जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Mahesh Patil
09-10-2016
mytoday121@gmail.com
१२ ऑगस्ट २०१६ रोजी , ७/१२ वरील सोसायटी बोजा कमी करणेसाठी संबधीत तलाठी यांचे कडे सोसायटी NOC सहित अर्ज केला होता , पण अद्याप ७/१२ वरील बोजा कमी झाला नाही. संबधीत तलाठी यांचेकडे याबाबत विचारणा केली असता, होईल... करतो...बघतो...अशी उत्तरे मिळत आहेत.
तरी मी आता काय करावे ?
NOC आणि बोजा कमी पत्र या दोन भिन्न गोष्टी आहेत.बँकेने केवळ NOC दिली असेल त्यावर गट नं ,बोजा रक्कम ,फेरफार क्रमांक या बाबी नमूद नसतात त्यामुळे केवळ NOC मुळे बोजा कमी केला जाऊ शकत नाही.बोजा कमी पत्र असेल तर त्यावर गट नं ,बोजा रक्कम ,बोजा दाखल केलेला फेरफार क्रमांक इ बाबी नमूद असतात त्यावरून बोजा कमी करता येईल.आपण तलाठी यांचेकडे दिलेले NOC आहे का बोजा कमी पत्र हे तपासून घ्यावे.कदाचित NOC असलेमुळे ही बोजा कमी झाला नसेल.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by Mahesh Patil
09-10-2016
mytoday121@gmail.com
आमच्या ७/१२ वर इतर मध्ये "खरेदी निरर्थक कुळास कमाल
मर्यादेपेक्षा जमीन आहे" असा शेरा आहे, याचा अर्थ काय आणि तो कमी करता येईल काय ?
आपल्या जमिनीत पूर्वी जे कुळ असेल, त्याच्याकडे कमाल जमीन धारण मर्यादा कायद्यात नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त जमीन असेल त्यामुळे कुळकायदा ३२-ग नूसार त्याला तुमची जमीन खरेदी करता आली नाही. त्याबाबत हा शेरा आहे. या शेर्याला १२ वषार्षापेक्षा जास्त काळ झाला असेल तर तहसिलदारकडे अर्ज करून ताो शेरा कमी करू शकाल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by श्रीकांत ज्ञा. पिसाळ
08-10-2016
shreekantpisal1@gmail.com
देवस्थान ईनाम वर्ग -३ च्या जमीनीचा मिराशी कुळ किंवा कायम कुळाचा हक्क खरेदी दस्ताने हस्तांतर होतो का?
Question by अमितकुमार शिर्के
08-10-2016
amitkumar.shirke@gmail.com
मा. किरण पानबुडे साहेब,
माझे आजोबा व त्यांचे बंधु यांचे नावे 1970 ला वाटपद्वारे 15-15 एकर एवढी शेतजमीन त्यांचे वडिलांकडून आली आहे.
आज आम्ही आमची ताब्यातील जमीन मोजली असता ती फक्त 10 एकर भरत आहे व सात-बारा वरती तर 15 एकराचा उल्लेख आहे.
म्हणून आम्ही चुलत आजोबा यांच्या ताब्यातील जमीन मोजली असता त्यांची 20 एकर भरत आहे व सात-बारा वर तर 15 एकर आहे.
यावरुन मला असे समजले की, आमची 5 एकर एवढी जमीन चुलत आजोबांचं वहिवाटत आहेत.
मी याबाबत माझे आजोबा, वडील तसेच चुलते यांच्याशी बोललो असता त्यांना याबाबत काहीच माहित नाही, ते म्हणतात की, आपल्या ताब्यातील जमीन हि 15 एकर असेल कारण त्यांनी आजपर्यंत कधीच मोजणी केली नाही.
माझे आजोबा, वडील, चुलते हे सर्व अशिक्षित आहेत, म्हणूनच त्यांनी 1970 पासून आपली जमीन 10 एकर आहे की 15 एकर हे सुद्धा समजले नाही.
मी आमच्या 5 एकर जमिनीबाबत चुलत आजोबा व त्यांची मुले यांच्याशी बोललो असता, त्यांनी डायरेक्ट आमच्याशी वाद घालण्यास चालू केला आहे व आमची जमीन आम्हांला देणारच नाहीत असे सांगत आहेत. व माझ्या आजोबांच्या नावावरील 5 एकर जमीन त्यांचे नावावर करण्यासाठी दमदाटी करत आहेत.
आज मी व माझे चुलते आम्ही सर्व एकत्रच राहतो व त्यामुळे आमच्या जमिनीचे आम्ही वाटप केले नाही, व ती अजून आजोबांच्याच नावे आहे, सर्व जमीन एकाच गट नम्बरमधील असल्याने आम्हांस ती 10 एकर आहे कि 15 हे सुद्धा समजले नाही, तरी,...
1. 1970 ला वाटप झाले, तेव्हापासून आजपर्यंत 45 वर्ष झाले, चुलत आजोबा आमची जमीन वहिवाटत आहेत, तरी तिचा ताबा आम्हांस मिळू शकतो का ?
2. न्यायालयात आमची केस टिकेल का ?
3. आम्ही दावा काय म्हणून दाखल करावा.
4. चुलत आजोबा व त्यांची मुले आमच्या नावावरील 5 एकर जमीन त्यांचे नावावर करण्यासाठी दमदाटी करत आहेत, व त्रास देत आहेत तरी आम्ही कोणती कायदेशीर मदत घ्यावी.
5. आज 45 वर्षांनंतर आम्हांस माहित झाले आमची जमीन किती आहे ते, व जरी न्यायालयात गेलो तरी आमची बाजु कमकुवत आहे, म्हणून विलंब माफी बाबत न्यायालयात आम्ही काय म्हणणे मांडावे.
6. माझे आजोबा, वडील व चुलते हे सर्व अशिक्षित असल्याने न्यायालयात मी माझे नावे केस दाखल केली तर चालेल का ?
7. हा दावा वकील न देता मी स्वतः चालवू शकतो का, कारण असे झाले तर न्यायालयात आमचे म्हणणे आम्हांला व्यवस्थित सांगता येईल.
8. म.ज.म. अधिनियमाच्या कोणकोणत्या कलमानुसार मला दावा दाखल करता येईल.
Question by अभिजीत
07-10-2016
abhijitkadam55@gmail.com
महोदय जमिन एकञिकरणावेळी स़ऩ़ चे गटात रूपांतर होताना नकाशात हस्तदोष होऊन तो दोन भागात विभागला अाहे त्यापैकी एकास नं आहे तर उर्वरित भागास नंबर नाही ही बाब दुरूस्तीसाठी ऊपसंचालक कार्यालयाकडे पाठवली असता तो अर्ज चौकशीसाठी TLR कडे आला आहे परंतु tlr कार्यालय १९४० पूर्वीची कागपञाची मागणी करत आहे ती TLR व तहसिल रेकाँर्डला ऊपलब्ध नाहीत त्या मुळे अर्ज निकाली काढला जात आहे मी १९५० पर्यतची कागदपञे जमा केली आहेत हस्तदोषासाठी कलम १५५ याठीकाणी लागु पडू शकते का मार्गदर्शन करा
दुरुस्ती नकाशामध्ये आहे का ७/१२ मध्ये कारण कलम १५५ नुसार केवळ ७/१२ मधील हस्तदोष दूर करता येतो.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by अभिजीत
07-10-2016
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... महोदय सामाईक विहीरीतील पाणी(पाट पाणी ) वापरण्याचे काही विशीष्ट नियम आहेत का? ऊदा_जेवढी जमिन रहहिस्सेदार भिजवतो तेवढीच आपणही भिजवावी़ तसेच याच विहरीवर नविन जमिन खरेदी करून त्यासाठी याच विहीरीतले पाणी वापरता विनासंमती वापरता येऊ शकते का? मार्गदर्शन करा
सामाईक विहीरीतील पाण्यावर सर्व सहहिस्सेदारांचा समान हक्क असताो. त्याबाबतचे नियम एकमताने केलेले असतात. जेवढी जमिन सहहिस्सेदार भिजवतो तेवढीच आपणही भिजवावी़ अशी जबरदस्ती करणे याोग्य नाही. तथापि, नविन खरेदी केलेल्या जमिनीसाठी याच विहीरीतले पाणी वापरतांना सवर्संव सहहिस्सेदारांची संमती घेण्याची अट असू शकते.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
06-10-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,रहिवासी क्षेत्रात 4 वर्षांपूर्वी जमिनीची मोजणी करून कंपाऊंड केले आहे.सादर जागेचा लेआऊट प्लॅन मंजूर कौन घ्यावयाचा असल्यास पुन्हा मोजणी करणे आवश्यक आहे का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by शिवाजीराजे
06-10-2016
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरण पाणबुडे साहेब नमस्कार, जर ग्रामसेवक याना ग्राम पंचायत बॉडी जाणून बुजून त्रास देत आहे कारण सरपंच याना बिलकुल अपहार करू देत नसल्यामुळे त्यांच्यावर खोट्या तक्रारी मा. सभापती पंचायत समिती यांच्याकडे केल्या जाताहेत. पर्वा तर त्यांनी ग्रामसेवकांवर पोलीस स्टेशन ला बॅनर लावला होता तो कोणीतरी फाडला म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती. त्यावर पोलीस स्टेशन ने त्यांना नोटीस पाठवली व त्यात त्यांनी म्हटले आहे कि बॅनर लावताना परवानगी घेतली का ते पहा. जर परवानगी घेतली नसेल तर तुमच्यावर वैयक्तिक कारवाई करावी लागेल व हि नोटीस त्याचा पुरावा म्हणून वापरला जाईल असे त्या नोटीस मध्ये नमूद करून ग्रामसेवकांना नोटीस दिली आहे- सदर ग्रामसेवक हे नगर कडचे आहेत. परंतु त्यांनी परवानगी मागितलेली आहे . व ग्रामसेवकांनीही परवानगी दिली आहे. पण त्या गावकर्यांनी लावलेला बॅनर कोणीतरी फाडला होता त्यावर ग्रामस्थानी तक्रार दिली व परत गावकर्यांनी जसा पहिला बॅनर होता तसाच बॅनर त्याच ठिकाणी लावला आहे व अजूनही तो बॅनर तेथेच आहे . मग पोलिसांच्या नोटीस ला ग्रामसेवकाने कसे सामोरे जावे कृपया मार्गदर्शन व्हावे हि विनंती.
Question by जी .टी .गारळे
05-10-2016
gtgarale@gmail.com
माझे वडिलाचे निधनानंतर त्याना आम्ही दोघे भाऊ त्याना वारस आहे वारसाने आम्हा दोघाचे नावे वारसाने ९ एकर जमीन लागलेली आहे त्यानंतर आम्ही सदरची मिळकत ही आम्ही दोघे व आमची पत्नी असे चौघामध्ये असे वाटणी पत्र करून घेतले आहे त्याकरिता १ टक्का नोंदणी शुल्क व ५०० रुपयाचा stamp जोडला असून सदर वाटणी पत्राची नोंद ७/१२ पत्रकी झालेली आहे सदर नोंद झाले नंतर १ वर्षा नंतर सहा. मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी दुय्यम निबंधक कार्यालय तपासणी मध्ये सदर केलेले वाटणी पत्रा मध्ये ४ टक्का मुद्रांक वसुली चुकवलेली असून ती वसूल करणेचे सूचित करून रक्कम रुपये १२.००००० (बारा लाख ) इतकी वसुली नोटीस मला प्राप्त झालेली आहे तरी केलेली वाटणी पत्र योग्य आहे अगर मुद्रांक वसुली भरणे योग्य आहे या बाबत मार्गदर्शन व्हावे
माझा मोबाईल क्रमाक ७५८८७९७६०७
Question by श्रद्धा वाडे
05-10-2016
shraddha.wade@gmail.com
24-जून-2016 विचारलेले प्रश्न चे कॉटिनुशन आहे.भोगवटादार 2 ची जमीन नवीन अविभाज्य शर्त LND155/25-04-1961 वंशपरंपरागत आणि हस्तांतरणीय असते मग वर्ग अ चे वारसदार नसतील तर वर्ग ब च्या वारसांच्या नवे होते शकते ना? पालघर जिल्ह्यांचे प्रांत ते शासन जमा करतात कारण त्याच्या मते वर्ग ब चे वारसदार हे वारस नाही होते? हिंदू वारसा अधिनियम असा कुठे हि उल्ल्लेख नाही कि हा नियम भगवंतदार वर्ग 2 ला अँप्लिकेबल नाही. मार्गदर्शन करा? ह्या निणर्य बाबत कुठे & कशी अपील करावे?
भोगवटादार 2 ची जमीन, काोणत्या कायद्यान्वये मिळाली आहे ते बघणे आवश्यक आहे. सदर जमीन जर वारस कायद्यामध्ये उल्लेखलेल्या *स्वतंत्र मिळकती* या व्याख्येखाली येत असतील आणि वर्ग एकचे काोणी वारस नसतील तर त्या वर्ग २ च्या वारसांकडे हस्तांतरीत करतांना अनेक मुद्दे अभ्यासावे लागतात. तथापि, आपणास प्रांताच्या .निर्णयाविरूध्द अपिलाचा पर्याय आहे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
05-10-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,एखाद्या महसूल अधिकाऱ्याची विभागीय चौकशी चालू असताना तो सेवानिवृत्त झाल्यास त्याची ग्रॅच्युइटीची रक्कम रोखून ठेवता येते का?किंवा कसे?त्याबाबत शासन निर्णय आहे का?
Question by अमोल ए वाघ
04-10-2016
amolwagh6828@gmail.com
नमस्कार सर,
मंजूर विकास योजनेत 24 मीटर रुंदीचा रस्ता दर्शविण्यात आलेला आहे. सन 1894 च्या पहिल्या ऍक्ट अनवये नगरपंचायत करीता भूसंपादन करावयाचे असल्याची कलम 9(3)(4) ची पहिलीच नोटीस दिनांक 21/01/2014 रोजी आलेली असून पुढील भूसंपादनची कोणतेही कार्यवाही झालेली नाही.
1) विकास योजनेत आरक्षित असलेले क्षेत्राचे भूसंपादन करताना कलम 4 ची हितसंबंधी व्यक्तीस नोटीस, शासकीय राजपत्रात अधिसूचना, चावडी नोटीस, वुत्तपत्रात नोटीस देणे आवश्यक आहे का?
2) संपादक संस्था नगरपंचायत ने 50% मोबदला रक्कम ठेव न ठेवता कलम 9(3)(4) ची नोटीस हितसंबंधी व्यक्तीस देता येते का?
3) कलम 4 अधिसूचना प्रसिद्ध झालेली नसल्यास, भूसंपादन प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी दिनांक 26/12/2011 मंजूर केलेला असून, क्षेत्राची मोजणी दि.01/03/2012 व कलम 6 ची अधिसूचना शासन राजपत्र 6 नोव्हेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झालेली असल्यास मोबदला रक्कम कोणत्या वर्षाच्या मूल्यानुसार धरावे?
4) विकास योजनेतील आरक्षित असलेले क्षेत्राचे भूसंपादन करताना कालमर्यादा 2 वर्षापेक्ष्या जास्त झालेली असल्याने कार्यवाही व्यपगत होते का?
Question by नंदकिशोर रामराव सोनवणे
04-10-2016
nrsonvane@gmail.com
नमस्कार सर
सर ग्रामीण, नगरपालीका, महा नगरपालीका, या भागा मधे म.रा.ज.म.१९६६ चे कलम ४४ प्रमाणे अकृषीक झाले असेल तर मुळ अकाराला ( ग्रामपंचायत जिल्हापरीषद ) शेषस लागतात का कृपया मार्गदर्शन करने..
Question by नंदकिशोर रामराव सोनवणे
04-10-2016
nrsonvane@gmail.com
नमस्कार सर
सर ग्रामीण, नगरपालीका, महा नगरपालीका, या भागा मधे म.रा.ज.म.१९६६ चे कलम ४४ प्रमाणे अकृषीक झाले असेल तर मुळ अकाराला ( ग्रामपंचायत जिल्हापरीषद ) शेषस लागतात का कृपया मार्गदर्शन करने..
Question by BALAJI DAHIPHALE
03-10-2016
balajidahiphale1996@gmail.com
नमस्कार सर,
कोतवाल यांनी कोणती कामे करवी,तसेच कोतवाला संबधी कोणता अधिनियम आहे का? असेल तर त्यांची कॉपी मला इमेल वर पाठवावी.
मुंबई कनिष्ठ गाव वतने निर्मूलन कायदा, १९५८ अन्वये दिनांक १ फेब्रुवारी १९६२ पासून अनुवांशिक कनिष्ठ गाव सेवक प्रणाली संपुष्टात आली. त्यानंतर गावच्या लोकसंख्येकनुसार कोतवालाचे नियमित मानधन घेणारे पद निर्माण करण्यात आले.
काही काळ कोतवालांची पदे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली होती. पुन्हा दिनांक १ डिसेंबर १९६३ पासून कोतवालाची पदे महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आली.
कोतवाल हे महसूल खात्यातील सर्वात कनिष्ठ पद आहे. कोतवाल हे गाव कामगार तलाठी यांचे मदतीसाठी काम करतात.
कोतवालांकडून खाजगी कामे करुन घेण्यास शासनाने २५/०५/२००४ च्या परिपत्रकान्वये मज्जाव केला आहे.
कोतवालांना कामावर असतांना जखम/इजा झाल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाने १२/१२/१९९१ च्या परिपत्रकान्वये दिल्या आहेत.
कोतवालांची सेवा पुस्तके दोन प्रतीत ठेवण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत त्यायोगे त्यांना निवृत्तीनंतरचे लाभ देणे सोयीस्कर होईल.
कोतवालाची भरती: तहसिलदार करतात.
कोतवाल पदाचे शिक्षण: ४ थी पास
कोतवाल पदासाठी वयोमर्यादा: ४५ वर्षापर्यंत
कोतवालाचे सध्याचे मानधन: रु. ५०००/-
• घोलप समिती अहवालानुसार कोतवालाची कर्तव्ये:
æ शासकीय रक्कम शासकीय तिजोरीत भरण्यात सहाय्य करणे.
æ शेत सारा, शासकीय देणे अदा करण्यासाठी गावकर्यांाना चावडीवर बोलावून आणणे.
æ शासकीय पैसा, कार्यालयीन कागदपत्रे आणि शासकीय वसुली म्हणून जप्त केलेल्या मालमत्तेवर लक्ष ठेवणे.
æ अटकवलेली/जप्त केलेली मालमत्ता/जनावरे चावडीवर घेऊन येणे.
æ आवश्यकतेनूसार गाव दप्तर गावातून तहसिल कार्यालयात नेणे.
æ चावडीचे टपाल तहसिल कार्यालयात व तहसिल कार्यालयाचे टपाल चावडीवर नेणे.
æ शासकीय अधिकार्यातना त्यांच्या दौर्यायत, पीक पाहणीत, हद्दीच्या खुणा तपासण्यात सहाय्य करणे.
æ नोटीस/ समन्स बजावणे व नोटीस/ समन्स बजावण्यासाठी मदत करणे.
æ गावातील जन्म, मृत्यू, लग्न आणि अर्भक मृत्यूची माहिती ग्राम पंचायत सचिवाला देणे.
æ पोलिस पाटील आणि पोलिसांना रात्रीच्या गस्तीसाठी मदत करणे. संशयास्पद प्रकरणांची माहिती पोलिस पाटलास देणे.
æ बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास तसेच शव विच्छेदनासाठी प्रेत घेऊन जाण्यात पोलिसांना सहाय्य करणे.
æ शासनाच्या आदेशांबाबत गावात दवंडी देणे.
æ लसीकरण मोहीमेत मदत करणे.
æ अपघाती मृत्यू, आग, साथीचे रोग या प्रसंगी प्रशासनास मदत करणे.
æ गुन्हेगारांच्या हालचाली पोलिसांना कळवणे तसेच तपासात आणि गुन्हे प्रतिबंध समयी पोलिसांना मदत करणे.
æ पोलिस पाटलाच्या अभिरक्षेत असलेल्या गुन्हेगारावर पहारा देणे.
æ गावातील अधिकार्यांभना जमीन महसूल वसुलीस तसेच त्यांच्या इतर शासकीय कामात मदत करणे.
æ गावात शासकीय कामासाठी आलेल्या अधिकार्यांसना सहाय्य करणे.
æ गावातील चावडी स्वच्छ ठेवणे आणि तेथे दिवाबत्ती करणे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सुजित बर्गी
02-10-2016
sujitbargi95@gmail.com
नमस्कार सर ,
मला खालील प्रश्नांवर मार्गदर्शन आणि शंकांचं निरसन करावे हि विनंती .
१) एका व्यक्तीने पूर्वी जमीन खरेदी केली असून त्यांना तीन मुले होती त्यांची नावे रमेश , लक्ष्मण, अनिल अशी आहेत.ही जमीन त्यांनी तिघांमध्ये आपअपसात वाटून घेतली. आणि हद्दीच्या निशाणी ठरवून वाटण्या एकमेकांत मान्य केल्या. पण त्या तिघांमध्ये कोणताही लेखी करार झाला नाही फक्त एकमेकांच्या सहकार्याने तोंडी वाटण्या झाल्या. त्यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांच्या वारसांची नावे चढली ती अशी रमेश च्या जागी दीपक, लक्ष्मण च्या जागी कमला आणि अनिल च्या जागी मंगेश . ही जमीन सामायिक आहे शिवाय कोणाच्याच नावे स्वतंत्र क्षेत्र दर्शविलेले नाही, आणि खाते क्रमांक एकच आहे आणि ते खाते क्रमांक दीपकच्या नावे आहे . तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन स्वतःच्या नावे करायची आहे परंतु त्यांच्याकडे वाटणीचा कोणताही पुरावा आता नाही, पण सातबारा वर मंगेश यांचे नाव आहे. आणि दीपक व कमला हे दोघे जण सहकार्य करत नाहीत. हरकत दाखवत आहेत तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन नावे करण्यासाठी काय करावे लागेल ?
(2) एका व्यक्तीला पूर्वी कुळकायद्या नुसार जमीन मिळाली, त्यानुसार सात बारा मध्ये कुळाचे वर्णन : साधे कुळ ( 1 )
म. ग. पाटील यांचा ( 1 )
32 ग चा बोजा र.रु. 414.70 ( 1 )
हपते 5 ( 1 ) असे वर्णन आहे
वरिल व्यक्तीला (ज्याला कुळ कायद्यानुसार जमीन मिळालेली व्यक्ती ) तीन मुले होती त्यांची नावे रमेश , लक्ष्मण, अनिल अशी आहेत.ही जमीन त्यांनी तिघांमध्ये आपअपसात वाटून घेतली. आणि हद्दीच्या निशाणी ठरवून वाटण्या एकमेकांत मान्य केल्या. पण त्या तिघांमध्ये कोणताही लेखी करार झाला नाही फक्त एकमेकांच्या सहकार्याने तोंडी वाटण्या झाल्या. त्यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांच्या वारसांची नावे चढली ती अशी रमेश च्या जागी दीपक, लक्ष्मण च्या जागी कमला आणि अनिल च्या जागी मंगेश . ही जमीन सामायिक आहे शिवाय कोणाच्याच नावे स्वतंत्र क्षेत्र दर्शविलेले नाही, आणि खाते क्रमांक एकच आहे आणि ते खाते क्रमांक दीपकच्या नावे आहे . तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन स्वतःच्या नावे करायची आहे परंतु त्यांच्याकडे वाटणीचा कोणताही पुरावा आता नाही, पण सातबारा वर मंगेश यांचे नाव आहे. आणि दीपक व कमला हे दोघे जण सहकार्य करत नाहीत. हरकत दाखवत आहेत तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन नावे करण्यासाठी आणि वर वर्णन केलेले कुळ सात बारा मधून काढून टाकण्यासाठी काय करावे लागेल ?
(3) शिवाय सात बारा मधून सर्वांच्या सहमतीने कुळाचे नाव कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी काय करावे लागेल ?
(4)सात बारा मध्ये खालील वर्णन केलेली जमीन विकता येते का ?
इतर अधिकार
फॉरेस्ट कलम 35 मधुन वगळण्यात आली. ( 1 )
म. खा. व. स. कायदा 1975 ( 1 )
केंद्र शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय वनैतर वापरास बंदी ( 771 )
वने ( 809 )
वन ( 809 )
धन्यवाद !
प्रश्न १. .दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करावा.
प्रश्न २. म.ग.पाटील यांनाच जर कुळकायदा ३२ ग नुसार जमीन मिळाली असेल आणि ३२-म चे प्रमाणपत्र असेल तर वरील बाोज्याची नाोंद, चलन, ३२-ग आदेश आणि ३२-म प्रमाणपत्र, तहसिलदारकडे सादर करून, म.ज.म.अ. कलम १५५ अन्वये कमी करता येईल.
प्रश्न ३. म.ग.पाटील हे सध्या जमिनीचे मालक नसतील आणि अन्य व्यक्ती असतील तर तहसिलदारकडे अर्ज करावा लागेल. तहसिलदार याोग्य ती चाौकशी करतील.
प्रश्न ४. अशी जमीन वन खात्याच्या परवानगी.शिवाय विकता येणार नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sajid
02-10-2016
sajid11@gmail.com
सर एखाद्या जमिनीमध्ये 3 सह हिस्सेदाराक आहेत.पण त्यांचे वाटप होऊन त्यांना कोणते क्षेत्र मिळाले आहे कशावरून कळते?
2) सर एखाद्या जमिनीमध्ये 3 सह हिस्सेदाराक आहेत.पण त्यांचे वाटप झालेले नाही आपण 2 सह धारकाचा संमती विना बोअर घेऊ शकतो का व घेतल्यास ते त्यांचा त्या बोअर मध्ये हिस्सा मागू शकता का
वाटप पत्रात नमुद सीमांच्या आधारे काोणाला कोणते क्षेत्र मिळाले आहे हे कळू शकते.
सह धारकाचा संमती विना बोअर घेणे याोग्य हाोणार नाही. घेतल्यास ते त्यांचा त्या बोअर मध्ये पाण्याचा हक्क मागू शकतील
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by saddam
02-10-2016
saddam11@gmail.com
सर प्रत्येक सह हिस्सेधारकाची वाटणी झालेली असेल तर 7/12 एकत्र निघतो का वेगवेगळा निघतो
2)वाटणी कोर्टाकडून तहसीलदारकडून भूमी अभिलेख कडून कोणाकडून होते व कोणाला अधिकार आहेत वाटणीचे
वाटणीमुळे सहसा ७-१२ स्वतंत्र हाोत नाही. त्याच ७-१२ वर .हिस्स्याचे क्षेत्र नमुद करतात.
सर्व सहहिस्सेदारांची संमती नसल्यास, दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून, सर्व सहहिस्सेदारांची संमती असल्यास, तहसीलदारांकडे म.ज.म.अ. कलम ८५ नुसार अर्ज करून किंवा दुय्यम निबंधकाकडे नाोंदणीकृत दस्त करून वाटणी हाोऊ शकते.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by रोहित जठार
02-10-2016
www.roraj8@gmail.com
सर, सद्ध्या स्वच्छ भारत अभियान चालू आहे, यात आमच्या गावातहि शौचालये बांधण्यास सांगत आहेत. आम्हालाही आमचे वैयक्तिक शौचालय बांधायचे आहे.
परंतु आमचे घर हे आमच्या पणजोबा यांचे नावे आहे व त्यांना आत्ता पर्यत ८ वारस आहेत सदर घर हे २०’x३३’ चे आहे. तर आम्हाला जवळ पास २.५’x ४’ इतकीच जागा मिळते आहे. व त्याच बरोबर आमच्या घरावर व जमिनीवर दिवाणी न्यायालयात केस चालू आहे.
आणि ग्रामपंचायतवाले बोलतात कि तुम्हाला शौचालय बंधावेच लागेल आम्हीही आमचे वैयक्तिक शौचालय बांधायचे आहे. पण अशा काही कारणामुळे आम्हाला शौचालय बांधता येत नाही.
याच बरोबर आमचे रेशन, वीज, सरकारी दाखले, गावचे पाणी बंद करणार आहेत. ग्रामपंचायत ग्राम सभेत आपले विचार न मांडू देणार नाहीत, आमच्या घरा समोर वाजंत्री लावून व गावात सार्वजनिक जागेत आमचे फलक लावणार आहेत.
या कारणाने आमचे घरचे निराश झाले आहेत व मला तर भीती वाटते आहेत कि कोन्ही या मुळे जीवाचे काही बरे-वाईट करून घेऊ नये या साठी तुम्हीच आम्हाला मदत करावी.
१) तरी आम्ही काय करू ?
व
२) तर रेशन दुकानदारांकडे, वीज वितरण मंडळाकडे, जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा याच्याकडे, ग्रामपंचायत कडे सरकारी दाखले देऊ नये असे कोणतेही GR पाठविले आहेत काय?
कृपा करून या दोन प्रश्नाची उत्तरे द्यावी.
Question by Vinayak बुवाजी patil
02-10-2016
Vbpatil96@gmail.com
If there is not mentioned specific period in the contract of sale deed of land and near about 56 years has been completed but this contract is not completed then what is specific period to complete this contract
Question by गणेश शिंदे
01-10-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,सण 1983 मधील नोटरी केलेले कु.मु. पत्र असल्यास मनपा.हद्दीतील जमिनीचा TDR मिळू शकेल का?
Question by sajid
01-10-2016
sajid11@rediffmail com
नॉन क्रीमीलेयर मधे बसत नसेल तर ओबीसी आरक्षण चा नोकरीसाठी फायदा घेता येतो का
Question by anand salve
01-10-2016
salveanand89@gmail.com
नमस्कार सर , माझे काका गेल्या तीन वर्षा पासून हरवले आहेत त्यांच्या मुलांनी त्या बद्दल पोलीस कंप्लेंट केलेली नाही ते पाचोरा तालुक्यातील राहणारे आहेत तर त्यांना काकाचे मुर्त्यू सर्टिफिकेट भेटू शकते का ?त्याची काय प्रॉसिजर आहे ?
दिवाणी न्यायालयात तसे सिध्द करावे लागेल. भारतीय पुरावा कायदा, १८७२ च्या कलम १०७, १०८ अन्वये दिवाणी न्यायालयामार्फत वारस दाखला प्राप्ती करून घ्यावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by anand salve
01-10-2016
salveanand89@gmail.com
नमस्कार सर , एखादी फेरफार नोंद झाली असल्यास त्या विरोधात अपील करण्यासाठी किती कालावधी असतो .ऑनलाइन फेरफार पाहू शकतो का ?जमिनीवर मुलींच्या मुलांचा अधिकार असतो का ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २५० अन्वये, ज्या निर्णयाविरुद्ध किंवा आदेशाविरुद्ध तक्रार असेल तो निर्णय किंवा आदेश, जिल्हाधिकाऱ्याच्या किंवा अधीक्षक, भूमि अभिलेख याच्या दर्जाहून कमी दर्जाच्या असलेल्या अधिकाऱ्याने दिला असेल तर साठ दिवसांची मुदत संपल्यानंतर त्याविरूद्ध अपील दाखल करता येणार नाही.
जमिनीवर मुलींच्या मुलांचा अधिकार, जमीन कशी प्राप्त झाली आहे यावर ठरताो.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सय्यद फिरोज बनेमिया
30-09-2016
firojsayyad1982@gmail.com
नगरपालिका हद्दीत महार वतन जमिनीचे भूसंपादन करतांना कपात करावयाची नजराणा रक्कम किती ? याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
