जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by नितीन नळेगावकर
22-05-2019
avidalaji@rediffmail.com
मी crpf मध्ये सेवारत असून मला कसण्यासाठी शासकीय जमीन मिळण्यासाठी आवश्यक बाबी बाबत मार्गदर्शन करावे
महाराष्ट्र जमीन महसूल ( शासकीय जमिनीची विल्लेवाट लावणे ) नियम १९६९ नुसार , व्यक्तीच्या नावे जमीन नसल्यास ( असल्यास २ हे पेक्षा कमी आहे तर , देण्यात येणारी जमीन २ हे पर्यंत त्याचे धारण क्षेत्र होईल त्या मर्यादेत ) जमीन देता येते . आपल्या वास्तवाच्या ठिकाणापासून ८ किलोमीटर परिसरात आपणास जमीनदेण्यात येते
आपण आपले क्षेत्राच्याबी जिल्हाधिकरी यांचेकडे अर्ज करा . तत्पूर्वी तहसील कार्यालयात जाऊन लँड बँक मधून , उपलब्ध व निर्बद्ध रित्या वाटपास उपलब्ध जमिनीची माहिती घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Prafull jadhav
22-05-2019
prafullj16795@gmail.com
नमस्कार सर
माझ्या आजोबांना सन १९४३ साली त्यांच्या भावाने नजर गहाण खताद्वारे आम्हास 50 आर क्षेत्र लिहून दिले होते सदरचा दस्त विना रजिस्टर आहे तलाठी साहेबांनी त्या गहाण खताचा फेरफार मंजूर केला ७/१२ सदरी सण १९४३ साली आमच्या आजोबांचे नाव इतर अधिकारात लागले असून आज तागायत आहे ... ते नाव अधिकारात येईल का ? ते इतर अधिकारातील नाव अधिकारात आणण्यासाठी काय करावे , किंवा ७/१२ सदरी अधिकारात नाव येण्यासाठी काय करावे ? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
आजोबांचे भावाने आजोबांना काही क्षेत्र गहाण खताने दिले . मात्र त्या बदल्यात आपल्या आजोबांनी काही पैसे त्यांच्या भावांना दिले असतील .आपले चुलत आजोबांनी त्यांना दिलेले पैसे परत केले आहेत का ?
आपणास आपले आजोबांनी , चुलत आजोबांना दिलेले पैसे परत मिळण्यासाठी दिवाणी दावा दाखल करावा लागेल . जर चुलत आजोबा अथवा त्यांचे वर्षांनी पैसे परत केले नाहीत तर , आपले नावे जमीन होईल अन्यथा आपले नावे जमीन होणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Balajisawant
21-05-2019
Balajisawant927@gmail.com
सर माझ्या वडिलांनी गावठाण मधील एक जागा खरेदी केली त्याची खरेदी नोंदणी रजिस्टर कार्यालयात झालेली आहे जागा खरेदी करुन 20 वर्षे झाले परंतु खरेदी करतेवेळी त्या खरेदीदस्तावर सिटी सर्व्हे नंबर टाकण्यात आला नसल्यामुळे आजही सिटी सर्व्हे ला मुळ मालकाच्या नावे नोंद आहे मी त्या सिटी सर्व्हे कार्यालयात वडिलांच्या नावाने नोंद लावण्यासाठी गेलो असता मला त्यांनी डबल नविन खरेदीदस्त बनवण्यास सांगितले आहे वडिलांच्या नावे नोंद करण्यासाठी काय करावे
गावठाणाचा सिटी सर्वे झाला असेल तरच , गावठाणातील जमिनींना , CTS नंबर असतो . अन्यथा गावठाणातील जमिनीला CTS नंबर नसतो .
सल्ला दिल्या प्रमाणे , दुरुस्त खरेदी खत करावे लागेल . म्हणजे नवीनच खरेदी खत करावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश वाघमारे
19-05-2019
yograjwaghmare@gmail.com
नमस्कार सर,
नमस्कार सर,
माझ्या आजोबांची २१ एकर जमीन होती, आजोबांनी १९६९ साली १० एकर २० गुंठे जमीन एका व्यक्तीला विकली, त्या व्यक्तीने त्याच्या ३ मुलांना समान वाटणी केली, प्रत्येकी ३ एकर २० गुंठे.
पैकी एका मुलाचा वाटा माझ्या वडिलांनी व २ चुलत्यांनी मिळून १९९४ साली विकत घेतला, आता आम्हाला एकूण जमीन १४ एकर झाली विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व आजोबांची वडिलोपार्जित १० एकर २० गुंठे व नंतर १९९६ साली माझ्या वडिलांचे व चुलत्यांचे जमिनीची समान वाटणी झाली पण माझ्या वडिलांच्या वाट्याला विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व आजोबांची वडिलोपार्जित १ एकर २० गुंठे अशी एकूण ५ एकर जमीन वाट्याला आली. वडील थोरले असल्याने शेवटी वाटणी उचलावी लागल्याने जमीन थोडीशी हलकी म्हणून ५ एकर, दोन नंबर चुलता अपंग आहे, एक हात ज्वारी करायच्या मशीन मध्ये गेल्यामुळे त्याला तालीच्या पोटातील भारी जमीन व वाड्यात हिस्सा म्हणून ४ एकर, तीन नंबर चुलता लहान असल्याने त्याला किराणा दुकान म्हणून ५ एकर. (यात हलकी / भारी जमीन, राहता वाडा व किराणा दुकान यांच्या वाटणीमुळे क्षेत्र कमी जास्त)
पण ७ / १२ उतारावर ५ एकर जमीन बरोबर दिसत आहे. पण इतर हक्कात ३ आत्या व आजी यांची नावे आहेत.
मला वाटते नियमाप्रमाणे फक्त १ एकर २० गुंठे वरच म्हणजे वडिलोपार्जित जमिनीवरच इतर हक्कातील नावे पाहिजे पण ती उताऱ्यावर सर्व क्षेत्रात दिसत आहेत कारण वडिलांच्या वाट्याला आलेली विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व वडिलोपार्जित १ एकर २० गुंठे यांचा गट नंबर एकच आहे. तर ३ एकर २० गुंठे व १ एकर २० गुंठे याचा गट फोडता येईल का व त्यांची नावे ३ एकर २० गुंठे वरून कमी करता येतील का.
पण अजून एक अडचण आहे आजी मयत झाली आहे, त्यांमुळे आजीच्या इतर वारसांना म्हणजे दोन चुलत्यांना इतर हक्कातील नावे कमी करताना बोलवावे लागेल का ?
मी १९९७ साल चा फेरफार काडून पहिला आहे त्यात तिघांची समान वाटप व क्षेत्र दिसत आहे.
कृपया मार्गदर्शन करावे
Question by तुकाराम रावसाहेब राहिंज
16-05-2019
tukaramrahinj@gmail.com
आदरनीय सर, माझ्या जमिनी च्या बांधालगत च्या शेजार्याने अवैध रित्या माती उचलली व तिची विक्री केली आहे व माझा बांध फोडला आहे .तरी यावर काय कारवे लागेल.
अवैध्य रित्या माती उचली आहे म्हणजे माती चा वापर कोठे केला आहे ?
त्याचेच शेतात केला असल्यास , तो दंडनीय कारवाईस पात्र होत नाही .
आपला बांध फोडला आहे , त्याचेकडून नुकसान भरपाई मागा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दीपक तळेकर
16-05-2019
djt07@rediffmail. com
Sir, date 10-05-2019 The Bombay High Court granted probate on 09/01/2019 with reference to will. In said will executor was appointed. Can executor, on the basis of probate order, submit the application to the concerned Tahsildar/Talathi for adding the name of legal hairs as mentioned in will ? if so, a] in this case can you specify the list of other documents required ? b] specific time limit prescribed to add the names in 7/12 for concerned Talathi ? c] if the said time limit is not followed by the Talathi then who is the higher authority to take up the matter ? Sir, will you like to reply by mail to my mail id i.e. djt07@rediffmail.com Thanking in anticipation regards Deepak
Executor has to apply to Talathi / Tahsildar to mutate the 7/12 in the name of beneficiary. 15 days is the mandatory period for mutation . You can take up this matter to Tahsildar or District Collector .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नरेंद्र शिवदास शिंदे
16-05-2019
Vickysss40@gmail.com
आदरणीय सर / मॅडम
शेती बक्षीसपत्र / दानपत्र केल्यास 7/12 मध्ये नाव येऊ शकते का ??
Question by Gajanan
16-05-2019
gajananp8910@gmail.com
सर मला शिवरस्ते विषयी माहिती हवी आहे
1) सर शिव रस्ते हे सर बांधावरून असतात का
2) शिव रस्त्या वर 3 डेपनी आहेत त्या डेपनी (मातीच्या मोठे बांध )मध्ये काही अंतर आहे ते अंतर किती असते
3)शिवरस्ते सर बांधावरून4 फूट -4फूट असा देता येतो का पण डेपनी असताना
4) पूर्वी ब्रिटीश काळात डेपनी मधून शिव रस्ते होते का
5) काही जन म्हणतात कि डेपनी मधून8 फूट रास्ता असतो ते बरोबर आहे का
Question by नरेंद्र शिवदास शिंदे
16-05-2019
Vickysss40@gmail.com
आदरणीय सर/मॅडम
बक्षीसपत्र/दानपत्र केलेली शेती ची नोंद 7/12 मध्ये होऊ शकते का ? कृपया मार्गदर्शन करावे
Question by श्री.आल्बर्ट रूपजी धोधडे
10-05-2019
albertdhodade21@gmail.cpm
आमच्या वडीलांची स्वतंत्र मिळकत आहे. सदर मिळकत एकूण क्षेत्र 3.29.0 हे.आर एवढी आहे. मिळकत अजूनही वडीलांच्या नावावर नाही
या मिळकतीची वारसाना वाटणीसाठी काही नियम आहे का?
मिळकत वडिलांची स्वकष्टर्जित असेल तर , वडिलांचे इच्छेनुसार , त्याची विक्री / विल्हेवाट ते लावू शकतात . वडील मयत झाल्यावर , व्ययक्तिक वारसा कायद्यानुसार वारसांची नावे दाखल होतील
मिळकत वडिलोपार्जित असेल व वडिलांचे हयातीत वाटप करायचे असल्यास , वडील व इतर वारस , अश्या सर्व वारसांना प्रत्येकी एक हिस्सा या प्रमाणे वाटप होईल
उदा
वडील व त्याना २ मुले व एक मुलगी आहे तर प्रत्येकी १/४ हिस्सा या प्रमाणे वाटप होईल . मात्र वडील मयत झाले तर , २ मुले , १ मुलगी व आई हयात असेल तर आईस या प्रमे प्रत्येकी १/४ हिस्सा मिळेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
03-05-2019
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर, बिनशेती मोजणी करून कजाप.प्लॉट नुसार विभागणी करून भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्राप्त.झाला आहे.जमिनीचे विनिश्चीतीकरण झाले असून त्यानुसार बिनशेती चलन भरले आहे.सदर ठिकाणी अंशतः विकास परवानगी मिळाली आहे.त्यामुळे बिनशेतीची इतर हक्कात नोंद घेता येत नाही असे मा.तलाठी यांचे म्हणणे आहे.तर ७/१२ सदरी कजाप.नुसार प्लॉटिंग नुसार वेगळे ७/१२ तयार करता येतील का?आकारणी केव्हा करता येईल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.बिनशेती नोंद करण्या अगोदर कजाप.ची नोंद घेता येऊ शकेल का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
आपणास आकार फोड पत्रक म्हणायचे आहे , कजाप नाही . जो पर्यंत आकारफोड पत्रक येत नाही तो तोपर्यंत बिनशेती नोंद व आकारणी ७/१२ वर करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भुजंगराव संजय कोकणे
29-04-2019
kokanebhujangrao112@gmail.com
नमस्कार सर
माझ्या आजोबांना 1974-74 मध्ये धरणग्रस्त म्हणून 5000 चौ फूट प्लाॅट मिळाला होता. सिटी सर्वे 1987 ला झाला आहे. त्यानंतर 1994 मध्ये आजोबांनी 1200 चौ फूट जागा भावकीतल्या व्यक्तीला विकली. परंतू खरेदीखत जिल्हाधिकारी किंवा कोणत्याही सक्षम अधिकाय्राची पूर्वपरवानगी न घेता झाल होत. खरदीखतावर सिटी सर्वे चा नंबरही नाही व सिटी सर्वे चा किंवा ग्रामपंचायतीचा उताराही जोडला नव्हता. तसेच खरेदी घेणाराची सही किंवा अंगठासुद्धा नाही.
1994 पासून आजपर्यंत(2019) खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद नाही.
आजोबा 2011 वारलेत व नंतर 2016 मध्ये वडिलांनी 5000 चौ फूट जागेवर वारस(4 वारस वडील, चुलते व दोन आत्या) नोंद करून घेतली.
जागा वारसाने मिळाल्यामुळे वारस त्यांचा हक्क सोडत नाहीत. तर वारसांची संमती नसताना खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद होईल का? वारसांची संमती नसताना 25 वर्षापूर्वीच्या खरेदीखतावरून खरेदी घेणाराची नोंद करण्याचा अधिकार उप-अधीक्षक भूमि अभिलेख यांना आहे का?
पूर्वपरवानगी न घेता केलेलं खरेदीखत रद्द होत का? रद्द होत असेल तर ते कोणाकडे रद्द करून मागाव लागेल?
1994 ला खरेदीखतावरून खरेदी घेणाराची 1200 चौ फूट जागेची नोंद ग्रामपंचायत नमुना 8 ला झाली.
त्यानंतर 1998-2002 या काळात (खरेदी घेणाराने ) कोणत्याही दस्त, अर्ज किंवा ठराव याचा उल्लेख(शेरा) न करता 1200 चौ फूट नोंद 2500 चौ फूट अशी बोगस वाढवून घेतली. हे 2016 मध्ये आमच्या निदर्शनास आले. तर बोगस वाढवलेले क्षेत्र कमी करून मिळेल का?ते कमी करण्यासाठी कुणाकडे अपील कराव लागेल?
खरेदी खत रद्द करून मागितल्यावर धरणग्रस्ताने मिळालेला प्लाॅट सरकार गोठवेल का?
१. ज्या आदेशाने आपल्या आजोबांना भू खंड मिळाला , त्या आदेशामध्ये भूखंड विक्री बाबत काही निर्बंध आहेत का ? जर निर्भेड असतील तरच , जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे .
२. खरेदी खत नोंदणीकृत नाही , त्या वर सिटी सय्र्वेय नंबर नाही , तर त्याचा अंमल मिळकत पत्रिकेवर उप अधीक्षक तसेच ग्राम पंच्यात यांनाही घेता येणार नाही
३. ग्राम पंचायतचे आदेश विरुद्ध गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भुजंगराव संजय कोकणे
29-04-2019
kokanebhujangrao112@gmail.com
नमस्कार सर
माझ्या आजोबांना 1974-74 मध्ये धरणग्रस्त म्हणून 5000 चौ फूट प्लाॅट मिळाला होता. सिटी सर्वे 1987 ला झाला आहे. त्यानंतर 1994 मध्ये आजोबांनी 1200 चौ फूट जागा भावकीतल्या व्यक्तीला विकली. परंतू खरेदीखत जिल्हाधिकारी किंवा कोणत्याही सक्षम अधिकाय्राची पूर्वपरवानगी न घेता झाल होत. खरदीखतावर सिटी सर्वे चा नंबरही नाही व सिटी सर्वे चा किंवा ग्रामपंचायतीचा उताराही जोडला नव्हता. तसेच खरेदी घेणाराची सही किंवा अंगठासुद्धा नाही.
1994 पासून आजपर्यंत(2019) खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद नाही.
आजोबा 2011 वारलेत व नंतर 2016 मध्ये वडिलांनी 5000 चौ फूट जागेवर वारस(4 वारस वडील, चुलते व दोन आत्या) नोंद करून घेतली.
जागा वारसाने मिळाल्यामुळे वारस त्यांचा हक्क सोडत नाहीत. तर वारसांची संमती नसताना खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद होईल का? वारसांची संमती नसताना 25 वर्षापूर्वीच्या खरेदीखतावरून खरेदी घेणाराची नोंद करण्याचा अधिकार उप-अधीक्षक भूमि अभिलेख यांना आहे का?
पूर्वपरवानगी न घेता केलेलं खरेदीखत रद्द होत का? रद्द होत असेल तर ते कोणाकडे रद्द करून मागाव लागेल?
1994 ला खरेदीखतावरून खरेदी घेणाराची 1200 चौ फूट जागेची नोंद ग्रामपंचायत नमुना 8 ला झाली.
त्यानंतर 1998-2002 या काळात (खरेदी घेणाराने ) कोणत्याही दस्त, अर्ज किंवा ठराव याचा उल्लेख(शेरा) न करता 1200 चौ फूट नोंद 2500 चौ फूट अशी बोगस वाढवून घेतली. हे 2016 मध्ये आमच्या निदर्शनास आले. तर बोगस वाढवलेले क्षेत्र कमी करून मिळेल का?ते कमी करण्यासाठी कुणाकडे अपील कराव लागेल?
खरेदी खत रद्द करून मागितल्यावर धरणग्रस्ताने मिळालेला प्लाॅट सरकार गोठवेल का?
कोकणे साहेब
आपले आजोबांना भूखंड मिळाला होता त्याप्रमाणे त्यांनी तो आपल्या भावकीतील एका इसमास विक्री केला . ग्राम पंचायत अभिलेख सदरी घेणारच नाव लागले . तथपि अद्याप मिळकत पत्रीकेस नाव लागले नही . ताबा मात्र घेनारचेकडे आहे . ज्या आदेशाने भू खंड प्रदान करण्यात आला त्या मध्ये , हस्तांतर करण्यापूर्वी , जिल्हाधि यांची परवानगी आवश्यक आहे असा अट होती का ? जर अशी अट असेल तर , खरेदी खत रद्द होणार नाही मात्र , त्याचे नाव मिळकत पत्रीकेस लागणार नाही . मात्र जर अट नसेल , तर त्याचे नाव लागण्यास काही अडचण नसावी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Gajanan
27-04-2019
gajananp8910@gmail.com
सर माझे शेत दोन गावच्या शिववर आहे शिवरस्त्याची मागणी आहे शिववर 3 डेपनी(मोठे मातीचे बांध)तिन्ही बाजूस आहेत 3डेपनी मध्ये अंतर आहे
1)डेपनी मध्ये किती अंतर असते त्यातुन रस्ता असतो का
2)डेपनी असताना शिववरुन रस्ता कुठून देता येतो
3)शिववरच्या बांधाला सरबांध म्हणतात का
4)डेपनी कस्यासाठी असतात त्याचे महत्व काय
5)शिववरुन 4-4 असा सरबंधाने डेपनी असताना रस्ता देता येतो का
6)प्रत्येक शिववरुन रस्ता पूर्वी पासून असतोच का
7)काही माणसे म्हणतात ब्रिटिश काळापासून डेपनी मधून शिव रस्ते असतात /मग प्रत्येक शिववर रस्ता असतो का व् तो किती असतो
8)तहसीलदार याना शिवरुन कसा रस्ता देता येतो
Question by संदीप यादव
21-04-2019
sysandeepyadavy.1995@gmail.com
सर,
1980-82 साली खरेदी केलेली जमीन च खरेदी खत पुणे जिह्यातील कोणत्या कार्यलयात काढता येतील.
दुसरा प्रश्न
सातबारा मध्ये नावात बदल झाला असेल(म्हणजे आधी शेषराव होते की ते बरोबर आहे पण आता ऑनलाइन ते शेष असे झाले आहे.)आधी ऑनलाइन तसेच हस्तलिखित उतारा यावर शेषराव असे बरोबर लिहिलेले दोन्ही उतारे आहेत. यात दूरुस्ती कशी करायची
धन्यवाद!
१. एवढे जुने खरेदी खत मिळणे अवघड आहे . आपण संबंधित दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात अर्ज करा
२. तहसीलदार यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अरुण राजाराम जायकर
21-04-2019
arunjaykar@gmail.com
नमस्कार सर,
वडिलांच्या मृत्यूनंतर आई, मी व भावंडांची वारसनोंद केल्यानंतर तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून कोणकोणती कागदपत्रे, दाखले व उतारे घ्यावेत व त्यामधून कोणकोणत्या बाबींची खातरजमा करावी याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
धन्यवाद.
... अरुण जायकर.
Question by रोहिदास सखाराम पाबळे
18-04-2019
rohidaspable@yahoo.in
नमस्कार सर ३२ ग चे सर्टिफिकेट आमच्याकडे नाही ७/१२ वर इतर हक्कात जमीन मालक यांना जमिनीची रक्कम ३३७८ तारीख १/१०/१९६३ पासून वार्षिक १० हप्त्यात मिळाली आहे असा शेरा इतर हककात आहे सदर त्याबाबतच्या पावत्या आहे तरी सदर भोगवटा वर्ग२ व इतर हक्कातील शेरा कमी करण्यासाठी काय करावे लागेल
आपले तहसील / शेत जमीन न्यायाधिकरण कार्यालयात जाऊन ३२ मी प्रमाणपत्र ( जमिनीचे हप्ते भरले बाबत ) घ्या . त्या आधारे तलाठी इतर हक्कातील हि नोंद कमी करतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास सखाराम पाबळे
17-04-2019
rohidaspable@yahoo.in
११ आर जागा २००६ मध्ये ११ जणांच्या नावे घेतली आहे सादर व्यवहार तुकडेबंदी विरुद्ध असा शेरा इतर अधिकारात आहे नवीन सुधारणेनुसार किमतीच्या २५ % रक्कम भरण्याबाबत काही परिपत्रक अथवा जि आर आहे का ते मिळावे हि विनंती
कायद्यात सुधारणा झाली आहे . महाराष्ट्र शासनाचे संकेत स्थळावर सुधारणा कायदा प्रत आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by क्षितिजा
15-04-2019
kshitija1020@gmail.com
खुल्या प्रवर्गातील लग्न झालेल्या महिलांसाठी NCL प्रमाणपत्र काढण्यासाठी तिच्या आई वडील कि नवरा यापैकी कोणाचे उत्पन्न धरण्यात येते? तसेच महिला स्वत: नोकरी करत असेल तर तिचे पगारापासून मिळणारे उत्पन्न कुटुंबातील उत्पन्नाच्या तपशील मध्ये पकडण्यात येते का ? कुटुंबातील उत्पन्नाच्या तपशीलामध्ये कशाकशाचा समावेश होतो याबद्दल मार्गदर्शन करावे,
१. आई व वडील
२. आई -वडील यांचे वेतन व शेती पोंसून मिळणारे उत्पन्न सोडून , सर्व बाबी उत्पन्नात येतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by समाधान नाना साबळे
15-04-2019
samadhansabale96@gmail.com
उपजिल्हाधिकार्याची कार्य किंवा उपविभागीय अधिकाऱ्याची कार्य
Question by Sagar Dadaso Yedage
14-04-2019
yedagesagar@gmail.com
मा.सर.....आमच्या 7/12 मध्ये तिन व्यक्तिंची नावे आहेत.
तिन्हीं व्यक्तींच्या नावे 2 हेक्टर समाईक क्षेत्र असुन त्याचा 8अ हा तिघांच्या नावे 2हेक्टर जमिनीचे क्षेत्र समाईक दाखवत आहे.....
मला व्यक्ती नं.ऐकाच्या नावे 80आर क्षेत्र...व्यक्ती नं.2 च्या नावे 80आर व व्यक्ती नं.3च्या नावे 40आर आशी वाटनी पत्र करायचे आहे...तिन्ही व्यक्ती एकाच घरातले आहेत.....वाटणीपत्र कसे...व कोठे करावे....कमी खर्चात....
Question by Sadik
13-04-2019
Sadik11m@rediffmail.com
सर crpc 133 अंतर्गत अर्जामध्ये स्वतःचे नाव नमूद न करता अर्ज sdm ला पाठविल्यास ते त्या public nuisance वर कारवाई करू शकतात का ते पण नगर पंचायतीच्या विरुद्ध
Question by RAMESH
12-04-2019
rameshpawar9049@gmail.com
नमस्कार सर, वीस (20) वषॉपुवी सदरील कब्जेदाराकडुन व त्याच्या मालकी हक्कामध्ये असलेली दोन(2) एकर जमिन खरेदी खत करुन विकत घेतली होती परंतु आता पुविच्या मुळ मालकाने महसुली विभागात अपिल करुन आमच्या नावे असलेला फेरफार कमी केला व त्याच्या नावे फेरफार मंजुर करुन घेतला व आता जमिनीवर हक्क मागतो तर त्याच्यावर काय कायॅवाही करावी, व न्याय कुठे मागावा ,याबद्दल सर योग्य मागॅदशॅन करावे .
प्रांत अधिकारी यांचे आदेश विरुद्ध , अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Anuradha patil
07-04-2019
Anurodhpatil1996@gmail.com
सर, आमचे मुंबई हायकोर्टमध्ये 1951 ला अपिल होते तो निकाल आमुच्यासारखा झाला आहे व सर्वे नंबर ला तिघाची नाव समान क्षेत्राला आहेत प्रत्येकी एक चतुर्थ अंश 135 गुंठे प्रत्येकाला आहे परंतू सर्वे नंबर नंतर एकत्रीकरण ज्यावेळी झाले त्यावेळी ' ' एका भावाला182 आर दुसऱ्याला132 आणि तिसऱ्या भावाला99आर नुसते आहे, एकत्रीकरण मध्ये कोणतेही जाब जबाब नाहीत तीच चुक गट नंबर तीन पडले त्यातही झाले, परंतु भुमिअभिलेख मध्ये विचारले असता ते साहेब म्हणतात की ही पहिल्यावहिवाटीनुसार मोजणी झाली आहे, गट नकाशाही चुकीच्या क्षेत्रानुसार झाला आहे मग क्षेत्र परत सर्वे नंबर सारखे होन्यासाठी काय करावे लागेल साहेब मार्गदर्शन करा | प्लिज.6
एकत्रीकरण योजना झाल्यानंतर , आपण झालेल्या चुकीबाबत पुनरिक्षण अर्ज दाखल करू शकला असता . आता तो कालावधी संपलेला आहे . आता काही करता येणार .
समान क्षेत्र करण्यासाठी , क्षेत्राची विक्री आपापसात करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Nitinkumar Y.Mahale
07-04-2019
nitinmahale389@gmail.com
सर नमस्कार.
आजोबांची शेतजमीन आहे,भुमिअभिलेख एकत्रीकरनाचा सन 1971 ला शेजारचा खातेदाराचा व आजोबांचा काही संबध नसतांना देखील एकत्रीकरणने दोघांचे सातबारे सामाईक करुन दिले आहेत,सातबारा वेगळे करणेकामी भुमिअभिलेख कार्यालय,तहसिलदार सो.तहसिल कार्यालयाला भरपुर अर्ज करुन देखील दाद मिळाली नाही,तरी यावर आत्ता पुढे काय पाऊल टाकावे याचे आपन योग्य मार्गदर्शन करावे हि विनंती...
धन्यवाद,,,
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
