जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार सर ,

जर आमच्याकडे १९२२ पर्यंत जुने फेरफार आहेत पण जुने सातबारा १९५६ च्या नंतरचे आहेत . पण १९५६ च्या आधीचे सातबारा
बद्दल आम्ही तहसील आणि तलाठी कार्यालयात विचारणा केली तर आम्हाला १९५६ आधीचे सातबारा नाही आहेत , १९५६ पासूनच सातबारा आहेत असे सागितले .

तर जुने सातबारा कसे शोधावे किवा जमिनीचा मुळ मालकीहक्क कसा शोधावा या बद्दल मार्गदर्शन करावे
जमिनीच्या हक्का संबंधी सर्वे नंबर चे हक्क नोंदणी उतारा संबंधीत तहसिल मधिल अभिलेखागारातुन प्राप्त करता येईल....

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

नमस्कार सर ,

दारिद्र रेषेखाली विहीर आणि घर बांधण्यासाठी सरकार कडून अनुदान मिळते का आणि मिळत असेल तर त्याची काय कार्यपद्धती आहे या बद्दल मार्गदर्शन करावे .
योजना आहेत .घरांच्या योजनासाठी आपण ग्रामीण साठी ग्राम पंचायत व शहरी भागासाठी नगर परिषद कडे संपर्क साधावा . विहिरी ग्रामीण भागात narega ,jawahar vihiri,jalyukt shivar ya sathi gram panchyat aani B D O KARYALAYAT ,krishi sahayak yancheshi sampark sadhava . gavatil gram rojgar sevakachi madat ghyavi . arakhada vishisht velet tyar hoto , aapli vihir arakhadyat manjur pahije .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by anand salve
18-05-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर, १) ०.०९ पोट खराबा, ००.४ आर २) ०.४१ पोट खराबा, ००.४आर ३) १ हेक्टर,०.९ आर, ०.१६ पोट खराबा हे एकूण क्षेत्र एकर प्रमाणे किती होइल.

Question by suraj mankar
18-05-2016
sepune17@gmail.com

पानशेत पूरग्रस्त ला मिळालेल्या जमिनी विषयी ची माहिती व नियम sanga.
जर दिवाणी न्यायालयाकडून एखाद्या वाटप पत्र बाबत मनाई हुकुम आल्यास त्या वाटप पत्राची नोंद मंडलाधिकारी प्रमाणित करू शकता का ?
दिवाणी न्यायालयाचा मनाई हुकुम काय आहे यावर सदर बाब अवलंबून आहे.

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सर आपण सुरु केलेल्या उपक्रमाचे मनापासून धन्यवाद सर मी प्रकल्पग्रस्त दाखला काढला आहे पण प्रकल्पग्रस्त दाखल्यावर वडिलांचे नाव ज्ञानोबा मारुती भोसले असे आले आहे त्यावर अवलंबून असलेली व्यक्ती त्यांचा मुलगा बाळकृष्ण ज्ञानेश्वर भोसले असे आले आहे पुनर्वसन कार्यालयाकडे अर्ज करते वेळी ज्ञानोबा व ज्ञानेश्वर हि दोन्ही नावे एकच आहेत असे प्रतिज्ञापत्र दिले होते मुल भूसंपादन दाखल्यावर ज्ञानोबा असे नाव आहे पुनर्वसन दाखला दुरुस्ती करून देत नाहीत किंवा दिलेला दाखला वैद्य आहे का किंवा कोठे अपील करावी
मा . जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयात अर्ज करावा . तहसीलदार कार्यालयातून अहवाल मागवून ते दुरुस्त करून देऊ शकतात .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by सोनू
17-05-2016
sonunimje93@gmail.com

भंडारा तालुक्यातील शेतजमीन आहे त्याची एकुण आराजी ०.१० हे. आर पैकी ०.०४ हे. आर शेतजमीन विकलेली आहे. तर ०.१० हे. आर पैकी ०.०४ हे. आर शेतजमीनीचा नोंदणीकृत दस्त करता यईल का,,, ०.०४ हे. आर शेतजमीन विक्रीपत्राच्या लेखान्वये दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवीता येईल काय व ०.०४ हे. आर चा वेगळा सातबारा मिळेल काय
आदरणीय सर,७/१२ सदरील इतर हक्कात ता. ग.र.रु.५०००/-असा शेरा दाखल आहे. तरी त्याबाबत अर्थ सांगून सदर शेरा कमी करणेकामी मार्गदर्शन होणेस विनंती.
सदर नोंद हि ग्रामिण विकास सोसायटी किंवा बँके कडे कर्ज घेवुन गहाण दिल्याची असु शकते. ती नोंद कमी करणे करीता नोंदी संदर्भातील माहीती संबंधीत गावचे तलाठी यांना विचारुन. कर्ज परतफेड झाले असल्यास संबंधीत बँक किंवा सोसायटी यांचे कडुन कर्ज नसल्याबाबत दाखला घ्या व त्यानुसार तलाठी यांचे कडुन नोंद कमी करुन घेवु शकता.

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

दिनांक ३१/०३/२०१६ च्या महाराष्ट्र शासन राजापात्रानुसार शासकीय जमीन किवा नशुअल जमीन विक्री किवा हस्तांतर करण्याचे अधिकार कलेक्टर यांना देण्यात आले आहेत .त्यानुसार देवास्तान इनाम शेत जमिनेचे हस्तांतर किवा विक्री अधिकार देखील कलेक्टर यांना देण्यात आले आहेत का किव्हा कसे ?

सदर बाबत मी दिनांक ०६/०५/२०१६ रोजी देखील विचारणा केली आहे.
मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम 58,59बाबत सविस्तर माहीती मिळावी
सर , माझ्या वडिलांनी आणि माझ्या काकानी वाटपपत्र दुय्यम निबंधकांकडून मंजूर करुन घेतले आहे परंतु ऎसे करताना सामान क्षेत्र वाटप किंवा आकार जुडी समान असायला हवी होती, परंतु 2 एकर क्षेत्र एका भावाला वाटनितच जास्त दिल आहे , माझ्या वडिलांना 2 एकर क्षेत्र कमी आले आहे , वडील तक्रार करायला तयार नाही तरी ही वाटप आम्हाला मान्य नाही कारण आमचे क्षेत्र कमी आहे, ही नोंद सामान वाटप नाही म्हणून मुलगा या नात्याने तक्रार तलठ्यकडे दिल्यास नोंद मंजूर होईल का? ही वाटप मान्य नसल्यास मी आणखी काय करू शकतो ? जमीन वादिलोपार्जित आहे ,
मा दिवाणी न्यायालयात अर्ज करू शकता . ते त्या प्रमाणे आदेश करून जिल्हाधिकारी कार्यालयात समान वाटपासाठी पाठवतील . त्यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयात ते वाटप होऊन त्या प्रमाणे समोरची कार्यवाही होईल .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by ravindra
14-05-2016
ravindra171282@gmail.com

आदरणीय सर जर दुय्यम निबंधक कार्यालयातून ३ बहिणीं नि नोंदणी कृत हक्क सोड पत्र केल असेल आणि ते हक्क सोड पत्रची index ची कॉफी तलाठी कार्यालयात जमा कारात्यावेळेस तलाठी हक्क सोड करणारे व्यक्तीला घेवून येण्यास सांगितले त्या प्रमाणे २ बहिणी आल्या आणि त्यांची सही दिली परंतु एक बहिणीस तिच्या व्यक्तिगत करणा मुले येण्यास वेळ लागत आहे आणि तलाठी सांगतायत कि जो पर्यंत ती बहिण येत नाही दो पर्यंत नोदन होणार नाही सदर ची नोंदणीस एक वर्ष पूर्ण होयला आले आहे तरी प्रश्न असा आहे सदर च्या हक्क सोड पत्र ला किती दिवसांची वैधता असेल किवा एका वर्षा नंतर ते रद्द होतेका तसेच त्या बद्दल ची अन्य माहिती द्यावी
रजिस्टर / नोंदणीकृत हक्क्सोड पत्र आहे. ते रद्द होणार नाही.
हक्कसोड पत्र केलेल्या बहिनींना सदर नोंदी वर काही हरकत आहे काय...? या बाबत तलाठी यांना
नमुना ९ ची नोटीस देण्यास सांगा.

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

वरील विचारलेल्या प्रश्नातील जमीन वडीलोपारजीत आहे
माझा प्रश्न हींदु वारसा अधिनियम 1956 वत्यातील सूधारना 2005 शी संबंधित आहे माझ्या आईचा जन्म 1960चा असुन लग्न 1977साली झाले ती जिवंत असून तीला 3भाऊ व 3 बहीणी आहेत. सद्या तीचे आई व वडीलही जिवंत आहेत त्यांना 54 एकर जमीन असुन त्यापैकी44एकर 1990च्या आसपास वरील पैकी 3भावांचे नावें साध्या पद्धतिने केली असून बाकीची 10एकर जुलै 2005मध्ये कोर्ट डिक्री दावा नुसार(या डिक्री दाव्यात तीनही मुले गुडीपाडवा 2004 पासुन वेगळी राहतात व तोंडी वाटण्या झालेल्या आहेत असे नमूद आहे पण डीक्री दावा जुलै 2005मध्ये दाखल केला व नोहेंबर 2005 मध्ये मंजुर झाला) त्याच मुलांचे नावें केली आहे 7/12 त्यांच्या नावें निघतो .वाटप करते वेळी मुलींचा वीचार केला नाही किंवा कसलेही सही अंगठा घेतलेला नाही अशा स्थितीत माझ्या आईस तीच्या वडीलांच्या शेतीत हीस्सा मीळू शकतो का? त्या वीषयी मार्गदर्शन हवे.
हिंदू वारसा सुधारणा कायदा 2005 नुसार ,आपले आजोबांची जरी वडिलोपार्जित जमीन असेल , तर
any alienation including partition or testamentary disposition made prior to 20 th December 2004 does not invalidate such transfer.
आजोबांनी 44 एकराचे वाटप 1190 सालीचा केले आहे .
जमिनीचे वाटप 44 एकर प्रत्येकी 1/4 प्रमाणे ( वडील+ 3 भाऊ ) प्रत्येकी 11 एकर याप्रमाणे होणे आवश्यक
तसेच 10 एकर हि 20 डिसेंबर 2004 पूर्वी तोंडी वाटप त्यामुळे त्याचे हि प्रत्येकी 1/4 या प्रमाणे म्हणजे प्रत्येकी 2.5 एकर वाटप होणे आवश्यक .
आजोबांकडे 12.5 एकर जमीन वाटते आली असती . ती त्यांची स्वकष्टार्जित मिळकत होते त्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे .
त्यामुळे आपणास आता कोणताही हक्क मिळकतीत उरलेला नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, मी सासरवाडीला तीन एकर शेतजमीन पाच वर्षापूर्वी पत्नीच्या नावे खरेदी केली आहे. मेव्हण्याने इच्छा नसताना शेजारी त्रास देणारा येईल म्हणून बळजबरीने घ्यायला लावले. तीन वर्षानंतर बाजारभावाने घेईन म्हणाला. आता माझ्या जमीनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करीत आहे. खोटेच पैसे दिले म्हणुन सांगतो.’बहीण आहे म्हणून लिहून घेतले नाही’ म्हणुन सांगतो बळजबरीने शेतात नांगर मारला आहे. दोघांच्या शेतामधील बांध नष्ट केला आहे. मी दुसर्याक शहरात राहतो. पत्नी माझ्या बाजूने आहे. बहीण माझ्यासाठी मेली आहे म्हणतो. शेत विकत घेणारे आले की त्यांच्यासमोर वाद करतो. शेती घेणारे वादात आहे म्हणून निघून जातात. कृपया मला या त्रासातून कसे मुक्त होता येईल.
घाबरू नका . जमीन तुमच्या मालकीची आहे . नोंदणीकृत खरेदी खत तुमच्या नावे आहे म्हणजे मालकी तुमची आहे . कब्जा हा मालकी पाठोपाठ च आला पाहिजे . पण खबरदारी म्हणून तुम्ही दर वर्षी पिक पाहणी लावून घेत चला .म्हणजे तुमचा कब्जा सिध्द होईल आवश्यकता पडल्यास . या साठी तलाठी व तहसील कार्यालयाशी संपर्क साधा . फार्म no १४ आणि ७ ब च्या साम्क्षांकित प्रती स्वतः च्या file ला ठेवा . दर वर्षी चा ७/१२ स्वतः च्या file ला ठेवा.

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

माझ्या मामानी २०१० मध्ये वडिलोपार्जित मिळकतीबाबतचे माझ्या आई चे विना मोबदला हक्कसोड पत्र नोंदवून घेतले आहे. सादर विनामोबदला हक्कसोड पत्र कायदेशीर आहे का? माझ्या आईला ते रद्द करून घेता येईल का?
रजिस्टर / नोंदणीकृत हक्क्सोड पत्र असल्यास ते रद्द करायचे असल्यास दिवाणी न्यायालयात जावे लागेल .

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

पूर्वी ७/१२ उतार्यावर वारसांची नोंद करण्यात येत असे असे करताना घरातील मोठा मुलगा ह्याची फक्त नोंद कब्जेदार सदरी करण्यात येत असे व बाकीचे मुलीची नोंद इतर अधिकार सदरी करत असे . परंतु ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन सध्या दुय्यम निबंधकांकडे वाटप करताना इतर अधिकारातील वर्षांची नावे कायम ठेऊन चुच्कीचे वाटप करण्याची प्रथा चालू झाली आहे .इतर अधिकार सदरी असणाऱ्या व्यक्तींना संमतीसाठी बोलावले सुद्धा जात नाही आणि परस्पर वाटप केले जाते व इतर अधिकार कायम ठेऊन जमीन वाटप केले जात आहे. तरी अशी नोंद सुद्धा मंजूर केली जात आहे . यानुले वारसावर अन्याय होऊन लोक इतर अधिकार सदरी असलेल्या व्यक्तीचा हक्क डावलत आहे अशी समस्या सर्वत्र सुरु आहे .तरी आदरणीय अधिकारी मंडळास विनंती आहे कि हे थांबावे म्हणून काय उपाय करता येयील ? तसेच इतर अधिकार सदरी असलेले वारस भोग्वातदार सदरी आणण्याची प्रक्रिया कशी आहे किवा त्याबाबत एखादे परिपत्रक उपलब्द असल्यास site वर upload करावे आणि सर्व लोकांच्या शंका समाप्त कराव्या . तरी सर्व अधिकारी वर्गाने ह्या ह्या प्रशाबाबत योग्य असा सल्ला द्यावा आणि काही लोकांकडून होणारा दुरुपयोग थांबवावा ,कृपया विनंतीचा विचार व्हावा .
मुळातच बहिणीची / मुलींची नवे इतर अधिकारात ठेवणे चुकीचे व बेकायदेशीर आहे . हिंदू वारसा कायद्यानुसार , वडिलांचे मृत्य पश्चात जे वर्ग १ चे वारस आहेत , त्या मध्ये मुलींचा हि समावेश आहे. मुलींना हा मुलां इतकाच मिळकतीत हक्क आहे.
मुलींची नवेइतरहक्कात थेइन नोंद मंजूर करणे हे चुकीचेआहे. अश्या सर्व नोंद्चे , तहसीलदार यांनी म.ज.मअ १९६६ चेकलम १५५. खाली लेखन प्रमाद चूक , म्हणून दुरुस्त करणे आवश्यक आहे.
जिल्हाधिहारी स्तर वर , परिपत्रक काढून , अश्या सर्वनोंदी , दुरुस्त करून मुलींचीनवे, भोग्वातदार सादरी घेणे आवश्यक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,वडिलांच्या नावे वडिलोपार्जित शेतजमीन असल्यास,ते त्यांच्या इच्छेनुसार सदर जमीन तीनपैकी फक्त एका मुलास देऊ शकतात का?किंवा मुलांची संमती न घेता सदर जमिनीची ते विक्री करू शकतात का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
वडिलोपार्जीत जमिन ही ईतर वारसांना समान द्यावी लागेल.
एकाच मुलास दयायची असेल तर ईतर वारसांची संमती आवश्यक आहे.

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

सर
सर्वे ११२ पैकी ९ हिस्सा अरविंद व इतर व्यक्तीच्या नावे आहे परंतु सचिन नावाच्या व्यक्तीच्या कबज्या आहे सचिन याने २००९ साली ग्रामपंचायत अर्ज करून झोपडी आहे असे दाखवून घरपट्टी लावून घेतली तरी जमीन नावे नसताना ग्रामपंचायत घरपट्टी लागू करू शकते का
There is legal maxim
Quicquid plantatur solo, solo cedit-- Whatever is affixed to the soil belongs to the soil.
मात्र सदरचे तत्व हे भारतात लागू नाही . आपणाकडे , Dual -Ownership संकल्पना आहे . त्यामुळे जमीन एकाची व त्यावरील सौरांचना ( बांधकाम ) दुसर्याचे असू शकते .
ग्रामपंचायत अश्या घरावर घरपट्टी बसवू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर्व साधारणपणे कब्जा हा मालकी पाठोपाठ आला पाहिजे . ग्राम पंचायत उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून घरपट्टी आकारते . प्रताय्क्षात तेथे घर नसेल तर ग्राम पंचायत च्या निदर्शनास आणा . वयैक्तिक जागेवरील अतिक्रमण मात्र आपल्यालाच काढावे लागेल .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Adaraniy sir . माझ्या आईचे नाव मामाच्या उताऱ्यावर वारस म्हणून इतर अधिकारत आहे , ते कब्जेदार सदरी आनायचे असल्यास काय करावे , त्या अर्जाला कोणती कागदपत्रे जोडवी लागतील ?
एखाद्या ७/१२ उताऱ्यामध्ये काही महिला वारसांची नांवे इतर अधिकार मध्ये नोंदविण्यात आलेली आहे. त्यांची इतर अधिकारातील नांवे कब्जेदार सदरी दाखल करण्याकरीता कोणता शासन निर्णय अगर परिपत्रक अथवा अन्य काही तरतुदी आहेत काय?
महिला वारसदार आहेत . त्यांचे नाव कब्जेदार सदरी असणे आवश्यक . त्यासाठी शासन निर्णयाची गरज नाही . लेखन प्रमाद चूक दुरुस्ती कलाम 155 खाली तहसीलदार यांनी आदेश काढून करणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१) सातबारा मध्ये असणारा भोगवटादार या कॉलम मध्ये एखाद्याचे नाव ५० ते ८० वर्षापूर्वी कसे आले ते चेक कसे करावे किवा ते कोणत्या कागदपत्राची पूर्तता केल्यावर येते .

२) ८० वर्षापूर्वीचा एखादा फेरफार जर बरोबर दिसत नसेल आणि एखाद्याचे नाव याच फेरफार च्या आधारे चढले असेल तर फेरफार सोडून दुसरे कुठले कागदपत्रा चेक करू शकतो जेणेकरून सातबारात चढलेले नाव बरोबर आहे याची शाहनिशा करता येईल .

३) एखाद्याचे नाव 56 वर्षापूर्वी इतर हक्क मध्ये निगुन गेले असेल आणि तसा फेरफार ही आमच्याकडे आहे तर ते नाव सातबारा मधून कायमचे निगुन गेले पाहिजे कि नाही . पण आज रोजी ते नाव आमच्या भोगवटादार आणि इतर हक्क या कॉलम मध्ये कसे दिसते या वर कृपया मार्गदर्शन करावे .

४) इतर हक्क याचा अर्थ काय आहे
जुने चाक्बंदी ,जमाबंदी ,री सर्व्हे असे रेकॉर्ड तपासावे .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

१.जुने ७/१२ व फेरफार नोंदवही पहा.
२.फेरफार नोंदवही तील नोंदी वरून खात्री करता येयील
३.मुद्दा क्रमांक तीन चे बाबतीत कागदपत्रे पहिल्या नंतर अभिप्राय देणे योग्य आहे
४.इतर हक्क मध्ये कुल,कर्जाचा बोजा,किंवा संबंधित भूमापन क्रमांकावर इतर कुणाचा हक्क असल्यास त्याबाबर नोंद केली जाते.

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

Question by anand salve
07-05-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर, माझ्या वडिलांनी माझ्या नावे रजिस्टर मुतुपत्र केले आहे त्यामध्ये वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीला स्वकष्टित म्हटले आहे व ७ एकर जमिनीला ४ एकर म्हटले आहे व गावाचे नाव तालुका,झिला लिहिला आहे परंतु सर्वे न व गट नंबर टाकला नाही.७/१२ त्यांच्या नावानी आहे त्यांनी त्यांचा नंतर त्या जागेवर माझे नाव लावायला सांगितले आहे तर माझे नाव त्या जमिनीला लागू शकते का?
जर मृत्यापत्रात सर्वे नंबर नसेल तर , कोणती मिळकत आपणास त्यांनी दिली हे कसे लक्षात येणार ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सिटी सर्वे ऑफिस ने घराच्या जागेचा नकाशा कोणत्या कागदपत्राच्या आधारावर तयार केला याची माहिती मागविता येते का
दिनांक ३१/०३/२०१६ च्या महाराष्ट्र शासन राजापात्रानुसार शासकीय जमीन किवा नशुअल जमीन विक्री किवा हस्तांतर करण्याचे अधिकार कलेक्टर यांना देण्यात आले आहेत .त्यानुसार देवास्तान इनाम शेत जमिनेचे हस्तांतर किवा विक्री अधिकार देखील कलेक्टर यांना देण्यात आले आहेत का ?

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3398
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3