जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by योगेश पाटील
22-10-2016
yogeshpatil623@gmail.com
नमस्कार साहेब , आमच्या तसेच आजूबाजूच्या शेतात येण्याजाण्यासाठी रस्ता नाही . दोन मार्गातून रास्ता मिळू शकतो पण एका मार्गातून शेतात येण्यापूर्वी मसअनवट ग्रामपंचायत, बिनाकारणी पड, गुरुचरण ग्रामपंचायत किंवा खासगी शेती हे गट येतात तर यातून रास्ता मिळू शकतो का? तसेच दुसऱ्या मार्गातून शेतात येण्यापूर्वी पाश्चर फॉरेस्ट ,प्रोटेक्ट फॉरेस्ट चे क्षेत्र लागते तर या दोन्ही मधून कोणत्या मार्गातून रस्ता मिळू शकतो का? असेल तर कोणत्या मार्गातून आणि किती मीटर चा त्यासाठी कोणाकडे मागणी करावयाची त्याचे मार्गदर्शन करावे हि विनंती .
Question by सतीश joshi
21-10-2016
satishsampada@gmail.com
महाराष्ट्रातील सर्व विभागातील ७/१२ उतार्यावरील शेरे आणि त्यांचे अर्थ तसेच त्या शेर्यांचे परिणाम या विषयी विस्तृत माहिती मला मिळू शकेल का?
Question by somnath Lokhande
20-10-2016
somnathLokhanderx@gmail.com
नमस्कार सर . माझ्या वडिलांनी 2009 साली आमचे घर खरेदी खताने विकले व खरेदी घेणारा व्यक्ती तेव्हांपासून गायब आहे व वडिलांचे राहिले ले पैसे सुद्धा दिले नाही आजही घराचा कर वडिलांच्या नावे येत आहे व 7/12 सदरी वडिलांचे नाव आहे व ताबा एका दादा एजंट कडे आहे तरी वडिलाचे राहीलेले पैसे कसे मिळवावे कृपया मार्गदर्शन करावे
Question by किशोर खांडेभराड
19-10-2016
Kishgajanan@gmail.com
ऐपत प्रमाणपञाबाबत शासन निर्णय आहे का ? असेल तर द्याल please .
Question by शिवाजीराजे
18-10-2016
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरण पानबुडेसो, मोहसीनजी, नमस्कार,
1. दहन भूमी किंवा दफन भूमी हि गावठाणात असते का?
2. वाढीव गावठाण सोडून जुन्या गावठाणात असते का?
Question by अभिजीत
18-10-2016
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... महोदय ७/१२ च्या इतर हक्कात गेली १९३७ वर्षापासुन आजपर्यत संरक्षित कुळाची नोंद आहे तर ते नाव कमी कींवा काढुन टाकता येते का तसे अधिकार कोणाला आहेत कार्यपध्दती सांगा़
सौरक्षित कुल कृषक दिनी मानीव खरेदीदार असतो . त्या मुले त्याचे नाव कमी करता येणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजीत
18-10-2016
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... महोदय माझ्या शेतातुन
१९९० साली रस्ता तयार करण्यात आला
त्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे आजपर्यंत
भुसंपादन झाले नाही तो नकाशातही नाही
कींवा ७/१२ वरही नाही सदर रस्त्याचे अंदाजे २एकर
क्षेत्र आजही माझ्याच नावावर आहे तसेच PWD
विभाग सदर रस्ता आमचा नाही असे लेखी दिले
आह तसेच तहसिलदारांकडे रस्त्यासाठी कोणीही अर्ज केलेला नाही तेव्हा या रस्त्यावर माझा मालकी हक्क आहे त्याबाबत मला कोणतेही नुकसान भरपाई मिळालेली नाही तेव्हा आता सदर रस्त्याचे भुसंपादन होऊ शकते का कींवा मी न्यायालयाकडुन मी नुकसान भरपाइसाठी दावा लाउ शकतो
का? कींवा मी न्यायालयाकडुन रस्ता बंद करू शकतो का मार्गदर्शन करा
न्यायालयात जाणे हाच एकमेव पर्याय आपलेकडे आहे .
आपणास नुकसान भरपाई दिल्याशिवाय आपली जागा अशी संपादित करता येणार नाही.
घटनेच्या अनुच्छेद 31 अन्वये
No person shall be deprived of his property without following due procedure of law.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजीत
18-10-2016
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... ७/१२ इतर हक्कातील संरक्षित कुळाची वारस नोंद आता होऊ शकते का कार्यपध्दती सांगा
हो
नेहमीच्या वारस तपासाप्रमाणे प्रमाणे कुल वारस नोंद कार्तनेचे आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजीत
18-10-2016
abhijitkadam55@gmail.com
महोदय सिटी स न ची
मालमत्ता ९९ वर्षाच्या रजिस्टर भाडेपट्टयाने
१९८३ ला घेतला पट्टेदार म्हणुन नोंद आहे धारक
म्हणुन मुळ मालकाची नोंद आहे तर धारक म्हणुन
नोंद लावण्यासाठी काय करावे लागेल
भाडेपट्ट्याने जमीन घेतलेली असल्यास , धारक म्हणून नोंद कशी होईल ? पट्टेदार म्हणूनच नोंद होणार
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मोहित चौधरी
17-10-2016
chaudharimohit72@gmail.com
आदरणीय साहेब,
साहेब आम्ही २०१० पासून गावठाण परिक्षेत्रात राहत आहोत.गावठाण जागे साठी आम्ही ग्रामपंचायत ला अर्ज केला होता,त्याप्रमाणे ग्रामसभेत ठराव झाला व त्यानुसार आम्हाला ३०×५० अतिक्रमित जागा देण्यात आली.जागा मोजणी साठी ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच व गावातील पंच हजर राहून त्यांनी आम्हाला अतिक्रमित जागा मोजून दिली.आणि घरपट्टी चालू झाली. ८ अ उतारा आईचा नावाने दिला त्यात मालकीचे नाव-आईचे नाव आणि अतिक्रमण धारक असे आहे.
नवीन ग्रामसेवक यांनी केलेला बदल खालील प्रमाणे-
पण यावर्षी नवीन ८ अ चा उतारा ग्रामपंचायत मधून काढला असता मालकीचे नाव-सरकार आणि भोगवाटदार-आईचे नाव लिहिले आहे आणि या उताऱ्यात आईचे नाव पण बदले गेले,रस्ता पण बदलला आहे आणि त्यात 30,00000 ₹ एवढे valuation दाखवले आहे.
आम्ही ग्रामसेवक यांना विचारले असता त्यांनी आम्हाला उडवा उदवीची उत्तरे दिली आणि मागचा ठरावाची नक्कल सुद्धा मागितली (२०१० साली झालेला ठराव)तरी त्यांनी नाही भेटणार असे सांगितले. तरी साहेब या बाबत माहिती द्यावी.
मात्र अशी जमीन वाटप करण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी आवश्यक असते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
गावठाणातील जागा जर ग्राम पंचायतीचे मालकीची असेल तर , पंचायतीस जमीन वाटप करण्याचा अधिकार आहे . मात्र अशी शक्यता खूप कमी आहे .
गावठाणातील जागा शाशकीय मालकीची असते . त्यामुळे ग्राम पंचायतीस नियमानुकूल करण्याचा अधिकार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by santosh ShitoleDeshmukh
17-10-2016
sshitoledeshmukh6@gmail.com
तात्याबा यांनी गहाण खत करून1927 दिले पूर्वीची नोंद इतर हक्कात झाली होती पण तात्याबा यांनी भाडे चिट्ठी लिहून दिली त्यामुळे गुप्ते याची कब्जेदार हक्कात केली आहे गुप्ते यांनी 1948 ला तळेकर याना बेचनपत्र करून दिले त्यानंतर जंगलवहिवाटी मुळे तळेकर याची नोंद 7/12 झाली गुप्ते याची कब्जेदार सदरी नोंद असली तरी ताबा हा तात्याबा यांच्याकडे होता सवर्शित कुल म्हुणुन नोंद इतर हक्कात नोंद होती ती जमीन मिळवण्यासाठी काय करावे लागेल
Question by दिनेश दाभोलकर
17-10-2016
dabholkar.dinesh@gmail.com
आमच्या फेरफार मध्ये एका विक्तिचे नाव डी ए बोर्डच्या नियम प्रमाणे कमी झाले . या वर मला खालील प्रश्नावर मार्गदर्शन करावे हि विनंती
1) डी ए बोर्ड म्हणजे काय ,
2) तसेच गहाणदार घेणारा म्हणजे काय
Question by सुजित बर्गी
16-10-2016
sujitbargi95@gmail.com
सर्व प्रथम महाराष्ट्र सिविल सर्विस या संकेतस्थळवर कुंडेटकर साहेबांनी मी विचारल्येल्या प्रश्नांचे निरसन केल्या बद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे तसेच महाराष्ट्र सिविल सर्विस या वेबसाइट वरील सर्व सभासदांचे आभार मानतो.
नमस्कार सर ,
मला खालील प्रश्नांवर मार्गदर्शन आणि शंकांचं निरसन करावे हि विनंती .
मी दिनांक २ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रश्न क्रमांक १ विचारला होता.
प्रश्न १) एका व्यक्तीने पूर्वी जमीन खरेदी केली असून त्यांना तीन मुले होती त्यांची नावे रमेश , लक्ष्मण, अनिल अशी आहेत.ही जमीन त्यांनी तिघांमध्ये आपअपसात वाटून घेतली. आणि हद्दीच्या निशाणी ठरवून वाटण्या एकमेकांत मान्य केल्या. पण त्या तिघांमध्ये कोणताही लेखी करार झाला नाही फक्त एकमेकांच्या सहकार्याने तोंडी वाटण्या झाल्या. त्यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांच्या वारसांची नावे चढली ती अशी रमेश च्या जागी दीपक, लक्ष्मण च्या जागी कमला आणि अनिल च्या जागी मंगेश . ही जमीन सामायिक आहे शिवाय कोणाच्याच नावे स्वतंत्र क्षेत्र दर्शविलेले नाही, आणि खाते क्रमांक एकच आहे. तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन स्वतःच्या नावे करायची आहे परंतु त्यांच्याकडे वाटणीचा कोणताही पुरावा आता नाही, पण सातबारा वर मंगेश यांचे नाव आहे. आणि दीपक व कमला हे दोघे जण सहकार्य करत नाहीत. हरकत दाखवत आहेत तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन नावे करण्यासाठी काय करावे लागेल ?
या प्रश्नाचा उत्तर श्री. कुंडेटकर साहेबांनी दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करावा
अशाप्रकारे देऊन प्रश्नाचा निरसन केलं होतं तर या उत्तरा प्रमाणे दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करण्यासाठी काय व कोणती प्रक्रिया असू शकते? कृपया मार्गदर्शन करावे .
प्रश्न २) कानू नावाच्या व्यक्तीला पूर्वी कुळकायद्या नुसार जमीन मिळाली, त्यानुसार सात बारा मध्ये कुळाचे वर्णन : साधे कुळ ( 1 )
म. ग. पाटील यांचा ( 1 )
32 ग चा बोजा र.रु. 414.70 ( 1 )
हपते 5 ( 1 ) असे वर्णन आहे
वरिल व्यक्तीला (कानूला ज्याला कुळ कायद्यानुसार जमीन मिळालेली आहे ) तीन मुले होती त्यांची नावे रमेश , लक्ष्मण, अनिल अशी आहेत.ही जमीन त्यांनी तिघांमध्ये आपअपसात वाटून घेतली. आणि हद्दीच्या निशाणी ठरवून वाटण्या एकमेकांत मान्य केल्या. पण त्या तिघांमध्ये कोणताही लेखी करार झाला नाही फक्त एकमेकांच्या सहकार्याने तोंडी वाटण्या झाल्या. त्यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांच्या वारसांची नावे चढली ती अशी रमेश च्या जागी दीपक, लक्ष्मण च्या जागी कमला आणि अनिल च्या जागी मंगेश . ही जमीन सामायिक आहे शिवाय कोणाच्याच नावे स्वतंत्र क्षेत्र दर्शविलेले नाही, आणि खाते क्रमांक एकच आहे. तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन स्वतःच्या नावे करायची आहे परंतु त्यांच्याकडे वाटणीचा कोणताही पुरावा आता नाही, पण सातबारा वर मंगेश यांचे नाव आहे. आणि दीपक व कमला हे दोघे जण सहकार्य करत नाहीत. हरकत दाखवत आहेत तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन नावे करण्यासाठी काय करावे लागेल ? वर वर्णन केलेले कुळ सात बारा मधून काढून टाकण्यासाठी काय करावे लागेल ?
प्रश्न ३) वरील प्रश्न क्रमांक २ ला संधर्भात घेऊन याच जागेमध्ये शेती व्यवसायाला पूरक म्हणून पूर्वीपासूनचा अनिल यांचा गुरांसाठी गोठा आहे, हा गोठा ग्रामपंचायतच्या गाव नमुना नंबर ८अ रजिस्टर वर शिवाय असेसमेंट लिस्ट रजिस्टर वर पूर्वीपासूनच अनिल यांच्या नावे आहे. तर अनिल यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मंगेश याने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुरांसाठीचा गोठा ग्रामपंचायतच्या गाव नमुना नंबर ८अ रजिस्टर मध्ये व असेसमेंट लिस्ट रजिस्टर वर नमूद करून गोठा आपल्या नावे करून घेतला आहे. तर या सर्व मंगेशने केलेल्या कायदेशीर प्रक्रियेला दीपक व कमला यांनी विरोध करीत ग्रामपंचायतला हरकत पत्र सादर केला आहे तर काय करावे ?
Question by स्वप्नील प्रभू
16-10-2016
prabhuswapnil@yahoo.com
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील नोदणीकृत देवस्थानची मााहिती कोठे मिळू शकते
Question by Pradeep Rahate
15-10-2016
pradeeprahate19@gmail.com
mazya vadilanche naav satbaryvar swarkshit kul mahnun aahe jamin malkaane sader jamin parspaer veekun takli aahe atta amhi kai karave
खरेदी नोंदीवर मा.उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील करावे.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by संतोष शितोळेदेशमुख
14-10-2016
sshitoledeshmukh6@gmail.com
हिंदू वारसा हक्क कायदा 1956 नुसार मुलगा नाही फक्त मुलगी आहे तर वारसा हक्क कोणास मिळेल पुतण्याने सक्खा पुतण्या म्हणून वारस नोंद केली आहे काय करू मी मुलीचा वारस आहे
मुलीस वारस हक्क मिळणे आवश्यक . या अगोदर उत्तर दिल्याप्रमाणे , ज्या नोंदीने पुतण्याचे नाव दाखल आहे त्या विरुद्ध अपील दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपण सदर नोंदीवर मा.उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील करावे
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by KP
13-10-2016
krrishnakant@gmail.com
नमस्कार,
आम्हास हक्कसोड पत्रं करून घ्यावयाचे आहे. मला अशी माहिती मिळाली आहे कि आता चालू वर्षाचा सात बारा उतारा हस्तलिखित चालत नाही. इलेक्ट्रॉनिक प्रिंट आउट विथ डिजिटल सिगनेचर पाहिजे. कृपा करून मला हकंक सोड पत्रं करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावे आणि इलेक्ट्रॉनिक प्रिंट आउट विथ डिजिटल सिगनेचर सात बारा मिळवण्यासाठी कोणती वेब साईट आहे ते सांगणे किंवा कोणत्या शासकीय अधिकाऱ्याची भेट घ्यावी लागेल.
हक्कसोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने, सहहिस्सेदाराने, त्याचा त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील, स्वत:च्या हिस्याबातचा वैयक्तिीक हक्क, त्याच एकत्र कुटुंबाच्या सदस्याच्या किंवा सहदायकाच्या लाभात, स्वेच्छे्ने आणि कायमस्वकरुपी सोडून दिल्याबाबत नोंदणीकृत दस्त.
हक्कसोडपत्र कोणाला करता येते ?
एकत्र कुटुंबाचा कोणताही स्त्री अथवा पुरुष सदस्य, सहहिस्सेसदार हक्कसोडपत्र करु शकतो. एकत्र कुटुंबाचा कोणताही स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार फक्त् वारसहक्काने मिळालेल्याा किंवा मिळू शकणार्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या हिस्याच्या मिळकतीपुरते हक्क्सोडपत्र, त्याच एकत्र कुटुंबाच्या् स्त्री अथवा पुरुष सदस्य् किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात करु शकतो.
हक्कंसोडपत्र कोणत्या मिळकतीचे करता येते ?
फक्त वारसहक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणार्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या हिस्याच्या् मिळकतीपुरते हक्कसोडपत्र करता येते.
हक्कसोडपत्र कोणाच्या् लाभात करता येते ?
फक्त त्या्च एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात हक्कसोडपत्र करता येते. त्या एकत्र कुटुंबाचे सदस्य किंवा सहहिस्सेदार नसलेल्या व्यहक्तीच्या् लाभात झालेला दस्त हक्कसोडपत्र होत नाही. असा दस्त हस्तांतरणाचा दस्त म्ह्णून गृहीत धरला जातो व मुंबई मुद्रांक कायदा १९५८ मधील तरतुदींन्व्ये मूल्यांकनास व मुद्रांक शुल्कास पात्र ठरतो.
हक्कसोडपत्राचा मोबदला
सर्वसाधारणपणे हक्क्सोडपत्र विनामोबदला केले जाते परंतू हक्कसोडपत्र हे मोबदल्यासह असू शकते. मोबदल्यासह असणारे हक्कसोडपत्र त्याच एकत्र कुटुंबातील सदस्य किंवा सहहिस्से्दार यांच्या् लाभात असल्याने त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जात नाही तथापि हक्कसोडपत्र नोंदणीकृत असते त्यामुळे ते नोंदणी शुल्कास पात्र असते.
हक्कसोडपत्र नोंदणीकृत असावे काय?
होय, हक्कसोडपत्र हे लेखी आणि नोंदणीकृत असणे अत्यावश्यक आहे अन्यथा त्याची नोंद सरकारी दप्त्तरात होणार नाही.
हक्कसोडपत्र कसे करावे ?
एकत्र कुटुंबातील मिळकतीवरील हक्क सोडणारा आणि तो हक्क ग्रहण करणारा यांना स्वतंत्रपणे अथवा एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांना संयुक्तपणे, त्याच एकत्र कुटुंबातील कोणाही एकाच्या किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांतच्या लाभात हक्कसोडपत्राचा दस्त करता येतो.
असा दस्त रक्क्म रु. २००/- च्या (अद्ययावत तरतुद पहावी) मुद्रांकपत्रावर (स्टँप पेपरवर) लेखी असावा. याकामी जाणकार विधिज्ञाचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.
हक्कसोडपत्राच्या दस्तात खालील गोष्टी नमूद असाव्यात.
हक्कसोडपत्राचा दस्त लिहून देणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
हक्कसोडपत्राचा दस्त लिहून घेणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
एकत्र कुटुंबाच्या सर्व शाखांची वंशावळ.
एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सा निहाय विवरण.
दोन निष्पक्ष आणि लायक साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील व स्वााक्षरी.
दस्ताचे निष्पाषदन व नोंदणी.
हक्कसोडपत्र, स्वत:च्या हिस्याच्या सर्व किंवा काही मिळकतींबाबत करता येते. हक्क सोडपत्र स्वत:च्या हिस्याच्या कोणकोणत्या मिळकतींबाबत आणि कोणाच्या लाभात करीत आहे आणि स्वत:च्या हिस्याच्या् कोणत्या मिळकतींबाबत हक्कसोडपत्र केलेले नाही याचा स्पष्ट उल्लेख हक्कसोडपत्रात असावा. यामुळे भविष्यात कायदेशीर अडचण येणार नाही.
हक्क्सोडपत्राची मुदत
हक्क्सोडपत्र कधीही करता येते, त्यास मुदतीचे बंधन नाही. हक्क सोडपत्रासाठी ७/१२ अथवा मिळकत पत्रीकेवर कुटुंबाच्या सदस्याचे नाव दाखल असण्या ची आवश्यंकता नसते. फक्त तो एकत्र कुटुंबातील सदस्यी असल्याेचे सिध्द करण्या इतपत पुरावा असावा.
एकदा हक्कसोडपत्राचा नोंदणीकृत दस्त केल्याानंतर, हक्क सोडलेल्या मिळकतीत पुन्हा हक्क, हिस्सा मागण्यााबाबत कोणतीही कायदेशीर तरतुद नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
आपण तलाठी कार्यालयातून चालू संगणीकृत उतारा काढून दुय्यम निबंधक यांचेकडे हक्कसोडपत्र नोंदवून घ्यावे
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by निलेश
12-10-2016
nikysweet1@gmail.com
आदरणीय सर , nap 34 नुसार मी सर्व्हे न. 296 जागा खरेदी केली होती काही दिवसानंतर त्या जागेला लागूनच असलेली जागा ज्याचा सर्व्हे न 296/6 असा आहे व ती जागा पॉट खराब आहे असे खरेदी मध्ये नमूद आहे. पॉट खराब असलेल्या जागेची नोंद तलाठी दप्तर ला करायची होती. तलाठी यांनी असे सांगितले आहे कि पॉट खराब जागेची नोंद होत नाही..कृपया मार्गदर्शन करावे
याेग्य आहे. 'पोटखराब' क्षेत्राचे 'वर्ग अ' आणि 'वर्ग ब' असे दोन भाग पडतात.
'पोटखराब-वर्ग अ' म्हणजे खडकाळ क्षेत्र, नाले, खंदक, खाणी इत्यादीने व्याप्त असलेले क्षेत्र.
'पोटखराब-वर्ग अ' अंतर्गत येणार्या क्षेत्रावर महसूलाची आकारणी करण्यांत आलेली नसते. 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणारी जमीन शेतकर्यास कोणत्याही लागवडीखाली आणता येते. तथापि, अशी जमीन आकारणीस पात्र असणार नाही. 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्या जमिनीची आकारणी करायची असेल तेव्हा त्याबाबतचा प्रस्ताव तहसिलदारांमार्फत मा. जमाबंदी आयुक्त यांना सादर करून आदेश प्राप्त करावा लागतो. अशा आदेशानंतरच 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्या जमिनीची आकारणी करता येते. 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्या जमिनीत जर काही पीके घेतली असतील तर पीक पाहणीच्या वेळेस अशा पीकांची नोंद घेता येते.
'पोटखराब वर्ग ब' म्हणजे सार्वजनिक प्रयोजनार्थ म्हणजे रस्ते, पदपथ किंवा जलप्रवाह, कालवे, तलाव किंवा किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरणेत येणारे तलाव किवा ओढा यांनी व्यापलेली किंवा कोणत्याही जाती-जमाती मार्फत दहनभूमी किंवा दफनभूमी म्हणून वापरात असणारी किंवा पाण्याची टाकी, रहिवास वापर अशा काही विशिष्ठ प्रयोजनार्थ राखून ठेवलेली, आणि त्यामुळे लागवडीसाठी उपलब्ध नसलेले क्षेत्र. 'पोटखराब वर्ग ब' क्षेत्रावर कोणत्याही प्रकारची महसूल आकारणी करण्यात येत नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन राऊत
11-10-2016
sachinsraut@gmail.com
आमची जमीन शासकीय आहे आणि ती आमच्या आजोबा ला 100 वर्षे कराराने दिलेली आहे पण ती आमच्या वडिलांचे भावाच्या नावावर आहे पण आमची वारस नोंद झालेली नाही या बाबत मार्गदर्शन व्हावे ?
संबंधीत तलाठी यांना वारस नाोंदीसाठी अर्ज व पुरावे सादर करावे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन राऊत
11-10-2016
sachinsraut3@gmail.com
आमची जमीन शासकीय आहे आणि ती आमच्या आजोबा ला 100 वर्षे कराराने दिलेली आहे पण ती आमच्या वडिलांचे भावाच्या नावावर आहे पण आमची वारस नोंद झालेली नाही या बाबत मार्गदर्शन व्हावे ?
संबंधीत तलाठी यांना वारस नाोंदीसाठी अर्ज व पुरावे सादर करावे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
11-10-2016
dabholkar.dinesh@gmail.com
आपली जमीन आपल्याकडे कशी आली किंवा जमिनीचे खरेदीखत कसे काढावे , तसेच खरेदीखत काढण्यासाठी कोणत्या कागतपत्राची पूर्तता करावी लागते आणि खरेदीखत काढण्यासाठी कोणत्या सरकारी विभागाला संपर्क करावा .
आपले दुय्यम निबंधक( मुन्द्रानक व नोंदणी ) कार्यालयाकडे आपणास जमिनीचे दस्त मिळेल . अर्ज करा .हे कार्यालय तहसील कार्यलया परिसरात असते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
11-10-2016
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर
महाराष्ट्र सिविल सर्विस या संकेतस्थळवर आपण दिलेल्या माहिती बद्दल आम्ही आपली मनपूर्वक धन्यवाद .
आमचे खालील नमूद केलेले प्रकरणावर थोडे मार्गदर्शन हवे आहे
1) आमची जमीन सामाईक आहे त्या मध्ये पूर्वीपासून चार खातेक्रमांक दिसत आहे त्या मध्ये प्रत्यक्ष जमिनीचा ताबा हा आमच्याकडे आहे त्या मध्ये दोन असे खातेक्रमांक आहेत ज्यांची पूर्वजांची नवे आमच्या जमिनीमधून निघून गेलेली आहे आणि तसा मंजूर फेरफार 1958 रोजी चा आहे . जुने सातबारा 1956 रोजी चे काढले असता असे दिसते मंजूर फेरफार चा आदेश पारित केलेला दिसत नाही आणि आत्ता या दोन्ही खातेक्रमांकांनी यांच्या पुढील पीडीची नावे आमच्या सातबाराच्या नोंद केली आहेत .
2) दुसरा मुद्धा असा कि 20.06.1958 या एकाच दिवशी आमच्या पूर्वजांची नावे वरील दोन्ही खातेक्रमांकयाच्या जमिनीमधून निघून गेली आहेत आणि त्यांची पूर्वजांची नावे आमच्या जमिनीमधून निघून गेली आहेत . तसे मंजूर फेरफार त्यांच्याकडे पण आहे तरी देखील आज रोजी हि नावे बेकायदेशीरपणे नमूद केलेली आहेत .
3) पुर्विपार जमिनीचा ताबा , तसेच राहते घर हे आमच्या कब्ज्यामध्ये आहे , पुर्विपार वरील दोन्ही खातेक्रमांक कुठलेही जमीन कसत नाही फक्त नावे बेकायदेशीरपणे नमूद केलेली आहेत , आम्हीच जमिनीचे दस्त भरत आहोत तसेच राहते घराची घरपट्टी भरत आहोत .
4) आम्ही माहितीच्या अधिकारांमध्ये या लोकांची नावे कशी नमूद करण्यात आली याचे समाधान कारक उत्तर आम्हाला दिले नाही तसेच त्याची त्यांची कुठल्या कागतपत्राची पूर्तता केली या चे हि उत्तर नाही
वरील प्रकरणे 50 वर्षापूर्वेची आहे दुसरे आमच्या घरामध्ये कोणीही शिकलेले नव्हते पण आत्ता आम्ही हे पूर्वीचे कागतपत्रे काढली तेव्हा हि नावे बेकायदेशीरपणे नमूद केलेली आहेत असे समजते
आत्ता आम्ही या दोन्ही खातेक्रमांकावर कोणती कारवाही करू शकतो किंवा कोणता अपिलीय अर्ज करून हरकत घेऊ शकतो का या वर थोडे मार्गदर्शन करावे हि विनंती
तुमच्या पूर्वजांची नावे ज्या 1958 च्या मंजूर फेरफारने काढून टाकण्यात आली आहेत तो जोडून तहसिलदारकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्वये चूक दुरूस्तींचा अर्ज सादर करा. कलम १५५ अन्वये अर्ज सादर करण्यासाठी मुदतीचे बंधन नसते.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजीत
10-10-2016
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... .. महोदय माझ्या शेतातुन १९९० साली रस्ता तयार करण्यात आला त्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे भुसंपादन आजपर्यत झालेले नाही सदर रस्ता नकाशातही नाही कींवा याची नोंद ७/१२ अभिलेखावरही नाही सदर रस्त्यासाठी वापरलेले एकुण २ एकर क्षेत्र आजही माझ्याच नावावर आहे सदर रस्त्या बाब त PWD विभागाशी संपर्क केला असता हा रस्ता आमच्या मालकीचा नाही असे लेखी कळविलेले आहे तर हया रस्त्यावर माझाच मालकी हक्क आहे का ?
रस्ता काोणी, काोणाच्या आदेशाने तयार झाला याची चाौकशी करावी लागेल. एखाद्यावेळेस लगतच्या खातेदाराच्या अर्जावरून तहसिलदारांनी ताो मंजूर केला असावा परंतु ७-१२ त्याची नाोंद झाली नसावी. रस्ता जर सार्वजनिक वापरासाठी, इतर लाोकांच्या येण्या-जाण्यासाठी वापरात येत असेल तर ताो सावर्वजनिक मालकीचा हाोताो. शासन त्याचा मालक असते.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजीत
10-10-2016
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... महोदय माझ्या शेतातुन १९९० साली रस्ता तयार करण्यात आला त्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे आजपर्यंत भुसंपादन झाले नाही तो नकाशातही नाही कींवा ७/१२ वरही नाही सदर रस्त्याचे अंदाजे २एकर क्षेत्र आजही माझ्याच नावावर आहे तसेच PWD विभाग सदर रस्ता आमचा नाही असे लेखी दिले आहे तेव्हा या रस्त्यावर माझा मालकी हक्क आहे का? मी रस्ता बंद करू शकतो का मार्गदर्शन करा
रस्ता काोणी, काोणाच्या आदेशाने तयार झाला याची चाौकशी करावी लागेल. एखाद्यावेळेस लगतच्या खातेदाराच्या अर्जावरून तहसिलदारांनी ताो मंजूर केला असावा परंतु ७-१२ त्याची नाोंद झाली नसावी. रस्ता जर सार्वजनिक वापरासाठी, इतर लाोकांच्या येण्या-जाण्यासाठी वापरात येत असेल तर ताो सावर्वजनिक मालकीचा हाोताो. शासन त्याचा मालक असते. तुम्ही असा इतर लाोकांच्या येण्या-जाण्यासाठी वापरात असणारा रस्ता बंद करू शकत नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by अमितकुमार शिर्के
10-10-2016
amitkumar.shirke@gmail.com
मा. किरण पाणबुडे साहेब,
आम्ही चांदे खुर्द या गावच्या हद्दीत राहतो.
आम्ही वस्तीवरती राहतो आणि आमची वस्ती हि जवळ-जवळ 200 लोकसंख्येची वस्ती आहे.
आमची वस्ती हि चांदे खुर्द या
गावच्या हद्दीत आहे परंतु आमच्या घराच्या नोंदी ह्या चांदे बुद्रुक या गावच्या ग्रामपंचायत मध्ये आहेत. चांदे खुर्दच्या ग्रामपंचायत मध्ये नाहीत.
आमच्या जमिनी सुद्धा चांदे खुर्द च्याच हद्दीत आहे.
आमचे मतदान, रेशनकार्ड हे सर्व चांदे बुद्रुक या गावचे आहे.
दोन्ही गावामधील अंतर अवघे 2 km आहे.
आमच्या वस्तीवरील 10 लोकांनी व मी आपापल्या जमिनीमध्ये शासकीय योजनेमधून शेततळे बनविण्यासाठी अर्ज केला आहे.
शेततळ्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव आवश्यक असतो म्हणून आम्ही आमच्या रहिवाशी म्हणजे चांदे बुद्रुक या ग्रामपंचायतीमध्ये गेलो असता त्यांनी आम्हांस असे सांगितले कि आपली जमीन हि चांदे खुर्द या गावच्या हद्दीत आहे तरी आपण चांदे खुर्द या ग्रामपंचायत मधून ठराव घ्यावा.
आम्ही चांदे खुर्द मध्ये गेलो असता तेथे आम्हांस असे सांगितले की, आपणांस ठराव मिळणार नाही कारण आपण आमच्या गावचे रहिवाशी नाहीत तसेच आपले मतदान व रेशनकार्ड हे सुद्धा आमच्या गावचे नाही.
तसेच चांदे खुर्द या गावच्या सरपंच यांनी आम्हा वस्तीवरील सर्व लोकांची बैठक घेऊन असे सांगितले आहे की, आपण सर्वांनी लवकरात लवकर आपले मतदान व रेशनकार्ड हे चांदे खुर्द या ग्रामपंचायतीत स्थानांतरण करावे तसेच आपल्या घराच्या नोंदी आमच्या हद्दीत राहता म्हणून आमच्या ग्रामपंचायत मध्ये लावून घ्याव्यात. अन्यथा आम्ही आपल्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल करणार आहोत.
त्यांनी असे संगीतल्यानंतर आम्ही आमच्या सध्या रहिवाशी असणाऱ्या चांदे बुद्रुक या गावच्या सरपंचांची भेट घेतली व त्यांना सदर सर्व घटना कथित केली, परंतु त्यांनीही आमची मदत करण्यास नकार दिला व असे सांगितले की, आपण ज्या गावच्या हद्दीत राहता त्याच गावचे रहिवास स्वीकारा, आणि आपले मतदान, रेशनकार्ड व घरांच्या नोंदी आमच्या येथून चांदे खुर्द येथे स्थानांतर करा. कारण आपण चांदे खुर्द या गावच्या हद्दीत राहता.
1. आम्ही चांदे खुर्दच्या हद्दीत राहत असल्याने घराच्या नोंदी सुद्धा चांदे खुर्द मधेच घ्याव्यात का
2. आम्ही चांदे बुद्रुक मधील मतदार यादीतील नाव व रेशनकार्ड हे चांदे खुर्द मध्ये स्थानांतरित करावे का
3. आम्ही चांदे खुर्दच्या हद्दीत राहत असून चांदे बुद्रुकच्या ग्रामपंचायत मध्ये आमच्या घराच्या नोंदी आहेत तरी हे बेकायदेशिर आहे का व तसे असल्यास आमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते का
4. आमच्या घरांच्या नोंदी चांदे खुर्द मध्ये नसल्याने त्यांना आम्हांस ठराव न देण्याचा अधिकार बनतो का
प्लिज सर आपण लवकरात लवकर माझ्या समस्येचे निराकरण करावे हि विनंती
आपला आभारी
अमित शिर्के
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
