.१० हे क्षेत्र चातुर्सिमेप्रमाणे आमचे आहे. तसेच संबंधित सिंचन विभागाकडील तलावाच्या नकाशामध्ये जे शिल्लक क्षेत्र दाखवीत आहे ते आमच्या गटातील आहे.
त्यामुळे आम्हाला अवार्ड मधील आमचे किती क्षेत्र संपादन झाले आहे याची माहिती मिळून शिल्लक जमिनींचा ७/१२ तयार करावयाचा असल्यास तो आम्हाला मिळेल का?

आपण अवॉर्ड ची प्रत घ्या
सयुंक्त मोजणी नकाशा मिळाला असता तर , आपले काम खूप सोई चे झाले असते
मोबदल्याच्या प्रमाणावरून जागा समापदं ठरवा
निम्मा निम्मा मोबदला दिला असेल तर , ५.९० च्या निम्मे क्षेत्र संपादित झाले असा काढावा . त्याप्रमाणे संबंधित SLAO यांचेकडून आदेश घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by PRASHANT OSTWAL
05-09-2019
Satyatrs1@gmail.com

माझा प्रश्न असे आहे की सन 1972 अगोदर ज्या गटातून रोड गेलेले आहे व ते क्षेत्र मुळ मालक यांचे नावावर 7/12ला बाकी आहे व रोड सोडून 2नि कडचे क्षेत्र मूळ मालकाने विक्री केलेले आहे पण आज रोजी रोड चे क्षेत्र कमी झलेले नसले मुळे तो विक्री केलेले जमीन धारका शी भाडत आहे तरी ते क्षेत्र 7/12 वरुण कमी कसे करता येईल कारण महसुल ला रोड ची नोंद त्ये वेळेस झांलेली नाही परंतु भूमि अभी लेख कडून मोजनी झाली तर रोड गेलेला अभीप्राय मिळतो नेमके तेवडे च क्षेत्र 7/12 वर मूळ मालक यांचे नावावर दिसून येते तरी सदरिल क्षेत्र चे महाराष्ट्र शाषण चे नाव कसे लावता येईल कारण तो रोड त्ये वेळेस रोजगार हमी तुन झलेले आहे त्ये मुळे तैचे KJP झलेले नाही तरी मार्गदर्शन करावे
या साठी आपणास , जमीन संपादन निवाडा प्राप्त करून घ्यावा लागेल . निवाडा व ताबे पावतीच्या आधारे भूमी अभिलेख खाते ,कजाप तयार करेल व कजाप च्या आधारे ७/१२ तयार होईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबांच्या नावे मालमत्ता(शेती व राहते घर)आहे . मी त्यांचा दत्तकपुत्र आहे. आजोबा १९९३ साली मयत झाले असुन त्यांनी सगळी मालमत्ता मृत्युपत्राद्वारे माझ्या नावे केली आहे.ते मृत्युपत्र मला आत्ता सापडले आहे पण सदर मालमत्तेला (मृत्त्युपत्र मला सापडण्यापुर्वी) इतर वारसदारांची नावे लागली आहेत.
मृत्यूपत्र नोंदणीकृत नाही. तरी सदर मृत्युपत्राच्या आधारे फक्त माझे नाव वारस म्हणुन लावता येईल काय..??
ज्या फेरफाराने आजोबांच्या इतर वारसांची नावे लागली आहेत , तो फेरफार आव्हानात करा . मृत्यपत्र नोंदणीकृत करण्याची आवश्यकता नाही . तसेच मिळकत मुंबई बाहेरीलक असेल तर मृत्य पात्र प्रोबेट करण्याची हि आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Radhika more
03-09-2019
Radhakare91jgd22@yahoo.com

माझे पती आणि मी सरकारी नोकरी करत आहोत.आम्हाला शेतजमीन विकत घेण्यासाठी शेतकरी दाखला मिळेल का ?
माझ्या पतीच्या नावावर शेतजमीन नाही परंतु त्यांच्या वडिलांच्या नावावर वडिलोपार्जित शेतजमीन आहे.
आपले पतीचा त्यांचे वडिलोपार्जित शेतीत हक्क आहे . पारियायाने ते शेतकरी आहेत त्यामुळे त्यांना शेतकरी दाखलामिळेल . ते शेत जमीन खरेदी करू शकतील . मात्र आपणास शेतकरी दाखला मिळू शकणार नाही . आपण शेत जमीन खरेदी करू शकणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Amol E Wagh
01-09-2019
amolwagh6828@gmail.com

नमस्कार सर,
विकास योजनेत 24 मी.रिंग रोड साठी आरक्षण पडलेले आहे. जुन्या भूसंपादन कायद्यानुसार 2013 मध्ये कलम 6ची अधिसूचना प्रसिद्ध होवुन 9(3)(४) ची नोटीस मिळाली आहे. परंतु भूसंपादन प्रकरणी गेल्या 6 वर्षात अद्याप पर्यत कोणतेही कार्यवाही झालेली नाही. भूसंपादन कायद्यानुसार प्रत्येक टप्प्याचा कालावधी निश्चित केलेला आहे. 6 वर्षाचा कालावधी होवुन देखील भूसंपादन झालेले नसेल तर
1) भूसंपादन प्रक्रिया व्यप्तगत झालेली समजावयाचे का? 2) कलम 9(3)(4) चे नोटीस नंतर कलम 11 ची अधिसूचना किती वर्षात काढणे आवश्यक असते.
3) भूसंपादन मोबदला 2013 चे बाजार भावानुसार मिळेल की 2019चा.
भू संपादन प्रक्रिया व्यपगत झाली आहे
नव्याने भू संपादन करावे लागेल
आपणास २०१३ चे कायद्याप्रमाणे , जर जमीन नव्याने संपादन झाली तर पैसे मिळतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sandeep
01-09-2019
Sbhadane49@yahoo.com

महोदय, माज्या गावात माझा 50x80 प्लॉट आहे ग्रामपंचायत 7/12 उताऱ्यावर मालक सरकार आहे तर भोगवंटदार माझे नाव आहे .गावात सिटी सुर्वे चालू आहे तर काही अडचण येणार का
नगर सर्वेक्षणाचे नोटीस आपणास प्राप्त झाली असेल . आपण सदर सुनावणीस हजार राहून , जमीन मालकीचे असलेबाबत कथन करावे व आपला पुरावा द्यावा .
आपण सुनावणीस हजार राहिला नाही तर , या जमिनीवर आपला कोणताही हक्क नसल्याचे समजण्यात येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब माझा असा एक प्रश्न आहे की, माझ्या आजोबांनी सिलिग मधे मिळालेली जमीन डवरी समाजातील एका माणसाची खरेदी केली आहे.
ति जमीन भोगवट दार वग २ मधे येते, म्हणून अपर जिल्हाधिकारी यांची परवानगी काढून जि काही बाजारभावाने रक्कम होते तची ५०% रक्कम शासकिय खजाण्यत भरणा करून खरेदी केली आहे. म्हणजे ती जमीन आता भोगवटा वर्ग 1 होवून खरेदी केली.

आता आजोबांचं बक्षीसपत्र करून नातंवाच्या नावावर जमीन करायची आहे. पन अपर जिल्हाधिकारी परवानगी देताना त्यांनी हस्तांतर करताना कलम 29 व नियमावली 1975 मधील नियम 12 (ड-१) व त्याखालील उपकलमाचे उपबंधाचे अधीन असेल अशी अट व शर्त घातली आहे.

पण आता ती जमीन भोगवट वर्ग 1 असताना परत ती भोगवट वर्ग 2 मधे कशी गेली.


त्यामुळे आता काय परत परवानगी काढून ५०%रकम भरावी लागेल का.
सर प्लिज माहिती दिली तर बरं होईल.
जमीन खरेदी केली म्हणजे वर्ग २ ची वर्ग १ झाली नाही .
आपणास ५० % रक्कम भरावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या 7 12 उतार वर पूण क्षेत्र पोटखराबादशवत ते लागवडीस वेग करण्या करकरत कुणा कडे आज कराव
प्रथम ते क्षेत्र आपण लागवड योग्य करा नंतर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Dipak
30-08-2019
dipak.a75@gmail.com

On which weblink I will see back 2 years computerized mutation
Please send me लिंक
Thanks
बनावट कागदपत्रे सादर करून भावकितील एकाने अतिरिक्त क्षेत्र असलेला सातबारा तयार करून घेतला आहे.तहसीलदार, आपले सरकार,प्रांत साहेब,कलेक्टर साहेब यांचे कडे तक्रार करून एक महिन्या हुन अधिक कालावधी लोटला.कोणी काहीच करत नाही.आणि अर्जाला उत्तर देत नाही.आता न्याय कोणाकडे मागायचा?
कारवाई होईल . आपलेसरकार तक्रार निवारण कालावधी केवळ २१ दिवसाचा आहे . २१ दिवसात उत्तर देणे क्रमप्राप्त आहे . उत्तर प्राप्त झालेले नाही , आपण जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Raj Sali
27-08-2019
krish9442@gmail.com

Tribal land is purchased by a trust with proper approval and sanctions from collector...Now the trust intends to sell the land to general public...can the trust sell the land
Permission to sell land belonging to tribal to non tribal is given for non agricultural purpose . Whether land has been utilised for the purpose for which permission has been granted ? If yes , then there is no bar , for a trust to sell land .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by jAGDISH SALUNKHE
26-08-2019
jag_s21@rediffmail.com

नमस्कार मी ज्योत्स्ना मोहन साळुंखे माझी आई शांताबाई शेटये हिने २००४ साली ६६० चौ वार जागा बाळाराम न्होईर व इतर ३,५०,००० यांच्याकडून विकार घेतली होती. त्यावेळेला त्या जमिनीवर सिलिंग (महाराष्ट्र शासन) असल्यामुळे जागा नावावर करता येत नव्हती. त्याप्रमाणे जमीन मालकांनी सांगितले कि जेव्हा सीलिंग उठेल तेव्हा तुम्हाला जागा नावावर करून देण्यात येईल. २००४ साली सगळ्या मालकांनी पॉवर ऑफ अट्टोर्नि व विकास करारनामा नोटरी लिहून दिले. विकास करारनामा मध्ये मोबदला म्हणून ३,५०,०००/- मिळाले असे लिहिण्यात आले. २००४ साली आम्ही ग्रामपंचायत पिसावली यांच्याकडून नकाशा मंजूर करून व्यापारी गेले बनविले व नंतर त्यावर कर लावून घेतला.नंतर २०१४ साली सादर ग्रामपंचायत महानगरपालिका मध्ये समाविष्ट झाली व आम्ही महानगरपालिके चा टॅक्स भारत आहोत,शरद जागेवर आमचा २००४ पासून अधिकृत कब्जा असून सादर जागा मालक आम्हाला खरेदी खत नोंदणीकृत करून देण्यास तयार नाहीत.आमच्या कब्ज्यानुसार इतर हक्कात आमचे कब्जेदार म्हणून नाव लावता येईल का? किंवा शासनाकडे विनंती करून आमचे पेपर सादर करून आम्ही जागेचे मालक होऊ शकतो का?
जी जागा अतिरिक्त ठरवण्यात आली , ती जागा नावावर होऊ शकत नाही . ज्या मूळ मालकांची जागा होती , त्यांचे धारण क्षत्र नागरी जमीन धारणा कायद्या अंतर्गत निश्चित मर्यादेपेक्षा जादा झाल्याने , त्या जमिनीस महाराष्ट्र शासन हे नाव दाखल करण्यात आले आहे . आपण सध्या स्थित शासनाचे जागे वर अतिक्रमण केले आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by मोगल
26-08-2019
sagar06731@gmail.com

प्रश्न -
महोदय , मला 4 भाऊ व 3 बहाणे असे कुटुंब असून आमची 10 एकर वडिलोपार्जित शेत जमीन (एकूण 7 गट आहेत) आहे.माझे 4 ही भाऊ व बहीण हे शहरी नौकरी करत असून ते शेती वर अवलंबून नाही व शेत जमिनी ची वाटे हिस्से करून देत नाही व वडील वारल्या नंतर सातबारा सादरी सर्व 8 जणांचे सामाईक मालक म्हणून नावे लागली आहेत 19 वर्षा पासून.सदर 7 गटा पैकी 4 गट माझ्या ताब्यात असून त्या मी कसत आहे.तर
1. मी एकटा भूमी लेख कार्यालय इथे अर्ज देऊन जमिनीची मोजणी करू शकतो का? कारण बऱ्याच शेजारील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे.
2.तलाठी हे माझ्या नावे पिकपहानी दाखल करत कारण ते बोलता सामाईक जमीन आहे.
3.आर्थिक अडचणी मुळे मी कोर्टात दावा पण नाही टाकू शकलो तर माझ्या कडे काय पर्याय आहे जमीन वाटे करू घेण्यासाठी.
जमिनीचे वाटप करण्यासाठी सर्व सह धारकांची संमती आवश्यक आहे . संमती नसेल तर आपण न्यायालयात जाण्या वाचून पर्याय नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. किरन सर, नविन अविभाज्य शर्त भोगवटदार वर्ग 2 शेतजमिनीत कूकुट्टपालन करने करिता परवानगी संबंधी माहिती द्यावी हि विनंती
कुक्कुट पालन व्यवसाय हा शेती समजला जातो .
त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही .मात्र कुक्कुट पालन शेड साठी नियोजन अधिकारी यांची विकास परवानगी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kishor Rokade
25-08-2019
sagaradipune@gmail.com

माझा प्रश्न: माझे आजोबा कुलकर्णी इनाम जमिनी ला कुळ होते. नंतर तेहसिल दार यांनी ३२ ग या इनाम जमिनीला लागू नसलेले कलम अंतर्गत चौकशी करून कुळ बेदखल केले. परंतु त्या पूर्वीही आणि त्या नंतरही शासकीय खंड भरून ती जमीन आजोबा वहिवाट करत होते ७/१२ सादरी तशी नोंद आहे. १९७२ ला मा. प्रांत साहेबांनी ऑर्डर काढून आजोबांना व बाकी इतर जणांना कब्जे हक्काची रक्कम भरण्यास सांगितली ऑर्डर तेहसील दार साहेब यांच्या नावे होते मूळ ऑर्डर ची प्रत आमच्याकडे आहे. ऑर्डर मध्ये आजोबांचे नाव कुळ म्हणून दाखल करण्यात यावे असा स्पष्ट उल्लेख आहे. परंतु तशी काही कार्यवाही त्यांनी पुढे केली नाही.
१९७९ ला आजोबांनी तहसील दारंच्य परवानगी ने कब्ज हक्काची रक्कम भरली परंतु अजनाते पणी पुढील कार्यवाही करायची राहून गेली तरी आजोबा तिथून पुढे त्याचा प्रत्येक वर्षी त्याचा खंड भरत होते तशा पावत्या आहेत.
पुढे जाऊन वडिलांनी त्या जमिनीची मागणी केली ती मागणी प्रांत साहेबांनी मान्य करून त्या कारणी बुडीत खंडाचे २० rs चालना द्वारे भरून घेतले व तहसील दारांना पुढील कार्यवाही करून अहवाल त्वरित सादर करायला सांगितला.
तहसील दारांनी ती फाईल खूप वर्ष कोणतीच कारवाई न करता स्वतः कडे ठेवली खूप पाठपुरावा करून देखील उत्तर मिळाले नाही लेखी अर्ज करता फाईल गहाळ झाली वाळविणे खाल्ली असा शेरा देण्यात आला.
पुन्हा परत जमीन नावे करण्या कामी अर्ज केला असता कोणतीच कारवाई न करता चुकीच्या पद्धतीने बेदखल केलेल्या कुळाचा हवाला देण्यात आला परंतु नंतर च्यां प्रांत साहेबांच्या कुळ दाखल करण्याच्या ऑर्डर कडे लक्ष दिले नाही पुरेस म्हणणं ऐकून घेतले नाही.
पुढे जाऊन वडिलांनी परत प्रांत साहेबांकडे मागणी केली असता त्यांनी खूप वेळ झाला असा निकाल दिला.
वास्तविक आजोबा त्या जमिनीचे कुळ आहेत याकडे लक्ष दिले नाही.
प्रांत साहेबांच्या निकालाच्या २० दिवसात मूळ वतनदार की ज्याने १९४८ पासून कधीच जमिनीचा भोगवटा केला नाही किंवा कसलेच भोगवटा मूल्य कधी शासन दरबारी जमा केले नाही अश्या इसमाने तहसील दारांकडून स्वतः नावे ऑर्डर करून घेतली. व त्या आधी १ वर्षा पूर्वी एका इसमाला सरकारी अकरि पड शेरा जमिनीवर असताना साठे खत करून दिले.
आम्ही काय करावे आमचं सर्व कुटुंब त्या जमिनीवर अवलंबून आहे.

आपले उत्तर: As per Bombay Pargana and Kulkarni Watan (Abolition) Act १९५१ च्या कलम ८ नुसार , कुलकर्णी वाटण जमीन निर्धारित दिनांकास , त्रयस्थ व्यक्तीस कायदेशीर रित्या कसण्यासाठी दिली असल्यास , अशी मिळकत /जमिनीस , मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या तरतुदी , कुल व जमिनीच्या धारकास त्यांचे हक्क व जबाबदारी संदर्भात लागू असतील .
आपले जमिनीचे कुल असल्याचे प्रांत साहेबांनी जाहीर केले होते . केवळ त्यांचे नाव ७/१२ सादरी दाखल केले नाही म्हणून , आपला कुल मी हणून असलेला हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही . तहसीलदात यांचे आदेश आवाहणीत करा . ( अपील करा )
मात्र आपले प्रश्नात आपण नमूद केले आहे कि , जमीन सरकारी नोकरी पड असताना , , साठे खत करून , त्रयस्थ पक्ष हिट संबंध निर्माण केले .
जर आपले आजोबा या जमिनीचे कुल होते व जामीन कस्त होते तर जमीन पड म्हणून कशी नोंद झाली? आजोबांनी जमीन कसली नाही का ?
तहसीलदार यांनी पूर्वाश्रमीचे वतनदारास ५ वर्षे होऊन गेल्यानंतर ( हा कायदा अमलात आल्या नंतर ) पुनर्प्रदान कशी केली ? हा तहसीलदार यांचा आदेश अहवानीत करा

आपण विचारलेले प्रश्न: जमीन अकरी पड कशी झाली?
उत्तर: kulkarni vatan abolition act नुसारच झाली 1958 सालाला तसा फेरफार आहे. 1966 सली adiitional मामलेदारानी 32ग अंतर्गत चौकशी करून इनाम वतन जमिनीला 1957 ला सदर जमिनीस कुळकायदा लागू नाही सबब कुलांचे इतर हक्कातून नाव कमी केले. त्यानंतर 1972 ला प्रांत साहेबांनी ऑर्डर काढून त्या जमिनी वहिवाट दाराच्या नावे करण्यास सांगितले होते व
७/१२ ला इतर हक्कात नोंद घ्यायला सांगितले होते. तशी काही नोंद घेतलीच नाही.
आपला प्रश्न: आजोबांनी जमीन कसली नव्हती का?
उत्तर: सदर जमीन आजही मी माझ्या कुटुंबासह कसत आहे.

मूळ वतन दाराची regrant order मी पाहिली आहे त्यात त्याने खोटे प्रतिज्ञा पत्रक करून तो जमीन कसत आहे असे सांगितले. व आमचे कुळ बेदखल केले आहे हे त्यात नमूद केले.
आम्ही जमीन कसत असून देखील 2012 ते 2016 पर्यंत तलाठी यांनी पीक पाहणी ला आकरि पड अशी नोंद केली आम्ही हरकत घेतली असता जमीन सरकारची आहे असं सांगितले.
खोट्या प्रतिज्ञा पत्रविषयी काय काय कारवाई करता येईल.
आणि जमीन आकारि पड असताना register साठे खत कसे काय केले असेल.?
तहसीलदार यांचे आदेश हवनीत करा
३२ ग (६) अन्वये , जमीन मूळ वतनदारास पुनर्प्रदान करण्यापासून एखादा कुल जमीन कसत असेल तर , अश्या कुळांना सौरक्षण आहे . अश्या कुळाचे नावे जमीन ३२ ग किंमत निश्चित होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सुरेश
25-08-2019
sushilk22@gmail.com

सर मिळकत पत्रिकेला सामाईक वारस नोंद आहे पण ग्रामपंचायत नमूना न 43 ला एकाचे नाव आहे त्यावेलेस वडिलांनी भूमिअभिलेख ला वाटणीपत्र न करता ग्रामपंचायत ला केले आहे 100 रु चे बोंड वर
आता माझ्या भावांनी हिस्सा मागीतल्यावर मि त्यांचे नाव ग्रामपंचायत ला लावायला अडवू शकतो का pr card सामाईक लागले आहे पण ग्रामपाच्नायात रेकॉड ला माझे नाव 30 वर्ष पूर्वी लागले व त्या सगळ्या वारसांच्या संमतीने लागले आहे पण त्यांनी आता pr कार्ड ला वारसा केला आता मि काय उपाय करू शकतो कि जेणे करून माझे भाऊ हिस्सा मागणार नाहीत
अशे करणे योग्य नाही
आपला भावाचा हिस्सा मिळकत पत्रिकेत नोंदवला आहे .
आपण ग्राम यांच्यात अभिलेख या मध्ये नोंदवण्यास विरोध केला म्हणून काही फरक पडणार नाही .ग्राम पंचायतीकडे अभिलेख हा केवळ कर संकलनापुरता मर्यादित आहे . त्यावरून मालकी हक्क सिद्धह होत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्रामपंचायतीची परवानगी न घेता बांधकाम केल्यास कोणत्या प्रकारची कार्यवाही होते? जर दंड भरला तर पुढे बांधकाम नियमित होईल का?
केवळ गावठाण मध्ये बांधकाम करावयाचे असल्यास , ग्राम पंचायत परवानगी देऊ शकते . अनधिकृत बांधकाम जर बांधकाम नियंत्रण नियमावली नुसार नियमानुकूल होत असेल तरच , ते नियमानुकूल होऊ शकते . अन्यथा बांधकाम दूर करावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी राधिका मोरे बोलत आहे.माझा प्रश्न असा आहे की
1) माझे काका शेतकरी नाहीत.त्यांनी 2001 साली ग्रामपंचायत हद्दीत
भोगवटादार वर्ग 1 शेतजमीन खरेदी केली होती त्यांचा व्यवहार सन २०१६
चा अधिनियम क्रमांक 20 प्रमाणे दंड आकारून नियमित होऊ शकतो का ? सध्या जमीन नगरपंचायत हद्दीत आहे.परंतु नगरपंचायतीचा विकास आराखडा अजून तयार झाला नाही.
2) सरकारी नोकरी असलेल्या व्यक्तीला शेतकरी दाखला मिळू शकतो का ? सरकारी नोकरी करणार्‍या व्यक्तीचे वडील यांची वडिलोपार्जित शेतजमीन असून ते शेती करतात.
3) संभाव्य बिनशेती म्हणून एका शेतकरयाकडून रस्त्याच्या हक्कासहीत शेतजमीन खरेदी केली असल्यास ती जमीन आता अधिकृत निवासी बिनशेती होऊ शकते काय ?
4) संभाव्य बिनशेती खरेदी म्हणजे काय ?
कृपया प्रश्नांची उत्तरे द्यावीत ही विनंती.
१. व्यक्ती शेतकरी नसेलतर जमीन खरेदी करू शकत नाही . २०१६ अधिनियम नुसार जमीन व्यवहार नियमित होऊ शकत नाही
२. होय
३. जर जमीन गावठाण हद्दी पासून ५०० मीटर हद्दीत असेल तर , जमीन मानीव बिन शेती आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या मुलाचा जन्म 2018 मध्ये झाला आहे तरी त्याचा दाखला काढलेला नाही काढायचा आहे त्याच्यासाठी प्रोसिजर काय
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मला २०१६ मधील ८४ क संधर्बातील शासन निर्णय कोठे मिळतील .
महाराष्ट्र्र शासनकजे संकेत स्थळावर नवीन कायदा सुधारणा आहेत
Google वर , महाराष्ट्र्र शासन निर्णय तुपे करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब माझा प्रश्न पुढीलप्रमाणे आहे माझी आजी गावच्या ठिकाणी 1985 / 86 निधन पावली. तेव्हा तिच्या मृत्यु ची नोंद केल्याची ग्रामपंचायत मध्ये कल्पना नाही. तरी तिचे सातबारावरील नाव अजून प्रयन्त तसेच आहे ते आम्हाला कमी करायचे आहे तलाठी साहेब मृत्यु दाखला मागत आहे आणि तो आमच्याकडे नाही तर आता आम्ही आमच्या आजीचे नाव सातबारावरून मृत्यु दाखल्या शिवाय कसे कमी करू शकतो याचे मार्गदर्शन करावे हीच नम्र विनंती
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे कडे अर्ज करा . JMFC मृत्यू नोंद दिनांक जाहीर करतील . त्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थेत मृत्यूची नोंद होईल व आपणास मृत्यू दाखला मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Imran Tamboli
22-08-2019
itamboli209@gmail.com

मालकी हक्काचा पुरावा खालीलपैकी कोणता आहे
सिटी सर्व्हे उतारा की ग्रामपंचायत 8 अ उतारा
हे दोन्ही हि मालकी हक्काचे पुरावे नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सुशील
20-08-2019
sushilk22@gmail.com

नमस्कार सर
मी परळी येथील रहिवाशी असून माझ्या आजोबाच्या नावावर pr कार्ड ला मोकळी जागा होती त्यांना 8 मुले होते त्यांनी 1993 ला माझ्या वडिलांच्या नावावर ग्रामपंचायत कार्यालय नमुना 8 ला काही जागा नावे करून दिली नंतर त्या जागेवर वडिलांनी घर बांधले पण काही वर्षात त्यांचा मृत्यू झाला नंतर ते घर ग्रामपंचायत ला वारसा आधारे माझ्या नावावर झाले पण pr कार्ड वर आजोबाचीच नोंद आहे तर माझ्या वडिलांनी बांधलेल्या घरावर कोणी दुसरा हिस्सा मागू शकतो का pr कार्ड आधारे व जर pr कार्ड ला नोंद करायची असल्यास ती कशि होईल?
आजोबानी कि त्यांचे इतर वारसांनी आपले वडिलांचे नावावर जमीन करून दिली ?
जमीन नावावर नोंदणीकृत दस्त द्वारे करून दिली कि केवळ अनोंदणीकृत दस्त द्वारे ग्राम पंचायत रेकॉर्ड ला नाव दाखल झाले ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.32 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3