जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार साहेब,
महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमातील तरतूदीस अधीन राहून असा शेरा सातबारा मधील इतर हकात नोंद केली असल्यास ती जमीन विकत घेता येते का ? विकत घेतल्यास सातबारामध्ये कब्जेदार सादरी विकत घेणाराचे नाव दाखल होईल का ? त्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे जरुरीचे आहे का? त्याचा काही नजराणा शासनास भरावा लागेल का ? समजा रीतसर दस्त केल्यास सातबारामध्ये नावं लावण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती .
नमस्कार सर, माझ्या मित्राच्या आजोबाच्या नावाची जमीन आहे त्याच्याकडे १९४९ चे सातबारा प्रती आहेत ते त्याच्या आजोबाच्या नावे आहेत व आता सद्यस्थितीत प्रांतिक सरकार यांचे नावे आहे. सदर जमिनीच्या सर्वे क्रमांकावरुन नगर भूमापन क्रमांक कश्या पध्दतीने काढता येतील व कोणत्या कार्यालयातुन माहिती उपलब्ध होईल तसेच उपरोक्त जमीनीचे गटबुक कश्या पध्दतीने व कोणत्या कार्यालयातुन मिळविता येईल.
आपण उपाधीक्षक भूमी अभिलेख यांचे कार्यालयात जा . त्या ठिकाणी चौकशी नोंदवहीवरुय्न आपणास सर्वे नंबर वरून नागरभूमान no काढता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, आमची कुळकायद्यानी आलेली जमीन होती. ती एका वक्तीने कलम ४३ नुसार जिल्हधिकारींची परवानगी न घेता खरेदी केली. नंतर परवानगी ३ वर्षांनी घेतली. तसेच परवानगी आल्यावर ४ महिन्यांनी सदर जमिनीच्या सातबारावर कलम ४३ नुसार कलेक्टर च्या आगाऊ परवानगी शिवाय सदर जमीन कोणासही गहाण,दान, विकू नये असा फेरफार तसेच ४३ ला पात्र असा शेरा लागला..
तर हा फेरफार घडल्यावर ४ महिन्यापूर्वी घेतलेली
परवानगी रद्द होते का? का हा फेरफार घडल्यापासून परत नवीन परवानगी काढायची होती? तर ३ वर्षांपूर्वी झालेले व्यवहार हा कायदेशीर आहे का? का रद्द होतो?.....कृपया मला कळवा....
जमीन खरेदी करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक होते . खरेदी पचश्चत परवानगी देता येत नाही . अश्या प्रकरणात कलाम ८४ क क खाली कारवाई अपेक्षित आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, आमच्या शेती जवळ एक पाझर तलाव आहे . शेजारच्या एका शेतकऱयाने त्या पाझर तलावाच्या दहा मीटरच्या अंतरावर एक विहीर खोदली आहे. अशी विहीर खोदण्यासाठी शासनाची परवानगी लागत नाही का ? जेणे करून मलाही पाझर तलाव जवळ विहीर खोदता येईल. कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
पाझर तलाव जर जिल्हा प्राधिकरणाने , Public Drinking Water Source म्हणून अधिसूचित केला असेल तर , The Maharashtra Ground Water ( Management and development ) Act 2009 च्या कलम २१ अन्वये , ५०० मित्राच्या आत विहीर खोदता येणार नाही . मात्र पाझर तलाव अधिसूचित नसेल तर , विहीर खोदण्यास कोणतीही कायद्याची बाधा नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by राकेश
11-06-2017
r.kakare@gmail.com

संरक्षित कुळ आणि एकत्र कुटुंब मॅनेजर ह्यांचा संबंध काय असतो. संरक्षित कुळ कोण्या एकाच्या नावाने असेल तर एकत्र कुटुंबातील इतरांना त्यात काय हक्क न अधिकार असतात. ह्या विषय माहिती हवी आहे.
नमस्कार सर ...माझा प्रशा असा होता कि माझा मालकीचा ग्रामपंचायत गावठाण मध्ये २५०० sq फट प्लॉट १९८५ ला खरेदी खाता नुसार रिजिस्ट्रेड खरेदी केली आहे. पण तेंव्हा पासून सादर जागेची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात केल्या गेली नाही, सध्या त्या जागेवर अतिक्रमण केले आहे . २०१० पासून जागेची नोंद करण्यासाठी आम्ही अर्ज करत आहोत पण ग्रामसेवकाने नोंद घेतली नाही.. परत आम्ही ग्रामसेवकाला नोंद करण्यासाठी विनंती केली आहे...व नोंद करण्यासाठी सर्च रिपोर्ट मागितला आहे. सर्च रिपोर्ट ची गरज आहे का. याबाबत मार्गदर्शन करावे. सदर जागेवर एका व्यक्ती ने अतिक्रमण केले आहे व त्याचा नावे खोटी नोंद घेतली आहे.
गावठाण जर unsurveyed असेल तर , अश्या जागेचे अधिकार अभिलेख म्हणजे , ग्राम पंचायत कर आकारणी पत्रक . आपण हि जागा ज्याच्याकडून घेतली , त्याचे नाव कर आकारणी नोंदवहीत नमूद होते का ? जर आपण ज्या इसमाकडून खरेदी केली त्याचे नाव , अश्या आकारणी नोंद वहीत असेल तर , आपण गट विकास अधिकारी यांचे कडे , ग्राम सेवकाने जी खोटी नोंद घंटील्याचे आपण नमूद केले आहे त्या विरुद्ध अपील करा .
मात्र जर आपण ज्याच्याकडून खरेदी केली आहे त्याचे तत्कालीन वेळी मिळकत आकारणी नोंदवहीत नाव नसेल तर , आपले नाव गावठाणातील जागेला लागणार नाही
गावठाण surveyed असेल तर , त्या मिळकरीचा मिळकत उतारा , आपण खरेदी करते वेळी कोणाचे नावावर होता , त्या वर , आपले नाव लागणे अवलंबून आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब,
महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमातील तरतूदीस अधीन राहून असा शेरा सातबारा मधील इतर हकात नोंद केली असल्यास ती जमीन विकत घेता येते का ? विकत घेतल्यास सातबारामध्ये कब्जेदार सादरी विकत घेणाराचे नाव दाखल होईल का ? त्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे जरुरीचे आहे का? त्याचा काही नजराणा शासनास भरावा लागेल का ? समजा रीतसर दस्त केल्यास सातबारामध्ये नावं लावण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो का?
नमस्कार सर , गृहनिर्माण सहकारी संस्था याचे री डेव्हलपमेंट म्हणजे काय ? संस्थेच्या नावे जमीन किंवा सदनिका धारकांच्या नावे जमीन बाबतचे हक्क नसताना री डेव्हलपमेंट करता येते का ? सभासदांच्या नावे महानगर पालिकेचा कर पाणी बिल लाईट बिल येत आहे. त्यांना कोणते अधिकार प्राप्त होतात , जमीन मालक यांना दुसऱ्या व्यक्तीस जमीन विकत येते का ? पूर्वी जमीन मालकाने एका विकासकाला विकास करार करून दिला होता. तसेच कुलमयूखत्यारपत्र करून दिले होते. सदरचे कुलमुखत्यारपत्र व विकास करार नामा रजिस्टर केला नाही. विकासकाने सदनिका धारकांना सर्व सदनिका रजिस्टर नोंदणी करून विकले नाहीत. अश्या परिस्थितीत सानिका धारकांना जमिनीवर काही हक्क सांगता येतील का?. काही हक्क सांगण्या करीता कोणता कायदा आहे का? कृपया मार्गदर्शन मिळावे. हि विनंती
सर
जात अर्जदारांनी जात प्रमाणपत्रसाठी जर रक्तातील नात्याची वंशावलीनुसार सर्व सदशांचे जातप्रमाणपत्र किंवा जातपडताळणी प्रमाणपत्र प्रस्ताव सोबत सादर केल्यास १९५० च्या मानीव पुरावाची गरज असेल का
होय मूळ रहिवाशी असलयाचे सिद्ध करणे साठी

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

नमस्कार सर,प्रथम तुमचे आभार ठुमरी मार्गदर्शना मुले मी खूपच यौग दिशेने जात आहे . आटा माझ्या एक प्रश्न आहे कि ,फेरफफर दुरुस्थी साठी ताल .कोरेगाव येते माननीय प्रातःशाईब यांच्याकडे केश चालू होती दोनी बाजूचे म्हणणे मांडून झाले आहे पण सर अजून कोणताच निर्णय मला लेखी अथवा तोंडी समजला नाही .मी वकिलांच्याकडे विचारणा केली असता सांगण्यात आले कि निकाल तुम्हाला पोस्टाने कळवळा जाईल .हाय गोष्टीला १ वर्ष होऊन गेले आहे .मला तो निकाल मिळवण्यासाठी काय करावे लागेल कृपया मागर्दर्शन करा .
नवीन कायदा दुरुस्तीनीसार , अपील दाखल झाल्यापासून १ वर्षाचे आत त्यावर निर्णय घेणे , महसूल अधिकारी यांना क्रमप्रपात आहे . आपण संबंधित प्रांत सहेब्बन भेटून हि बाब निद्रशनास आणून द्या .
तसेच जिल्हाधिकारी यांचेकडे हि लेखी पत्राद्वारे कळवा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vnyk
09-06-2017
vnyk1234@gmail.com

नमस्कार,

जमिनीची मोजणी करावयाची आहे पण लगतचे कब्जेदार आणि त्यांचे पत्ते चौकशी करून सुद्धा उपलब्ध होत नसतील तर त्यांच्याविना सरकारी मोजणी होऊ शकते का ?

जमिनीची मोजणी करणे अनिवार्य आहे कृपया मार्ग सुचवा.


लगतचे कब्जेदारांचे पत्ते उपलब्ध होत नसतील तर , महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम २३० प्रमाणे , मोजणी नोटीस , कब्जेदारांचे जागेवर प्रसिद्धही करण्याची तरतूद आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्‍कार सर माझा प्रश्‍न असा आहे की, A नावाचा कर्मचारी महसूल अहर्ता परीक्षा उत्‍तीर्ण नाही. B नावाचा कर्मचारी महसूल अहर्ता परीक्षा उत्‍तीर्ण आहे. पण जेष्‍ठते मध्‍ये A कर्मचारी सिनीयर आहे व B कर्मचारी ज्‍युनीयर आहे. A कर्मचारी यांची जेष्‍ठता कायम आहे कारण त्‍यांच्‍या तीन संधी झाल्‍या नाही व 9 वर्षाची सेवा पण झाली नाही. मग आता B कर्मचारी ज्‍युनीयर असला तरी परीक्षा लवकर पास झाला म्‍हणून त्‍यांना लगेच पदोन्‍नती देण्‍यात येते का सर, याबाबत योग्‍य मार्गदर्शन करावे. हि नम्र विनंती
पदे जशी रिक्त होतात , तसे पद्दोनीतीची बैठक होते . बैठकीमध्ये आपण पदोन्नतीसाठी पात्र यादीमध्ये येत याल, तर आपणास पदोन्नती मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सरजी आपणास विचारलेल्या प्रश्नाची किती दिवसात आपण उत्तर देता ?
महोदय , येथे अधिकारी त्यांच्या कार्य व्यापातून आपला बहुमूल्य वेळ काढून उपलब्धतेनुसार उत्तरे देतात, धन्यवाद.

Reply by MCS Maharashtra | इतर

माझ्या बिनशेती जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर 'ओपन बिनशेती' असा उल्लेख आहे. त्याचा अर्थ काय होतो ?
ओपन बिनशेती अशी संकल्पना नाही . आपली मिळकत बिनशेती असल्यास , ओपन हा शब्द वगळण्याबाबत कलाम १५५ ( MLRC 1966 ) खाली तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझी बिनशेती जमीन ग्रामपंचायत रस्त्यालगत आहे जी मी १० वर्षांपर्वी खरेदी केली होती. ग्रामपंचायत रस्त्यालगत माझ्या हद्दीच्या आतील बाजूस पूर्वीपार ४ फूट गटार होते व जमिनीतील प्रवेशासाठी जागा खरेदीवेळी गटारावर मोरी बांधलेली होती त्याच्या खालून पावसाळी पाण्याचा निचरा होतो.

ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार माझ्या हद्दीत गटारासाठी मी आता ४ फुटांच्या ऐवजी ८ फूट रुंदीचे अंतर गटारासाठी ठेवले आहे. त्यामुळे आता माझ्या हद्दीतील मोराची रुंदी कमी झाली आहे. ग्रामपंचायत मला नवीन रुंद मोरी बांधायला सांगत आहे, परंतु हा खर्च करणे शक्य नसल्याचे मी कळविल्यावर 'पावसाळी पाण्याचा निचरा' होणेसाठी ८ फूट रुंदीचे अंतर मोरीसाठी आवश्यक असून मी मोरी रुंद न केल्यास मूळची मोरी तोडून टाकू व पावसाळी पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करू असे ग्रामपंचायतीने कळविले आहे. ग्रामपंचायतीस असे करण्याचा अधिकार आहे का ? गेली १० वर्षे असलेली प्रवेशासाठीची मोरी तोडून माझा वहिवाट मार्ग ग्रामपंचायत बंद करू शकते काय ? मी हद्दीतील प्रवेशासाठी ग्रामपंचायत रस्त्यालगत मोरी बांधली तेंव्हा कोणतेही परवानगी न घेतल्याने ती बेकायदेशीर आहे असे ग्रामपंचायत सांगते आहे. ग्रामपंचायत रस्त्यावरून हद्दीत प्रवेशासाठी मोरी बांधण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते का ?
आपण मोरीसाठी ४ फूट ऎवैजी ८ फूट जागा सोडली आहे . मात्र ग्रामपंचायत आपणास , मोरीचे बांधकाम करण्यास सांगू पाहत आहे . मोरीचे बांधकाम ग्रामपंचायतिने करणे आवश्यक . जर सध्या . ग्रामपंचायत ८ फूट मोरीचे काम न केल्यास , मोरीवरील बांधकाम तोडण्याची सूचना आपणास करत आहेत , आपण सध्याचे मोरीमुळे , पाण्याचा निचरा होत नाही का याची खात्री करा .
आपण ग्रामपंचायतीचे पत्रास उत्तर द्या .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर विभागीय दुय्यय सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) या परीक्षेच्‍या शासन निर्णयातील नियम क्र. ८ नुसार सदर परीक्षा उत्‍तीर्ण होण्‍यासाठी प्रत्‍येक वि‍षयात कमीत-कमी ४० टक्‍के गुण व संपुर्ण परीक्षेत एकूण गुणाच्‍या ५० टक्‍के गुण (म्‍हणजे १००० पैकी ५०० च्‍या वर गुण ) मि‍ळाले तर सदर परीक्षा उत्‍तीर्ण झाल्‍याचे जाहिर केले जाते. तसेच नियम क्र. १० नुसार जर परीक्षार्थी परीक्षा नापास झाला तर त्‍याने कोणत्‍याही व‍िषयात किंवा व‍िषयांमध्‍ये त्‍याने ६० टक्‍के किंवा त्‍यापेक्षा जास्‍त गुण मिळविले तर त्‍याला त्‍या विषयाला पुन्‍हा बसण्‍यापासुन सुट देण्‍यात येते.

प्रश्‍न खालील प्रमाणे-
(१) तीन व‍िषयाला यापुर्वीच्‍या परीक्षेत सुट म‍िळाली होती. म्‍हणून फक्‍त ३ विषयाची पुन्‍हा परीक्षा दिली तर संपुर्ण परीक्षा उत्‍तीर्ण होण्‍यासाठी तीन्‍ाही विषयात प्रत्‍येकी ६० टक्‍के गुण मिळवावे लागतील कि ४० टक्‍के गुण मिळवावे लागतील सर.
कृपया करुन मार्गदर्शन करावे. खुप मोठी मदत होईल सर.
आदरणीय महोदय माझा प्रश्‍न असा आहे की, माझे आजीचे नावावर २ एकर जमीन होती, त्‍यांचे निधन सन २००० मध्‍ये झाले पण माझे आजीने कोणत्‍याही मुलाच्‍या नावाने मृत्‍युपत्र लिहून दिलेल नाही.
मग आजीचे निधन झाल्‍यानंतर त्‍या जमीनीच्‍या ७/१२ वर वारस म्‍हणून फक्‍त माझे वडीलांचे नाव आजच्‍या तारखेपर्यंत आहे. माझे वडीलांचे दोन भाऊ सदर जमीनीच्‍या ७/१२ वर वारस म्‍हणून आमचे नाव नोंदविण्‍यात यावे म्‍हणून तलाठी साहेबांना अर्ज केला तर तलाठी साहेब त्‍यांचे नाव वारस म्‍हणून ७/१२ वर नोंदवतील का सर ?
कृपया करुन याेेग्‍य ते मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
आपले कथनानुसार , आपले आज्जीस तीन मुले आहेत . त्यामुळे साहजिकच अन्य दोन वारसांची नावे लागणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
जमिनीची मोजणी केल्यास मोजणी अधिकारी अतिक्रमण असल्यास ते काढून देऊ शकतात का?
जर बाजूच्या शेतकऱ्याने अतिक्रमण काढण्यास मनाई केली तर त्याची तक्रार कोठे करावी?
शेत जमिनीवर असणारे अतिक्रमण काढण्यास तलाठी अधिकारी मदत करतात का?
त्यांची मदत होऊ शकते का ? उत्तर द्या?
मोजणी अधिकारी मोजणी कधी शकत नाही
तलाठी हि खाजगी जमिनीचारील अतिक्रमण काढू शकत नाही .
आपणास ते अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने काढावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

MLRC act 1966 अंतर्गत सेक्शन 44 मधील Amendment 2014 नुसार Ddevelopment plan मध्ये समावेश असलेल्या नगरपालिका हद्दीतील जागा अक्रुषिक वापरासाठी कलेक्टर NA ची गरज नाही परंतु तहसीलदारांकडील NA ची सनद मिळवण्यासाठी काय करावे
नमस्ते श्री किरण पाणबुडे साहेब या पूर्वी मी आपणास २ ई-मेल पाठवले होते त्याचा आपल्या कडून कुटला ही प्रतिसाद मिळाला नाही .मी नमूद केलेले प्रश्नांचे उत्तर अपेक्षित आहे १- ७/१२ मध्ये इतर हक्कात महाराष्ट्र खाजगी वन आधीनियमतील तरतुदीस अधीन राहून अशी नोंद असताना अशा शेत जमीची खरेदी विक्री करता येते का? त्याची शासन शासकीय परवानगी घेणे आवश्यक आहे का ? जर खरेदीदाराने सदर जमीन रीतसर खरेदी केलीतर त्याच्या नावाची नोंद 7/12 मध्ये होईल का ? कृपया माहिती मीळावी ही विनंती.
नमस्कार साहेब माझा प्रश्न असा आहे कि मी एक गृहनिर्माण संस्थे मध्ये सदनिका विकत घेतली आहे. सदनिका विकत घेताना संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र सदनिकेचा महानगरपालिका कर पावती , नळाचे जोडणी बिल पाहून खरेदी केली आहे. संस्थेचे प्रमाण पत्र गृहनिर्माण संस्था असून त्याचे वर्गीकरण भाडेकरी सह भागीदारी संस्था असे आहे. आता संस्थेचे नावे कोणताही महानगरपालिकेचा कर येत नाही. सातबारा मध्ये कोठेही संस्थेचे नावाचा उल्लेख नाही. अनधिकृत बांधकाम असा उल्लेख आहे. जागेचा बिन शेती आदेश नाही. महानगरपालिकेने आराखडा मंजूर केलेला नाही. बांधकाम परवाना दिला नाही. टायटल मध्ये चुकीची माहिती आहे. सातबारामध्ये कु.का.की.४३ अशी नोंद आहे. पूर्वी १९८८ साली विकासकरारनामा व कुलमुखत्यार करून दिले होते त्या आधारे विकासकाने सर्व सदनिका अन रजिस्टर सदनिका धारकांना विकल्या सातबारा मालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांची नोंद झाली. सातबारातील वारस जमीन मालकांनी पुन्हा ती जमीन विकासकाला कन्व्हेन्स डिडने विकली आहे.
आता संस्थेचे नावे जमीन होईल का? सदनिकेवर सदनिका धारकांचा मालकी हक्क काय असणार आहे. विकासक यांच्या विरुद्ध किंवा जमीन मालकानं विरुद्ध काही दावा दाखल केला तर फायदा होईल का? विकासक आम्हाला घराच्या बदल्यात त्याचा ठिकाणी २७% जागा वाढवून देतो आहे. ते मान्य केलेले चांगले का दावा दाखल केल्याने फायदा होईल . या बाबत मार्ग सुचवावा. हि विनंती
महोदय,
मी माझी जमीन रजिस्टर गहाण खत करून माझ्या काकांना दिली होती
ती मी आता त्यांचे पैसे देवून गहाण फेड दस्त करून घेतला आहे मी जमीन सोडवली आहे
परंतु माझ्या सातबारावर माझ्या काकांचेही नाव चढले आहे त्यासाठी मी तलाठी कडे अर्ज केला होता
तलाठी कडे असणाऱ्या रजिस्टर वर काकांच्या सह्या हव्या आहेत असे तलाठीचे म्हणणे आहे
परंतु ते आता सह्या करत नाहीत मी काय करावे माझ्या सातबारा वर असलेले काकांचे नाव कसे कमी होईल ते सांगावे

Question by संकेत
05-06-2017
sanketgujar@gmail.com

आदरणीय साहेब, आपण आपल्या कामांमधुन वेळात वेळ काढुन देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खुप धन्यवाद. माझा पुढील प्रश्न पुढीलप्रमाणे – संपादित जमीनीचा मोबदला देण्यात येतो त्यापैकी अर्धवट रक्कम स्विकारलेली आहे आणि अर्ध्या रकमेचा एक भाग न्यायालयात आणि एक भाग इन्कम टॅक्स विभागात जमा केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सदर जमीनीचा शासनातर्फे केवळ कब्जा घेण्यात आलेला नाही म्हणुन, सदर मिळकत भुसंपादन कायदा -१८९४, कलम ४८ पोटकलम १ अन्वये मुळ मालकाला परत देता येउ शकते का तशी कायद्यामध्ये तरतुद असल्यास त्याची सविस्तर माहिती देण्यात यावी ही नम्र विनंती..
मूळ मालकाला जमीन परत देता येणार नाही कलाम ११ खाली निवडया नंतर जमीन govt. ची होते

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

महोदय , आमचे ७/१२ वर ०.१५ हेक्टर शेत्र पोटखराब आहे , तथापि सध्या संपूर्ण क्षेत्र बागायती आहे , तरी पोटखराब क्षेत्र बागायती म्हणून वर्ग करता येईल का ?
सहा . संचालक भूमी अभिलेख यांचे कडे अर्ज करावा व आदेश प्राप्त करून घेणे

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

आदरणीय सर,महा margalagat seva rasta सोडणे आवश्यक आहे का?tyababt काही शासन nirnay आहे का? krupaya margdarshan होणेस विनंती...

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3