जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

ता.तुळजापूर गावहद्दीतील गट नंबर - १९१ मध्ये माझ्या वडीलांची पिढीजात विहिर आहे .१९१ गटाच्या सातबारा सदरी माझ्या वडीलांचा हिस्सा (०.८) बाबू गरड (०.८) असून सदर सातबारा रमेश बाबू गरड ,सुरेश बाबू गरड,सतिश बाबू गरड यांचे नावावर असून सदर विहरीसाठी माझ्या वडीलांनी गट नं - १९२ मधील १० गुंठे जमीन त्यांना विहीरीचा मोबदला म्हणून दिला आहे .विहरीचा
अर्धा हिस्सा अर्धा खर्च गेली ४० वर्षे माझ्या वडीलांचा असून तो आम्ही ४० वर्षे वापरत आहोत .पण राजकारणी लोकांच्या मदतीने दबाव आणून सदर विहिर ही माझ्या सातबारयावर व माझ्या शेतात असल्यामुळे तुझा त्यावर काही हक्क नाही .विहीर का तुझ्या बापाची आहे का? विहिरीवर याल तर जिवंत माघारी जाणार नाहीत.....विळा घालुन फाडून टाकू अशी गुंडगीरीची ,निझामशाहीची भाषा वापरत आहेत .तुमची विहीर नाही विहरीवर याल तर घराबारावर फौजदारी कारवाई करू .मुलांच्या नाेकरया घालवू .माझी दोन्ही मुले १.कुशल राम गरड शिक्षक जि.प.सांगली.२.विनोद राम गरड शिक्षक जि.प.औरंगाबाद. शिक्षक असून जीव मारण्याच्या व नोकरी घालवण्याच्या धमकीमुळे आम्ही हक्काच्या विहरीवर पण गेलो नाही. नोकरीत असने गुन्हा आहे का?का कुणीही आयाबहिणीवर शिव्या द्यायच्या ,नोकरीत असणारयांनी त्या सहन करायच्यया असा कायदा आहे का? आज गुंडगीरीने हक्काच्या विहिरीतून काढलेत, उद्या हक्काच्या विहरीतून आणि आपण काहीच कारवाई केली नाही तर हक्काच्या गावातून सुद्धा हाकलून लावतील अशी भीती वाटते .स्वतंत्र भारतात राहत आहोत की निझामशाहीत हाच प्रश्न पडला आहे.पेरलेल्या शेतास पाणी नाही . सदर विहीर वरील तिघेजण पाव हिस्सा असताना पूर्ण वापरत आहे .आमचा अर्धा हिस्सा असताना पाणी वापरू देत नसतील तर त्यांना ही मनाई हुकूम करावा किंवा आमचा हक्क मिळावा.
आपण दखल घ्याल हीच आशा
आपला विश्वासू
राम यशवंता गरड
The Indian Easement Act अन्वये आपला या सामायिक विहिरीतून पाणी काढण्याचा हक्क आहे .आपण The Specific Relief Act दिवाणी दावा दाखल करा . व विहिरीतून आपणास पाणी काढण्याचा हक्क आहे हे जाहीर करून मग तसेच आपणास पाणी काढण्यासाठी प्रतिबंध करू नये म्हणून मनाई हुकूम मागा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दि.22-11-216 रोजीच्या उत्तरास अनुसरून प्रश्न.सन 1961-62 सालीच जर कूळवहिवाटीची नोंद घेताना चुकून तीन सातबारा ऐवजी दोन सातबाराची खरेदी किम्मत लावली असेल तर त्यावेळची चूक आता दुरुस्त करता येईल काय?. कारण तिसऱ्या सातबारावर आजोबांची कूळ वहिवाटीची नोंद आढळून येत नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी तरी तीन ऐवजी दोन सातबाराची किम्मत लागलेची चुक त्यावेलीच झालेली आहे.अन्यथा तीसरी मालमत्ता मुळ मालकाने त्या वेळेसच आमचे ताब्यातून काढून घेतली असती.त्याकाळापासुन ते आजपावेतो तीसरी मालमत्ता आमचेच ताबेकब्जात आहे.त्या वेळेची चुक आता कशी दुरुस्त करता येईल.कृपया योग्य मार्गदर्शन करावे.
मिळकत ताब्यात असणे आणि मिळकतीस कुल म्हणून नोंद असणे या भिंन्न गोष्टी आहेत
जमीन ताब्यात कुल म्हणून हि असू शकते . त्याच बरोबर , अनधकृत पणे हि अश्या जमिनीवर ताबा असू शकतो .
जमिनीला कुल म्हणून नाव असेल तर ३२ ग किंमत निश्चित होऊ शकेल
जमीन १२ वर्ष्याहून अधिक काळ ताब्यात असेल व हि बाब जमीन मालकास माहित असेल तर , आपण adverse possession चा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. किरण पाणबुडे सर
मा. संजय कुंडेटकर सर
नमस्कार

आम्ही चांदे खुर्द या गावच्या हद्दीत राहतो.

आम्ही वस्तीवरती राहतो आणि आमची वस्ती हि जवळ-जवळ 200 लोकसंख्येची वस्ती आहे.

आमची वस्ती हि चांदे खुर्द या
गावच्या हद्दीत आहे परंतु आमच्या घराच्या नोंदी ह्या चांदे बुद्रुक या गावच्या ग्रामपंचायत मध्ये आहेत. चांदे खुर्दच्या ग्रामपंचायत मध्ये नाहीत.

आमच्या जमिनी सुद्धा चांदे खुर्द च्याच हद्दीत आहे.

आमचे मतदान, रेशनकार्ड हे सर्व चांदे बुद्रुक या गावचे आहे.

दोन्ही गावामधील अंतर अवघे 2 km आहे.

आमच्या वस्तीवरील 10 लोकांनी व मी आपापल्या जमिनीमध्ये शासकीय योजनेमधून शेततळे बनविण्यासाठी अर्ज केला आहे.

शेततळ्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव आवश्यक असतो म्हणून आम्ही आमच्या रहिवाशी म्हणजे चांदे बुद्रुक या ग्रामपंचायतीमध्ये गेलो असता त्यांनी आम्हांस असे सांगितले कि आपली जमीन हि चांदे खुर्द या गावच्या हद्दीत आहे तरी आपण चांदे खुर्द या ग्रामपंचायत मधून ठराव घ्यावा.

आम्ही चांदे खुर्द मध्ये गेलो असता तेथे आम्हांस असे सांगितले की, आपणांस ठराव मिळणार नाही कारण आपण आमच्या गावचे रहिवाशी नाहीत तसेच आपले मतदान व रेशनकार्ड हे सुद्धा आमच्या गावचे नाही.

तसेच चांदे खुर्द या गावच्या सरपंच यांनी आम्हा वस्तीवरील सर्व लोकांची बैठक घेऊन असे सांगितले आहे की, आपण सर्वांनी लवकरात लवकर आपले मतदान व रेशनकार्ड हे चांदे खुर्द या ग्रामपंचायतीत स्थानांतरण करावे तसेच आपल्या घराच्या नोंदी आमच्या हद्दीत राहता म्हणून आमच्या ग्रामपंचायत मध्ये लावून घ्याव्यात. अन्यथा आम्ही आपल्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल करणार आहोत.

त्यांनी असे संगीतल्यानंतर आम्ही आमच्या सध्या रहिवाशी असणाऱ्या चांदे बुद्रुक या गावच्या सरपंचांची भेट घेतली व त्यांना सदर सर्व घटना कथित केली, परंतु त्यांनीही आमची मदत करण्यास नकार दिला व असे सांगितले की, आपण ज्या गावच्या हद्दीत राहता त्याच गावचे रहिवास स्वीकारा, आणि आपले मतदान, रेशनकार्ड व घरांच्या नोंदी आमच्या येथून चांदे खुर्द येथे स्थानांतर करा. कारण आपण चांदे खुर्द या गावच्या हद्दीत राहता.

1. आम्ही चांदे खुर्दच्या हद्दीत राहत असल्याने घराच्या नोंदी सुद्धा चांदे खुर्द मधेच घ्याव्यात का

2. आम्ही चांदे बुद्रुक मधील मतदार यादीतील नाव व रेशनकार्ड हे चांदे खुर्द मध्ये स्थानांतरित करावे का

3. आम्ही चांदे खुर्दच्या हद्दीत राहत असून चांदे बुद्रुकच्या ग्रामपंचायत मध्ये आमच्या घराच्या नोंदी आहेत तरी हे बेकायदेशिर आहे का व तसे असल्यास आमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते का

4. आमच्या घरांच्या नोंदी चांदे खुर्द मध्ये नसल्याने त्यांना आम्हांस ठराव न देण्याचा अधिकार बनतो का

प्लिज सर आपण लवकरात लवकर माझ्या समस्येचे निराकरण करावे हि विनंती

आपला आभारी
अमित शिर्के
१. होय
२.होय
३.आपणावर कायदेशीर कारवाई होण्यापेक्षा , सभांडीत ग्रामपंचायतीने , आपले घराचे नोंदी बुद्रुक गावात कश्या करून घेतल्या ? ते आपण पेक्षा जादा दोषी आहेत
४. हो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by anand salve
01-12-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर , तीन वर्षांपूर्वी माझे वडील खाजगी रुग्णालयात दाखल होते,ते रुग्नालयात दाखल होते त्या बाबत माझ्या कडे कुठलाही पुरावा नाही,माहिती अधिकाराने मला तास पुरावा मिळू शकतो का ? त्यासाठी काय करावे लागेल ?
शासकीय रुग्णालयात असतील तर माहिती अधिकारात माहिती मिळू शकेल . तथापि , रुग्णालयाचे नियमपणाने , अभिलेख जतन करण्याचा कालावधी क्ती आहे या वर ते अवलंबून आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by दीपक
01-12-2016
sathe.dipak@gmail.com

महोदय ,
आमच्या जमिनीजवळ असणारी मोकळी जागा पूर्वी आमची होती असे मला समजल्या नंतर चौकशी केल्या नंतर असे समजले कि, सदर जमीन माझ्या वडिलांनी एका संस्थेस विकली आहे . सदर जमिनीचा फेरफार नोंद पहिली व असे आढळले कि फेरफार माझ्या वडिलांच्या मृत्यू नंतर नोंद केलेला आहे . फेरफार वरून निबंधक कार्यलयाकडे सदर खरेदी दस्त मागणी केली परंतु खरेदी ३५ वर्ष पूर्वीची असलेने दस्त दोन प्रतीमध्ये केला जात नव्हता असे सांगितले व खरेदी रजिस्टर मधील नोंदीची झेरॉक्स दिली गेली सदर रजिस्टर वर खरेदी देणार म्हणून माझ्या वडिलांचे नाव आहे पण त्यांची त्यावर सही नाही पण सहीच्या ठिकाणी अंगठा असा मोकळा चौकोनी शिक्का मारलेला आहे तेथे अंगठा उमटवलेला नाही परंतु माझे वडील सही करत होते याची माहिती त्यांनी या पूर्वी ३ वर्षे आधी घेतलेल्या खरेदीवरून समजते.
सदर संस्थेचे अस्तित्व आता कोठेही जाणवत नाही. तसेच तालुका व जिल्हा सहकार रजिस्ट्रार कार्यालयात चौकशी केले असता संस्थेच्या नावाची नोंद सुद्धा आढळत नाही .आज रोजी सदर जागेवर काही व्यक्ती तसेच इतर संस्था मूळ संस्तेने जमीन आम्हास दिली होती असे सांगत आपला हक्क सांगत आहेत .
१) सदर जागेच्या जुन्या खरेदीवर ,बोगस व्यक्ती नेऊन खरेदी केली आसा अर्थ काढता येईल का ?
२) मूळ वारस अवसायक नेमण्याची मागणी करू शकतात का ?
३ ) सदर संस्था बंद असल्यास व अवसायक नेमला गेल्यास सदर जमीन विकताना वारसांना प्राधान्य मिळू शकते का ?
आपले कथनावरून खरेदी खात एक तर बोगस असले बाबत आपणस संशय आहे . आपण खरेदी खत बोगस असल्याचे जाहीर करून मिल्ने बाबत The Specific Relief Act खाली दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Savita Gaykar
01-12-2016
savitagaykar@gmail.com

श्री किसन यांना दोन पत्नी, जनाबाई आणि मंदाबाई आहेत. पहिल्या पत्नीचा, जनाबाई यांचा मोठा मुलगा महादू याने २००२ साली किसन यांची पावणे तीन एकर जमिन खरेदीखत करून घेतली. जमिन वडिलोपार्जित आहे. खरेदीखत करताना फक्त घरखर्चासाठी पैसे दिल्याचे सोडुन इतर कोनत्याही प्रकारचे पैसे दिल्याचा पुरावा नाही. त्यावेळेस किसन यांच्या दुसऱ्या पत्नाची, मंदाबाई यांची किंवा तिच्या मुलांची कोनत्याही प्रकारची NOC घेतली नाही. हे सर्व घडताना किसन यांना नशेत ठेवलं होतं. आता यावर यांच्या दुसऱ्या पत्नीला, मंदाबाई यांना किंवा त्यांच्या मुलांना काय मार्ग काढता येइल का?
किसान यांनी मंदाबाई यांचे मुलास कोणतीही अन्य मिळकत दिली नाही का ? अथवा किसन यांना केवळ पावणे तीन एकर जमीन होती .
जर फक्त पावणे तीन एकर जमीन एकट्या महदूस दिली असेल तर त्या वर , मंदाबाईच्या मुलाचा निम्मा हक्क आहे . जमीन वडिलोपार्जित असल्याने , त्या जमिनीचे किसनरावांना त्यांचे इच्छे प्रमाणे वाटप/विल्हेवाट लावता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Yogesh Rudruke
30-11-2016
Yogeshrudruke@gmail.com

नमस्कार सर
मी 1996 मध्ये तीन गुंठे Non NA जमीन खरेदी केली
होती दस्ता वर तशी नोंद आहे परंतु तलाठी कार्यालायमधील 7/12 उताऱ्या ला दोन गुंठे जमिनीची नोंद झाली आहे तरी तीन गुंठे
जमिनीची नोंद होणे साठी काय करावे लागेल या विषयी सल्ला मिळावा ही नम्र विनंती
उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील करा . नोंद आव्हानात करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रश्न :- मी सण १९८५ मध्ये मूळगावी २२०० sq भूखंड खरेदी खतानुसार खरेदी केला व आज रोजी माझेच नावे आहे. पण काही काळानंतर माझे वडिलांनी ती जागा एका इसमांस तात्पुरती राहायला म्हणून दिली. आज रोजी त्या इसमाचे त्या जागेवर घर बांधून वास्तव्य आहे. व त्यांनी ग्रामपंचायत दप्तर ला नोंद सुद्धा केली व नमुना ८ ला त्याचा नावे निघाला. आता मी सेवा निवृत्त झालो आहे आणि आता मला परत माझे मूळ गावी यायचे आहे. तर ती जागा मला परत कशी मिळवता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे.

आपण दिलेला उत्तर :- त्याने जागेचा मोबदला दिला तर तो स्वीकारावा .
जागे वर घर बांधले आहे , त्या मुले तो जागा आपणास परत करणार नाही
जागा किती वर्षे त्याचे तांबे कब्जात आहे ?
जर १२ वर्षापेक्षा , त्याचे ताब्यात असेल तर , तो adverse possession चा दावा दाखल करू शकतो . जागेची मालकी त्याचे नावे जाहीर करून मिळण्यासाठी चा दावा मान्य होऊ शकतो .

स्पष्टीकरण :- ज्या व्यक्तीला ती जागा निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात राहायला दिली होती ती व्यक्ती आता त्या जागेवर राहत नाही त्या व्यक्तीने ती जागा सोडल्या नंतर ती व्यक्ती मरण पावली. परंतु माझा मालकीची जागा त्या व्यक्तीने परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला दिली. व ती तिसरी व्यक्ती आज त्या जागेवर घर बांधून राहायला आहे. तसेच त्या तिसऱ्या व्यक्तीने गैर मार्गाने ग्राम पंचायत दप्तर ला नोंद करून घेतली.
आपले जमिनीवर , अतिक्रमण केले आहे , त्यास आपली जागा खाली करण्यासाठी दिवाणी दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय
सर/मॅडम
आदिवासी ने आदिवासीला ला जमीन विकायची असल्यास कुठला कायदा आहे आणि ती जमीन कश्या प्रकारे मिळवावी.

मी आदिवासी आहे माझी जमीन आदिवासी कडे गहाण होती. आता ती सोडून घ्यायची आहे तर मला कुठल्या प्रकारचे मार्ग अवलंबाव लागेल. पुढचा व्यक्ती सरकारी नोकरदार आहे तरी सुद्धा सावकारी धंदा करतो त्याच्या कडे मान्यता आहे कि नाही हे माहित नाही जर त्याने माझी जमीन मला देण्यास नकार दिल्यास मी कश्या प्रकारे ती जमीन मिळवू शकतो.
प्रस्ताव सादर करत असताना
१) तहसीलदार २) एस डी ओ ३) कलेक्टर यांच्या मार्फत जाणार ना?
आणि कलेक्टर सर ची मान्यता घायवीच लागते का?
प्रस्ताव कश्या प्रकारे सादर करावा कृपया मार्गदर्शन करावे.
आदिवासी व्यक्तीने बिगर आदिवासी व्यक्तीस जमीन हस्तांतरण केले असल्यास , अशी जमीन जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करून जमीन परत मिळवता येते . आदिवासी व्यक्तीने आदिवासी व्यक्तीकडे गहाण ठेवली असल्यास , जिल्हाधिकारी /प्रांताधिकारी यांचेकडे अर्ज करून , जमीन गहनातून सोडवता येणार नाही . आपण जमिनीचे घेतलेले पैसे , ज्यास जमीन गहाण दिली आहे त्यास परत द्या .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,१५ वर्षापूर्वी मोबदला देऊन जमिनीचे कुलमुखत्यार पत्र नोटरी केलेले होते.त्यानंतर त्याबाबत संबंधित व्यक्तींकडून रजि.मान्यतापात्र घेतले होते.त्यापैकी एक व्यक्ती मयत झाली.तरीही आजरोजी कुलमुखत्यारधारकाने सादर जमिनीची विक्री केल्याने गावदप्तरी नोंद घेण्यात आली आहे.तरी सडे व्यवहार कायदेशीर आहे का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..
कुलमुखत्यातरपत्र देणार्यांपैकी मयत झालेल्या व्यक्ती्ची जमीन, तो मयत झाल्यानंतर विकली असेल तर ते अवैध आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महोदय ,
दि. १९/११/२०१६ रोजी विचारलेल्या प्रश्नानुसार सहकारी संस्थेने जमीन खरेदी केल्याचे फेरफार वरून दिसते ( १९६६ साली ). फेरफार वरील नोंदीनुसार खरेदी झाल्यानंतर १९७२ साली फेरफार नोंदविण्यात आला परंतु जमीन देणारा इसम १९७१ साली मयत झाला होता. १९७२ साली सदर फेरफार नंतर मूळ गटातून खरेदी जमिनीचा वेगळा गट नंबर तयार झाला आहे ( ६९० ब). फेरफार वरील; नोंदीनुसार उपलब्ध खरेदी दस्त नंबर व तारीख नुसार रजिस्ट्रार ऑफिसकडे विचारणा केल्यानंतर सदर खरेदीची नोंद आढळत नाही. मागील प्रश्नात सांगितल्याप्रमाणे सदरची संस्था आता अस्तित्वात नाही. आता मयत इसमाच्या वारसांना काय करता येईल
दस्त झाल्यानंतर खरेदी देणार किंवा खरेदी घेणार मयत झाला तरी दस्ताच्या कायदेशीरपणावर परिणाम होत नाही. मयताच्या‍ वारसांना रेकॉर्डवर आणून नोंद प्रमाणीत करता येते. एकदा विकलेली जमीन कायदेशीर हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केल्या‍शिवाय पुन्हा प्राप्त करता येत नाही. जरूर तर दिवाणी न्याायालयात दाद मागावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार किरण सर,

वेगवेगळे असे ९ सात बाऱ्यांचे (अंदाजे २५ एकर) ४ हिस्से पाडायचे आहेत आणि त्या सर्व सात-बारयत चारही कुटुंबातल्या सर्व सदस्यांची नावे आहेत.

चौथ्या कुटुंबातील हिस्यामध्ये २ बहिणींचे नावे ७/१२ मध्ये आहेत पण आता या जमिनींचे ४ समान वाटप करताना किंवा ७/१२ स्वतंत्र करताना दोघींपैकी एक बहीण तयार होत नाही आहे, ती बहीण हक्क सोडायला हि तयार नाही आणि चौथा हिस्सा करण्यासही तयार नाही परंतु दुसऱ्या बहिणीला लवकरात लवकर वाटप करावयाचे आहे.

कृपया खालील प्रश्नाचे निरसन करावे,
१) चौथ्या कुटुंबातील एक बहीण सही करण्यास नकार देत असेल तरीही दुसऱ्या बहिणीच्या संमतीने हे वाटप होऊ शकते का?
२) सध्या हे वाटप ५०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मजकूर लिहून आणि चारही कुटुंबाच्या संमतीने होणार आहे. तर हि प्रक्रिया बरोबर आहे कि वाटप सरकारी कार्यालयात व्हायला हवे.

कृपया मार्गदर्शन करावे.
१) नाही. सर्वांची संमती आवश्‍यक
२) दस्‍त नाोंदणीकृत हवा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by anand salve
28-11-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर , ऑनलाइन फेरफार पाहू शकतो का ? फेरफार संबंधित कागतपत्र मिळवण्यासाठी काय करावे लागेल ?
सद्या तरी नागरीकांसाठी ऑनलाइन फेरफार बघण्‍याची सुविधा नाही. फेरफार नक्‍कल संदर्भात संबंधित गावांचे तलाठी यांचे कडुन माहीती घ्‍यावी.

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

नमस्कार साहेब माझ्या प्रश्नाला आपण दिलेल्या उत्तरास अनुसरून पुढील खुलासा करीत आहे.साहेब तिसऱ्या सातबारावर कूळ म्हणून कोठेही नोंद सापडत नाही.ना सातबारावर ना फेरफार वर.सदरची चूक त्यावेळेसच झाली असावी अन्यथा तिसऱ्या मालमत्तेचा ताबा आजपर्यंत आमच्याकडे राहीलाच नसता.आजोबा असतानाच कूळ नोंद झाली असती तर त्यावेळेसच किम्मत लावली गेली असती. आता मालमत्ता आमचे ताबेक्ब्जात व मालक वेगळेच.माझा प्रश्न आपणांस असा की आम्ही कूळ वहीवाट नोंदीसाठी तहसीलदार यांचेकडे आता दावा दाखल करू शकतो का ?व त्यासाठी कोणकोणते पुरावे दयावे लागतात याबद्दल सविस्तर माहिती मिळाली तर बरे होईल साहेब.
कूळ वहीवाट नोंदीसाठी आपण तहसीलदार यांचेकडे आता दावा दाखल करू शकाल. त्यासाठी सन १९५० पासूनचे सर्व सात-बारा उतारे, त्यांवरील सर्व फेरफार, कुळ-मालक नाते सिध्द करणारे दस्तऐवज, खंड दिल्याच्या पावत्या इत्यादी दाखल करावे लागतील. तथापि, जमिनीवर ताबा असणे आणि जमिनीचा मालक असणे या दोन्ही् गोष्टी् भिन्न आहेत. जमिनीवरील ताबा हा कायदेशीर कागदपत्रांन्वयेच आलेला असावा अन्यथा ते अतिक्रमण ठरेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महोदय साहेब एकत्रीकरण गटयोजनेत एकत्रीकरना योजनेपूर्वीचे क्षेत्र ०-९८-९ ईतके होते तर नंतर गटाचे क्षेत्र ०-६४-३ ईतके झाले.सदरचे एकत्रीकरण सन १९९० साली झाले.तेव्हा वडील मुम्बई ला कामाला होते.वडील सन २००२ ला वारले.तेंचे मृत्यु पछत मी सादरची शेतजमीन आमचे नावे करतांना जुना रेकॉर्ड पाहिला असता ही बाब लक्षात आली.सर्व कागद गोळा करी पर्यंत सन 2003 उजाडले.दिसे.2003 ला सादरचे प्रकरण ता.भू.अ.अलीबाग येथे दाखल केले.फेर चौकशि झाली.पुढे काहीच होत नसल्याने उप संचालक कोकण नंतर जमाबंदि आयुक्ताकडे नंतर महसूल मंत्राकडे या संदर्भत अर्ज विनंती करून थकलो.सदरचे प्रकरण कोठे गायब झाले ते कोणीच सांगत नाही.आजपावेतो मला कही न्याय मिळालेला नाही.आज तेरा वर्ष झाली हरकत दाखल केलेल्याला.या उपर आणखी कोणता मार्ग मला उपलबध आहे.कृपया मार्गदर्शन करावे.मी आपला आभारी राहीन

आपण मुख्यमंत्री लोकशाही दिनात अर्ज करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
नमस्कार
तीन भावांच्या वडिलोपार्जित मालकीच्या दोन वेगवेगळ्या गावातील मिळकत 'अ' व मिळकत 'ब' होत्या. त्यांच्यात २००४ साली रजिस्टर वाटणीपत्र झाले. वाटणीपत्राच्या सुरवातीला त्यांच्या वडिलांच्या मालकी कब्जे वहिवाटीच्या मिळकती म्हणून 'अ' व 'ब' या दोन्ही मिळकतीचा उल्लेख करण्यात आला आहे.
वाटणीपत्राच्या मुख्य कलमामध्ये फक्त मिळकत 'अ' ची वाटणी करण्यात आली असा उल्लेख आहे व मिळकत 'अ' मधील प्रत्येकाच्या वाटणीचे क्षेत्राचा उल्लेख आहे. मुख्य कलमामध्ये मिळकत 'ब' चे वाटप झाले म्हणून कोणताही उल्लेख नाही. परंतु परिशिष्ट मध्ये वारस १ च्या वाटणीस मिळकत 'अ' मधील हिश्श्याबरोबर मिळकत 'ब' सुद्धा आल्याचा उल्लेख झाला आहे.
आता वारस 2 व 3 चे म्हणणे असे कि, वाटणीपात्राच्या मुख्य कलमामध्ये मिळकत 'ब' चे वाटप झाले म्हणून कोणताही उल्लेख नाही वा मिळकत 'ब ' वारस १ च्या वाटणीस आल्याचा कोणताही उल्लेख नाही. फक्त परिशिष्ट मध्ये मिळकत 'ब' चा उल्लेख आहे म्हणून मिळकत 'ब' चे वाटप झाले असे म्हणता येणार नाही. वाटपासाठी मुख्य कलमात उल्लेख असणे आवश्यक आहे. त्या मुले मिळकत 'ब' अजून सामायिक व अविभाजित आहे आणि म्हणूनच मिळकत 'अ' च्या वाटपाचा फेरफार लगेच केला मात्र मिळकत 'ब' चा फेरफार अजून झालेला नाही.
तर वारस १ चे म्हणणे असे कि, परिशिष्ट प्रमाणे मिळकत 'ब' माझे वाटणीस आलेली आहे. परिशिष्ट सुद्धा वाटणीपत्राचा भाग आहे. म्हणून वारस १ ने आता २०१६ साली त्याच्या फेरफार साठी अर्ज केला आहे. फेरफाराची नोटीसला वारस 2 व 3 यांनी हरकत घेतली आहे.
या प्रकरणामध्ये योग्य बाजू काय आहे? याबाबत मार्गदर्शन करावे हि विनंती.
धन्यवाद

Question by ravi
25-11-2016
ravindra171282@gmail.com

नमस्कार सर , भावा भावा च्या वडिलोपार्जित शेती मध्ये दिशा लावणे म्हणजे काय ? दिशा कश्या लावल्या जातात ? दिशा लावल्या मुले जमिनीचे हस्तातंरंन कशे होते? दिशा लावणे हि कायदेशीर प्रकिया आहे का? प्रश्न २) या मध्ये तलाठी ची भूमिका काय असते ते या वर कश्या प्रकारे काम करतात ?
माझ्याामते दिशा लावणे याचा अर्थ सीमा आणि क्षेत्र निश्चित करुन जमिनीचे कायदेशीर पध्दतीने वाटप करून घेणे.
तहसिलदारकडे अर्ज करून, दिवाणी न्‍यायालयात दावा दाखल करून किंवा दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत दस्ताने, सर्व सहहिस्सेदारांच्या संमतीने वाटप करता येते.
उपोक्त आदेश किंवा नोंदणीकृत दस्तान्वनये फेरफार नोंद तलाठी यांनी नोंदवावी लागते.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by रवी
25-11-2016
ravindra171282@gmail.com

सर ३भावना वडिलोपार्जित शेती आहे त्या मध्ये चार वेगवेगळे उतारे मध्ये जवळ पास २३ एकर क्षेत्र आहे . सध्या परिस्थिती मध्ये सर्वांचे वेगवेगळे खाते नंबर पडलेले आहेत . त्या मध्ये जर कुठल्याही एका भावास किंवा आम्हास आमची जमीन विकायची किंवा वेगळी Karun हवी असेल तर काय करावे आम्ही आमची जमीन कुठल्या बाजूने पकडायची किंवा जर आम्हास जमीन कसायची असल्यास कुठल्या बाजूने कसायची ? त्या सती वाटणी पत्रक करावे लागेल का? वाटणी पत्रक कश्या प्रकारे बनते तसेच वाटणी पत्रकाची पूर्ण माहिती सांगावी ? तसेच वाटणी पत्रक बनल्या नंतर तलाठी त्यावर काय कार्यवाही करतात? वाटणी पत्रक बद्दल जरा अधिक माहिती द्यावी जेणे करून भविष्य मध्ये आम्हास कुठल्याही प्रकारची कायदेशीर अडचणी येणार nahit. वाटणी पत्रकात कोणी कुठल्या बाजूने कासवे किंवा त्याचा अधिकार कुठल्या बाजूने आहे हे कशे सिद्ध होते त्यांची प्रकिया sanagavi
२३ एकर क्षेत्र आहे . सर्व जमीन समान उत्पादिकतेची असल्यास , चार सारखे ( प्रत्येकी १\४) हिस्से करण्यास हरकत नाही .
मात्र समान उत्पादकतीची नसल्यास , चौघांनी एकत्र बसून , कोणी कोणती घ्यावी हे ठरवावे .
कोणत्या बाजूने कसावी या बाबत , नियम नाहीत . आपण ठरवणे हितावह
वाटप पत्र १०० रु. चे स्टॅम्प पेपर वर हि बनते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नियुक्ती प्राधिकारी हे कर्मचाऱ्याचा ३५ वर्षांची सेवा झाल्यानंतर
स्वेच्छा सेवा निवृत्तीचा अधिकार संबंधित कर्मचाऱ्याचे निलंबन नसेल तर रोखून ठेवू शकतात काय? ठेवू शकत असल्यास कृपया संदर्भासहित माहिती द्यावी .
जमीन नोंदणी दस्ताने खरेदी घेतल्यानंतर काही कारणास्तव फेरफार नोंद करणेचे राहून गेले होते . सदर खरेदी देणार इसम खरेदी तारखे पासून ५ वर्षानंतर मयत झाला. त्यानंतर पुढील वर्षी फेरफार साठी अर्ज करून ७/१२ वर नाव नोंद करून घेतले आहे. सदर घटनेला ४० वर्ष झालेली आहेत परंतु खरेदी देणार इसमाचे वारस खोट्या इसमाला नेऊन खरेदीखत केले आहे व फेरफार परस्पर संगनमताने नोंद केला असल्याची तक्रार करणार आहेत. वरील प्रकरणात खरेदी देणार ५ वर्षानंतर मयत झाले व त्यानंतर पुढील वर्षी फेरफार केला असल्याने अडचण येऊ शकते का ?
घाबरण्याचे कारण नाही . आपण खोटा इसम नेऊन खरेदी खत केले हे सिद्ध करण्याची जबाबदारी वारसांची आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय महोदय,
मी १९९४ साली जमीन खरेदी खताने जाण्या येण्याच्या रस्त्या सह घेतली आहे , खरेदी खातात व साठे खातात तसा उल्लेख आहे .
खरेदी लिहून देणारा मयत झालेला आहे . तर आता त्यांची पत्नी वारसदार म्हणून रास्ता देण्यास नकार देत आहे.
तर रास्ता मिलने साठी काय करावे लागेल कृपा करून कळवा.

धन्यवाद .
आपला विनम्र
दिनकर नरहरी सोनावणे .
पत्नी रस्ता नाकारू शकत नाही .
न्यायालयात तिने अडथळा केला असल्यास दावा दाखल करा .
मामलतदार कोर्ट कायद्या खाली हि आपण अर्ज करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या वडिलोपार्जित जमिनीचे माझ्या वडिलांनी माझ्या नावे मृत्युपत्र केले आहे. पण माझ्या भावाला समजताच माझ्या भावाने व २ बहिणीने कोर्टात वाटणी पत्र करीत अर्ज केला आहे आता कोर्टात केस चालू आहे
तर केस चालू असताना माझे वडील वारले तर सदर मृत्युपत्र मान्य होईल का?
मी काय करू कृपया सल्ला द्या
मान्य होईल .
मात्र मिळकत वडिलांची , स्व कष्टार्जित असावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबांना सन 1961-62 साली 32ग शेतजमीन मिळाली. त्यावेळेस 3 स्वतंत्र सातबारा होते परंतु 2 सातबारांची खरेदी किम्मत ठरवली व त्यानुसार हप्ते भरले. आजोबा सन 1967 ला वारले.वडील लहान असल्याने व नंतर नोकरी नीम्मीत्त बाहेरगावी.त्यामुळे सदरची बाब लक्षातच आली नाही.आता ऑनलाईनच्या जमान्यात या सातबारा बाबत एका एजेंटने ही माहिती मूळ मालकांच्या वारसाना दिली व लगेचच वारसांनीही सदरच्या सातबारावर वारस नॊंद दाखल केली.आता एजेंट आम्हाला सदरचि जागा विकत घेणेबाबत तगादा लावत आहे अन्यथा ती जागा दुसऱ्याना विकली जाईल अशी धमकी देत आहेत.मूळ मालक सन 1961 अगोदरच मुम्बईत स्थाईक झालेले आहेत.आजोबा पासून सर्व शेतजमीन आमच्याच तबेकब्जात आहे.माझा प्रश्न आपणांस असा की आमच्याकडे आता काय पर्याय उपलब्ध आहेत.जुन्या नोंदी पाहिल्याअसता आजोबाची नोंद कोठेही सापडत नाही.आता तलाठि कूळ वहिवाट नोंद दाखल करू शकतो का ?.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

आपण कथन केल्यानुसार , तिसऱ्या मिळकतीचे कुल म्हणून लागलेले नाव कमी झाले आहे काय ?
नाव कमी झालेले नसल्यास , ३२ ग किंमत आताही निश्चित होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपला प्रश्न/सूचना... महोदय या सरकारचा सिलींग अँकट विषयी वर्तमानपत्र व सोशल मिडीयात जोरदार प्रचार सुरू आहे यात कितपत सत्य आहे कीती जमिन सिलींग खाली येणार व आगामी येणार्या सिलींग अँक्ट विषयी माहीती दया
या पूर्वीचा कायदा हा १९६१ पासून अमलात आलेला आहे. त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा झालेल्या आहेत .
महाराष्ट्र नागरी जमीन कमाल मर्यादा धारण कायदा रद्द झालेला आहे . मात्र शेतजमीन कमाल मर्यादा धरण कायदा रद्द झालेला नाही
कायदा बनवण्याची एक पद्धत असते . कायदा बनव्य्नयापूर्वी त्याचे प्रारूप प्रसिद्ध केले जाते .लोकांच्या हरकारी , मते मागवली जातायत.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वर्तमानपत्र व सोशल मिडीयावर फार विश्वास ठेऊ नये. याबाबतचा जुना कायदा काही वर्षापूर्वीच शासनाने रद्द केलेला आहे. त्याामुळे तोच कायदा पुन्हा अंमलात येण्या‍ची शक्यता फार कमी आहे. तथापि, जर हा कायदा पुन्हा आणला गेलाच तर शासनाचा निर्णय सर्वोच्च असल्या‍ने तो स्वीकारावा लागेलच.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by निलेश
20-11-2016
nikysweet1@gmail.com

नमस्कार सर , मी सण १९८५ मध्ये मूळगावी २२०० sq भूखंड खरेदी खतानुसार खरेदी केला व आज रोजी माझेच नावे आहे. पण काही काळानंतर माझे वडिलांनी ती जागा एका इसमांस तात्पुरती राहायला म्हणून दिली. आज रोजी त्या इसमाचे त्या जागेवर घर बांधून वास्तव्य आहे. व त्यांनी ग्रामपंचायत दप्तर ला नोंद सुद्धा केली व नमुना ८ ला त्याचा नावे निघाला. आता मी सेवा निवृत्त झालो आहे आणि आता मला परत माझे मूळ गावी यायचे आहे. तर ती जागा मला परत कशी मिळवता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे.
त्याने जागेचा मोबदला दिला तर तो स्वीकारावा .
जागे वर घर बांधले आहे , त्या मुले तो जागा आपणास परत करणार नाही
जागा किती वर्षे त्याचे तांबे कब्जात आहे ?
जर १२ वर्षापेक्षा , त्याचे ताब्यात असेल तर , तो adverse possession चा दावा दाखल करू शकतो . जागेची मालकी त्याचे नावे जाहीर करून मिळण्यासाठी चा दावा मान्य होऊ शकतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.32 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3