जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Suraj shivanath madan
04-04-2019
surajmadanpatil@gmail.com
नमस्कार सर..
2015-16 मध्ये केळीगव्हाण (ता.बदनापूर) गावातील नदीमध्ये जलयुक्त शिवार, सामाजिक संस्थेच्या आणि लोकवर्गणी निधीतून खोलीकरण आणि रुंदीकरनाचे अर्धवट काम झाले होते
त्यामुळे आमचा नदीतीरावरील वडिलोपार्जित शेतरस्ता विस्थापित झाला तो नदीतीरावरुन पूर्ण करून देऊ अस आम्हाला सांगण्यात आलं पण आजपर्यंत 3 वर्षात तो बनवला नाही त्यासाठी तहसील ला नोव्हेंबर -2018 मध्ये ३५ शेतकऱ्यांच्या सातबारा नंबर आणि तलाठी पंचनामा प्रत सह त्रकार दिल्यावर आमचा अर्ज मजूर करून तहसील ने फक्त खाजगी सामाजिक संस्थांना रस्ता पुर्ववत करण्याची नोटीस दिली पण आजपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी काही उपाययोजना झाली नाही..
लोकवर्गणीतून जमा झाालेल्या निधीतील जवळपास पाच लाख रुपयांची रक्कम कार्यकारी समितीकडे शेष आहे. नदीला जुलै ते जानेवारी पर्या्यं्त पाणी असते,आम्हाला पर्यायी रस्ताही नाही. दोन वर्षेपासून पाण्यातून अवजारे नेऊन शेती पिकावतो आहे..
बदनापूर तहसीलला जानेवारी पासून सतत पाठपुरावा करतोय पण काहीच कार्यवाही होत नाहीय.. आम्ही काय करावे कोणाकडे दाद मागावी??
कृपया मदत करावी,सल्ला दयावा.
लोकवर्गणीतून जल शिवार योजना राबवण्यात आली आहे . याबाबत कोणाकडे दादा मागण्याशिवाय आपण सावताच रस्ता तयार करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by इंद्रजित पडले
04-04-2019
indrajitpudale@gmail.com
सर, माझ्या आजोबाच्या नावाने एकून १४ एकर पैकी ७ एकर इतकी जमीन पाझर तलावासाठी संपादन झाली आहे.ग्रामपंचायत आणि निवृत्ती बाबू पुदाले अशी संयुक्त पणे संपादन अहवालात नमूद आहे. तरी आमची पूर्ण जमीन वर्ग झाल्यामुळे आमची जमीन शिल्लक असून उर्वरित ७ एकर जमिनीचा ७/१२ तयार झाला नाही. संयुक्त जमीन मोजणी अहवालाची नक्कल मागणी केली असता ती भूमी अभिलेख आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध नाही असे सांगतात तरी यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाकडे हि नक्कल मिळेल माहिती द्यावी.
जमीन ज्या भू संपादन अधिकारी कार्यालयाकडून संपादित झाली आहे , त्या कार्यालयाकडे मागणी करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Indrajit ashok pudale
04-04-2019
Indrajitpudale@gmail.com
सर पाझर तलाव मध्ये गाळ पेरा करण्याचा हक्क कुणाला असतो मूळ मालकाला की लगतच्या/ गटातील शेतकर्याला?
Question by चंद्रशेखर ह.नितोणे
03-04-2019
vickynitone2112@gmail.com
नमस्कार सर...मी ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमातील वडीलोपार्जित जागा सूमारे 30ते35 वर्षे पासून वापरत आहे.नेहमी ग्रामपंचायतला कर भरणा चा आग्रह करूनही त्यानी गावपातळीवरील राजकारणामुळे कर घेतला नाही व जागा नावाने पण केली नाही.मी ती जागा शेती वापराच्या साहित्य व जनावर ठेवण्यासाठी मा.तहसिलदार साहेबांना शासनाने निर्धारीत रक्कम भरून जागा मिळण्यासाठी निवेदन सुद्धा दिले पण 2002च्या शासन निर्णयानूसार जागा देता येत नाही म्हणून मला नकार दिला तरी मी काय करू की जेनेकरून मला ती जागा मिळेल.2001पासून मी ती जागा वापरतो याचा स्टम्प पेपर पुरावा सुद्धा आहे.. व मी त्या जागेवर कच्चा स्वरुपात बांधकाम पण केलय व आता गावपातळीवरील राजकारणी विरोधक ग्रामपंचायतीच्या साहाय्याने अतिक्रमण हटाओ च्या नोटीस देऊन धमकावत आहे तरी मी काय करू साहेब मार्ग सांगावा ही विनंती...
अतिक्रमित जागा देता येत नाही असे तहसीलदार यांनी आपणास कळवले आहे . त्यामुळे आपणास ती जागा मिळणार नाही . आपण ती जागा खाली करणे योग्य
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विजय भोई
03-04-2019
vijaybhoi007@gmail.com
सर शेती साठी नदी मध्ये विहीर खोदण्यासाठी नियम,gr, मार्गदर्शक सूचना आहेत का?
Question by हेमंत
02-04-2019
He69mant@gmail.com
नमस्कार साहेब,
जर 'अ ' हा व्यक्ती शेतकरी नाही परंतु 'अ ' या व्यक्तीचे वडीलांच्या नावे थोडी शेतजमिन आहे आणि ते दुसरया ईसमांकरवी शेती करतात. तर ' अ ' हा व्यक्ती स्वतःच्या नावे शेतजमिन खरेदी करू शकतो का ?
वडिलांकडे असलेली जमीन जर त्यांची वडिलोपार्जित जमीन असेल तर , अ व्यक्तीचा त्या जमिनीत जन्मताच हक्क / मालकी निर्माण होते . त्यामुळे तो व्यक्ती शेतकरी आहे . जमीन खरेदी करू शकेल
मात्र जर वडिलांची जमीन स्वकष्टार्जित असेल तर , अ या व्यक्तीचा त्या जमीनीत जन्मताच अधिकार निर्माण होत नाही . त्यामुळे ती व्यक्ती शेतकरी होऊ शकत नाही . सबब त्यास जमीनखरेदी करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by परशुराम भिकाजी अनसूरकर
02-04-2019
parshu50@hotmail.com
साहेब,आमच्या वडिलांना कुळकायद्याने जमीन मिळाली आहे.वडिलांच्या नंतर आम्हा भावंडांची नावे लागली आहेत. पण सादर जमिनीची अजून विक्री करून मिळालेली नाही . सादर कुळकायद्याची जमीन विक्री करून मिळण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल?
कृपया या बाबतीत आम्हाला योग्य मार्गदर्शन करावे ही आपणास आमची विनंती आहे
आभार
आपले संबंधित तहसीलदार / शेत जमीन न्यायाधिकरण यांचेकडे ३२ ग किंमत निश्चित करून मिळण्यासाठी अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रमेश भावे
27-03-2019
rameshbhave@hotmail.com
१. वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वाटपात कमीत कमी किती गुंठे जमिनीचा ७/१२ उतारा बानू शकतो? माझ्या नावे ८ गुंठे जागा येत आहे
२. जमिनी मोजणी अर्जा सोबत कोणती कागद पत्रे जोडावी लागतात ?
वरकस जमीन -२० गुंठे
भात शेती / एकपिकी - १५ गुंठे
बागायती - ५ गुंठे
उपरोक्त जमीन प्रकारानुसार , या पेक्षा जमीन कमी उरणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक .
८ गुंठे जागेवंगे स्वरूप काय आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rupesh vishwekar
26-03-2019
rupeshvishwekar@gmail.com
वर्ग2शेत जमिनीचे रजिस्टर willdeed करणेस permission लागते काय
Question by सागर
23-03-2019
sagarkandekar@hotmail.com
माझा प्रश्न - गट नं.238 ही जमीन नवीन अविभाज्य शर्तीची असून 'सक्षम अधिकाराच्या परवानगी शिवाय हस्तांतरणस बंदी' हा शेरा इत्तर हक्कात आहे.पूर्वी ही जमीन पुंजा नावाचं व्यक्तीची होती.पुंजा हा 1952 साली मयत झाला व त्याच्या दोन वारस मुलाचे नाव मोगल पुंजा आणि दादा पुंजा यांचे नाव 7 / 12 दिसू लागले.दादा पुंजा हा 1972 साली मयत होऊन त्याच्या 3 मुले ,2 मुली व पत्नी चे नाव वारस म्हणून लागले.2000 साली मोगल हा मयत होऊन त्याच्या 2 मुले व 2 मुली व पत्नी चे नाव वारस म्हणून लागले.आज मितील ह्या दोन्ही परिवारात कटुता असून त्याची वाटणी झालेली नाही व ही सर्व जमीन सामायिक क्षेत्र म्हणून 9 जणांचे नाव 7 / 12 ला आहे.माझा स्वतःचा गट 237 हा गट या 238 गट शेजारी असून मी हा गट विकत घेऊ इच्छितो व आज ती सर्व जमीन माझाकडे कासण्यासाठी असून कब्जा आमचाच आहे तर...
1.सामाईक वारसा पैकी दादा पुंजा चे 6 वारसा मला त्याचा 1/2 (अर्धा ) हिस्सा विकू इच्छिता तर मी ती जमीन खरेदी करू शकतो का?.
2.जिल्हाधिकारी 1/2 (अर्धा ) जमीन विक्री ची परवानगी देतील का?.
3.मागील 20 वर्षी पासून सदर जमीन कसतोय पण पिकपहानी मालकाची आहे तर मी पीक पाहनि कशी लावू अथवा सिद्ध करू शकतो.
4.आणेवारी करून घेण्या साठी काय करावे लागेल?
आपले उत्तर -
दादा पुंजयाची जमीन आपण परवानगीने खरेदी करी शकता ( तुकडे बंदी कायदा अधीन ) .
जिल्हाधिकारी परवानगी देतील
आपण पीक पाहणी लावली तर याचा अर्थ असा होतो कि मूळ मालक जमीन कसत नाही . त्यामुळे जमीन सरकार जमा होऊ शकते .
प्रश्न सर -
१.हे सर्व वारस एक मेक्याचे रक्ताचे नातेवाईक आहेत, जर मी त्यांना नोटिस न बजावत 1/2 क्षेत्र खरेदि केले तर ते (इतर वारस) न्यायालयात माझे 'हिंदू उत्तराधिकार अधिनियम , कलम 22 ' प्रमाणे खरेदी खत रद्द करण्याचा व तो 1/2 आम्ही घेण्यास तयार होतो असा दावा टाकू शकता का?
Question by poorva
22-03-2019
poorva.wadke@yahoo.com
नमस्कार सर ,तलाठी व मंडळ अधिकारी ला पत्र लिहायचे आहे .न्यायालयात चालू असलेला दावा वादी ने न चालविल्याने रद्द करण्यात आला आहे तर सात बारा वरती असलेली दाव्याची नोंद रद्द करण्याकरिता.
Question by अजय पाटोळे
04-02-2019
ajaypatole.ap@gmail.com
सर 1980 साली शासनाने प्लॉट करून जागा वाटप केल्या होत्या लोकांना राहण्यासाठी परंतु खुली जागा होती म्हणून एक प्लॉट वर 1987 साली ग्रामपंचायतीने राहण्यासाठी ती जागा आम्हाला दिली होती राहण्यासाठी.पण ती जागा सिटी सर्व्हे ला (7/12) दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर आहे.आम्हाला माहिती पण नाही ती व्यक्ती कोण आहे उताऱ्यावर च नाव फक्त माहिती आहे तरी आम्हाला दुसरीकडे कुठेच जागा नाहीये व या जागेचा 7/12 वर आमचं नावं नोंद करायचे आहे त्यासाठी काय करावं लागेल योग्य ते मार्गदर्शन करावे???
शासनाकडून हि जागा आपणास मिळणार नाही
परंतु या जागेवर आपले अतिक्रमण नियमानुकूल करता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पाबळे रोहिदास सखाराम
04-02-2019
rohidaspable@yahoo.in
महार वतन जमिनीची शर्तभंग झाली असल्यास नियमित करण्यासाठी काय करावे लागेल
Question by श्रेयस रामचंद्र जोशी.
03-02-2019
shreyasrjoshi26@gmail.com
नमस्कार,
देऊळ, ट्रस्ट, देवस्थान, मंदिराच्या जागांना कुळ लागतात का ? कुळ लागली असतील पण त्यांना काढायची असतील तर काय करावे लागेल ?
देवस्थान जमीन ला कुल लागू शकतो
मात्र त्याचे नावे विक्री होऊ शकत नाही
देवस्थान जमीन स्वतः कसण्यासाठी अशी जमीन काढून घेऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sharmila
01-02-2019
shardha12@yahoo.com
mi X kadun jamin vikat ghetli, sale deed register kele. X ya navane 7/12 hota. pan mazya navavar 7/12 zala nahi, jamin ni.sa.pra. aslyache karan denyat aale. aata X sahkary karat nahi, tar aata mazya kade kay paryay aahet ?
आपण शेतकरी आहेत का ? आपण जर शेतकरी असाल तर नवीन सुधारणा कायदयानुसार आपला व्यवहार दंड भरून नियमानुकूल करता येईल .
जमीन कोणत्या गावी/ तालुक्यात/ जिल्ह्यात आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandeep Awalekar
29-01-2019
sandeepawalekar@gmail.com
तलाठ्यांनी वसुली रकम जवळ ठेवण्याची मर्यादा बाबत शासनादेश असल्यास कृपया माहीती द्यावी
Question by रामदास झिम्ब्रे
24-01-2019
ramdaszimbare@ yahoo.com
सातबारा वरती जर नाव वर्णाक्षरे ने चुकीची असतील तर कुठे तक्रार करावी?
Question by अमोल चव्हाण
24-01-2019
amol.chavan25@rediffmail.com
साहेब नमस्कार
माझा प्रश्न आहे की माझ्या वडिलांनी माझ्या आत्याला २००४ साली निबंधकाकडे जाऊन रजिस्टर मृतुपत्र केले आहे,ते मृतुपत्र माझ्या नावावर आहे हे मला माहित नव्हते,आत्या २०१७ साली मयत झाली तेव्हा मला कळले ,मृत्यूपत्र तलाठी यांच्याकडे नोंदीला दिले तलाठी यांनी नोंद घाली आहे ,पण ७/१२ वर नोंद घालत असताना वारसांना कळले त्यांनी कोर्टात दावा दाखल केले आहे आणि मी मृतुपत्र पहिले असता मृत्यूपत्र करताना मृतुपत्रा मध्ये काही चुका झाल्या आहेत त्या म्हणजे १) दोन साक्षीदार आमच्या गावाचे आहेत पण त्यांचे पत्ते चुकीच्या गावाचे टाकले आहेत
२) साक्षीदार व मृतुपत्र करणारी माझी आत्या यांची दस्ताला ओळखीसाठी कोणतीही कागदपत्रे जोडली नाहीत
3) मृतुपत्र करतेवेळी आत्याचे ७५ वय झाले होते,मृतूपत्राला डॉक्टरांचा मेडिकल आणि फिजिकल फिटनेस दाखला जोडला नाही,
3) आत्याने माझे नावे मृतुपत्र करण्याचे कारण आत्याला मुल बाल नाही,व आत्याची मृतुपत्रातील इच्छा मरेपर्यंत सांभाळ सेवा चाकारी करणार म्हणून केले होते ,परंतु आत्या तिच्या सासरी असल्याने मी तिचा सांभाळ, सेवा दवाखाना केली नाही ,मृतुपत्र रजिस्टर आहे, परंतु आत्याच्या वारसदाराना मृतु पत्राबद्द्दल माहित झाले असल्याने त्यांनी कोर्टात दावा दाखल केला आहे,हे मृतुपत्र कोर्टात चालेल का ,मी पुढील कायदेशीर कार्यवाही काय करू शकतो कृपया मार्गदर्शन करावे हि आपणास विनंती
Question by प्रशांत बालाजी केंद्रे
23-01-2019
pkendre232@gmail.com
मी लहान असताना आजोबांनी काही जमीन माझ्या नवे केली आहे परंतु त्या वेळी ती जमीन टोपण नावाने सातबाऱ्यावर नोंदवली गेली... सध्या सर्व शासकीय कागदपत्रे माझ्या चालू नावावर आहेत फक्त सातबारा टोपण नावे आहे तर ते नाव दुरुस्ती कशी करावी
Question by Sushil Karnade
21-01-2019
Sushi.karnade@gmail.com
Bhogwatdar warg 2 jamin vidharbha prane sampurna rajyat warg 1honyachi kiti shakyata आहे
Question by रवींद्र रामभाऊ गोळेसर
20-01-2019
ravindra.golesar@rediffmail.com
मा. श्री. पाणबुडे सर , तक्रार रजिस्टर भरल्यानंतर किती दिवसा मद्ये निकाल दिला पाहिजे , निकाल देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत असेल तर कायकरावे संबधीत अधिकारी पुढची तारीख देत नाही व निकालही देत नाही कृपया आपले मार्गदर्शन व्हावे हि नम्र विनंती.
कायदाची मर्यादा १ वर्षाची आहे .
मात्र शास्नानाने परिपत्रकाद्वारे ती मुदत कमी केली आहे
३ मानण्यात निकाल देणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शुभम मोरे
18-01-2019
santoshpmore9@gmail.com
खरेदी खत नोंदणी प्रत मागणी केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी पुस्तक प्रतीमध्ये नोंदणी सुरु तारीख आणि अंतिम पानावर नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये प्रथम पानावर व अंतिम पानावर नमूद रजिस्ट्रार सही दोन वेगळ्या रजिस्ट्रारची आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये जमीन देणाऱ्याची सही नसून तेथे अंगठ्याचा ठसा असा शिक्का आहे तेथे अंगठ्याचा ठसा लावलेला नाही . तसेच खरेदी देणार इसम सही करत होता व तो मयत आहे . सदर खरेदी १९६८ ची आहे
१) वरील खरेदी खत बोगस इसम नेऊन केली असेल का ?
२) नोंदणी सुरु तारीख आणि नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप का असेल ?
Question by अमित दवाणगावे
18-01-2019
d_amit29@yahoo.com
सर मला ज़िला अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कलाम ३१ अ निर्यणाया निकाल विरुद्ध अपील करावयाचे आहे त्याबद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती .
Question by Sarang
07-01-2019
Sarangalone@rediffmail.com
अम्हला देवास्तन ची 30 अकर जमिन खरेदी ची 2008 मधे धर्मदय आयुक्त ची परवानगी मिढली होती पण ट्रस्टी ने पुर्ण रकम घेऊण फक्त 25 अकर च जमिन खृरेदी करुण दिली 5अकर जमिन खरीदी चे आश्वासन दिले होता पण खरीदी करुण दिली नाही तया मुडे 5 अकर साथी अम्ही कोर्ट मधे केस केली आहे आम्हला 5 अकर जमिनिची खरीदी ची ऑर्डर मिढल काय?आज 07/1/2019 कोर्ट-कचहरी चालू आहे
आपण ३० एकर जमिनीचा साठे करार केला होता का ? आपण कोणत्या आधारे उर्वरित ५ एकर जागा देव्स्ताहन विश्व्स्तांनी आपणास द्यावी याचा दावा करत आहेत ? कोणता दस्त आपणाकडे आहे ? त्यावर अवलंबून आहे . आपले २५ एकराचे दस्त मध्ये ३० एकर जमिनीचे पैसे मिळाले बाबत देवस्थान विश्वस्तांनी नमूद केले आहे का ?
विश्वस्तांना ३० एकर जमिनीचे पैसे मिळाले बाबत आपण सिद्ध करू शकला तर , आपणास उर्वरित जमीन विश्वस्तांनी विक्री करून द्यावी या बाबत न्यायालय आदेश देऊ शकेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शुभम मोरे
07-01-2019
santoshpmore9@gmail.com
खरेदी खत नोंदणी प्रत मागणी केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी पुस्तक प्रतीमध्ये नोंदणी सुरु तारीख आणि अंतिम पानावर नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये प्रथम पानावर व अंतिम पानावर नमूद रजिस्ट्रार सही दोन वेगळ्या रजिस्ट्रारची आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये जमीन देणाऱ्याची सही नसून तेथे अंगठ्याचा ठसा असा शिक्का आहे तेथे अंगठ्याचा ठसा लावलेला नाही . तसेच खरेदी देणार इसम सही करत होता व तो मयत आहे . सदर खरेदी १९६८ ची आहे
१) वरील खरेदी खत बोगस इसम नेऊन केली असेल का ?
२) नोंदणी सुरु तारीख आणि नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप का असेल ?
खरेदी देणाऱ्याची सही नसेल मात्र , अंगठा आहे का ? असल्यास खरेदी खत वैध आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
