जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by संदीप वळवी
06-09-2016
sandipv9@gmail.com
मा. महोदय, नवनियुक्त कर्मचाऱ्यास किरकोळ, वैद्यकिय, अर्जित रजा यांचा 6 महिन्याच्या आत लाभ घेता येतो किंवा कसे? कृपया मार्गदर्शन व्हावे.
होय.
6 महिन्या मध्ये 15 दिवस अर्जित राजा खात्यात जमा होते . आपला सेवेत किती कालावधी झाला आहे या वरून ठरवा .
किरकोळ रजा वर्षाला 12 आहेत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्री डी. डी. लोखंडे
06-09-2016
nikysweet1@gmail.com
nikysweet1@gmail.com
Sunday, August 21, 2016
माननीय सर नमस्कार ,
शासकीय कर्मचारी सेवेत असताना सलग तीन वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाल्यास एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा नियम आहे . तसेच सलग पाच वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाल्यास दोन आगाऊ वेतनवाढ देण्याचा नियम आहे. मला सलग पाच वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाले असताना सुद्धा एकच आगाऊ वेतनवाढ मंजूर केली. यावर कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
.किंवा न्यायाधिकरणाकडे दाद मागावी
Reply By - कुंडेटकर संजय नरेंद्र
Dy. Coll. Satara
वरिष्ठांकडे लेखी विनंती करावी.
Reply By - कुंडेटकर संजय नरेंद्र
Dy. Coll. Satara
धन्यवाद सर आपण मार्गदर्शन केल्याबद्दल. पण कालावधी बराच होऊन गेला. अपील करण्यासाठी कालावधी असतो का. सण 2006-07 मधील प्रकरण आहे सर.
आपण ज्या कार्यालयात कार्यरत आहेत , तेथील आस्थापना लेखा विभागाकडे असलेल्या अतिकामामुळे त्यांचेकडून अश्या वेतन वाढ काढल्या जात नाहीत . आपण हि बाबा त्यांचे निदर्शनास आणून द्या . अथवा आपले विभाग प्रमुख यांना भेटून आपली व्यथा मांडा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमेय सावे
05-09-2016
ameysave21@gmail. com
आमच्या गावात एका व्यक्तीने गटारात अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. संबंधित व्यक्तीला तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 52 अन्वये मनाई हुकूम दिला होता परन्तु काही ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे याबाबत कारवाईस टाळाटाळ करण्यात आली तरी याबाबत कोणाकडे दाद मागावी व ह्या ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध कोठे तक्रार करावी व तक्रार करण्याची प्रक्रिया काय?
आपण या ग्राम पंचायत सदस्याविरद्ध जिल्हाधिकारी यांचेकडे अनर्हता अर्ज दाखल करा .
महाराष्ट्र ग्राम पंचायत कायदा 1958
कलम 14 (1) (j3)
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vishalrajeshinde143@gmail.com
05-09-2016
vishalrajeshinde143@gmail.com
पिक पाहणी ७/१२ वर लावुन घेण्यासाठी तलाठी जर अडचण देत असेल तर कोणाकडे दाद मागावी व रितसर पिकपाहणी लावुन घेण्यासाठी काय करावे.
उत्तर मिळावे.
Question by प्रशांत पाटील
05-09-2016
pbpatil.mca13@gmail.com
मूळ मालकाच्या समतिविना(मालक व कुळ नाते सिद्ध होत नाही पण इतर हक्कात सर्व साधारण कुळ म्हणून दोन शेतकऱ्यांची नोंद आहे ) साधारण 50 वर्षे दोन शेतकऱ्यांच्या ताब्यात जमीन असून,त्यांच्याकडे (पीक पाहणी सदरी नावे आहेत) कब्जा आहे व त्यापैकी एक मयत असून ते पीक पाहणी व इतर हक्कात वारस नोंद करू शकतात का?तसेच ते शेतकरी दिवाणी न्यायालयात adverse possession चा दावा दाखल करू शकतात का ? यासंबंधी माहिती मिळावी .
1. पीक पाहणी सदरी असलेले नाव हे , कसणारी व्यक्ती याने दुसऱ्याचे मालकीची जमीन , मालकाचे संमतीने कसल्याशिवाय लावले जात नाही .
2. पीक पाहणी सदरी असलेले नाव हे त्या ठराविक एका हंगाम पुरते असते . त्यास वारस लावता येत नाही
3. शेतकरी adverse Possession चा दावा दाखल करू शकतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by saddam
04-09-2016
saddam@gmail.com
शासकीय जमिनीची नोंद कोणत्या गाव नमुन्यात असते
महााराजस्व अभियाना अंंतर्गत आता प्रत्येक तहसिल स्थरावर शासकिय जमीनी संदर्भात डेटा बँक तयार करण्ेा बाबत निर्देश आहेेत. व संबंंधीत माहीती ही त्या जिल्ह्याच्या संकेत स्थळावर सुध्दा असेल.
Reply by कामराज बसवंन्ना चौधरी | तलाठी
Question by दिनेश दाभोलकर
04-09-2016
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
आम्ही महाराष्ट् जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्व्ये पोकळ नोंद केलेले फेरफार रद्ध करण्यासाठी तसेच त्यांची नावे सातबारातून रद्ध करण्यासाठी अपिलीय अर्ज तहसीलदार यांना करणार आहोत , त्यावर वरील वरील अधिनियम आणि कलम अर्जावर नमूद करावे का तसेच सदर फेरफार सुमारे 58 वर्षापूर्वीचे आहेत . तर अर्ज सोबत विलंब माफी चा अर्ज करावा लागतो का .तसेच विलंब माफी चा नमुना कसा असावा ,या वर थोडे मार्गदर्शन करावे
कलाम 155 खालील लेखन प्रमादचूक दुरुस्त करण्यासाठी , काळ मर्यादा नाही. त्यामुळे विलम्बमाफीचा अर्ज देण्याची गरज नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
04-09-2016
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
आमच्या सातबारा मध्ये 1980 वर्षी एक नाव पोकळ नोंद केले गेले , पण ज्या वेक्तीचे नाव नोंद केले त्यांच्या वडिलांचे नाव 30 वर्षांपूर्वी कायमचे निघून गेले आहे तसा मंजूर फेरफार आमच्याकडे आहे , या बद्दल आम्हाला कुठलीही नोटीस आली नाही , मला असे विचाराचे आहे कि जेव्हा एखादा नवीन फेरफार मजूर होण्यापूर्वी त्याची नोटीस मूळ कब्जेदार किंवा वहिवाटदार येत नाही का
सदरचा मंजूर फेरफार तलाठी आणि तहसीलदार कार्यालयाला दाखवला तर ते आम्हाला 50 वर्षे तुम्ही कुठे होतात असे तलाठी आणि तहसीलदार कार्यालाकडून विचारण्यात येत , या वर आम्ही काय करावे या वर मार्गदर्शन करावे हि विनंती
आपण 155 खाली लेखन प्रमाद दुरुस्त करण्याचा अर्ज दया. या अर्जाला काळ मर्यादा नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नंदकिशोर रामराव सोनवणे
03-09-2016
nrsonvane@gmail.com
नमस्कार सर
सर मार्गदर्शन करने
सर एका ७/१२ च्या मालकी हक्कामधे " मसनवट सरकारी जमीन " अशी नोंद आहे .सर मुस्लिम समाज त्या जमीन मधे पुर्वी पासून दफनविधी करत आहे .सर अता त्या मुस्लीम समाजाने त्या ७/१२ " मसनवट सरकारी जमीन " एैवजी मुस्लिम कब्रस्तानची नोंद ७/१२ मालकी हक्कात करावी म्हणून तहसिल कार्यालयात अर्ज केला आहे .
सर मला तहसिलदार साहेबांनी पत्र दीले आहे की आपण नियमानुसार आवश्यक स्थानिक प्रक्रिया पुर्ण करून त्या ७/१२ च्या इतर अधिकारामधे " मुस्लिम कब्रस्तान " ची नोंद घेन्याची कार्यवाही करावी. असे पत्र दीले आहे.
सर या प्रकरणामधे नेमकं मी काय कार्यवाही करू या बाबत योग्य ते मार्गदर्शन करने ही नम्र विनंती ..
सरकारी मसणवता साठी जमीन प्रदान करण्यात आली आहे कि मूळ आकारबंद ला मसणवठा म्हणून नोंद आहे .
जिल्हाधिकारी यांचे आदेश आवश्यक .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
सरकारी मसणवता साठी जमीन प्रदान करण्यात आली आहे कि मूळ आकारबंद ला मसणवठा म्हणून नोंद आहे .
जिल्हाधिकारी यांचे आदेश आवश्यक .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
03-09-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,नगरपरिषद हद्दीत(रहिवासी झोन) 07 आर क्षेत्राची सरकारी मोजणी करून ,तसेच ले-आऊट मंजूर करून रीतसर बांधकाम परवानगी घेतलेली आहे त्याबाबत मा.उपविभागीय अधिकारी यांचा बिनशेती आदेश असल्याने त्यानुसार बांधकाम करून बिनशेती मोजणीही केली आहे.बांधकाम पूर्ण झाले आहे.परंतु शेजारील व्यक्तीने त्यावेळी कोणतीही हरकत न घेता आता भिंत बांधून अतिक्रमण केलेबाबत तक्रार केली आहे.व त्यानेही आता सरकारी मोजणी केली आहे.त्यामध्ये कोणताही बदल नाही.परंतु तो आता दबाव आणून तडजोड करून भिंत पाडा.असे म्हणत आहे.भिंत पाडल्यास बिनशेती आदेश रद्द होईल का?तसेच आम्हाला मिळालेली क प्रत रद्द होईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
Question by arjit
03-09-2016
arjit123@gmail.com
7/12 वरून पोकळ नावाची नोंद कमी होण्यासाठी कौर्ट चा हुकूमनामा तलाठी कडे दिल्यावर पोकळ नोंद कमी होण्यासाठी तलाठी व सर्कल कडून कोणती व कशाप्रकारे प्रोसेस केली जाते डीटेल मधे सांगा
कोर्टाचा हुकूमनामा असल्यास , मंडळ अधिकारी यांनी पोकळ नोंद रद्द करणे आवश्यक .
कोर्ट प्रक्रियेत ज्यांचे नावाची पोकळ नोंद आहे , त्यांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकलेले असते त्यामुळॆ पुन्हा त्यांना नोटीस देण्याचा प्रश्न उद्भवत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रियंका अंकलगे
03-09-2016
priyankaankalge@gmail.com
धन्यवाद मागील उत्तर मार्गदर्शन केल्याबबात, सर मा .प्रातअधिकारी याच्याकडे अपील केल्यानंतर त्याची नोटीस हि किती दिवसांनी आम्हाला मिळते .व त्याचा कालवधी किती असतो.याचे मार्गदर्शन करावे .
अपील दाखल केल्या नंतर , नोटीस लगेच निघणे आवश्यक . नोटीस किती कालावधीची असावी या बाबत काही मर्यादा नाही . तथापि नोटीस कालावधी 7 ते 15 /30 दिवस असतो .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sonali gadade
02-09-2016
gadadesonal@gmail.com
नमस्कार सर
माझा प्रश्न कुंडेटकर साहेबांना आहे की, माझे वडिल 2015 साली मयत झाले आहेत. वडिलांना 300 गुंठे वडिलोपाजित मिळकत आहे .माझ्या दोन भावांनी 2010 साली माझ्या पाच बहिणींचे व आई चेहि हक्कसोड पञ करुन घेतले व 2013 साली सर्व जमिन वडिलांचे मृत्यूपञ करुन मृत्यूपञाद्वारे दोघा भावाच्या नावावर लिहून घेतली आहे . माझे कोणत्याही प्रकारचे हक्कसोड पञ झालेले नाही. आता भावांनी मृत्यूपञ नोंदणीसाठी कार्यालया अर्ज केला आहे.तलाठी साहेबांनी मला महाराष्ट्र महसुल अधिनियम 1966 याच्या कलम १५०(२) अन्वये सुचना नोटीस पाठविली आहे. माझ्या ५ बाहिनी त्या मृत्युपञाला सहमत असून माझा त्यावर आक्षेप आहे .कृपया मला सुचवावे कि २ भावाचे 7/12 दफ्तरि व फेरफार दफ्तरि मृत्यूपञाद्वारे नाव नोंद करण्याचे थांबवायचे आहे व मला माझे नाव 7/12 दफ्तरि व फेरफारृ दफ्तरि नोंदणीसाठी काय करावे लागेल कोनाकडे आपिल करावी लागेल कृपया मला कायदेशीर मार्गदर्शन करावै व मृत्युपञाची नोंद होऊ नये यासाठी काय करावे लागेल? आपले मोलाचे मार्गदर्शन मिळावे.
वडिलांना 3 हेक्टर जमीन , वडिलोपार्जित पद्धतीने मिळालेली आहे . हिंदू वारसा कायदा ( सुधारणा कायदा 2005 ) च्या कलम 6 (3) नुसार वडिलोपार्जित मिळकत हि मृत्यपत्राने हि हस्तांतरित करता येते . त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या मृत्य पत्र आव्हानात करता यईल का ? या बद्दल साशंकता आहे .
मृत्य पत्रं वडिलाना फसवणूक करून घेतले आहे अशी बाब असल्यास , आपण फौजदारी दावा दाखल करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप बोरले
02-09-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,
महाराष्ट्र राज्यात शेतजमीन नाही.मध्य प्रदेश या राज्यात शेतजमीन आहे.महाराष्ट्र राज्यात शेतजमीन घेता येईल काय?कृपया मार्गदर्शन करावे.
Question by चेतन चंद्रशेखर चौधरी
02-09-2016
chetan_raver@rediffmail.com
सर जर सामाइकतील तीन हिस्से आहे त्यापैकी दुसर्याने त्याची जमीन विकली तेव्हा त्याने ज्याला खरेदी करून दिले त्याच्या नावासमोर 7 12 वर क्षेत्र दर्शविले आहे परंतु आता तिसरा विकायला जातो तर निबंधक म्हणतो तुमचे क्षेत्र किती. पहिल्या व तिसर्याचे क्षेत्र सामाइकत दिसते आहे असे म्हणे. तसेच पहिल्या व तिसऱ्याच्या मध्ये दुसरा असल्याने व त्याचे क्षेत्र 7 12 वर नमूद असल्याने प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे आहे. दुसर्याने 2009 मध्ये विकताना 1 व 3 ची परवानगी नाही घेतली होती तरी त्याची जमीन विकली गेली.
निबंदक यांची शंका बरोबर आहे . पहिला व तिसरा यांचे क्षेत्र जर सामायिक दरवाषले असेल तर , तिसर्याचे सामायिक मधील क्षेत्र किती कसे कळेल . या करता दस्तावर पहिल्याची स्वाक्षरी घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by किरण काळे
02-09-2016
kkale40@gmail.com
मी 13 वर्षांपूर्वी नवीन अविभाज्य शर्तीची जमीन खरीदी केली होत (वर्ग 2 राखीव वॅन ) सदरचे खरीदी खत लोकन्यालयात तडजोड होऊन मे. कोर्टाच्या आदेशानुसार खरीदी केली होती परंतु आता उपविभागीय प्रांत आणि जिल्हाधिकारी यांनी खरीदी करतेवेळी सक्षम अधिकाऱ्याची परवाना घेतली नाही म्हणून ते जमीन सरकार जमा करण्याचे आदेश दिले आहेत तरी आता काय करावे ? मला ते जमीन जमीन परत मिळेल का ? नजराणा भरून ते माझ्या नावावर होईल का ? प्ली माहिती द्यावी
राखीव वन जागा देता येत नाही . कदाचित अशे असेल कि सुरवातीला , जमिनीवर राखीव वनाचा शेरा नसेल नंतर वनाचा शेरा ठेवला असेल. अशी वस्तुस्थिती असल्याने , जमीन राखीव वन असल्या कारणाने वन विभाग जमीन परत घेणार यात शंका नाही.
आपण आपला 7/12 स्कॅन करून मला मेल करा . 7/12 पाहून अजून माहिती देता येईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रियांकाअंकालगे
02-09-2016
priyankaankalge@gmail.com
नमस्कार सर
माझ्या शेतीला व राहत्या घरी जाण्या-येण्यासाठी सर्वे नंबरच्या सरबांधावरून रस्ता मागणी अर्ज केला असून मा.तहसीलदार सोहेब यांनी ८ फुटी रस्त्याचा आदेश मंजुरी केला असून सदर प्रतिवादी यांनी सदर आदेशावर मा.प्रांत अधिकारी साहेब यांच्याकडे अपील केले असून अपिलचा निर्णय काय लागू शकतो ?
मा.तहसीलदार सोहेब हा निकाल १२-५ -२०१६ दिलेला असून आम्ही ६० दिवस पूर्ण झाले नतर आम्ही मा.तहसीलदार साहेब याच्या कडे पोलीस बंदोबस्त घेण्यासाठी अर्ज केला व मा.तहसीलदार साहेब यांनी पोलीस यांना पत्र दिले कि चौकशी करून पुढील कारवाई करावी असे पत्र दिले.पोलीसानी प्रतिवादी विचरले कि म्हणणे काय आहे.त्यावर प्रतिवादी यांनी सागितले कि आम्ही सदर अपील प्रांत अधिकारीकडे केलेले आहे.निकाल लागून आज दि.०१.०९.२०१६ रोजी ११० दिवस झाले परतू प्रांत अधिकारी याच्या कडून कोणताही मा.तहसीलदार सोहेब हा निकालस stay order किवा अपील केलेले नोटीस देखील दिलेले नाही.तरी मला पोलीस बंदोबस्त मिळत नाही तर मी पुढे काय करावे.
सर तुम्ही मार्गदर्शन करावे हि विनंती.
अपील कोणत्या कारणांवर आधारित केले आहे त्यावर निर्णय अवलंबून आहे . या पूर्वी आपणास दिलेल्या उत्तरात मी नमूद केले आहे कि , शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यास , बांधावरून रस्ता देण्याचा तहसीलदार यांना अधिकार आहे.
जर स्थानिक पोलीस , बंदोबस्त देत नसतील तर आपण पोलीस अधीक्षक यांना भेटून अर्ज द्या .
वास्तविक रस्ता देणेसाठी , तहसीलदार यांनी त्यांचे आदेशात नमूद करणे आवश्यक होते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रुपाली घाडगे
02-09-2016
piya_ghadge21@yahoo.co.in
श्री. किरण पाणबुडे सर,
आपण २५ एप्रिल ला विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. जनपीठ च्या माध्यमातून खरच नागरिकांना उत्तम मार्गदर्शन मिळत आहे.
दिवाणी न्यायालयात केस न करता बिल्डर कडून आम्हाला ५००Sqft भाड्याच्या कमर्शियल जागेची जी ७० ते ८० वर्षापूर्वीची आहे तिचा जागा + FSI किंवा रोख रकमेच्या स्वरुपात काय मोबदला मिळाला पाहिजे.
बिल्डर already फसवून नाव बदललेल्या भाड़ेपावतीवर चुलत भावांशी प्रशांत engg .नावाने व्यवहार करत आहे जो गैर आहे. असे असताना आम्ही (चार पैकी एक हिस्सा) फक्त योग्य मोबदला घेवून या व्यवहारातून बाहेर पडायला तयार आहोत. पण बिल्डर चुलत भावांच्या साइड ने आहे व आम्हाला तुटपुंजी रक्कम देवून प्रकरण मिटवू पाहत आहे.
"बी. बी. घाडगे & सन्स " या नावाने पुण्यात कॉर्पोरेशन मध्ये 500 sqft जागेची नोंद आहे. Private मोजणी मध्ये जागा - कार्पेट एरिया ६५३ sqft व प्लॉट एरिया ८६८ sqft आहे. ८६८ sqft X २८५०= २४,७३,८०० एवढी value होत आहे. व त्यात चार हिस्से होणार आहेत. तुम्ही या बद्दल मार्गदर्शन करू शकाल का ? बिल्डरने आम्हाला न फसवता योग्य मोबदला देण्यासाठी आम्ही काय करावे?
रुपाली घाडगे
९८२२०१३५०८
पुण्यातील जागेचे भाव , याची आपणास माहिती घेणे आवश्यक .
आपली मूळ जागा क्षेत्र , त्यावर अनुज्ञेय चटई निर्देशांक याचे भाव माहित करून आपल्याला हिस्स्याप्रमाणे किती पैसे मिळायला पाहिजे याचा निर्णय घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सोमनाथ Lokhande
01-09-2016
somnathLokhanderx@gmail.com
सर माझ्या आजोबांना 1964साली घर बांधायला व गुरांच्या गोठ्यासाठी 11 गुंठे जागा त्त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती त्याचा कुठलाही दस्तावेज केला नाही 1998 मध्ये त्या नातेवाईकांचया वारसांनी त्यांची वारसनोंद करून ती जागा आमची घरे सोडून विकली आहे विकतघेणाय्राने तया जागेवर ताबा घेतला आहे आता आमची घरांची दोन आर जागेचे खरेदी खत दोघांपैकी कोणाकडून करून घ्यावे माग॔दश॔न करावे
जागा गावठाणातील आहे का ?
जागा गावठांसोडून इतर क्षेत्रातील असल्यास , नावावर नसताना , वारस नोंद कशी होईल ?
कि आजोबांनी वर्दीने /तोंडी माहिती तलाठीस त्या काली दिल्यावर , नोंदणीकृत खतांशिवाय नोंद पूर्वीच्या प्रथेप्रमाणे विकली आहे ?
आपले घरे या वर आपला ताबा आहे , तसेच मालकी आहे मग ती नावावर कशी नाहीत ?
कृपया सविस्तर माहिती द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vishalrajeshinde143@gmail.com
01-09-2016
vishalrajeshinde143@gmail.com
कोर्टातुन बहीण भावामध्ये तडजोड होऊन मिळालेले जमिन गटामध्ये घर अाहे वा सदर घराची नोंद ग्रामपंचायत वा सिटीसर्व्हेला नाही. तसेच सदर ७/१२ वर घरपड म्हणुन नोंद आहे. व
सदर मिळालेला संपुर्ण गट हा जर बहीणीच्या नावी असेल्यास घरामध्ये भावाचा हाक्क चालेल का?
तडजोड नाम्यामध्ये घराचा उल्लेख करणे आवश्यक होते . तसेच घरावर हक्क कोणाचा राहील हे नमूद करणे आवश्यक होते .
आपले बहिणीशी बोलून , आपण घरावरील हक्क बाबत पुन्हा न्यायालयाचे संमतीने , दुरुस्त तडजोडनामा सादर करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by चेतन चंद्रशेखर चौधरी
31-08-2016
chetan_raver@rediffmail.com
सर जर सामाइकतील तीन हिस्से आहे त्यापैकी दुसर्याने त्याची जमीन विकली तेव्हा त्याने ज्याला खरेदी करून दिले त्याच्या नावासमोर 7 12 वर क्षेत्र दर्शविले आहे परंतु आता तिसरा विकायला जातो तर निबंधक म्हणतो तुमचे क्षेत्र किती. पहिल्या व तिसर्याचे क्षेत्र सामाइकत दिसते आहे असे म्हणे. तसेच पहिल्या व तिसऱ्याच्या मध्ये दुसरा असल्याने व त्याचे क्षेत्र 7 12 वर नमूद असल्याने प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे आहे.
तिसरा जो विकत आहे , त्याचे विक्री खतावर त्याचे मालकीचे क्षेत्र नमूद करून हरकत नाही म्हणून पहिल्याची सही घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सौरभ फाटक
31-08-2016
saphatak@yahoo.in
नमस्कार ,
मी सौरभ फाटक , मूळचा रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील विजयनगर गावचा रहिवाशी आहे . माझं गाव 1990 साली स्थापन झाला असून गावामध्ये फक्त एकदाच रस्त्याचा काम झालं आहे ते सुद्धा दगडाचा . पक्का व डांबरी रस्ता बनवण्यासाठी कोणाकडे मागणी करावी लागेल किंवा काय करावं लागेल . माहिती मिळावी .
धन्यवाद ,
सौरभ
8793234086
Question by विनायक बुवाजी patil
31-08-2016
Vbpatil96@gmail.com
ले आउट मध्ये दाखवलेला रस्ता सार्वजनिक असतो कि फक्त sambhandhit प्लॉट धारकच तो रस्ता वापरू shaktat
Question by सोमनाथ लोखंडे
31-08-2016
somnathLokhanderx@gmail.com
सर एकत्र कुटुंबातील दोन भाउ व पाच बहिणी आहेत त्यांचे वडील 1962साली मयत झाले 1956 च्या अॅकटनुसार पाच बहिणींना लिमिटेड हिस्सा मिळाला व उरलेल्या क्षेत्रात दोन भावांमध्ये विभागले गेले दोन भावांपैकी एकाचा मृत्यू 1992 ला झाला असेल तर त्याला तीन मुले व एक मुलगी असेल तर त्या मुलीला समान हिस्सा मिळेल का
Question by Mohan
31-08-2016
mohanms9775@gmail.com
सर वडील 1970 मध्ये मयत झाले आहे वारसा लागत असताना एकत्र कुटुंब म्यानेजर मुलांचे नाव आहे कब्जा नाही म्हणून मुलिंचे नाव इतर हक्कात ठेवलेले आहे सदर स्त्री चे 22 जून 1994 पूर्वी लग्न झाले असतील तर सदर स्त्री 2004 पूर्वी मृत्यू झाल्यास त्यांचे वारसांचे वारसा होणार काय? सर
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
