जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by गणेश शिंदे
18-04-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,का.तलाठी यांनी घेतलेल्या फेरफार नोंदीवर दिवाणी न्यायालय स्थगिती आदेश देऊ शकते का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..
Question by बालाजी मुसळे
18-04-2016
mbalaji555@yahoo.com
सर माझा प्रश्न हींदु वारसा अधिनियम 1956 वत्यातील सूधारना 2005 शी संबंधित आहे माझ्या आईचा जन्म 1960चा असुन लग्न 1977साली झाले तिला 3भाऊ व 3 बहीणी आहेत. सद्या तीचे आई व वडील जिवंत आहेत त्यांना 60 एकर जमीन असुन ती त्यांनी 1990च्या आसपास वरील पैकी तीच्या 3भावांचे नावें साध्या पद्धतिने केली असून 7/12 त्यांच्या नावें निघतो .वाटप करते वेळी मुलींचा वीचार केला नाही किंवा कसलेही सही अंगठा घेतलेला नाही अशा स्थितीत माझ्या आईस तीच्या वडीलांच्या शेतीत हीस्सा मीळू शकतो का? त्या वीषयी मार्गदर्शन हवे.
बालाजी ,
आपण आपले प्रश्नात , आई चे वडिलांकडे हि मिळकत त्यांचे वादिलाकडून म्हणजे आई चे आजोबांकडून प्राप्त झाली आहे का ? याचा उल्लेख केलेला नाही
जर आपले आजोबांना , त्यांचे वादिलाकडून म्हणजे आपले पंजोबाकडून मिळकत प्राप्त झाली असल्यास , आपले आजोबा सध्या हयात असताना सुद्धा मालकी हक्क आहे . या हक्क चे आधारे आपली आई , मिळकतीची वाटणी करून मागू शकते . जर आपले आजोबांनी वाटणी करून दिली नाही तर , श्री .मोहसीन शेख यांनी उत्तर दिल्याप्रमाणे आपणास , दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल .
जर मिळकत आपले आजोबांची स्व कष्टार्जित असेल , तर सध्या या मिळकतीत आपले आइस , वडील हयात असे पर्यंत कोणताही हक्क नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भाऊराव केकाण
17-04-2016
bhaukkd84@gmail.com
नमस्कार सर , माझ्या आईचे वडील १९९१ ला मयत झाले त्यापाच्यात ३ मुले व २ मुली होत्या . त्यापैकी एका बहिणीने हक्कसोड केले . भवानी आपापसात वाटप पत्र करताना एका बहिणीचे नाव सर्व ३ गटांवर कायम ठेऊन वाटप पत्र दुय्यम नि . समोर केले त्यास आईची परवानगी नव्हती ? त्यावर आक्षेप आईने घेतला आहे .
१) सदर नोंद होऊ शकते का ?
२)नोंद न होण्यासाठी काय करावे ?
३)सदर वाटप पत्र रद्द करण्यासाठी काय करावे ?
४)दिवाणी दावा टाकावा कि नाही ?
कृपया मार्ग दर्शन करावे
वडील मयत झाल्यावर , तीन भाऊ व दोन बहिनांना समान हक्क मिळकतीत मिळणे आवश्यक आहे .
जर एक बहिणीने हक्क सोडला आहे तर , तिचा कोणताही हक्क मिळकतीत उरलेला नाही . ज्या बहिणीने हक्क सोडलेला नाही , तिचे नाव ७/१२ सादरी दाखल असले बाबत आपले प्रश्वरून दिसून येते .
आपल्या आई चा आक्षेप कोणत्या कारणासाठी आहे .
या दोन बहिणी शिवाय आपली आई , हि वारस आहे का ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
नोंदीस आक्षेप असलेबाबत तक्रार अर्ज तलाठी कार्यालय येथे द्यावा..
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by श्रीनिवास khedkar
16-04-2016
khedkarshriniwas1987@gmail.com
सर एकाच स.न.चे रजि अखत्यार पत्र एका व्यक्तीला आगोदर केले व त्याच स.न चे दुसर्या एका व्यक्तीला करून दिले व दोन्ही घेणारे नोंदणी साठी आग्रही आहेत .अखत्यार पत्र घेणारा ची नोंद घेत येत नाही मग खरेदी खताने घेणाऱ्याची नोंद करताना अखत्यार पत्रावाला तक्रार करतो आहे त्याला नोटीस दिलेली नाही मग त्याची तक्रार घेऊन चालेल का /अशी हरकत घेणे कायदेशीर योग्य आहे का? किवा अखत्यार पत्र घेणार्याने काय केले पाहिजे ?
अखत्यार पत्र घेणाराला कोणताही अधिकार नाही.तक्रार घेता येणार नाही.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by संतोष शिंदे
16-04-2016
svshinde67@gmail.com
सर,
मागास व इतर मागास प्रवर्ग व्यक्ती जमीन ( वर्ग १) विकत असेल व त्या मुळे ती व्यक्ती भूमीहीन म्हणुन बाधीत होत असेल तर त्या व्यक्तीला जमीन विकता येउ शकते का?
त़्या बाबतीत काही नियम , कायदे आहेत का?
सदर मागास व इतर मागास प्रवर्ग व्यक्ती यांना जमीन विकता येऊ शकते त्यास कोणतेही अडचण नाही परंतु अशी व्यक्ती भूमिहीन होत असेल तर
"मी श्री.---------------------------- आज दिनांक ---------रोजी खरेदीखताने ----अशी जमीन श्री.--------------यांना विकली असून यामुळे मी भूमिहीन होत असून यापुढे मी शासनाला कोणत्याही प्रकारची जमीन मागणी करणार नाही तसेच भूमिहीन योजनेचा लाभ घेणार नाही "
या आशयाचे कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र सदर खरेदीखत दस्तास जोडून द्यावे लागते.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by रवि
16-04-2016
ravindra171282@gmail.com
किरण सर दिलेले प्रतिसादाबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद सर मी दिनांक ०८.०४.२०१६ ला विचारलेल्या तसेच अन्य एक प्रश्न साठी आपणास आपले मोबाईल नंबर (उपरोक्त एका प्रश्नांच्या दरम्यान उपलब्ध केलेला आहे
) त्यावर संपर्क करू शकतो का..विनंती आहे सर आपण फोन कधी करावा या बद्दल सांगावे...किवा आपला इमेल द्यावा ज्यावर सविस्तर शंका पाटवली जावू शकते . आपले सर्वांचे चालवलेले उपक्रमा बद्दल मनपूर्वक आभार
kiranpanbude@ग्मैल.काम
९९२१७११९९९
kiranpanbude@gmail.com
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय जी वाघ
15-04-2016
sanjaygwagh@gmail.gom
विविध योजनेकरिता हयातीचे प्रमाणपत्र ग्रामीण भागात कोणाकडून घ्यावे.प्रमाणपत्र देण्यास सक्षम अधिकारी कोण.
गाव स्तरावर सरपंच आणि पोलीस पाटील हे ह्यात प्रमाणपत्र देऊ शकतात..... आणि ते ग्राह्य धरले जाते.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by Ravi
15-04-2016
ravindra171282@gmail.com
आदरणीय सर मी दिनांक ०८.०४.२०१६ ला विचारलेल्या प्रश्नाला संजय सर यांनी कागदपत्र बघितल्या शिवाय सल्ला देणे योग्य नाही असे सांगितले आहे तरी सदर बाबतीत संजय सर मला आपला पेर्सोनेल इमेल द्यावा त्यावर मी काय काय कागदपत्र जोडावे जेणे करून शंके चे निराकारण होईल तसेच त्या बद्दल कृपया मार्गदर्शन करावे
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
15-04-2016
ravindra.golesar@rediffmail.com
मा. सर, वडिलांनी केलेल्या मृतुपत्राची अंमलबजावणी करावयाची झाल्यास ती कशी करावी किंव्हा मृतुपत्राचा अंमल कसा करावा? कृपया मार्गदर्शन करावे.
तसेच आपण या संकेतस्थळावर दिलेल्या महसूल मित्र मोहसिन शेख ब्लॉग वरील मृत्युपत्र हा लेख वाचवा.अधिक संकल्पना स्पष्ट होईल .
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
मृत्यूपत्र करून दिलेला व्यक्ती मयत असेल तर मृत्युपत्र ज्या मिळकतीचे वर्णन असेल त्यानुसार अर्ज करावा .जर मृत्युपत्रातील वर्णन मिळकत जमीन या प्रकारात मोडत असेल तर तलाठी कार्यालयात अर्ज करावा.व मिळकत ग्रामपंचायत हद्दीतील असेल तर ग्रामपंचायत कार्यालय येथे अर्ज करावा.मृत्यूपत्राची सत्यप्रत सोबत जोडून अर्ज सादर करावा.परंतु हयात व्यक्तीचे मृत्युपत्र ची नोंद कोठेही करता येणार नाही. कारण व्यक्ती मरणा आधी कितीही मृत्युपत्र तयार करू शकतो पण कायद्यानुसार सर्वात शेवटचे मृत्युपत्र अधिकृत मानले जाते
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by श्रीनिवास khedkar
15-04-2016
khedkarshriniwas1987@gmail.com
सर एकाच स.न.चे रजि अखत्यार पत्र एका व्यक्तीला आगोदर केले व त्याच स.न चे दुसर्या एका व्यक्तीला करून दिले व दोन्ही घेणारे नोंदणी साठी आग्रही आहेत .अखत्यार पत्र घेणारा ची नोंद घेत येत नाही मग खरेदी खताने घेणाऱ्याची नोंद करताना अखत्यार पत्रावाला तक्रार करतो आहे त्याला नोटीस दिलेली नाही मग त्याची तक्रार घेऊन चालेल का /अशी हरकत घेणे कायदेशीर योग्य आहे का? किवा अखत्यार पत्र घेणार्याने काय केले पाहिजे ?
मिळकत मालकाने अखत्यार पत्र करून दिले आहे व नंतर मिळकत अन्य व्यक्तीस विकली आहे
ज्यास विकली आहे त्याची नोंद घेणे आवश्यक
ज्यास अखत्यारपत्र करून दिले आहे त्याची हरकत असेल तर त्याचे म्हणणे ऐकून घेऊन घ्या
अखत्यार पत्र करून घेनारास सध्या स्थित काही अधिकार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amol Shirke
14-04-2016
shirke.amol238@gmail.com
नमस्कार सर १० वर्षाकरिता दिलेली मुदत खरेदी मुदतीनंतर सोडविल्यास ते रिकन्व्हेन्स पत्र ग्राह्य होते काय?
Question by निलेश फेगडे
14-04-2016
nileshfegade@yahoo.co.in
नमस्कार सर,
अकृषिक जमिनीचा कर भरण्यासाठी कोणती ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे का?
कि प्रत्यक्ष तलाठी कार्यालयात जाऊनच कर भरावा लागतो.
कृपया सांगावे.
आपण स्वतःच कर स्वत:ही भरू शकता त्यासाठी शासनाने ग्रास प्रणाली मागील वर्षी पासून चालू केली आहे.परंतु आपणास चलन प्रत तलाठी कार्यलयात एक द्यावी लागेल.त्यामुळे तलाठी कार्यालयात जाऊन भरणे अधिक योग्य आहे.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
10-04-2016
ravindra.golesar@rediffmail.com
मा. सर, मृतुपत्रा नुसार मला मिळालेल्या क्षेत्रा मध्ये भावाने अतिक्रमण केले असून त्या जागेवर घर देखील बांधले आहे. सदर अतिक्रमन बाबत दाद कोणाकडे मागावी. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
Question by गणेश शिंदे
09-04-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,इनामवर्ग ६ ब ची जमीन शेतीप्रयोजनार्थ जुन्या शर्तीवर १० वर्षापूर्वी मूळ वतनदारांनी करून घेतली आहे.सदर जमीन त्यांना आता दुसऱ्या व्यक्तीस विक्री करावयाची असल्यास पुन्हा परवानगी घेण्याची आवश्यकता आहे किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
तहसील कार्यालयात सर्व कागदपत्रे दाखवून चौकशी करणे चांगले
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गोरख साताळकर
09-04-2016
gorakhsatalkar@gmail.com
शेत मोजणी करताना चुकीची मोजणी झाली आहे असे वाटले तर काय करावे ?
कृपया माहीती द्यावी?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १३६ नुसार शेतजमीन मोजणी केली जाते.अशावेळी हितसंबंधित सर्व व्यक्तींना नोटीस बजावून उपस्थित राहणेस सांगितले जाते.अशावेळी उपस्थित व्यक्तींनी तक्रार केलेस त्यांची हरकत विचारात घेऊन व पुरावे मांडणेची संधी देऊन तालुका निरीक्षक भूमी अभिलेख निर्णय देतात.जर आपणाला निर्णय अथवा मोजणी मान्य नसेल तर आपण अशा मोजणी चे अपील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचे कडे करावे.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by रवि
08-04-2016
ravindra171282@gmail.com
आदरणीय सर, प्रश्न असा आहे कि एक A हि व्यक्ती सन १९९० मरण पावली त्या वेळेस त्यांची X हि विधवा पत्नीहोती, तसेच त्यांचे तीन मुलींची म्हणजेच B ,C ,D ह्यांची लग्न झाली होती आणी E ,F ,G हि तीन मुल होती. सदर व्यक्ती हिंदू वारसा कायदा १९५६ च्या १९९४ तसेच २००५ च्या सुधारणा येण्या पूर्वी मयात झाली आहे. सदर च्या कालवधी अस्तितवात असेलेले नियम हिंदू वारसा कायदा १९५६ च्या कलम ६ नुसार मुलीना त्यांचे वडिलोपार्जित जमिनी मध्ये हिस्सा मिळत असे पण तो हिस्सा हा प्रतीकात्मक वाटणी प्रमाणे म्हणजेच A च्या तीन मुलांना E ,F ,G यांना त्यांच्या जन्मापासून वडलांच्या जमिनीत १X५ प्रमाणे प्रत्येकी हिस्सा आणी विधवा पत्नी चा१X५ एक हिस्सा आणी वडिलांच्या उरलेले एक हिस्स्या मध्ये तीन मुली तसेच तीन मुले आणी विधवा पत्नी यांना हिस्सा मिळत असे . सर वरील शंका जर बरोबर असेल सदर च्या वरील तिन्ही मुलीना त्यांचे वडिलोपार्जित जमिनीं मध्ये हिस्सा मिळेल पण तो मुलां इतकाच नसायला पाहिजे. वरील अनुषंगा मला हे विच्रारचे आहे कि आज रोजी वरीलसर्व सात व्यक्ती कुढल्याही प्रकारचे वाटणी पत्र तथा अन्य कोणताही प्रकारचे दस्त न करता समसमान जमीन धारण करीत आहेत तर त्या मध्ये मुलांनी त्यावेळेस लागू असलेले नियमाप्रमाणे सात बारा वर नोंद लावण्या साठी काय करावे . तसेच सात बारा च्या दुरुस्ती सती काय करावे तसेच वरील प्रकार जर बरोबर असेल तर सात बारा कसा दुरुस्त करून मिळेल . कृपया मार्गदर्शन करावे प्रश्न जर अधिका गुंता गुंतीचा असेल तर किरण सर कृपया आपला पेर्सोणेल ई मेल किंवा फोन न. देणे जेणे करून शंके चे समाधान होईल. धन्यवाद ...सर्व मान्यवरांना गुढी पाडव्याचे तसेच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आपण सर्व मान्य वरांस सुखाचे समृद्धी चे जावो............
आपला प्रश्न अतिशय योग्य आहे वडील जर १९९४ पूर्वी मयत असतील हिंदू वारस कायद्यातील १९९४ व २००५ च्या सुधारणा व तरतुदी त्या वारसांना आजरोजी लागू होणार नाहीत.या बाबत मा.सुप्रीम कोर्टाचा मागील वर्षीचा निकाल आहे.तो निकाल आपण प्राप्त करून घ्यावा.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
१९९४ चा सुधारणा कायदा ( महाराष्ट्र ) , २००५ कायद्या द्वारे , मुलींना मुलांप्रमाणे वासिलांचे मिळकतीत ( वडिलांना जर मिळकत त्यांचे वडिलांकडून मिळाली असेल तर ) वडील हयात असताना , जमिनीची वाटणी करून मागण्याचा हक्क देण्यात आला
वासिल मयत आहेत
त्यांचे मृत्य पश्छात , विधवा पत्नी , तीन मुले , तीनमुली वारस आहेत ,
आता चालू असलेली कास्वणूक वारस हिस्स्या प्रमाणे आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपली सर्व कागदपत्रे पहिल्याशिवाय सल्ला देणे योग्य ठरणार नाही. आपण तज्ञ वकिलांचा सल्ला घेणे योग्य ठरेल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by अतुल नंदकिशोर थोरात
08-04-2016
thoratatul@yahoo.in
मा.सर
माझे आजोबा यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत.. माझी आजी मृत झाल्याला नंतर आजोबांचा सांभाळ आम्ही व चुलत्याने केला . पण काही कालावधीनंतर चुलत्याने आजोबांना त्रास देण्यास सुरवात केली आमचा मधून चुलता वेगळा झाला आणि त्याला घर बांधण्यासाठी माझा वडिलांनी व आजोबांनी १० लाख रुपये दिले. पण त्यानंतर चुलत्याने आजोबांना आमचा कडे येयला बांधी केली व त्यांनी(चुलत्याने) आजोबांना झोपेचे औषध चालू केले व नंतर आजोबांकडून मा.निबंधक यांस समोर रजि मृत्युपत्र तयार केले. त्यात दोनीही भावांना समान हिस्से दिले आहेत. पण त्यांनी आजोबा मृत होण्याच्या ३ महिन्याआधी नोटरी मृत्युपत्र तयार केले त्या वेळे आजोबा कोमा मध्ये होते. खोटे डॉक्टर सर्फिकेट जोडले. मुख्य म्हणजे त्यावेळेस आजोबा हॉस्पिटल मध्ये अडमिट होते त्याचा पुरावा सुद्धा आहे आमचा कडे त्या नोटरी मृतुपत्रात त्याने सर्व मालमत्ता स्वताचा नावे केली आहे. त्या बदल आम्ही मे. सिव्हील कोर्ट मध्ये अपील केल आहे. पण मुख्य म्हणजे चुलत्याने तलाठी व सर्कल यांस पैसे देऊन उताऱ्यावर स्वताच्या नावाची नोंद केली आहे ती नोंद रद्द करण्यासाठी आम्ही सर्कल या कडे अपील केले होते पण सर्कल यांनी ती नोंद योग्य असल्याचा निकाल दिला आहे त्या विरोधात आम्ही मा. प्रांताधिकारी कडे अपील केल आहे. आमचा हाच उदेश आहे की जो पर्यंत मे सिव्हील कोर्ट निकाल देत नाही तो पर्यंत यांनी कोणतीही नोंद करू नाही.मि त्यांना मे. सिव्हील कोर्टात चालू असलेली केस फाईल सादर केली तरीही ते निकाल देण्यास तयार नाही तर असा निकाल घेण्यासाठी काय तरतूद करू ? कृपया आपण मार्गदर्शन करावे.
अशी तर्त्तुद कायद्यात नाही
आपले बाजूने न्यायालयाचा निकाल आल्यावर चुलत्याचे एकट्याचे नावावर झालेली जमीन नोंद रद्द होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
महसुली न्यायालयात चालणारी केस जर दिवाणी न्यायालयात ही चालू असेल तर अशावेळी मा.दिवाणी न्यायालय यांचे निर्णयास अधीन राहून महसूल न्यायालय निर्णय देत असते.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
prakaran jo paryant ma . divani nyayalayat pravisht aahe to paryant stay babat ma . prantadhikari yanna arj karave .
Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार
Question by nandkishor thorat
08-04-2016
thoratatul9296@gmail.com
आम्ही दोन भाऊ व दोन बहिनी आहेत मी मोठा आहे माझ्या वडिलांनी मरण्या आधी में निबंधक साहेब यांपुढे रजि मृत्युपत्र केल आहे त्यात आम्हा दोन्ही भावांना रितसर मालमतेचे वाटप केले आहे पण दूसरे जे मृत्युपत्र केले आहे ते नोटरी असून त्यात फक्त लहान भावास मालमत्ता दिलेली आहे. ते दूसरे मृत्युपत्र संशयसपद आहे त्या विरोधात मे सिव्हिल कोर्ट मधे अपील केले आहे पण त्या नोटरी ची नोंद तलाठी साहेबानी उ त्ता ऱ्यावर केली आहे त्या विरोधात पण मे प्रांतअधिकारी साहेब यास कड़े अपील केले आहे. उदेश एवढाच आहे की जो पर्यन्त मे सिव्हिल कोर्ट चा निकाल येत नाही तो पर्यन्त त्याच्या नावाची नोंद करू नाही अन्यथा तो गैरव्यवहार करू शकतो असा निकाल मिळवण्यासाठी (नोंद होउ नये ) कायद्यात काही तरतूद आहे का ? असल्यास ACT सह सांगावे ही विनंती
सर्वात शेवटी केलेले मृत्युपत्र कायद्याने ग्राह्य मानले जाते. प्रांतअधिकारी यांचे कडून सत्य घ्यावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश रुद्रुके
07-04-2016
yogeshrudruke@gmail.com
नमस्कार सर
आमच्या गावामध्ये सिटी सर्वे १९८३ ला आला .माझ्या वडिलांनी गावठाणामध्ये १९८८ ला जागा खरेदी केली (८७ चो.मी.)
परंतु खरेदी दस्तावर सिटी सर्वे नंबर घातलेला नाही.सदर दस्ता मध्ये ग्रामपंचायत घर नंबर नमूद केलेला आहे .सदर जागेचा या अगोदर सन १९६३ व १९८२ ला खरेदी दस्त झालेला आहे .
या तीनही दस्त व सूची क्रमांक २ मधील क्षेत्र (८७ चो.मी.) व रस्ता यांची मापे सारखीच आहेत.
परंतु सिटी सर्वे ला सदर जागेची नोंद चुकीची नोंदली गेली आहे (५० चो.मी.). तसेच रस्ताची जागा ही शेजारच्या व्यक्तीच्या नावावर नोंदली आहे .
सदर जागेची ग्रामपंचायत रेकॉर्ड ला असणारी जुनी नोंद ग्रामपंचायत रेकॉर्ड सन २००० साली जळाले असल्यामुळे मिळत नाही .
सिटी सर्वे ऑफिस सदर जागेची दस्ता नुसार नोंद करीत नाही .
तरी सदर जागेची दस्ता नुसार नोंद करण्यासाठी काय करावे लागेल या विषयी मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती
२००० च्या पूर्वीचे जुने अभिलेख पुरावा प्राप्त करणेचा प्रयत्न करावा. असे अभिलेख काढून सिटी सर्व्हे ऑफीस ला तक्रार अर्ज करावा.अर्ज फेटाळला तर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे दाद मागावी.
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by संचित
07-04-2016
spyminded@yahoo.in
मा.महोदय, आम्ही ५ भावंडे आणि आमचे चुलत चुलते यांचेमध्ये सामाईक असलेल्या क्षेत्रावर चुलत चुलते व त्यांच्या कुटुंबीयांनी दांडगाईने व आमच्या उपरोक्ष बांधकामास सुरवात केली असता, आम्ही दिवाणी न्यायालयात कोर्ट वाटपाचा तसेच सदर क्षेत्रात बांधकाम, खोदकामास निरंतर मनाई हुकुम मिळण्याबाबत दावा केला. सदर दावा मंजूर होऊन कोर्ट आदेशान्वये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने भूमी अभिलेख कार्यालयाकडून तयार केलेली वाटप तक्त्यानुसार तहसीलदार कार्यालयाकडून मंडळ अधिकारी, कामगार तलाठी, भूमी अभिलेख कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांच्या उपस्थित आमच्या हिस्स्याच्या हद्दीच्या खुणा दाखविण्यात आल्या व ताबेपावती मिळाली. ताबा मिळालेल्या क्षेत्रात न्यायालयाचा आदेश डावलून चुलत चुलत्यांनी केलेले बांधकाम येते. तसेच मिळालेल्या हद्दीच्या खुनाद्वारे संबंधिताचे लगत असलेल्या आमच्या मालकीच्या गटातील अतिक्रमण सिद्ध होते. आठ दिवसांनी चुलत चुलत्यांच्या कुटुंबियांकडून आमच्या अनुपस्थितीत आमच्या हद्दीच्या खुणांची मोडतोड करण्यात आली. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली असता समाज देण्यासाठी संबंधिताना बोलाविले असता 'आम्ही तुम्हास ताबा दिला नाही आणि देणारही नाही' असे सांगण्यात आले.पोलिस उदासीन आहेत, तक्रार अर्जावर साधी पोहोच देण्यास टाळाटाळ करतात. तसेच सदर कोर्ट वाटपाची फेर नोंद ७/१२ वर होण्यास विलंब लागणार आहे (Online Process ठप्प आहे). त्यामुळे Specific Relief Act नुसार संबधितांवर दावा दाखल करता येत नाही. तरी सदर क्षेत्राचा ताबा मिळणेसाठी व त्यांनी न्यायालयाचा आदेश डावलून केलेले घराचे अतिक्रमण काढण्यासाठी काय कारवाई करावी लागेल. वरच्या कोर्टात अपील करण्याऐवजी महसूल अधिकार्यांकडे अपील करून प्रोसेसमध्ये गुंतवून हेतुपुरस्सर विलंब केला जात आहे व मानसिक त्रास व धमक्या दिल्या जात आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.
७/१२ जरी सध्या आपले नावावर झाला नसला तरी , आपणास The Specific Relief Act खालीच दावा दाखल करावा लागेल व न्यायालयास आपले चुलत बंधूंचे विरुद्ध आपले वाहिवातीस अडथला न करणे बाबत कायमचा मनाई हुकुम कलम ३७ अन्वये मागवा लागेल .
याच दाव्यात अतिक्रमण चुलत बंधूंनी त्यांचे खर्चाने दूर करून देणे बाबत मागणी करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
ज्या कोर्टाने आदेश दिला त्या कोर्टात आदेशाच्या अवमानाचा अर्ज दाखल करा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सविता sinde
05-04-2016
savishinde12@gmail.com
आदरणीय सर नमस्कार
एकत्रित कुटुंबतले जमिनीचे वाटप पत्र करताना इतर अधिकारतीलअधिकारतील व्यक्तीचे नाव तसेच ठेऊन (तिची परवानगी न घेता) वाटप पत्र केलेले असल्यास त्यावर तलठ्यकडे आक्षेप नोंदवाला । परंतु जानकार लोक सांगतात की महसुली दावे अधिकारी manage होतात, असे होउ नए म्हणून काय करावे? तसेच वाटप नोंद होउ नए म्हणून कोर्टात दावा दाखल करुन नोंद होउ नये म्हणून काय करावे ?
2 नोंद होउ नये म्हणून कोर्ट काही आदेश देऊ शकते काय? त्याला किती वेळ लागेल
तुम्ही केलेल्या वाटप पत्राला कायदेशीर आधार काय याचा खुलासा करावा.
इतर अधिकारातील व्यक्तीचा कायदेशीर अधिकार काय याचा खुलासा करावा.
महसुली दावे अधिकारी manage होतात या गोष्टीत तथ्य नाही, तुमचे पुरावे भक्कम असतील तर काळजी करू नका.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by कुणाल अंकुश जाधव
05-04-2016
mr.k1387@gmail.com
एखादे अधिकारी / कर्मचारी यांची सेवा दुसऱ्या कार्यालयात वर्ग झालेली असल्यास त्यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याचे / प्रतिवेदनाचे अधिकार कोणास आहेत ? सेवा वर्ग कार्यालयाचे कार्यालय प्रमुख की मूळ आस्थापनेचे कार्यालय प्रमुख ?
Question by श्रीनिवास खेडकर
05-04-2016
khedkarshriniwas1987@gmail.com
सर,
जर एखाद्या जमिनीवरती दत्तक मुलाचे नाव वारसाने दाखल करायचे असल्यास त्या अर्जदाराने कोणती कागद पत्रे सादर करणे आवश्यक आहेत
Question by rohit
04-04-2016
rhtpatil168@gmail.com
सर वडिलांनी रजिस्त्टर वाटणी पत्र करुन दिले पण एकच मुलाला सर्व जमीन दिली मग बाकि मुलाना त्यात हक्क नहीं का
Question by शिवाजीराजे
03-04-2016
shivajirajetarale@gmail.com
सर नमस्कार ,
ग्रामसभेने ठरावानुसार नोद बदलली आहे त्यावर ग्रामसेवकाची शी आहे सरपंचाची सहि नाही. त्या ग्रामसभेला सरपंच हजर होते पण उप सरपंचाची सही आहे व उतार्यावर फक्त ग्रामसेवकाचीच सही आहे तसे चालते का ?
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3433 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
